✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझा एक थरारक अनुभव

श
शिल्पा ब यांनी
Fri, 07/16/2010 - 08:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15224 वाचन

💬 प्रतिसाद (84)

प्रतिक्रिया

असे अनुभव

Nile
Fri, 07/16/2010 - 09:03 नवीन
असे अनुभव मजा आणतात खरं. यावरुन माझा बंगळुरातील एक अनुभव थोडक्यात सांगतो. हाफिसाची वेळ, बंगळुरातील बस पाहिली असेल तर गर्दीबद्दल सांगायला नको. दारातच उभे असल्याने नविन लोकांना बसमध्ये जाण्यास अडचण नेहमीचीच. असेच त्यादिवशीही. खिशात मोबाईल असल्याने माझा एक हात नेहमी खिशात असायच(मोबाईल चोरी नेहमीचीच) पाकिट वगैरे सुरक्षित बॅगेत. एक लठ्ठ माणुस तिसर्‍या पायरीवर उभाहोता. मी त्याला पार करुन पुढे जायला लागलो तर फारशी जागा नसल्याने मला जमेना, त्यानेही जागा करुन देत आहे असे केले, मग मी दोन्हीहाताने वरचे बार पकडुन स्वतःला खेचुन पुढे घेणार इतक्यात कुणीतरी माझ्या खिशात हात घालतोय असे जाणवले, त्या लठ्ठ माणसाने मला अधीकच आवळले. मी झटकन पुढे होउन मोकळा झालो आणि खिशात हात घालतो तर मोबाईल गायब. बंगळुरात बसेस्ना हायड्रॉलीक दारं. बंद. लगेच कंडक्टरच्या नावाने ओरडलो,, म्हणलं गाडी पोलिस स्टेशनला घ्या माझा मोबाईल चोरी झाला. चोरही घाबरला असावा, नविन असेल. त्या घाईगर्दीत(मी अर्थातच शोधतच होतो) एक हात दिसला, माझा मोबाईल त्या हातात. मी मोबाईल पटकन खेचुन घेतला, हात गायब झाला होता. मोबाईल स्वीच ऑफ केलेला होता. काहे क्षणांची गंमत. मोबाईल मिळाला, पुढे काही करण्यासारखं नव्हतं. त्या गर्दीतही जीव भांड्यात पडुन थंडगार वाटलं. -Nile
  • Log in or register to post comments

इतक्यात

विजुभाऊ
Fri, 07/16/2010 - 15:02 नवीन
इतक्यात कुणीतरी माझ्या खिशात हात घालतोय असे जाणवले, त्या लठ्ठ माणसाने मला अधीकच आवळले. अरे बापरे... नायल्या भलताच अवघड प्रसंग होता तुझ्यावर 8| Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

खरच थरारक

शेखर
Fri, 07/16/2010 - 10:21 नवीन
खरच थरारक अनुभव... पण खालील वाक्य थरारक पणा कमी करते. झाल्यावर मी आपली जसं काही झालंच नाही अशी दुसरी लोकल पकडायला निघून गेले
  • Log in or register to post comments

बापरे !

लिखाळ
Fri, 07/16/2010 - 10:36 नवीन
बापरे ! विलक्षणच ! मराठी, मुंबईकर चोर .. एक डेडली काँबिनेशन !! किंवा मराठी, मुंबईकर प्रवासी ... एक कोल्डमोस्ट पासिव काँबिनेशन असे काही विषय सुचत आहेत. (त्या पुढे प्रतिसादांमध्ये 'चोर मराठी होती हे कशावरुन? इतर बघ्यांमध्ये परप्रांतीय नव्ह्ते कशावरुन? असे मुद्दे उपस्थित करायला आपणच वाव ठेवायचा .. म्हणजे प्रतिसाद भरपूर :) ) -- लिखाळ. देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली ;)
  • Log in or register to post comments

देवाने

Nile
Fri, 07/16/2010 - 10:43 नवीन
देवाने विचारले अक्कल हावी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली
=)) =)) -पायदळ. -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

अमराठी

यशोधरा
Fri, 07/16/2010 - 10:49 नवीन
अमराठी 'हावी' आणि मराठी 'हवी' मधल फरक न कळणार्‍या देवाकडून कशाला, असं ठरवलं असेल. पुणेकरच ते! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

