Skip to main content

पीके !

लेखक वेदश्री यांनी शुक्रवार, 25/04/2008 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
जसे पीजे म्हणजे पकाऊ जोक तसे पीके म्हणजे पकाऊ कोडे ! हा काथ्याकूट काढण्यामागचा हेतू हा की अशी जास्तीत जास्त कोडी समजवून घेणे आणि उत्तरे देण्यातली मजा अनुभवणे.. तर करुया सुरूवात? पहिला पीके मीच विचारते.. दोन मुंग्या एक केक खात आहेत पण त्यांच्याच जवळ उभी असलेली तिसरी मुंगी खात नाहीये. ती का खात नसेल तो केक?

वाचने 30710
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

दोन मुंग्या एक केक खात आहेत पण त्यांच्याच जवळ उभी असलेली तिसरी मुंगी खात नाहीये. ती का खात नसेल तो केक? कारण केकला मुंग्या लागल्या आहेत. -) असे असावे. अबब

कारण त्या केकला मुंग्या लागलेल्या आहेत ना! तीची आई रागावते मुंग्या लागलेलं खाल्लं की :-)

In reply to by स्वाती राजेश

त्या मुंगीला जागचे हलता येत नसेल.... कारण तिच्या "पायांना मुंग्या" आल्या असतील !! आपलेच, साठ्यांचे कार्टे .

अरे वा ! अबब आणि ध.मु. दोघांनीही एकदम बरोबर उत्तरे दिलीत. नुकतंच केजी पास केलेला विद्यार्थी कोणते गाणे म्हणेल?

In reply to by आनंदयात्री

योग्य उत्तराच्या खूप जवळ आहे हे उत्तर.. खरे उत्तर 'केजी किया रे' असे आहे !

एक आजारी गरूड अन्नाच्या शोधार्थ उडत असतो तर पोलिस त्याला अटक करतात ! का बरं?

In reply to by धमाल मुलगा

अरे वाह ! बरोबर.. इतरांनीही कोडी विचारावी.. माझ्याकडे खूप लिमिटेड कोटा आहे ! १३चा घन किती? ( गणितज्ज्ञांनी माफ करावे ! )

In reply to by वेदश्री

सुरूऽऽऽऽर आमच्या आनंदयात्री मास्तरांची शिकवणी!

In reply to by मनस्वी

>सुरूऽऽऽऽर बरोब्बर ! >आमच्या आनंदयात्री मास्तरांची शिकवणी! ये बात कुछ हजम नहीं हुई |

In reply to by मनस्वी

अशाच सज्जनांचा सहवास दे ! -(कृतकृत्य मास्तर) मिष्टर आनंद :)

एका मुलाचे नाव प्रकाश असूनही त्याचे सगळे दोस्त त्याला 'पक्या' म्हणायचे. यावरून तो एक शास्त्रज्ञ होता हे सिद्ध करा.

In reply to by वेदश्री

कारण पक्याच्या मित्राचे नाव दिनेश असूनही त्याला सगळे दोस्त 'दिन्या' म्हणायचे. झाले सिद्ध.. हाय काय अन् नाय काय!

In reply to by मनस्वी

अम्ह्म.. इतके सरळसोट नाही याचे उत्तर ! सुरूवात मुद्दाम सोप्या कोड्यांनी केली मी.. ;-)

In reply to by वेदश्री

कृपया तुम्हीच प्रकाश पाडा उत्तराचा..

एका सुसरीचं मगरावर प्रेम बसतं. दोघांच्या घरून विरोध म्हणून ते पळून जाऊन लग्न करायचं ठरवतात. ठरलेल्या रात्री, सुसर नदीकिनारी येते, वाट बघते आणि गाणं म्हणते. कोणतं गाणं?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


In reply to by नंदन

...मगर तुम ना आये ! नंद्या तु बी उतरलास की !!

In reply to by आनंदयात्री

चाँद फिर निकला.. मगर तुम ना आये..

चांद फिर निकला, मगर तुम ना आये

१३ च्या निम्मे ८ होतात, हे सिद्ध करा !!!

In reply to by वेदश्री

आठ एके आठ आठ दुणे तेरा .... म्हणून १३ च्या निम्मे ८! हे हे कसलं सोप्पय!

In reply to by मनस्वी

हे हे हे ... आमच्या क्यालसी मधे ८ च होतात म्हणुन. -(यम थ्री मधी ३ दा नापास झालेला) गणितयात्री

In reply to by मनस्वी

गलत जव्वाब.. लॉजिकल थिंकिंग आवश्यक आहे पीके असला तरीही !

१. हमे और जीनेकी चाहत ना होती, 'मगर' तुम ना होते २. आजा 'मगर' मधुर चांदनी में हम अशी अजून करता येतील...

In reply to by नारदाचार्य

अहो मुनीवर्य ते 'सनम' आहे.

In reply to by मनस्वी

सनम बरोबर, पण त्या सुसरीची सनम मगरच ना हो? आणि जरा गुणगुणून बघा ना.

In reply to by मनस्वी

पकाऊ कोड्याच्या उत्तरावर त्यांनी काय टाळ्या वाजवायच्या?

प्रश्न - २० फूट X २० फूट X १२ फूट पाण्याचा हौद आहे. त्यात निम्म्या उंचीपर्यंत पाणी भरलेलं आहे. त्यात जर सर्वसाधारण आकाराचा हत्ती पडला, तर काय होईल?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


धबाक्क्क्क्क... काही पाणी इकडे काही तिकडे.

स्विमींग करेल

तिथला वाचमेन दचकून खुर्चीतून धाप्पकन सांडेल.

In reply to by मनस्वी

झाला .. माझं विंटरनेट स्लो आहे म्हणुन :( माझ्या आधी पोष्ट झाला तुझा !

In reply to by नंदन

५० मधुन ५ हा आकडा वजा केला की ० रहाणार ! (बाकी शुन्य ही कादंबरी न आवडलेला) - आंद्या पाणिनी

In reply to by आनंदयात्री

तुमच्या शिकवणीप्रमाणे ४५ रहायला पाहिजेत.. म्हणजे तुम्ही आम्हाला भरगच्च फी घेउन चूकीचे शिकवले तर!

In reply to by मनस्वी

तुम्ही शिकवणी विसरलात .. तुम्ही म्हणता तशी आमची शिकवणी असली असती तर मुंगी एवढी सुसंस्कारी नसली असती :))))

In reply to by नंदन

तुमचीच शिकवणी लावा(वी) म्हणतो.

In reply to by नंदन

आभासी विश्वात सगळेच हलके घेतो. 'कळ' काढण्याचा स्वभाव असला की हलकेच घ्यावे लागते. त्यामुळे बिनधास्त चालू द्या.

In reply to by नंदन

आमचा हत्ती झाला .. अळी मिळी गुप चिळी ठेवली असती तर काही बिघडले नसते :(

चला आता मी घालते कोडी, दोन हत्ती ज॑गलातुन चालले असतात, एक जण असाच झाडावर जाऊन बसतो, तर दुसरा का नाही?

In reply to by शितल

.......... झाला की नाही पोपट?

In reply to by शितल

त्याला झाडावर बसायचा कंटाळा आलेला असतो.

In reply to by शितल

बास की डोकं पकवणं. द्या की उत्तर काय ते....

मिपावरची 'फाष्टेश्ट फिफ्टी' म्हणुन गिनली जाइल ... वेदश्री चा विजय असो ! पीके चा विजय असो ! मिपाधर्माचा विजय असो !

एका झाडावर ४ हत्ती बसलेले असतात... पहिला हत्ती पडतो...का? दुसरा पण पडतो...का? तिसरा पण पडतो...का? चौथा पण पडतो....का? शेवटी झाड पण पडते...का का का?

त्यांना मुंगीचा धक्का लागतो.

बसल्या बसल्या पहिला हत्ती पेंगत असतो, त्याचा तोल जातो. आता सांगा दुसरा का पडतो?

पहिला पडतो तेव्हा मोठ्ठा आवाज होतो ठप्प्पाक्क्क. तो ऐकून दुसरा दचकतो आणि पडतो. हे दोघे कसे पडले हे पहायला जाऊन तिसरा पडतो आणि या तिघांचे असे झाले या धक्क्यानेच चौथा पडतो. आता झाड का पडले ते तूच सांग धमाल मुला...

चला आता मी घालते कोडी, दोन हत्ती ज॑गलातुन चालले असतात, एक जण असाच झाडावर जाऊन बसतो, तर दुसरा का नाही? अरे, पहिला बसल्यावर झाड आडवे नाही का होणार, मग दुसरा बापुडा कसा बर बसणार ?

दुसरा पहिल्याच्या शेपटीला धरून बसलेला असतो ना...म्हणून तिसरा 'काय झालं?' बघायला जातो आणि धुब्बुक! चौथ्याला वाटतं हा काय बॉ नवा खेळ म्हणून तोही..धुब्बुक.. आणि शेवटी.............. झाडाला वाटतं............आपणही हत्तीच आहोत म्हणून तेही.....