असे अनुभव मजा आणतात खरं. यावरुन माझा बंगळुरातील एक अनुभव थोडक्यात सांगतो. हाफिसाची वेळ, बंगळुरातील बस पाहिली असेल तर गर्दीबद्दल सांगायला नको. दारातच उभे असल्याने नविन लोकांना बसमध्ये जाण्यास अडचण नेहमीचीच. असेच त्यादिवशीही. खिशात मोबाईल असल्याने माझा एक हात नेहमी खिशात असायच(मोबाईल चोरी नेहमीचीच) पाकिट वगैरे सुरक्षित बॅगेत. एक लठ्ठ माणुस तिसर्या पायरीवर उभाहोता. मी त्याला पार करुन पुढे जायला लागलो तर फारशी जागा नसल्याने मला जमेना, त्यानेही जागा करुन देत आहे असे केले, मग मी दोन्हीहाताने वरचे बार पकडुन स्वतःला खेचुन पुढे घेणार इतक्यात कुणीतरी माझ्या खिशात हात घालतोय असे जाणवले, त्या लठ्ठ माणसाने मला अधीकच आवळले. मी झटकन पुढे होउन मोकळा झालो आणि खिशात हात घालतो तर मोबाईल गायब. बंगळुरात बसेस्ना हायड्रॉलीक दारं. बंद. लगेच कंडक्टरच्या नावाने ओरडलो,, म्हणलं गाडी पोलिस स्टेशनला घ्या माझा मोबाईल चोरी झाला. चोरही घाबरला असावा, नविन असेल. त्या घाईगर्दीत(मी अर्थातच शोधतच होतो) एक हात दिसला, माझा मोबाईल त्या हातात. मी मोबाईल पटकन खेचुन घेतला, हात गायब झाला होता. मोबाईल स्वीच ऑफ केलेला होता. काहे क्षणांची गंमत. मोबाईल मिळाला, पुढे काही करण्यासारखं नव्हतं. त्या गर्दीतही जीव भांड्यात पडुन थंडगार वाटलं.
-Nile
बापरे ! विलक्षणच !
मराठी, मुंबईकर चोर .. एक डेडली काँबिनेशन !!
किंवा
मराठी, मुंबईकर प्रवासी ... एक कोल्डमोस्ट पासिव काँबिनेशन
असे काही विषय सुचत आहेत. (त्या पुढे प्रतिसादांमध्ये 'चोर मराठी होती हे कशावरुन? इतर बघ्यांमध्ये परप्रांतीय नव्ह्ते कशावरुन? असे मुद्दे उपस्थित करायला आपणच वाव ठेवायचा .. म्हणजे प्रतिसाद भरपूर :) )
-- लिखाळ.
देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली ;)
जाता-येता पुणेकरांना नावं ठेवताना लोकांच्या अकलेवर नक्की काय (अमराठी) 'हावी' होतं ते आपल्याला कधीच कळणार नाही ;)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
मूळ प्रतिसाद लिहिणारा पुणेकरच असल्याने एक सुचना सुचली आहे:
"जाता-येता पुणेर्यां*ना नावं ठेवताना पुणेकर लोकांच्या अकलेवर नक्की काय (अमराठी) 'हावी' होतं ते आपल्याला कधीच कळणार नाही!" ;-)
अदिती
* अपशब्द वापरल्याबद्दल माफी!! ;-)
अरे देवा !! पुणेकर असण्याचा अभिमान असूनही काही खटकले तर काही बिघडत नाही. रोज घरी आल्यावर मी रस्त्यातल्या बेमुर्वत वाहनचालकांच्या नावाने खडे फोडतो तसे इतर अनेक करत असतात. पुण्यातले वाहनचालक आणि त्यांचा असमंजसपणा, बेशिस्त हे विषय नवे नाहीत.
.. असो :)
--लिखाळ.
देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली. ;)
|देवाने विचारले अक्कल हावी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली
-अहो त्या पुणेकरांकडे आधीच अक्कल असेल म्हणून टू-व्हिलरची निवड केली असेल आणि देवाला अक्कलेऐवजी मुंबईकरांना सहनशक्ती द्यायला सांगितले असेल.
पुणेकर तसे उदार आहेत ;)
अर्धवट माहिती पुरवली गेली आहे.
अर्धे अर्धे बील भरायची बोली होती पण पराकडे त्याच्या वाट्याचे पैसे नव्हते. दुर्देवाने त्या दिवशी माझ्याकडे पैसे कमी असल्याने मी पराला तु थोडा वेळ बैस मी येतोच असे सांगुन बाहेर आलो. कदाचित त्याला द्रव्याच्या सेवनाने आठवत नसावे. असो.
त्यानंतर मी बाहेर येवुन चारही दिशांना आकाशात नजर टाकली आणि एके ठिकाणी धुर उंचच उंच आकाशात जातांना दिसत होता तिकडे चालु लागलो. अखेर धुराच्या उगम स्थानी उमामहेश्वराच्या प्रसादाने जावुन पोचलो. दरवाजांवरची नावे वाचत अखेरीस योग्य ठिकाणी दार ठोठावले. एका माउलीने दार उघडले, आणि आमच्याकडे पाहुन दार फाटकन बंद करणार तोच आम्ही परवलीची खुण म्हणजे मार्लबरोचे पाकिट दाखवुन मी धम्याचा मित्र आहे असे सांगितले, तेव्हा प्रवेश मिळाला. असो.
यानंतर बराच वेळाने साग्रसंगीत (धम्याचा ) मेकअप झाल्यावर धम्या आणि मी रस्त्यावर आलो आणि हॉटेलाकडे जातांना मधेच माझी गाडी पंक्चर झाली. तेव्हा जवळच्याच बारमधे मी बसतो तु पराला घेवुन ये असे सांगुन मी धम्याला पाठवले. थोड्याच वेळात दोघे आले आणि आम्ही परत पारायणाला बसलो.
पराला हे सारे आठवत नाही,याचा गैरफायदा घेवुन आमचे काही हितचिंतक (आमचे हित झाले की ज्यांना चिंता वाटते ते ... हो तेच ते बरोबर लांब केसवाले) धम्याला त्यांनीच पाठवले असा अपप्रचार करत आहेत असे आम्हाला समजते म्हणुन सदर खुलासा.
कळावे.
--अवलिया
चारही दिशांना आकाशात नजर टाकली आणि एके ठिकाणी धुर उंचच उंच आकाशात जातांना दिसत होता तिकडे चालु लागलो.
........................
धम्या आणि मी रस्त्यावर आलो आणि हॉटेलाकडे जातांना मधेच माझी गाडी पंक्चर झाली.
???
म्हणजे काय ?
तुम्ही 'चालत होता' आणि चालता चालता 'तुमची गाडी पंक्चर झाली'.
आयला, हे अजबच म्हणावे लागेल.
माणुस ( पक्षी : तुर्तास तुम्ही ) गाडीवर कसा काय चालु शकतो ?
------
छोटा डॉन
खरे तर प्रतिसाद देण्याची आवश्यकता नाही पण देत आहे कारण डान्राव आमचे मित्र आहेत.
मागे एकदा ते आणि मी पुनमला बसलो होतो. तेव्हा बोलता बोलता ते म्हणाले परवा मी परत चाललो आहे तेव्हा आपली भेट दोन महिन्यांनी येईन तेव्हा. मी बरे म्हटले. खरे तर डान्राव हे काही चालत चालत गेले नसणार, बस, रेल्वे किंवा विमान अशा वाहनानेच गेले असणार. पण बोली भाषा वळवावी तशी असते हे त्यांना माहित आहे. आणि आमच्या प्रतिसादाला प्रत्युत्तर देता येत नसल्याने शुद्धलेखन, अर्थाचे अनर्थ वगैरे वेळखाउ प्रकाराच अवलंब करत आहेत. सबब खुलासा.
--अवलिया
ह्म्म.
सदैव घाईत असणार्या मुंबईकरांकडून काय मदत मिळणार (ते बाँबस्फोटाचे सांगू, अश वेळेस कुठेही मदत करतातच लोकं)? रस्त्यात मरायला टेकलेला माणूस आला तर ओलांडून पुढे जातील, पण मदत नाही करणार!!!
(देवाने विचारले अक्कल/दयाबुद्धी हवी की लोकल? सगळ्याच मुंबईकरांनी 'लोकल' निवडली! ;) )
-- वायफळ
>>(देवाने विचारले अक्कल/दयाबुद्धी हवी की लोकल? सगळ्याच मुंबईकरांनी 'लोकल' निवडली! )
और ये लगा सिक्सर !!!
एक नंबर रे मनिष, एकदम 'कडक' जवाब. ;)
जा, आजपासुन मुंबैची १ लोकल तुझ्या नाववर केली ;)
------
(जाज्वल्य)छोटा डॉन
कृपया इस लोकल से यात्रा न करे.यह लोकल कारशेड रवाना होगी!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
देवाने विचारले अक्कल/दयाबुद्धी हवी की लोकल? सगळ्याच मुंबईकरांनी 'लोकल' निवडली!
अक्कल असेल आणि लोकल नसेल..तर काय अकलेची घरी बसून काय चटणी वाटणार?
दयाबुध्दी काय मुंबईकरांनाच नसते असे नाही. बाकीच्या कोठल्याही शहरात हाच अनुभव येतो. समजा एखादा अपघात झाला, तर मदतीला आजूबा़जूचे रहिवासी किंवा दुकानदार प्रामुख्याने येतात. त्या भागातून प्रवास करणारा माणूस (जो घाईत असेल) थांबेलच असे नाही.
रस्त्यात मरायला टेकलेला माणूस आला तर ओलांडून पुढे जातील, पण मदत नाही करणार!!!
तुम्ही अशी मदत किती जणांना केली आहे? समजा एखादा गर्दूल्ला किंवा भिकारी मरायला टेकला असेल, तर तुम्ही जाल पुढे मदतीला?
खादाडमाऊ
एकदा मी लहान असताना, बाबा मला गणपतीचे देखावे पहायला घेउन गेले. असाच हात सुटला मी इकडे तिकडे बघत असता गर्दीत बाबा व मी वेगळे झालो. एका मंडपाच्या जवळ असल्याने तिथल्या कार्यकत्यांनी मला पाहीले व मी हरवलो आहे का विचारले. मी मान डोलावताच लगेच लाइड स्पीकरवरुन माझे नाव विचारुन जाहीर केले. लगेच बाबा तिथे आले व आमची ताटातूट संपली. [जय पुणे, जय सार्वजनीक गणेशोत्सवाचे कार्यकर्ते, जय लाउडस्पीकर. बघा तेव्हा लाउडस्पीकर नसता तर अवघड होती कीनै परिस्थिती? असो त्यावर वेगळी चर्चा होउ शकते]
मी तसा घाबरलो होतो व एखादा रट्टा खायची मनाची तयारी ठेवली होती. पण बाबांनी मला मारले नाही उलट ते जे काही बोलले ते मी अजुनही लक्षात ठेवले आहे. ते म्हणाले पुढे तुला आयुष्यात हे वाक्य उपयुक्त होईल. वाक्य होते,"चल तुझ्यासाठी कॅडबरी घेउ. आणी हो, तुझ्या आईला हे सांगू नकोस हं"
याच्या एकदम उलटा अनुभव असलेला किस्सा डोळ्याने पाहिला आहे.
एक बाई प्लॅटफॉर्म वरुन दारात उभ्या असलेल्या बाईची पर्स ओढत होती... गाडी चालु झाल्या झाल्या गाडीतल्या बाईने पर्सला धरुनच प्लॅटफॉर्म वर उडी घेतली. भांडण फारच विकोपाला गेले. शेवटी लेडी कॉन्स्टेबल आली आणि तीने भांडण सोडवले. सगळ्यात महत्वाचे गाडीत उभ्या असणार्या बाईचीच ती पर्स होती. प्लॅटफॉर्मवरची बाई बनाव करत होती. म्हणजे तुमच्या एकदम उलटा अनुभवच की...
त. टी :- हा अनुभव मुंबईतल्या प्लॅटफॉर्मवरच आला आहे. ठाण्याचा नाही ;)
स्वगत:- काय हे अधःपतन मुंबई, गर्दी, लोकल, बेदरकारपणा, मदत न करायची वृत्ती हे सगळे असुन मुंबईला शिव्या घालणारे प्रतिसाद येत नाहीत.
(मुंबईकर, पुणेकर, नागपुरकर, आणि अर्थातच... जाउद्या)निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
स्वगत:- काय हे अधःपतन मुंबई, गर्दी, लोकल, बेदरकारपणा, मदत न करायची वृत्ती हे सगळे असुन मुंबईला शिव्या घालणारे प्रतिसाद येत नाहीत.
अहो पुणेकर सभ्य आहेत, किरकिरे नाहीत. आणि छोट्या छोट्या अपराधांसाठी इतरांना माफ करतात...
(खुद के सांथ बातां: ही १००+ प्रतिसादी धाग्याची सुरुवात म्हणावी का? )
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
अहो पुणेकर सभ्य आहेत, किरकिरे नाहीत. आणि छोट्या छोट्या अपराधांसाठी इतरांना माफ करतात...
=)) =)) =))
बरोबर पुणेकर कधी चुकीचे नसतातच...
बाकीच सगळे उगाचच पुण्याला नावे ठेवतात...
असो काही जुने धागे वाचायची आज अंमळ ईच्छा होत आहे.
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
माझाही मुंबई लोकलबाबत भयानक अनुभव आहे.
एक ४-५ महिन्यापुर्वी काही कामानिमित्त मुंबईला गेलो होतो तेव्हाची गोष्ट. मी आणि आमचा एक आंतरजालिय मित्र ( जो आजकाल 'संपादक' म्हणुन मिरवत असतो, असो ) आम्ही दिवसभर "जिवाची मुंबई"करुन परत आपल्या घरी म्हणजे ठाण्याला परतत होतो.
रात्रीची ९.३० ची वेळ असावी, छ.शि.ट. वरुन लोकल पकडली ( अॅक्च्युअली तिथुनच सुटली ), बसायला जागा मिळाली नाही व उभारुन प्रवास करणे नशिबी आले, हा भयंकर अपमान आम्ही च्युईंगमसोबत गिळुन टाकला ( फक्त अपमान , च्युईंगम नव्हे ).
नंतर कुठलेसे स्थानक आले आणि काय झाले कळेना पण एखाद्या धाग्यावर धडाधड अवाम्तर प्रतिसाद यावेत तशी फटाफट माणसे आत घुसली व कंप्लिट राडा झाला. आम्ही एकेकडे, आमचे पाय एकीकडे, आमची कंबर एकीकडे, आमचे डोके ( + मेंदु ) एकीकडे ह्या अवस्थेत आम्ही अलमोस्ट २० मिनिटे प्रवास केला.
एवढा मिपावर जगप्रसिद्ध असलेला ब्लॉगर आपल्या डब्यात आहे हे लोकांना कळालेच नाही, आम्हाला अजिबात बसायला जागा मिळाली नाही व सुटसुटीत असे उभेही राहता आले नाही. ना गाडीतल्या दारात उभ्या असलेल्यांनी मदत केली ना आत बसलेल्या कोणी काही इंटरेस्ट दाखवला.....
हा प्रकार पाहुनही आमचे दोस्त जसं काही झालंच नाही असे दाखवुन रिक्षा पकडायला निघून गेले .
तर असा हा माझा एक अनुभव.
ह्यावरुन आम्हाला त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या 'बजबजपुरी' नामक संस्थळावरची '** *** आणि मुंबई पाहिली' हे सुवचन आठवुन गेले पण त्याचीही कुणास पत्रास नव्हती, असो.
------
छोटा डॉन
हा प्रकार पाहुनही आमचे दोस्त जसं काही झालंच नाही असे दाखवुन रिक्षा पकडायला निघून गेले .
=)) =)) =)) =)) =))
थरारक अनुभव होता नै??
शेवटी तुझे अभिनंदन. यावर तु एक लेख लिहिणार होतास पण प्रतिसाद तरी टंकलास..
अय्या तु कित्ती कित्ती छान लिहितोस रे तुझे अनुभव...
मी तर बुवा पहिल्या दिवसा पासुन तुझ्या प्रतिसादांचा फॅनच आहे.
(मिरवणारा संपादक डॉण्याचा मित्र)निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
एवढा मिपावर जगप्रसिद्ध असलेला ब्लॉगर आपल्या डब्यात आहे..
'आणि तो नुकताच 'झेंडा' पाहुन आलेला आहे' हे वाक्य अॅड करायचे राहिले का ?
ह्यावरुन आम्हाला त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या 'बजबजपुरी' नामक संस्थळावरची '** *** आणि मुंबई पाहिली' हे सुवचन आठवुन गेले पण त्याचीही कुणास पत्रास नव्हती, असो.
आम्ही दिवसभर "जिवाची मुंबई"करुन परत आपल्या घरी म्हणजे ठाण्याला परतत होतो.
हे पहा झेंडाधारी छोटे डाण बंगलोरवाले, ही चुक तुमची आहे. ठाणे हे काय गाव आहे का जाण्याचे?? च्यायला नको तिथे जाता अन मग लोकांनी धुतले म्हणुन गाता. मुळात तुम्ही तिथे जाण्याच्या आधी माहिती काढुन गेला होता का? (अरे त्या धाग्यावरचा प्रतिसाद खाली चिकटवा रे.
-आणेकर.
-Nile
ह्या घटनेच्या निमित्ताने आणखी काही खुलासे करु इच्छितो.
१. मुंबईला जाण्याचे आम्हाला रितसर आमंत्रण होते, अगदी अक्षता घेऊन कुणी आमच्या घरी आले नसले तरी कायदेशीर आमंत्रण होते.
तसेच मुंबईत गेल्यावर मुक्कामाची सोय म्हणुन त्या मित्राकडुनही कायदेशीर आमंत्रण होते, अक्षता घरी गेल्यावर दिल्या.
२. ठाण्याच्या बाबतीत आमच्या मनात कसलाही पुर्वगृह नव्हता.
३. जाण्याआधी आम्ही 'माफक' माहिती काढुन गेलो होतो.
४. 'झेंडा' हा सिनेमा पाहणे ही घटना ह्याच्याशी इर्रिलेव्हंट आहे ( पार्किंग स्पेस इतकीच ), उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नका. माझ्या आख्ख्या प्रतिसादात मी कुठेच 'झेंडा'चा पुसटसासुद्धा उल्लेख केलेला नाही.
------
छोटा डॉन
'झेंडा' हा सिनेमा पाहणे ही घटना ह्याच्याशी इर्रिलेव्हंट आहे ( पार्किंग स्पेस इतकीच ), उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नका. माझ्या आख्ख्या प्रतिसादात मी कुठेच 'झेंडा'चा पुसटसासुद्धा उल्लेख केलेला नाही.
नंतर कुठलेसे स्थानक आले आणि काय झाले कळेना पण एखाद्या धाग्यावर धडाधड अवाम्तर प्रतिसाद यावेत तशी फटाफट माणसे आत घुसली व कंप्लिट राडा झाला. आम्ही एकेकडे, आमचे पाय एकीकडे, आमची कंबर एकीकडे, आमचे डोके ( + मेंदु ) एकीकडे ह्या अवस्थेत आम्ही अलमोस्ट २० मिनिटे प्रवास केला.
छ्या... याचा मुंबईच्या लोकलचा काय संबंध? हा पोटातल्या द्रव्याचा परिणाम. त्यामुळं मेंदूत भ्रम होतात. उगा आपलं लोकलच्या नावे बिल फाडायचं! ;)
>>... याचा मुंबईच्या लोकलचा काय संबंध? हा पोटातल्या द्रव्याचा परिणाम. त्यामुळं मेंदूत भ्रम होतात. उगा आपलं लोकलच्या नावे बिल फाडायचं!
हं, कदाचित ह्या घटनेमागची आणि घटनास्थळाबाबत पार्श्वभुमी माहित नसल्याने ( किंवा माहित असल्याचे मान्य करायचे नसल्याने ) आपली किंचित गल्लत झाली आहे .
माझ्य प्रतिसादातील 'तुम्ही' कोट केलेल्या वाक्यात आलेले 'स्थानक, माणसे आत घुसली, प्रवास' इत्यादी बाबी ठळकपणे आल्यने हा नक्की लोकलचाच प्रवास होता ह्यात दुमत रहात नाही. तसेच ह्या प्रतिसादात तसा स्पष्ट उल्लेख झाला आहे.
आत राहता राहिली बाब ती पोटातल्या द्रव्याची तर आम्ही "तो आपला पुर्वगृह आहे आणो कोणताही पुर्वगृह वाईटच!" एवढेच सांगतो.
------
(विस्तारित)छोटा डॉन
पूर्वगृह नाही रे डान्या, पूर्वग्रह... च्यायला शाईन मारायची तर आधी शब्द तरी नीट लिहावे ना माणसाने? नाहीतर हसतात लोकं... ;)
(जाज्ज्वल्य मुंबईकर) बिपिन कार्यकर्ते
प्रतिक्रिया
असे अनुभव
इतक्यात
खरच थरारक
बापरे !
देवाने
अमराठी
चालायचंच ग यशोधरा
मूळ
अरे देवा !!
पुणेकर
|देवाने
पुणेकर तसे
देवाने
खुलासा.
अति घाई ... बाकी असो !
अतिघाई अन
खरे तर
हितचिंतक
ह्म्म.
हाण्ण तिच्यायला ...
जा,
याला म्हणतात...
देवाने
एकदम बरोबर..
माझा एक थरारक अनुभव
>>> चल
वाक्य
लय भारी!
तुम्ही 'सहज' हे टोपणनाव कसे काय घेतलेत
मुंबईची
याच्या
स्वगत:- काय
अहो पुणेकर
सहीच..
माझाही ...
हा प्रकार
एवढा
आमचे दोन आणे
ठाणे हे
आता
पुण्याबाह
खुलासा :
कायदेशीर
'झेंडा' हा
आता राज चा
मुंबईला
छ्या...
किंचित गल्लत झाली आहे ...
पूर्वगृह
:-)