चालायचंच ग यशोधरा

संदीप चित्रे
Sat, 07/17/2010 - 00:17 नवीन
जाता-येता पुणेकरांना नावं ठेवताना लोकांच्या अकलेवर नक्की काय (अमराठी) 'हावी' होतं ते आपल्याला कधीच कळणार नाही ;) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मूळ

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 07/17/2010 - 01:01 नवीन
मूळ प्रतिसाद लिहिणारा पुणेकरच असल्याने एक सुचना सुचली आहे: "जाता-येता पुणेर्‍यां*ना नावं ठेवताना पुणेकर लोकांच्या अकलेवर नक्की काय (अमराठी) 'हावी' होतं ते आपल्याला कधीच कळणार नाही!" ;-) अदिती * अपशब्द वापरल्याबद्दल माफी!! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

अरे देवा !!

लिखाळ
Sat, 07/17/2010 - 12:09 नवीन
अरे देवा !! पुणेकर असण्याचा अभिमान असूनही काही खटकले तर काही बिघडत नाही. रोज घरी आल्यावर मी रस्त्यातल्या बेमुर्वत वाहनचालकांच्या नावाने खडे फोडतो तसे इतर अनेक करत असतात. पुण्यातले वाहनचालक आणि त्यांचा असमंजसपणा, बेशिस्त हे विषय नवे नाहीत. .. असो :) --लिखाळ. देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पुणेकर

यशोधरा
Sat, 07/17/2010 - 12:42 नवीन
पुणेकर असण्याचा अभिमान असूनही काही खटकले तर काही बिघडत नाही खरंच. पुणेकरांकडे नि:पक्षपातीपणा आणि न्यायबुद्धी आहेच. O:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

|देवाने

भाऊ पाटील
Fri, 07/16/2010 - 13:23 नवीन
|देवाने विचारले अक्कल हावी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली -अहो त्या पुणेकरांकडे आधीच अक्कल असेल म्हणून टू-व्हिलरची निवड केली असेल आणि देवाला अक्कलेऐवजी मुंबईकरांना सहनशक्ती द्यायला सांगितले असेल. पुणेकर तसे उदार आहेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

पुणेकर तसे

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/16/2010 - 13:28 नवीन
पुणेकर तसे उदार आहेत
हे सांगा तुम्ही आणखी एका पुणेकर पीएचड्याला!! ए लिखाळ, कधी होणार रे तुझा थिसीस? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊ पाटील

देवाने

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/16/2010 - 10:56 नवीन
देवाने विचारले अक्कल हावी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली
=)) =)) काय हे ? काय हे ? लिखाळरावांची मस्तानी कॅन्सल ;) माझा थरारक अनुभव तसा मी मागच्यावेळी मिपावर लिहिला आहेच. पण पुन्हा थोडक्यात सांगतो. बिलाचे अर्धे पैसे न भरताच दारु ढोसून आमचा नान्या मला चौपाटीच्या बारवर एकटाच सोडुन गेला. पैसे पुरेसे नाहीत म्हणल्यावर वेटर्सनी माझ्याभोवती कडे केले. मी पण एका हाताने बाटली धरुन ठेवली आणि दुसर्‍या हाताने गुद्दे वगैरे मारायला लागलो. एवढे सगळे चालु असुनही आजुबाजुच्या टेबलावरच्या कोणीचा त्यात इंट्रेस्ट दाखवला नाही, म्यानेजरने पण नाही. नशीब थोड्यावेळाने आमचा धम्या तिकडेच टपकला. मग बील वगैरे भरुन आम्ही जसं काही झालंच नाही असे दुसरीकडे ढोसायला निघून गेलो. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

खुलासा.

अवलिया
Fri, 07/16/2010 - 14:50 नवीन
अर्धवट माहिती पुरवली गेली आहे. अर्धे अर्धे बील भरायची बोली होती पण पराकडे त्याच्या वाट्याचे पैसे नव्हते. दुर्देवाने त्या दिवशी माझ्याकडे पैसे कमी असल्याने मी पराला तु थोडा वेळ बैस मी येतोच असे सांगुन बाहेर आलो. कदाचित त्याला द्रव्याच्या सेवनाने आठवत नसावे. असो. त्यानंतर मी बाहेर येवुन चारही दिशांना आकाशात नजर टाकली आणि एके ठिकाणी धुर उंचच उंच आकाशात जातांना दिसत होता तिकडे चालु लागलो. अखेर धुराच्या उगम स्थानी उमामहेश्वराच्या प्रसादाने जावुन पोचलो. दरवाजांवरची नावे वाचत अखेरीस योग्य ठिकाणी दार ठोठावले. एका माउलीने दार उघडले, आणि आमच्याकडे पाहुन दार फाटकन बंद करणार तोच आम्ही परवलीची खुण म्हणजे मार्लबरोचे पाकिट दाखवुन मी धम्याचा मित्र आहे असे सांगितले, तेव्हा प्रवेश मिळाला. असो. यानंतर बराच वेळाने साग्रसंगीत (धम्याचा ) मेकअप झाल्यावर धम्या आणि मी रस्त्यावर आलो आणि हॉटेलाकडे जातांना मधेच माझी गाडी पंक्चर झाली. तेव्हा जवळच्याच बारमधे मी बसतो तु पराला घेवुन ये असे सांगुन मी धम्याला पाठवले. थोड्याच वेळात दोघे आले आणि आम्ही परत पारायणाला बसलो. पराला हे सारे आठवत नाही,याचा गैरफायदा घेवुन आमचे काही हितचिंतक (आमचे हित झाले की ज्यांना चिंता वाटते ते ... हो तेच ते बरोबर लांब केसवाले) धम्याला त्यांनीच पाठवले असा अपप्रचार करत आहेत असे आम्हाला समजते म्हणुन सदर खुलासा. कळावे. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अति घाई ... बाकी असो !

छोटा डॉन
Sat, 07/17/2010 - 00:26 नवीन
हे पहा अवलियासाहेब =)) =))
चारही दिशांना आकाशात नजर टाकली आणि एके ठिकाणी धुर उंचच उंच आकाशात जातांना दिसत होता तिकडे चालु लागलो. ........................ धम्या आणि मी रस्त्यावर आलो आणि हॉटेलाकडे जातांना मधेच माझी गाडी पंक्चर झाली.
??? म्हणजे काय ? तुम्ही 'चालत होता' आणि चालता चालता 'तुमची गाडी पंक्चर झाली'. आयला, हे अजबच म्हणावे लागेल. माणुस ( पक्षी : तुर्तास तुम्ही ) गाडीवर कसा काय चालु शकतो ? ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अतिघाई अन

चतुरंग
Sat, 07/17/2010 - 00:41 नवीन
अतिघाई अन चालता चालता गाडी पंक्चर होई! ;) (पंपचर काढून मिळेल)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

खरे तर

अवलिया
Sat, 07/17/2010 - 10:30 नवीन
खरे तर प्रतिसाद देण्याची आवश्यकता नाही पण देत आहे कारण डान्राव आमचे मित्र आहेत. मागे एकदा ते आणि मी पुनमला बसलो होतो. तेव्हा बोलता बोलता ते म्हणाले परवा मी परत चाललो आहे तेव्हा आपली भेट दोन महिन्यांनी येईन तेव्हा. मी बरे म्हटले. खरे तर डान्राव हे काही चालत चालत गेले नसणार, बस, रेल्वे किंवा विमान अशा वाहनानेच गेले असणार. पण बोली भाषा वळवावी तशी असते हे त्यांना माहित आहे. आणि आमच्या प्रतिसादाला प्रत्युत्तर देता येत नसल्याने शुद्धलेखन, अर्थाचे अनर्थ वगैरे वेळखाउ प्रकाराच अवलंब करत आहेत. सबब खुलासा. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हितचिंतक

Pain
Sat, 07/17/2010 - 09:33 नवीन
हितचिंतक (आमचे हित झाले की ज्यांना चिंता वाटते ते ... =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

ह्म्म.

मनिष
Fri, 07/16/2010 - 11:01 नवीन
ह्म्म. सदैव घाईत असणार्‍या मुंबईकरांकडून काय मदत मिळणार (ते बाँबस्फोटाचे सांगू, अश वेळेस कुठेही मदत करतातच लोकं)? रस्त्यात मरायला टेकलेला माणूस आला तर ओलांडून पुढे जातील, पण मदत नाही करणार!!! (देवाने विचारले अक्कल/दयाबुद्धी हवी की लोकल? सगळ्याच मुंबईकरांनी 'लोकल' निवडली! ;) ) -- वायफळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

हाण्ण तिच्यायला ...

छोटा डॉन
Fri, 07/16/2010 - 11:11 नवीन
>>(देवाने विचारले अक्कल/दयाबुद्धी हवी की लोकल? सगळ्याच मुंबईकरांनी 'लोकल' निवडली! ) और ये लगा सिक्सर !!! एक नंबर रे मनिष, एकदम 'कडक' जवाब. ;) जा, आजपासुन मुंबैची १ लोकल तुझ्या नाववर केली ;) ------ (जाज्वल्य)छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

जा,

कानडाऊ योगेशु
Fri, 07/16/2010 - 14:45 नवीन
जा, आजपासुन मुंबैची १ लोकल तुझ्या नाववर केली
कृपया इस लोकल से यात्रा न करे.यह लोकल कारशेड रवाना होगी! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

याला म्हणतात...

भारद्वाज
Sat, 07/17/2010 - 00:37 नवीन
कृपया इस लोकल से यात्रा न करे.यह लोकल कारशेड रवाना होगी!
...सही जवाब !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

देवाने

Nile
Fri, 07/16/2010 - 11:21 नवीन
देवाने विचारले अक्कल/दयाबुद्धी हवी की लोकल? सगळ्याच मुंबईकरांनी 'लोकल' निवडली!
हाण च्यामारी! =)) =)) -ग्लोबल -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

एकदम बरोबर..

योगी९००
Fri, 07/16/2010 - 12:40 नवीन
देवाने विचारले अक्कल/दयाबुद्धी हवी की लोकल? सगळ्याच मुंबईकरांनी 'लोकल' निवडली! अक्कल असेल आणि लोकल नसेल..तर काय अकलेची घरी बसून काय चटणी वाटणार? दयाबुध्दी काय मुंबईकरांनाच नसते असे नाही. बाकीच्या कोठल्याही शहरात हाच अनुभव येतो. समजा एखादा अपघात झाला, तर मदतीला आजूबा़जूचे रहिवासी किंवा दुकानदार प्रामुख्याने येतात. त्या भागातून प्रवास करणारा माणूस (जो घाईत असेल) थांबेलच असे नाही. रस्त्यात मरायला टेकलेला माणूस आला तर ओलांडून पुढे जातील, पण मदत नाही करणार!!! तुम्ही अशी मदत किती जणांना केली आहे? समजा एखादा गर्दूल्ला किंवा भिकारी मरायला टेकला असेल, तर तुम्ही जाल पुढे मदतीला? खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

माझा एक थरारक अनुभव

सहज
Fri, 07/16/2010 - 11:09 नवीन
एकदा मी लहान असताना, बाबा मला गणपतीचे देखावे पहायला घेउन गेले. असाच हात सुटला मी इकडे तिकडे बघत असता गर्दीत बाबा व मी वेगळे झालो. एका मंडपाच्या जवळ असल्याने तिथल्या कार्यकत्यांनी मला पाहीले व मी हरवलो आहे का विचारले. मी मान डोलावताच लगेच लाइड स्पीकरवरुन माझे नाव विचारुन जाहीर केले. लगेच बाबा तिथे आले व आमची ताटातूट संपली. [जय पुणे, जय सार्वजनीक गणेशोत्सवाचे कार्यकर्ते, जय लाउडस्पीकर. बघा तेव्हा लाउडस्पीकर नसता तर अवघड होती कीनै परिस्थिती? असो त्यावर वेगळी चर्चा होउ शकते] मी तसा घाबरलो होतो व एखादा रट्टा खायची मनाची तयारी ठेवली होती. पण बाबांनी मला मारले नाही उलट ते जे काही बोलले ते मी अजुनही लक्षात ठेवले आहे. ते म्हणाले पुढे तुला आयुष्यात हे वाक्य उपयुक्त होईल. वाक्य होते,"चल तुझ्यासाठी कॅडबरी घेउ. आणी हो, तुझ्या आईला हे सांगू नकोस हं"
  • Log in or register to post comments

>>> चल

स्मिता_१३
Fri, 07/16/2010 - 11:12 नवीन
>>> चल तुझ्यासाठी कॅडबरी घेउ. आणी हो, तुझ्या आईला हे सांगू नकोस हं =)) स्मिता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

वाक्य

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/16/2010 - 11:42 नवीन
वाक्य होते,"चल तुझ्यासाठी कॅडबरी घेउ. आणी हो, तुझ्या आईला हे सांगू नकोस हं"
वाक्य काळजात कोरुन ठेवण्यासारखे. ह्या एका वाक्यात जणु तुम्हाला जीवनाचे सारच कळाले असे म्हणायला हरकत नाही. माझ्या आगामी 'हरवलेल्या बाबाची कहाणी' मध्ये हे वाक्य घ्यायला आपण परवानगी द्याल का ? ©º°¨¨°º© संदिप ख ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

लय भारी!

पांथस्थ
Fri, 07/16/2010 - 11:51 नवीन
तुझ्या आईला हे सांगू नकोस हं
=)) =)) =)) =)) =)) काय तयारी करुन घेतलीये लहानपणी. एक नंबर आहे. - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

तुम्ही 'सहज' हे टोपणनाव कसे काय घेतलेत

चतुरंग
Fri, 07/16/2010 - 23:35 नवीन
ह्याचा उलगडा झाला!! :B चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मुंबईची

पाषाणभेद
Fri, 07/16/2010 - 11:15 नवीन
मुंबईची लोकल म्हणजे एक भयानक सत्य आहे. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

याच्या

निखिल देशपांडे
Fri, 07/16/2010 - 11:25 नवीन
याच्या एकदम उलटा अनुभव असलेला किस्सा डोळ्याने पाहिला आहे. एक बाई प्लॅटफॉर्म वरुन दारात उभ्या असलेल्या बाईची पर्स ओढत होती... गाडी चालु झाल्या झाल्या गाडीतल्या बाईने पर्सला धरुनच प्लॅटफॉर्म वर उडी घेतली. भांडण फारच विकोपाला गेले. शेवटी लेडी कॉन्स्टेबल आली आणि तीने भांडण सोडवले. सगळ्यात महत्वाचे गाडीत उभ्या असणार्‍या बाईचीच ती पर्स होती. प्लॅटफॉर्मवरची बाई बनाव करत होती. म्हणजे तुमच्या एकदम उलटा अनुभवच की... त. टी :- हा अनुभव मुंबईतल्या प्लॅटफॉर्मवरच आला आहे. ठाण्याचा नाही ;) स्वगत:- काय हे अधःपतन मुंबई, गर्दी, लोकल, बेदरकारपणा, मदत न करायची वृत्ती हे सगळे असुन मुंबईला शिव्या घालणारे प्रतिसाद येत नाहीत. (मुंबईकर, पुणेकर, नागपुरकर, आणि अर्थातच... जाउद्या)निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

स्वगत:- काय

llपुण्याचे पेशवेll
Fri, 07/16/2010 - 11:43 नवीन
स्वगत:- काय हे अधःपतन मुंबई, गर्दी, लोकल, बेदरकारपणा, मदत न करायची वृत्ती हे सगळे असुन मुंबईला शिव्या घालणारे प्रतिसाद येत नाहीत. अहो पुणेकर सभ्य आहेत, किरकिरे नाहीत. आणि छोट्या छोट्या अपराधांसाठी इतरांना माफ करतात... (खुद के सांथ बातां: ही १००+ प्रतिसादी धाग्याची सुरुवात म्हणावी का? ) पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

अहो पुणेकर

निखिल देशपांडे
Fri, 07/16/2010 - 11:56 नवीन
अहो पुणेकर सभ्य आहेत, किरकिरे नाहीत. आणि छोट्या छोट्या अपराधांसाठी इतरांना माफ करतात... =)) =)) =)) बरोबर पुणेकर कधी चुकीचे नसतातच... बाकीच सगळे उगाचच पुण्याला नावे ठेवतात... असो काही जुने धागे वाचायची आज अंमळ ईच्छा होत आहे. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

सहीच..

llपुण्याचे पेशवेll
Fri, 07/16/2010 - 12:04 नवीन
सहीच.. वाटचाल सुरू. :) पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

माझाही ...

