जसे पीजे म्हणजे पकाऊ जोक तसे पीके म्हणजे पकाऊ कोडे ! हा काथ्याकूट काढण्यामागचा हेतू हा की अशी जास्तीत जास्त कोडी समजवून घेणे आणि उत्तरे देण्यातली मजा अनुभवणे.. तर करुया सुरूवात?
पहिला पीके मीच विचारते..
दोन मुंग्या एक केक खात आहेत पण त्यांच्याच जवळ उभी असलेली तिसरी मुंगी खात नाहीये. ती का खात नसेल तो केक?
वाचने
30840
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तर
दोन मुंग्या एक केक खात आहेत पण त्यांच्याच जवळ उभी असलेली तिसरी मुंगी खात नाहीये. ती का खात नसेल तो केक?
कारण केकला मुंग्या लागल्या आहेत. -)
असे असावे.
अबब
मी सांगू? मी सांगू???
कारण त्या केकला मुंग्या लागलेल्या आहेत ना! तीची आई रागावते मुंग्या लागलेलं खाल्लं की :-)
तिला..
In reply to मी सांगू? मी सांगू??? by धमाल मुलगा
तिला डायबेटीस झालेला असेल.
:))))))
आणखी एक उत्तर............
In reply to तिला.. by स्वाती राजेश
त्या मुंगीला जागचे हलता येत नसेल....
कारण तिच्या "पायांना मुंग्या" आल्या असतील !!
आपलेच,
साठ्यांचे कार्टे .
पीके - २
अरे वा ! अबब आणि ध.मु. दोघांनीही एकदम बरोबर उत्तरे दिलीत.
नुकतंच केजी पास केलेला विद्यार्थी कोणते गाणे म्हणेल?
क्रेझी किया रे
In reply to पीके - २ by वेदश्री
क्रेझी किया रे
क्रेझी किया रे
केजी किया रे !
In reply to क्रेझी किया रे by आनंदयात्री
योग्य उत्तराच्या खूप जवळ आहे हे उत्तर.. खरे उत्तर 'केजी किया रे' असे आहे !
पीके - ३
एक आजारी गरूड अन्नाच्या शोधार्थ उडत असतो तर पोलिस त्याला अटक करतात ! का बरं?
illegal flying !!!!
In reply to पीके - ३ by वेदश्री
illegal flying !!!!
पीके - ४
In reply to illegal flying !!!! by धमाल मुलगा
अरे वाह ! बरोबर.. इतरांनीही कोडी विचारावी.. माझ्याकडे खूप लिमिटेड कोटा आहे !
१३चा घन किती? ( गणितज्ज्ञांनी माफ करावे ! )
१३ * १३ * १३
In reply to पीके - ४ by वेदश्री
सुरूऽऽऽऽर
आमच्या आनंदयात्री मास्तरांची शिकवणी!
तेरा चा घन
In reply to १३ * १३ * १३ by मनस्वी
तीन तेरा
>सुरूऽऽऽऽर
In reply to १३ * १३ * १३ by मनस्वी
>सुरूऽऽऽऽर
बरोब्बर !
>आमच्या आनंदयात्री मास्तरांची शिकवणी!
ये बात कुछ हजम नहीं हुई |
देवा
In reply to १३ * १३ * १३ by मनस्वी
अशाच सज्जनांचा सहवास दे !
-(कृतकृत्य मास्तर) मिष्टर आनंद :)
पीके - ५
एका मुलाचे नाव प्रकाश असूनही त्याचे सगळे दोस्त त्याला 'पक्या' म्हणायचे. यावरून तो एक शास्त्रज्ञ होता हे सिद्ध करा.
कारण...
In reply to पीके - ५ by वेदश्री
कारण पक्याच्या मित्राचे नाव दिनेश असूनही त्याला सगळे दोस्त 'दिन्या' म्हणायचे.
झाले सिद्ध.. हाय काय अन् नाय काय!
अम्ह्म..
