या रे या
stranger things च्या फ्यान लोकांनो
इकडे या
भावनांचे पाट वाहू द्या
stranger things ला भरलेल्या मनाने
गुड बाय करू या
शेवटचा भाग right side up अक्षरश: दोन तास मनःपटलावर अधिराज्य करतो.वेकना मरणार हे माहितीच होत . पण एल पण गायब होणार होत हे अनपेक्षित होत . सुपरनॅचरल मालिका असं गृहीत चालताना यात सायन्सचा वर्म होल हा कन्सेप्ट हि सिरीज सगळ्यांसाठी बघणीय होते.कारण ते भूत खेत जाम बोर करतात.
कोणाचं कौतुक करावं ???
सायकोकायनेटिक क्षमता असलेली इलेव्हन ,मैत्रीने घट्ट विणलेले माइक,लुकास, डस्टिन आणि विल,मॅक्स, धडाकेबाज नॅन्सीचा,स्टीव्ह ,हूपर,जोनाथन,रॉबिन जॉयसी,गोड गोडुली हॉली,डफर, बडबडी एरिका की हेन्री उर्फ वन उर्फ वेकना उर्फ खेकडा भजी(भारतीयांनी दिलेले नाव ) :) की पिसाळलेल्या कुत्र्यासारखे मागे लागणारे डेमोगोर्गनच यांचं करायचं.
२०१६ पासून १० वर्षात ५ सीझन आणि ४२ भागांत ही सगळी पात्र आपल्या बरोबरच वाढत होती.हृदयस्पर्शी मैत्रीचा अर्थ पुन्हा पुन्हा पटवून देत होती. ८० च्या दशकातील जुन्या आठवणी पॉप गाण्याने जाग्या होत होत्या https://en.wikipedia.org/wiki/Stranger_Things:_Music_from_the_Netflix_O… ."Running Up That Hill (A Deal with God)" by Kate Bush हे गाणं आता माझी मोबाइल रिंगटोन आहे .
यावर इन्स्टावर थेअरी ,कॉमेडी,अशा रीलचा महापूर आला आहे .त्यात मॅक्स समोर गेट आलं तरी वेड्या सारख्या का बडबडत आहे हा प्रश्न असो :),वेकना भाऊने केलेला वेट लॉस,एल सारखी पॉवर आल्याचा विश्वास असो :)
वर्गीकरण
वाचने
9268
प्रतिक्रिया
105
मिसळपाव
प्रतिक्रिया
"बौद्ध मूर्तीशास्त्र"
धुरंधर नेटफ्लिक्सवर आलाय, लाभ
"साबर बोंड" (कॅक्टस पिअर्स)
तरल मनोवृत्तीच्या पब्लिक ने
॔॓Queen of katwe
काल आपला आवडता हीरो अमर
+१
In reply to काल आपला आवडता हीरो अमर by विजुभाऊ
In the Blink of an Eye हा
ट्रेलर
In reply to In the Blink of an Eye हा by Bhakti
नेफिवर His & Hers ही सिरीज
भक्तीचं वाचन लेखन आकलन संपर्क
कौतुकासाठी कंकाका धन्यवाद !
In reply to भक्तीचं वाचन लेखन आकलन संपर्क by कंजूस
गांधी टॉक्स आणि उत्तर
हे काय नवीन..झी वरची मराठी…
https://youtu.be…
https://youtu.be/RjphBAgLwKo
मनपिशाच्च हा झीरो बजेट सिनेमा आहे. राही अनील बर्वेंचा
अवघ्या ३३,०००/- रुपयांत तयार झालेला आहे.
बघणेबल आहे. यु ट्यूब वर सतत जहिराती येतात त्यामुळे विरस होतोय.
ब्रेव्ह
In reply to https://youtu.be… by विजुभाऊ
जाहिराती टाळण्यासाठी ब्रेव्ह बाउसर वरून Youtube वापरा.
- (ब्रेव्ह) सोकाजी
खुप आधीच पाहिला आहे. बरा आहे…
In reply to https://youtu.be… by विजुभाऊ
खुप आधीच पाहिला आहे. बरा आहे. एक वेगळा प्रयोग म्हणून पहिला.शेवट आवडला 👍मनपिशाच्च अर्थ आणि गोष्ट उलगडाते.
ओझार्कचा चौथा आणि फायनल सीजन…
ओझार्कचा चौथा आणि फायनल सीजन बघतोय. एकदम मॅच्युअर सिरीज आहे. संथ वाटते काहीवेळा पण अवश्य बघा.
सिरीज भारी आहे. पहिला सीजन…
In reply to ओझार्कचा चौथा आणि फायनल सीजन… by प्रचेतस
सिरीज भारी आहे. पहिला सीजन पाहून संपला.
आजच सगळी सिरीज पाहून संपली…
In reply to सिरीज भारी आहे. पहिला सीजन… by Bhakti
आजच सगळी सिरीज पाहून संपली. चौथा सीजन वेगवान आहे. बर्ड दाम्पत्याचे होणारे अध:पतन उत्तम चित्रित केले आहे.
बर्ड दाम्पत्याचे होणारे अध…
In reply to आजच सगळी सिरीज पाहून संपली… by प्रचेतस
बर्ड दाम्पत्याचे होणारे अध:पतन
ओह मला वाटलं चमत्कार होऊन ते सुटणार!
Marty, windey, rut कमाल काम केले आहे
शेवटपर्यंत बघा :)
In reply to बर्ड दाम्पत्याचे होणारे अध… by Bhakti
शेवटपर्यंत बघा :)
दुसरा सीझन संपला .तिसरा सुरु…
In reply to आजच सगळी सिरीज पाहून संपली… by प्रचेतस
दुसरा सीझन संपला .तिसरा सुरु आहे.वेंडी ही खरोखर वेडी झालिये 😐️
ओझार्क उत्तम - आधीच पाहिली आहे
In reply to ओझार्कचा चौथा आणि फायनल सीजन… by प्रचेतस
आपल्याकडे नायक/ नायिका सर्व वेळी, उदात्तच दाखवण्याची पध्दत आहे. अनेक पश्चिमेच्या मालिकांत मात्र माणसांत गुणाबरोबर अवगुणही असतात, त्यांचेही स्खलन होते असे दाखवले जाते. आपल्याकडे असली परिपक्वता कधी येणार कोण जाणे...
कॅप्चर - बीबीसी आय प्लेअर वर
सध्या कॅप्चर पाहतोय - बीबीसी आय प्लेअर वर. तिसरा ससिझन.
सीसी टीव्ही हॅक झाले, तर सुरक्षा एजन्सीजवर कसा परिणाम होईल असे काहीसे कथानक आहे. उत्कंठावर्धक आहे.
डार्केस्ट...
कुणाला अतिशय डार्क सिरीज बघायच्या असतील तर “Monster: The Ed Gein Story”, “Dahmer” आणि “Mindhunter” सुचवेन. डोकं सुन्न होतं.
ozark ..मी मारधाड ,क्रिमिनल…
ozark ..
मी मारधाड ,क्रिमिनल,हॉरर सिरीज अजिबात पाहत नाही .पण इथे सुचवलेली ओझर्क सिरीज अक्षरश: बिंज वॉच केली .कारण मार्टी आणि त्याचे त्याच्या कुटूंबावर असलेले प्रेम !!
खतरनाक अभिनय केला आहे.कायम शांत ,तरीही नशिबाच्या फेऱ्याने गुन्हेगारांच्या विळख्यात सापडतो.पण कुटुंबाला वाचवण्यासाठी एकामागून एक गुन्हे ते करत राहतात .
चार गुणिले दहा अधिक चार =एकूण ४४ भागांत अनेक महत्वाच्या व्यक्तिरेखांचा खून होतो .पण त्या प्रत्येक व्यक्तिरेखांची मानसिक जडण घडण पूर्णपणे आपल्या पर्यंत आधीच पोहचल्याने मेलेला व्यक्ती गुन्हेगार आहे तरीही त्याच्या जाण्याने चक्क वाईट वाटते.
कथा खूपच वाढत जाते .काही लूपहोलही आहेत पण वेडी वेन्डीबाईंमुळे ती गोष्ट आणखीनच वाढली आहे .रूथ
मला सगळ्यात जास्त आवडली होती.
From"
'From' बघतय का कोणी ? चौथा सीजन आलाय आत्ता. डोक्याला शॉट आहे लई 🫡
prime वर बघता येईल.
सध्या काय पाहताय?सध्या मी…
सध्या काय पाहताय?
सध्या मी लोकशाहीची होणारी हत्या पाहतोय. :)
खिक्क! (ह. घ्या. हा.)
सध्या येडपट गोष्टी (stranger things) इंग्रजीत पाहायला सुरुवात केली आहे, चक्क समजतेय, पण वेळ खूप लागतोय कारण सबटायटल वरून नजर उचलली जात नाहीये. त्या नंतर नवीन काही पाहेन म्हणतो!
विहिरी हा मराठी सिनेमा अर्धा राहिलाय!
तुर्की येथील ऐतिहासिक…
तुर्की येथील ऐतिहासिक स्थळांशी निगडित वेब सीरीज
माझ्यासारख्या इतिहासाची आवड असणाऱ्या सामान्य मुलीच्या बकेट लिस्टमध्ये इराणच्या ऐतिहासिक आणि आकर्षक स्थळांनंतर तुर्कीतील इस्तांबूल या शहराचे नाव आवर्जून येते. प्रत्यक्षात तिथे जाण्याची संधी कधी मिळेल याची शाश्वती नसली, तरी आजच्या डिजिटल युगात मनाने जगभर भटकण्याची सुविधा आपल्याला मिळाली आहे. अशाच मनस्वी प्रवासात मला तुर्कीच्या इतिहास, पुरातत्त्व आणि संस्कृतीशी संबंधित दोन उत्कृष्ट नेटफ्लिक्स वेब सीरीज पाहायला मिळाल्या. एक म्हणजे रहस्य, अध्यात्म आणि कल्पनारम्यतेचा संगम असलेली द गिफ्ट (Atiye) आणि दुसरी म्हणजे इतिहासाला जिवंत करणारी राईज ऑफ एम्पायर्स: #ऑटोमन
द गिफ्ट (#Atiye) ही तुर्कीतील जगप्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ गोबेकली टेपेच्या पार्श्वभूमीवर आधारित फँटसी-मिस्ट्री मालिका आहे. इस्तांबूलमध्ये राहणारी आतीये नावाची चित्रकार मुलगी तिच्या आयुष्यात अचानक समोर आलेल्या एका गूढ चिन्हामुळे प्राचीन इतिहास, स्वतःचा भूतकाळ आणि विश्वाच्या रहस्यमय शक्तींशी जोडली जाते. Şengül Boybaş यांच्या Dünyanın Uyanışı या कादंबरीवर आधारित असलेल्या या मालिकेत रहस्य, आध्यात्मिकता, विज्ञान आणि मानवी भावविश्व यांचे अनोखे मिश्रण पाहायला मिळते. तीन सीझन्स आणि चोवीस भागांमध्ये उलगडणारी ही कथा केवळ मनोरंजन करत नाही, तर गोबेकली टेपेसारख्या प्राचीन स्थळाविषयी कुतूहलही निर्माण करते. प्राचीन संस्कृतींचे संकेत, प्रतीके आणि मानवाच्या अस्तित्वाविषयीचे प्रश्न यांना आधुनिक कथानकाशी जोडण्याचा या मालिकेचा प्रयत्न प्रभावी वाटतो.
दुसरीकडे राईज ऑफ एम्पायर्स: #ऑटोमन ही मालिका इतिहासप्रेमींसाठी पर्वणीच आहे. डॉक्युमेंट्री आणि नाट्यमय पुनर्निर्मिती यांचा सुरेख संगम असलेल्या या मालिकेत ऑटोमन साम्राज्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक असलेल्या १४५३ मधील कॉन्स्टँटिनोपलच्या विजयाची कथा मांडली आहे. सुलतान मेहमेद दुसरा याने बायझंटाईन साम्राज्याची राजधानी जिंकण्यासाठी केलेली तयारी, विशाल तोफांचा वापर, नौकादलाला जमिनीवरून नेण्यासारख्या अभिनव लष्करी युक्त्या आणि निर्णायक युद्धांचे चित्रण अत्यंत प्रभावीपणे करण्यात आले आहे. दुसऱ्या सीझनमध्ये मेहमेद आणि व्लाद द इम्पेलर यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. इतिहासतज्ज्ञांच्या माहितीपूर्ण मुलाखती आणि नाट्यमय दृश्यांमुळे ही मालिका केवळ माहितीपर न राहता अत्यंत रंजकही बनते.
ऑटोमन साम्राज्याची स्थापना उस्मान प्रथम याने इ.स. १२९९ मध्ये केली. पुढे मेहमेद दुसऱ्याने १४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपल जिंकून इतिहासात नवे पर्व सुरू केले. सुलतान सुलेमान द मॅग्निफिसंटच्या काळात हे साम्राज्य सर्वाधिक विस्तारले आणि अनेक शतकांपर्यंत युरोप, आशिया व आफ्रिकेच्या विस्तीर्ण प्रदेशांवर त्याचे वर्चस्व राहिले. अखेरीस १९२२ मध्ये ऑटोमन साम्राज्याचा अस्त झाला आणि आधुनिक तुर्कस्तानाचा उदय झाला.
या दोन्ही मालिका तुर्कीच्या समृद्ध वारशाचे दोन वेगळे पैलू दाखवतात. 'द गिफ्ट' प्राचीन पुरातत्त्व, गूढता आणि आध्यात्मिकतेच्या माध्यमातून कल्पनाशक्तीला चालना देते, तर 'राईज ऑफ एम्पायर्स: ऑटोमन' इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांना जिवंत स्वरूपात आपल्या समोर उभे करते. इस्तांबूल आणि तुर्कीची भटकंती प्रत्यक्षात शक्य नसली तरी या मालिका पाहताना मन मात्र त्या भूमीत सहज पोहोचते. त्यामुळे माझ्या बकेट लिस्टमध्ये इस्तांबूलसोबत या दोन्ही वेब सीरीजनाही विशेष स्थान आहे.
पोलडार्क, ऑल क्रिचर्स ग्रेट ॲन्ड स्मॉल, द इन्डियन डॉक्टर
अलीकडेच पोलडार्क, ऑल क्रीचर्स ग्रेट ॲन्ड स्मॉल, द इन्डियन डॉक्टर या तिन्ही सिरीज बघितल्या! केवळ अप्रतिम!
सध्या यूट्यूब वर हे पाहतोय
बीबीसी वर
हॅपी व्हॅली पाहिली. सर्व सिझन्स चांगले आहेत.
सध्या द बॉईज बघत आहे.
सध्या द बॉईज बघत आहे.
खुप दिवसांनी एक चांगला sci…
खुप दिवसांनी एक चांगला sci fi सिनेमा पाहिला.
Andy Weir च्या प्रसिद्ध sci-fi पुस्तक "Project Hail Mary वर आधारित Project Hail Mary सिनेमा पाहिला
पृथ्वीवर एक मोठी समस्या येते Astrophage नावाचे एक सूक्ष्म जीव सूर्य आणि इतर ताऱ्यांची ऊर्जा खात आहे. यामुळे सूर्य मंद होत चालला आहे आणि पृथ्वीवर बर्फाचे युग येऊ शकते, ज्यामुळे मानवजातीचा नाश होईल.
शाळेत विज्ञान शिकवणारा एक साधा शिक्षक Ryland ग्रेस (PhD )याला ही समस्या सोडवण्यासाठी अंतराळात एक “Hail Mary” मिशन (अंतिम जोखमीची शेवटची चाल) पाठवले जाते.
तो एकटा अंतराळात जागा होतो, त्याला स्मृती हरवलेल्या असतात. हळूहळू त्याला आपली आठवण येते आणि तो समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो.
तिथे त्याला alien जीवन Rocky नावाचा अतिशय भारी एलीयन भेटतो. तोही आपला ग्रह वाचवण्यासाठी निघाला आहे.पहिल्या संपर्क,भाषा संवाद, interstellar travel इत्यादी त्यांच्यातली गंम्मत मस्त फूलवली आहे.
नक्की पाहावा असा सिनेमा आहे.