छोटा डॉन
Fri, 07/16/2010 - 11:27 नवीन
माझाही मुंबई लोकलबाबत भयानक अनुभव आहे. एक ४-५ महिन्यापुर्वी काही कामानिमित्त मुंबईला गेलो होतो तेव्हाची गोष्ट. मी आणि आमचा एक आंतरजालिय मित्र ( जो आजकाल 'संपादक' म्हणुन मिरवत असतो, असो ) आम्ही दिवसभर "जिवाची मुंबई"करुन परत आपल्या घरी म्हणजे ठाण्याला परतत होतो. रात्रीची ९.३० ची वेळ असावी, छ.शि.ट. वरुन लोकल पकडली ( अ‍ॅक्च्युअली तिथुनच सुटली ), बसायला जागा मिळाली नाही व उभारुन प्रवास करणे नशिबी आले, हा भयंकर अपमान आम्ही च्युईंगमसोबत गिळुन टाकला ( फक्त अपमान , च्युईंगम नव्हे ). नंतर कुठलेसे स्थानक आले आणि काय झाले कळेना पण एखाद्या धाग्यावर धडाधड अवाम्तर प्रतिसाद यावेत तशी फटाफट माणसे आत घुसली व कंप्लिट राडा झाला. आम्ही एकेकडे, आमचे पाय एकीकडे, आमची कंबर एकीकडे, आमचे डोके ( + मेंदु ) एकीकडे ह्या अवस्थेत आम्ही अलमोस्ट २० मिनिटे प्रवास केला. एवढा मिपावर जगप्रसिद्ध असलेला ब्लॉगर आपल्या डब्यात आहे हे लोकांना कळालेच नाही, आम्हाला अजिबात बसायला जागा मिळाली नाही व सुटसुटीत असे उभेही राहता आले नाही. ना गाडीतल्या दारात उभ्या असलेल्यांनी मदत केली ना आत बसलेल्या कोणी काही इंटरेस्ट दाखवला..... हा प्रकार पाहुनही आमचे दोस्त जसं काही झालंच नाही असे दाखवुन रिक्षा पकडायला निघून गेले . तर असा हा माझा एक अनुभव. ह्यावरुन आम्हाला त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या 'बजबजपुरी' नामक संस्थळावरची '** *** आणि मुंबई पाहिली' हे सुवचन आठवुन गेले पण त्याचीही कुणास पत्रास नव्हती, असो. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

हा प्रकार

निखिल देशपांडे
Fri, 07/16/2010 - 11:33 नवीन
हा प्रकार पाहुनही आमचे दोस्त जसं काही झालंच नाही असे दाखवुन रिक्षा पकडायला निघून गेले . =)) =)) =)) =)) =)) थरारक अनुभव होता नै?? शेवटी तुझे अभिनंदन. यावर तु एक लेख लिहिणार होतास पण प्रतिसाद तरी टंकलास.. अय्या तु कित्ती कित्ती छान लिहितोस रे तुझे अनुभव... मी तर बुवा पहिल्या दिवसा पासुन तुझ्या प्रतिसादांचा फॅनच आहे. (मिरवणारा संपादक डॉण्याचा मित्र)निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

एवढा

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/16/2010 - 11:39 नवीन
एवढा मिपावर जगप्रसिद्ध असलेला ब्लॉगर आपल्या डब्यात आहे..
'आणि तो नुकताच 'झेंडा' पाहुन आलेला आहे' हे वाक्य अ‍ॅड करायचे राहिले का ?
ह्यावरुन आम्हाला त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या 'बजबजपुरी' नामक संस्थळावरची '** *** आणि मुंबई पाहिली' हे सुवचन आठवुन गेले पण त्याचीही कुणास पत्रास नव्हती, असो.
=)) =)) =)) =)) =)) च्यायला तुला एक कधी काय आठवेल. सोनेरी राघु ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

आमचे दोन आणे

Nile
Fri, 07/16/2010 - 11:42 नवीन
आम्ही दिवसभर "जिवाची मुंबई"करुन परत आपल्या घरी म्हणजे ठाण्याला परतत होतो.
हे पहा झेंडाधारी छोटे डाण बंगलोरवाले, ही चुक तुमची आहे. ठाणे हे काय गाव आहे का जाण्याचे?? च्यायला नको तिथे जाता अन मग लोकांनी धुतले म्हणुन गाता. मुळात तुम्ही तिथे जाण्याच्या आधी माहिती काढुन गेला होता का? (अरे त्या धाग्यावरचा प्रतिसाद खाली चिकटवा रे. -आणेकर. -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

ठाणे हे

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/16/2010 - 11:48 नवीन
ठाणे हे काय गाव आहे का जाण्याचे??
सहमत. आता ठाण्यातलीच काही नाठाळ लोक पुण्यात वस्ती करुन राहिली आहेत हा भाग वेगळा ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आता

विंजिनेर
Fri, 07/16/2010 - 12:04 नवीन
आता ठाण्यातलीच काही नाठाळ लोक पुण्यात वस्ती करुन राहिली आहेत हा भाग वेगळा
पुण्याबाहेर पराभाऊ, पुण्याबाहेर.. आजकाल गावकुसाबाहेर बेसुमार वाढत चाललेल्या बंगाल्यांच्या वस्तीत एखाददुसरं भगवं क्वार्टर 'ठाण' मांडून बसलेलं दिसतं तेव्हा आमची नजर आकाशगंगा आणि दिर्घिकांमधे हरवून जाते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पुण्याबाह

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/16/2010 - 12:12 नवीन
पुण्याबाहेर पराभाऊ, पुण्याबाहेर..
धन्यवाद धन्यवाद. आमच्याकडून टंकनात अंमळ चूक झाली खरी. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

खुलासा :

छोटा डॉन
Fri, 07/16/2010 - 12:03 नवीन
ह्या घटनेच्या निमित्ताने आणखी काही खुलासे करु इच्छितो. १. मुंबईला जाण्याचे आम्हाला रितसर आमंत्रण होते, अगदी अक्षता घेऊन कुणी आमच्या घरी आले नसले तरी कायदेशीर आमंत्रण होते. तसेच मुंबईत गेल्यावर मुक्कामाची सोय म्हणुन त्या मित्राकडुनही कायदेशीर आमंत्रण होते, अक्षता घरी गेल्यावर दिल्या. २. ठाण्याच्या बाबतीत आमच्या मनात कसलाही पुर्वगृह नव्हता. ३. जाण्याआधी आम्ही 'माफक' माहिती काढुन गेलो होतो. ४. 'झेंडा' हा सिनेमा पाहणे ही घटना ह्याच्याशी इर्रिलेव्हंट आहे ( पार्किंग स्पेस इतकीच ), उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नका. माझ्या आख्ख्या प्रतिसादात मी कुठेच 'झेंडा'चा पुसटसासुद्धा उल्लेख केलेला नाही. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

कायदेशीर

विजुभाऊ
Fri, 07/16/2010 - 12:07 नवीन
कायदेशीर आमंत्रण होते. याला मराठीत समन्स म्हणतात . कोणत्या गुन्ह्यासाठी हे समन्स होते Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

'झेंडा' हा

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/16/2010 - 12:16 नवीन
'झेंडा' हा सिनेमा पाहणे ही घटना ह्याच्याशी इर्रिलेव्हंट आहे ( पार्किंग स्पेस इतकीच ), उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नका. माझ्या आख्ख्या प्रतिसादात मी कुठेच 'झेंडा'चा पुसटसासुद्धा उल्लेख केलेला नाही.
'आपण जनतेकडून दुर्लक्षीले जात आहोत' , 'आपल्यावर अन्याय होत आहे' , ' आपली दखल घेतली जात नाहीये' अशी तिव्र भावना मनात 'झेंडा' चित्रपट नुकताच पाहण्यात आला असल्याने जागी झाली असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

आता राज चा

शेखर
Fri, 07/16/2010 - 12:23 नवीन
=)) आता राज चा उद्धव झाला आणी उद्धव चा राज... ;) झेंड्याचा धंद्याला मरण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मुंबईला

Nile
Fri, 07/16/2010 - 12:18 नवीन
मुंबईला जाण्याचे आम्हाला रितसर आमंत्रण होते
म्हणजे तुम्ही गेलात फुकटात वर ही मिजास!!
२. ठाण्याच्या बाबतीत आमच्या मनात कसलाही पुर्वगृह नव्हता.
हेच म्हणतोय, फुकटात बोलावणे आले तर थोडी माहिती काढुन जायला नको?
३. जाण्याआधी आम्ही 'माफक' माहिती काढुन गेलो होतो.
तुमचीच चुक,अन तीही माफक नव्हे.
४. 'झेंडा' हा सिनेमा पाहणे ही घटना ह्याच्याशी इर्रिलेव्हंट आहे
बरं मंग?
उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नका.
त्याचा इथे काय समंध?
माझ्या आख्ख्या प्रतिसादात मी कुठेच 'झेंडा'चा पुसटसासुद्धा उल्लेख केलेला नाही.
मी फक्त तुम्हाला झेंडाधारी म्हणलंय. पिच्चरचा इथे काय समंध? कीती तो पुर्वग्रह! -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

छ्या...

श्रावण मोडक
Fri, 07/16/2010 - 12:16 नवीन
नंतर कुठलेसे स्थानक आले आणि काय झाले कळेना पण एखाद्या धाग्यावर धडाधड अवाम्तर प्रतिसाद यावेत तशी फटाफट माणसे आत घुसली व कंप्लिट राडा झाला. आम्ही एकेकडे, आमचे पाय एकीकडे, आमची कंबर एकीकडे, आमचे डोके ( + मेंदु ) एकीकडे ह्या अवस्थेत आम्ही अलमोस्ट २० मिनिटे प्रवास केला.
छ्या... याचा मुंबईच्या लोकलचा काय संबंध? हा पोटातल्या द्रव्याचा परिणाम. त्यामुळं मेंदूत भ्रम होतात. उगा आपलं लोकलच्या नावे बिल फाडायचं! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

किंचित गल्लत झाली आहे ...

छोटा डॉन
Fri, 07/16/2010 - 12:26 नवीन
>>... याचा मुंबईच्या लोकलचा काय संबंध? हा पोटातल्या द्रव्याचा परिणाम. त्यामुळं मेंदूत भ्रम होतात. उगा आपलं लोकलच्या नावे बिल फाडायचं! हं, कदाचित ह्या घटनेमागची आणि घटनास्थळाबाबत पार्श्वभुमी माहित नसल्याने ( किंवा माहित असल्याचे मान्य करायचे नसल्याने ) आपली किंचित गल्लत झाली आहे . माझ्य प्रतिसादातील 'तुम्ही' कोट केलेल्या वाक्यात आलेले 'स्थानक, माणसे आत घुसली, प्रवास' इत्यादी बाबी ठळकपणे आल्यने हा नक्की लोकलचाच प्रवास होता ह्यात दुमत रहात नाही. तसेच ह्या प्रतिसादात तसा स्पष्ट उल्लेख झाला आहे. आत राहता राहिली बाब ती पोटातल्या द्रव्याची तर आम्ही "तो आपला पुर्वगृह आहे आणो कोणताही पुर्वगृह वाईटच!" एवढेच सांगतो. ------ (विस्तारित)छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

पूर्वगृह

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/16/2010 - 13:18 नवीन
पूर्वगृह नाही रे डान्या, पूर्वग्रह... च्यायला शाईन मारायची तर आधी शब्द तरी नीट लिहावे ना माणसाने? नाहीतर हसतात लोकं... ;) (जाज्ज्वल्य मुंबईकर) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

:-)

सहज
Fri, 07/16/2010 - 13:23 नवीन
संपादक जरा हे पण दुरुस्त करा की - बसायला जागा मिळाली नाही व उभारुन प्रवास करणे नशिबी आले, विठ्ठल विठ्ठल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा