मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पीके - २

वेदश्री · · काथ्याकूट
जसे पीजे म्हणजे पकाऊ जोक तसे पीके म्हणजे पकाऊ कोडे ! हा काथ्याकूट काढण्यामागचा हेतू हा की अशी जास्तीत जास्त कोडी समजवून घेणे आणि उत्तरे देण्यातली मजा अनुभवणे.. तर करुया सुरूवात? पहिल्या भागातील योग्य उत्तरे न मिळालेली कोडी अशी आहेत - १. एका मुलाचे नाव प्रकाश असूनही त्याचे सगळे दोस्त त्याला 'पक्या' म्हणायचे. यावरून तो एक शास्त्रज्ञ होता हे सिद्ध करा. - वेदश्री २. १३ च्या निम्मे ८ होतात, हे सिद्ध करा ! - वेदश्री ३. बर, सगळे प्राणी पिकनिकला जातात, फक्त जिराफ सोडुन का? - शितल

वाचने 16815 वाचनखूण प्रतिक्रिया 54

मुक्तसुनीत Fri, 04/25/2008 - 17:52
३. बर, सगळे प्राणी पिकनिकला जातात, फक्त जिराफ सोडुन का? - शितल कारण तो फ्रिजात असतो ना !

वेदश्री Fri, 04/25/2008 - 17:55
कोड्याचे लॉजिकल उत्तर जर ते कोडे विचारणारालाच द्यावे लागले, तर इतरांना काय शिक्षा? एक मिसळपाव पार्टी ! कसें? असा जर काही नियम झाला तर मला दोन पार्ट्या मिळतील असा नूर दिसतोय एकंदरीत.. :-)

वेदश्री Fri, 04/25/2008 - 18:05
१३ च्या निम्मे ८ रोमन पद्धतीचे आकडे वापरून मिळवता येते का बघा बरं.. पक्यावाल्या कोड्याचे उत्तर द्यायला भीती वाटत आहे.. कारण ते खर्रंच पकाऊ कोडे आहे ! पकाऊ उत्तर वाचून मला मिपावरून हद्दपार केले तर काय घ्या?!!! :-)

In reply to by वेदश्री

मनस्वी Fri, 04/25/2008 - 18:07
पक्यावाल्या कोड्याचे उत्तर द्यायला भीती वाटत आहे.. कारण ते खर्रंच पकाऊ कोडे आहे ! पकाऊ उत्तर वाचून मला मिपावरून हद्दपार केले तर काय घ्या?!!! :-)
आताऽऽऽऽ.... नाही दिले तर हद्दपार करू!

In reply to by मनस्वी

वेदश्री Fri, 04/25/2008 - 18:14
>आताऽऽऽऽ.... नाही दिले तर हद्दपार करू! बापरे ! ठीके.. देते बापडी उत्तरे.. १३ हा आकडा रोमन लिपीमध्ये XIII असा लिहितात तर त्यात मध्ये आडवी रेष मारायची.. म्हणजे निम्मा केल्याचाच प्रकार ना? वरती जो भाग राहील ( VIII ) तो असेल रोमन ८ सारखा.. म्हणजे झाले की नाही १३ च्या निम्मे ८?! आता जाऊया पक्याकडे.. प्रकाशला त्याचे दोस्त काय म्हणायचे - पक्या पक्याच्या उलट काय होते? - कॅप कॅप म्हणजे काय? - टोपी टोपीच्या उलट काय? - पीटो पीटो म्हणजे काय? - मारा माराच्या उलट काय? - रामा रामा हा कोण होता? - देव देवच्या उलट काय? - वदे वदे म्हणजे काय? - बोलो बोलोच्या उलट काय? - लोबो लोबो हा कोण होता - शास्त्रज्ञ.. म्हणून पक्यादेखील शास्त्रज्ञ !!! हुश्श... :-)

In reply to by वेदश्री

नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 18:16
तुमच्या पायांचा फोटो पाठवा. ते उलटे नाहीत ना पाहू द्या. सरळ असतील तर वंदन करतो. उलटे असतील तर टांगून ठेवतो. आयला काय डोकं पकवलंय... लय भारी. नारायण, नारायण...

In reply to by वेदश्री

धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 18:19
अरे काय हे? काय चाललय काय नक्की? मला माझा टी.एल. रोखून बघतोय...नजरेत "च्यायला मेंटल हॉस्पिटलात' फोन करावा लागणार " भाव!!! मी एकटाच गडगडाटी हसतोय पण आणि स्वत:चे केस ओढतोय.... शेजारची तामिळी-कानडी गाढवं बावचळून गेलीयेत.... अगं ए वेदश्रीताई....पाय कुठायत तुझे? फोटो चढव इथेच त्यांचा...हार फुलं हळद-कुंकु वाहीन म्हणतो....

In reply to by धमाल मुलगा

झकासराव Sat, 04/26/2008 - 18:27
=)) हे त्या कोडाच्या उत्तरासाठी. धमाल माझी अवस्था देखील तुझ्यासारखीच झाली रे. फक्त आज वीकेंड असल्याने आमचा टी ली लवकर पळालाय. :)

In reply to by वेदश्री

मनस्वी Fri, 04/25/2008 - 18:21
लोबोच्या उलटे काय - बोलो बोलो म्हणजे काय - वद वदच्या उलटे काय - दव दवच्या उलटे काय - वद वदतात कुठून - तोंड तर तुझे तोंडभरून कौतुक!

स्वाती राजेश Fri, 04/25/2008 - 18:15
नारायण नारायण करत नारदाचार्य तुम्ही इकडचे तिकडे करता.... साधी एक काडी तुम्हाला इकडची तिकडे करता आली नाही.;))) तुम्ही कसले हो नारद? ह.घ्या.:))))

In reply to by स्वाती राजेश

नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 18:19
नारद नव्हे. नारदाचार्य. ते काड्या इकडून तिकडं करायचे. आम्ही फक्त काड्या घालत असतो. 'ह. घ्या.'ची गरज नाही हो. येऊन जाऊन चार घटका विरंगुळ्याचा इथं हेतू. त्यात ते ह. घ्या. हे टंकीत करण्याचे कष्ट कशाला. सारं काही ह.च घेऊ.

In reply to by स्वाती राजेश

इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 18:20
ते कोडे पाहून नारद सुद्धा गारद झाला म्हणायचा. बाकी काड्या लावणार्‍या नारदाला साधी एक काडी हलवता येऊ नये याचे आश्चर्य वाटतंय. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

वरदा Fri, 04/25/2008 - 18:16
रोमन १३ म्हणजे XIII आता निम्मे करायला.. बरोब्बर मधे १ आडवी रेघ द्या.. झाले ८.. म्हणजे रोमन VIII हे मला खूप आवडलं ते पक्याचं काय? शास्रज्ञ पकाऊ असतात असं काहीतरी आहे का?

वरदा Fri, 04/25/2008 - 18:24
पाहिलच नाही...सॉलीड पकाऊ आहे ... आवडलं

In reply to by वेदश्री

इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 18:29
लगोलग पैसे डबल करायचे आहेत.. काही उपाय आहे का? बँक ऑफ बिहार मध्ये गुंतवा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

वेदश्री Fri, 04/25/2008 - 18:31
अम्ह्म.. गुंतवा मग बँकेकडे तोंड ताणा.. वो झोल नहीं मंगता है.. अभ्भीके अभ्भी अपनका रोकडा डबल होनेको मंगता है.. :))

In reply to by वेदश्री

इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 18:36
मग झेरॉक्स करा. सोप्पय की नाई? समर्थ झेरॉक्स,डेक्कन जिमखाना,पुणे-४ (आमच्याकडे कोर्‍या कागदाच्या झेरॉक्स काढल्या जातील) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

वेदश्री Fri, 04/25/2008 - 18:38
नाही हो.. झेरॉक्स करण्याइतकापण वेळ नाहीये आपल्याकडे. लग्गोल्लग दामदुप्पट पायजेल आपल्याला..

In reply to by वेदश्री

इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 18:42
लई पकवलं.आता सांगून टाका एकदाचं. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by वेदश्री

इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 18:50
वाटलंच होतं,हे असं काही उत्तर असेल ते.(मग सांगीतलं का नाहीस लेका?) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

वरदा Fri, 04/25/2008 - 18:45
देऊन दोनदा सुट्टे मागा..थोडं भांडण झालं तरी चालेल ते घ्याच....

वेदश्री Fri, 04/25/2008 - 18:53
लाल आहे पण मिरची नाही, कृष्ण आहे पण काळा नाही, आड आहे पण पाणी नाही आणि वाणी आहे पण दुकानच नाही.. असे काय?

मुक्तसुनीत Fri, 04/25/2008 - 18:57
अरे ..... श्वास घ्यायला जागा द्याल का नाही ! नुसते टणाटणा फुटाणे फुटत आहेत .... हापिसातले लोक मला वेड्यात काढणार ! :-)

In reply to by वेदश्री

इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 19:02
नारळ. हाय का नाय. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

वेदश्री Fri, 04/25/2008 - 19:02
१. हाताचे बोट म्हणजे दूध तर हलणारे बोट म्हणजे? २. उभे बोट म्हणजे बीन तर आडवे बोट म्हणजे? ३. आडवे बोट म्हणजे साखर तर उभे बोट म्हणजे?