Skip to main content

माझा एक थरारक अनुभव

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 16/07/2010 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत असताना कामानिमित्त मला ट्रेनने प्रवास करावा लागायचा....आधी ट्रेनने दादरला तिथून मग ट्रेन बदलून पुढे...मला सवय झाली होती...न होऊन सांगतेय कोणाला.. खरं तर गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास हा थरारकच असतो...त्याशिवाय कोणतंही विशेषण त्याला शोभून दिसत नाही...आधी भयानक गर्दीत हव्या त्या platform वर जाणे, तिथून हव्या त्या डब्यासमोर उभे राहणे आणि गाडी आली कि आपली पर्स आणि जीव सांभाळून त्या गाडीत चढणे आणि आपले स्टेशन आल्यावर काही सेकंदात परत आपला जीव आणि पर्स होता तसा घेऊन उतरणे हेच एक दिव्य असते... त्या डब्यात चढताना बघणाऱ्याला गंमत वाटावी अशा घटना रोजच घडत असतात...एकदा गाडी थांबल्यावर बायकांच्या (सेकंडक्लासच्या) डब्यातून एक भरलेली गोणी धडपडली आणि मग तिच्यावर गोष्टीतल्या उद्रांसार्ख समोरचा काही दिसत नसल्यासारख्या एकावर एक अजून गोण्या येऊन आदळल्या...आम्ही अर्थातच फिदीफिदी हसून घेतले...अजून एकदा मी गाडीत चढताना अचानक कोणीतरी माझ्या पाठीत मारलं..मग मी संतापून दुसऱ्या एकीच्या पाठीत गुद्दा घातला...तिने पाहिलं आणि अजून मला मारायला धावली आणि मी पण प्रतिकाराच्या पवित्र्यात उभी राहिले पण गाडी सोडायचा धोका आम्हाला असल्या फालतू कारणासाठी घ्यायचा नसल्याने ते तिथेच थांबलं... असो, तर काय ? हं..माझा अनुभव ....झालं काय कि मी नेहमीप्रमाणे दादरात उतरायला म्हणून दारात उभी होते...हि SSSSS गर्दी....तशातच गाडी थांबल्यावर मी उतरून घेतले पण....माझी पर्स कोणीतरी धरून ठेवली....इतर बायका मला धक्काबुक्की करून आत चढल्या आणि उतरल्या...मी आपली दारातच एक हात दांड्याला धरून उभी...ती बाई काही पर्स सोडायला तयार नाही...तिला वाटलं असेल जीवाच्या भीतीने मी पर्स सोडून देईन...पण त्यात माझे त्यावेळेसचे २-३ हजार रुपये होते शिवाय बस पास ,ट्रेन पास अजून काही चिल्लर गोष्टी...तर मी काही पर्स सोडली नाही आणि तिनेपण ...लोकल चालू झाली ....मी पण एका हाताने दांडा धरून ठेवला आणि पळत पळत दुसऱ्या हाताने त्या बाईच्या हातावर गुद्दे मारायला सुरुवात केली...गाडीने वेग घेतला आणि मी पण...शेवटी तिने पर्स सोडली.... एवढं सगळं गर्दीने गजबजलेल्या दादरातल्या स्टेशनवर....ना गाडीतल्या दारात उभ्या असलेल्यांनी मदत केली ना फलाटावर उभे असलेल्या कोणी काही इंटरेस्ट दाखवला.....हा प्रकार झाल्यावर मी आपली जसं काही झालंच नाही अशी दुसरी लोकल पकडायला निघून गेले आणि इतरांसाठी काही झालेच नसल्याने तसाही काही वाटण्याचा प्रश्न आला नाही.. तर असा हा माझा एक अनुभव.

वाचने 15393
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

धाग्यावरील बरेचसे प्रतिसाद अवांतर आहेत. रेवती

In reply to by Nile

आम्ही सगळ्यांना फाट्यावर मारतो म्हणून कोणी संबंधित प्रतिसाद दिले किंवा नाही दिले तरी आम्ही धागा उडवणार नाही....हे तुम्ही (आणि कोणीही) कसेही घ्या. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

आम्ही सगळ्यांना फाट्यावर मारतो म्हणून कोणी संबंधित प्रतिसाद दिले किंवा नाही दिले तरी आम्ही धागा उडवणार नाही....हे तुम्ही (आणि कोणीही) कसेही घ्या.
मस्तच ! हे आवडले. तुम्ही 'फेडअप' झाला नाहीत ह्याचे कौतुक वाटते. सहजश्रीचा मित्र ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

एवढ्या बारीक सारीक कारणांनी फेडअप व्हायला आम्ही काही अगदीच "हे" नाही.. :D *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by Nile

नाईल, आपला उपप्रतिसाद अजिबात आवडला नाही. यापुढे आपण सद्स्य रेवतीला प्रतिसाद अथवा उपप्रतिसाद न द्याल तर बरे होइल. संपादक म्हणून जे माझे काम आहे ते करीनच. आपण काळजी करू नये. कोणत्या धाग्यावर मौन पाळायचे हे ठरवण्याचे अधिकार मला आहेत. रेवती

In reply to by रेवती

कोणत्या धाग्यावर मौन पाळायचे हे ठरवण्याचे अधिकार मला आहेत. म्हणजे मराठीत ज्याला पार्शलिटी म्हणतात तसा प्रकार वाटतो..दुटप्पी धोरण म्हणा हवे तर. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

मौन पाळणे आणि संपादनाच्या कामात हलगर्जीपणा करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या धाग्यावर बरेच अवांतर प्रतिसाद आले. त्यात जर मिसळपावच्या धोरण क्र. ५ मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे आले असते तर अप्रकाशीत केले असते. तरीही (कोणाला फारसे न दुखावणार्‍या) अवांतरपणाला ब्रेक लावण्यासाठी म्हणून माझी उपस्थिती दाखवून देण्याचे काम केले. हा दुट्टप्पीपणा नव्हे तर थोडी मोकळीक दिली होती. त्यावर अश्याप्रकारचे उपप्रतिसाद येणे अपेक्षित नव्हते. याउपर आपली तक्रार असेल तर संपादक मंडळाला व्य. नि.तून कळवावी. रेवती

In reply to by रेवती

माझी अजिबात तक्रार नाही...फक्त खटकणारे वाक्य दाखवले इतकेच...असो. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

बापरे वाचुनच भिती वाटते. मी बर्‍याच जणांचे असे प्रकार ऐकते. खरच कसे कसे अनुभव येतात ना ?

हा अनुभव एखाद्याला थरारक वाटु शकतो हे कळाल्यावर इतरांच्या 'थरारक' अनुभवांना काय म्हणायच असा प्रश्न पडला. काही विनोदी वाचायला मिळेल म्हणुन लेख वाचला पण डोक्यात फक्त प्रश्न चिन्ह बाकी राहील. _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे http://www.fl

तुम्हाला पुणेकर व्हायचे आहे, मुंबईकर का मिपाकर ? मिपाकर व्हायचे असेल तर अवांतर प्रतिक्रिया बंद करा. हाच 'थरारक'प्रसंग त्या पर्स चोरणार्‍या बाईच्या दृष्टिकोनातून ..... दादर यायच्या आधीच मी माझं 'गिर्‍हाईक' हेरुन ठेवलं होतं. बाई मुंबईची वाटत नव्हती. बावळटपणा हा, लपवायचा प्रयत्न केला तरी आमच्यासारख्या सराईताच्या नजरेतून कसा सुटणार ? पर्स जरा जास्तच संभाळत होती. तेंव्हाच वाटलं, 'माल' असणार! दादरला ती उतरताना अलगद पर्सचा पट्टा धरुन ठेवला.पण बाई लई खमकी, पुणेरी वाटली. पर्स सोडायला तयार नाही. नशिबानी गाडी सुटली. तर ती गाडीबरोबर धावायला लागली, गुद्दे मारत. म्हटलं आता पर्स नाही सोडली तर ही पडून मरायची, म्हणून दिली सोडून! आतल्या बायका विचारायला लागल्या, काय झालं ? मी म्हटलं माझी पर्स चोरून गेली हो ती भामटी! जाऊ दे. आपल्याला काय फरक पडतो? एक गिर्‍हाईक कमी तर कमी. भूतदया दाखवली का नाही ? म्हणजे पुण्य मलाच मिळालं की! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

च्यामारी!!! तिरशिंगराव, दृष्टीकोन असावा तर असा... लै भारी!!! तसेही आम्ही आमचा बावळटपणा कबुल सुद्धा केलेला आहे... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

शिल्पातै, 'बावळटपणा' हा उल्लेख त्या बाईच्या दृष्टिकोनातून. आम्ही तुम्हाला तसे म्हणणार नाही. प्रतिसाद खेळकरपणे घेतल्याबद्दल धन्यवाद. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|