Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by राजेश घासकडवी on Tue, 11/30/2010 - 07:15
वॉशिंग्टन - नुकत्याच विकीलीक्सवर गोपनीय कागदपत्रांच्या प्रसिद्धीमुळे अमेरिकेत खळबळ उडालेली आहे. अमेरिकेच्या गृहखात्याने या घटनेचा धिक्कार केलेला असून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा दावा केला आहे. तर विकीलीक्सच्या मते अमेरिकन सरकारने महत्त्वाच्या बातम्या गोपनीयतेची सबब सांगून जनतेपासून लपवून ठेवल्या होत्या. या एकमेकांवरच्या चिखलफेकीच्या वातावरणात त्या कागदपत्रांमधून बाहेर येणाऱ्या सत्यांमुळे अमेरिकन सरकारची परिस्थिती अधिकच बिकट झालेली आहे. आमच्या वार्ताहराने या कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर एक सनसनाटी बातमी हाती लागली. ती म्हणजे ३_१४ विक्षिप्त अदिती ऊर्फ श्री. श्री. सौ. सौ. अदितीअम्मादेवी, ऊर्फ अदिती अवखळकर पाटील ऊर्फ जोजोकाकू ऊर्फ आज्जीबाई ऊर्फ दुर्बिटणेताई अशा अनेक 'जाली' नावांनी वावरणाऱ्या अदिती यांना अमेरिकेचा व्हिसा मान्य झालेला आहे, इतकंच नव्हे तर अमेरिकन सरकारने काही कारवाई केली नाही तर या शुक्रवारी त्या अमेरिकेत येऊन ठाकतील देखील. ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर जनसामान्यांत एकच गदारोळ उठला. कीप अमेरिका नॉइज पोल्यूशन फ्री डॉट कॉम ने सर्वात मोठा 'आवाज' उठवला आहे. वी लव्ह काम अॅंड क्वाएट डॉट कॉम वरही अशीच बोंब सुरू आहे. 'काहीच वर्षांपूर्वी इंग्लंडमधल्या एका शांत खेड्याचं काय झालं हे सर्वांनाच माहिती आहे. आम्हाला ते इथे व्हायला नको.' 'गो बॅक अदिती' अशा पोस्ट्स तिथे सर्रास दिसू लागल्या आहेत. अदिती यांच्या काड्यालावू कारवाया अमेरिकेत सुरू होऊ नयेत याबद्दल लोकांमध्ये एकमत आहे. अशा व्यक्तीला मुळात व्हिसा मिळतोच कसा असा प्रश्न सर्वजण उपस्थित करत आहेत. अमेरिकन सरकारने मुद्दामच त्यांना आमंत्रण दिलेलं असून हा प्रकार जगजाहीर होऊ नये यासाठी ते गोपनीयतेच्या वेष्टनात गुंडाळून ठेवलं असा एकंदरीत सूर दिसतो. किंबहुना अदिती यांच्या भारतातल्या कारवायांना अमेरिकेतील उच्चपदस्थांचा सक्रीय पाठिंबा होता असाही आरोप होतो आहे. अमेरिकेतील काही उच्चपदस्थांचा अदिती यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे हीही बाब आता उघड झाली आहे. या सर्व प्रकरणामुळे अमेरिकन सरकारची चांगलीच भंबेरी उडाली असून प्रकरण राज्यसचिव (गृहमंत्री) हिलरी क्लिंटन यांपर्यंत पोचलेलं आहे. त्यांनी आमच्या वार्ताहराला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा विकीलीक्सचा निषेध केला. 'राष्ट्रीय महत्त्वाची गोपनीय कागदपत्रं प्रकाशित केल्याने सुरक्षेला धोका' हा मंत्र म्हणून दाखवला. मात्र राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेल्या अशा गोष्टी दडवून का ठेवल्या गेल्या हे विचारल्यावर मात्र त्यांनी सारवासारव केली. 'अदिती यांना कदाचित नजरचुकीने व्हिसा दिला गेला असावा. त्यांनी व्हिसासाठी अर्ज करताना 'संहिता जोशी' या नावाखाली केला. त्यामुळे ही गफलत झाली असावी. सरकार युद्धपातळीवर या घटनेचा मागोवा घेत आहे' असं सांगितलं. अदिती यांना व्हिसा मिळण्यातल्या धोक्याची कल्पना आहे का, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या 'अर्थातच. अमेरिकन जनतेची शांतताप्रियता मला ठाऊक आहे. किंबहुना बराक ओबामा भारतात गेले होते तेव्हा महिनाभर आधी व त्यानंतरही अदिती हा शब्द असलेल्या मेल्स, फोनसंभाषणं, व चॅट मेसेजेस आम्ही टॅप करत होतो. पण दुर्दैवाने आमचा सर्व्हर तेवढ्यानेच भरून गेला व ओबामांच्या सुरक्षिततेसाठीच्या कारवायांना जागा कमी पडणार की काय अशी भीती वाटली. म्हणून आम्ही काही काळापुरते भारतातले सर्व्हरच बंद पाडून टाकले' (मिपाचा सर्व्हर चारपाच दिवस बंद पडण्यास नक्की जबाबदार कोण यावर आता कदाचित प्रकाश पडेल!) दरम्यान भारतात या बातमीमुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. विशेषतः पुण्यात तर जल्लोष सुरू झालेला आहे. 'अदिती गावकुसाबाहेर राहतील अशी व्यवस्था केली होती, पण तरीही त्या पूर्णपणे दूर जाणार हे ऐकून सुटकेचा निश्वासच टाकते' अशी प्रतिक्रिया मिळाली. कुठच्याशा पूज्य व्यक्तिमत्वाबद्दल हीन लेखन करण्यास एका पाश्चात्य लेखकाला पुणे युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीची मदत झाली होती त्याबद्दल शिक्षा म्हणून कुठच्याशा सेनेने त्यांना युनिव्हर्सिटीमध्ये नोकरी द्यायला लावली होती, असं आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. 'खरं तर आम्ही त्यावेळी - यापेक्षा युनिव्हर्सिटीची थोडी तोडफोड वगैरे करा - असं म्हणत होतो' पुणे युनिव्हर्सिटीचे कुलगुरु नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हणाले. 'पण हरकत नाही. हा काळा काळ संपला एकदाचा. यावर्षी नव्या वर्षाचं स्वागत समारंभ ३ डिसेंबरलाच सुरू होईल. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना व स्टाफला आठवड्याची सुटी जाहीर करण्यात आलेली आहे.' सर्वसामान्य लोकांनीही गावभर दिवाळीचे उरलेले - सचिनचं पन्नासावं शतक होईल तेव्हा वापरायचे म्हणून ठेवलेले - फटाके वाजवायला सुरूवात केली आहे. 'आदर्श घोटाळा, टु जी घोटाळा वगैरे छप्पन्न घोटाळे या चांगल्या बातमीवर कुर्बान' असंही काहींनी म्हणून दाखवलं - अर्थातच नाव जाहीर न करण्याच्या अटीवर. आम्हाला आतल्या गोटातून मिळालेल्या बातमीनुसार अदिती यांचं भावी अमेरिकागमन हे मुळीच गुप्त नव्हतं. किंबहुना अदिती यांनीच मी जाणार, जाणार असा धोषा लावला होता. आपलं व्हिसा प्रोसेसिंग कसं चालू आहे याबद्दलच्या बित्तंबातम्या काहीशा अनाहुतपणेच त्या आसपासच्या लोकांकडे जाहीर करत होत्या. तो अर्थातच 'आपणही अमेरिकेला चाललो हे दाखवून देण्याचा क्षीण प्रयत्न' होता याबद्दल कोणाला शंका नाही. पण इतकं उघड गुपित अमेरिकन सरकारला ठाऊक नसावं हे विश्वासार्ह वाटत नाही. एकंदरीत अमेरिकन सरकारचं - काड्याघालू कारवाया करणाऱ्यांचा जाहीरपणे धिक्कार करायचा पण प्रत्यक्षात त्यांना मदतच करायची - असं दुटप्पी धोरण पुन्हा उघडकीला आलं आहे यात वाद नाही. यामुळे गोपनीयता व सरकारची लबाडी याबद्दलचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. इतक्या उच्चपदस्थांचे हितसंबंध गुंतले गेले असल्यामुळे आम्हाला सरकार काहीही कारवाई करणार नाही व अदिती अमेरिकेत येऊन पोचणार याबद्दल काडीमात्र शंका नाही. तेव्हा आम्हीही त्यांचं आगाऊ(पणे) अभिनंदनच करतो. पण या राजकीय साठमारीत सामान्य हिरवं गवत भरडलं जावं तशी हिरवी जनता भरडली जाते. पण ते तर कायमच होत आलं आहे. कालाय तस्मै नमः - आणखीन काय लिहिणार? तुम्हाला व्यक्तिशः या घटनेविषयी काय वाटतं ते जरूर लिहा.
  • Log in or register to post comments
  • 15412 views

प्रतिक्रिया

Submitted by श्रावण मोडक on Tue, 11/30/2010 - 12:54

In reply to डिपेंडंट व्हिजा? by कवितानागेश

Permalink

­अर्रे

अवांतर सल्ला: फावल्या वेळात भरतकाम-विणकाम शिक बरे!
­अर्रे? ­­­भरतकाम, वि­णकाम ­(पहिल्या ­अक्षराचे ­शुद्­धले­खन, ­शुद्­धले­खन...­­!)­ हीही खु­षखबर ­आहे होय! वा... वा... ते काय म्ह­णतात ना दु­धात सा­खर... तसं ­झालं हे! ;­)
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Tue, 11/30/2010 - 13:26

In reply to ­अर्रे by श्रावण मोडक

Permalink

जन्माने नागरिकत्त्व

हीही खु­षखबर ­आहे होय! वा... वा... ते काय म्ह­णतात ना दु­धात सा­खर... तसं ­झालं हे! ;­) अपत्याच्या जन्माने नागरिकत्त्वाची शिडी वापरून अमेरिकन नागरिकत्त्व मिळवायचा ही&हि प्रयत्न असला तरी आवडला म्हटले पाहिजे ;) (भारतीय)बेसनलाडू असे झाल्याने हिरवा माज आयताच जीवनाचे अविभाज्य अंग बनणार, हेही ओघाने आलेच. त्यामुळे आता अमेरिकास्थित हिरव्या माजोरड्यांकडून तो शिकायला नको ;) (अमेरिकास्थित)बेसनलाडू (सर्व संबंधितांनी ह. घ्या.)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Wed, 12/01/2010 - 01:03

In reply to जन्माने नागरिकत्त्व by बेसनलाडू

Permalink

ह. घ्या????????? द.सुध्दा घेतली.

(अमेरिकास्थित)बेसनलाडू (सर्व संबंधितांनी ह. घ्या.) ह. घ्या????????? :( द.सुध्दा घेतली. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Tue, 11/30/2010 - 11:23

Permalink

कशाला येताय इथे? नाही म्हणजे

कशाला येताय इथे? नाही म्हणजे काय काम आहे असं प्रेमाने विचारलं हो!!! ( जायचं तिथे जायचं? उगीच सगळीकडे लेख टाकू टाकू अन फोटो टाकू टाकू जाहिरात कशाला? हे आपलं मनातल्या मनात - माझ्याच)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 11/30/2010 - 11:32

In reply to कशाला येताय इथे? नाही म्हणजे by शिल्पा ब

Permalink

( जायचं तिथे जायचं? उगीच

( जायचं तिथे जायचं? उगीच सगळीकडे लेख टाकू टाकू अन फोटो टाकू टाकू जाहिरात कशाला? हे आपलं मनातल्या मनात - माझ्याच)
सहमत सहमत सहमत ! एका पुणेद्वेष्ट्याने दुसर्‍या पुणेद्वेष्ट्याच्या केलेला कौतुक सोहळा असे ह्या धाग्याचे स्वरुप वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Wed, 12/01/2010 - 01:08

In reply to ( जायचं तिथे जायचं? उगीच by परिकथेतील राजकुमार

Permalink

हे मात्र बरीक खरे हों. (हो वरच्या टिंबाची दखल घ्यावी)

सहमत सहमत सहमत ! एका पुणेद्वेष्ट्याने दुसर्‍या पुणेद्वेष्ट्याच्या केलेला कौतुक सोहळा असे ह्या धाग्याचे स्वरुप वाटते. सहमत सहमत सहमत ! त्याच बरोबर असे वाटले की.......................... जाउ दे. जाण्या-याला कशाला दुखवा. शुभास्ते पंथानः संतु:
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 12/01/2010 - 07:18

In reply to हे मात्र बरीक खरे हों. (हो वरच्या टिंबाची दखल घ्यावी) by चिंतामणी

Permalink

अहो फक्त भारतातून अमेरिकेत

अहो फक्त भारतातून अमेरिकेत जाणार आहे...जगातून नाही....दुखवा इथेच काय दुखवायचं ते
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 12/01/2010 - 15:00

In reply to ( जायचं तिथे जायचं? उगीच by परिकथेतील राजकुमार

Permalink

परा प्रोत्साहन मंडळ

एका पुणेद्वेष्ट्याने दुसर्‍या पुणेद्वेष्ट्याच्या केलेला कौतुक सोहळा असे ह्या धाग्याचे स्वरुप वाटते.
पुण्यासारख्या पुण्य शहराचं नाव अकारण घुसडून देऊन धाग्याचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न क्षीण असला तरी आपल्याला आवडला. पराभाऊ, तुम्हाला प्रोत्साहन मंडळात भागीदारी करण्याची गरज नाही. तुम्ही एकटेच लय भारी आहात. तुमची स्वतःची कंपनी काढलीत तर आमच्या सगळ्या लेखनाची कॉंट्रॅक्टं तुमच्याकडेच! काय बोलताय?
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 12/01/2010 - 15:03

In reply to परा प्रोत्साहन मंडळ by राजेश घासकडवी

Permalink

होलसेल डिस्काऊंट देतो का हो

होलसेल डिस्काऊंट देतो का हो तो? पर्‍या, "तुझा भाव काय"?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 12/01/2010 - 15:09

In reply to होलसेल डिस्काऊंट देतो का हो by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

पुण्यासारख्या पुण्य शहराचं

पुण्यासारख्या पुण्य शहराचं नाव अकारण घुसडून देऊन धाग्याचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न क्षीण असला तरी आपल्याला आवडला. पराभाऊ, तुम्हाला प्रोत्साहन मंडळात भागीदारी करण्याची गरज नाही. तुम्ही एकटेच लय भारी आहात. तुमची स्वतःची कंपनी काढलीत तर आमच्या सगळ्या लेखनाची कॉंट्रॅक्टं तुमच्याकडेच! काय बोलताय?
बसु आणि बोलु एकदा.
पर्‍या, "तुझा भाव काय"?
अदिती... 'भाव' इज हॉरिबली मिडलक्लास वर्ड. 'रेट' म्हण ग ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Wed, 12/01/2010 - 15:12

In reply to पुण्यासारख्या पुण्य शहराचं by परिकथेतील राजकुमार

Permalink

असं होय, मल्ला वाटे, तुझ्या

असं होय, मल्ला वाटे, तुझ्या भावाबद्द्ल विचारते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 12/01/2010 - 15:14

In reply to पुण्यासारख्या पुण्य शहराचं by परिकथेतील राजकुमार

Permalink

'भाव' इज हॉरिबली मिडलक्लास

'भाव' इज हॉरिबली मिडलक्लास वर्ड.
कार्पेटखालचा दांभिक कचरा बर्‍याच दिवसांत साफ न केल्यामुळे बहुदा असा मध्यमवर्गीय भावूक शब्द आठवला. असो. बाकी काय म्हणालात तुमचा रेट?
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Wed, 12/01/2010 - 15:10

In reply to होलसेल डिस्काऊंट देतो का हो by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

पर्‍या तुझ्या भावाचे नाव सांग

पर्‍या तुझ्या भावाचे नाव सांग का मी सांगु ?
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 12/01/2010 - 15:15

In reply to होलसेल डिस्काऊंट देतो का हो by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

हो तर...

होलसेल डिस्काऊंट देतो का हो तो? पर्‍या, "तुझा भाव काय"?
पण त्यासाठी एक लक्षात ठेवायचं. फार भाव द्यायचा नाही. भाव करायचा. काही कष्टमर नुसते अय्या म्हणून पळून जातात. आपण शांतपणे 'मी शंभर रुपये तासाला देईन' म्हणून सुरूवात करायची. मग द्यायचे थोडे जास्त. शेवटी त्यालाही पोट आहेच ना.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 12/01/2010 - 15:25

In reply to हो तर... by राजेश घासकडवी

Permalink

बाकी काय म्हणालात तुमचा

बाकी काय म्हणालात तुमचा रेट?
नका विचारु. तुमच्या आवाक्याबाहेरचा आहे.
आपण शांतपणे 'मी शंभर रुपये तासाला देईन' म्हणून सुरूवात करायची.
अशा लोकांना आम्ही रँबोकडे पाठवतो ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 12/01/2010 - 15:28

In reply to हो तर... by राजेश घासकडवी

Permalink

अरेच्चा, कष्टंबरांनाच पैसे

अरेच्चा, कष्टंबरांनाच पैसे मिळतात! खूपच उत्तम समाजसेवा सुरू आहे ही!!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 12/01/2010 - 15:34

In reply to अरेच्चा, कष्टंबरांनाच पैसे by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

customer satisfaction is our

customer satisfaction is our motto.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 12/01/2010 - 15:41

In reply to customer satisfaction is our by परिकथेतील राजकुमार

Permalink

क्लिशे

पुणेरी असूनही आपल्याला इंग्लिश येतं हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 12/01/2010 - 15:44

In reply to क्लिशे by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

छे ! तु हिरव्या देशात निघालीस

छे ! तु हिरव्या देशात निघालीस म्हणुन तयारी करुन घेतोय तुझी.
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Wed, 12/01/2010 - 15:45

In reply to क्लिशे by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

किती गो क्लेश देशील अजून

किती गो क्लेश देशील अजून पुणेकरांस? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 12/01/2010 - 16:02

In reply to किती गो क्लेश देशील अजून by मेघवेडा

Permalink

पुणेकरांना काहीही फुकट मिळालं

पुणेकरांना काहीही फुकट मिळालं की ते घेतात त्यात माझा काय दोष?
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 12/01/2010 - 16:06

In reply to पुणेकरांना काहीही फुकट मिळालं by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

तसं नाही. तुम्ही काहीतरी फुकट

तसं नाही. तुम्ही काहीतरी फुकट देता आहात त्याचे अप्रुप आहे. ;) बाकी पुणेद्वेष्ट्यांचा खच आहे मिपावर. त्याचे एवढे कौतुक नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 12/01/2010 - 15:39

In reply to अरेच्चा, कष्टंबरांनाच पैसे by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

दुकानदार...

अगं, इतका घोटाळा कसा गं करतेस. पुण्यातले फेमस दुकानदार ते. आपण कष्टमर. (दुकानदाराने दिलेल्या कष्टाने मरतो तो)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 12/01/2010 - 15:40

In reply to दुकानदार... by राजेश घासकडवी

Permalink

गुर्जी इतके कसे हो तुम्ही

गुर्जी इतके कसे हो तुम्ही अडाणी? आता सर्कारी म्हटल्यावर घोटाळा होणारच ना?? अजून हिरवी झाले नाहीये मी!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 12/01/2010 - 15:42

In reply to दुकानदार... by राजेश घासकडवी

Permalink

आले आले.... फिरुन फिरुन

आले आले.... फिरुन फिरुन पुणेद्वेष चौकात आले परत गुर्जी.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 12/01/2010 - 15:58

In reply to आले आले.... फिरुन फिरुन by परिकथेतील राजकुमार

Permalink

मुळात या धाग्यावरच्या

मुळात या धाग्यावरच्या प्रतिसादांत पुण्याचा उल्लेख कोणी केला? ऑ? ऑ?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 12/01/2010 - 16:03

In reply to मुळात या धाग्यावरच्या by राजेश घासकडवी

Permalink

मी तुमच्या स्वभावाचा (पक्षी :

मी तुमच्या स्वभावाचा (पक्षी : पुणेद्वेष) उल्लेख केलेला आहे !! विनाकारण अकारण केलेले आरोप सहन केले जाणार नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 12/01/2010 - 16:17

In reply to मी तुमच्या स्वभावाचा (पक्षी : by परिकथेतील राजकुमार

Permalink

उलट्या बोंबा

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. एका विक्षिप्त पुणेरी दुकानदाराची कहाणी सांगितली तर शहरद्वेषाचा आरोप पदरात पडतो. तोही एका पुणेरी दुकानदाराकडून. विनाकारण + अकारण!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 12/01/2010 - 16:24

In reply to उलट्या बोंबा by राजेश घासकडवी

Permalink

बघा तुम्ही आता मला चोर म्हणत

बघा तुम्ही आता मला चोर म्हणत आहात. कित्ती कित्ती द्वेष भरलाय तुमच्या विषारी मनात. अरे कोणी जबाबदार पुणेकर संपादक* आहे का इकडे ? *आजकाल आपापल्या गावातल्या संपादकांना पकडून राहिलेले बरे असते. जल्ला कधी सदस्यत्वावर कुर्‍हाड आली तर उपयोग होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 12/01/2010 - 16:30

In reply to बघा तुम्ही आता मला चोर म्हणत by परिकथेतील राजकुमार

Permalink

अरे कोणी जबाबदार पुणेकर

अरे कोणी जबाबदार पुणेकर संपादक* आहे का इकडे ?
जबाबदार हे विशेषण पुणेकर साठी आहे की संपादक साठी? तुमच्या कोणाविषयी अतिरेकी अपेक्षा आहेत असं म्हणू? मीही हाक मारतो ना हिरव्या संपादकांना. होऊनच जाऊदेत. कोण आहे रे तिकडे?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 12/01/2010 - 16:33

In reply to अरे कोणी जबाबदार पुणेकर by राजेश घासकडवी

Permalink

खरेतर जबाबदार संपादक म्हणजेच

खरेतर जबाबदार संपादक म्हणजेच पुणेकर संपादक. हि द्विरुक्ती आहे. असो... तुम्हाला आता हे युद्ध संपादक पातळीवर खेळायचे असल्यास हरकत नाही. मात्र आमच्या काही छुप्या देशी संपादकांनी अंधारात हल्ला केल्यास तक्रार करु नका म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 12/01/2010 - 16:37

In reply to खरेतर जबाबदार संपादक म्हणजेच by परिकथेतील राजकुमार

Permalink

मेलो !!!!

तुम्हाला आता हे युद्ध संपादक पातळीवर खेळायचे असल्यास हरकत नाही. मात्र आमच्या काही छुप्या देशी संपादकांनी अंधारात हल्ला केल्यास तक्रार करु नका म्हणजे झाले.
=)) =)) =)) =)) और ये लगा सिक्सर !!! दंगा बास करा रे आता ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 12/01/2010 - 16:40

In reply to मेलो !!!! by छोटा डॉन

Permalink

दंगा बास करा रे आता आमच्या

दंगा बास करा रे आता
आमच्या धाग्याचा ट्यार्पी वाढण्याची जळजळ पोहोचली हो डाण्राव.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 12/01/2010 - 16:40

In reply to खरेतर जबाबदार संपादक म्हणजेच by परिकथेतील राजकुमार

Permalink

अच्छा, म्हणजे तुम्ही आता

अच्छा, म्हणजे तुम्ही आता बिनपुणेकर संपादकांना बेजबाबदार म्हणताय तर... असं दुहीचं राजकारण खेळताय, ते महागात पडेल. वेळ जायला वेळ लागत नाही. अशीही वेळ येईल की तुमच्या पुण्यात अंधार असेल तेव्हा हिरव्या देशात उजेड असेल. आणि ते होईल तेव्हा पहिला वार....
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 12/01/2010 - 16:46

In reply to अच्छा, म्हणजे तुम्ही आता by राजेश घासकडवी

Permalink

अच्छा, म्हणजे तुम्ही आता

अच्छा, म्हणजे तुम्ही आता बिनपुणेकर संपादकांना बेजबाबदार म्हणताय तर...
हे बघा गुर्जी, सचिन जबाबदारीने खेळला असे जेंव्हा आम्ही म्हणतो तेंव्हा नेहरा खेळला नाही असा त्याचा अर्थ काढायचा नसतो. ते वाक्य सचिनच्या कौतुकापुरते सिमित असते. तुमच्यासारखे नारदमुनी उगाच अर्थाचे अनर्थ तयार करुन जालिय दंगली पेटवता आणि त्यावर आपल्या स्वार्थाची पोळी भाजुन घेता. आत तरी जागे व्हा, निदान बिहारच्या उदाहरणावरुन तरी शहाणे व्हा ! असो... डान्रावांनी दंगा नको म्हणल्याने आम्ही आता अंमळ विश्रांती घेतो. देर इज आलवेज अ फस्ट टैम आलवेज अ नेक्स्ट टैम... (घासुगुर्जी) नेक्स्ट टैम... दबंग परा पांडे
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 12/01/2010 - 16:47

In reply to अच्छा, म्हणजे तुम्ही आता by राजेश घासकडवी

Permalink

तुमच्या पुण्यात अंधार असेल

तुमच्या पुण्यात अंधार असेल तेव्हा हिरव्या देशात उजेड असेल.
अजून सव्वा-दीड तासांत अंधारच होईल हो गुर्जी!
  • Log in or register to post comments

Submitted by बद्दु on Tue, 11/30/2010 - 11:27

Permalink

हे हे हे

बाकी काही असो...." पुणे युनिव्हर्सिटीचे कुलगुरु नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हणाले. ".... हे वाक्य काळजाला भिडलं...
  • Log in or register to post comments

Submitted by sagarparadkar on Tue, 11/30/2010 - 12:01

Permalink

काही नवे क्षक्षक्षस्थ असे ...

न्युझीलंड वासी --- किविस्थ जपानवासी -- जपानस्थ किंवा नवसूर्यभूमिस्थ ऑस्ट्रेलियावासी -- जाणकारांसाठी थोडा खुराक म्हणून सोडलंय पूर्वयुरोपवासी -- जाणकारांसाठी थोडा खुराक म्हणून सोडलंय ब्रिटनवासी -- आंग्लभूमिस्थ अमेरिकावासी -- ईस्टकोस्ट्स्थ (पूर्वतटस्थ), मध्यभूमिस्थ, पर्वत्भूमिस्थ, वेस्ट्कोस्टस्थ (पश्चिमतटस्थ) आखात वासी -- मरूभूमिस्थ / मध्यपूर्वस्थ / तैलभूमिस्थ
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Tue, 11/30/2010 - 13:34

Permalink

एक शब्द कळला तर शप्पथ ! काय

एक शब्द कळला तर शप्पथ ! काय लिहितात ते, सगळ्यांसाठि लेख करा ना.
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Tue, 11/30/2010 - 15:10

Permalink

३_१४ताइंचे आभीनंदन

३_१४ताइंचे हारदीक आभीनंदन. आयला फ्लेक्सवाले कुट उलथले सगळे? 'तसा' तरुणी रुदय समराट स्टाइल एखादा टाकावा का काय?
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 12/01/2010 - 22:18

Permalink

खुटं खुटं जायाचं?

उगवतीच्या राज्यांमध्ये "गोल"माल होण्याची अपेक्षा की अस्तांचलात? का हिरव्या देशाच्या लालेलाल काळजावरच घाव घालण्याचा बेत आहे?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com