या रे या
stranger things च्या फ्यान लोकांनो
इकडे या
भावनांचे पाट वाहू द्या
stranger things ला भरलेल्या मनाने
गुड बाय करू या
शेवटचा भाग right side up अक्षरश: दोन तास मनःपटलावर अधिराज्य करतो.वेकना मरणार हे माहितीच होत . पण एल पण गायब होणार होत हे अनपेक्षित होत . सुपरनॅचरल मालिका असं गृहीत चालताना यात सायन्सचा वर्म होल हा कन्सेप्ट हि सिरीज सगळ्यांसाठी बघणीय होते.कारण ते भूत खेत जाम बोर करतात.
कोणाचं कौतुक करावं ???
सायकोकायनेटिक क्षमता असलेली इलेव्हन ,मैत्रीने घट्ट विणलेले माइक,लुकास, डस्टिन आणि विल,मॅक्स, धडाकेबाज नॅन्सीचा,स्टीव्ह ,हूपर,जोनाथन,रॉबिन जॉयसी,गोड गोडुली हॉली,डफर, बडबडी एरिका की हेन्री उर्फ वन उर्फ वेकना उर्फ खेकडा भजी(भारतीयांनी दिलेले नाव ) :) की पिसाळलेल्या कुत्र्यासारखे मागे लागणारे डेमोगोर्गनच यांचं करायचं.
२०१६ पासून १० वर्षात ५ सीझन आणि ४२ भागांत ही सगळी पात्र आपल्या बरोबरच वाढत होती.हृदयस्पर्शी मैत्रीचा अर्थ पुन्हा पुन्हा पटवून देत होती. ८० च्या दशकातील जुन्या आठवणी पॉप गाण्याने जाग्या होत होत्या https://en.wikipedia.org/wiki/Stranger_Things:_Music_from_the_Netflix_O… ."Running Up That Hill (A Deal with God)" by Kate Bush हे गाणं आता माझी मोबाइल रिंगटोन आहे .
यावर इन्स्टावर थेअरी ,कॉमेडी,अशा रीलचा महापूर आला आहे .त्यात मॅक्स समोर गेट आलं तरी वेड्या सारख्या का बडबडत आहे हा प्रश्न असो :),वेकना भाऊने केलेला वेट लॉस,एल सारखी पॉवर आल्याचा विश्वास असो :)
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
11305
प्रतिक्रिया
141
मिसळपाव
प्रतिक्रिया
सध्या या सिजनचे २ भाग पाहुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Panditव्हाईट टायगर.. नेटफ्लिक्सवर
In reply to सध्या या सिजनचे २ भाग पाहुन by मदनबाण
तुमच्या मागच्या धाग्यात असंका
In reply to व्हाईट टायगर.. नेटफ्लिक्सवर by Bhakti
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]वेगळा आहे पिक्चर. आवडला का?
In reply to तुमच्या मागच्या धाग्यात असंका by मदनबाण
मागे दिवंगत मिपाकर चौकटराजा
In reply to वेगळा आहे पिक्चर. आवडला का? by असंका
व्हय जी, आवडला. :)
In reply to वेगळा आहे पिक्चर. आवडला का? by असंका
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1वरील प्रतिसाद @असंका यांना
In reply to व्हय जी, आवडला. :) by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1टॅंक बद्दलचे चित्रपट पाहायचे…
In reply to तुमच्या मागच्या धाग्यात असंका by मदनबाण
टॅंक बद्दलचे चित्रपट पाहायचे असेल तर The Beast हा चित्रपट जरूर पहा. रशियन सैन्याने अफगाणिस्तानातून घाई घाईने माघार घेतली पण एक टॅंक त्या प्रदेशांत अडकतो, टॅंक घेऊन त्या टीम ला आता घरी जायचे आहे पण त्यासाठी त्यांना संकटांचा सामना करावा लागतो. टॅन्क च्या कमांडर ने एका पश्तुन गांवात नरसंहार केला आहे त्यामुळे त्याचा एक माणूस ताज आणि इतर वाचलेले पश्तून मुजाहिदीन ह्या "बिस्ट" शी शिकार करण्याच्या मार्गावर आहेत. ... छान चित्रपट आहे.
ही मालिका पाहायला सुरुवात
stranger things पहिला खंड
@Bhakti, एक अनाहूत सल्ला -
In reply to stranger things पहिला खंड by कांदा लिंबू
Stranger things
रेग्युलर थिंग्स
शेवटचा एपिसोड देखिल बेहद्द
In reply to रेग्युलर थिंग्स by हणमंतअण्णा शंक…
शेवटचा एपिसोड देखिल बेहद्द आवडला.शेवटच्या एपिसोडचा शेवट रडवून गेला!काळ किती पळत राहतो,आपणही त्याच्याबरोबर पळले पाहिजे.चारचौघी नाटक
छान नाटक आहे हे.
In reply to चारचौघी नाटक by Bhakti
Stranger Things मधला
one last time. watch the never-before-seen behind-the-scenes documentary on the making of Stranger Things 5. january 12th.गाणं आवडलं! इथे शेअर केल्या
In reply to Stranger Things मधला by Bhakti
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boysसेव्हन इयर्स इन तिबेट-seven years in Tibet
मध्यरात्रीचे स्वातंत्र्य
The Day of the Jackal
In reply to मध्यरात्रीचे स्वातंत्र्य by अमरेंद्र बाहुबली
अरे वा, पुस्तक नी १९७३ ला
In reply to The Day of the Jackal by जुइ
जॅकलचा दिवस अर्थात द डे ऑफ द
In reply to मध्यरात्रीचे स्वातंत्र्य by अमरेंद्र बाहुबली
पाताल लोक पर्व पहिले.
एनोला होम्स १ आणि २
दोन्ही पाहिले आहेत!
In reply to एनोला होम्स १ आणि २ by Bhakti
श्रीगुरूजी सध्या लपून मिपा
कुणाला कशाचं, बोडकीला केसाचं!
In reply to श्रीगुरूजी सध्या लपून मिपा by अमरेंद्र बाहुबली
खरंच की!
In reply to श्रीगुरूजी सध्या लपून मिपा by अमरेंद्र बाहुबली
यंग शेल्डन -Young Sheldon
+१००
In reply to यंग शेल्डन -Young Sheldon by Bhakti
माझी लेक आधीच बडबडी आहे.ती
In reply to +१०० by सोत्रि
पाहते लेकीबरोवर
In reply to यंग शेल्डन -Young Sheldon by Bhakti
हो,आमचा तिसरा सीझन पाहणे सुरु
In reply to पाहते लेकीबरोवर by जुइ
धन्यवाद!
In reply to हो,आमचा तिसरा सीझन पाहणे सुरु by Bhakti
आमच्या घरातली शेल्डन आणि मिमो
In reply to यंग शेल्डन -Young Sheldon by Bhakti
एकांकिका: स्वातंत्र्य सौभाग्य.
एवढे सगळे कसे बघू शकते ब्वा
काका, वेबसिरीजचे तेच तर
In reply to एवढे सगळे कसे बघू शकते ब्वा by चित्रगुप्त
काका, वेबसिरीजचे तेच तर
In reply to एवढे सगळे कसे बघू शकते ब्वा by चित्रगुप्त
आपण चित्रकार कलाकार आहेत
In reply to एवढे सगळे कसे बघू शकते ब्वा by चित्रगुप्त
अलाईस ईन बॉर्डरलँड पहिला सीझन
ह्या आठवड्यात 'Better call
लालो ची एंट्री झाली का? :)
In reply to ह्या आठवड्यात 'Better call by टर्मीनेटर
'लालो' हे नाव परिचयाचे वाटत
In reply to लालो ची एंट्री झाली का? :) by अमरेंद्र बाहुबली
लालो ची एंट्री
In reply to लालो ची एंट्री झाली का? :) by अमरेंद्र बाहुबली
मला मात्र शेवट आवडला! शेवटी
In reply to लालो ची एंट्री by टर्मीनेटर
'हायझेनबर्ग कडे रसायनशास्त्राची उत्तम जाण
In reply to मला मात्र शेवट आवडला! शेवटी by अमरेंद्र बाहुबली
नार्कोज आणि नार्कोज: मेक्सिको
In reply to 'हायझेनबर्ग कडे रसायनशास्त्राची उत्तम जाण by टर्मीनेटर
तुमच्या एंगल ने एंड पाहिला तर
In reply to 'हायझेनबर्ग कडे रसायनशास्त्राची उत्तम जाण by टर्मीनेटर
आवरण
भैरप्पांचे आवरण हे पुस्तक
In reply to आवरण by कपिलमुनी
**द क्वीन्स गॅम्बिट
फिर आयेगी हसीन दिलरुबा
"प्राइड अँड प्रेज्युडिस"
'फील गुड' मुव्हीज बघायला आवडत असतील तर
In reply to "प्राइड अँड प्रेज्युडिस" by Bhakti
ट्रेलर पाहिला ,आवडला. आता
In reply to 'फील गुड' मुव्हीज बघायला आवडत असतील तर by टर्मीनेटर
घरच्या सगळ्यांनी एकत्र बसुन
In reply to ट्रेलर पाहिला ,आवडला. आता by Bhakti
मध्यंतरी नेटफ्लिक्सवर विजय
In reply to घरच्या सगळ्यांनी एकत्र बसुन by टर्मीनेटर
Oldboy चे भारतीय वर्जन! हा
In reply to मध्यंतरी नेटफ्लिक्सवर विजय by प्रचेतस
गार्गी छानच
In reply to Oldboy चे भारतीय वर्जन! हा by अमरेंद्र बाहुबली
गार्गी कुठे बघता येईल?
In reply to गार्गी छानच by स्वधर्म
'गार्गी' बघायची तुमची इच्छा
In reply to गार्गी कुठे बघता येईल? by प्रचेतस
तुम्ही केलेल्या वर्णनानुसार
In reply to 'गार्गी' बघायची तुमची इच्छा by टर्मीनेटर
प्रचेतस सर, गार्गी
In reply to तुम्ही केलेल्या वर्णनानुसार by प्रचेतस
अर्रर्र
In reply to गार्गी कुठे बघता येईल? by प्रचेतस
महाराजा मस्तच आहे!
In reply to मध्यंतरी नेटफ्लिक्सवर विजय by प्रचेतस
सेतुपतीचे बरेचसे चित्रपट
In reply to महाराजा मस्तच आहे! by टर्मीनेटर
छान आहे, रियाने मस्तच काम
In reply to 'फील गुड' मुव्हीज बघायला आवडत असतील तर by टर्मीनेटर
पण शेवट समजला नाही.तिला
In reply to छान आहे, रियाने मस्तच काम by Bhakti
सुंदर सिनेमा!
In reply to "प्राइड अँड प्रेज्युडिस" by Bhakti
"बौद्ध मूर्तीशास्त्र"
धुरंधर नेटफ्लिक्सवर आलाय, लाभ
"साबर बोंड" (कॅक्टस पिअर्स)
तरल मनोवृत्तीच्या पब्लिक ने
॔॓Queen of katwe
काल आपला आवडता हीरो अमर
+१
In reply to काल आपला आवडता हीरो अमर by विजुभाऊ
In the Blink of an Eye हा
ट्रेलर
In reply to In the Blink of an Eye हा by Bhakti
नेफिवर His & Hers ही सिरीज
भक्तीचं वाचन लेखन आकलन संपर्क
कौतुकासाठी कंकाका धन्यवाद !
In reply to भक्तीचं वाचन लेखन आकलन संपर्क by कंजूस
गांधी टॉक्स आणि उत्तर
हे काय नवीन..झी वरची मराठी…
https://youtu.be…
https://youtu.be/RjphBAgLwKo
मनपिशाच्च हा झीरो बजेट सिनेमा आहे. राही अनील बर्वेंचा
अवघ्या ३३,०००/- रुपयांत तयार झालेला आहे.
बघणेबल आहे. यु ट्यूब वर सतत जहिराती येतात त्यामुळे विरस होतोय.
ब्रेव्ह
In reply to https://youtu.be… by विजुभाऊ
जाहिराती टाळण्यासाठी ब्रेव्ह बाउसर वरून Youtube वापरा.
- (ब्रेव्ह) सोकाजी
खुप आधीच पाहिला आहे. बरा आहे…
In reply to https://youtu.be… by विजुभाऊ
खुप आधीच पाहिला आहे. बरा आहे. एक वेगळा प्रयोग म्हणून पहिला.शेवट आवडला 👍मनपिशाच्च अर्थ आणि गोष्ट उलगडाते.
ओझार्कचा चौथा आणि फायनल सीजन…
ओझार्कचा चौथा आणि फायनल सीजन बघतोय. एकदम मॅच्युअर सिरीज आहे. संथ वाटते काहीवेळा पण अवश्य बघा.
सिरीज भारी आहे. पहिला सीजन…
In reply to ओझार्कचा चौथा आणि फायनल सीजन… by प्रचेतस
सिरीज भारी आहे. पहिला सीजन पाहून संपला.
आजच सगळी सिरीज पाहून संपली…
In reply to सिरीज भारी आहे. पहिला सीजन… by Bhakti
आजच सगळी सिरीज पाहून संपली. चौथा सीजन वेगवान आहे. बर्ड दाम्पत्याचे होणारे अध:पतन उत्तम चित्रित केले आहे.
बर्ड दाम्पत्याचे होणारे अध…
In reply to आजच सगळी सिरीज पाहून संपली… by प्रचेतस
बर्ड दाम्पत्याचे होणारे अध:पतन
ओह मला वाटलं चमत्कार होऊन ते सुटणार!
Marty, windey, rut कमाल काम केले आहे
शेवटपर्यंत बघा :)
In reply to बर्ड दाम्पत्याचे होणारे अध… by Bhakti
शेवटपर्यंत बघा :)
दुसरा सीझन संपला .तिसरा सुरु…
In reply to आजच सगळी सिरीज पाहून संपली… by प्रचेतस
दुसरा सीझन संपला .तिसरा सुरु आहे.वेंडी ही खरोखर वेडी झालिये 😐️
ओझार्क उत्तम - आधीच पाहिली आहे
In reply to ओझार्कचा चौथा आणि फायनल सीजन… by प्रचेतस
आपल्याकडे नायक/ नायिका सर्व वेळी, उदात्तच दाखवण्याची पध्दत आहे. अनेक पश्चिमेच्या मालिकांत मात्र माणसांत गुणाबरोबर अवगुणही असतात, त्यांचेही स्खलन होते असे दाखवले जाते. आपल्याकडे असली परिपक्वता कधी येणार कोण जाणे...
कॅप्चर - बीबीसी आय प्लेअर वर
सध्या कॅप्चर पाहतोय - बीबीसी आय प्लेअर वर. तिसरा ससिझन.
सीसी टीव्ही हॅक झाले, तर सुरक्षा एजन्सीजवर कसा परिणाम होईल असे काहीसे कथानक आहे. उत्कंठावर्धक आहे.
डार्केस्ट...
कुणाला अतिशय डार्क सिरीज बघायच्या असतील तर “Monster: The Ed Gein Story”, “Dahmer” आणि “Mindhunter” सुचवेन. डोकं सुन्न होतं.
ozark ..मी मारधाड ,क्रिमिनल…
ozark ..
मी मारधाड ,क्रिमिनल,हॉरर सिरीज अजिबात पाहत नाही .पण इथे सुचवलेली ओझर्क सिरीज अक्षरश: बिंज वॉच केली .कारण मार्टी आणि त्याचे त्याच्या कुटूंबावर असलेले प्रेम !!
खतरनाक अभिनय केला आहे.कायम शांत ,तरीही नशिबाच्या फेऱ्याने गुन्हेगारांच्या विळख्यात सापडतो.पण कुटुंबाला वाचवण्यासाठी एकामागून एक गुन्हे ते करत राहतात .
चार गुणिले दहा अधिक चार =एकूण ४४ भागांत अनेक महत्वाच्या व्यक्तिरेखांचा खून होतो .पण त्या प्रत्येक व्यक्तिरेखांची मानसिक जडण घडण पूर्णपणे आपल्या पर्यंत आधीच पोहचल्याने मेलेला व्यक्ती गुन्हेगार आहे तरीही त्याच्या जाण्याने चक्क वाईट वाटते.
कथा खूपच वाढत जाते .काही लूपहोलही आहेत पण वेडी वेन्डीबाईंमुळे ती गोष्ट आणखीनच वाढली आहे .रूथ
मला सगळ्यात जास्त आवडली होती.
From"
'From' बघतय का कोणी ? चौथा सीजन आलाय आत्ता. डोक्याला शॉट आहे लई 🫡
prime वर बघता येईल.
सध्या काय पाहताय?सध्या मी…
सध्या काय पाहताय?
सध्या मी लोकशाहीची होणारी हत्या पाहतोय. :)
खिक्क! (ह. घ्या. हा.)
सध्या येडपट गोष्टी (stranger things) इंग्रजीत पाहायला सुरुवात केली आहे, चक्क समजतेय, पण वेळ खूप लागतोय कारण सबटायटल वरून नजर उचलली जात नाहीये. त्या नंतर नवीन काही पाहेन म्हणतो!
विहिरी हा मराठी सिनेमा अर्धा राहिलाय!
तुर्की येथील ऐतिहासिक…
तुर्की येथील ऐतिहासिक स्थळांशी निगडित वेब सीरीज
माझ्यासारख्या इतिहासाची आवड असणाऱ्या सामान्य मुलीच्या बकेट लिस्टमध्ये इराणच्या ऐतिहासिक आणि आकर्षक स्थळांनंतर तुर्कीतील इस्तांबूल या शहराचे नाव आवर्जून येते. प्रत्यक्षात तिथे जाण्याची संधी कधी मिळेल याची शाश्वती नसली, तरी आजच्या डिजिटल युगात मनाने जगभर भटकण्याची सुविधा आपल्याला मिळाली आहे. अशाच मनस्वी प्रवासात मला तुर्कीच्या इतिहास, पुरातत्त्व आणि संस्कृतीशी संबंधित दोन उत्कृष्ट नेटफ्लिक्स वेब सीरीज पाहायला मिळाल्या. एक म्हणजे रहस्य, अध्यात्म आणि कल्पनारम्यतेचा संगम असलेली द गिफ्ट (Atiye) आणि दुसरी म्हणजे इतिहासाला जिवंत करणारी राईज ऑफ एम्पायर्स: #ऑटोमन
द गिफ्ट (#Atiye) ही तुर्कीतील जगप्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ गोबेकली टेपेच्या पार्श्वभूमीवर आधारित फँटसी-मिस्ट्री मालिका आहे. इस्तांबूलमध्ये राहणारी आतीये नावाची चित्रकार मुलगी तिच्या आयुष्यात अचानक समोर आलेल्या एका गूढ चिन्हामुळे प्राचीन इतिहास, स्वतःचा भूतकाळ आणि विश्वाच्या रहस्यमय शक्तींशी जोडली जाते. Şengül Boybaş यांच्या Dünyanın Uyanışı या कादंबरीवर आधारित असलेल्या या मालिकेत रहस्य, आध्यात्मिकता, विज्ञान आणि मानवी भावविश्व यांचे अनोखे मिश्रण पाहायला मिळते. तीन सीझन्स आणि चोवीस भागांमध्ये उलगडणारी ही कथा केवळ मनोरंजन करत नाही, तर गोबेकली टेपेसारख्या प्राचीन स्थळाविषयी कुतूहलही निर्माण करते. प्राचीन संस्कृतींचे संकेत, प्रतीके आणि मानवाच्या अस्तित्वाविषयीचे प्रश्न यांना आधुनिक कथानकाशी जोडण्याचा या मालिकेचा प्रयत्न प्रभावी वाटतो.
दुसरीकडे राईज ऑफ एम्पायर्स: #ऑटोमन ही मालिका इतिहासप्रेमींसाठी पर्वणीच आहे. डॉक्युमेंट्री आणि नाट्यमय पुनर्निर्मिती यांचा सुरेख संगम असलेल्या या मालिकेत ऑटोमन साम्राज्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक असलेल्या १४५३ मधील कॉन्स्टँटिनोपलच्या विजयाची कथा मांडली आहे. सुलतान मेहमेद दुसरा याने बायझंटाईन साम्राज्याची राजधानी जिंकण्यासाठी केलेली तयारी, विशाल तोफांचा वापर, नौकादलाला जमिनीवरून नेण्यासारख्या अभिनव लष्करी युक्त्या आणि निर्णायक युद्धांचे चित्रण अत्यंत प्रभावीपणे करण्यात आले आहे. दुसऱ्या सीझनमध्ये मेहमेद आणि व्लाद द इम्पेलर यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. इतिहासतज्ज्ञांच्या माहितीपूर्ण मुलाखती आणि नाट्यमय दृश्यांमुळे ही मालिका केवळ माहितीपर न राहता अत्यंत रंजकही बनते.
ऑटोमन साम्राज्याची स्थापना उस्मान प्रथम याने इ.स. १२९९ मध्ये केली. पुढे मेहमेद दुसऱ्याने १४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपल जिंकून इतिहासात नवे पर्व सुरू केले. सुलतान सुलेमान द मॅग्निफिसंटच्या काळात हे साम्राज्य सर्वाधिक विस्तारले आणि अनेक शतकांपर्यंत युरोप, आशिया व आफ्रिकेच्या विस्तीर्ण प्रदेशांवर त्याचे वर्चस्व राहिले. अखेरीस १९२२ मध्ये ऑटोमन साम्राज्याचा अस्त झाला आणि आधुनिक तुर्कस्तानाचा उदय झाला.
या दोन्ही मालिका तुर्कीच्या समृद्ध वारशाचे दोन वेगळे पैलू दाखवतात. 'द गिफ्ट' प्राचीन पुरातत्त्व, गूढता आणि आध्यात्मिकतेच्या माध्यमातून कल्पनाशक्तीला चालना देते, तर 'राईज ऑफ एम्पायर्स: ऑटोमन' इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांना जिवंत स्वरूपात आपल्या समोर उभे करते. इस्तांबूल आणि तुर्कीची भटकंती प्रत्यक्षात शक्य नसली तरी या मालिका पाहताना मन मात्र त्या भूमीत सहज पोहोचते. त्यामुळे माझ्या बकेट लिस्टमध्ये इस्तांबूलसोबत या दोन्ही वेब सीरीजनाही विशेष स्थान आहे.
पोलडार्क, ऑल क्रिचर्स ग्रेट ॲन्ड स्मॉल, द इन्डियन डॉक्टर
अलीकडेच पोलडार्क, ऑल क्रीचर्स ग्रेट ॲन्ड स्मॉल, द इन्डियन डॉक्टर या तिन्ही सिरीज बघितल्या! केवळ अप्रतिम!
सध्या यूट्यूब वर हे पाहतोय
बीबीसी वर
हॅपी व्हॅली पाहिली. सर्व सिझन्स चांगले आहेत.
सध्या द बॉईज बघत आहे.
सध्या द बॉईज बघत आहे.
खुप दिवसांनी एक चांगला sci…
खुप दिवसांनी एक चांगला sci fi सिनेमा पाहिला.
Andy Weir च्या प्रसिद्ध sci-fi पुस्तक "Project Hail Mary वर आधारित Project Hail Mary सिनेमा पाहिला
पृथ्वीवर एक मोठी समस्या येते Astrophage नावाचे एक सूक्ष्म जीव सूर्य आणि इतर ताऱ्यांची ऊर्जा खात आहे. यामुळे सूर्य मंद होत चालला आहे आणि पृथ्वीवर बर्फाचे युग येऊ शकते, ज्यामुळे मानवजातीचा नाश होईल.
शाळेत विज्ञान शिकवणारा एक साधा शिक्षक Ryland ग्रेस (PhD )याला ही समस्या सोडवण्यासाठी अंतराळात एक “Hail Mary” मिशन (अंतिम जोखमीची शेवटची चाल) पाठवले जाते.
तो एकटा अंतराळात जागा होतो, त्याला स्मृती हरवलेल्या असतात. हळूहळू त्याला आपली आठवण येते आणि तो समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो.
तिथे त्याला alien जीवन Rocky नावाचा अतिशय भारी एलीयन भेटतो. तोही आपला ग्रह वाचवण्यासाठी निघाला आहे.पहिल्या संपर्क,भाषा संवाद, interstellar travel इत्यादी त्यांच्यातली गंम्मत मस्त फूलवली आहे.
नक्की पाहावा असा सिनेमा आहे.
Little House on the Prairie
मी "लिटल हाऊस ऑन द प्रेरी" ही मालिका पाहिली. ती खूप आवडली. अमेरिकेच्या सुरुवातीच्या ब्रिटिश वसाहतींमधून लोक पश्चिमेकडे कसे स्थलांतरित झाले, त्यांनी नवीन ठिकाणी कसे स्थायिक होऊन संघर्षमय जीवन उभारले, याचा इतिहास या मालिकेत अतिशय सुंदर पद्धतीने दाखवला आहे.
ही मालिका पाहिल्यानंतर कळलं की ही एका जुन्या, अतिशय लोकप्रिय क्लासिक मालिकेची remake आहे.
मुसाफिर कॅफे - नेटफ्लिक्स…
मुसाफिर कॅफे - नेटफ्लिक्स बघितली. (का? का? का?)
टिपिकल जेन Zची कथा आहे, काहीच नाविन्य नाही. त्यापेक्षा प्रीती-चंदरची किंवा मार्क-नीलिमाची गोष्ट/प्रवास बघायला आवडला असता.
शेवटही इतका open ended आहे की ज्याचे नाव ते ... बहुधा त्यांचे बजेट संपले असेल, लेखकांना सांगितले नसेल हा शेवटचा एपिसोड आहे किंवा मग डायरेक्टर/ एडिटरनी बहुधा झोपेत शेवटचा एपिसोड केलेला दिसतोय... दुसरा सिझन आला(च) तरी अजिबात पाहणार नाही.
Mussoorie मात्र इतकी सुंदर दिसली आहे, पटकन जावेसे वाटतं. :)
खुप दिवसांनी धागा वर आला…
खुप दिवसांनी धागा वर आला 👍👍
या दरम्यान चिक्कार सिरिज आणि सिनेमे पाहिलेत. केवळ आठवणीच्या जोरावर सांगते.
नेव्हर आय हॅव एव्हर -एका अमेरिकन दक्षिण भारतीय टीन एज मुलीची भन्नाट मालिका आवडली.
माय ब्रिल्लायंट करियर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला गोऱ्या स्त्रियां कशाप्रकारे मुक्त जीवन, स्त्रीवादी कडे वळत होत्या, एक लेखिका होण्याचे स्वप्न बाळगणारी आस्ट्रेलियन बाईची कथा कधीकाळी लेखिका व्हायची इच्छा असल्याने खुप रिलेट झाली.
अग आई अहो सासूबाई अशा नावाची एक मराठी मालिका घरच्यांसोबत पाहून झाली.
आणि नुकतीच वायकिंग वाल्लाह पाहिली. वायाकिंग संस्कृती विषयक खुप उत्सुकता यामुळे निर्माण झाली. काका -केक, -विन्ड आय -विंडो, हॅपीन -हैप्पी असे काही शब्द यांनी दिलेत.
यात शेवटी वायकिंग अमेरिकेच्या शोधला निघाले हे दाखवले आहे.
११०० शतकात वैयकिंग अमेरिकेत पोहचले होते असे काही संदर्भ आहेत, तेव्हा ग्रीनलँड हून या भूमिला ते सुनेहरी धरती म्हणायचे.
अगं आई अहो आई, मोजून दीड भाग…
In reply to खुप दिवसांनी धागा वर आला… by Bhakti
अगं आई अहो आई, मोजून दीड भाग पाहिले, कंटाळवाणी वाटली.
एवढ्यात जुनेच बरेच मराठी चित्रपट पाहिले.
पाँडिचेरी, वायझेड, तुंबाडची मंजुळा, सुपरडुपर, क्रांतिज्योती विद्यालय
नेव्हर आय हॅव एव्हर
In reply to खुप दिवसांनी धागा वर आला… by Bhakti
नेव्हर आय हॅव एव्हर:- मला वाटते पहिले २ सिजन पाहिले आहेत. मालिका आवडली.
तुंबाडची मंजुळा बघितला
अतिशय साचेबद्ध स्टोरी आहे पण ओम भूतकर आणि जितेंद्र जोशीने मजा आणली आहे. सई ताम्हणकरला मुळातच काही स्कोप नव्हता अन् उरलेली जनता नगाला नग बरे आहेत झाले.
इमिली in पॅरिस ओह मी ही…
इमिली in पॅरिस
ओह मी ही सिरिज कशी विसरले?? 😅
बिंज watch करून करून सिरिज संपवली होती.
कपडे बदलावे तशी इमिली मित्र बदलते असो 🙄 आवड ज्याची त्याची.
पण इमिलीचे प्रोफेशनल आयुष्यात खुप काही चांगले, रोमांचक किस्से दाखवले आहेत. त्यामुळे ते पाहायला मज्जा येते.
शेवटचा सिझन यंदा डिसेंबरला येऊ शकतो. वाट पाहत आहे 👍👍
@ भक्ती- इमली(चिंच) in पॅरिस
In reply to इमिली in पॅरिस ओह मी ही… by Bhakti
हायला,प्रथमदर्शनी टायटल वाचून नवलच वाटले.
काळजीपूर्वक वाचले तेंव्हा एक वेलांटी काढली तर कोलांटी होते.....🤣
हिन्दीचा प्रभाव अजूनही गेला नाही.
हलकेच घ्या.
खरं तर ते ऍमेली आहे. पण मी…
In reply to @ भक्ती- इमली(चिंच) in पॅरिस by कर्नलतपस्वी
खरं तर ते ऍमेली आहे. पण मी तिच्या भूमिकेनुसार इमलीच म्हणते -आंबट गोड 😄
ही ही पाहिली आहे!
In reply to इमिली in पॅरिस ओह मी ही… by Bhakti
ही ही पाहिली आहे!
जुइ तु 'ही ही' करुन करुन हसत…
In reply to ही ही पाहिली आहे! by जुइ
जुइ तु 'ही ही' करुन करुन हसत आहेस का ?'ही ही' मालिका पाहिली आहे असे दर्शवत आहे 🧐
;-)
In reply to जुइ तु 'ही ही' करुन करुन हसत… by Bhakti
ही मालिका पाहिली आहे, असे म्हणायचे होते.
हनुमान अन्श
खुप वर्षांनी चित्रपटघरात हनुमान अंश हा चित्रपट पहिला , कथानक बरे वाटले पण चित्रपटगृह तील ध्वनी यंत्रणा अयोग्य वेळी आवाजात वाढ व कंपने या मुळे आनद घेता आला नाही
The Parisian Agency
The Parisian Agency, The Great British Bake Off या नेटफ्लिक्स वर्च्या सिरीजही मी पाहत असते.
अडकित्ता आणि कुलकर्णी…
अडकित्ता आणि कुलकर्णी चौकातला देशपांडे नावाचा चित्रपट पाहिला. कुचौदे चांगला वाटला पण नाटकासारखं नाव ठेवल्याने नाव चित्रपटाला अपिलिंग वाटत नाही.
अडकित्ता कोणत्या…
In reply to अडकित्ता आणि कुलकर्णी… by श्वेता व्यास
अडकित्ता कोणत्या प्लॅटफॉर्मवर ???
Zee5
In reply to अडकित्ता कोणत्या… by Bhakti
आजच मी परीक्षण लिहिले आहे, ते वाचून ठरवा😁
मी आज रविवारच्या निवांतवेळी…
मी आज रविवारच्या निवांतवेळी तुंबाडची मंजुळा पाहिला. काय सुरु आहे कळतच नव्हतं, सई आल्यावर जरा समजायला लागला. कोकणाच्या अशा कोकणी गाव, शहळ्या सारख्या गोड लोकांच्या भूमिकेने नटलेला विनोदी माझा आवडता एकच सिनेमा आहे "घो मला असला हवा "😊राधिका आपटे ❤️
दुसरा काहीतरी भूत भुतभयाम.. 🙄एकदमच बकवास...
कोकण बेस्ड 'निरोप' एक…
In reply to मी आज रविवारच्या निवांतवेळी… by Bhakti
कोकण बेस्ड 'निरोप' एक चित्रपट पाहिला, समीर धर्माधिकारी मुख्य पात्र असलेला, बरा होता.
भक्तीजी,
In reply to मी आज रविवारच्या निवांतवेळी… by Bhakti
घो मला असला हवा हा माझाही आवडता सिनेमा. भावे सुकथनकर जोडीचा माझा एकमेव आवडता सिनेमा.
सुंदर म्युझिकल फार्स आहे. काहीही म्हणा, सुनील सुकथनकार हे एक खूप चांगले गीतकार आहेत. त्यांनी लिहिलेली सगळीच गाणी अप्रतिम आहेत लिरिक्स च्या अंगाने. घो चे संगीत देखील खास आवडले. विशेषत: टायटल सॉंग. किंवा ते माहेराच्या आठवणींचे गाणे.
विशेषत: टायटल सॉंग....+१११…
In reply to भक्तीजी, by हणमंतअण्णा शंक…
विशेषत: टायटल सॉंग....+१११
माझ्या डोल्यातलं आसू
माझ्या व्हटावरलं हासू
माझ्या मुरक्यातलं रूसू
बोटात रूतलेलं कुसू
माझ्या यादेनं झोप त्याच्या डोल्याची
जाई उडून दूरच्या गावा...
घो मला असला हवा रे मेल्या...
पापणीवरची फडफड... किती कमाल करते राधिका..
कमाल गीत आहे ते, आठवड्यातुन बऱ्याच वेळा ऐकते.
आणि शेतात उगवलेल पापलेट😅ती धमाल 👍
घो मला असला हवायामध्ये…
In reply to मी आज रविवारच्या निवांतवेळी… by Bhakti
घो मला असला हवा
यामध्ये झिंग्यामामा झालेले कलाकार श्रीराम रानडे सर आमच्या इयत्ता नववी वर्गाला मराठी विषय शिकवायला होते. जितके उत्तम शिक्षक तितकेच उत्तम कलाकार अशा सरांचा खूप अभिमान वाटतो.
येडपट गोष्टी (stranger…
येडपट गोष्टी (stranger things) चा चौथा सीझन संपण्यात आहे. लईच थ्रिलिंग आहे.
धमाल4
माझे नाव गिनीज बुक मधे लिहून ठेवायला हवे.
मी धमाल4 एका बैठकीत सुरवातीपासून शेवटपर्यंत बघीतला.🤣
😂आम्हीपण पाहिला गणेश…
In reply to धमाल4 by कर्नलतपस्वी
😂आम्हीपण पाहिला गणेश चतुर्थीच्या दिवशी, केवळ कन्येसाठी, खुप खुप हसली ती 😂
Predestination पाहिला!…
Predestination पाहिला! डोक्याचे भजे करणारे सिनेमे आवडत असतील तर नक्की पहा.
वेब सिरीज सुचवा
मोठमोठ्या वेब सिरीज पहात बसण्या इतका attention span माझ्यात नाही; ज्यांच्यात आहे त्यांचं मला खरंच कौतुक वाटतं.
कुणीतरी सुचवलं म्हणून नेटफिक्स वरची Black Mirror चा कॉमन पीपल एपिसोड पाहिला. कदाचित अजून काही एपिसोड्स् पाहीन. मालीकेची एकूण थीम, कथानक व सादरीकरण आवडलं. यातला प्रत्येक एपिसोड एक स्वतंत्र कथा आहे.
१. अशाच प्रत्येक एपिसोड स्वतंत्र कथा असलेल्या वेब सिरीज सुचवाव्यात.
२. पंचायत सारख्या हलक्याफुलक्या वेब सिरीज सुद्धा सुचवाव्यात.
मी कधीच रील्स पाहण्याच्या…
मी कधीच रील्स पाहण्याच्या फंदात पडत नाही, अगदी क्वचीत कधी तरी अचानक कुठुन तरी काहीतरी पाहताना समोर आल्यास ते प्ले केले जाते.
असेच अचानक एक रील पाहण्यात आले व ते त्यातील अभिनयामुळे ते जरा फार जास्तच आवडल्याने इथे देउन जात आहे.
सदर चॅनल एका पक्षाचा असुन समस्त इतर पक्षी वर्गासाठी निर्माण करण्यात आलेला दिसतो...
असो... मी काही उगा वेळ काढत बसत नाही व म्हणुन ते रील तेव्हढ इथं देऊन जातो. ;)
निंदा करणार्या बायका
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : One Name - Lyric Video | Jailer 2 |
पाव्हनी फेवरेटच आहे 😃
In reply to मी कधीच रील्स पाहण्याच्या… by मदनबाण
पाव्हनी फेवरेटच आहे 😃
पाव्हनी फेवरेटच आहे 😃हा हा…
In reply to पाव्हनी फेवरेटच आहे 😃 by श्वेता व्यास
पाव्हनी फेवरेटच आहे 😃
हा हा हा... पाव्हनी लईच भारी प्रकरण हाय ! सगळं येतय तिला ! :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : One Name - Lyric Video | Jailer 2 |
Modha Ratri -मोढा रात्री
त्याला लग्नच करायचे नव्हते. दुबईत नोकरी करणाऱ्या त्या तरुणाला फक्त भाच्याच्या लग्नासाठी भारतात बोलावले गेले. पण घरच्यांनी कसेबसे समजावून, फसवून त्याला थेट बोहल्यावर चढवले. मुलाला चक्क मांडवात उभे करण्याची ही युक्ती फक्त या सिनेमातच नाही, साऊथच्या कित्येक चित्रपटांतही दिसते.
सुरुवातीला खूप विनोदी प्रसंग येतात. हसता हसता चित्रपट पाहायला सुरू केला. पण हळूहळू कळते की ती मुलगीही बळजबरीने या लग्नाला तयार केली गेली आहे. तिचा बालिश, अपरिपक्व प्रियकर दाखवताना हसतानाही मनात एक वेदना जाणवते.
‘मोढ्या रात्री’… म्हणजे पहिली रात्र...मधुचंद्राची रात्र.
नावावरून वाटते रोमँटिक सिनेमा असेल. पण हा थेट प्रेमात पडलेल्या जीवांचा मधुचंद्र नाही. ही त्या रात्रीची कहाणी आहे, जिथे दोन हृदयं प्रेमाचा नवा अर्थ शोधतात. स्वतःसाठी, स्वतःच्या वेदनेतून.
नायक… प्रत्येक मुलीला आवडेल असा पती. पुरुषी अहंकाराचा समतोल राखणारा, तरीही स्त्रीला सन्मान देणारा. जेव्हा तो तिला तिच्या प्रियकराकडे सोडायला जातो, तेव्हा ‘हम दिल दे चुके सनम’ ची ती दृश्यं आठवतात. पण इथे कलाटणी अधिक निर्मळ, अधिक पवित्र वाटते.
आणि या सगळ्यात एक अदृश्य पात्र आहे. गावातल्या पाराच्या देवाची भूमिका. ती फक्त पार्श्वभूमी नाही, तर संपूर्ण कथेचा श्वास आहे.
त्या बरसणाऱ्या रात्री… प्रियकर सोडून गेल्यावर नायिका झरझरणाऱ्या पावसात स्तब्ध उभी राहते. जवळपास संपूर्ण कथाभर ती शब्दांशिवाय बोलते. फक्त चेहरा… त्या एका शॉटमध्ये तिच्या चेहऱ्यावरील प्रत्येक रेखा, प्रत्येक हावभाव सिनेमा व्यापून टाकतात. आणि त्याच क्षणी नायकाच्या अपूर्ण प्रेमाची कवाडे हळूहळू उघडू लागतात. ती विहीर, ते झाड, ते पावसाचे थेंब… सारे उलगडू लागते.
इकडे घरचे दोघांना शोधत फिरत असताना विनोदी प्रसंग घडतात. पण अचानक गंभीरता दाटून येते. मुलीचे अफेअर, मुलाचे अफेअर… दोन्ही कुटुंबे हमरी-तुमरीत उठतात. धागे गुंतागुंतीचे होतात.
आणि मग… तो प्रसंग.
नायिका घसा फोडून ओरडते. ती ओरड नाही, तर या समाजव्यवस्थेला केलेला निषेध आहे. मग ती शांत होते. चार पावले चालते… मागे वळते… आणि फक्त बघते. तोही तिच्यामागे चालू लागतो.
पुन्हा त्याच झाडाखालच्या देवाजवळ दोघे बसतात.
ती खूप बोलते. मोकळेपणाने, निरागसपणे, सगळं काही मनातले ओतून टाकते. आणि नायक… फक्त शांत प्रेमाने ऐकत राहतो. शब्द नाहीत, फक्त ऐकणे आहे.
त्या रात्री… ते दोघे खरोखर प्रेमात पडले.
खरी खरी पहिली रात्र साकार झाली.
परिचय आवडला, नक्की बघेन.
In reply to Modha Ratri -मोढा रात्री by Bhakti
परिचय आवडला, नक्की बघेन.
Tropic Thunder पाहिला.हहपुवा…
Tropic Thunder पाहिला.
हहपुवा.
That word has kept us down for ४०० years...
दशवतार चित्रपट पाहिला. कथा…
दशवतार चित्रपट पाहिला. कथा भाबडी असली तरी सर्वांच्या आणि विशेषतः दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयासाठी नक्की पाहण्यासारखा आहे. पुढे काय होईल याची उत्सुकता वाढवणारा आणि कुठेही कंटाळवाणा न होणारा चित्रपट आहे.
त्यांची शारीरिक स्थिती
In reply to दशवतार चित्रपट पाहिला. कथा… by श्वेता व्यास
आणि Climax मधील त्यांचे शक्तीचे प्रयोग किंवा न मरण्याची चिकाटी ह्याची मनात सांगडच बसत नव्हती.
चित्रपट मला थोडा आवडला कारण कोकणातील राखणदार वगैरे कल्पना अनुभवल्या आहेत. वाघाने माणसं नेली तरी लोकांचा विश्वास कमी होत नाही. पण Industry आली म्हणजे वाईटच, हे गृहीतक धरून सगळं लिहिल्यासारखं वाटलं, त्यामुळे भाबडी कथा म्हणालात ते योग्यच आहे.