चांगले लिहिले आहेस.
पेटार्यातून पळून जाण्याचा प्रसंगाला समांतर असा पोत्यातून पळण्याचा प्रसंग सुद्धा असाच. पण ते जाऊ दे !
या चित्रपटामुळे मराठी मुलखातल्या वातावरवणात काय फरक पडला? तरूण लोक मराठी लँग्वेज परफेक्ट बोलायला लागले का? मराठी रिक्षावाल्यांचा/ बस कंडक्टर-डायवरांचा/ घरी येणार्या पलंबर-इलेक्ट्रिशियन इत्यादिंचा, सरकारी सेवकांचा माज आता अजून चमकून उठला का? की मराठी बांधवांशी ते बंधुभावाने वागायला आहेत? अशी काही निरिक्षणे सुद्धा नोंदवावीत अशी विनंती.
-- लिखाळ.
आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !
ह्या चित्रपटाची भली-बुरी अनेक परिक्षणे वाचली. त्यातील हे सर्वोत्तम परिक्षण!
डानराव, लगे रहो! लै भारी
मात्र त्यांच्या पत्नी असलेल्या "बांधेकरवहिनी" उगाचच अनावश्यक बेअरिंग घेऊन अख्ख्या चित्रपटात वावरल्याने त्यांचा आक्रस्ताळा अभिनय अंगावर येतो. महेश मांजरेकर आणि सिद्धर्थ जाधव आपापल्या ठिकाणी उत्तम. मकरंद अनासपुरेचा रायबा असा विनोदी का दाखवला हे कळाले नाही,त्याच्या शैलीला अनुसरुन त्याला संवाद देताना म्हणींचा अतिरेक झाल्याने घासात खडा लागावा असे ते टोचते. भरत जाधवाचा शाहीर पहाणे हा मात्र अत्याचार आहे, दुसरा कुणीही चालला असता, केवळ स्टारडम आणायचे म्हणुन त्याला वापरणे साफ फसले
अधोरेखित वाक्य सोडल्यास अगदी मनातील बोललात! भरत जाधवने त्या पोवाड्यात जे काहि केलं आहे ते पाहून त्याला घाईची लागली असावी असेच मला वाटत आले आहे . :)
महेश मांजरेकर हा मात्र प्रस्तुत भुमिकेत जराही शोभत नाहि. शिवाजी महाराजांचे डोळे असे प्यायल्यासारखे सतत तांबरटलेले असतील असे वाटत नाहि. महाराजांची घोडेस्वारी हा तर उत्तम विनोदाचा नमुना ठरावा
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
भरत जाधवने त्या पोवाड्यात जे काहि केलं आहे ते पाहून त्याला घाईची लागली असावी असेच मला वाटत आले आहे .
मला तर तो कोणताही डायलॉग खालच्या ओठांत तंबाखुचा बकणा भरून केकटतो की काय असा वाटतो ...
बाकी मकरंद आणि सिद्धार्थ ह्यांना रोल फिट झाले नाहीत पण .. मक्याचा "केसभर गजरा आणि गावभर नजरा" ह्या डायलॉगचं टायमिंग केवळ अप्रतिम होतं ..
ऋषिकेशशी सहमत..
मांजरेकर अगदी सहन होत नाही त्या रोलमधे! दुसरा कोणीही चालला असता तिथे इतका मला त्या रोलमधे तो आवडला नाही!!
पिक्चर चांगला आहे.. पण अतिशय अतिशयोक्ती करण्याच्या नादात सुरवातीच्या काही प्रसंगातच माझा रस जाऊ लागला.. अरे इतका पदोपदी अपमान? जिथे जाईल तिथे?? काय अर्थं आहे का त्याला!
आणि ते मराठी असण्याचा गर्व ही वाक्यरचनाही कानाला खूप खटकली! त्यावर सचिन खेडेकर जे मुठ वळवून अभिनय करतो त्याने मलातर अतिशय हसू आले! :))
असो.. मला हा पिक्चर तसा चांगला असूनही विशेष आवडला नाही! थिएटर मधे अजुन ५० लोकांबरोबर पाहीला असता तर थोडा फरक पडला असता... पण मराठी माणसाने हा पिक्चर पाहून काहीतरी भारावून गेल्यासारखे करायची काही गरज नाहीये! इतका पदोपदी अपमान सहन कोणीच करत नसेल, आणि त्यावर उपाय हा पिक्चर पाहणे नक्कीच नसेल! उगीच इमोशनल व्हायची काय गरज.. करमणूकीला चांगला आहे. ... :|
http://www.bhagyashree.co.cc/
>>अरे इतका पदोपदी अपमान? जिथे जाईल तिथे?? काय अर्थं आहे का त्याला!
अक्षरशः पट्लं... मला वाटतं की त्याना मराठी आहे म्हणून अपमान होतोय असं म्हणायचंय की गरीब आहे म्हणून अपमान होतोय असं म्हणायचंय हेच कळलं नाहीय... मी मुंबईतल्या बर्याचशा मोठ्या दुकानात, हॉटेलमध्ये नि मॉल्स मध्ये गेलेय.... तिथल्या लोकांशी इंग्रजीत बोललो तरी सोबतच्या लोकांशी मराठीत बोललं जातं.. अशावेळी ते लोकही मराठी असो वा अमराठी, मराठीत संभाषण चालू करतात... अशा वेळी कुणी कुत्सितपणा दाखवल्याचं स्मरत नाही..
मी वसतीगृहात रहात असताना माझ्या ग्रुपमधल्या इतर सगळ्या मुली उत्तर भारतीय होत्या... त्यांनी कशावरूनतरी एकदा घाटी हा शब्द दोनतीन वेळा अपमानास्पद रित्या वापरला.... तेव्हा त्यांना "Wats so bad in being ghati? I am a ghati girl" असं थोड्याश्या करड्या सुरात विचारल्यानंतर त्यांनी तो शब्द निदान माझ्यासमोर तरी वापरणं बंद केलं होतं.... (त्यातल्या बर्याचजणी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनी होत्या.. नि मी मॅम... त्यामुळे सहसा कुणी माझ्याशी पंगा घेत नसत.. नि तसे प्रसंगही उद्भवत नसत हेही तितकंच खरं)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
अगदी पटलं.
अवांतर : मुंबईत जेव्हा नवीन आलो होतो, दहा वर्षापुर्वी. तेव्हा बर्याचदा इथले आग्री, कोळी समाजातले मित्र घाटी, घाटी असा उल्लेख करायचे. एकदा रागाच्या भरात बोलुन गेलो...
"भXXनो कंबरेला फडकं गुंडाळुन पार्श्वभाग दाखवत फिरत होतात, आम्ही आलो म्हणुन पँटी घालायला शिकलात. (इथे कंबर आणि पार्श्वभाग ला त्यावेळी वेगळे शब्द वापरले होते)" त्यानंतर मात्र कधी घाटी म्हणुन ऐकायला मिळाले नाही.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
त्यांना मराठी आहे म्हणून अपमान होतोय असं म्हणायचंय की गरीब आहे म्हणून अपमान होतोय असं म्हणायचंय हेच कळलं नाहीय...
अगदी बरोबर... चित्रपटाचा आशयच मुळात कळत नसल्यामुळे चित्रपटाचा विषय पुर्णपणे भरकटला आहे.
मांजरेकरांच्या तारटवलेल्या (?) डोळ्यात महाराजांच्या नजरेतला करारीपणा शोभतो का? माझी बॅट म्हणजे मीच ओपनर बॅट्समन असे म्हणणार्या बाळांसारखे... माझा चित्रपट म्हणजे मीच शिवाजी.. असे तर नव्हे? त्या भुमिकेला काही तरी अर्थ आहे का?
मांजरेकराच्या मराठीबाबतच्या अभिमानाबद्द्ल शंकाच नाही आज त्यांनी हिंदी चित्रपटात नेहमीच मराठी कलाकारांना प्राधान्य देऊन चमकवले आहे.. नेहमीच मराठीचा गोडवा गायला आहे..
पण मांजरेकर या चित्रपटास मात्र तुम्ही न्याय देऊ शकला नाहीत.
डाणबा !!! एक णंबर्स परिक्षण !!! तोलून मोलून लिहीलंय ..
उगाच कुठे लैच्यालै आणि कैच्याकै कौतुक नाय :)
तु ह्यावर अजुन कसं लिहीलं नाहीस असा प्रश्न पडला होता .. :)
- (डॉनप्रेमी) टार्या
(हिणता सेवा बंद करण्यात आली आहे)
डान्राव,
एकदम वस्तुनिष्ठ परीक्षण.....
शब्दांचा फुलोरा नाही, अनावश्यक अलंकारिक भाषेचा वैताग नाही....
आणि प्रश्नोत्तराचा फॉर्म्याट मस्तच..
...
शंभरपैकी पंचाण्णव गुण...
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
डान्राव, परिक्षण आवडलं. एकूणच पोस्टर्स पाहून आणि इकडे तिकडे वाचून चित्रपट पहावा असं वाटलं नव्हतं, आता याचा आनंद होत आहे.
मास्तर, एकदा मास्तरी शैलीत चित्रपट परीक्षण येऊ देत. बरेच दिवस झाले.
अदिती
परिक्षण अतिशय उत्तम..बहुतेक बाबतीत आपली मते जुळली आहेत.
मात्र मला महेश मांजरेकर यांनी साकारलेला शिवाजी आवडला. प्रमुख भुमिकेत असूनही स्वत:चे प्रसंग वाढवले नाही. तसेच उगाच स्वतःचे जास्त डायलॉगही ठेवले नाहीत. नाहीतर याचाही अतिरेक झाला असता.
पण याच मांजरेकरांनी नंतर कुठल्यातरी चॅनलला या चित्रपटाविषयी बोलताना मात्र अतिरेक केला होता. एकतर तारवटलेले डोळे, त्यात मराठीतून विचारलेल्या गेलेल्या प्रश्नांना इंग्रजीतून उत्तरे यामुळे हा माणूस डोक्यात गेला होता.
पण "हे राजे.." हे गाणे सु़खविंदरकडून म्हणून घ्यायची काय गरज होती? कोणी मराठी गायक नाही का चालला? मधले मधले काही शब्द तर कळतच नाहीत. अर्थात सुखविंदरवर राग नाही. त्याने गाणे उत्तम गायलेय.
खादाडमाऊ
डान्राव!!! जबरदस्त परिक्षण. शब्दनशब्द पटला. तुमच्या शैलीबद्दलतर काही बोलायलाच नको. प्रश्नोत्तराचा फॉर्मॅट मस्तच.
जन्माच्याकर्मा शारजा मधे मराठी चित्रपट आला म्हणून अगदी आवर्जून बघितला. चित्रपट तद्दन फिल्मी, भडक आणि अतिरेकाकडे झुकणारा वाटला. बर्याच ठिकाणी अगदी बाळबोध संवाद, भाबडा आशावाद आहे. कोणतंच कॅरॅक्टर नीट पकड घेत नाही. त्यातल्यात्यात सचिन खेडेकरनेच चांगले काम केले आहे, पण संवाद, कथा आणि दिग्दर्शनाच्या मर्यादांमुळे त्यालाही मर्यादा आहेत. आयटम साँग उग्गाच्च घुसवलेले आहे. भरत जाधव पूर्णपणे फसलाय आणि मकरंद अनासपुरेचे टायमिंग चांगले आहेच. मांजरेकरांना मोठ्या पडद्यावर महाराजांच्या रूपात बघणे अशक्य झाले होते शेवटी शेवटी. कॅमेरा त्यांच्यावर गेला की त्यांच्या डोळ्यांखालच्या आयबॅग्जच डोळ्यात भरत होत्या पटकन.
एकदा बघावा... फुकट मिळाला तर आणि फार अपेक्षा न ठेवता.
बिपिन कार्यकर्ते
मी जेव्हा हा चित्रपट मोठ्या कौतुकानं पाहिला, तेव्हा हेच प्रश्न पडले होते! सगळी उत्तरं मिळाली. चित्रपट मनापासून न आवडलेल्या माझ्यासारख्या अनेकांच्या भावना या परीक्षणात मांडल्या आहेत.
खरंच मराठी माणूस केवळ नाव बदलून जगू शकतो ताठ मानेनं? त्याला बाकी काही पर्याय नाही? मग मांजरेकर हे अगदी लक्षात येणारं [कर हा खास मराठी प्रत्यय!] नाव का बदललं गेलं नाही? ६४ कला, ज्ञान-विज्ञान, राजकारण, समाजकारण, कितीतरी क्षेत्रात जगन्मान्यता मिळवणार्या पं. भीमसेन जोशी, पं वसंतराव देशपांडे, वसंत देसाई, जयंत नारळीकर, विजय भटकर, बाबा आमटे, डॉ. मांडके, मंगेशकर कुटुंबीय, ऑस्करचा प्रवास करून आलेली अगदी खास मराठमोळ्या वळणाची आपल्या "श्वास"ची टीम यांनी तर नावं बदलली नाहीत! [माधुरी दिक्षीत वगैरे मराठी मुलींची नावं बदलली, पण ती प्रथेमुळे! ;) ] मराठी माणसावर इतके वाईट दिवस अजून तरी आलेले दिसले नाहीत, की त्याने प्रत्येक दु:ख आणि अपमान विसरण्यासाठी बारमध्ये बसून टल्ली होईपर्यंत ढोसावी, आणि मार खाऊन लोळावं! [किती मराठी माणसं पाहिली अशी मांजरेकरांनी कुणास ठाऊक?] भ्रष्ट अधिकारी हा फक्त मराठीच असतो का? :?
त्या बांदेकर बाई तर मंदबुद्धीच वाटतात. :D काय ते लहान मुलासारखं गाडी खेळत बसणं! छे, डोक्यात गेला तो पांचट प्रकार! आणि ते बालाजी प्रकरण पण फालतू! अनारसपुरे आणि भरत जाधव कंटाळवाणे (|: झालेत आता. सिद्धार्थ मात्र ठीक वाटला. बाकी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर पटलं, आणि त्याच विचारानं हा चित्रपट पाहिला. अजून असंच लिखाण येऊ दे.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखारूह की शायरी
मराठी म्हणुन ज्यापद्धतीने त्याचा अपमान, अवहेलना झाल्याचे चित्रपटात दाखवले आहे तसा तो अगदी बिहार, युपी मध्येही होत नाही. हा टोकाचा अतिरेक चित्रपटाच्या मुळ हेतुवरच आघात करतो. खरेतर आणखीही खुप वेगवेगळ्या पद्धतीने ते अधोरेखीत करता आले असते. सहज बोलतानाही दर दोन शब्दांनंतर दहा हिंदी, इंग्रजी शब्द वापरणार्या मांजरेकरांनी (पर्यायी मराठी शब्द न सापडणार्या मांजरेकरांनी) मराठी व मराठी माणसावर भाष्य करावे ही कल्पनाच हास्यास्पद वाटते.
भरत आणि मकरंद दोघेही अपयशी ठरतात, त्यामानाने सिद्धार्थ जाधव खुप उजवा वाटतो. पण त्याच्या भुमिकेलाही फारसा वाव दिलेला नाहीये. सचिन खेडेकर मस्तच.
पण अति आदर्शवादही खटकतो बर्याचदा. कदाचित सादरीकरणाचा दोष असावा. बाकीच्यांबद्दल बोलणेच नको. एक अतिशय सुरेख कल्पना अक्षरशः वाया घालवलीय. बर्याच वेळा प्रदीप दळवींच्या "चेतक" कादंबरीची आठवण होते.
बाकी समिक्षणाचा फॉर्मॅट मस्तच आहे. मिपावरील बाकी समिक्षकांनीही अवलंबायला हरकत नाही. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
>>ऑस्करचा प्रवास करून आलेली अगदी खास मराठमोळ्या वळणाची आपल्या "श्वास"ची टीम यांनी तर नावं बदलली नाहीत! <<
संदीप सावतांनी आडनाव शर्मा, चोप्रा, बहल असं काहीतरी केलंय असा विचार करून जाम हसायला आलं. ;)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
सुंदर परिक्षण. :) ते लिहिण्याची कल्पकता भारीच. चित्रपटात भरत जाधव तिथे फिट बसलाच नाही. त्यामानाने सिद्धुने मस्त काम केले आहे.
"मराठी वाटण्याची लाज न वाटता" असे काम करा की "मराठी असल्याचा अभिमान ( इथे सिनेमात वापरलेला "गर्व" हा शब्द अप्रस्तुत आणि चुकीचा आहे असे आमचे मत आहे ) वाटायला हवा " हा फार मोलाचा संदेश हा चित्रपट देतो ...
सहमत !
डॉनराव परिक्षण मस्तच जमले आहे....
प्रश्न उत्तर स्वरुपातले सादरीकरण आवडले
बाकी चित्रपटा बद्दल बोलायचे तर आहेच तो गल्लाभरु चित्रपट पण मराठीतील तांत्रिक दॄष्ट्या चांगला चित्रपट म्हणुन पाहिला आवडला.
निखिल
================================
परीक्षण आवडले आणि पटले सुद्धा.
प्रश्नोत्तराचा फॉर्म्याट पण आवडला.
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------
मात्र हा चित्रपट एका हुशार माणसाने ( पक्षी : महेश मांजरेकर ) बनवलेला अतिशय धंदेवाईक आणि सरळसरळ भावनांना हात घालुन मराठी माणसाला चित्रपटगृहात खेचण्यात यशस्वी झालेला एक गाजलेला चित्रपट आहे हे मात्र तेवढेच निर्वीवाद सत्य आहे. असो.
अगदी अगदी...
परीक्षण मस्तच लिहिले आहेस.
स्वाती
एक नम्बर परिक्षण लिहिले आहेस...
हम्म, आमच्या प्रतिसादातील एक हिणकस शब्द संपादित केला गेला. हो हो तोच शब्द, जो माननीय मालक हवे तिथे हवे तेव्हा वापरु शकतात. आम्हाला मात्र त्याची सवलत नाही. टाळ्या!
-चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
मी हा चित्रपट २ वेळा चित्रपटगृहात पाहिला - एकदा "प्रभात" ला आणि एकदा "सिटीप्राईड" ला. लोकांच्या प्रतिसादात जमीन-आस्मानाचं अंतर होतं. सिटीप्राईडला सर्वांत उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती ते म्हणजे एका कॉलेजकन्यकेचं अस्फुट "वॉ..............व". ह्याउलट प्रभातला कित्येक संवाद ऐकूच आले नाहीत. राजांच्या 'एंट्री' ला तर पब्लिकनी थेटर डोस्क्यावर घेतलं होतं.
परीक्षण झकासाच... सगळेच मुद्दे पटले. फकस्त येक्दा प्रभातला पिटात बसून पिक्चर बघा डानराव... मंग समजेल हा चित्रपट नक्की कोणासाठी आणि कशासाठी होता ते. 'गल्लाभरू' शब्द वापरला आहेच ना तुम्ही?
+१.
आमच्या इथल्या चित्रपटगृहात म्हारांजांची यंट्री वन्समोअर घ्यायला लावली पब्लिकने. मी एखाद्या चित्रपटाचे रिळ उलटे फिरवून वन्समोअर झालेले पहिल्यांदाच पाहिले
चित्रपट फारसा आवडला नसला तरी तो पिटात बसून बघणे हा अत्यंत मजेदार अनुभव होता
(वन्स मोअर टैम प्रतिक्रीया देणारा) ऋषिकेश
शिवाजी द बॉस सिनेमात साउथला असे बर्याचदा करावे लागते असे ऐकले होते... नाहीतर हाणामार्यांची वेळ येते
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
परीक्षण आवडले. विषयाची व्याप्ती डॉन राव म्हणतात तशी मोठी आहेच. पण चित्रपटाचा उत्कृष्ट परामर्ष घेतला आहे असे वाटले. वर आलेल्या प्रतिक्रियाही बोलक्या आहेत.
शिवाजी महाराजांच्या तोंडी असलेली चार वाक्ये सोडता, या चित्रपटात हाताशी काही लागेल असे दिसत नाही. आणि ती चार वाक्ये म्हणजे ठाकरे कुटुंबीयांपैकी एखाद्याच्या तोंडची उचलून घालावीत तशी दिसताहेत. म्हणजे एकूणच , काही ढोबळ सत्यांचा उपयोग भावनांच्या उद्रेकाकरता असा एकूण फॉर्म्युला. उद्योजक वृत्ती , क्षात्रतेज या सर्वाना आवाहन देणार्या शिवाजीराजांपासून इथेतिथे डाफरणार्या नि भवानी तलवार चालवणार्या - थोडक्यात अशक्यप्राय अशा , टिपिकल मसाला गोष्टींपर्यंतचा - प्रवास वाचताना रोचक वाटला.
परीक्षण उत्तम जमले आहे हे पुन्हा एकदा नमूद करतो.
मला पोवाडा पहिल्यांदा ऐकला तेव्हा आवडला. पण रविवारी रायगडचा राजबंदी पाहिला डीव्हीडीवर अन त्यातला शेवटचा पोवाडा ऐकुन मी शिवाजीराजेमधल्या पोवाड्याची सगळी छाप पुसुन गेली.
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
हा भालजी पेंढारकरांचा सिनेमा आहे, कृष्णधवल. स्टारकास्ट मधे सुर्यकांत अन सुलोचना आहेत. सिनेमा संपताना सावळारामांचा पोवाडा आहे, अवर्णनिय.
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
हा भालजी पेंढारकरांचा सिनेमा आहे, कृष्णधवल. स्टारकास्ट मधे सुर्यकांत अन सुलोचना आहेत. सिनेमा संपताना सावळारामांचा पोवाडा आहे, अवर्णनिय.
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
परिक्षण उत्तम, अगदी जे चांगले आहे त्याला चांगले आणि वाईटाला वाईट असे लिहिले आहे.
परिक्षण अगदी असेच तटस्थ असावे लागते आणि ते तुम्ही अप्रतिम रित्या लिहिले आहे.
जाता जाता हा चित्रपटाने मराठी जणांना जागे केले का? तर उत्तर नाही हेच आहे, अगदी स्वतः महाराज आले तरीही.
परिक्षण आवडले / नाही आवडले असे आवर्जुन कळविणार्या / न कळविणार्या सर्व मिपाकरांचे आभार ...!!!
आता महत्वाचा मुद्दा,
बरेच जण वर प्रतिसादात म्हणातात की " ह्या सिनेमानंतर मराठी माणसात काय फरक पडला ? "
लिखाळरावांनी तर प्रश्नांची जंत्रीच दिली आहे.
मॉर्गनसाहेब पिटात बसुन हा चित्रपट पहावा म्हणजे त्याच्या वास्तवातल्या प्रेक्षकवर्गाशी नाळ जोडली जाईल असा सल्ला देतात ...
ह्याच सर्व मुद्द्यांचा सविस्तर उहापोह करणारा आणि माझे मत मांडणारा सविस्तर प्रतिसाद थोड्याच वेळात टाकतो, हे मुद्दे महत्वाचे आहेत असे ( माझे ) मत आहे.
धन्यवाद ...!!!
------
छोटा डॉन
गल्लाभरु चित्रपट .......... आणि सल्लाभरू, हल्लाभरू सुद्धा...
पण तरीही गल्लाभरू म्हणावेसे वाटत नाही... कारण मग मम्मी, जुरासिक पार्क, मिस्टर इन्डिया, हम आपके है कौन.... हे सगळे काय समाजसेवा म्हणून काढलेले चित्रपट होते काय ? हा प्रश्न निर्माण होतो...
<<<<<<<सुखविन्दर ऐवजी मराठी गायक हवा होता... >>>>>>>>>>.. ( हृदयनाथ, शोनक अभिशेकी, अवधूत गुप्ते, अजित कडकडे, श्रिधर फडके, सुरेश वाडकर, सन्जीव अभ्यन्कर, बाल गन्धर्व... नेमकं कोण तुम्हाला अपेक्षित आहे?)
रजनीअण्णाचा शिवाजी द बॉस चे परिक्षण सकाळ मध्ये वाचले होते.त्यात असे लिहीले होते की व्यावसायिक यशस्वी चित्रपट काढणे आणि प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचुन आणणे ही कला रजनीअण्णाला चांगली जमली आहे.
उगाच कलात्मकतेच्या,प्रबोधनतेच्या वाटेला न जाता निखळ करमणुक देणारा चित्रपट एखादा बिग बजेट मराठीतही का काढला जाऊ नये.
वरील प्रश्नाला माझामते "मी शिवाजी.." काही प्रमाणात उत्तर देतो असेच म्हणावे लागेल.
गल्लाभरु,मसाला वगैरे बिरुदांबद्दल म्हणाल तर अमिताभचे त्याला सुपरस्टारपदापर्यंत घेवुन जाणारे चित्रपट तरी कोणत्या लायकीत मोजायचे?
माझ्यामते "मी शिवाजी..." च्या आधीचा सक्सेसफुल मसाला बिगबजेट व्यावसायिक चित्रपट हा बहुदा "बिनधास्त" असावा.
सुरे़ख परिक्षण..! मला हा पिक्चर एकदा पहायच्या लायकीचा वाटला.. खूपसा "लगे रहो मुन्नाभाई" च्या जवळ जाणारा.. मला न आवडलेले मुद्दे..
१. महेश मांजरेकर शिवाजीच्या रोलमध्ये असणं.
२. "गर्व बाळगा" हा संदेश.. तो "अभिमान बाळगा" असाच हवा होता..!
३. डि. वाय. पाटील या शिक्षण सम्राटाचा अतिशय आदराने केलेला उल्लेख...
प्रश्न फक्त उल्लेखाचा नाही तर लेखक-दिग्दर्शकाच्या सामान्य ज्ञानाचा आहे..! हीच डी. वाय. पाटील सारखी मंडळी परप्रांतीय विद्यार्थ्यांना कसे प्रवेश देतात व त्यांना महाराष्ट्रात स्थायिक व्हायची कशी संधी देतात लेखक-दिग्दर्शकाच्या गावीही नसावे याचे आश्चर्य वाटले..!
--सुहास
चित्रपट पाहिल्यानंतर आपले परिक्षण पुन्हा वाचले. प्रतिक्रिया लिहिण्यासाठी काही शिल्लक राहिले नाही. शिवाजी महारांजाच्या भुमिकेतले महेश मांजरेकर सहन करावे लागले.या अनेकांच्या मताशी आम्हीही सहमत आहोत. अपमान आणि अपमान, चित्रपटात मराठी माणूस म्हणजे जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेला. अगदी भिकार्यासारखा दाखवलाय. पापलेट खरेदी करायची हिम्मत नै म्हणजे लैच झाले. मराठी माणसांना अभिमान वाटणारी अशी जी नावे संवादाच्या निमित्ताने येतात त्याने जरा सुखावल्यासारखे वाटते. मराठी माणसाने अंतर्मुख व्हावे इतका भडीमार नक्कीच चित्रपटात आहे. अरे हो, शाहीर भरत जाधवच्या जागेवर कोणीही अनोळखी कलाकार चालला असता. असो,
डॉन्याचे परिक्षण मात्र एक लंबर...मालक अजून येऊ द्या..!
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
चांगले
ह्या
भरत जाधवने
ऋषिकेशशी
अरे इतका पदोपदी अपमान????
अगदी
मराठी की गरीब?
डाणबा !!! एक
उत्तम
डान्राव,
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हेच
हेच
डॉन्राव...
वा...
उत्तम परिक्षण..
वा!!!
एक्दम सही परीक्षण!
मराठी
>>ऑस्करचा
वा डोन्राव
मस्तच
डॉनराव
उत्तम
उत्तमच
मस्त परीक्षण!
यस्स..
डॉन्राव
बाझवला, एक
झकास!
+१
रीळ उलटे फ़िरवून परत
परिक्षण
ऊत्तम परीक्षण..
माझे मत
चित्रपट
परीक्षण
उत्तम परिक्षण
"रायगडचा
राजगडचा राजबंदी
रायगडचा राजबंदी
परिक्षण
बरोबर आहे ...
गल्लाभरु
अवधूत गुप्ते
करेक्ट हेच
शिवाजी द बॉस
गर्व की अभिमान
सुरेख परिक्षण...!
चांगले परिक्षण