In reply to कारण... by मनस्वी
अम्ह्म.. इतके सरळसोट नाही याचे उत्तर ! सुरूवात मुद्दाम सोप्या कोड्यांनी केली मी.. ;-)
वेदश्रीताई
In reply to पीके - ५ by वेदश्री
कृपया तुम्हीच प्रकाश पाडा उत्तराचा..
थिंक थिंक..
In reply to वेदश्रीताई by मनस्वी
विचार करा की जरा..
अजून एक....
एका सुसरीचं मगरावर प्रेम बसतं. दोघांच्या घरून विरोध म्हणून ते पळून जाऊन लग्न करायचं ठरवतात. ठरलेल्या रात्री, सुसर नदीकिनारी येते, वाट बघते आणि गाणं म्हणते. कोणतं गाणं?
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
:)
In reply to अजून एक.... by नंदन
...मगर तुम ना आये !
नंद्या तु बी उतरलास की !!
आलं.. मला आलं
In reply to :) by आनंदयात्री
चाँद फिर निकला.. मगर तुम ना आये..
सुसरबाई तुझी पाठ मऊ..
In reply to अजून एक.... by नंदन
हेच ते गाणे!
खी खी खी
In reply to सुसरबाई तुझी पाठ मऊ.. by मनस्वी
खी खी खी :)
खी खी खी :)
गाणे...
चांद फिर निकला, मगर तुम ना आये
पीके - गणिती !
१३ च्या निम्मे ८ होतात, हे सिद्ध करा !!!
कसलं सोप्पय
In reply to पीके - गणिती ! by वेदश्री
आठ एके आठ
आठ दुणे तेरा
....
म्हणून १३ च्या निम्मे ८!
हे हे कसलं सोप्पय!
हे हे कसलं सोप्पय!
In reply to कसलं सोप्पय by मनस्वी
हे हे हे ... आमच्या क्यालसी मधे ८ च होतात म्हणुन.
-(यम थ्री मधी ३ दा नापास झालेला) गणितयात्री
गलत जव्वाब
In reply to कसलं सोप्पय by मनस्वी
गलत जव्वाब.. लॉजिकल थिंकिंग आवश्यक आहे पीके असला तरीही !
घ्या
१. हमे और जीनेकी चाहत ना होती, 'मगर' तुम ना होते
२. आजा 'मगर' मधुर चांदनी में हम
अशी अजून करता येतील...
वा..
In reply to घ्या by नारदाचार्य
उत्तर आवडले, नारदाचार्य :)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सनम
In reply to घ्या by नारदाचार्य
अहो मुनीवर्य ते 'सनम' आहे.
काय बॉ हे?
In reply to सनम by मनस्वी
सनम बरोबर, पण त्या सुसरीची सनम मगरच ना हो? आणि जरा गुणगुणून बघा ना.
पाहिले गुणगुणून...
In reply to काय बॉ हे? by नारदाचार्य
आणि.... शेजारचे पळून गेले!
मग...?
In reply to पाहिले गुणगुणून... by मनस्वी
पकाऊ कोड्याच्या उत्तरावर त्यांनी काय टाळ्या वाजवायच्या?
गणिती पीके-२
प्रश्न - २० फूट X २० फूट X १२ फूट पाण्याचा हौद आहे. त्यात निम्म्या उंचीपर्यंत पाणी भरलेलं आहे. त्यात जर सर्वसाधारण आकाराचा हत्ती पडला, तर काय होईल?
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हात्तिच्या
In reply to गणिती पीके-२ by नंदन
एवढेच ना .. सोप्पय .. तुम्हाला माहित नाही ??
२ गोष्टी होतील..
In reply to गणिती पीके-२ by नंदन
१. हत्ती ओला होईल.
२. हत्तीचा पोपट होईल.
पोपट :))))))))
In reply to २ गोष्टी होतील.. by मनस्वी
एक्झ्याक्टली हेच म्हणायचे होते नंदु :)))
हहपुवा...
:D
In reply to पोपट :)))))))) by आनंदयात्री
दोन्ही उत्तरे बरोबर :)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धबाक्क्क्क्क्
धबाक्क्क्क्क... काही पाणी इकडे काही तिकडे.
तो..
स्विमींग करेल
हौद--हत्ती---पाणी
तिथला वाचमेन दचकून खुर्चीतून धाप्पकन सांडेल.
अगदी बरोब्बर!
In reply to हौद--हत्ती---पाणी by धमाल मुलगा
१० पैकी १०.
ठ्ठप्पाक !!
In reply to अगदी बरोब्बर! by मनस्वी
ठ्ठप्पाक !!
कपाळावर हात मारुन घेतला वॉचमनने ;)
अजून एक गणित
पन्नासातून पाच किती वेळा वजा करता येऊ शकतात?
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
किती वेळा बरं....
In reply to अजून एक गणित by नंदन
एकदाच!
आलं की नाही..
तडफडाट
In reply to किती वेळा बरं.... by मनस्वी
झाला .. माझं विंटरनेट स्लो आहे म्हणुन :( माझ्या आधी पोष्ट झाला तुझा !
एकदाच !
In reply to अजून एक गणित by नंदन
५० मधुन ५ हा आकडा वजा केला की ० रहाणार !
(बाकी शुन्य ही कादंबरी न आवडलेला) - आंद्या पाणिनी
पण मास्तर..
In reply to एकदाच ! by आनंदयात्री
तुमच्या शिकवणीप्रमाणे ४५ रहायला पाहिजेत..
म्हणजे तुम्ही आम्हाला भरगच्च फी घेउन चूकीचे शिकवले तर!
छ्या छ्या
In reply to पण मास्तर.. by मनस्वी
तुम्ही शिकवणी विसरलात .. तुम्ही म्हणता तशी आमची शिकवणी असली असती तर मुंगी एवढी सुसंस्कारी नसली असती :))))
आंद्या...
In reply to एकदाच ! by आनंदयात्री
एकदाच बरोबर आहे...पण पन्नासातून एकदा ५ घालवले की ४५ उरतात. पुन्हा ५ घालवायला, पन्नास कुठनं आणायचे? :)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मास्तर
In reply to आंद्या... by नंदन
तुमचीच शिकवणी लावा(वी) म्हणतो.
अवश्य
In reply to मास्तर by नारदाचार्य
पण नारदाचार्य, थोडी 'कळ' काढा :)
[ह. घ्या. हो]
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आम्ही
In reply to अवश्य by नंदन
आभासी विश्वात सगळेच हलके घेतो. 'कळ' काढण्याचा स्वभाव असला की हलकेच घ्यावे लागते. त्यामुळे बिनधास्त चालू द्या.
हात्तिचायला
In reply to आंद्या... by नंदन
आमचा हत्ती झाला ..
अळी मिळी गुप चिळी ठेवली असती तर काही बिघडले नसते :(
असेच आपले
चला आता मी घालते कोडी, दोन हत्ती ज॑गलातुन चालले असतात, एक जण असाच झाडावर जाऊन बसतो, तर दुसरा का नाही?
कारण
In reply to असेच आपले by शितल
त्याचे पाय दुखत नसतात?
(अंदाजपंचे)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
उत्तर
In reply to असेच आपले by शितल
..........
झाला की नाही पोपट?
कारण
In reply to असेच आपले by शितल
त्याला झाडावर बसायचा कंटाळा आलेला असतो.
आता
In reply to असेच आपले by शितल
बास की डोकं पकवणं. द्या की उत्तर काय ते....
फाष्टेश्ट फिफ्टी
मिपावरची 'फाष्टेश्ट फिफ्टी' म्हणुन गिनली जाइल ...
वेदश्री चा विजय असो !
पीके चा विजय असो !
मिपाधर्माचा विजय असो !
ए...माझा पण एक कोडा....
एका झाडावर ४ हत्ती बसलेले असतात...
पहिला हत्ती पडतो...का?
दुसरा पण पडतो...का?
तिसरा पण पडतो...का?
चौथा पण पडतो....का?
शेवटी झाड पण पडते...का का का?
कारण...
In reply to ए...माझा पण एक कोडा.... by धमाल मुलगा
भूकंप होतो!
कारण...
त्यांना मुंगीचा धक्का लागतो.
चुक्क!
बसल्या बसल्या पहिला हत्ती पेंगत असतो, त्याचा तोल जातो.
आता सांगा दुसरा का पडतो?
असं होय...
पहिला पडतो तेव्हा मोठ्ठा आवाज होतो ठप्प्पाक्क्क.
तो ऐकून दुसरा दचकतो आणि पडतो. हे दोघे कसे पडले हे पहायला जाऊन तिसरा पडतो आणि या तिघांचे असे झाले या धक्क्यानेच चौथा पडतो.
आता झाड का पडले ते तूच सांग धमाल मुला...
:)
चला आता मी घालते कोडी, दोन हत्ती ज॑गलातुन चालले असतात, एक जण असाच झाडावर जाऊन बसतो, तर दुसरा का नाही?
अरे, पहिला बसल्यावर झाड आडवे नाही का होणार, मग दुसरा बापुडा कसा बर बसणार ?
थोडं बरोबर थोडं चुक..
दुसरा पहिल्याच्या शेपटीला धरून बसलेला असतो ना...म्हणून
तिसरा 'काय झालं?' बघायला जातो आणि धुब्बुक!
चौथ्याला वाटतं हा काय बॉ नवा खेळ म्हणून तोही..धुब्बुक..
आणि शेवटी..............
झाडाला वाटतं............आपणही हत्तीच आहोत म्हणून तेही.....
लय भारी....
In reply to थोडं बरोबर थोडं चुक.. by धमाल मुलगा
खासच. लय लय भारी. हे हत्ती कुठल्या सर्कसचे आहेत पहावे लागेल.
आणि
In reply to थोडं बरोबर थोडं चुक.. by धमाल मुलगा
धमुला वाटतं.. आपण झाड आहोत.. म्हणून मग तो उभा रहातो.
:>
एका फ्रीज मध्ये जिराफ कसा बसेल ?
हॅ हॅ
In reply to :> by शितल
हॅ हॅ हॅ....
दार उघडून...बास का ताई...आमीच शिकवलं की त्याला असं फ्रिजात शिरायला :-)
कुडकुडत!
बरोबर?
घ्या अजून येक
भिंतीवरुन मुंग्या चाललेल्या असतात्,रेडीओवर गाणं चालू असतं "ओ साथी चलऽऽ".
अचानक गाणं संपतं आणि सगळ्या मुंग्या खाली पडतात. ??????
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
टाळ्या....टाळ्या....टाळ्या...
In reply to घ्या अजून येक by इनोबा म्हणे
आता टाळ्या वाजवायला लागल्यावर आणखी काय होणार भौ?
:)
In reply to टाळ्या....टाळ्या....टाळ्या... by धमाल मुलगा
धम्या लेका अगदी सह्ही जवाब.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
:
बर, सगळे प्राणी पिकनिकला जातात, फक्त जिराफ सोडुन का?
कारण
In reply to : by शितल
अग्गं.. तो फ्रिजमध्ये नसतो का... विसरलीस पण इतक्यात!
वाटलंच होतं...
In reply to कारण by मनस्वी
हे उत्तर येणार असं. तेवढ्यात नारायणानं बोलावलं आणि इकडं मनस्वीनं बाजी मारली.
एक मुंगी स्कूटरवरुन चाललेली असते ती एकदम खाली पडते
असे का?
चतुरंग
असे का?
In reply to एक मुंगी स्कूटरवरुन चाललेली असते ती एकदम खाली पडते by चतुरंग
तिचा ब्रेक पर्यत पाय पोचला नसेल !!!!! :)
आता पुरे
या चर्चेत ८०+ प्रतिसाद आले आहेत. एवढ्या लांबलेल्या चर्चा कुठेतरी थांबायला हव्यात. या आधीच पिके २ व पिके ३ सुरू झाले आहेत , तेथे प्रतिसाद द्यावा.
धन्यवाद.