✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक पुस्तक वाचताना...

श
श्रावण मोडक यांनी
Sun, 09/20/2009 - 18:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9955 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

उच्च...

बिपिन कार्यकर्ते
Sun, 09/20/2009 - 18:54 नवीन
उच्च पुस्तकाची उच्च ओळख... नक्की वाचेन. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

सुंदर

प्रसन्न केसकर
Sun, 09/20/2009 - 19:40 नवीन
लिहिलय परिक्षण. वेळेअभावी ही फक्त पोच. सविस्तर अभिप्राय नंतर देईन. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

एका

मनीषा
Sun, 09/20/2009 - 19:58 नवीन
एका चांगल्या पुस्तकाचा तितकाच सुंदर परिचय मी हे पुस्तक वाचलय ... हा लेख वाचुन परत वाचावसं वाटतं आहे..
  • Log in or register to post comments

अत्यंत

घाटावरचे भट
Sun, 09/20/2009 - 20:25 नवीन
अत्यंत सुंदर परिचय. पुस्तक वाचायलाच हवे. धन्यवाद श्रा.मो.
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Sun, 09/20/2009 - 21:50 नवीन
हेच म्हणतो. लेखन सुरेख जमले आहे. व्यासपर्व हे या विषयावरचे एकेकाळचे अतीव लाडके पुस्तक. (इरावती कर्वे बाईंचे "युगांत" हे दुसरे. ) या निमित्ताने त्या पुस्तकाची , या विषयाची परत एकदा आठवण झाली. धन्यवाद. महाभारताचे इंटरप्रिटेशन (आकलन ) जवळजवळ प्रत्येक हिंदू माणसाने कधीनाकधी केलेले असेल. दुर्गाबाई, इरावतीबाई यांच्यासारख्या लोकांनी केलेल्या विवेचनाला तत्वज्ञान, संस्कृती, इतिहास , काव्य यांचे अनेकानेक संदर्भ मिळतात आणि त्यामुळे त्यांचे लिखाण मार्मिक, चिरस्मरणीय ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

+२

चित्रा
Sun, 09/20/2009 - 22:06 नवीन
लेखन सुरेख जमले आहे. दुर्गाबाई, ... विवेचनाला तत्वज्ञान, संस्कृती, इतिहास , काव्य यांचे अनेकानेक संदर्भ मिळतात आणि त्यामुळे त्यांचे लिखाण मार्मिक, चिरस्मरणीय ठरते. इरावतीबाईंचे वाचलेले नाही विशेष, पण दुर्गाबाईंच्या बाबतीत वरील मताशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+३

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 09/21/2009 - 00:24 नवीन
लेखन सुरेख जमले आहे.'व्यासपर्व' जेव्हा पहिल्यांदाच वाचले तेव्हा कितीतरी वेळ महाभारतातील पात्रांमधे हरवून गेलो होतो. दुर्गाबाईं म्हणतात 'व्यासांनी महाभारतातील पात्रांना गृहीत धरले आणि त्याप्रमाणे प्रंसंगाची गुंफन करुन महाभारतातील व्यक्तीविशेष कोरुन ठेवल्या आहेत' त्या पात्रांचा उलगडा व्यासपर्वात आहे. व्यासपर्वातील 'कामिनी' ही व्यक्तीरेखा मला आवडते. सुदैवाने 'व्यासपर्व'संग्रही असल्याने, कधी तरी काही निमित्ताने किंवा सहजच पुस्तक उचकल्याशिवाय होत नाही. पुस्तकातील विवेचन वाचतांना दुर्गाबाई जशा स्वतःशीच बोलतात असे वाटते, तसे त्या वाचकांशीही बोलत आहेत असे वाटत जाते आणि म्हणूनच पुस्तक वाचून कधी होते ते कळत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

सुंदर

स्वाती२
Sun, 09/20/2009 - 23:20 नवीन
सुंदर परिचय. व्यासपर्व आणि युगांत, दोन्ही लाडकी पुस्तकं. दर वेळा वाचताना काहीतरी नविन देऊन जातात.
  • Log in or register to post comments

+१

सुबक ठेंगणी
Wed, 09/23/2009 - 14:51 नवीन
व्यासपर्व ब-याच वर्षांपूर्वी वाचलं होतं. आता पुन्हा वाचलं पाहिजे. धन्यवाद श्रा.मो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

उत्तम परिचय

धनंजय
Mon, 09/21/2009 - 05:42 नवीन
हे पुस्तक मिळवून वाचलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Mon, 09/21/2009 - 05:56 नवीन
एका उच्च दर्जाच्या पुस्तकाची उच्च ओळख, ह्या बिकांच्या प्रतिसादाशी सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

सुंदर परिचय...

