✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सध्या काय पाहतेय? ---२०२६

B
Bhakti यांनी
Fri, 01/02/2026 - 12:51  ·  लेख
लेख
1 या रे या stranger things च्या फ्यान लोकांनो इकडे या भावनांचे पाट वाहू द्या stranger things ला भरलेल्या मनाने गुड बाय करू या शेवटचा भाग right side up अक्षरश: दोन तास मनःपटलावर अधिराज्य करतो.वेकना मरणार हे माहितीच होत . पण एल पण गायब होणार होत हे अनपेक्षित होत . सुपरनॅचरल मालिका असं गृहीत चालताना यात सायन्सचा वर्म होल हा कन्सेप्ट हि सिरीज सगळ्यांसाठी बघणीय होते.कारण ते भूत खेत जाम बोर करतात. 2 कोणाचं कौतुक करावं ??? सायकोकायनेटिक क्षमता असलेली इलेव्हन ,मैत्रीने घट्ट विणलेले माइक,लुकास, डस्टिन आणि विल,मॅक्स, धडाकेबाज नॅन्सीचा,स्टीव्ह ,हूपर,जोनाथन,रॉबिन जॉयसी,गोड गोडुली हॉली,डफर, बडबडी एरिका की हेन्री उर्फ वन उर्फ वेकना उर्फ खेकडा भजी(भारतीयांनी दिलेले नाव ) :) की पिसाळलेल्या कुत्र्यासारखे मागे लागणारे डेमोगोर्गनच यांचं करायचं. २०१६ पासून १० वर्षात ५ सीझन आणि ४२ भागांत ही सगळी पात्र आपल्या बरोबरच वाढत होती.हृदयस्पर्शी मैत्रीचा अर्थ पुन्हा पुन्हा पटवून देत होती. ८० च्या दशकातील जुन्या आठवणी पॉप गाण्याने जाग्या होत होत्या https://en.wikipedia.org/wiki/Stranger_Things:_Music_from_the_Netflix_Original_Series ."Running Up That Hill (A Deal with God)" by Kate Bush हे गाणं आता माझी मोबाइल रिंगटोन आहे . यावर इन्स्टावर थेअरी ,कॉमेडी,अशा रीलचा महापूर आला आहे .त्यात मॅक्स समोर गेट आलं तरी वेड्या सारख्या का बडबडत आहे हा प्रश्न असो :),वेकना भाऊने केलेला वेट लॉस,एल सारखी पॉवर आल्याचा विश्वास असो :) 3 4 अहो शेवट ,तुम्ही सस्पेंस ,थ्रिलरवर गोष्ट संपवता तेव्हा हे क्षणिक ठरत .मानवी भावनांना जेव्हा स्पर्श करता तेव्हा ती गोष्ट अमर होते. माईक सगळ्यांना समजून सांगतोय आपलं बालपण आता दूर चाललं आहे ,संपलं आहे .हा खेळ संपला आयुष्याचे नवीन अध्याय आता खेळणार आहोत.... हायला खूप दिवसांनी एखाद्या सीरिजने आनंद दिला ,हसवलं,उत्सुकता वाढवली ,रडवले. हॅट्स ऑफ डफर ब्रदर !!!!!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7087 वाचन

💬 प्रतिसाद (79)

प्रतिक्रिया

भैरप्पांचे आवरण हे पुस्तक

कांदा लिंबू
Fri, 01/23/2026 - 00:25 नवीन
भैरप्पांचे आवरण हे पुस्तक माझ्याही संग्रही आहे; अनेकदा वाचले आहे. हिंदूंच्या नाशाला हिंदूच कारणीभूत आहेत असे वाटते, पुस्तक वाचून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

**द क्वीन्स गॅम्बिट

Bhakti
गुरुवार, 01/22/2026 - 21:25 नवीन
**द क्वीन्स गॅम्बिट महिन्याचा एका रविवारी बिंज वॉचिंग झाले.खूपच खिळवून ठेवलं. विशेष करून नायिकेचा अभिनय कमाल आहे. प्रतिभा खूप मोठी असली तरी व्यसन आणि भावनिक संघर्ष यांच्याशी लढावं लागतं.बेथ हार्मन एक अनाथ मुलगी आणि तिला मिळालेलं बुद्धिबळ खेळाचे वरदान असे कथानक भावना दुःख स्पर्धा इच्छाशक्ती यांचा सुरेख संगम आहे . **अगाथा क्रिस्टीज सेव्हन डायल्स-आंतरराष्ट्रीय षड्यंत्र, गुप्त फॉर्म्युला आणि अनपेक्षित ट्विस्ट्सचा आहे. **द वंडर-विज्ञान विरुद्ध विश्वास,यांच्याभोवती फिरते. या ठीक ठाक आहेत
  • Log in or register to post comments

फिर आयेगी हसीन दिलरुबा

अभ्या..
Sun, 01/25/2026 - 20:32 नवीन
फिर आयेगी हसीन दिलरुबा पाहिला नेटफ्लिक्सावर. . हा "हसीन दिलरुबा" २०२१ साली आलेला त्याचा सिक्वल आहे. कास्ट अर्थात थोडी वाढलेली. तापसी पन्नू (कायतरी सर्जरी केलीय नोज जॉब बहुधा. प्रचंड गंडलेला आहे. मूळची गोड पन्नू एकदम सर्वसामान्य आणि कशीतरीच दिसते आहे. पूर्ण चित्रपट ती आधी कशी दिसायची आणी आता काय करुन घेतलेय ध्यान ह्याची तुलना करण्यातच गेला) विक्रांत मेस्सी (पहिल्यासारख्याच पाट्या प्लस थोडासा मुमकीन है चा नकली जोष) आधीचा हर्शवर्धन राणे मेला त्याजागी नवीन आशिक म्हणून सनी कौशल आलाय (भाउ विकी कौशलच्या तुलनेत प्रचंड कॅलिबर आहे त्याच्यात. शिद्दत मध्ये ते जाणवले होतेच पण आवाजाचा पोत आणि अभिनय ह्या जमेच्या बाजू, सामान्य रुप असले तरी भविष्य उज्ज्वल आहे. ) जिमी शेरगिल : अजूनही राजा अवस्थी मधून बाहेर आलाच नाहीये. सोसो बाकी सीआयडी फेम अभिजीत सारखे इतर थोडेफार पब्लिक. . कथा पहिली संपली तिथेच चालू होते. बायकोसाठी हात तोडलेला आणि जळून मेला अशी बतावणी करुनही जिवंत असलेला रिशू(विक्रांत मेस्सी) वेगळीकडे फरार होऊन आयुस्ष्य जगणारी दिलफेक आणि बिनधास्त आशिक रानी(तपसी पन्नू) ह्यांना एकत्र यायचेय. स्वतःच्यच फॅमिलीला संपवून अनाथ अशी बतावणी करणारा व रानीवर भाळलेला अभिमन्यू (सनी कौशल). जुनी केस अनुभवलेला इन्स्पेक्टर आणि मेलेला हर्षवर्धन राणे ह्याचा पोलीसात असलेला काका मॉन्टू (जिमी शेरगिल) रानी आणि रिशू दोघानाही हुडकताहेत. लिखित पुस्तकरुपाने दिसणारा रेल्वे स्टेशन छाप पॉकेटबुक लेखक दिनेश पंडीत च्या कथेचे रेफरन्सेस वापरत कथा पुढे सरकते आणि अपेक्षित अशा वळणावर संपते. संवाद चटकदार आहेत, सनी कौशल वगळता अभिनय सोसो सगळ्यांचाच. सस्पेन्स फार नाहिये, लूपहोल्स प्रचंड आहेत, काही करामती केवळ अशक्य अशा कोटीतल्या आहेत पण पहिली हसीन दिलरुबा आवडणार्‍या प्रेक्षकांना थोडाफार विरंगुळा अशी "फिर आयेगी हसीन दिलरुबा" आहे.
  • Log in or register to post comments

"प्राइड अँड प्रेज्युडिस"

Bhakti
गुरुवार, 01/29/2026 - 12:52 नवीन
Image removed. अनेकदा 'फील गुड मुव्ही' असं लिहुन सिनेमे शोधून पाहावे.नितांत सुंदर मनाचं तळ शांत होणारे काही सिनेमे हाती लागतात. "प्राइड अँड प्रेज्युडिस" १९०० च्या शतकात इंग्लंडमधली प्रतिभावंत लोकप्रिय लेखिका जेन ऑस्टेनची सर्वात लोकप्रिय कादंबरी आहे.त्या काळात स्त्री लेखिका दुर्मिळच त्यामुळे तिच्या पुस्तकांवर "लेडी रायटर " असे लिहिले जात.तिने Sense and Sensibility ,Pride and Prejudice ,Mansfield Park ,Emma ,Northanger Abbey ,Persuasion अशा वेगळ्या धाटणीच्या अनेक कादंबरी लिहिल्या.पण सर्वात जास्त लोकप्रिय ठरली ती "प्राइड अँड प्रेज्युडिस"!! पुस्तकांमधून, चित्रपटांमधून आणि टीव्ही रूपांतरांमधून पुन्हा पुन्हा सांगितली आणि नव्याने सादर केली गेली आहे.तिने अनेक नवीन कथानकांना प्रेरणा दिली आहे. तिच्या नायिका फेमिनीसम आणि प्रेम यांचे अद्भुत मिश्रण असत."प्राइड अँड प्रेज्युडिस" ही एका क्लासिक थीमची सुरुवात मानली जाते. ज्यात सुरुवातीला दोघे नायक नायिका एकमेकांचा तिरस्कार करतात असे वाटते, पण शेवटी ते चक्क एकमेकांच्या आकंठ प्रेमात पडलेले असतात.जो राईट २००५ मधील हा सिनेमा ऑस्करसाठी चार नामांकनाचा मानकरी ठरला.यासाठीचे श्रेय यातले कलाकार (पैकी नायिकालाही उत्कृष्ट नायिकेचे नामांकन होते),सिनेमाटोग्राफी,पोशाख यांना तर होतेच.परंतु याची मोठी शिलेदार होती पटकथालेखिका डेबोरा मोग्गाच यांनी पटकथेवर दोन वर्षांहून अधिक काळ घालवला. १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या इंग्लंडमध्ये घडते. नायिका एलिझाबेथ बेनेट,स्वतंत्र विचारांची आणि थोडी जिद्दी मुलगी आहे. तिला कुटुंबात ५ बहिणी आहेत. आईची एकच इच्छा असते की सर्व मुलींचे लग्न लवकरात लवकर श्रीमंत आणि चांगल्या घराण्यातील पुरुषांशी व्हावे.मिस्टर बिंगले आणि जेन बेनेट यांच्या प्रेमाची ,लग्नाची गोष्ट पुढे सरकत असतानाच त्यांचा मित्र मिस्टर डार्सी एक अतिशय श्रीमंत पण अहंकारी वाटणारा माणूस कथेचा एक प्रमुख पात्र होतो. एलिझाबेथ आणि डार्सीची पहिली भेट होते.पण डार्सीच्या अभिमानी 'वागणुकीमुळे' pride आणि एलिझाबेथच्या पूर्वग्रहांमुळे 'prejudice' त्यांच्यात गैरसमज निर्माण होतात.पुढे कथेत अनेक मजेशीर,काही गंभीर,हृदयस्पर्शी घटना होतात.शेवटी दोघेही आपल्या चुका ओळखतात, गैरसमज दूर होतात आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. या कथेमध्ये तेव्हाच्या स्त्रियांनाही 'लग्न ' योग्य वयात व्हायला समस्या असत हे पाहून आश्चर्य वाटले.अनेक स्त्रियांच्या लग्नाची ही कथा अनेक सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधते. त्यातही नायिका एलिझाबेथ हिची हिम्मत ,स्पष्टवक्तेपणा ,सहजता तरीही वागण्यातली शिष्टचारता मंत्रमुग्ध करते . एलिझाबेथला समजले नसले तरी डार्सी हा तिच्यासाठी खूप खूप योग्य आहे हे चाणाक्ष प्रेक्षकांना नक्कीच संमजते.आणि आता तो कसा तिचा गैरसमज कसा कुठवर दूर करणार याची उत्सुकता असते. "You must allow me to tell you how ardently I admire and love you" ते "You have bewitched me, body and soul" असा डार्सीचा झालेला प्रेमळ बदल फार रोमँटिक आहे. लिझी शेवटी जेव्हा वडिलांना सांगते ,"I do love him. I love him very much. Indeed he has no improper pride. He is perfectly amiable. You do not know what he really is." तेव्हा वडील आनंदून म्हणतात ,"I could not have parted with you, my Lizzy, to any one less worthy." ते तिला मान्यता देतात आणि आनंदमिश्रित खूप खूप सुहास्य करतात.सिनेमा संपतो पण आपल्याही मुखावर सहज सुहास्य उमलते. -भक्ती
  • Log in or register to post comments

'फील गुड' मुव्हीज बघायला आवडत असतील तर

टर्मीनेटर
Sat, 01/31/2026 - 09:58 नवीन
'फील गुड' मुव्हीज बघायला आवडत असतील तर जिओ हॉटस्टारवर 'सर्वम माया' (Sarvam Maya) हा मूळचा मल्याळम सिनेमा बघण्याची शिफारस करतो! तो मराठी सहित सात भाषांत उपलब्ध असला तरी शक्यतो हिंदीत बघावा, मला एकदा बघायला चांगला वाटला आहे! खूप काही अभिनव प्रयोग वगैरे ह्यात केलेला नाहीये पण बरेचसे मल्याळम चित्रपट चांगले असले तरी ते भयानक संथ असल्यामुळे (किंवा कळकट्ट पात्रांमुळे) कंटाळवाणे वाटतात तसे इथे होत नाही. त्यामुळे प्लेबॅक स्पीड न वाढवताही (गाणी पळवत) बघता येईल. आणि हो, ह्यातली 'माया''(रिया शिबू) कशी वाटली ते हा चित्रपट पाहिल्यास किंवा आधी पाहिला असल्यास अवश्य कळवा 🙂
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

ट्रेलर पाहिला ,आवडला. आता

Bhakti
Sat, 01/31/2026 - 10:45 नवीन
ट्रेलर पाहिला ,आवडला. आता सिनेमा पाहते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

घरच्या सगळ्यांनी एकत्र बसुन

टर्मीनेटर
Sat, 01/31/2026 - 12:26 नवीन
घरच्या सगळ्यांनी एकत्र बसुन पहायलाही हरकत नाही, अगदी गिरिजाही बघु शकेल असा आहे! त्याला 'हॉरर' हा टॅग उगाचच लावला आहे 😀 अजुन तीन सिनेमे सुचवतो. आधी पाहिले नसल्यास सवडीने ते ही पहा... १) 'पासंगा-२'(Pasanga 2 - मूळचा तामिळ) ह्याची कथा पण चांगली आहे आणि सुरिया आणि अमला पॉल ची जोडी नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या भूमिकेत छान वाटली. (नर्मविनोदी, फील गुड, Child psychology) हा सिनेमा 'अ‍ॅमेझॉन प्राईम' आणि 'युट्युब' वर आहे. २) 'श्रीनिवासा कल्याणम' (Srinivasa Kalyanam - मूळचा तेलुगू) नितीन आणि राशी खन्ना. (फॅमिली व्हॅल्यूज, फील गुड मुव्ही) हा हिंदीत 'अ‍ॅमेझॉन प्राईम' आणि 'युट्युब' वर आहे. ३) 'हर दिन दिवाली' (Prati Roju Pandage - मूळचा तेलुगू) साई धरम तेज, राशी खन्ना आणि सत्यराज. (फॅमिली व्हॅल्यूज, फील गुड मुव्ही) हा हिंदीत 'अ‍ॅमेझॉन प्राईम (MX Player)' आणि 'युट्युब' वर Free आणि जिओ हॉटस्टारवर फक्त तेलुगूत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

मध्यंतरी नेटफ्लिक्सवर विजय

प्रचेतस
Sat, 01/31/2026 - 14:16 नवीन
मध्यंतरी नेटफ्लिक्सवर विजय सेतुपतीचा 'महाराजा' पाहिला. अत्यंत भारी रहस्यपट. खिळून पहावा लागतो. जागोजागी क्लू पेरलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

Oldboy चे भारतीय वर्जन! हा

अमरेंद्र बाहुबली
Sat, 01/31/2026 - 16:46 नवीन
Oldboy चे भारतीय वर्जन! हा आवडला असेल तर गार्गी देखील पहा असे सुचवेन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गार्गी छानच

स्वधर्म
Sun, 02/01/2026 - 02:27 नवीन
साध्यासुध्या नायिकेचा संघर्ष खूप छान दाखवलाय. मला साध्या लोकांशी रिलेट होणारे सिनेमे आवडतात. म्हणून हिंदी अनेक वर्षांनी एखाद दुसराच आवडतो (मल्होत्रा खानदान, पापा का इंपोर्ट एक्स्पोर्ट का बिजनेस, स्विझर्लंडमध्ये उगीचच स्थळदर्शन इ. इ. सहन करू शकत नाही) साई पल्लवी कधीच मेक अप करत नाही असे ऐकले होते. हॅट्स ऑफ त्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

गार्गी कुठे बघता येईल?

प्रचेतस
Sun, 02/01/2026 - 06:16 नवीन
गार्गी कुठे बघता येईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

'गार्गी' बघायची तुमची इच्छा

टर्मीनेटर
Sun, 02/01/2026 - 10:00 नवीन
'गार्गी' बघायची तुमची इच्छा असेल(च) तर 'SonyLIV' वर आहे. खरंतर साई पल्लवी कितीही चांगली अभिनेत्री आणि उत्कृष्ट नृत्यांगना असली तरी मला ती कुठल्याही अँगलने हिरोईन मटेरियल वाटत नसल्याने आणि असले लो-बजेट चित्रपट बघायला बिलकुल आवडत नसल्याने माझी हा चित्रपट बघण्याची अजिबात इच्छा नव्हतीच. पण बायकोला बघायचा होता म्हणून मागे एकदा बघायला घेतला होता पण वरील दोन्ही कारणांच्या जोडीला हा चित्रपट 'संथ वाहते कृष्णामाई' छाप स्लो असल्याने काही मिनिटांतच कंटाळून दुसऱ्या उद्योगाला लागलो होतो पण बायकोने मात्र हुंदके देत साश्रुनयनांनी तो पूर्ण पाहून आपण संवेदनशील वगैरे असल्याचे प्रमाण दिले होते. मला ह्या बाबतीत कोणी 'असंवेदनशील. अमानुष' वगैरे म्हंटले तरी माझी काहीही हरकत नसते, पण असले पकाऊ 'इमोशनल अत्याचार' पाहण्यापेक्षा आपला वेळ पक्के कमर्शिअल मनोरंजक चित्रपट पाहण्यावर खर्च केलेलाच बरा वाटतो बुवा! (तुम्हालाही 'गार्गी' बोरिंग वाटेल ह्याची मला खात्रीच आहे, पण तुम्ही बघितलात आणि काही वेगळे मत बनले तर ते ऐकायलाही नक्कीच आवडेल 🙂)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुम्ही केलेल्या वर्णनानुसार

प्रचेतस
Sun, 02/01/2026 - 11:59 नवीन
तुम्ही केलेल्या वर्णनानुसार गार्गी मला आवडणार नाही असेच दिसते :) बाकी किष्किंधाकांडम हा अतिशय संथ मात्र जिद्दीने शेवटपर्यंत पाहिला होता आणि शेवटी शेवटी आवडला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

प्रचेतस सर, गार्गी

अमरेंद्र बाहुबली
Sat, 02/14/2026 - 23:15 नवीन
प्रचेतस सर, गार्गी सुरुवातीपासून एंगेजिंग आहे, नक्की पहा आणी कळवा कसा वाटला ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अर्रर्र

स्वधर्म
Tue, 02/24/2026 - 21:40 नवीन
या धाग्यावर एकदम आजच आलो. सॉरी. मी गार्गी अ‍ॅमेझॉनवर पाहिला होता असे आठवते. खूप दिवस झाले. बाकी तुंम्हाला न्यूटन हा राजकुमार रावचा सिनेमा आवडला होता का? मला तो खूपच आवडला होता. टर्मिनेटर भाऊ तुंम्ही सॉलिड पिसं काढली आहेत असल्या सिनेमांची. म्हणून आमचे दोन पैसे हलकेच घ्या: आपला हिरो कधी एकदा जातो आणि सोळा गुंड आणि व्हिलनचे दात घशात घालतो अशा प्रकारची उत्तेजना हवी असेल तर गार्गी तुंम्हाला आवडणार नाही. त्यासाठी रजनीकांत बघा बेष्टपैकी. 'हिरॉईन मटेरियल' पहायचं असेल तर आवड आपली आपली. मला लो बजेट = बोअर आणि हाय बजेट = भारी असे काही वाटत नाही. उलट मला हाय बजेट सिनेमे विनोदी वाटतात म्हणून कधीकधी जरूर बघतो. सामान्य माणसाने शांतपणे कायद्याच्या कक्षेत राहून अन्यायाचा प्रतिकार करणे, चांगल्यावरचा विश्वास न गमावता समाजाला तोंड देत राहणे आणि शेवटी सत्याजवळ पोहोचणे असा प्रवास कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता, अगदी उत्कंठापूर्ण पध्दतीने दाखवला आहे. बर्‍याचदा हा सिनेमा वाटतच नाही, आपल्या घरासमोरच काहीतरी घडतंय असं वाटत राहतं. प्रचेतस तुंम्ही जरूर बघा आणि कसा वाटला ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

महाराजा मस्तच आहे!

टर्मीनेटर
Sun, 02/01/2026 - 09:57 नवीन
महाराजा मस्तच आहे! मला विजय सेतुपती हा अभिनेता म्हणून खूप आवडतो. 'इझी अ‍ॅक्टिंग' कशाला म्हणतात ह्याचा तो एक आदर्श नमुना आहे. लीड रोल मधले त्याचे जवळपास सगळे चित्रपट पाहिलेत (त्यात काही तद्दन भिकार चित्रपटही आहेत), आणि सुरुवातीच्या काळात तो अगदी दुय्यम भूमिका करायचा ते ही पाहिलेत. धनुष 'हिरो' असलेल्या एका जुन्या चित्रपटात त्याला व्हीलनच्या गॅंग मधल्या सामान्य पंटरच्या भूमिकेत पाहून हसूही आले होते 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सेतुपतीचे बरेचसे चित्रपट

प्रचेतस
Sun, 02/01/2026 - 12:00 नवीन
सेतुपतीचे बरेचसे चित्रपट भिकारच आहेत. आता आता त्याच्या क्षमतेला न्याय देणारे सिनेमे येताहेत असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

छान आहे, रियाने मस्तच काम

Bhakti
Sat, 01/31/2026 - 21:21 नवीन
छान आहे, रियाने मस्तच काम केलय.नायिकेने विदाऊट मेकअप असूनही केवळ तिच्या रिफ्रेशिंग अभिनयाने खिळवून ठेवलं. पण शेवट समजला नाही.तिला आवडणारा दाढीवाला तोच?? पण संथच वाटला,सिनेमा खूप पळवला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

पण शेवट समजला नाही.तिला

टर्मीनेटर
Sun, 02/01/2026 - 09:55 नवीन
पण शेवट समजला नाही.तिला आवडणारा दाढीवाला तोच??
शेवट अशा प्रकारे कल्पिता येऊ शकतो... प्रभेंदू हा तोच (म्हणजे जिवंतपणी तिच्या मनातला प्रियकर) असावा पण आधीच्या आई-वडिलां बरोबरच्या संभाषणात ती त्याला बंगलोरमध्ये भेटल्याचे म्हंटले होते, ते फोनवर संपर्कातही असतात. पण प्रभेन्दुला हे काहीच माहित नसल्याचे दाखवले आहे म्हणजे हा 'तो' नसावा. प्रभेंदूचा काका त्याला सल्ला देतो त्याप्रमाणे तो तिच्या घरच्यांना भेटायला जातो. मायाने आईला तिच्या मनातल्या प्रियकराचे जे वर्णन सांगितलेले असते ते योगायोगाने प्रभेन्दुला तंतोतंत लागू पडत असल्याने तो तिच्या आईला आपण तोच असल्याचे सांगत असावा. आणि (मेल्यानंतर) माया खरंच प्रभेन्दुच्या प्रेमात पडली असल्याने त्याच्या (तिच्या आईला दिलेल्या खोट्या) कबुलीने तिला मुक्ती मिळाल्याचे त्या हवेच्या प्रतीकात्मक स्पर्शाने दाखवले असावे. मला हा शेवट लॉजिकल वाटतो आहे!
पण संथच वाटला,सिनेमा खूप पळवला
हा हा हा... 😀 संथ असणे हे मल्याळम चित्रपटांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तरी हा त्यातल्यात्यात सुपरफास्ट आहे म्हणू शकतो, नाहीतर संथपणाचे एकसे एक रेकॉर्ड्स त्यांनी नोंदवून झाले आहेत. प्लेबॅक स्पीड १.५ X केल्याशिवाय ते बघणे माझ्यासाठी अशक्य ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

सुंदर सिनेमा!

जुइ
Sun, 02/01/2026 - 21:17 नवीन
त्यावेळी चित्रपटगृहात पाहिला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

"बौद्ध मूर्तीशास्त्र"

Bhakti
Fri, 01/30/2026 - 15:41 नवीन
सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय???(कोणाला आपल्याबद्दल काही वाटलं तरी बदलु नये ,हा बेसिक नियम मान्यच असेल असे..:)) माहिती अधिक झाल्याने इथे स्वतंत्र धागा दिला आहे. http://misalpav.com/node/53480
  • Log in or register to post comments

धुरंधर नेटफ्लिक्सवर आलाय, लाभ

Bhakti
Sat, 01/31/2026 - 21:24 नवीन
धुरंधर नेटफ्लिक्सवर आलाय, लाभ घ्यावा.कथेत खूपच नावीन्य आहे.तीन-चार पार्ट तरी व्हायला पाहिजे.
  • Log in or register to post comments

"साबर बोंड" (कॅक्टस पिअर्स)

Bhakti
Sat, 02/14/2026 - 22:17 नवीन
Image removed. प्रेमाला केवळ भावना म्हणून सिनेमांत सादर करणे खूप दुर्मिळ आहे. त्याच्याभोवती संघर्ष, प्रतिशोध,एकाकी लढा असे धागे कथा म्हणून गुंतलेले असतात. पण अशा कथासूत्रांत "साबर बोंड" (कॅक्टस पिअर्स) हा प्रेमाचा सिनेमा अडकत नाही.गोष्ट जगात सहज मान्य नसणाऱ्या "समलैंगिक तरुणांची"!पण सिनेमा इतक्या सहजतेने हॆ समलैंगिक नातं आपल्यापर्यंत पोहचवतो की वाटत "का बर प्रेम देणाऱ्या यां नात्याला बोल लावतो,यांच्याही भावना जाणून घेत नाही.लग्नासाठी ढकलून कोणत्याही मुलीचे/मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याऐवजी, अशा लैंगिकता पुढे येऊन स्वीकार करणाऱ्यांना समाज दबावाशिवाय सामावून घेत नाही? वडिलांच्या मृत्यूनंतर आनंद अंतिम क्रियाकर्मसाठी गावाकडे जातो. तिथे त्याचे वय उलटल्यामुळे लग्नाविषयीं गावाकडचे त्याला सतत विचारत राहतात. तेव्हा आनंदला त्याचा लहानपणीचा सवंगगडी बाळ्या भेटतो. बाळ्याही याच लैंगिक ओळखीचा आहे. ग्रामीण भागातल्या तरीही मधेच शुष्क बाभाळी, एवलस तळ, डेरेदार झाड्याच्या पानाची सळसळीतले ते दोघे अशी गोंगाटविरहित फ्रेम दाहक विषय आपल्यापर्यंत शांतपणे आणून सोडते. यां सिनेमातल मर्म घ्यायचं असलं तरी काय?? उत्तर -"स्वीकार" आपल्या भावनांचा स्वीकार, समोरच्याच्या भावनांचा स्वीकार हॆ एक मूल्य आहे. आनंदला त्याचे आईवडील आहे आहे तसा स्वीकारतात त्यामुळे त्याच्या भावनांना सुरक्षा,प्रेम मिळते. बाळ्यालाही मग ती सुरक्षा मिळते. एक प्रेमाच "नातं" समाजाच्या नकळत सुरक्षित होतं.
  • Log in or register to post comments

तरल मनोवृत्तीच्या पब्लिक ने

धर्मराजमुटके
Mon, 02/23/2026 - 00:25 नवीन
तरल मनोवृत्तीच्या पब्लिक ने प्राईम व्हिडिओ वर नुकताच आलेला " ८ ए. एम. मेट्रो' हा चित्रपट बघावा अशी आवर्जून शिफारस करतो.
  • Log in or register to post comments

॔॓Queen of katwe

कपिलमुनी
Mon, 02/23/2026 - 16:39 नवीन
Image removed. हा चित्रपट आवर्जून बघा ! सत्यकथेवर आहे . यावर स्वतंत्र धागा काढायचा आहे.
  • Log in or register to post comments

काल आपला आवडता हीरो अमर

विजुभाऊ
Mon, 02/23/2026 - 17:03 नवीन
काल आपला आवडता हीरो अमर विश्वास अ‍ॅमॅझॉनवर पाहिली https://www.amazon.in/minitv/tp/234bac87-44a3-4f3a-a6b1-30c2debf8c4a सुशिंची स्टार हंटर ही कादंबरी वाचली होती. तीचे चित्राट स्वरूप पहाताना कसे वाटेल हा प्रश्न होता पण सिरीयल आवडली. कादंबरी वाचण्यातली उत्सुकता सिरीयल पहातानाही अनुभवली.
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Mon, 02/23/2026 - 18:04 नवीन
अमर विश्वास आणि बॅरिस्टर दिक्षीत या पात्रांना बराच वाव होता, त्या तुलनेत मोहिनी, गोल्डी या व्यक्तिरेखा पहिल्या सिझनमधे फारशा वेधक वाटल्या नाहीत. ही उणीव पुढे भरून निघेल, त्यामुळे या मालिकेचे आणखी बरेच 'सीझन्स' यावेत अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

In the Blink of an Eye हा

Bhakti
Sat, 02/28/2026 - 20:27 नवीन
In the Blink of an Eye हा चित्रपट मानवजातीच्या अस्तित्वाचा, भावनांचा आणि वारशाचा अत्यंत वेधक आणि तत्त्वचिंतनात्मक प्रवास दाखवतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन Andrew Stanton यांनी केले आहे, यापूर्वी Finding Nemo आणि WALL‑E सारखे भावनिक आणि विचार करायला लावणारे चित्रपट त्यांनी दिले आहेत. WALL-E हा बालपणीचा एक अविस्मरणीय अनुभव होता,विशेषतः तो Star Movies वर वारंवार लागायचा आणि एकाकीपणा, प्रेम आणि आशा यांची सुंदर कथा सांगायचा. त्याच भावनिक आणि तत्त्वज्ञानात्मक शैलीची झलक In the Blink of an Eye मध्येही दिसते. चित्रपटातील तीन काळात मानवाची कथा फिरत आहे.मानवजातीचा प्रवास या चित्रपटात मानवाच्या इतिहासातील तीन महत्त्वाचे टप्पे परस्पर गुंफलेले दाखवले आहेत भूतकाळ (४५,००० BC) Neanderthal आदिमानवाचा संघर्ष, अस्तित्वासाठीची झुंज आणि कुटुंबाची सुरुवात, कशा प्रकारे ते होमो सेपीयन्सशी भेटतात, सहकार्य सुरु होते. वर्तमानकाळ -एक वैज्ञानिक संशोधक, जो विश्वातील रहस्ये आणि मानवी अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत राहतात. भविष्यकाळ -मानव दुसऱ्या ग्रहावर वसाहत निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, जिथे अस्तित्व, वारसा आणि मानवी ओळख पुन्हा निर्माण होते. या तिन्ही कथांमध्ये एक समान धागा आहे. एकाकीपणातून कुटुंबाकडे, आणि कुटुंबातून मृत्यू व वारशाकडे जाणारा प्रवास. चित्रपट विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच मानवी भावनांचाही विकास दाखवतो. तंत्रज्ञान बदलते, काळ बदलतो, पण प्रेम, भीती, आशा आणि वारसा यांसारख्या मूलभूत भावना कायम राहतात.हा या चित्रपटाचा मुख्य संदेश आहे. OTT- Disney Jio Hotstar
  • Log in or register to post comments

ट्रेलर

Bhakti
Sat, 02/28/2026 - 20:30 नवीन
ट्रेलर https://youtu.be/1EKzEaKKoYU?si=56RFt872oI7dVnYB
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा