✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझा एक थरारक अनुभव

श
शिल्पा ब यांनी
Fri, 07/16/2010 - 08:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15224 वाचन

💬 प्रतिसाद (84)

प्रतिक्रिया

अहो

llपुण्याचे पेशवेll
Fri, 07/16/2010 - 13:25 नवीन
अहो सहज, त्याला बोली भाषा का काय त्ये म्हणतात.. तुम्ही अगदीच सुदलेकनवादि आहात बॉ. पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

:-)

सहज
Fri, 07/16/2010 - 13:31 नवीन
ह्याला प्रीएम्पशन म्हणतात. ती टिंग्याची उद्बोधक घोषणा कोणी दुसरे देण्याअगोदर आपण टंकनदोष सुधारायचा म्हणायचे :-) मी कुठे सुदलेखनाचा इशय काढला? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

तेच ना ...

छोटा डॉन
Fri, 07/16/2010 - 13:31 नवीन
>>.. तुम्ही अगदीच सुदलेकनवादि आहात बॉ. +१, असेच म्हणतो. कधीकधी सहजरावही गल्ली चुकतात आणि उपक्रमाचा प्रतिसाद तिसरीकडेच लिहुन बसतात. असो, त्या पुर्वग्रह प्रकरणात "शेपुट घातले आहे". कळावे ! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

कधीकधी

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/16/2010 - 14:29 नवीन
कधीकधी सहजरावही गल्ली चुकतात आणि उपक्रमाचा प्रतिसाद तिसरीकडेच लिहुन बसतात.
सहजरावही पुणेरीच ना? ;-) (काडीगावकर) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

पूर्वगृह

विजुभाऊ
Fri, 07/16/2010 - 13:25 नवीन
पूर्वगृह नाही रे डान्या, पूर्वग्रह... त्याचे ठीक आहे हो ... त्याचे पूर्वगृह मुम्बैत नाहिये. तुमचे पूर्वगृह मुम्बैत आहे आणि सध्याचे पुण्यात आहे म्हणून तुम्ही असे म्हणताय. ग्रह उद्योग हा एक उत्तम गृह उद्योग होउ शकतो का यावर डॉन्या त्याच्या गृहात संशोधन करतोय . अर्थात योग्य ग्रह असतील तर गृह उद्योग उत्तम चालतात Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

काय हो

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/16/2010 - 13:26 नवीन
काय हो डानबाबा बंगलोरी, तुमच्या पुण्याचा कैवार घेणार्‍या बंगलोरी मराठीत पूर्वग्रह हा शब्द पूर्वगृह असा लिहीतात का? त्यावरून आठवलं, तुम्ही ठाण्याला पूर्वेच्या गृहात होतात का पश्चिमेच्या? ठाणे पूर्व विरूद्ध ठाणे पश्चिम हा वाद हिरव्या माजाएवढाच सनातन आणि स्फोटक आहे हो! ;-) मी जेव्हा एकेकाळी अनिच्छेने लोकलने प्रवास करायचे ते दिवस आठवले. कसला वैताग यायचा मुंबईबाहेरचे आणि येडे (मुंबैबाहेरचे याचा अर्थ येडे असा मी तरी घेतलेला नाही, खुलासा संपला.) लोकं ट्रेनमधे आले की ... शिस्त नाही, काही नाही आणि घुसले गर्दीत गाड्या पकडायला! गाड्या पकडायचे का कुठे झेंडे गाडायचे कोण जाणे!! असो, आम्ही सध्या स्वतंत्र संस्थानात रहातो त्यामुळे पोस्टड पत्ता काही का असेना, आम्ही आमचा वेगळाच माज दाखवतो! ;-) अदिती अवांतरः लिखाळ ... एक लंबर प्रतिसाद रे! तुझी शब्दांची वही सापडलेली दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

अर्र...

श्रावण मोडक
Fri, 07/16/2010 - 14:52 नवीन
अर्र... संपादक चुकलं वो... तो प्रवास लोकलचा आहे याविषयी आमच्या मनात तीळमात्र संशय नाही. आम्ही त्याविषयी कुठंही, काहीही म्हटलेलं नाही. पण लोकलच्या प्रवासाशी तुम्ही नातं जोडलेले इतर अनुभवांचा लोकलशी संबंध नाही, इतकाच आमचा युक्तिवाद आहे. तोच संपादित करतो म्हणालात तर आम्ही काय लिहायचं? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

तेव्हाच

Nile
Fri, 07/16/2010 - 23:53 नवीन
तेव्हाच नव्हे तर हे प्रतिसाद टंकतानाही द्रव्याचा अंमल आहे हे दिसतेच आहे, नाही का गुर्जी? -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

आतले अन बाहेरचे

राजेश घासकडवी
Fri, 07/16/2010 - 15:44 नवीन
आत राहता राहिली बाब ती पोटातल्या द्रव्याची
डान्राव, ती पोटातल्या द्रव्याची बाब आतच राहिली ते बरं नाही का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

सत्य आणि मोक्ष

विजुभाऊ
Fri, 07/16/2010 - 11:32 नवीन
मुंबईची लोकल म्हणजे एक भयानक सत्य आहे. तसे असेल तर .... पुण्याची पीमटी हा मोक्ष आहे Image removed.
  • Log in or register to post comments

पुण्याची

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 07/16/2010 - 15:05 नवीन
पुण्याची पीमटी हा मोक्ष आहे ह्या वाक्याशी शब्दशः सहमत सुहासच्या एका प्रतिसादात पीमटीच्या खाली मोक्ष संपादन करणार्‍याची आकडेवारी होती भेटला तर विदा देतोच सुहासचा प्रतिसादातील मुद्दे पिएमटी च्या खाली मृत झालेल्यांची संख्या गेल्या दहा वर्षात ११३ ....९६ जण वय वर्षे ५० आणी वय वर्षे १८ च्या खाली....काल ह्या नुकसानीसाठी स्थायी समितीने नुकसान भरपाई साठी २६ लाख वसुल केले ...११३ जणांपैकी केवळ २ जणांना पीएमटी तर्फे आजवर नुकसान भरपाई दिली गेली आहे. ४० हजार दोघांना मिळुन . ही देखील फुलकरांची कृपा (कोण फुलकर माहीत आहेत का ? पुण्यातले एक सुप्रसिध्द वकील ..मागील वर्षी निधन झाले..) चालक तीन महिने सस्पेंड आणी आता पेन्शनधारी.... ______________________________ संपादक घाश्या कोतवाल भुर्जीपाव डॉट कॉम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

पीएमटी ने

शिल्पा ब
Sat, 07/17/2010 - 00:56 नवीन
पीएमटी ने मला जवळजवळ स्वर्गापाशीच नेऊन सोडलं होतं...पण बहुतेक दार बिघडले असावे किंवा माझा मौक्षिक ब्यालंस कमी असावा मी खालीच राहिले आणि तळहातावर तिथपर्यंत जाऊन आल्याची खुण राहिली. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

दार?

पंगा
Sat, 07/17/2010 - 01:20 नवीन
पीएमटी ने मला जवळजवळ स्वर्गापाशीच नेऊन सोडलं होतं...पण बहुतेक दार बिघडले असावे
पीएमटीला दार??? असो. पीएमटीचा आम्हाला जाज्ज्वल्य अभिमान आहे. त्यामुळे 'पीएमटीने ईप्सित* स्थळी आपल्याला पोहोचवण्यात हलगर्जीपणा केला' असा गलिच्छ आरोप करून पीएमटीच्या कार्यक्षमतेबद्दलच्या कीर्तीवर** पूर्वग्रहदूषित शिंतोडे उडवण्याबद्दल (आणि एकंदरीतच पीएमटीच्या कीर्तीस आणि प्रतिष्ठेस क्षति पोहोचवल्याबद्दल) आपला तीव्र*** निषेध! (*स्पष्टीकरण आणि डिस्क्लेमरः पीएमटीला ईप्सित स्थळी. आपल्याला ते स्थळ ईप्सित असेलच, असा दावा नाही. असल्यास तो केवळ एक योगायोग समजावा.) (**उगीच नाही काही त्याला पब्लिक मर्डर ट्रान्स्पोर्ट म्हणत!) (***निषेध हा तीव्रच असावा, असा अलिखित दंडक आहे. अलिकडे हा दंडक पाळण्याच्या बाबतीत समाजाचे दुर्लक्ष होते आहे. पण लक्षात कोण घेतो?) - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

असे कसे हो

शिल्पा ब
Sat, 07/17/2010 - 05:56 नवीन
असे कसे हो तुम्ही भाषापंडित? दार स्वर्गाचे पीएमटीचे नाही... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

तसे असेल तर .... पुण्याची पीमटी हा मोक्ष आहे

संजय अभ्यंकर
Fri, 07/16/2010 - 14:42 नवीन
=)) =)) =)) =)) =)) संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

धत्तड धत्तड तत्तड तत्तड

विजुभाऊ
Fri, 07/16/2010 - 15:08 नवीन
त्या पुर्वग्रह प्रकरणात "शेपुट घातले आहे". हे धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड तत्तड Image removed.
  • Log in or register to post comments

अरे वा

शेखर
Fri, 07/16/2010 - 15:28 नवीन
अरे वा बरेच अवांतर प्रतिसाद आले आहेत ह्या धाग्यावर.
  • Log in or register to post comments

शू: तसे

विजुभाऊ
Fri, 07/16/2010 - 15:32 नवीन
शू: तसे बोलायचे नाही........ Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

किती लोक

Dhananjay Borgaonkar
Sat, 07/17/2010 - 00:33 नवीन
किती लोक जळतात रे देवा आमच्या पुण्यावर... कोणीही कितीही बोलल तरी जगात रहाण्या लायक दोनच शहरं पुणे किंवा पॅरीस.
  • Log in or register to post comments

त्यातले

मृत्युन्जय
Sat, 07/17/2010 - 10:11 नवीन
त्यातले पॅरीस खुपच महाग असल्यामुळे (पुण्यापेक्षासुद्धा महाग.) उरते केवळ पुणेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

धाग्यावरी

रेवती
Sat, 07/17/2010 - 03:31 नवीन
धाग्यावरील बरेचसे प्रतिसाद अवांतर आहेत. रेवती
  • Log in or register to post comments

(पण)धाग्याब

Nile
Sat, 07/17/2010 - 05:21 नवीन
(पण)धाग्याबद्दल पाळलेले मौन इंटरेस्टींग आहे. ;) (हलके घेणे.) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आम्ही

शिल्पा ब
Sat, 07/17/2010 - 06:01 नवीन
आम्ही सगळ्यांना फाट्यावर मारतो म्हणून कोणी संबंधित प्रतिसाद दिले किंवा नाही दिले तरी आम्ही धागा उडवणार नाही....हे तुम्ही (आणि कोणीही) कसेही घ्या. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आम्ही

परिकथेतील राजकुमार
Sat, 07/17/2010 - 11:01 नवीन
आम्ही सगळ्यांना फाट्यावर मारतो म्हणून कोणी संबंधित प्रतिसाद दिले किंवा नाही दिले तरी आम्ही धागा उडवणार नाही....हे तुम्ही (आणि कोणीही) कसेही घ्या.
मस्तच ! हे आवडले. तुम्ही 'फेडअप' झाला नाहीत ह्याचे कौतुक वाटते. सहजश्रीचा मित्र ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

एवढ्या

शिल्पा ब
Sat, 07/17/2010 - 11:04 नवीन
एवढ्या बारीक सारीक कारणांनी फेडअप व्हायला आम्ही काही अगदीच "हे" नाही.. :D *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नाईल, आपला

रेवती
Sat, 07/17/2010 - 17:13 नवीन
नाईल, आपला उपप्रतिसाद अजिबात आवडला नाही. यापुढे आपण सद्स्य रेवतीला प्रतिसाद अथवा उपप्रतिसाद न द्याल तर बरे होइल. संपादक म्हणून जे माझे काम आहे ते करीनच. आपण काळजी करू नये. कोणत्या धाग्यावर मौन पाळायचे हे ठरवण्याचे अधिकार मला आहेत. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

<<कोणत्या

शिल्पा ब
Sat, 07/17/2010 - 21:16 नवीन
<<कोणत्या धाग्यावर मौन पाळायचे हे ठरवण्याचे अधिकार मला आहेत. म्हणजे मराठीत ज्याला पार्शलिटी म्हणतात तसा प्रकार वाटतो..दुटप्पी धोरण म्हणा हवे तर. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मौन पाळणे

रेवती
Sun, 07/18/2010 - 02:12 नवीन
मौन पाळणे आणि संपादनाच्या कामात हलगर्जीपणा करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या धाग्यावर बरेच अवांतर प्रतिसाद आले. त्यात जर मिसळपावच्या धोरण क्र. ५ मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे आले असते तर अप्रकाशीत केले असते. तरीही (कोणाला फारसे न दुखावणार्‍या) अवांतरपणाला ब्रेक लावण्यासाठी म्हणून माझी उपस्थिती दाखवून देण्याचे काम केले. हा दुट्टप्पीपणा नव्हे तर थोडी मोकळीक दिली होती. त्यावर अश्याप्रकारचे उपप्रतिसाद येणे अपेक्षित नव्हते. याउपर आपली तक्रार असेल तर संपादक मंडळाला व्य. नि.तून कळवावी. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

माझी

शिल्पा ब
Sun, 07/18/2010 - 02:21 नवीन
माझी अजिबात तक्रार नाही...फक्त खटकणारे वाक्य दाखवले इतकेच...असो. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

बापरे

जागु
Sat, 07/17/2010 - 21:32 नवीन
बापरे वाचुनच भिती वाटते. मी बर्‍याच जणांचे असे प्रकार ऐकते. खरच कसे कसे अनुभव येतात ना ?
  • Log in or register to post comments

हा अनुभव

शानबा५१२
Sat, 07/17/2010 - 22:32 नवीन
हा अनुभव एखाद्याला थरारक वाटु शकतो हे कळाल्यावर इतरांच्या 'थरारक' अनुभवांना काय म्हणायच असा प्रश्न पडला. काही विनोदी वाचायला मिळेल म्हणुन लेख वाचला पण डोक्यात फक्त प्रश्न चिन्ह बाकी राहील. _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments

मिपाकर

तिमा
Sun, 07/18/2010 - 10:47 नवीन
तुम्हाला पुणेकर व्हायचे आहे, मुंबईकर का मिपाकर ? मिपाकर व्हायचे असेल तर अवांतर प्रतिक्रिया बंद करा. हाच 'थरारक'प्रसंग त्या पर्स चोरणार्‍या बाईच्या दृष्टिकोनातून ..... दादर यायच्या आधीच मी माझं 'गिर्‍हाईक' हेरुन ठेवलं होतं. बाई मुंबईची वाटत नव्हती. बावळटपणा हा, लपवायचा प्रयत्न केला तरी आमच्यासारख्या सराईताच्या नजरेतून कसा सुटणार ? पर्स जरा जास्तच संभाळत होती. तेंव्हाच वाटलं, 'माल' असणार! दादरला ती उतरताना अलगद पर्सचा पट्टा धरुन ठेवला.पण बाई लई खमकी, पुणेरी वाटली. पर्स सोडायला तयार नाही. नशिबानी गाडी सुटली. तर ती गाडीबरोबर धावायला लागली, गुद्दे मारत. म्हटलं आता पर्स नाही सोडली तर ही पडून मरायची, म्हणून दिली सोडून! आतल्या बायका विचारायला लागल्या, काय झालं ? मी म्हटलं माझी पर्स चोरून गेली हो ती भामटी! जाऊ दे. आपल्याला काय फरक पडतो? एक गिर्‍हाईक कमी तर कमी. भूतदया दाखवली का नाही ? म्हणजे पुण्य मलाच मिळालं की! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

च्यामारी!!!

शिल्पा ब
Sun, 07/18/2010 - 11:47 नवीन
च्यामारी!!! तिरशिंगराव, दृष्टीकोन असावा तर असा... लै भारी!!! तसेही आम्ही आमचा बावळटपणा कबुल सुद्धा केलेला आहे... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

धन्यवाद

तिमा
Sun, 07/18/2010 - 13:24 नवीन
शिल्पातै, 'बावळटपणा' हा उल्लेख त्या बाईच्या दृष्टिकोनातून. आम्ही तुम्हाला तसे म्हणणार नाही. प्रतिसाद खेळकरपणे घेतल्याबद्दल धन्यवाद. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा