सध्या काय पाहतेय? ---२०२६
या रे या
stranger things च्या फ्यान लोकांनो
इकडे या
भावनांचे पाट वाहू द्या
stranger things ला भरलेल्या मनाने
गुड बाय करू या
शेवटचा भाग right side up अक्षरश: दोन तास मनःपटलावर अधिराज्य करतो.वेकना मरणार हे माहितीच होत . पण एल पण गायब होणार होत हे अनपेक्षित होत . सुपरनॅचरल मालिका असं गृहीत चालताना यात सायन्सचा वर्म होल हा कन्सेप्ट हि सिरीज सगळ्यांसाठी बघणीय होते.कारण ते भूत खेत जाम बोर करतात.
कोणाचं कौतुक करावं ???
सायकोकायनेटिक क्षमता असलेली इलेव्हन ,मैत्रीने घट्ट विणलेले माइक,लुकास, डस्टिन आणि विल,मॅक्स, धडाकेबाज नॅन्सीचा,स्टीव्ह ,हूपर,जोनाथन,रॉबिन जॉयसी,गोड गोडुली हॉली,डफर, बडबडी एरिका की हेन्री उर्फ वन उर्फ वेकना उर्फ खेकडा भजी(भारतीयांनी दिलेले नाव ) :) की पिसाळलेल्या कुत्र्यासारखे मागे लागणारे डेमोगोर्गनच यांचं करायचं.
२०१६ पासून १० वर्षात ५ सीझन आणि ४२ भागांत ही सगळी पात्र आपल्या बरोबरच वाढत होती.हृदयस्पर्शी मैत्रीचा अर्थ पुन्हा पुन्हा पटवून देत होती. ८० च्या दशकातील जुन्या आठवणी पॉप गाण्याने जाग्या होत होत्या https://en.wikipedia.org/wiki/Stranger_Things:_Music_from_the_Netflix_Original_Series ."Running Up That Hill (A Deal with God)" by Kate Bush हे गाणं आता माझी मोबाइल रिंगटोन आहे .
यावर इन्स्टावर थेअरी ,कॉमेडी,अशा रीलचा महापूर आला आहे .त्यात मॅक्स समोर गेट आलं तरी वेड्या सारख्या का बडबडत आहे हा प्रश्न असो :),वेकना भाऊने केलेला वेट लॉस,एल सारखी पॉवर आल्याचा विश्वास असो :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny PanditIn reply to सध्या या सिजनचे २ भाग पाहुन by मदनबाण
In reply to व्हाईट टायगर.. नेटफ्लिक्सवर by Bhakti
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]In reply to तुमच्या मागच्या धाग्यात असंका by मदनबाण
In reply to वेगळा आहे पिक्चर. आवडला का? by असंका
In reply to वेगळा आहे पिक्चर. आवडला का? by असंका
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1In reply to व्हय जी, आवडला. :) by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1In reply to stranger things पहिला खंड by कांदा लिंबू
In reply to रेग्युलर थिंग्स by हणमंतअण्णा शंक…
शेवटचा एपिसोड देखिल बेहद्द आवडला.
शेवटच्या एपिसोडचा शेवट रडवून गेला!काळ किती पळत राहतो,आपणही त्याच्याबरोबर पळले पाहिजे.
१९९०-९१ ला प्रथम सादर झालेले प्रशांत दळवी लिखित चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित "चारचौघी" नाटक २०२२ lरोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर आणि मुक्ता बर्वे या कलाकारांच्या साथीने २०२२ ला नाटक ३१ वर्षांनी पुनरुज्जीवित केले होते .मागील वर्षी या नाटकाचे अखेरचे प्रयोग पार पडले.प्रत्यक्ष नाटक पाहायचा योग्य आला नाही आज झी फाईव्ह OTT वर हे नाटक पाहिले.रोहिणी हट्टंगडी याचे संवाद नाही गर्जनाचं.. पितृसत्ताक संस्कृतीला, बंडखोर तरीही पुरुष द्वेष नाही, निर्णय घेतलास तर तो निभावणारी बाई हो ... पूर्ण नाटकभर या गर्जना ठसा पडतात, कानात गुंजत राहतात .रंगमंचावर नाटक पाहू शकले नाही याचे जरा वाईट वाटले.
स्त्रीने पितृसत्ताक पद्धतीने आखलेल्या कुंपणातच वागले पाहिजे. ती जरा जरी याहून वेगळी वागली तर ते अनैतिक वा चुकीचे समजले जाते. त्यांनी "चारचौघी" सारखेच वागले पाहिजे .अशावेळी नाटकातील चौघीचे निर्णय या समाजाला कसे पचतील? नाटकातील संवादानुसार ५० वर्षांनंतर कदाचित लागू होतील असे निर्णय आज घेतलं तर उठणाऱ्या वादळाला सामोरं आज जावं लागणारच.
आई सावित्रीबाई विवाहित पुरुषाशी लग्न न करता तीन मुलींना जन्म देत एकटी सांभाळते...(आजही अशी उदाहरणे फारच दुर्मिळ आहे)
तिच्या तिन्ही मुलींच्या आयुष्यात पितृसत्ताक चाकोरीमुळे वादळ आले आहे.
नाटकात अनेक प्रश्नाना वाचा फोडली आहे ...पुरुषांच्या अनैतिक संबंध समाज सहज पचवतो ?? मठ्ठ पुरुषाला समाज प्रश्न न विचारता त्याच्या बायकोला लढायला लावतो ??(लग्न टिकवायला द्रौपदी प्रमाणे किंवा मातृसत्ताक पद्धतीनुसार बहुपतित्व आज शक्य आहे ??
हे प्रश्न विद्या वैजयंती विंनी आआपापल्या आयुष्यातील घटनांद्वारे सादर करतात आपल्याला विचार करायला भाग पाडतात.
अशी काळाच्या पुढची नाटके आली तर यामुळे कुटुंबव्यवस्था धोक्यात येईल अशीही नकारात्मक घंटा समाजात वाजू लागतात.पण नाटकातील वैजयंती कुटुंब वाचवते पण स्वतःचे सत्व हरवते केवळ तडजोडीने ती आता जगणार हे एक आजच्या अनेक स्त्रियांचे प्रातिनैधिक उदाहरणही नाटकात आहे हे विसरता काम नये .
विद्या जेव्हा घटस्फोटाची केस लढताना ६- ६ महिने आई वडील दोघांनीही मुल का सांभाळू नये ? एकट्या बाईचीच जबाबदारी आहे का ? हा प्रश्न मांडते तेव्हा तिला एक उलट्या काळजाची आई ठरवलं जाते वडील मात्र इथे नाम निराळेच राहतात .खरंच बाईला तिचे आईपण निभवावे लागते पुरूषाला बापपणाची सक्ती का नाही...किती हास्ययास्पद आहे हे ..
विनीचा मी एकाचवेळी दोन्ही पुरुष का निवडू शकत नाही ? हा प्रश्न तर कुठूनच मेंदूत शिरत नाही यावरचे उत्तर तर लांबच !!
मग अशा प्रश्नासह बाईने करायचे काय ???
तर तिचे निर्णय तिला योग्य वाटतील ते ठामपणे घ्यायचे काळाच्या परिणामाच्या भीतीशिवाय ..हे नाटकाचे मर्म वाटते .
-भक्तीIn reply to चारचौघी नाटक by Bhakti
https://youtu.be/Ec08db2hP10?si=pm1zy1fecE3TnR-6कालपासून स्ट्रेंजर थिंगचा अजून एक एपिसोड येणार या फ्यॅन थेअरीला उधाण आल होत.हो अजून एक भाग येणार तो बिहाइंड द सीन डॉक्युमेंटरी येणार आहे.
one last time. watch the never-before-seen behind-the-scenes documentary on the making of Stranger Things 5. january 12th.In reply to Stranger Things मधला by Bhakti
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading BoysIn reply to मध्यरात्रीचे स्वातंत्र्य by अमरेंद्र बाहुबली
In reply to The Day of the Jackal by जुइ
In reply to मध्यरात्रीचे स्वातंत्र्य by अमरेंद्र बाहुबली
शेरलॉक होम्सचे तर करोडो चाहते आहेत.पण काय होईल जर त्याला एक बहिणही असेल तीही त्याच्यासारखीच तरबेज आणि धाडसी!
एनोला होम्स ही एक काल्पनिक कॅरेक्टर आहे, जी अमेरिकन लेखिका नॅन्सी स्प्रिंगर यांनी २००६ मध्ये सुरू केलेल्या "The Enola Holmes Mysteries" या पुस्तक मालिकेत निर्माण केली. या मालिकेत एनोला ही शेरलॉक आणि मायक्रॉफ्टची खूप लहान बहिण (२० वर्षांनी धाकटी) दाखवली आहे.
नेटफ्लिक्सवर खूप लोकप्रिय झालेल्या Enola Holmes १ आणि २ या चित्रपटांमध्ये (मिली बॉबी ब्राउन मुख्य भूमिकेत आहे.
एनोला हुशार, निर्भय आणि लढवय्या आहे! अॅक्शन आणि हृदयस्पर्शी असे हे चित्रपट आहेत.
स्ट्रेंजर थिंगमुळे मिली ब्राऊन आवडायला लागली आहे.तिचा डॅमसेल हाही फॅन्टसी चित्रपट पाहिला.In reply to एनोला होम्स १ आणि २ by Bhakti
In reply to श्रीगुरूजी सध्या लपून मिपा by अमरेंद्र बाहुबली
In reply to श्रीगुरूजी सध्या लपून मिपा by अमरेंद्र बाहुबली
In reply to यंग शेल्डन -Young Sheldon by Bhakti
In reply to +१०० by सोत्रि
In reply to यंग शेल्डन -Young Sheldon by Bhakti
In reply to पाहते लेकीबरोवर by जुइ
In reply to हो,आमचा तिसरा सीझन पाहणे सुरु by Bhakti
In reply to यंग शेल्डन -Young Sheldon by Bhakti
In reply to एवढे सगळे कसे बघू शकते ब्वा by चित्रगुप्त
In reply to एवढे सगळे कसे बघू शकते ब्वा by चित्रगुप्त
In reply to एवढे सगळे कसे बघू शकते ब्वा by चित्रगुप्त
In reply to ह्या आठवड्यात 'Better call by टर्मीनेटर
In reply to लालो ची एंट्री झाली का? :) by अमरेंद्र बाहुबली
In reply to लालो ची एंट्री झाली का? :) by अमरेंद्र बाहुबली
"लालो ची एंट्री झाली का? :)"लाँग विकेंडचा पुरेपूर उपयोग करत "Better call Saul" चे सगळे सहा सीझन्स बघून झाले. लालो ची एंट्री बरीच उशिरा म्हणजे चौथ्या सीझनच्या आठव्या एपिसोडमध्ये झाली एकदाची 😀 'लालो' हे खलनायकी पात्र भारीच आहे! मी हा आठवा एपिसोड दोन वेळा पाहिला असल्याने चांगलाच लक्षात राहिला, अर्थात तो लालो साठी नाही पण त्यात 'ह्युल'ला जेलमध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी जिमी आणि किम जे काही उपद्व्याप करतात ते पुन्हा पाहण्यासाठी पुन्हा पाहिला 😂 संपूर्ण सहा सीझन्स मधल्या त्रेसष्ट एपिसोड्स पैकी मला सगळ्यात जास्त आवडलेला (विनोदी) एपिसोड हाच आहे! बाकी सिरीजबद्दल बोलायचे तर साडेपाच सीझन्स पर्यंत खूपच मस्त जमून आली आहे पण पुढे मात्र भरकटल्यासारखी वाटली! शेवट तर अजिबात आवडला नाही, तिथे कथानकाने अक्षरशः 'माती' खाल्यासारखे वाटले. 'क्राईम नेव्हर पेज' वगैरे ठीक आहे, तेच तत्व पाळूनही ह्या सुंदर सिरीजचा शेवट कितीतरी चांगल्याप्रकारे करता आला असता अशी भावना मनात घर करून बसली आहे.
In reply to लालो ची एंट्री by टर्मीनेटर
In reply to मला मात्र शेवट आवडला! शेवटी by अमरेंद्र बाहुबली
In reply to 'हायझेनबर्ग कडे रसायनशास्त्राची उत्तम जाण by टर्मीनेटर
नार्कोज आणि नार्कोज: मेक्सिको पाहिलेल्या असल्यामुळे त्यातल्या मेडलिन आणि कॅली ड्रग कार्टेल्स पुढे आणि 'पाब्लो एस्कोबार' आणि 'मिगेल एंजल'काय नाव काढलंत राव. ह्या दोन्ही मालिका अतिशय उच्च दर्जाच्या आहेत.
In reply to 'हायझेनबर्ग कडे रसायनशास्त्राची उत्तम जाण by टर्मीनेटर
In reply to आवरण by कपिलमुनी
अनेकदा 'फील गुड मुव्ही' असं लिहुन सिनेमे शोधून पाहावे.नितांत सुंदर मनाचं तळ शांत होणारे काही सिनेमे हाती लागतात.
"प्राइड अँड प्रेज्युडिस" १९०० च्या शतकात इंग्लंडमधली प्रतिभावंत लोकप्रिय लेखिका जेन ऑस्टेनची सर्वात लोकप्रिय कादंबरी आहे.त्या काळात स्त्री लेखिका दुर्मिळच त्यामुळे तिच्या पुस्तकांवर "लेडी रायटर " असे लिहिले जात.तिने Sense and Sensibility ,Pride and Prejudice ,Mansfield Park ,Emma ,Northanger Abbey ,Persuasion अशा वेगळ्या धाटणीच्या अनेक कादंबरी लिहिल्या.पण सर्वात जास्त लोकप्रिय ठरली ती "प्राइड अँड प्रेज्युडिस"!!
पुस्तकांमधून, चित्रपटांमधून आणि टीव्ही रूपांतरांमधून पुन्हा पुन्हा सांगितली आणि नव्याने सादर केली गेली आहे.तिने अनेक नवीन कथानकांना प्रेरणा दिली आहे. तिच्या नायिका फेमिनीसम आणि प्रेम यांचे अद्भुत मिश्रण असत."प्राइड अँड प्रेज्युडिस" ही एका क्लासिक थीमची सुरुवात मानली जाते. ज्यात सुरुवातीला दोघे नायक नायिका एकमेकांचा तिरस्कार करतात असे वाटते, पण शेवटी ते चक्क एकमेकांच्या आकंठ प्रेमात पडलेले असतात.जो राईट २००५ मधील हा सिनेमा ऑस्करसाठी चार नामांकनाचा मानकरी ठरला.यासाठीचे श्रेय यातले कलाकार (पैकी नायिकालाही उत्कृष्ट नायिकेचे नामांकन होते),सिनेमाटोग्राफी,पोशाख यांना तर होतेच.परंतु याची मोठी शिलेदार होती पटकथालेखिका डेबोरा मोग्गाच यांनी पटकथेवर दोन वर्षांहून अधिक काळ घालवला.
१९व्या शतकाच्या सुरुवातीच्या इंग्लंडमध्ये घडते. नायिका एलिझाबेथ बेनेट,स्वतंत्र विचारांची आणि थोडी जिद्दी मुलगी आहे. तिला कुटुंबात ५ बहिणी आहेत. आईची एकच इच्छा असते की सर्व मुलींचे लग्न लवकरात लवकर श्रीमंत आणि चांगल्या घराण्यातील पुरुषांशी व्हावे.मिस्टर बिंगले आणि जेन बेनेट यांच्या प्रेमाची ,लग्नाची गोष्ट पुढे सरकत असतानाच त्यांचा मित्र मिस्टर डार्सी एक अतिशय श्रीमंत पण अहंकारी वाटणारा माणूस कथेचा एक प्रमुख पात्र होतो. एलिझाबेथ आणि डार्सीची पहिली भेट होते.पण डार्सीच्या अभिमानी 'वागणुकीमुळे' pride आणि एलिझाबेथच्या पूर्वग्रहांमुळे 'prejudice' त्यांच्यात गैरसमज निर्माण होतात.पुढे कथेत अनेक मजेशीर,काही गंभीर,हृदयस्पर्शी घटना होतात.शेवटी दोघेही आपल्या चुका ओळखतात, गैरसमज दूर होतात आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.
या कथेमध्ये तेव्हाच्या स्त्रियांनाही 'लग्न ' योग्य वयात व्हायला समस्या असत हे पाहून आश्चर्य वाटले.अनेक स्त्रियांच्या लग्नाची ही कथा अनेक सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधते. त्यातही नायिका एलिझाबेथ हिची हिम्मत ,स्पष्टवक्तेपणा ,सहजता तरीही वागण्यातली शिष्टचारता मंत्रमुग्ध करते . एलिझाबेथला समजले नसले तरी डार्सी हा तिच्यासाठी खूप खूप योग्य आहे हे चाणाक्ष प्रेक्षकांना नक्कीच संमजते.आणि आता तो कसा तिचा गैरसमज कसा कुठवर दूर करणार याची उत्सुकता असते.
"You must allow me to tell you how ardently I admire and love you" ते "You have bewitched me, body and soul" असा डार्सीचा झालेला प्रेमळ बदल फार रोमँटिक आहे.
लिझी शेवटी जेव्हा वडिलांना सांगते ,"I do love him. I love him very much. Indeed he has no improper pride. He is perfectly amiable. You do not know what he really is."
तेव्हा वडील आनंदून म्हणतात ,"I could not have parted with you, my Lizzy, to any one less worthy."
ते तिला मान्यता देतात आणि आनंदमिश्रित खूप खूप सुहास्य करतात.सिनेमा संपतो पण आपल्याही मुखावर सहज सुहास्य उमलते.
-भक्ती
In reply to "प्राइड अँड प्रेज्युडिस" by Bhakti
In reply to 'फील गुड' मुव्हीज बघायला आवडत असतील तर by टर्मीनेटर
In reply to ट्रेलर पाहिला ,आवडला. आता by Bhakti
In reply to घरच्या सगळ्यांनी एकत्र बसुन by टर्मीनेटर
In reply to मध्यंतरी नेटफ्लिक्सवर विजय by प्रचेतस
In reply to Oldboy चे भारतीय वर्जन! हा by अमरेंद्र बाहुबली
In reply to गार्गी छानच by स्वधर्म
In reply to गार्गी कुठे बघता येईल? by प्रचेतस
In reply to 'गार्गी' बघायची तुमची इच्छा by टर्मीनेटर
In reply to तुम्ही केलेल्या वर्णनानुसार by प्रचेतस
In reply to गार्गी कुठे बघता येईल? by प्रचेतस
In reply to मध्यंतरी नेटफ्लिक्सवर विजय by प्रचेतस
In reply to महाराजा मस्तच आहे! by टर्मीनेटर
In reply to 'फील गुड' मुव्हीज बघायला आवडत असतील तर by टर्मीनेटर
In reply to छान आहे, रियाने मस्तच काम by Bhakti
पण शेवट समजला नाही.तिला आवडणारा दाढीवाला तोच??शेवट अशा प्रकारे कल्पिता येऊ शकतो... प्रभेंदू हा तोच (म्हणजे जिवंतपणी तिच्या मनातला प्रियकर) असावा पण आधीच्या आई-वडिलां बरोबरच्या संभाषणात ती त्याला बंगलोरमध्ये भेटल्याचे म्हंटले होते, ते फोनवर संपर्कातही असतात. पण प्रभेन्दुला हे काहीच माहित नसल्याचे दाखवले आहे म्हणजे हा 'तो' नसावा. प्रभेंदूचा काका त्याला सल्ला देतो त्याप्रमाणे तो तिच्या घरच्यांना भेटायला जातो. मायाने आईला तिच्या मनातल्या प्रियकराचे जे वर्णन सांगितलेले असते ते योगायोगाने प्रभेन्दुला तंतोतंत लागू पडत असल्याने तो तिच्या आईला आपण तोच असल्याचे सांगत असावा. आणि (मेल्यानंतर) माया खरंच प्रभेन्दुच्या प्रेमात पडली असल्याने त्याच्या (तिच्या आईला दिलेल्या खोट्या) कबुलीने तिला मुक्ती मिळाल्याचे त्या हवेच्या प्रतीकात्मक स्पर्शाने दाखवले असावे. मला हा शेवट लॉजिकल वाटतो आहे!
पण संथच वाटला,सिनेमा खूप पळवलाहा हा हा... 😀 संथ असणे हे मल्याळम चित्रपटांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तरी हा त्यातल्यात्यात सुपरफास्ट आहे म्हणू शकतो, नाहीतर संथपणाचे एकसे एक रेकॉर्ड्स त्यांनी नोंदवून झाले आहेत. प्लेबॅक स्पीड १.५ X केल्याशिवाय ते बघणे माझ्यासाठी अशक्य ठरते.
In reply to "प्राइड अँड प्रेज्युडिस" by Bhakti
प्रेमाला केवळ भावना म्हणून सिनेमांत सादर करणे खूप दुर्मिळ आहे. त्याच्याभोवती संघर्ष, प्रतिशोध,एकाकी लढा असे धागे कथा म्हणून गुंतलेले असतात.
पण अशा कथासूत्रांत "साबर बोंड" (कॅक्टस पिअर्स) हा प्रेमाचा सिनेमा अडकत नाही.गोष्ट जगात सहज मान्य नसणाऱ्या "समलैंगिक तरुणांची"!पण सिनेमा इतक्या सहजतेने हॆ समलैंगिक नातं आपल्यापर्यंत पोहचवतो की वाटत "का बर प्रेम देणाऱ्या यां नात्याला बोल लावतो,यांच्याही भावना जाणून घेत नाही.लग्नासाठी ढकलून कोणत्याही मुलीचे/मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याऐवजी, अशा लैंगिकता पुढे येऊन स्वीकार करणाऱ्यांना समाज दबावाशिवाय सामावून घेत नाही?
वडिलांच्या मृत्यूनंतर आनंद अंतिम क्रियाकर्मसाठी गावाकडे जातो. तिथे त्याचे वय उलटल्यामुळे लग्नाविषयीं गावाकडचे त्याला सतत विचारत राहतात. तेव्हा आनंदला त्याचा लहानपणीचा सवंगगडी बाळ्या भेटतो. बाळ्याही याच लैंगिक ओळखीचा आहे. ग्रामीण भागातल्या तरीही मधेच शुष्क बाभाळी, एवलस तळ, डेरेदार झाड्याच्या पानाची सळसळीतले ते दोघे अशी गोंगाटविरहित फ्रेम दाहक विषय आपल्यापर्यंत शांतपणे आणून सोडते.
यां सिनेमातल मर्म घ्यायचं असलं तरी काय??
उत्तर -"स्वीकार"
आपल्या भावनांचा स्वीकार, समोरच्याच्या भावनांचा स्वीकार हॆ एक मूल्य आहे.
आनंदला त्याचे आईवडील आहे आहे तसा स्वीकारतात त्यामुळे त्याच्या भावनांना सुरक्षा,प्रेम मिळते. बाळ्यालाही मग ती सुरक्षा मिळते. एक प्रेमाच "नातं" समाजाच्या नकळत सुरक्षित होतं.
हा चित्रपट आवर्जून बघा ! सत्यकथेवर आहे .
यावर स्वतंत्र धागा काढायचा आहे. In reply to काल आपला आवडता हीरो अमर by विजुभाऊ
In reply to In the Blink of an Eye हा by Bhakti
In reply to भक्तीचं वाचन लेखन आकलन संपर्क by कंजूस
सध्या या सिजनचे २ भाग पाहुन