नीलकांत
Mon, 09/21/2009 - 07:50 नवीन
खरं तर व्यासपर्व हे पुस्तक मी सुध्दा नेटवर भेटलेल्या स्नेह्याच्या आग्रहाखातर वाचायला सुरूवात केली. आणि शेवटी जेव्हा पुस्तक खाली ठेवलं तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे त्या मित्राचे आभार मानले. एवढं सुंदर पुस्तक मी आता पर्यंत का वाचले नाही असेच वाटत होते. पुस्तकाचा विषय – महाभारत; अधिक नेमकेपणानं सांगायचं तर महाभारतातील व्यक्तिरेखा. त्याहूनही तो खरं तर वेगळाच आहे. हे पुस्तक म्हणजे महाभारत या कृतीचा एक वेगळा आस्वाद आहे. त्या आस्वादाचा प्रवासही या पुस्तकात जसा झाला आहे ते पाहिले की मग दुर्गाबाईंच्या उंचीची एक वेगळी जाणीव होतेच होते. महाभारत म्हटल्यावर मनात जे-जे विचार याही आधी अनेकदा उमटले, पुस्तक वाचतानाही उमटले ते सारेच या पुस्तकात गवसत गेले, त्याहूनही पलीकडे बरंच काही मिळत गेलं आणि आजवर असं आपण गमावलेलं होतं हे उमजून एक भारावलेपण येऊन गेलं. आधी म्हटलं त्या वेगळेपणात या भारावलेपणाचे मूळ असावं. हे असं नेमकं मांडून तुम्ही पुस्तकाबद्दल छान माहिती दिली आहे. हे पुस्तक वाचल्यावर आणि आवडलं म्हटल्यावर दुसरी शिफारस होती " ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी" दुर्गाबांईंसोबत अनेक विषयांवर मारलेल्या गप्पा असा या पुस्तकाचा विषय आहे. यातच व्यासपर्व मध्ये त्यांनी द्रौपदीबद्दल केलेल्या विधानांमुळे त्यांना 'महाभारताचे मारेकरी' म्हटलं गेल्याचे उल्लेख सुध्दा आहेत. ( अद्याप पुर्ण पुस्तक वाचून व्हायचे आहे. ) व्यासपर्व सारख्या पुस्तकाची एवढी सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. आता हे पुस्तक कुणी वाचावं असं सुचवायचं असल्यास हा लेख आधी वाच म्हणजे कळेल की पुस्तक काय आहे असं सुचवायला काहीच हरकत नाही. - नीलकांत
  • Log in or register to post comments

सुरेख

नंदन
Mon, 09/21/2009 - 08:13 नवीन
लेख आणि पुस्तकपरिचय. दुर्गाबाईंची युगान्त, व्यासपर्व, दुपानी, पैस... सगळीच पुस्तकं वाचलीच पाहिजेत अशी.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

दुर्गाबाई

भडकमकर मास्तर
Mon, 09/21/2009 - 14:43 नवीन
दुर्गाबाईंची युगान्त युगांत इरावरतीबाईंचे... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

वा! छान

llपुण्याचे पेशवेll
Mon, 09/21/2009 - 08:22 नवीन
वा! छान परिचय करून दिला आहे.. आता नक्की वाचले पाहीजे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

क्रान्ति
Mon, 09/21/2009 - 09:05 नवीन
विस्मृतीत जाऊ पहाणार्‍या या पुस्तकाची पुन्हा आठवण करून दिली, आता पुन्हा मिळवून वाचायलाच हवं! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

वाचायला हवे

सहज
Mon, 09/21/2009 - 09:12 नवीन
ऐकले होतेच, सुंदर परिचय. आता वाचायला हवे.
  • Log in or register to post comments

मस्त परिचय

निखिल देशपांडे
Mon, 09/21/2009 - 10:41 नवीन
मस्त परिचय करुन दिलात.... मिळवुन वाचायलाच पाहिजे!!! निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

व्यासपर्व

यशोधरा
Mon, 09/21/2009 - 12:06 नवीन
व्यासपर्व अतिशय सुरेख पुस्तक आहे.
  • Log in or register to post comments

असेच

स्वाती दिनेश
Mon, 09/21/2009 - 15:57 नवीन
व्यासपर्व अतिशय सुरेख पुस्तक आहे. यशोसारखेच म्हणते आणि तुम्ही केलेल्या परिचयातून आणखी एक पैलू उलगडल्यासारखे वाटले. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वाचीन म्हनतो...

प्रभो
Mon, 09/21/2009 - 16:32 नवीन
वाचीन म्हनतो... --प्रभो
  • Log in or register to post comments

एस. एल. भैरपा यांचे पर्व

भोचक
Mon, 09/21/2009 - 16:52 नवीन
मस्तच. आवर्जून वाचेन हे पुस्तक. कर्नाटकमधील एक बडे लेखक एस. एल. भैरपा यांचे पर्व वाचूनही मी असाच भारवलो होतो. महाभारतकाकडे मानवी दृष्टिकोनातून पाहणारे हे पुस्तक आहे. उगाचच कुणालाही देवत्व न देता , त्या सगळ्या व्यक्तिमत्वांना मानवी रूपातच ठेवून हे सगळे कसे घडले असेल याचा एक तार्किक प्रवास म्हणजे 'पर्व'. यात मानव म्हणून प्रत्येक माणसाच्या मर्यादाही दखवल्या आहेत. त्यामुळे ते पटतेही. (निदान मला तरी) वाचायलाच हवे यादीतील हेही एक पुस्तक. आता व्यासपर्व नक्कीच वाचेन. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? ही आहे आमची वृत्ती
  • Log in or register to post comments

नेमका!

वेदश्री
Mon, 09/21/2009 - 22:52 नवीन
कोंडलेले क्षितिज, एकाकी आणि अश्रू हरवल्यावर हे माझे खास भावलेले भाग व्यासपर्वमधले... त्यातही खासकरुन कोंडलेले क्षितिज! नेमका परीचय.
  • Log in or register to post comments

सुंदर शब्दातला परिचय!

चतुरंग
Mon, 09/21/2009 - 22:54 नवीन
उत्कटतेने पुस्तकाजवळ नेऊन सोडणारा! आता वाचायचे काम ज्याचे त्यानेच करायला हवे. चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्त पुस्तक आणि परीक्षण

मिहिर
Mon, 09/21/2009 - 23:06 नवीन
व्यासपर्व एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. मी ते काही महिन्यांपूर्वीच वाचले आहे. या पुस्तकाचे इतके छान परीक्षण लिहिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुरेख!! इरा

प्राजु
Mon, 09/21/2009 - 23:11 नवीन
सुरेख!! इरावती कर्व्यांचे युगांत वाचले आहे. हे पुस्तक मागवून घ्यावे लागेल असे दिसते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा! छान

ऋषिकेश
Mon, 09/21/2009 - 23:55 नवीन
वा! छान ओळख.. पुस्तक छान आहेच ऋषिकेश ------------------ रात्रीचे ११ वाजून ५४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "यदा यदाहीऽधर्मस्य, ग्लानिर्भवति भारत...."
  • Log in or register to post comments

+१ मस्तच.

कालिन्दि मुधोळ्कर
Tue, 09/22/2009 - 21:35 नवीन
+१ मस्तच. उत्क्रुष्ट पुस्तकाची उत्क्रुष्ट ओळख.
  • Log in or register to post comments

काही पुस्तकं

संदीप चित्रे
Tue, 09/22/2009 - 22:06 नवीन
अजूनही वाचणं झालं नाही. 'व्यासपर्व' हे त्यापैकीच एक :( बघू.. लवकवरच इथे मागवावं लागेल. पुस्तकपरिचयाबद्दल धन्स श्रामो.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

श्रावण मोडक
Wed, 09/23/2009 - 12:52 नवीन
सर्वांना धन्यवाद. हे पुस्तक वाचू असे म्हणणाऱ्यांची ही इच्छा लवकर प्रत्यक्षात येवो. वाचा आणि कळवाही.
  • Log in or register to post comments

छान

मृत्युन्जय
Fri, 10/02/2009 - 12:05 नवीन
छान परीक्षण मी युगान्त (दुर्गा भागवतान्चेच) वाचले आहे. ते सुद्धा महाभारतातील व्यक्तिरेखावरच आहे. २ पुस्तकामध्ये नेमका काय फरक आहे?
  • Log in or register to post comments

सुंदर..! श्र

विसोबा खेचर
Fri, 10/02/2009 - 12:09 नवीन
सुंदर..! श्रावणशेठ, जियो...! तात्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

गणपा
Fri, 10/02/2009 - 15:43 नवीन
अतिशय सुरेख परिचय मोडक साहेब. आता वाचायलाच हव.
  • Log in or register to post comments

काय सुंदर

अनामिक
Fri, 10/02/2009 - 17:25 नवीन
काय सुंदर ओळख करून दिली आहे पुस्तकाची. मिळवून नक्की वाचेन. -अनामिक
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा