Skip to main content

आओ, कानसेन, पहेचानो...भाग ५

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 08/07/2010 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
या स्पर्धेचा पहिला भाग गाण्यांच्या दुव्यांसह आणि विजेत्यांच्या नावांसह इथे पहायला मिळेल, दुसरा भाग इथे, तिसरा इथे, आणि चवथा इथे. *********** जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी पेश करीन, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. **************** कानसेन क्रमांक ३७: सहज कानसेन क्रमांक ३८: प्रभो कानसेन क्रमांक ३९: सहज कानसेन क्रमांक ४०: सहज कानसेन क्रमांक ४१: सहज कानसेन क्रमांक कानसेन क्रमांक कानसेन क्रमांक **************** सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!

वाचने 9980
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

In reply to by प्रभो

काल ते मिसळपाव तर आज हा प्रभो मला विजेतेपदाचा मुकुट घालू देत नाहियेत. वाईट्ट कुठले! रेवती

चांगलं अवघड द्या हो! दोन चार तास विचार करुदे लोकांना. एखादं गाणं आम्हाला येतंय म्हणुन बघावं तर ह्यांची उत्तरं आलेली इथे! :| -Nile

In reply to by सहज

काय हेच म्हणताय? कधी नव्हे ती दोनचार गाणी सोपी टाकली तर तुम्ही द्या चिथावणी म्हणजे मला कधीच ओळखता येणार नाही. एरवी अख्खं गाणं कानात ओतलं तरी कळत नाही मला. रेवती

In reply to by Nile

ते खरं आहे पण आता आधी कोण उत्तर देतय यावरच सगळं अवलंबून आहे. कालपासून प्रयत्न करकरून मी कंटाळलेली आहे. अगदी कुठली कुठली गाणी ऐकली म्हणून सांगू! रेवती

तुम्ही सारे विरुद्ध मी एकटा असा लढा चालू आहे इथे... मी एक धून टाकली रे टाकली की सारे तुटून पडताहात! #:S

In reply to by बहुगुणी

हे सगळे श्रेय रेडीओ, आकाशवाणी विविध भारती! त्यानेच कानावर केलेले संस्कार आहेत. :-)

In reply to by प्रभो

..की बाकिच्याना काल कसं वाटत होतं - च्यामारी जरा तिसर्यांदा ऐकतोय तोवर याचं उत्तर तयार.

१. निखिल देशपांडे २. प्रभो ३. सहज मिसळपाव, सहज आणि प्रभो यांत बहुतेक चढाओढ असणार जास्त वेळा कोण कानसेन होते त्याची... पण मंडळी, माझा available time जवळजवळ संपला आहे, एखादं-दुसरंच गाणं टाकू शकेन, बाकी उद्या जमेल तसं. भाग घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद!

In reply to by बहुगुणी

हां हां, म्हणजे सुग्रास भोजन वाढून वर दक्षिणा ठेवतात तसं होय!!

In reply to by मिसळपाव

अगदी! अहो बहुगुणी, धागे बरेच जण काढतात पण तुमच्या हा लेखमालेत जेवढी मेहनत आहे तेवढी बहुतेक फार फार कमी लेखमालेत असते. सो सर, थँक यु व्हेरी मच!

In reply to by मिसळपाव

सहमत...मेजवानीचा लुत्फ आम्ही घेतलाय.....तुमचे आभार मानू तेवढे कमीच आहे...२ दिवस मस्त मजेत गेले......