Skip to main content

पीके !

लेखक वेदश्री यांनी शुक्रवार, 25/04/2008 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
जसे पीजे म्हणजे पकाऊ जोक तसे पीके म्हणजे पकाऊ कोडे ! हा काथ्याकूट काढण्यामागचा हेतू हा की अशी जास्तीत जास्त कोडी समजवून घेणे आणि उत्तरे देण्यातली मजा अनुभवणे.. तर करुया सुरूवात? पहिला पीके मीच विचारते.. दोन मुंग्या एक केक खात आहेत पण त्यांच्याच जवळ उभी असलेली तिसरी मुंगी खात नाहीये. ती का खात नसेल तो केक?

वाचने 30710
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

एका फ्रीज मध्ये जिराफ कसा बसेल ?

In reply to by शितल

हॅ हॅ हॅ.... दार उघडून...बास का ताई...आमीच शिकवलं की त्याला असं फ्रिजात शिरायला :-)

बरोबर?

भिंतीवरुन मुंग्या चाललेल्या असतात्,रेडीओवर गाणं चालू असतं "ओ साथी चलऽऽ". अचानक गाणं संपतं आणि सगळ्या मुंग्या खाली पडतात. ?????? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by धमाल मुलगा

धम्या लेका अगदी सह्ही जवाब. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

बर, सगळे प्राणी पिकनिकला जातात, फक्त जिराफ सोडुन का?

In reply to by शितल

अग्गं.. तो फ्रिजमध्ये नसतो का... विसरलीस पण इतक्यात!

In reply to by मनस्वी

हे उत्तर येणार असं. तेवढ्यात नारायणानं बोलावलं आणि इकडं मनस्वीनं बाजी मारली.

या चर्चेत ८०+ प्रतिसाद आले आहेत. एवढ्या लांबलेल्या चर्चा कुठेतरी थांबायला हव्यात. या आधीच पिके २ व पिके ३ सुरू झाले आहेत , तेथे प्रतिसाद द्यावा. धन्यवाद.