Skip to main content
लेखक कांदा लिंबू यांनी मंगळवार, 01/09/2026 08:30 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मिपाखरांनो 🙏 

१४ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे त्याचबरोबर मिसळपावचा वर्धापनदिनसुदधा आहे! गणेशोत्सव व मिसळपाव वर्धापन दिन शुभेच्छा!

पावसाच्या बाबतीत जुलै ऑगस्ट महिने किमान मराठवाडा व विदर्भात निराशा जनक ठरले आहेत. सप्टेंबर महिन्यात पावसाची तूट काही प्रमाणात तरी भरून निघेल अशी अपेक्षा आहेत. देशभरात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून सप्टेंबरमध्ये पाऊस सरासरीतरी गाठेल का हे पहावे लागेल. 

महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची व राज्य सरकारची त्यावरची भूमिका काय राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

GST Council ची १२ सप्टेंबरची बैठक महत्त्वाची आहे. GST दर आणि इतर करासंबंधी विषयांवर काही निर्णय होण्याची शक्यता आहे.

क्रिकेटप्रेमी मिपाखरांसाठीही सप्टेंबरमध्ये भरपूर आशियाई प्रसाद आहे!

मिपाकरांनी महत्त्वाच्या बातम्या, दुवे, निरीक्षणे आणि मतमतांतरे इथे नोंदवावीत.

गणपती बाप्पा मोरया! 🙏

मिसळपाव वाढदिवस शुभेच्छा! 🥳


वाचने 10587
प्रतिक्रिया 392

प्रतिक्रिया

https://youtube.com/shorts/818BWMD4Igw?si=J2aQOtKA4dAVy86A

 

असंबद्ध बरळण्याची परमावधी. ऐकून भरपूर हसाल.

 

२०१३ मध्ये अर्णव गोस्वामीशी बोलताना जितके असंबद्ध बरळला होता, त्यापेक्षा जास्त असंबद्ध २०२६ मध्ये बोलतोय. धन्य आहे. १३ वर्षांनंतर काडीमात्र सुधारणा नाही. 


In reply to by श्रीगुरुजी

तो यडपट असल्याचे सर्टिफिकेट तुम्हीच तयार करून जगाला दाखवले आहे ना ? मग काय बोलणे गुरुजी ? आता, खाद्यतेल आयात बिल अन् आशीर्वाद का दिया विषयावर बोलणे अगत्याचे आहे आपले. 

तिसऱ्याचे वेड पांघरून आपण पेडगावला जाण्याचा गनिमी कावा आता जुना झाला हं गुरुजी. तुम्ही आशीर्वाद का दिया विषयाला सोयीस्कर बगल देऊ नका बुवा

(धनुर्धर एकाग्रचित्त सव्यसाची) खोंडे.


आदरणीय पंप्र नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

 

दिपोत्सव,तुला,रिकाॅर्ड ब्रेक लाडू,केक इ. कार्यक्रम  सर्वच सत्ताधारी,असत्ताधार  नेत्यांचे भक्त करतात. यात नवल वाटण्याचे कारण  नाही. 

 

बहेनजी मुख्यमंत्री असताना त्यांचा वाढदिवोत्सव बघीतला आहे.

 

मामाजींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या भाच्यांनी सैफैई मधे काय रंगारंग कार्यक्रम केले ते ही आठवावे लागेल. 

 

बालदिन,शिक्षकदिन असेही कार्यक्रम राबवून जन्तेला वेठीस धरले म्हणावे का?

 

हिंन्दू हृदयसम्राट, अगदी स्थानिक पातळीवर नगरसेवक, आमदार, खासदार यांचेही वाढदिवोत्सव होतातच ना?

हे असेच चालू रहाणार आणी भक्त अभक्तांचे रणक्रदंनही.......

 

कृबु ला तत्सम प्रश्न विचारला असताना अनेक मान्यवर  नेत्यांचे वाढदिवोत्सव आजही(पोस्टह्युमस,का काय ते)देश पातळीवर मनवले जातात.  आता ते आपल्यात नाहीत  म्हणून फारशी चर्चा होत नसावी. किंवा विकांताला जोडून सुट्टी आल्यावर बाहेरगावी गेल्याने वेळ मिळत नसावा.

 

एक झाड आई साठी आशी योजना आहे. कुणीही भाग घेवू शकतो. मी लावले आहे. 

 

तसेही मी पर्यावरण प्रेमी असल्याने आठही पिढ्यांसाठी झाडे लावून झाली आहेत. 

 

यावर एक जिल्बी सुद्धा पाडली आहे.

ना मैं मोमन विच मसीतां, ना मैं विच कुफ़र दीआं रीतां
ना मैं पाकां विच पलीतां, ना मैं मूसा ना फरऔन

बुल्ल्हा की जाणा मैं कौण

 

-बुल्ले शा का पंखा 


बहेनजी मुख्यमंत्री असताना त्यांचा वाढदिवोत्सव बघीतला आहे. 

असेल, कोणाचेच वाढदिवस साजरे करू नका, असा आदेश देऊन त्यांनी स्वतःचा साजरा करून घेतला होता का वाढदिवस ? उत्तर नाही असे आहे. 

मामाजींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या भाच्यांनी सैफैई मधे काय रंगारंग कार्यक्रम केले ते ही आठवावे लागेल. 

नेत्यांनी वाढदिवसाला उगाच मोठे कार्यक्रम करू नये अशी विनंती करतो वगैरे पूर्ण देशाला आवाहन करून नंतर त्यांनी रंगारंग कार्यक्रम उधळला होता का ?

बालदिन,शिक्षकदिन असेही कार्यक्रम राबवून जन्तेला वेठीस धरले म्हणावे का? 

भारताला कोणी एक शिक्षक असा नाही तर असंख्य गुरु आहेत म्हणून तुम्ही कोणा एकाचा वाढदिवस शिक्षकदिन/ बालक दिवस म्हणून साजरा करू नका असे आवाहन करून स्वतःचे वाढदिवस कोणी साजरे करून घेताना गप बसले आहेत का ?

 हिंन्दू हृदयसम्राट, अगदी स्थानिक पातळीवर नगरसेवक, आमदार, खासदार यांचेही वाढदिवोत्सव होतातच ना? 

ह्यांची तुलना मोदींनी केलेल्या राष्ट्रीय आवाहनाशी करणे म्हणजे उगाच मुद्दा लढवायचा म्हणून लढवता आहात का कर्नल साहेब ? 

बाकी, तुम्ही आम्ही सगळेच झाडे लावू झाडे जगवूच हो, प्रश्न सर्वोच्च कार्यकारी पदी बसलेल्या व्यक्तीच्या कथनी आणि करनी मधल्या तफावतीचा आहे. 

तुम्ही कर्नल काका म्हणूनच चांगले आहे काकासाहेब तोरसेकर म्हणून नाही इतकेच आपुलकीने सांगतो. 😂😂


In reply to by वृषभ खोंडे

तुम्ही कर्नल काका म्हणूनच चांगले आहे काकासाहेब तोरसेकर म्हणून नाही इतकेच आपुलकीने सांगतो. 😂

😂

 

प्रतिसाद तुम्हाला पटला नाही म्हणून  मला काकासाहेब तोरसेकर म्हणून व्यक्तीगत पातळीवर उतरून नका ही नम्र विनंती.

 

जर माझे मत पटत नसेल तर पास म्हणा उगाच वडाची साल पिंपळाला लावू नका.

 

मला प्रतिवाद करायचा नाही. 


In reply to by वृषभ खोंडे

फक्त मुद्द्याला समांतर उदाहरणे दिली तर चर्चेला खास मजा येईल इतके सुचवून मी पण खाली बसतो. 

 

मुद्दा - सर्वोच्च कार्यकारी पदी बसलेल्या व्यक्तीच्या कथनी आणि करनी मधल्या तफावतीचा आहे.

दुसरे म्हणजे अशा सार्वजनिक opulences वर बोलताना त्यांनी असे केले मग ह्यांनी काय घोडे मारले म्हणणे ग्राह्य धरले जाऊ शकत नाही कारण त्यांनी ते केले म्हणून ह्यांनी ते करू नये ह्याच अपेक्षेने निवडून दिलेले असते. लोकशाहीत निवडणूक घेऊन सरकार निवडण्याचा पूर्ण डोलारा हा "पूर्वसुरींपेक्षा येते सरकार भारी असेल" ह्या आशावादावर टिकलेले असते त्यामुळे त्यांनी केलेल्या चुका आम्हाला करू द्या ही मागणी/ तर्क/ वागणे चुकीचे असेल इतकेच म्हणतो. 

अमुकतमुक जुन्या पंतप्रधानाने हे केले म्हणून आता मोदींच्या नावाने ४५,००० लिटर तेल जाळू द्या हा प्रतिवाद लॉजिकल किंवा लोकशाहीला धरून खचितच नसेल असे वाटते. 

बघा पटले तर नाहीतर तुमचा आदर आहेच.

 

(खेळीमेळीतला खोडकर) खोंडे


बरोबर १ वर्षांपूर्वी, मोदी पंतप्रधानपद सोडून राजकारणातून निवृत्ती स्वीकारणार या आशेवर पाण्यात देव ठेवून बसलेले, आज अत्यंत विफलावस्थेत आहेत. 


In reply to by श्रीगुरुजी

कितीही लागट, विषय बाह्य शेरेबाजी केलीत तरी मी हलायचा नाही मुद्द्यावरून. 

मुद्दा अतिशय सुलभ आहे. 

मोदींनी खाद्यतेल वाचवणे राष्ट्रभक्ती असल्याचे सांगितले होते.

 ४५,००० लिटर तेल एकट्या उज्जैन मध्ये त्यांच्या वाढदिवसाला जळले 

आता ते तेल खाद्यतेल होते की नाही हे उत्तर पहिले लागेल बघा. 

बाकी तुम्ही अंदाजपंचे जे काही शेलकी वक्तव्ये करणार ती करत रहा. कारण कुठल्याही दिशेने उडालात तरी मी जागेवर आणेल. 

 

(जायरोस्कोप) खोंडे 😂😂


लाख काय, कोटी दिवे लावले तरी काय हरकत नाही. पण बातम्यांनुसार हा कार्यक्रम सरकारी आहे, म्हणजे पैसा आणि संसाधने लोकांची आहेत.

मोदी स्वतः लोकांना गरज नसताना परदेशात प्रवास करू नका म्हणून आवाहन करत आहेत, आणि त्यांच्याच पक्षाचं सरकार अशी उधळपट्टी  करतय.


In reply to by रात्रीचे चांदणे

हा दुसरा महत्वाचा मुद्दा. हे असे तेल वाटप कुठल्या प्रोटोकॉल अंतर्गत कलेक्टरला दिले गेले ? (मग ते खाद्यतेल असो व नसो)


१७ सप्टेंबर या दिवशी आपल्या ७५ व्या वाढदिवशी मोदी पदमुक्त होणार या आशेवर अनेक जण होते. परंतु त्यांचा दिवास्वप्नभंग झाला. 

 

१९ डिसेंबर २०२५ या दिवशी मोदींना पद सोडावे लागेल व त्यांच्या स्थानी एक मराठी नेता येईल असे पृथ्वीराजबाबा चव्हाणांनी भाकीत केले होते. परंतु त्यांच्या पाळीव शुकाने निवडलेल्या चिठ्ठीतील भाकीत प्रत्यक्षात आले नाही.

 

मे २०२६ मध्ये जागतिक ख्यातीच्या एका महान विचारवंताने भाकीत केले आहे की १ वर्षात म्हणजे मे २०२७ पर्यंत मोदींना पदमुक्त व्हावे लागेल.‌

 

या भाकितावर कृपया आपले मत सभ्य शब्दात जास्तीत जास्त १०० शब्दांच्या मर्यादेत व्यक्त करावे. 


In reply to by श्रीगुरुजी

महाराष्ट्राचे मनमोहन सिंह म्हणून ख्याती प्राप्त झालेले पृथ्वीराज चव्हाण काय बोलतात अन् काय भविष्य कथन करतात त्याने मोदींना किंवा सत्ताधारी मंडळींना काहीच फरक पडत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ सत्य आहे. 

तरीही जुने काहीतरी खोदून ऐरणीवर असलेला मुद्दा चर्चेतून बाजूला करविण्याचा आपला प्रयत्न कितीदा केला तरी लक्षात येतो आहे असे नम्रपणे नमूद करू इच्छितो. 

(ह्यातील एकूण एक शब्द संसदीय भाषा मर्यादेतील असून कुठेही असंसदीय शब्दाचा प्रयोग केलेला नाही ह्याची संबंधित सभासद आणि प्रशासनाने नोंद घ्यावी म्हणून हा तळटीप प्रपंच)

 

- (संसदीय भाषा मेरू) खोंडे


ह्या असल्या भविष्यवाणी असणारे शॉर्ट व्हिडिओ यूट्यूब वर पैशाला पासरी पडलेले आहेत. अन् आम्ही पडलो शिक्के बसलेले बुद्धिवादी, आम्हीच ह्याला सिरीयसली घेत नाही तर मोदीजी घेतील अशी सुतराम शक्यता नाही. त्यामुळे वरील पृथ्वीराज चव्हाण, अजून कुठले कोण ते जागतिक ख्यातीचे विचारवंत ह्यांनी जी काही भविष्यवाणी केली आहे तिचे करमणूक मूल्य सुद्धा शून्य आहे. 

त्यामुळे आपण सगळ्यांनी मूळ मुद्द्यावर फोकस केल्यास "चालू घडामोडी" वर सकस चर्चा होईल असे वाटते.

(मुद्देवीर) खोंडे


काल आदरणीय श्री. मोदीजींच्या वयास ७६ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने भाजपने केलेल्या आवाहनानुसार मी प्रज्वलित केलेले दीप अजूनही प्रज्वलित आहेत. त्यात टाकण्यासाठी सरकारने इतके तेल दिलंय की त्यावर हे दीप पुढील वाढदिवसापर्यंत प्रज्वलित राहतील.

 


In reply to by श्रीगुरुजी

सरकारने आपणाला तेलाचा पुरवठा केला उत्तम वर्तमान कळले. संतोष जाहला. पण ते तेल खाद्यतेल का इतर वापरण्यालाक/ जाळण्यालायक तेल तितके स्पष्ट केले तर बरे होईल गुरुजी.


ग्रह रजेवर जात नाहीत.

 

पंतप्रधान मोदींचा ७५ वा वाढदिवस साजरा झाला. ते आता ७६ वर्षांचे झाले. त्यांना उत्तम दीर्घायुष्य लाभो.

विषय थोडा वेगळा आहे. भाजपने आवाहन केले की मोदींच्या वाढदिवशी दिवे पेटवा.(त्यासाठी लाखो लिटर तेल,कापूर आणि माचीस बॉक्स ची व्यवस्था करण्यात आली) काही ठिकाणी गणेशोत्सवात आरती आणि महाआरतीचे आयोजन झाले. यज्ञ आणि होमहवन केले गेले.का? तर मोदी यांना पुढच्या काळासाठी ऊर्जा मिळावी म्हणून अनेक आध्यात्मिक कार्यक्रम राबवले. अचानक असे काय झाले की मोदींसाठी आशिर्वादांचे दिवे पेटवण्याचे फर्मान सुटले?

विषय थोडा वेगळा आहे. मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक आहे. पण अंधश्रद्धाळू नाही. १७ सप्टेंबर मोदींचा जन्मदिवस आहे. मोदींच्या पुढील ग्रहदशा त्यांना सत्तेच्या राजयोगापासून दूर नेणारी आहे.

१७ सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत प्रवेश करतोय. १८ सप्टेंबरला मंगळ कर्क राशीत जातोय.

 

कर्क राशीत मंगळ नीच स्थानी असतो. म्हणजे कमजोर होतो. हे सोप्या भाषेत सांगायचे तर हा कमजोर मंगळ दोन गोष्टी नक्की घडवतो: • सरकार आणि सत्तेला धक्का देतो, सुरंग लावतो. • संघर्ष आणि तीव्र आंदोलनाचा माहौल तयार करतो.राजकीय भूकंपाचे धक्के देतो,

 

नीच स्थानातला हा मंगळ सत्तेच्या दहाव्या भावाकडे पाहतो. संघर्षाच्या सहाव्या भावाकडे पाहतो. आणि त्या सहाव्या भावाचा स्वामी शुक्राकडेही पाहतो.

 

दहाव्या भावात राहू बसला आहे. हा योग आजच्या राज्यकर्त्यां टोळ्यांसाठी अशुभ आहे.

त्यामुळे काय होईल?

 

देशात असंतोषाचा मोठा भडका उडेल. आंदोलने होतील. आंतरराष्ट्रीय कारस्थानांचा फटका बसेल. अंतर्गत बंडाळी वाढेल,त्यात सत्तापरिवर्तनही घडू शकते.

 

या अशुभ काळाची चाहूल लागल्यामुळे गेल्या बारा वर्षांत पहिल्यांदाच सत्तेच्या स्थैर्यासाठी आणि मोदींच्या आरोग्यासाठी भक्तांना आशिर्वादाचे दिवे लावायला सांगितले जात आहे. त्यातून मोदींना ऊर्जा मिळेल, असे सांगितले जात आहे.

 

१७ तारखेपासून कठीण काळ सुरू होत आहे. ग्रहदशा कुणालाही बदलता येत नाही. दिवे लावा, काहीही करा…

 

ग्रह कधीच रजेवर जात नाहीत! होय. ग्रह कधीच सुट्टीवर जात नाहीत. ते सदैव ड्यूटी वर असतात.

पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा! जय महाराष्ट्र!

 

- आर. संजय या जागतिक ख्यातीच्या भविष्यवेत्त्याची भविष्यवाणी. होराभूषण आर. संजय यांनीच मावा सरकार २५ वर्षे टिकेल अशी भविष्यवाणी केली होती जी तंतोतंत खरी ठरली.


In reply to by श्रीगुरुजी

तुमची निरांजने व तुमचा ज्योतिष्याचा अभ्यास तुमच्या जागी ठीक.  त्यावर कोणालाच आक्षेप असण्याचे कारण नाही. 

फक्त साध्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने खालील प्रश्नांची उत्तरे आपण किंवा दिवे लावणारांनी द्यावीत. 

- एकट्या उज्जैन मध्ये म्हणे ९९ लाख रुपयांचे तेल काल खर्च झाले. बाकी देशभरात किती तेल व्यर्थ गेले असेल त्याची गणणा नाही. हे तेलाचे पैसे कुठून आले? या कार्यक्रमांसाठी देशातील नागरिकांच्या कराचा पैसा खर्च झाला का? 

गोरगरीब लोकांना खायला मिळत नाही. ८० कोटी जनता फुकट धान्यावर जगते आहे अशा परिस्थितीत असे करोडो दिवे लावून लाखो लिटर खाण्यायोग्य तेल जाळून टाकणे तुंम्हाला योग्य वाटते का? 

सरकारी अधिकाऱ्यांनी जनतेची कामे सोडून हे कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश दिले गेले होते म्हणे. ते खरे तर जनतेचे नोकर आहेत, त्यांना पगार जनतेचे काम करण्यासाठी दिला जातो. मग ते काम सोडून त्यांनी ही असली कामे करणे आपल्याला पटते का?

बाकी तुंम्ही व्यक्तीगत काहीही केले तर जोपर्यंत इतर जनतेला त्रास नाही तोपर्यंत हरकत नाही.  

वृषभ कोंडे यांनी पण असेच प्रश्न विचारले होते.


In reply to by स्वधर्म

राज्यकर्ते वा त्यांचे समर्थक हे जनतेच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीत हे इतक्या वर्षांत तुमच्या लक्षात आलं नाही का?


In reply to by रामचंद्र

पण आपली आशा अमर आहे. मध्यंतरी त्यांचे डोळे थोडे किलकिले झाले होते म्हणून...


In reply to by रामचंद्र

गरीब कुटुंबातील लहान मुले दिव्यातील तेल बाटल्यांमध्ये भरून घेत असल्याचे व्हिडीओ  खरा भारत दाखवत आहे. कोणालाही तोंड उघडायची गरज नाही. 


In reply to by रामचंद्र

दोन्ही होणार. जागतिक ख्यातीचे होराभूषण आर. संजय यांचे भाकितच आहे तसे. 


In reply to by श्रीगुरुजी

होराकर्त्याचं तुम्ही नाव सांगितल्यामुळं भाकिताची खात्रीच पटली!


दिल्ली च्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पण मोदींसाठी 108 कुंडी हवन का केलं आहे. एकंदरीत मोदींना खुश  करण्यासाठी चढाओढ चालू आहे. 

कदाचित नेहरूंना पंतप्रधान पदी मिळाला तसा  भारतरत्न मोदींना मिळण्याची शक्यता पण आहे.

 


In reply to by रात्रीचे चांदणे

नेहरूंनी निर्माण केलेली उच्च परंपरा कन्येने सुरू ठेवली. मोदींनी या खंडित परंपरेचे पुनरुज्जीवन केल्यास आक्षेप असण्याचे कारण नाही. 


दिल्ली विद्यापीठाच्या छात्रसंघाच्या (Delhi University Students' Union) निवडणुकांची मतमोजणी आज झाली.  अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि संयुक्त सचिव (जॉईंट सेक्रेटरी) या चार पदांसाठी निवडणुक झाली होती. त्यापैकी उपाध्यक्ष वगळता इतर तीन पदांवर भाजपची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परीषद (अभाविप) चे उमेदवार विजयी झाले. उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवार जिंकला. अध्यक्षपदासाठीची निवडणुक विशेष चुरशीची झाली. एकूण १८-१९ फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. दोन फेऱ्यांनंतर अभाविपचा उमेदवार अवघ्या एका मताने मागे होता.

 

जुलै महिन्यात दिल्लीतच जंतरमंतरमध्ये झुरळांच्या आंदोलनाचा तमाशा झाला होता. तेव्हापासूनच जेन-झी मोठ्या प्रमाणावर मोदी-भाजपविरोधात गेले आहेत अशाप्रकारे वातावरण उभे केले गेले होते/आहे. पण दिल्लीतील जेन-झी नी मात अभाविपलाच जिंकविले. ही चार पदे दिल्ली विद्यापीठ पातळीवरील. अशाप्रकारेच दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेल्या वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये कॉलेज पातळीवर असतात. काल तिकडची मतमोजणी झाली. तिथेही बऱ्याचशा कॉलेजांमध्ये अभाविपचेच उमेदवार जिंकले.

 

DUSU मधून आतापर्यंत काही महत्त्वाचे राजकीय नेते पुढे आले आहेत. त्यातील सगळ्यात महत्त्वाचे नाव आहे अरूण जेटली. ते कॉलेजमध्ये असताना DUSU चे उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्षही होते. त्याप्रमाणेच अजय माकन, अलका लांबा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि नुपूर शर्माही DUSU मधूनच पुढे आले आहेत. 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

राजस्थानात एका नवयुवक नेत्याने विद्यार्थ्यांचा आवाज नावाचा एक कार्यक्रम घेऊन त्यात जोरदार भाषण ठोकले होते.‌ परंतु त्या शहरातील महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय झाला.‌ 

 

यातून खालीलपैकी एक किंवा दोन्ही निष्कर्ष निघतात.

 

१) तथाकथित झ पिढी भाजपच्या पाठीशी आहे.

 

२) विद्यार्थ्यांचा आवाज कार्यक्रमात स्थानिक झ पिढी सहभागी नव्हती. जे होते ते बाहेरून भाड्याने आणले होते. 

 

झुरळ आंदोलन व झुरळ पक्ष हे पावसाळ्यात उगविणाऱ्या भूछत्राप्रमाणे अल्पायुषी आहेत हे मी पूर्वीच लिहिले होते.‌


In reply to by श्रीगुरुजी

कोटामधील कॉग्रेसच्या पराभवापेक्षा दिल्ली छात्रसंघातील एन.एस.यु.आय चा पराभव अधिक लक्षणीय आहे असे वाटते. कोटा शहरात आय.आय.टी जे.ई.ई आणि नीटचे प्रशिक्षण देणाऱ्या कित्येक संस्था आहेत. देशभरातून हजारो (कदाचित लाखही) संख्येने विद्यार्थी कोट्यात प्रशिक्षणासाठी म्हणून जातात. पण या विद्यार्थ्यांपैकी फार थोडे कोट्याचे रहिवासी आणि मतदार असतील. त्यामुळे कोटा मध्ये छात्र की गूंज साठी समजा स्वयंप्रेरणेने तिकडचे विद्यार्थी गेले तरी ते स्थानिक मतदार नसल्याने त्यांच्यामुळे निवडणुक फिरणार नव्हती. पण दिल्लीतील स्थिती वेगळी. एक तर छात्रसंघाच्याच निवडणुका होत्या म्हणजे दिल्ली विद्यापीठातील विविध कॉलेजांमध्ये शिकत असलेले (अर्थात जेन-झी) विद्यार्थी हेच मतदार होते आणि इतर कोणीच नाही. तरीही तिथे अभाविपचाच विजय झाला.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

बरोबर आहे. 

 

खरं तर मोदींविरोधात बोलण्यासाठी अनेक सबळ मुद्दे आहेत. परंतु मोदींविरोधात कोणताही मुद्दा जनतेसमोर नीट आणता येत नसल्याने, तो मुद्दा जनतेला पटवून देता येत नसल्याने, स्वतःकडे कोणताही कार्यक्रम नसल्याने आणि आपणच मोदींपेक्षा जास्त चांगला पर्याय असल्याचे सिद्ध करता येत नसल्याने जनता यांना भीक घालत नाही.

 

आपली नोकरी, काम, वेतन कितीही वाईट असले तरी, जोपर्यंत, आता आहे त्यापेक्षा चांगली नोकरी मिळत नाही, तोपर्यंत, आहे ती नोकरी सोडत नाही. तद्वत जोपर्यंत कोणीतरी मोदींना चांगला पर्याय आहे यावर जनतेचा विश्वास बसत नाही, तोपर्यंत, जनता मोदींच्याच मागे राहणार.

 

मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी लावलेले दिवे, मोदींचे वैयक्तिक जीवन, मोदींचे परदेश दौरे, मोदींच्या पदव्या, मोदींचे उच्चार, राफेल, लोया, मोदी चहा विकत नव्हते, मनूस्मृती  असल्या अनेक असत्य आणि फालतू गोष्टींवर बोलण्यात विरोधी पक्षांनी १२ वर्षे वाया घालविली. यातील एकही मुद्दा जनतेला कधीही पटवून देता आला नाही.  त्यामुळेच मोदी निश्चिंत आहेत.‌


In reply to by श्रीगुरुजी

अरेरे !! 

 

विरोधकांचा आवाज आता जरा वाढत होता. 

 

त्यात मनुस्मृतीमुळे तर  काही जणांना भयानक आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या,त्या आनंदात त्यांनी आपापल्या(च) बायको अथवा नव-यांना मस्त बदडून काढले होते... 

 

पण छे,.. काय हे दिवस आले परत... 

वीजेचे दिवे गेले आणि तेलाच्या पणत्या पुन्हा पेटल्या ! 

 

देश दोन हजार वर्षे मागे गेला ! 

 

भृगूसंहितेत वाचले पाहिजे आता यातून कसा मार्ग निघतो ते... 

 

भृगु.. अहो महाशय... या जरा इकडे आणि सांगा काय करायचे ते !! 

 

वैवस्वत (मनु सातवा)

 


मदर ऑफ ऑल डिल्स इत्यादी इत्यादी ह्यांच्याशीच केले होते ना ? हे तर आपल्याला भंगार विकायला राजी नाहीत ह्यांचे म्हणणे आहे की आमच्याकडून घेतलेले भंगार तुम्ही पर्यावरणपूरक पद्धतीनं प्रोसेस कराल ह्याची आम्हाला शाश्वती नाही. 

हीच का ती डील जी केली म्हणून म्हणे ट्रम्पचा जळफळाट इत्यादी झाला होता ? जग्वार लँड रोव्हरची डिफेंडर स्वस्त होणार होती, भारत अन् युरोपियन युनियन भरभरून आयात निर्यात करणार होते ना आपापसात ? हे तर भंगार द्यायला नाटकं करू लागले ! कसली मदर ऑफ ऑल डील नक्की कळेल का ?

(व्यावसायिक) खोंडे


विद्यापीठ निवडणुकांवर आता मोदींच्या/भाजपच्या लोकप्रियतेची भिस्त सोडावी लागत असेल ते पण तुमच्यासारख्या डॉक्टर खरे म्हणतात तसे मानेच्या वर वजन असणाऱ्या माणसाला तर खरेच दुर्दैवी विषयांतर आहे हे प्रतिसाद दर्जातले ! ☹️ 

असो, आमचा ध्येयवाद सत्य ते विदित केलेच पाहिजे हा असल्यामुळे काही आकडे मांडू इच्छितो आहे. खालील चार्ट पाहता दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकांचा इतिहास आपल्याला सुपष्ट कळतो. 

Screenshot 20260919 202127 एकूण निवडणुकीत आणीबाणी, मंडल आयोग जाहीर होणे आणि कोविड १९ ही तीन वर्षे सोडून ५४ निवडणुका झाल्या आहेत. त्यातील २९ अभाविप जिंकली आहे, १९ काँग्रेस आणि ११ इतर. ही मोजणी १९६७ पासून जेव्हापासून विद्यार्थी निवडणुकांचा डेटा ठेवण्यास काटेकोर सुरुवात झाली तेव्हापासून आहे. एकंदरीत दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये अभाविपचं प्रस्थ आणि जनेवि मध्ये डाव्यांचे प्रस्थ वादातीत आहेच. 

त्यामुळे त्याने फार काही मूड ऑफ नेशन/जनरेशन निर्देशित होतो असेही नाही. ह्यापेक्षा चांगला इंडेक्स तर धुरंधरने केलेला धंदा म्हणता येईल.... किमान त्यातून नवी पिढी देशभक्त आहे इतके तर म्हणता येईलच. 

जाहीर करतो की - जेन झी पूर्णपणे भाजपच्या विरोधात गेल्याचे माझे दावे नाहीत, किंबहुना बऱ्यापैकी जेन झी आजही भाजपसोबत असेलही पण जी आहे त्यातील एक मेजर भाग रिझर्व्हेशन हटाव आंदोलन / जनरल जनता पार्टीला जशी वागणूक सरकार कडून मिळाली आहे त्यामुळे दुखावला आहे, बांकीपुर आणि दतिया (दतिया तर सामान्य प्रवर्ग बहुल) त्याचे इंडिकेटर आहेत. माझा वैयक्तिक प्रॉब्लेम हा आहे की जेन झीचे हे समर्थन किंवा विरोध मतांत कन्व्हर्ट होतील का ? इथून तर सुरुवात आहे.


In reply to by वृषभ खोंडे

या निवडणुकांमध्ये जो मतदार आहे तो भाजप-मोदींपासून पूर्ण दुरावला आहे हे चित्र गेल्या दोनेक महिन्यांपासून उभे केले होते. खरोखरच तसे आहे की मिडीयात उभे केलेली हवा आहे यासाठी शीतावरून भाताची परीक्षा म्हणून या निवडणुका महत्त्वाच्या होत्या. बाकी २९ विरूध्द १९ म्हणजे अभाविप पुढे जरी असेल तरी १९७७ ते २००६ या काळात बंगालमध्ये झालेली प्रत्येक निवडणुक डाव्यांनी जिंकली होती तसा डॉमिनन्स नक्कीच नाही/नव्हता. आताच विकिपीडीयावर बघितले की २०१७/१८ आणि २०२४/२५ मध्ये एन.एस.यु.आय ने ४ पैकी २ पदे जिंकली होती- दोन्ही वेळेस अध्यक्षपद त्यांच्याकडे होते. म्हणजे जर जेन-झी खरोखरच विरोधात गेले असतील तर यावेळेस अभाविपने एकही पद जिंकायला नको होते. तसे झालेले नाही.

एक समकक्ष उदाहरण देतो. २००६ ची गोष्ट. त्यावेळेस विदर्भात चिमूरची विधानसभा पोटनिवडणुक होती. विजय वडेट्टीवार शिवसेना सोडून कॉग्रेसमध्ये गेले होते आणि ते कॉग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवत होते. त्यावेळेस प्रमोद महाजनांनी अगदी भांडून त्या जागेवर भाजपचा उमेदवार उतरवला होता (प्रत्यक्षात पोटनिवडणुक प्रमोद महाजन गेल्यानंतर झाली पण त्यावेळच्या युतीतील वाटाघाटी ते असताना झाल्या होत्या). शेतकरी आत्महत्या आणि इतर अनेक कारणांमुळे विजय वडेट्टीवार चिमूरमध्ये हरणार असेच वातावरण उभे केले गेले होते. युतीचे नेतेही आपण जिंकणार म्हणून बऱ्यापैकी निश्चिंत वाटत होते. पण कुठचे काय? जिंकले तेच. तसे काहीसे आता दिल्लीत झाले आहे असे दिसते. 

 

बरं दिल्लीतच झाले असे नाही तर काही आठवड्यांपूर्वी पंजाब विद्यापीठातही तेच झाले. जेमिनीमावशीने सांगितले की भारताचे मिडिअन (मराठी शब्द?) वय २८-२९ वर्षे इतके आहे. जेन-झी म्हणजे १९९६ ते २०१२ या काळात जन्मलेले असतील तर मतदारांमध्ये जेन-झींची संख्या लक्षणीय असायला हवे. राजस्थानात मतदारांचे मिडिअन राष्ट्रीय मिडिअनपेक्षा कमी आहे. म्हणजे राजस्थानात तो परिणाम अजून जास्त असायला हवा. राजस्थानातही ब्राह्मण, राजपूत, बनिया या उच्चवर्णीयांची संख्या लक्षणीय असलेली ठिकाणी आहेत. अलीकडे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यापैकी बिकानेर आणि पाली मध्ये भाजपने मार खाल्ला तर अल्वरमध्ये थोडी पिछेहाट झाली पण जयपूर, उदयपूर, जोधपूर, भिलवाडा वगैरे ठिकाणी कामगिरी सुधारली. राजस्थानात राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाची कामगिरी या 'मध्यावधी' स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विरोधी पक्षापेक्षा त्यामानाने कमी असते असे बहुतेक वेळा बघायला मिळाले आहे. तरी तसे झालेले नाही. तेव्हा युजीसी प्रकरणावरून खूप नाराजी असली तरी सध्या ते नियम लागू नाहीयेत. तशीच परिस्थिती राहिली तर हळूहळू असलेली नाराजी कमी होईल असा अंदाज. आणि हो.. बंगाल विधानसभा निवडणुका युजीसी प्रकरणानंतरच झाल्या होत्या.

 

अर्थात २०२९ मध्ये काय होईल याचे भाकित आता करत नाही. मात्र मिडियामध्ये जे चित्र उभे केले जात आहे- अमका वर्ग विरोधात आहे, तमका वर्ग विरोधात आहे... असे करत करत एकही वर्ग विरोधात घालवायचा ठेवला नसावा. तरीही परत मोदी/भाजप जिंकल्यावर तेच तेच घिसेपीटे आरोप- ईव्हीएम, मतचोरी, चुना आयोग वगैरे वगैरे चालू असतात. पण जी हवा मिडियामध्ये जितक्या प्रमाणावर उभी केली जात आहे तितक्या प्रमाणावर खरोखरच ग्राऊंड रिॲलिटी आहे का की आपल्याला जसे व्हावे असे वाटते तसेच होत आहे ही कल्पना बरेच लोक करत आहेत?

 

बघू काय होते ते.

 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

बंगाल विधानसभा निवडणुका युजीसी प्रकरणानंतरच झाल्या होत्या.

बंगाल निवडणुकांचे उदाहरण इथे अप्रस्तुत आहे कारण एकतर बंगाली लोकसंख्येचे कंपोजिशन. २५% भद्रोलोक (ह्यातील अर्धे डावे पकडा - ब्राह्मेनेर पार्टी), २५% नामसुद्र - (दलित) , ५-८% संथाल+ इतर आदिवासी समूह, जवळपास ३०% ओबीसी. तिथे भाजपला मतदान सगळ्यात जास्त नामसुद्र अन् आदिवासी गटांकडून अन् खालोखाल ओबीसींकडून झालेले आहे.

बाकी विद्यापीठ निवडणूक आणि विधानसभेच्या सीेटची निवडणूक तुलना होऊ शकत नाही असेही वाटते अगदी समकक्षतेत सुद्धा. कारण निवडणूक म्हणजे नुसती आकडेवारी नाही तर इतरही कैक फॅक्टर त्यात अंतर्भूत असतात. 

उर्वरित प्रतिसाद मेंदूला चालना देणारा आहे, बघू काय सुचते सापडते


In reply to by चंद्रसूर्यकुमार

>>> त्यावेळेस प्रमोद महाजनांनी अगदी भांडून त्या जागेवर भाजपचा उमेदवार उतरवला होता.

 

तो आग्रह नितीन गडकरींचा होता. मला वाटते त्यावेळी गडकरी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी हट्ट करून बाळ ठाकरेंच्या मागे लागून हट्टाने चिमूर मागून घेतला व त्या बदल्यात बहुतेक कल्याण किंवा त्याच्या आसपासचा सातत्याने भाजप आमदार निवडून येणारा एक विधानसभा मतदारसंघ सेनेला देऊन टाकला. प्रत्यक्षात चिमूरमध्ये पराभव झाला व दुसरा हक्काचा मतदारसंघही घालवून बसले.

 

नंतर २००९ मध्ये १९८० पासून २००४ पर्यंत प्रत्येक निवडणुकीत भाजप उमेदवार निवडून येत असलेला गुहागर, सेनेला रामदास कदमसाठी देऊन टाकला कारण तेव्हा रामदास कदम विरोधी पक्षनेता होते व त्यांचा मतदारसंघ बहुतेक दुसऱ्या मतदारसंघाला जोडला होता. हे कानावर आल्यावर विद्यमान भाजप आमदार डॉ. सुहास नातू चिडले होते. गडकरी बरेच दिवस घोळ घालत होते. गुहागर अजून सोडलेला नाही असे शेवटच्या क्षणापर्यंत सांगून शेवटी तो सेनेला देऊन टाकला. त्यामुळे डॉक्टर सुहास नातू अपक्ष उभे राहिले. निवडणुकीत रामदास कदम व डॉ. नातू हे दोघेही पडले आणि निवडून आले भास्कर जाधव जे आजतागायत निवडून येत आहेत. गडकरींनी विनाकारण २ हक्काचे मतदारसंघ गमावले.

 

>>> मिडिअन (मराठी शब्द?) 

 

त्रिकोणाच्या मेडिअनला मराठीत मध्यगा किंवा मध्यमा असे म्हणतात.‌ 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

अर्थात २०२९ मध्ये काय होईल याचे भाकित आता करत नाही. मात्र मिडियामध्ये जे चित्र उभे केले जात आहे- अमका वर्ग विरोधात आहे, तमका वर्ग विरोधात आहे... असे करत करत एकही वर्ग विरोधात घालवायचा ठेवला नसावा. तरीही परत मोदी/भाजप जिंकल्यावर तेच तेच घिसेपीटे आरोप- ईव्हीएम, मतचोरी, चुना आयोग वगैरे वगैरे चालू असतात. पण जी हवा मिडियामध्ये जितक्या प्रमाणावर उभी केली जात आहे तितक्या प्रमाणावर खरोखरच ग्राऊंड रिॲलिटी आहे का की आपल्याला जसे व्हावे असे वाटते तसेच होत आहे ही कल्पना बरेच लोक करत आहेत?

 

सर्वच मीडिया सध्या गोदी मीडियाचे गुण गाताना दिसून येत आहेत. दुसऱ्या बाजूने कुणी असेल तर ती सोशल मीडिया आणि त्यावर सुद्धा मोजकेच लोक. कारण सोशल मीडिया वर सुद्धा IT सेलीये मंडळींची देहाती वागणूक आहे. त्यामुळे मीडिया वगैरे हवा निर्माण करत आहे हि निव्वळ थाप आहे आणि हि थाप कदाचित २०१४ मध्ये चालली असती २०२६ मध्ये चालणार नाही.

> तरीही परत मोदी/भाजप जिंकल्यावर तेच तेच घिसेपीटे आरोप- ईव्हीएम, मतचोरी, चुना आयोग वगैरे वगैरे चालू असतात.

हे आरोप अगदी नेहमीचे लुसर्स (पप्पू वगैरे) सोडल्यास आणखीन कुणीच करताना दिसत नाही. सामान्य माणूस तर अजिबात नाही. 

 

इकडून तिकडून जनतेचे पैसे लुबाडायचे. हिंदुत्वाचे खुळखुळे मध्यमवर्गीय हिंदूंच्या हाती आणि फुकटची रेवडी शोषित वंचित पीडित देहाती लोकांच्या हाती देऊन विलेक्शन जिंकायचे हा फॉर्मुला आहे. हा फॉर्मुला किती काळ चालेल हेच पाहायचे आहे. 

 

 


मध्य - प्रदेश पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनची घोषण :  

ऑक्टोबर १६, २०२६ पासून दोन हजाराच्या वरील युपीआय पेमेंट घेणे बंद करणार. क्रेडिट/ डेबिट कार्ड ऑप्शन सुरू ठेवणार. मध्य- प्रदेश पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय सिंह म्हणतात की आधीच पेट्रोल डीलर अतिशय कमी मार्जिन वर काम करतात. त्यात हे एमडीआर लागू झाले तर अजूनच लो मार्जिन होणार. 

एकंदर रोज सरासरी १०० ग्राहक २००० + रुपयांचे व्यवहार UPI ने करतात पेट्रोल पंपावर, त्याचे रोज सरासरी डीलर्सना ₹ ५९०/- भरायला लागणार जे महिन्याला १७, ७००/- होतात जे पेट्रोलियम डीलरना परवडणारे नाहीये असे श्री अजय सिंह ह्यावेळी म्हणाले.


इंदूरमधील रागाच्या "छात्रों की गूंज" कार्यक्रमात, स्टँड-अप कॉमेडियन पुलकित मणीने एका छोट्या अभिनयासाठी मंच घेतला.

 

या सादरीकरणादरम्यान, त्या विनोदी कलाकाराने पंतप्रधानांच्या हावभावांची आणि परदेशी नेत्यांशी बोलण्याच्या त्यांच्या पद्धतीची नक्कल केली.

 

या कृतीत मोदींचे परराष्ट्र धोरण, त्यांची आई आणि पंतप्रधानांनी मुलांसोबत केलेल्या नाण्यांच्या जादूच्या खेळाचाही उल्लेख होता.

 

त्याने पंतप्रधान मोदींच्या एका वृद्ध महिलेसोबतच्या संवादाची खिल्ली उडविल्यानंतर राहुल गांधी हसताना दिसत आहेत.

 

____________________

 

मागील महिन्यात याने पळत पळत जाऊन संदीप दिक्षितला मिठी मारली होती व संदीप दिक्षितने मेलनीचा उल्लेख करून राजकीय औचित्यभंग केला होता. त्यापूर्वी याच माणसाने लोकसभेत अचानक उठून मोदींना मिठी मारली होती. 

 

वारंवार येणाऱ्या अपयशामुळे आलेल्या वैफल्यातून असला आचरटपणा होत असतो. अजूनही समज आली नाही हे वारंवार सिद्ध होतंय. 


In reply to by श्रीगुरुजी

मला राहुूल गांधींची कृती अजिबात पटली नाही. संसदेत रमेश बिदूरी जेव्हा अश्लिल शेरेबाजी करत असताना मागील बाकावरील रविशंकर प्रसाद ज्याप्रकारे हसत होते तेव्हाही त्यांचे वागणे मला खटकले होते. राहूल गांधींनी असले व्यक्तिगत टिंगल टवाळी  टाळायला  हवी.  


वारंवार असा आचरटपणा करून ना कॉंग्रेसच्या मतात वाढ होईल,  ना भाजपच्या मतात घट होईल. शक्यता ही आहे की कॉंग्रेसकडे वळू पाहणारे काठावरचे मतदार माघारी फिरतील. 

 

तिसऱ्या पंचवार्षिक कारकीर्दीत मोदींची कामगिरी घसरली आहे कारण समोर आव्हान द्यायला कोणी नाही. जे आहेत ते केवळ आचरटपणा, शाब्दिक कोट्या यामध्ये व्यग्र आहेत. एका बाजूला प्रगल्भ, खंबीर नेता आणि दुसऱ्या बाजूला आचरट विदूषक. निवड कोणाची होईल ते सांगण्याची गरज नाही. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात ६८ वर्षीय महिलेने भांडणातून आपल्या ७० वर्षीय प्रियकराची धारदार शस्त्राने हत्या करून त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून विहिरीत टाकल्याची घटना घडली आहे. डीएनए तपासणी आणि फोन कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी महिलेचा शोध घेऊन तिला अटक केली.

https://www.hindustantimes.com/cities/pune-news/68yearold-woman-held-for-killing-70-year-old-lover-101790015742290-amp.html 

Murder

In reply to by कांदा लिंबू

याचा अर्थ माझ्या जीवला सुध्दा धोका आहे 

आता कमीत कमी १५ ते २० जून्या खतावण्या काळजीपूर्वक बंद कराव्या लागतील आणि 

फार पूर्वी बंद झालेल्या पुन्हा उघडणार नाहीत याची जीवापाड काळजी घ्यावी लागेल....

जगलो वाचलो तर पुन्हा भेटूया...

पैजारबुवा,  


स्वतःला जगातील सगळ्यात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम म्हणवून घेतल्यावर ही पुढे आलेली आपली गत. 

टुरिस्ट विजा वर मलेशिया मध्ये येऊन रोजगार शोधू नका म्हणून आवाहन करते आहे भारतीय उच्च आयोग , क्वालालंपूर, मलेशिया. कुठेतरी काहीतरी गडबडले आहे नक्कीच. 

IMG 20260922 WA0015


In reply to by वृषभ खोंडे

विश्वगुरूचा महिमा इतका अगाध आहे कि प्रत्येक माणूस मिळेल त्या मार्गाने देश सोडून इतरत्र सर्वत्र जाण्याचा प्रयत्न करत आहे. 


In reply to by साहना

विश्वगुरूचा महिमा इतका अगाध आहे कि प्रत्येक माणूस मिळेल त्या मार्गाने देश सोडून इतरत्र सर्वत्र जाण्याचा प्रयत्न करत आहे. 

कशाला फुक्या मारताय उगाच?

भक्तांचं सोडून द्या एक वेळ, एक तरी मिपावरच मोदी रुग्ण देश सोडून जायचं म्हणतोय का?

तात्याने अमेरिकेत जाण्याची गोची करून ठेवली आहे. युरोपची अवस्था बिकट आहे. मध्यपूर्वेची स्थिती वाईट आहे.  

बाहेर जाणारे लोक हे केवळ जास्त पैसे मिळवण्याच्या आशेने  मिळेल तिथे जात आले आहेत.

माणूस बिहार हुन मुंबई दिल्लीत का येतो?  मद्रासी मुंबईत का आले? 

पूर्वी कोकण गोव्यातील माणसं मुंबईत का आली. तेंव्हा मोदी क्षितिजावर सुद्धा नव्हते.       

बांगला देशी लोक भारत का येतात?

तिथे मोदी शाह किंवा दुसऱ्या कुणाचा संबंध नाही.

कशाचाही संबंध मोदींशी लावण्याचा रोग जडला आहे तुम्हाला.

तपासणी करून पहा आणि काळजी घ्या.        


In reply to by सुबोध खरे

विश्वगुरूचा महिमा इतका अगाध आहे कि प्रत्येक माणूस मिळेल त्या मार्गाने देश सोडून इतरत्र सर्वत्र जाण्याचा प्रयत्न करत आहे. 


हा माझा प्रतिसाद होता. ह्यांत मोदींचा उल्लेख नाही शाह ह्यांचा उल्लेख नाही. तुम्हालाच हिरण्यकश्यपू प्रमाणे सर्वत्र मोदी रुपी विष्णू दिसतो आहे. त्यामुळे ह्याला काही औषध पाणी करून घ्या !

लोक देश सोडून जाण्याचा काटोकाट प्रयत्न करत आहेत हे निर्विवाद सत्य आहे. देशांतील संधीचा अभाव, पाचवीला पुजलेले दळिद्र, भ्रष्टाचार, करवसुली आणि अनेक कारणांनी विविध लोक सोडून जात आहेत. पूर्वी फक्त अमेरिका युरोप होता आता मंडळी थायलंड आणि मलेशिया मध्ये सुद्धा जायला पाहत आहे ह्यांत विश्वगुरूचे गुरुत्वाकर्षण नाही तरी आणखी काय आहे ?

गोव्यांत म्हण आहे. कुत्र्याला कुठेही मारा ते आपल्या पायावर लंगडते !

 


In reply to by साहना

आपल्याच पत्रकातील शेवटची ओळ स्पष्ट लिहिलेली आहे. प्रवासी व्हिसा घेऊन त्या देशात काम शोधण्यासाठी जाऊ नका.

त्या सुतावरून स्वर्ग गाठलात

There has been a significant decrease in the percentage of Indian respondents willing to work abroad from 78% in 2018 to 54% in 2023, stated a recent survey by Boston Consulting Group (BCG).


https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/drop-in-indians-seeking…


In reply to by सुबोध खरे

तो बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचा रिपोर्ट व्हाईट कॉलर कव्हर करतो, ब्लू कॉलर कव्हर करतो की दोन्ही कव्हर करतो खरे सर ? 

कारण व्हाईट कॉलर मधे आजकाल फार कमी बातम्या दिसतात अमुक आयआयटी मधे मेटा ने ५ कोटींचे पॅकेज दिले किंवा मायक्रोसॉफ्टने १० पोरे एकदम उचलली. त्याला एक महत्वाचे कारण म्हणजे, आता जमाना क्वांट फर्मचा आहे, तुम्हाला गुरुग्राम आणि बंगळूर मध्ये तितकेच पॅकेज मिळत असेल ते पण लोकल हेड हंट मधून तर रोजचा खर्च अन् राहणीमान खर्च + सांस्कृतिक वेगळेपणा इतके सगळे रिस्क करून कोण परदेशात relocate होणार ? आपण क्वांट फर्म बद्दल डिटेल्स मधे शिरलात तर अजून कळेल. 

दुसऱ्या बाजूला, ब्लू कॉलर जॉब्स मध्ये आजही परदेशात/ दुबईला/ आता लेटेस्ट ईस्टर्न युरोपमध्ये इत्यादी जाण्याचा ट्रेंड भयानक जास्त आहे. कोणी ट्रॅव्हल एजंट ओळखीचा असल्यास ECR Yes कॅटेगरी पासपोर्ट घेऊन किती लोक परदेशात जातात त्याची माहिती घ्या. मलेशिया/दुबई/ईस्टर्न युरोप इथे जाणारी गर्दी पहा चित्र अधिक स्पष्ट होईल. त्याशिवाय टुरिस्ट विजा वर बाहेर जाऊन नोकऱ्या शोधणारे अलग पकडा ते तर मोजणीत पण बसत नाहीत. ECR - Y = इमिग्रेशन चेक रिक्वायार्ड - येस ह्याबद्दल अधिक माहिती घेतलीत तर अजूनच चांगले. २०२३ मधेच मोदीजी म्हणाले आहेत की भारत हा जगाला वर्कफोर्स सप्लायर होऊ शकतो.... गवर्नमेंट ऑफ इंडियाची पॉलिसी आहे ती ब्लू कॉलर अप्रवसन प्रोत्साहित करण्याची. त्यासंबंधी काम कसे चालणार त्यावर ही एक इन्फोग्राफिक माहिती. image b7f8c029


In reply to by सुबोध खरे

बोस्टन ग्लोबल चा हा रिपोर्ट २०२३ मधील आहे आणि त्यानीं १८८ देशांतील १.५ लक्ष लोकांना इंटरनेट मार्फत सर्वे पाठवून डेटा मिळविला. भारतातून त्यांनी १००० ते ५००० लोकांना प्रश्न विचारले. भारतासाठी हे आकडे statistically significant नाहीत आणि त्याशिवाय इंटरनेट हे माध्यम असल्याने बहुसंख्य भारतीय त्यांत अंतर्भूत नाहीत.

हे असले फुटकळ रिपोर्ट पुरावे म्हणून देण्यापेक्षा प्रत्यक्ष आकडे उपलब्ध आहेत. ते पाहू.

आणि मी सुतावरून स्वर्ग गाठत नाही ३ वेगळ्या देशांत वास्तव्य असल्याने हा विषय आणि प्रवासी भारतीय ह्यांच्याशी संबंध आहे आणि मूळ विषयाची सखोल समज आहे.

देशांतील एकूण प्रति वार्षिक आऊटफ्लो. ह्यांत विविध प्रकारचे मजूर, विद्यार्थी आणि भारतीय नागरिकत्व सोडून देणाऱ्यांचा समावेश होतो. हे आकडे भारत सरकारच्या ठराविक नोंदणी व्यवस्थेतून आले आहेत. ह्यांत काही पांढरपेशी व्यावसायिकांचा समावेश नाही.

- २०१९ - 1,098,402
- २०२० - 439,056
- २०२१ - 741,625
- २०२२ - 1,351,145
- २०२३ - 1,509,294
- २०२४ - 1,353,505

UN and OECD's 2.5 million estimate, highlighting how many highly skilled Indian professionals, dependents, and standard ECNR laborers migrate without being captured in these specific departure categories.

थोडक्यांत भारतातून देश सोडून बाहेर जाणाऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.

मोदींमुळे हे झाले आणि मोदी ह्यांच्या आधी सर्व काही छान होते असा अर्थ तुम्ही कदाचित ह्यांत पाहाल पण मला तसे म्हणायचे नाही.

देशांतील राहणीमान अपेक्षेप्रमाणे चांगले होत गेले नाही. संधी वाढत गेल्या नाहीत. त्यामुळे कंटाळून किंवा इतर काही उपाय नसल्याने लोक देश सोडून जात आहेत. भारत देशांत बिहार ची जी स्थिती आहे ती जगात सध्या भारताची आहे. त्यामुळे जागतिक दृष्टिकोनातून आपण सर्व बिहारी आहोत. मागासलेला पणा आणि नेहमीची बजबजपुरी ह्याला कंटाळून पांढरपेशा व्यक्ती जात आहेत तर स्वीग्गी डिलिव्हरी किती काळ करत दिवस काढणार म्हणून गरीब लोक जात आहेत हि वस्तुस्थिती आहे.

 

पर्यटक म्हणून देशांतून बाहेर जाणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत जात आहे आणि त्यातील अनेक लोक पर्यटनाच्या नावाखाली मजुरी करायला जात आहेत. पर्यटकांची संख्या २० वरून ३० दशलक्ष वर पोचली आहे. 

 

 


दिल्लीत छात्रसंघांच्या निवडणुकांमध्ये अभाविपने विजय मिळवला. त्यानंतर केरळमध्ये त्रिवेंद्रमजवळील १३५ वर्षे जुन्या सरकारी संस्कृत कॉलेजमधील छात्रसंघाच्या निवडणुकांमध्ये अभाविपने डावी विद्यार्थी संघटना- एस.एफ.आय चा पहिल्यांदाच पराभव केला आहे.

https://www.jagranjosh.com/lite/news/abvp-wins-all-seats-in-kerala-college-student-union-elections-after-40-years-ousts-sfi-187621

 

निवडणुकांच्या राजकारणात प्रचंड रस असला तरी विद्यापीठ पातळीवरील छात्रसंघांच्या निवडणुकांमध्ये कधी फार रस घेतला नव्हता. पण दिल्लीतील झुरळ प्रकरणाच्या तमाशानंतर या छात्रसंघांच्या निवडणुकांमध्येही रस घेऊ लागलो आहे कारण अशा निवडणुकांमध्ये सगळे मतदार जेन-झीच असतात. ही निवडणुक आणखी एक कल दाखवत असेल तर त्या दृष्टीनेही ही निवडणुक महत्त्वाची आहे.

 

केरळचे तीन राजकीय विभाग आहेत- उत्तरेला मलबार (वायनाड, कोझिकोडे वगैरे), मध्य भागात कोचीन आणि दक्षिणेला त्रावणकोर. यापैकी मलबार भागात मुस्लिम लोकसंख्या लक्षणीय आहे (टिपू सुलतानने सक्तीने धर्मांतरीत केलेल्यांचे वंशज), कोचीन भागात ख्रिश्चन लोकसंख्या लक्षणीय आहे तर त्रावणकोरमध्ये हिंदू. आतापर्यंत भाजपला केरळमध्ये विशेष स्थान नव्हते. मुस्लिम आणि ख्रिश्चनांपैकी मोठा वर्ग कॉग्रेसला तर हिंदूंपैकी मोठा वर्ग डाव्या आघाडीचे हक्काचे मतदार होते. वरचे 'फ्लोटिंग' मतदार कुठे जातात यावर एकदा डावे आणि एकदा कॉग्रेस असे निकाल निवडणुकांमध्ये लागत असत. २०१६ मध्ये भाजपने प्रथमच विधानसभेची एक जागा जिंकली. २०२४ मध्ये थ्रिसूरमधून सुरेश गोपी जिंकले आणि भाजपने राज्यातून लोकसभेची पहिली जागा जिंकली. २०२५ मध्ये त्रिवेंद्रम महापालिका भाजपने जिंकली आणि इतर अनेक ठिकाणी कामगिरी बरीच उंचावली. २०२६ मध्ये भाजपने विधानसभेच्या तीन जागा जिंकल्या. गेल्या १२ वर्षात बऱ्याचशा राज्यांमध्ये भाजपने कामगिरी चांगली केली असली तरी दक्षिणेकडील केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये मात्र भाजपला फार शिरकाव करता आलेला नाही. 

 

कॉग्रेसइतकीच डावी आघाडी पण हिंदू द्वेष्टी असली तरी आतापर्यंत हिंदू डाव्या आघाडीला मत देत होते कारण दुसरा पर्याय नव्हता. आता भाजप हा केरळमधील हिंदूंसाठी पर्याय ठरू शकेल का? भाजपने राज्यात हळूहळू शिरकाव केल्याने भाजप हा पर्याय ठरू शकेल हा विश्वास निर्माण झाला तर निदान त्रावणकोर भागातून भाजप डाव्या आघाडीला हुसकावून लावू शकेल- किमान मोठे आव्हान निर्माण करू शकेल. तसेच केरळमध्ये मुळात लव्ह जिहाद हा मुद्दा हिंदूंनी नाही तर ख्रिश्चनांकडून मांडला गेला होता. मागच्या वर्षीच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये एक जवळपास पूर्ण ख्रिश्चन गावात भाजपचा विजय झाला होता. त्याचे कारण 'हे गाव आमचेच' हा दावा वक्फ बोर्डाने ठोकला होता आणि केंद्रात मोदी सरकारने केलेल्या वक्फ सुधारणा कायद्यामुळे आणि कॉग्रेसने त्याला विरोध केल्यामुळे तिथला ख्रिश्चन मतदार कॉग्रेसला मत न देता भाजपच्या बाजूला गेला. गोव्यात मनोहर पर्रीकरांनी हिंदू आणि ख्रिश्चन मतदार बऱ्याच अंशी एकत्र केले होते तसे केरळमध्ये होऊ शकेल का? तसे झाल्यास अजून वीसेक वर्षांनी राज्यात भाजप सत्तेत आला तरी आश्चर्य वाटू नये.

 

अर्थात ही एका कॉलेजमधील स्थानिकही नाही तर त्याहूनही लहान निवडणुक आहे. त्यावरून लगेच इतके निष्कर्ष काढू नये तरीही ती निवडणुक एक मोठा कल दर्शवित आहे का?

 

 

 

 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

यावेळी पंजाब विधानसभाही भाजप बरी कामगिरी करेल असा माझा अंदाज आहे. 

 

भाजप-अकाली दल युती अनेक दशके होती. पंजाबातील १३ लोकसभा मतदारसंघांपैकी भाजप २ व अकाली दल ११ मतदारसंघातून निवडणूक लढायचे. विधानसभेच्या ११७ पैकी भाजप २३ व अकाली दल ९४ असे वाटप होते. 

 

२००७ विधानसभा निवडणुकीत अकाली दलाने ९४ पैकी केवळ ४३ जागा जिंकल्या. परंतु भाजपने २३ पैकी १९ जिंकल्याने युतीला बहुमतासाठी आवश्यक आकडा ओलांडता आला होता.‌ भाजपने जिंकलेले मतदारसंघ बहुतांशी शहरी भागातील होते. 

 

२०२१ पर्यंत युती व्यवस्थित होती. परंतु शेतकरी आंदोलनाचे निमित्त करून अकाली दलाने युती तोडून स्वतःच्या पायांवर कुऱ्हाड मारून घेतली. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत अकाली दल व भाजप स्वतंत्र लढले आणि दोघांचीही वाट लागली. अर्थात भाजप जास्तीत जास्त २ जागा लढवित असल्याने भाजपवर अत्यल्प परिणाम झाला. 

 

परंतु त्यापूर्वी २०२२ विधानसभा निवडणुकीत आआपने जवळपास ९२ जागा जिंकल्या. कॉंग्रेसला केवळ १७, अकाली दल ३, भाजप २ अशी वाताहत झाली. त्यापूर्वी भाजप बरोबर असताना त्या युतीने २००७ व २०१२ अश्या सलग २ विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला होता. २००७ मध्ये भाजप १९ + अकाली दल ४३ अश्या ६२ जागा होत्या.‌ तर २०१२ मध्ये भाजप ९ व अकाली दलाला स्पष्ट बहुमत होते.

 

आता संपूर्ण वाताहत झाली आहे. आता अकाली दल भाजपशी पुन्हा युती करण्यास उत्सुक आहे. परंतु भाजपला आता निम्म्या जागा हव्या आहेत. केवळ २३ जागांवर भाजप ऐकणार नाही. आआपच्या भगवंत मान सरकारला पर्याय शोधण्याच्या प्रयत्नात पंजाबी मतदार आहेत.‌ कॅप्टन अमरिंदर सिंहना कॉंग्रेसने संपविल्यामुळे कॉंग्रेसला संधी खूप कमी आहे. भाजपप्रणित आघाडी हा एक पर्याय होऊ शकण्याची बऱ्यापैकी शक्यता आहे. 


In reply to by श्रीगुरुजी

पंजाबमध्ये भाजपने परत अकालींबरोबर युती करू नये. तसे केल्यास आपल्याच पायावर कुऱ्हाड मारल्यासारखे होईल. पंजाब हे शीख बहुसंख्येचे राज्य असले तरी हिंदू लोकसंख्या लक्षणीय आहे आणि हिंदू शहरी भागांमध्ये अधिक प्रमाणावर आहेत. 

ऐतिहासिक दृष्ट्या हिंदू आणि शीख तसे वेगळे नव्हते- दिल्लीतील धर्मांध मोंगलांपासून हिंदू समाजाचे रक्षण करायला म्हणून शीख संप्रदायाची स्थापना केली होती. तसेच हिंदू कुटुंबातील भावंडांपैकी सगळ्यात मोठा भाऊ शीख व्हायचा ही प्रथा ३-४ पिढ्यांपूर्वीपर्यंत चालू होती. त्यामुळे अनेक हिंदूंच्या विस्तारीत परिवारातील लांबचे नातेवाईक शीख मिळतात. मात्र सुरवातीला इंग्रजांच्या आणि त्यानंतर इंदिरा-संजय गांधींच्या घाणेरड्या राजकारणामुळे हिंदू आणि शीख यांच्यात दुरावा निर्माण झाला. कारण काहीही असले तरी दुरावा निर्माण झाला ही सत्य परिस्थिती आहे. भाजपची अकाली दलाशी युती असल्यामुळे हिंदू मतांपैकीही बरीच मते कॉग्रेसला जायची. 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाबात भाजपची कामगिरी खूप चांगली होती. जागा एकही जिंकली नसली तरी अकाली दलापेक्षा मते जास्त मिळवली आणि शहरी भागांमधून खूपच चांगली कामगिरी केली होती. पंजाबमध्ये लोकसभेच्या एका मतदारसंघात विधानसभेच्या ९ जागा असतात. त्यापैकी ९ च्या ९ जागा शहरांमध्येच असतील इतकी पंजाबमधील शहरे मोठी नाहीत. त्यामुळे लोकसभेच्या शहरी मतदारसंघातही आजूबाजूचा ग्रामीण भागही असतो. त्यामुळे लोकसभेची जागा जिंकली नाही तरी विधानसभेत शहरी भागांमध्ये चांगली कामगिरी करता येईलच. त्यात परत अकाली दलाशी युती असेल तर हिंदू मतदार परत कॉग्रेसकडे जाऊन नुकसान होईल. तसे व्हायला नको.

शीख मते आप, अकाली आणि कॉग्रेसमध्ये विभागली गेली आणि हिंदू मतांचे कॉन्सॉलिडेशन भाजपमागे झाले तर नक्कीच भाजपला पंजाबमध्ये चांगली कामगिरी करता येईल.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

२०२४ मध्ये थ्रिसूरमधून सुरेश गोपी जिंकले आणि भाजपने राज्यातून लोकसभेची पहिली जागा जिंकली ह्यात भाजपच्या करिष्मा दिसण्यापेक्षा सुरेश गोपी ह्यांचे क्रेझी फॅन फॉलोइंग खूप जास्त कारणीभूत आहे. मलयाळम सिनेमाचे एक मेगास्टार म्हणून त्यांची ओळख आहे. दुसरे म्हणजे केरळ मध्ये क्रिश्चन लॉबी भाजपकडे स्विंग झाली तरी त्यांच्या पवित्र्यात सावधानी खूपच जास्त होती/आहे. टॉम वडक्कन ह्यांच्यासारखे वरिष्ठ नेते आणल्यावर बहुसंख्य मध्य केरळातील क्रिश्चन डायॉसिसचे बिशप मोदींना/भाजप नेतृत्वाला भेटण्यास तयार झाले आहेत. ही सिच्युएशन, केरळातील दृष्टिकोनातून उत्साहवर्धक असली तरी जिथे मिशनरी धुमाकूळ अतोनात आहे अशा मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बंगाल इत्यादी राज्यांत सतत मिशनरी मंडळींच्या सोबत भांडणाऱ्या भाजपच्याच ग्राउंड कॅडरला आपल्या इलेक्ट्रेटला समजावणे जड जाऊ शकते. शिवाय लोकसभा वगैरे किंवा सार्वत्रिक निवडणुका वॉटर टाईट नसतात त्यामुळे भाजपला महाराष्ट्रात "मराठी बाणा" कुरवाळला तर कोअर हिंदी बेल्ट मध्ये uncomfortable होऊ शकते, so on and so forth. Besides, केरळातील सांस्कृतिक दृष्टीकोन प्रचंड वेगळे आहेत, बीफ खाणे हा तसलाच एक मुद्दा आहे. म्हणले तर लोकांच्या स्वयंपाकघरातील प्रश्न न म्हणले तर संवेदनशील मुद्दा. केरळातील जनतेला बीफ सेवन हा राजकीय मुद्दा असू शकतो हे गळी उतरवणे कठीण पडू शकते. परत त्यात इतर इलेक्ट्रेट दुखावण्याचा चान्स तितकाच.


In reply to by वृषभ खोंडे

या गोष्टी थोड्या 'सटल' पध्दतीने करता येऊ शकतात/ शकतील. गोव्यात आणि उत्तर पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये ख्रिश्चन मतदारांना बरोबर घेतले आहे. तरीही मग छत्तीसगड/झारखंड/ओरिसामध्ये त्रास व्हायचा प्रश्न आलेला नाही. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून थेट कोणतेही वक्तव्य न करता धर्मांतरणात न गुंतलेल्या गटांना बरोबर घेता येऊ शकेल. ते स्थानिक पातळीवर करता येईल. 

२०२४ मध्ये भाजपाने युपीत मार खाल्ला. त्यामागे चुकीचे उमेदवार देणे, भाजप मतदारांचा अती आत्मविश्वास (तशाही ४०० जागा येणार आहेत मग मी कशाला ४५ डिग्रीमध्ये मत द्यायला जाऊ) आणि त्याचबरोबर मोदींनी खरोखर ४०० जागा आणल्या तर काय या काळजीने विरोधी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मते देणे वगैरे महत्त्वाची कारणे आहेतच. पण त्याबरोबर एक कारण (तितके महत्त्वाचे नसले तरी) असावे असे मला वाटते. मोदींनी मुंबईतील सभेत राज ठाकरेंना सामील करून घेतले होते. राज ठाकरे या मनुष्याविषयी उत्तर भारतात बरेच प्रतिकूल मत आहे हे वेगळे सांगायला नकोच. राज ठाकरेंना बरोबर घेतल्याने खुद्द महाराष्ट्रात तरी किती फायदा झाला असेल हा पण संशोधनाचाच विषय आहे. पण झालाच असेल तर युपीत तोटा झाला असेल असे वाटते. इतकेच काय तर मुंबईतील उत्तर भारतीय मतेही त्यामुळे कमी झाली असतील ही पण शक्यता आहे. असले निरूपयोगी लोक खुद्द मोदींनी आपल्याबरोबर व्यासपीठावर का आणले असतील हा प्रश्न पडलाच होता. तसे काही केरळमध्ये व्हायला नको याची काळजी घेतील असे वाटते.  


In reply to by चंद्रसूर्यकुमार

२०१४ मध्ये राज ठाकरे मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी पाठींबा देत आहेत त्यावर तुमचे मत काय हा प्रश्न महाराष्ट्रात प्रचारासाठी आलेल्या राजनाथ सिंगांना पत्रकारांनी विचारला होता. तेव्हा राजनाथ सिंगांनी- त्यांचा पाठिंबा मागितला कोणी आहे? (उनका समर्थन मांगा किसने है?) असे म्हणून उडवून लावले होते. मते मिळवायला उपयोग शून्य आणि बरोबर घेतल्यास मते गमावायची भीती असलेल्या लोकांना कितपत महत्त्व द्यावे?  


In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुरुवातीला थोडे क्रिश्चन मेंटलिटी बद्दल - गोव्यात आणि उत्तर पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये ख्रिश्चन मतदारांना बरोबर घेतले आहे. तरीही मग छत्तीसगड/झारखंड/ओरिसामध्ये त्रास व्हायचा प्रश्न आलेला नाही. गोवा - पूर्वोत्तर भारत - दोन्ही कॉन्सॉलिडेटेड क्रिश्चन आहेत, ह्याचा अर्थ म्हणजे अग्रेसिव धर्मांतरण करणारे प्रकार तिथे मंदावले आहेत. गोव्यात तर inquisition नंतर असे फार काही ऐकण्यात नाही (मला वाटते साहना ह्यांचा त्यावर जास्त अभ्यास आहे) दुसरे म्हणजे नॉर्थ ईस्ट तिकडे तर आता मिझोरम मधील एका छोट्याशा जमातीला इस्रायलने १०वी हरवलेली जमात (टेंथ लॉस्ट ट्राइब) हा दर्जा दिला आहे आणि दरवर्षी त्या जमातीचे लोक इस्रायलला आलिया (पितृभूमीत जाऊन स्थाईक होण्याचा प्रवास) करतात. On the other hand, धर्मांतरी कारवाई छत्तीसगड/ झारखंड मध्ये जास्त आढळते optics मध्ये प्रचंड फरक आहे. बाकी केरळातील रीडिंग तुमचे आमचे more or less बऱ्यापैकी सेम पेज वर वाटते आहे.


आज 'ईक्विनॉक्स' म्हणजे विषुवदिन किंवा संपात दिन, ज्या दिवशी दिवस आणि रात्र समान आहेत. या दिवशी सूर्य बरोबर पृथ्वीच्या मध्यभागी असलेल्या विषुवृत्तावर येतो. त्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर सारखा पसरतो. महत्त्वाचे म्हणजे आता हळूहळू दिवस लहान आणि रात्री मोठ्या होऊ लागतात!

 

मग पृथ्वीप्रमाणेच आपल्या सूर्यमालेतील इतर ग्रहांवरही संपात दिन होतो का?


In reply to by निनाद

विषुवाच्या वेळी सूर्याची किरणे पृथ्वीच्या विषुववृत्तावर जवळजवळ लंब पडतात आणि सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या सरळ वर असतो. 

पृथ्वीप्रमाणेच इतर ग्रहांवरही विषुवदिन येतो. ग्रह सूर्याभोवती फिरताना अशी स्थिती येते की सूर्य त्या ग्रहाच्या विषुववृत्ताच्या सरळ वर येतो. त्यामुळे दोन्ही गोलार्धांना साधारण सारखाच सूर्यप्रकाश मिळतो.

पण प्रत्येक ग्रहावर दिवस-रात्र आणि ऋतू पृथ्वीसारखेच असतात असे नाही; ते त्या ग्रहाच्या अक्षाच्या झुकण्यावर अवलंबून असते.

मंगळ आणि शनि यांचे ऋतू पृथ्वीसारखे आहेत, तर युरेनस जवळजवळ आडवा असल्यामुळे त्याचे ऋतू वेगळे आहेत. 

इतर ग्रहांची स्थिती शोधून पहावी लागेल. 

 - (अखिल सूर्यमालेतील थोर खगोलशास्त्रज्ञ) कांदा लिंबू


In reply to by निनाद

रच्याक, 

संपात, वसंत संपात, सायन, निरयन, राहूबिंदू केतूबिंदू, मार्गी, वक्री, लग्न असे शब्द महाराष्ट्रीय पंचांग व इतर खगोलीय साहित्य वाचताना एकेकाळी अगदीच अपरिचित वाटायचे. AI ला योग्य ते प्रश्न विचारून त्यांचा योग्य अर्थ माहित करून घेतल्यापासून, ते समुद्रातील दीपगृहासारखे वाटतात! 

 

- (खगोल जिज्ञासू) कांदा लिंबू 


In reply to by श्रीगुरुजी

अशा परिस्थितीत सवर्ण नागरिकांनी स्वतःचे रक्षण कसे करावे? त्या प्राध्यापकांनी कसेही करून स्वतःला वाचवून हा देश सोडून दुसरीकडे कुठेतरी आश्रय घ्यावा.‌ ज्यांना शक्य आहे त्या सवर्ण नागरिकांनी सुद्धा पुरेसा अभ्यास करून, हा देश सोडून इतरत्र आश्रय घ्यावा हेच योग्य ठरेल असे वाटते.


मोदी सरकारने कडकपणे लागू केलेला हा ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणजे जणू काही औरंगजेबाने लादलेला जिझिया कर आहे!


In reply to by कांदा लिंबू

मिसळीला मजा ती काय उरणार ? ही अशी पलायनवादी मानसिकता काहीच कामाची नाही कारण ती नसलेला गिल्ट अटेस्ट करते. 

समाजात मी बघितला नाही म्हणून जातीयवाद नाही हे जर मानले असशील भावा तर आपण एकमेकांच्या तोंडावर मग्गा भर पाणी फेकून पावसाळा आल्याचे मानत आहोत इतके समज. 

समाजात atrocity कायद्याचा गैरवापर आहे का ? भरपूर आहे ! पण म्हणून लीगल शिक्षण घेणे सोडून किंवा ती माहिती ठेवणे सोडून पळून जाणे हा उपाय नाही. 

तसेही आपण पळून जाणार ते अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा इत्यादी. तिथे मारमार करून नागरिकत्वाला पोचताना परीक्षा द्यायचीच आहे एवीतेवी अन् तिच्यात त्यांचे कायदे अन् घटना पाठ करून जायची आहेच तर त्यापेक्षा इथेच पाच कायदे साधकबाधक माहितीत ठेवले तरी आरामात जगता येईल. 

(खमक्या) खोंडे


In reply to by श्रीगुरुजी

दुर्दैव आहे.

जेंव्हा अपात्र व्यक्तीला एका high stress वातावरणात ढकलले जाते तेंव्हा त्याचा प्रचंड मानसिक दबाव त्या कोवळ्या मनावर होणे साहजिक आहे. सदर विद्यार्थी इतर कुठे असता तर त्याच्यावर हि परिस्थिती ओढवली नसती. आता त्याच्या मृत्यूवरून इतर लोक राजकारण खेळतील. 


In reply to by साहना

आता त्याच्या मृत्यूवरून इतर लोक राजकारण खेळतील. 

राजकारण खेळणं त्याच्या आत्महत्येच्या दुसऱ्या दिवशीच सुरू झालं! लगोलग माध्यमांमधील मांडणीही "विद्यार्थ्याला परीक्षेत कॉपी करताना पकडले" यावरून "सवर्ण प्राध्यापकाकडून दलित विद्यार्थ्यावर जातीय अत्याचार" यावर वळली. 

 

 


In reply to by कांदा लिंबू

माध्यमांमधील मांडणीही "विद्यार्थ्याला परीक्षेत कॉपी करताना पकडले" यावरून "सवर्ण प्राध्यापकाकडून दलित विद्यार्थ्यावर जातीय अत्याचार" यावर वळली. 

खरं की काय ? मग तो सीसीटीव्ही व्हिडिओ वगैरे काय दाखवत होती चॅनल्स ? 


In reply to by वृषभ खोंडे

एकदा गाडी वळली आणि सरळ केली नाही तर ती वळतच रहाते...इकडून तिकडे... तिकडून पलिकडे... पलिकडून... असे करता करता परत पहिले वळण आले की सरळ करता येते. मधूनच केले तर मोसम तुटतो ना राव... 

 

-डायवर जोशी


In reply to by राज जोशी

वळणावळणाच्या प्रवासात गाडी लागल्यास (म्हणजे मळमळ झाल्यास) वांतीच्या गोळ्या मागून घेणे 

(वाहक) खोंडे


बँक कर्मचारी संघटनांचा राष्ट्रव्यापी संप

बँक कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २८ सप्टेंबरपासून तीन दिवसांचा संप राष्ट्रव्यापी संप पुकारला आहे. पाच दिवसांचा कामाचा आठवडा असावा ही त्यातील एक मागणी आहे.

हे मागणी न्याय्यच म्हणावी लागेल आणि माझा व्यक्तिशः या मागणीला पाठिंबा आहे (अर्थात, माझ्या पाठिंब्याला विचारतो कोण म्हणा!). पण या संपामुळे सलग पाच दिवस काम बंद राहण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून सर्व सरकारी बँका, ग्रामीण बँका रविवार २६ सप्टेंबर ला दिवसभर सुरु राहतील असे आदेश केंद्राने काढले आहेत.

पण जोडसुट्टीला धरून संप वा बंद करणे हा प्रकार पंधरा-वीस वर्षांपूर्वी, स्वतंत्र तेलंगाणा मागणीसाठी बहुधा तेलंगाणा राष्ट्र समिती या त्या आंदोलनातील प्रमुख पक्षाने सुरु केला होता. त्यावेळी शासकीय कार्यालयांना सहा दिवसांचा आठवडा होता. रविवार धरून सलग किंवा एक दिवसाआड सुट्ट्या आल्या की त्यानुसार हमखास बंद पुकारला जायचा. मग सर्वांना सलग किमान तीन दिवस सुट्ट्या मिळायच्या व सर्वच जण खुश व्हायचे. अर्थात हे बंदचे मुख्यतः प्रकार शाळा कॉलेजेस व काही अंशी खाजगी आस्थापने यांपुरते मर्यादित असायचे तरीही सलग किमान तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या म्हणून अनेक लोक्स अजून एक दिवस दांडी मारायचे व मज्जा करायचे!  

२०१४ मध्ये संयुक्त आंध्र प्रदेशातून तेलंगाणा स्वतंत्र झाला व हे बंदचे प्रकार बंद पडले!

- (तेलंगाणा निवासी) कांदा लिंबू 


चौकशी अजून पूर्ण झाली नसताना साहिल वाकोडे कॉपी करताना सापडला असे धडधडीत विधान करणे किंवा आडमार्गाने त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करणे... तसेच राखीव प्रवर्गातून आला असेल तर सरसकट त्याच्यावर 'अपात्र व्यक्ती' असा शिक्का मारणे...  अतिशय खेदकारक आहे. काल लोकसत्ताने त्यावर अग्रलेख लिहिला होता आणि आज सरळ आकडेवारीच प्रसिध्द केली आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या परीक्षांतील ओबीसी, एस सी एस टी वर्गाचा कट ऑफ इ ड्ब्लू एस प्रवर्गापेक्षा जास्त आहे. आणि तफावत बरीच आहे! अजून काय पाहिजे? https://www.loksatta.com/nagpur/mpsc-exam-cut-off-analysis-obc-sc-higher-than-ews-reservation-trends-zws-70-6152629/


अर्थात ज्यांना मान्यच करायचे नाही त्यांना काहीही सांगितले तरी फरक पडत नाही.


In reply to by स्वधर्म

चौकशी पूर्ण झाली नसताना त्याचा प्राध्यापकांनी जातीमुळे छळ केला असे आरोप खेदकारक नाहीत का? 

 

तुम्ही जातीची ढाल पुढे करून वाटेल ते आरोप सुरू केल्यावर विरूद्ध बाजूकडून प्रत्त्युत्तर येणारच. 


राज्यातील अनेक महत्त्वाच्या परीक्षांतील ओबीसी, एस सी एस टी वर्गाचा कट ऑफ इ ड्ब्लू एस प्रवर्गापेक्षा जास्त आहे. आणि तफावत बरीच आहे! अजून काय पाहिजे?

मराठा समाजाला आरक्षण मिळून काहीही फायदा होणार नाही. मुळात मराठा समाज हा कधीच सामाजीक दृष्ट्या मागास नव्हता. 


In reply to by आग्या१९९०

>> मुळात मराठा समाज हा कधीच सामाजीक दृष्ट्या मागास नव्हता. 

सहमत कारण सुप्रीम कोर्टानेच तसा निकाल दिला आहे.

>> मराठा समाजाला आरक्षण मिळून काहीही फायदा होणार नाही.

परंतु मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यामुळे ओबीसींचा मात्र तोटा झाला आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांत खासकरून पिंपरी चिंचवड मध्ये अनेक मराठा उमेदवारांनी कुणबी दाखले काढून मूळ ओबीसी लोकांची उमेदवारी कापून जागा घेतल्या आहेत. तसेच उदाहरण दौंड नगराध्यक्ष पदाचे आहे. सातारा जिप अध्यक्षपदाच्या विद्यमान आमदाराच्या पत्नीचे कुणबी सर्टीफिकेट एका रात्रीत मिळवून त्यांनी अध्यक्षपद मिळवले आहे.
दोन समाजात दुही निर्माण झाली आहे. या विषयावर इथे लेख लिहिला होता: सारे काही एकाच जातीसाठी


In reply to by स्वधर्म

असं खरंच होत असेल तर चांगलंच आहे. आरक्षण म्हणजे आपला जन्मजात अधिकाराच आहे असं मिळालेल्या जातींना वाटतंय. एकदा मिळालं की कोण स्वतःहून सोडणार नाही. साधं उपवर्गीकरणही मान्य नाही. एकाच घरात जास्त वेळा आरक्षणाचा लाभ उठवणारे भरपूर आहेत.

त्यामुळे मराठा आंदोलनाला माझा तर पाठिंबा आहे. ब्राम्हण लोकांनी पण आंदोलन करायला पाहिजे.


महाराष्ट्र सरकारचा निर्णय बघा मंडळी धारावी पुनर्विकास अदानी समूहाला द्यायचा होता ठीक आहे दिला काय जे बिडिंग झाले असेल ते. आधी ठरवले की सर्वे करून धारावी पुनर्विकासात ज्यांना घर मिळेल ते १० वर्षापर्यंत त्या घराचा मालकीहक्क ट्रान्स्फर करू शकणार नाहीत पर्यायाने घर विकू शकणार नाहीत. आता सरकार म्हणते आहे की तो क्लॉज काढून टाकू. म्हणजे धारावी पुनर्विकास होणार, तिथे घरे मिळाली की रहिवासी ती विकून खाणार अन् परत तिसऱ्या जागी झोपडपट्टी उभारणार ! उभारलेली झोपडपट्टी रेग्युलर करायला मायबाप सरकार तत्पर आहेच अगदी. झाली अशाने मुंबई झोपडपट्टीमुक्त !  

जय हो !

(अर्बन प्लॅनर) खोंडे


 

मुळात सुरुवातीपासून (स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच)  सरकारने झोपडपट्टी पुनर्वसनात फुकट दिलेली घरे हि मालकी तत्वावर न देता भाडे तत्त्वावरच द्यायला हवी होती म्हणजे ती विकून परत झोपडी बांधून फुकटचे पदरात पाडण्याची वृत्ती बोकाळली नसती.

 

या शिवाय कोणतीही गोष्ट फुकट मिळणे हा आमचा अधिकारच  आहे या वृत्तीलाच चाप बसला असता.

 

सरकार कुणालाही काही देऊ शकत नाही  एकाकडून काढूनच ते दुसऱ्याला दिले जाते.      


बिहारातील बेगुसराय मध्ये सरळ फोनमध्ये बघून परीक्षा पेपर लिहिला जात आहे. ऍट्रॉसिटी ऍक्ट लागू नये म्हणून कुणी पर्यवेक्षण करायला तयार नाही.

मोदीबा, अजब तुझे सरकार! 
 

 

https://www.youtube.com/watch?v=eBOL-nRHu4M 

 


In reply to by कांदा लिंबू

जो पर्यंत SC/ST कायदा आहे तो पर्यंत नाईलाज म्हणून SC/ST लोकांशी कसलाही व्यवहार किंवा संबंध टाळणे शहाणपणाचे आहे. संबंध ठेवला नाही तरी सुद्धा लोक घरी जबरदस्तीने येऊन तुमच्यावर कायदा लादू शकतात पण संबंध जितके कमी ठेवलं तितके जास्त चांगले. 


rediff.com/news/report/court-allows-7-foreign-nationals-in-drone-warfare-case-to-go-home-for-a-month/20260925.htm

 

म्यानमारमधील वांशिक सशस्त्र गटांशी संबंधित कथित ड्रोन-युद्ध प्रशिक्षण शिबिराबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) तपास सुरू असलेल्या एका प्रकरणात अटक करण्यात आलेल्या, कथित अमेरिकन भाडोत्री सैनिक मॅथ्यू अ‍ॅरॉन व्हॅन डायक आणि सहा युक्रेनियन नागरिकांसह सात परदेशी नागरिकांना दिल्लीतील एका न्यायालयाने एका महिन्यासाठी आपापल्या देशांत जाण्याची परवानगी दिली आहे.

आवश्यक औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी या आरोपींची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

न्यायालयाने त्यांना डिफॉल्ट जामीन मंजूर करून काही अटींच्या अधीन राहून देश सोडण्याची परवानगी दिल्यानंतर, त्यांना युनायटेड स्टेट्स (अमेरिका) आणि युक्रेनमध्ये जाण्याची अनुमती देण्यात आली.

प्रवासाची परवानगी देण्यामागील न्यायालयाचा युक्तिवाद

विशेष एनआयए (NIA) न्यायाधीश प्रशांत शर्मा यांनी गुरुवारी दिलेल्या आदेशात नमूद केले की, परदेश प्रवास करण्याचा अधिकार हा संविधानाच्या कलम २१ अंतर्गत दिलेल्या मूलभूत हक्कांचाच विस्तार आहे आणि यामध्ये समतोल साधणे आवश्यक आहे.

न्यायालयाने नमूद केले की, सहा युक्रेनियन नागरिकांना १८ सप्टेंबर रोजी 'इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अ‍ॅक्ट, २०२५' च्या कलम २१ आणि २३ अंतर्गत आरोपमुक्त करण्यात आले होते, तर व्हॅन डायक यांना २५ सप्टेंबर रोजी आरोपमुक्त करण्यात आले.

फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस (FRRO) द्वारे हे गुन्हे तडजोडीने निकाली काढण्यात (compounded) आले असून, प्रत्येक आरोपीवर ५.५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

 

-- 

पुच्छ ते मुरडिलें कोठे, हाती कंकणे बरी ! 
 


दिल्ली उच्च न्यायालयाने 'कॉक्रोच जनता पार्टी'चे नेते सौरभ दास, अभिजित दीपके, आशुतोष रंका आणि रत्ना सिंह यांना नोटिसा बजावल्या आहेत. पंतप्रधान आणि एका महिलेचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

 

The plea has been filed by the woman alleging that the CJP leaders ran a vicious, coordinated cyber-assault, public character assassination using deepfake technology.

 

 

The woman has alleged that the CJP leaders have unauthorizedly harvested her personal photograph and used AI face-swapping tools to morph her face onto a “highly vulgar and compromising image” alongside the Prime Minister of India.

 

 

“The perpetrators printed physical banners of this morphed picture, paraded them in massive crowds, raised sexually suggestive and derogatory slogans, and maliciously uploaded videos onto Instagram and other social media platforms,” the plea says.

 

It adds: “They further sank to absolute depravity by uploading and distributing the Petitioner's morphed non-consensual explicit Photos onto various pornographic websites.”

 

The court also issued notice to Meta Platforms and directed the platform to immediately remove within 24 hours the access to the "objectionable content" from the social media managed by it.

 


In reply to by श्रीगुरुजी

हे प्रकरण अतिशय गंभीर आहे.

कोणत्याही महिलेचे चारित्र्यहनन करणे हे अतिशय गंभीर कृत्य आहे. यातील आरोपींना दोषी आढळल्यास कठोर शिक्षा व्हायला हवी.


In reply to by कांदा लिंबू

तो विशेष संरक्षण असलेल्या गटातील आहे. त्याच्यावर केस करणाऱ्यालाच शिक्षा होणार.‌


In reply to by श्रीगुरुजी

दोन्ही चित्रांत कसलाही भेद नाही. तीच क दर्जाची कॉमेडी व कॉमेडीयन!


In reply to by कांदा लिंबू

दोन्ही चित्रे लक्षपूर्वक पहा. लगेच लक्षात येईल. दोन्ही चित्रात एक महत्त्वाचे वेगळेपण आहे. 


In reply to by कांदा लिंबू

पहिल्या चित्रातील वरच्या ओळीतील सर्वात उजवीकडे असलेली कारस्थानी व्यक्ती दुसऱ्या चित्रात अचानक नाहिशी झाली आहे. 😂😍🤫


मतचौर्याचे शिल्पकार -

 

१९५२ मध्ये, नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन डॉ. आंबेडकरांनी उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली. तथापि, त्यांना नेहरूंच्या काँग्रेसकडून प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला, ज्यांनी नारायण काजरोळकर नावाच्या एका दूधविक्रेत्याला आपला उमेदवार म्हणून उभे केले होते. या आव्हानात भर म्हणून, श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पक्षाने डॉ. आंबेडकरांना 'देशद्रोही' ठरवून त्यांच्या विरोधात उघडपणे प्रचार केला.

 

नेहरूंनी स्वतः डॉ. आंबेडकरांविरुद्ध प्रचार करण्यासाठी दोनदा मुंबईला भेट दिली, तर डांगे यांनी त्या दलित नेत्याची बदनामी करणारी पत्रके वाटली. या प्रयत्नांदरम्यान, निवडणुकीत हेराफेरी आणि अवैध घोषित  केलेल्या मतांच्या वृत्तांसह, निवडणूक अयोग्य प्रकारांचे आरोप समोर आले. डॉ. आंबेडकरांचा सुमारे १४ हजार मतांनी पराभव झाला.  त्या निवडणुकीत तब्बल ७४ हजार मते अवैध ठरविली होती.

 

 


In reply to by श्रीगुरुजी

म्हणजे नेहरुजी रचती पाया मोदीजी झालेसी कळस म्हणता आहात ! चांगलंय.


ग्यानेश कुमार ह्यांनी मला भाजपच्या तिकिटावर केरळम विधानसभा निवडणूक लढविण्याचा "मैत्रीपूर्ण सल्ला" दिला होता - जीजी थॉमसन, निवृत्त मुख्य सचिव केरळम 

 

हे खरे असल्यास सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स, १९६४ मधील रूल क्रमांक ५ आणि त्याची कैक उपकलमे ह्यांच्या कॉन्ट्रावेंशन मधे असतील ग्यानेश कुमार ! 

मुळात सी.सी.एस., १९६४ रूल क्रमांक पाच म्हणतो - Do not join political parties or take part in election canvassing. 

ह्यात कॅनव्हासिंग हा शब्द ठळक महत्वाचा आहे. भाषणस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार ग्यानेश कुमारांना असला तरी तो टच विथ पार्लमेंटरी प्रेविलेजेस आहे.  मुख्य निवडणूक आयुक्त ह्यांचे घटनात्मक स्थान सुप्रीम कोर्टाच्या जज सारखे आहे, त्यांना कोणीही "काढून टाकू" शकत नाही तर त्यासाठी एक महाभियोग चालवून पूर्ण पार्लमेंटरी प्रक्रियेने महाभिगोय संसदेच्या दोन्ही भवनात चालवावा लागतो, त्याशिवाय, मुख्य निवडणूक आयुक्ताला लीगल इम्युनिटी असते.

 बरं भाषण स्वातंत्र्य प्रेसिडेन्स घेते म्हणले तरी जर एखाद मुळशी तालुका तहसीलदाराने पुरंदर तालुका तहसीलदाराला तू निवडणूक लढव मित्रा म्हणणे वेगळे आणि भारताच्या विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्ताने एका राज्याच्या निवृत्त मुख्य सचिवाला "तू अमक्या पार्टीकडून निवडणूक लढ" असे सुचवणे अतिशय बेजबाबदार, व्यावसायिक आणि बऱ्यापैकी शेडी वागणे आहेच. 

खासकरून ते निवृत्त मुख्य सचिव आणि तुम्ही एकाच स्टेट कॅडरचे असताना, तुम्ही स्टेट कॅडर मध्ये असतात ते तुम्हाला ८ वर्षे सिनियर असताना आणि तुम्ही ज्या पार्टी कडून लढा असा मैत्रीपूर्ण सल्ला त्या निवृत्त मुख्य सचिवाला देता आहात ती नेमकी क्रिश्चन उमेदवार शोधत असताना तर असे सल्ले देणे ते पण भारतातील एखाद अतिशय पावरफुल घटनात्मक पोस्टवर राहून नक्कीच चिंतेचा विषय आहे. 

 

(घटनादत्त) खोंडे.


क्रमांक ५, सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स, १९६४ मधील इतर तरतुदी ठळक स्वरूपात खालीलप्रमाणे 

१. राजकीय संलग्नता (Political Affiliation): कोणताही शासकीय कर्मचारी कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य असू शकत नाही किंवा त्यांच्याशी संबंधित राहू शकत नाही.

 २. राजकीय चळवळी (Political Movements): कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा उपक्रमात भाग घेऊ नये, त्यासाठी निधी किंवा साहाय्य देऊ नये किंवा इतर कोणत्याही प्रकारे मदत करू नये. 

३. निवडणुकीतील हस्तक्षेप (Election Interference): कर्मचारी कोणत्याही विधिमंडळ किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रचार करू शकत नाहीत, हस्तक्षेप करू शकत नाहीत, आपल्या प्रभावाचा वापर करू शकत नाहीत किंवा भाग घेऊ शकत नाहीत. कोणत्याही उमेदवाराच्या नामांकनाचा प्रस्ताव मांडण्यास किंवा त्याला दुजोरा देण्यास पूर्णपणे बंदी आहे.

 ४. मतदानाचा अधिकार (Right to Vote): पात्र शासकीय कर्मचारी त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करू शकतात, परंतु त्यांनी कोणाला मतदान केले आहे किंवा ते कोणाला मतदान करणार आहेत, हे जाहीर किंवा सूचित करता कामा नये. 

५. कुटुंबातील सदस्य (Family Members): शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांनी कायद्याने स्थापित सरकारविरुद्ध विध्वंसक (subversive) ठरेल अशा कोणत्याही कार्यात भाग घेऊ नये, याची काळजी घेणे हे संबंधित कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. 

(कायदे) पंडित खोंडे


In reply to by वृषभ खोंडे

जीजी थॉमसन यांनी तक्रार करून आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ पुरावे दिल्यास जरूर ज्ञानेश कुमारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी. जर जीजी थॉमसन यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केल्यास त्यांच्या म्हणण्याला वजन प्राप्त होईल. नाहीतर त्यांच्या आरोपांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही. असे आरोप आल्यानंतर विरोधक लगेच ते गॉस्पेल ट्रुथ आहे अशाप्रकारे त्यावर उड्या मारणार आणि सत्ताधारी त्याकडे दुर्लक्ष करणार. अशा प्रकारांमधून आपल्यासारख्या सामान्यांचे मनोरंजन होण्यापेक्षा अधिक काही साध्य होत नाही.

 

असे वरीष्ठ अधिकाऱ्याने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करायची घटना पूर्वी झाली आहे का? नक्कीच. २०१३ मध्ये सीबीआय चे तत्कालीन संचालक रणजीत कुमार यांनी कोलगेट प्रकरणात तपासासंबंधीची माहिती सरकारला दिली होती हे आधी प्रतिज्ञापत्र दाखल करून कबुल केले होते. त्यावर न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांवर वरून आलेल्या आदेशांवरून तपास प्रभावित केला होता हे पण नंतर मान्य केले. न्यायालयात प्रतिज्ञापत्र शपथेवर दाखल केले जाते. प्रतिज्ञापत्रात केलेला दावा खोटा असेल हे नंतर सिध्द झाले तर असे प्रतिज्ञापत्र दाखल करणाऱ्यावर कारवाई होऊ शकते. अशाप्रकारे आपण केलेला दावा खोटा आहे हे सिध्द झाले तर कारवाईची शक्यता असतानाही जर कोणी असा कोणता दावा केला तरच त्या दाव्याला अधिक वजन प्राप्त होते. 

 

असे अजून एक उदाहरण (एकदम थेट संबंधित नाही पण काहीसे सारखे). १९८७ मध्ये बोफोर्स कंपनीच्या एक्स्टर्नल ऑडिटरने भारताला हॉव्हित्झर तोफा विकायचे कंत्राट आपल्याला मिळावे म्हणून कंपनीने भारतात लाच दिली होती असे ताशेरे आपल्या ऑडिटर रिपोर्टमध्ये ओढले होते. ऑडिटरने अशी कोणती माहिती जाणीवपूर्वक लपवली किंवा रिपोर्टमध्ये खोटी विधाने केली हे सिध्द झाल्यास संबंधित चार्टर्ड अकाऊंटंटचा परवाना रद्द होतो आणि त्याला भविष्यात कोणत्याही कंपनीचे ऑडिट करता येत नाही. हा नियम सगळ्या जगात पाळला जातो. या पार्श्वभूमीवर जर ऑडिटरने असे विधान त्यांच्या अहवालात केले असेल तर त्या विधानाला वजन प्राप्त होते. नुसते हवेत विधान केले तर त्याला काही अर्थ नाही. 

 

बाकी जीजी थॉमसन यांना असे गदारोळ निर्माण करायची क्षमता असलेले वक्तव्य करण्यामागे सत्ताधारी जरी असले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. जितका काळ विरोधक ज्ञानेश कुमार हा खुळखुळा हातात घेऊन खेळत बसतील तितके भाजपला चांगले. ते युपी निवडणुकांवर पूर्ण लक्ष केंद्रीत करतील आणि विरोधक तो खुळखुळा घेऊन खेळण्यात वेळ व्यर्थ दवडतील.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

मुळात ज्ञानेशकुमारांनी कोणता गुन्हा केलाय की त्याविरोधात थॉमसने न्यायालयात जावे किंवा प्रतिज्ञापत्र द्यावे? 


In reply to by श्रीगुरुजी

जीजी थॉमसन यांचा दावा खरा असेल तर ज्ञानेशकुमारांनी त्यांना भाजपचे उमेदवार म्हणून २०१९ ची लोकसभा निवडणुक लढविणार का असे विचारले होते. सरकारी नोकरी करणारा कोणीही  कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नको आणि पूर्णपणे निष्पक्ष हवा. तुम्ही भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुक लढविणार का हे पक्षाच्या कोणा नेत्याने विचारणे आणि कोणा सरकारी नोकराने विचारणे यात फरक आहे. आणि हे काम करायला भाजपने ज्ञानेश कुमारांचीच का निवड केली?त्याचा अर्थ ते भाजपशी जवळीक राखून होते- तस्मात त्यांच्या निष्पक्ष असण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहते. हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियमावलीचा भंग आहे.

 

अर्थात थॉमसन यांचा तो दावा खरा असेल तर....

 

 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

भाजपचा उमेदवार म्हणून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढणार का असे ज्ञानेशकुमारांनी समजा विचारले असेल तरीही त्यावरून ते भाजपशी संबंधित आहेत  आणि निष्पक्ष नाहीत असा अजिबात अर्थ काढता येत नाही. कदाचित थॉमस राजकारणात जाणार आहेत अशी कुणकुण त्यांनी ऐकली असेल किंवा सहज गप्पा मारताना विचारलं असेल. २०१९ मध्ये असे घडले असेल तर पुढील ७ वर्षांत अजून काही वेळा ज्ञानेशकुमारांची भाजपश जवळीक दिसली असती. पण तसे कधीच दिसले नाही. तसेच ७ वर्षांनंतर असे सांगणे निरर्थक आहे कारण तसे ऐकणारा कोणी साक्षीदार होता का, ७ वर्षे गप्प का होता हे प्रश्न येणारच. 

 

मी तर म्हणतो की थॉमसनची भाजप विरोधी पक्षांशी जवळीक आहे. म्हणून तर ज्ञानेशकुमार चर्चेत असताना यांनी जाणूनबुजून पुडी सोडून दिली जेणेकरुन विरोधी पक्षांना मुद्दा देता येईल.‌

 


In reply to by श्रीगुरुजी

नुसता प्रश्न जरी विचारला असला तरी ते सरकारी नोकरांच्या नियमावलीच्या लेटरमध्ये कल्पना नाही पण स्पिरीटमध्ये तरी बसणारे नाही(*). समजा थॉमस राजकारणात जाणार ही कुणकुण ऐकली जरी असली तरी नुसते तुम्ही निवडणुक लढविणार का हे विचारणे वेगळे आणि तुम्ही भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुक लढविणार हे विचारणे वेगळे. थॉमस यांच्या मते ही घटना २०१६ मध्ये झाली. तेव्हा २०१९ ची लोकसभा निवडणुक ३ वर्षे दूर होती. आणि तरीही नुसती निवडणुक लढविणार का हा प्रश्न नाही तर इतर कोणत्या पक्षाचा उल्लेख न करता भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुक लढविणार का आणि ते ही पथनमथिट्टा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणुक लढविणार का इतका स्पेसिफिक प्रश्न विचारला असल्यास तो का विचारला- ज्ञानेश कुमारांची भाजपशी जवळीक होती का हा प्रश्न पडू शकतो. 

आणि समजा त्यांनी असा प्रश्न विचारलेला थॉमस यांना आवडले नसेल तर त्यानंतर थॉमस निवृत्त होईपर्यंत त्यांनी ज्ञानेश कुमारांविरोधात काही केले का हा पण प्रश्नच आहे. कॉर्पोरेटमध्ये 'appraisal' असते तसा सरकारी नोकरीत गोपनीय अहवाल असतो. त्यावेळेस ज्ञानेश कुमार थॉमस यांच्यापेक्षा किती कनिष्ठ होते याची कल्पना नाही पण कॉर्पोरेटमध्ये होते त्याप्रमाणे किमान दोन पातळ्या खालच्या (कदाचित जास्तही) अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल थॉमस यांच्या स्वाक्षरीने पुढे जात असतील हे म्हणायला नक्कीच जागा आहे. आपल्या वरीष्ठाला न आवडणारे काहीतरी- आणि त्यातही कामाशी संबंधित नसलेले काहीतरी बोलताना सगळेच अधिकारी दहादा विचार करत असतीलच. मग त्या घटनेनंतर ज्ञानेशकुमारांविषयी त्या गोपनीय अहवालात टोन बदलला होता का? कल्पना नाही.

अर्थात या जरतरच्या गोष्टी. मुळात तो प्रश्न तोंडी विचारला असेल तर त्याचा काहीही पुरावा नाही. त्यामुळे या तथाकथित आरोपातून नुसता धुराळा उडण्याव्यतिरिक्त काहीही साध्य होणार नाही ही गोष्ट पण तितकीच खरी.

 

*: तशा सरकारी नोकरांच्या स्पिरीटमध्ये न बसणाऱ्या कित्येक गोष्टी भारतात होत आल्या आहेत. टी.एन.शेषन मुख्य निवडणुक आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर तीन वर्षांनी १९९९ मध्ये कॉग्रेसचे उमेदवार म्हणून  गांधीनगरमधून लालकृष्ण अडवाणींविरोधात लढले होते. त्यांच्या नंतरचे मुख्य निवडणुक आयुक्त एम.एस.गिल तर मनमोहनसिंग यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. तसे असेल तर दोघांनीही पदावर असताना कॉग्रेसला अनुकूल निर्णय घेतले होते का हा प्रश्न पडणारच.  तसेच आतापर्यंत अनेक आय.ए.एस अधिकाऱ्यांनी पण स्वत: कोणत्या राजकीय पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवली आहे. त्यांनी पदावर असताना संबंधित राजकीय पक्षाला अनुकूल निर्णय घेतले होते का हा पण प्रश्न पडणारच.  आणि तसेही स्वत: निवडणुक लढविण्यापेक्षा दुसऱ्याला तुम्ही निवडणुक लढविणार का हे विचारणे हा त्यामानाने बराच कमी स्पिरीटचा भंग झाला (झाला असेलच तर)


In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वत: निवडणुक लढविण्यापेक्षा दुसऱ्याला तुम्ही निवडणुक लढविणार का हे विचारणे हा त्यामानाने बराच कमी स्पिरीटचा भंग झाला (झाला असेलच तर)

ही तर प्रतारणा म्हणवली जाईल पदावर असताना केलेली सरकारतर्फे, ट्रेडिशनली आपल्याशी संलग्न नसणाऱ्या धार्मिक गटातील एका वरिष्ठ निवृत्त नोकरशहाला ते पण अशा एका राज्यातील जिथे कधीच आपले वैधानिक अस्तित्व नव्हते राज्य सदनात हे कमी वाटत नाही तर प्रॉपर भाजपसाठी सीट विक्री करण्याचा साईड बिझनेस वाटतो लॉबिंगचा.


In reply to by वृषभ खोंडे

प्रॉपर भाजपसाठी सीट विक्री करण्याचा साईड बिझनेस वाटतो लॉबिंगचा.

ज्ञानेश कुमारांनी असे विचारले असलेच तर ते माझ्यासारख्या समर्थकांना काही प्रमाणावर गैर आहे असे वाटेल पण इतर गैर गोष्टी होत आल्या आहेत त्यापेक्षा कमी गैर असे वाटेल. काही समर्थकांना काहीच गैर नाही असे वाटू शकेल. तर विरोधकांपैकी काहींना तो पक्षपातीपणा असल्याने नियमभंग झाला असे वाटेल तर काही विरोधकांना तो लॉबिंगचा साईड बिझनेस वाटेल.

अशा सगळ्या गोष्टी वाटणे हे आपण कोणत्या बाजूला आहोत यावर अवलंबून असते. 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

यशवंत सिन्हा सुद्धा पूर्वी सनदी अधिकारी होते.‌ मीरा कुमार, नटवरसिंह, मणी शंकर अय्यर, ससिकांथ सेंथिल, अजित जोगी (सर्व कॉंग्रेस), अश्विनी वैष्णव, ओ पी चौधरी (दोन्ही भाजप) है सुद्धा सनदी अधिकारी होते. यांनी नंतर अधीकृतरित्या राजकारणात प्रवेश केला.‌


In reply to by श्रीगुरुजी

इतरही अनेक नावे आहेत. 

आय.ए.एस

१. एस.कृष्णकुमार- राजीव गांधी आणि नरसिंह रावांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. आता भाजपमध्ये.

२. जगमोहन- १९८० च्या दशकाच्या शेवटापर्यंत कॉग्रेसला जवळ होते पण १९९६, १९९८ आणि १९९९ या लोकसभा निवडणुका भाजपचे उमेदवार म्हणून जिंकले. वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते.

३. कन्नन गोपीनाथन- हे त्यामानाने कनिष्ठ अधिकारी होते. २०१९ मध्ये ३७० कलम काढल्याचा निषेध म्हणून त्यांनी भाप्रसेचा राजीनामा दिला आणि आता कॉग्रेसमध्ये सामील झाले आहेत.

४. के. अल्फान्सो- मोदी सरकारमध्ये मंत्री होते.

५. अपराजिता सारंगी- सध्या ओरिसातून भाजप खासदार आहेत

६. अविनाश धर्माधिकारी- त्यांनी कोणती निवडणुक लढवली नाही पण काही काळ ते शिवसेनेचे सदस्य होते. आणि आय.ए.एसचा राजीनामा दिल्यानंतर अनेक वर्षांनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

आय.पी.एस

१. किरण बेदी- काही काळ भाजप सदस्य होत्या. निवृत्त झाल्यानंतर अनेक वर्षांनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

२. के.अण्णामलाई- २०२० ते २०२६ हे ६ वर्षे भाजपमध्ये होते. २०२४ मध्ये कोईमतूरमधून भाजपचे उमेदवार होते.

३. सत्यपालसिंग- मुंबईचे पोलिस आयुक्त पदाचा राजीनामा देऊन २०१४ आणि २०१९ मध्ये ते भाजप उमेदवार म्हणून बागपतमधून जिंकले.

४. पी.व्ही.रंगय्या नायडू- कॉग्रेसकडून लोकसभा सदस्य आणि नरसिंह रावांच्या मंत्रीमंडळात उपमंत्री होते

 

भारतीय परराष्ट्रसेवेतील अधिकाऱ्यांना त्यामानाने कोणत्याही पक्षाला झुकते माप द्यायची संधी आय.ए.एस आणि आय.पी.एस अधिकाऱ्यांपेक्षा कमी असते. तरीही नटवरसिंग, मीरा कुमार, एस.जयशंकर यांनी राजकारणात प्रवेश केला. जयशंकर यांनी लोकसभेची निवडणुक लढवलेली नाही पण ते भाजपचे सदस्य आहेत. माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन पण आय.एफ.एस अधिकारी होते. १९९२ मध्ये उपराष्ट्रपती बनण्यापूर्वी ते तीन वेळा कॉग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते.

 

त्या व्यतिरिक्त अरविंद केजरीवालांसारखे आय.आर.एस अधिकारीही आहेत. तसेच पंजाबमध्ये सुखबन्स कौर भिंदर म्हणून कॉग्रेसच्या नेत्या होत्या. त्या गुरदासपूरमधून सहा वेळा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. सहा वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या त्या एकमेव स्त्री नेत्या आहेत. त्यांचे पती आय.पी.एस अधिकारी प्रितमसिंग भिंदर आणीबाणीच्या वेळेस दिल्लीचे पोलिस आयुक्त होते आणि तेव्हा खूप बदनाम झाले होते.

 

न्यायाधीशांनीही राजकारणात प्रवेश करायचे प्रकार अनेक झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हरी रामचंद्र गोखलेंनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला आणि ते आणीबाणीच्या वेळेस इंदिरा गांधींच्या मंत्रीमंडळात कायदामंत्री होते. अलीकडच्या काळात अभय ठिपसे हे पण न्यायाधीश कॉग्रेसमध्ये आहेत. १९७३ मध्ये इंदिरा गांधींनी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांची सेवाज्येष्ठता डावलून ए.एन.रे यांना मुख्य न्यायाधीश नेमले होते. त्या तीन पैकी एक के.एस.हेगडे जनता पक्षाचे उमेदवार म्हणून १९७७ मध्ये बंगलोरमधून लोकसभेत खासदार होते. ते लोकसभा अध्यक्षही होते. १९७६ मध्ये इंदिरा गांधींनी परत एकदा हंसराज खन्ना (२०२४-२५ मधील मुख्य न्यायाधीश संजीव खन्नांचे काका) यांची सेवाज्येष्ठता डावलून एम.एच.बेग यांना मुख्य न्यायाधीश नेमले होते. तेच हंसराज खन्ना नंतर फायनान्स कमिशनचे प्रमुख आणि चरणसिंगांच्या मंत्रीमंडळात तीन दिवसांसाठी कायदामंत्री होते. नोकरभरती घोटाळा प्रकरणात बंगालमधील ममता सरकारवर कोरडे ओढणारे कलकत्ता उच्च न्यायालयाचे अभिजीत बंदोपाध्याय तो निकाल दिल्यानंतर भाजपमध्ये सामील झाले आणि २०२४ मध्ये तामलूक मधून भाजप उमेदवार म्हणून जिंकले पण. तेव्हा ममता सरकारवर त्यांनी ओढलेले कोरडे हे भावी भाजप नेते या नात्याने तर ओढले नव्हते ना हा प्रश्न कोणी विचारला तर त्याला चुकीचे कसे म्हणणार? ते सिध्द करायला पुरावा नसला तरी प्रश्न उभा राहणारच.

 

संसदीय परंपरा आणि नियम यांची लेटर आणि स्पिरीट दोन्हींमध्ये अगदी काटेकोर अंमलबजावणी व्हावी असे मला वाटत असते. त्या बाबतीत मी अगदी 'स्टिकलर' आहे. म्हणून मला या सगळ्या गोष्टी खटकतात. अशा काही पदांवरील व्यक्तींना राजकारणात प्रवेश करायला काहीतरी कुलिंग ऑफ पिरिअड असावा असे नेहमी वाटते. 

 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

कारण तुम्ही म्हणता तसे कोण कुठल्या बाजूला आहे त्यावर अवलंबून असेल कसे पहायचे ते. म्हणूनच मी प्रश्न चिन्ह लावून बोललो होतो. ते एक असो. मिलिटरी सर्व्हिसेस मधील कर्नल राजवर्धनसिंह राठोड, जनरल व्ही के सिंह, जसवंत सिंह ह्यांना आपण विसरलोच. ज्ञानेशकुमारांना पण राजकारणात यायचे तर काहीच गैर नाही, पण त्याबद्दल ते आऊट ऑफ द क्लोजेट आलेत का ? की मी नाही त्यातली प्रकार आहे? इतके सिंपल विषय आहेत. आता वरती तुम्ही शेषन बद्दल बोललात. तर शेषन हे गांधीनगर मधून लढताना निवृत्त होते. ज्ञानेशकुमार ह्यांनी रिटायर झाल्यावर एका अतिशय शक्तिशाली पदाचा भार स्वीकारला आहे, २०२४ मध्ये रिटायर झाल्यावर त्याची नियुक्ती २०२५ मधे आलेली आहे. आता एकंदरीत जर त्यांना भाजप प्रमोट करायची असेल तर तो खासगी चॉइस त्यांचा पण मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पदावर सिद्ध असताना जर तसे दिसून येत असेल आणि ते स्टील क्लोजेटेड असतील तर मात्र प्रश्न गंभीर होतो.


In reply to by वृषभ खोंडे

आता वरती तुम्ही शेषन बद्दल बोललात. तर शेषन हे गांधीनगर मधून लढताना निवृत्त होते. 

शेषन १९९६ मध्ये निवृत्त झाले होते आणि त्यांनी कॉग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुक तीन वर्षांनी म्हणजे १९९९ मध्ये लढवली. तीन वर्षे हा कालावधी तितका मोठा आहे का? म्हणजे आपल्याला भविष्यात कॉग्रेसकडून उमेदवारी हवी आहे म्हणून निवृत्त होण्यापूर्वीच कॉग्रेसला अनुकूल निर्णय त्यांनी घेतले असतील का? कारण तीन वर्षे हा काही तितका मोठा कालावधी नाही त्यामुळे त्या पदावर असताना एखाद्या पक्षाला अनुकूल निर्णय घेतले तर ते पुढील तीन वर्षे लक्षात ठेऊन पक्ष उमेदवारी देऊ शकेल. अर्थात शेषन यांनी तसे केले होतेच असे मला म्हणायचे नाही आणि केले नव्हतेच असेही म्हणायचे नाही. हा जनरल मुद्दा आहे- शेषन स्पेसिफिक नाही. उद्या समजा कोणी गुलाबराव काटेवाले मुख्य निवडणुक आयुक्त म्हणून निवृत्त झाले आणि तीन वर्षात कोणत्या पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवत असतील तर हा मुद्दा त्यांनाही लागू पडेल. तेव्हा निवडणुक लढवताना ते निवृत्त होते या मुद्द्याचा रेलेव्हन्स नाही. तसेही सरकारी कर्मचाऱ्यांना पदावर असताना निवडणुक लढवताही येत नाही त्यामुळे त्यांची इच्छा असती तरी राजीनामा दिल्याशिवाय त्यांना निवडणुक लढवता आलीही नसती- म्हणजे निवडणुक लढवायच्या वेळेस ते त्या पदावर नसतेच. शेषन यांनी निवृत्त झाल्यानंतर ७ महिन्यातच राष्ट्रपतीपदाची पण निवडणुक लढवली होती. पण मुख्य निवडणुक आयुक्तांप्रमाणे राष्ट्रपती हे पदही अराजकीय असते त्यामुळे त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढवली त्यात काहीच आक्षेपार्ह नाही. पण लोकसभेची निवडणुक एखाद्या पक्षाचे उमेदवार म्हणून लढवली त्यावर प्रश्नचिन्ह उभे केले जाणे यात काही अप्रस्तुत नसावे.

तेव्हा अशा पदांवरील व्यक्तींसाठी निवृत्त झाल्यानंतर राजकीय पक्षाचे सदस्य होण्यासाठी काही कुलिंग ऑफ कालावधी असावा असे मला तरी वाटते - आणि तो ७ वर्षे किंवा १० वर्षे इतका मोठा असावा.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

तेव्हा अशा पदांवरील व्यक्तींसाठी निवृत्त झाल्यानंतर राजकीय पक्षाचे सदस्य होण्यासाठी काही कुलिंग ऑफ कालावधी असावा असे मला तरी वाटते - आणि तो ७ वर्षे किंवा १० वर्षे इतका मोठा असावा.

 

कुलिंग ऑफ पिरियड आपल्या देशात इंटेलिजन्स मेकॅनिसम मध्ये काम केलेल्या अधिकाऱ्यांना पण नाही, अर्थात खासगी क्षेत्रात दुसरा रोजगार घेण्याच्या अगोदर १ वर्ष कुलिंग ऑफ आहे फक्त नाममात्र. 

सरकार कुलिंग ऑफ २० वर्षे करण्याच्या मूड मध्ये आहे पण हा काळ सुद्धा irrationally जास्त आहे, ६० ला निवृत्त झालेला अधिकारी (जगालाच तर) ८० मधे काय रोजगार घेणार ? 

पुस्तके लिहायला तर काहीच बंधन नाही फक्त सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस (पेन्शन) रूल्स आणि ऑफिशिअल सिक्रेट ऍक्ट च्या स्क्रुटिनी मध्ये क्लिअरन्स घेतला की झाले, 

त्यातही इतके सिनिअर पोस्ट वरून रिटायर झाले की हे खानापूर्ती टाईप क्लिअरन्स मिळवणे काय कठीण असणार ? कित्येक निवृत्त सनदी अधिकारी तर चक्क असल्या पुस्तकांच्या रॉयल्टी पेन्शन पेक्षा जास्त कमवतात. काय बोलणार !?

 

(सहमत) खोंडे


In reply to by श्रीगुरुजी

भाजपचा उमेदवार म्हणून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढणार का असे ज्ञानेशकुमारांनी समजा विचारले असेल तरीही त्यावरून ते भाजपशी संबंधित आहेत  आणि निष्पक्ष नाहीत असा अजिबात अर्थ काढता येत नाही. कदाचित थॉमस राजकारणात जाणार आहेत अशी कुणकुण त्यांनी ऐकली असेल किंवा सहज गप्पा मारताना विचारलं असेल. २०१९ मध्ये असे घडले असेल तर पुढील ७ वर्षांत अजून काही वेळा ज्ञानेशकुमारांची भाजपश जवळीक दिसली असती. पण तसे कधीच दिसले नाही. तसेच ७ वर्षांनंतर असे सांगणे निरर्थक आहे कारण तसे ऐकणारा कोणी साक्षीदार होता का, ७ वर्षे गप्प का होता हे प्रश्न येणारच. 

एकंदरीत राजकारणात जर जर एक अविभाज्य भाग असतो पण इतके ? 😂😂, जीजी थॉमसन दुधाने धुतलेले नाहीत हे पण मला मान्यच आहे पण तुमच्याकडून आलेला "कित्ती किती हो आमचे ज्ञानेशकुमार चांगले" खचितच नाही अर्थात आपल्याकडून इतर अपेक्षा पण नाहीत.  

 

मी तर म्हणतो की थॉमसनची भाजप विरोधी पक्षांशी जवळीक आहे. म्हणून तर ज्ञानेशकुमार चर्चेत असताना यांनी जाणूनबुजून पुडी सोडून दिली जेणेकरुन विरोधी पक्षांना मुद्दा देता येईल.‌

वरिष्ठ नोकरशाही प्रत्येकाला कळत नाही हेच खरे. आत्ताचे प्रश्न मुख्यत्वे दोन आहेत.

 १) जीजी थॉमसन ह्यांना ज्ञानेशकुमार ह्यांनी ऑफर दिली होती का नाही ?

 २) ज्ञानेशकुमार भाजपला जवळ आहेत का नाहीत ? जीजी थॉमसन विरोधी पक्षाच्या जवळ असतील, किंवा आता साहजिकच ते भ्रष्ट असतील वगैरे तर त्यांना तुरुंगात घाला. माझे काहीच जात नाही ! 😂 

पण मुख्य प्रश्न अनुत्तरित सोडू नका साहेब, ज्ञानेशकुमार आणि भाजपचे संबंध जवळीकीचे नाहीत असे आपण म्हणता पण तसे एकंदरीत दिसत नाही. कृ. बु. वर माहिती घेता ज्ञानेशकुमार ह्यांनी ३७० हटवण्याच्या कामात योगदान दिले म्हणतात (हे काम पंतप्रधान आणि गृहमंत्री सोडून बोटावर मोजण्याइतक्या लोकांनाच ठाऊक होते) रामजन्मभूमी ट्रस्ट स्थापना, २०२० - भाजपच्या ब्रँड प्रोजेक्ट वर काम करायला नेमणूक ही जवळच्या संबंधांची ग्वाही नाही तर काय आहे ? तसे पाहता आयएएस अधिकारी काही कमी नव्हते, तत्कालीन गृहसचिव अजयकुमार भल्ला ह्यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याला साइडला करून जर ज्ञानेशकुमारांची नेमणूक होत असेल तर ते भाजपच्या/नेतृत्वाच्या मर्जीतील होते नाही म्हणणार तर काय ? 

तसेच रिटायरमेंटच्या ऐन अगोदर एक वर्ष अमित शहांनी अतिशय धोरणीपणे स्थापन करून स्वतःच्या अखत्यारीत घेतलेल्या सहकार मंत्रालयात ह्यांची नेमणूक होती. ! आता कृपया कोणी बुद्धी, डिग्री, आयआयटी इत्यादी मोजून दाखवू नये कारण आयएएस होऊन आपापल्या स्टेट कॅडर मध्ये mandatory सेवा देऊन दिल्ली प्रतिनियुक्तीवर येऊन वर पर्यंत चढणारे सगळेच आयएएस अधिकारी तितकेच शार्प असतात. प्रश्न असतो कंफर्टेबल असण्याचा सत्ताधारी एखाद्यासोबत.

(विटनेस इन कॉरिडॉर) खोंडे


In reply to by वृषभ खोंडे

सनदी अधिकाऱ्याने कुणी तरी कुणाला तरी निवडणूक लढवायचा सल्ला दिला याच्या वरून त्याच्यावर कारवाई व्हायला हवी याच्या इतका भंपक आणि हास्यास्पद दावा दुसरा नसेल.

यात कोण काय आणि कसे सिद्ध करणार ते अगदी सिद्ध झाले तरी  मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याइतका तो (? )गुन्हा आहे का?

राहिली गोष्ट सनदी अधिकाऱ्यांची.

सनदी अधिकारी,  महाधिवक्ता, मुख्य सचिव इ सर्व अधिकारी हे सरकारला संलग्न विचारांचे च असावे लागतात अन्यथा प्रत्येक धोरणात्मक निर्णयात ते इतक्या काड्या घालतील कि लोकप्रतिनिधींना सरकार चालवणे अशक्य व्हावे आणि त्यांनी सरकारी निर्णयाचे पालन करण्यास नकार दिला तर राज्य शकट कसे चालवायचे?
 
ऍडमिरल विष्णू भागवत याना सेवेतून बडतर्फ केले गेले होते याचे कारण त्यांनी सरकारी आज्ञा पालनास नकार दिला हेच होते. (तो एक वेगळा सुरस आणि चमत्कारिक किस्सा आहे)  

तेंव्हा असले मुद्दे काढणे हे सुद्धा हास्यास्पद आहे. हे केवळ सरकार दरबारी कामकाज कसे चालते याबद्दलचे घोर अज्ञान दाखवून देतात.           


In reply to by सुबोध खरे

भारतातील आणि मिपावरील विरोधी पक्ष इतके हतबल आणि निराश झाले आहेत की, १० वर्षांपूर्वी मला ज्ञानेशकुमारांनी विचारले होते की तुम्ही भाजपकडून उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार का असे कोणीतरी ठोकून दिल्यानंतर लगेच ते ज्ञानेशकुमारांना तुरूंगात टाकण्याची मागणी करायला लागले. इतका दळभद्री आणि विचारांनी दरिद्री विरोधी पक्ष यापूर्वी कधीही नव्हते. 

 

उद्या या मुद्द्यावर हे न्यायालयात गेले तर न्यायाधीश चपलांनी सडकून हाकून लावतील. 


In reply to by श्रीगुरुजी

सहमत आहे, कोणीतरी काहीतरी पुरावा नसलेले विधान केले त्यावर इतका काथ्याकूट?


In reply to by सुबोध खरे

पहिली गोष्ट तर हा आरोप खरा असेल तरच , असे रायडर मी आधीच टाकलेले आहे. तो खराच असावा अशी काही माझी आस नाही, जे असेल तसे. 

दुसरे म्हणजे , 

सनदी अधिकारी, महाधिवक्ता, मुख्य सचिव इ सर्व अधिकारी हे सरकारला संलग्न विचारांचे च असावे लागतात अन्यथा प्रत्येक धोरणात्मक निर्णयात ते इतक्या काड्या घालतील कि लोकप्रतिनिधींना सरकार चालवणे अशक्य व्हावे आणि त्यांनी सरकारी निर्णयाचे पालन करण्यास नकार दिला तर राज्य शकट कसे चालवायचे?

 हे बोलून लोक प्रशासन विषयातील अज्ञान आपण दाखवत आहात सर. फार काय बोलणार जमल्यास एम. लक्ष्मीकांतचे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणून वाचा उत्तम पुस्तक आहे. बरं आता जर (माझी परत एकदा कीव करत, माझ्यावर हसत, भंपक वगैरे म्हणत) प्रॅक्टिकल असे नसते वगैरे म्हणणारच असाल तरी ते पण तुम्हाला विशेष माहिती आहेत असे भासत नाही. कारण माहिती असते तर भारतीय सामाजिक/ लोकप्रशासनाचे तीन भाग असतात विधिमंडळ/न्यायपालिका/कार्यकारी हे तुम्हाला माहिती असायला हवे, त्यात कार्यकारी म्हणजे नेमणूक झालेली नोकरशाही. इतकी कोडगी व्यवस्था दुसरी नसेल जगात. एकतर नको तितकी जॉब सिक्युरिटी, सरकारे बदलली तरी आम्ही ६०चे होईपर्यंत तसेच राहणार ही गॅरंटी अन् महिन्याला पगार + मलई अशी ही रोगट व्यवस्था आहे. ही व्यवस्था फक्त फायद्याला aligned असते. 

इतिहास पण तेच सांगतो, ह्याच व्यवस्थेने आणीबाणी राबवली अन् जनता सरकार आल्यावर त्यांच्याही पुढे पिंगा घातला. जनता सरकारने काही नवी भरती केली नव्हती. सनदी अधिकारी, महाधिवक्ता(हा बदलतात कारण ही राजकीय नेमणूक असू शकते), मुख्य सचिव इ सर्व अधिकारी हे सरकारला संलग्न विचारांचे वगैरे पैदा नव्हते केले जनता सरकारने. फारतर वरचे सेक्रेटरी एखाद बदलतात, बाकी खालपर्यंत नोकरशाही तीच असते. जोवर त्यांच्या खायच्या सिस्टीम मध्ये काही आडकाठी नसते तोवर ते येईल त्या सरकारच्या हुकूमाचे ताबेदार असतात. उद्या झुरळ पक्ष आला तर हीच नोकरशाही त्यांच्याशी align होईलच. 

आपण वेस्टमिन्स्टर व्यवस्थेत लोकशाही चालवतो, हे असे वरपासून खालपर्यंत सनदी अधिकारी आपल्या राजकीय सोयीने बदलायला आपण काही अमेरिकन सिस्टम नुसार अपॉइंटमेंट बाय स्पॉइल सिस्टीम लागू करत नाही. त्याला कंपन्सेट करायला पुढारी नोकरशाहीचे इमान विकत घेते, ते पण आयजीच्या जीवावर बायजी होऊन पैसे खाण्याकडे कानाडोळा करत. सिंपल. कोणी बोलत असेलच तर भंपक अन् हास्यास्पद तुम्ही बोलतय सर आणि तरीही जर तुम्ही सहमत नसाल तर काही हरकत नाही, पूर्ण ४८ ते ५० लाख केंद्रसरकारी कर्मचारी कसे "संलग्न विचारांचे" भरती करणार त्याचा रोडमॅप सांगा जरा. 

 

(नवाकाळ) खोंडे


In reply to by वृषभ खोंडे

पूर्ण ४८ ते ५० लाख केंद्रसरकारी कर्मचारी कसे "संलग्न विचारांचे" भरती करणार त्याचा रोडमॅप सांगा जरा. 

हायला

एवढी साधी गोष्ट समजेना का तुम्हाला?

During the Maha Vikas Aghadi (MVA) government led by Uddhav Thackeray, IAS officer Ashwini Bhide was moved out of her high-profile post as Managing Director of the Mumbai Metro Rail Corporation (MMRC) in January 2020 due to differences over the Aarey car shed project, and was subsequently appointed as an Additional Municipal Commissioner for MCGM/BMC to help manage COVID-19 response efforts.

सरकार बदलल्यावर आता त्याच मुंबई महापालिकेच्या आयुक्त सारख्या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर नियुक्त आहेत.

आपल्या नावडत्या अधिकाऱ्यांना खड्यासारखे उचलून अति सामान्य खात्यात पाठवायचे. उदा आदिवासी विकासासाठी गडचिरोली सारखे.

नाही तर बिनखात्याच्या मंत्र्यासारखे विशेष नियुक्तीवरील  अधिकारी (OSD -ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) म्हणून  कोणत्यातरी अधिकाऱ्याच्या खात्यात ठेवायचे आणि कोणतेच काम द्यायचे नाही    

बहुसंख्य सनदी अधिकारी वारा वाहेल तशी पाठ फिरवतात.

जे अरुण भाटिया तुकाराम मुंढे सारखे असतात ते याला बधत नाहीत त्यांची दर वर्षी बदली होते.  

सर्व सनदी अधिकाऱ्यांचे वार्षिक गोपनीय अहवाल त्या खात्याचे मंत्री लिहितात आणि पुनरिक्षण अधिकारी मुख्यमंत्री असतो. यामुळे मंत्र्यांशी भांडण करून सनदी अधिकारी फार वर चढूही शकत नाहीत.    

या शिवाय प्रत्येक सनदी अधिकाऱ्यावर गुप्तहेर खाते सुद्धा "नजर" ठेवून असते. एखादा जास्त वरचढ होऊ पाहत असेल तर त्याला तासून कमी केले जाते.      

सरकार जेंव्हा स्वबळावर आलेले असते तेंव्हा नोकरशाही त्याना दबून असते. उदा श्रीमती इंदिरा गांधी यांचे सरकार.

सध्या श्री मोदी यांच्या सरकारात एखाद्या सनदी अधिकाऱ्याने जास्त हुशारी केली किंवा अति अकार्यक्षमता दाखवली आर त्याला सरळ घरचा रस्ता दाखवला जातो. Union Minister Dr Jitendra Singh informs that 122 officers have been given compulsory retirement under Rule 56(j) during the last three years (2020-2023), including the current year.

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1947074&reg=48&lang=2

यामुळे सनदी अधिकारी मुळापासून हादरले होते.

सुरुवातीला लवकर बढती मिळवू म्हणून केंद्रात प्रतिनियुक्ती वर आलेले  राज्य केडर चे अधिकारी (२०१४) मोदींच्या कामाचा झपाटा झेपेना म्हणून परत राज्यात जाण्यासाठी उत्सुक होते. त्यातील उत्तर प्रदेशाचे जे अधीकारी परत गेले त्यांची स्थिती आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली कारण उत्तर प्रदेशात योगीजीं मुख्यमंत्री म्हणून आले ते  रोज सकाळी पाच वाजता उठून पूजा झाल्यावर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला फोन करून कालच्या कामाचा अहवाल घेतात

पण जेंव्हा सरकार अल्पमतातले असते तेंव्हा त्यांना नोकरशाहीवर अवलंबून रहावे लागते. कारण आपल्याच पक्षातील किंवा विरोधातील माणसे आपल्याविरुद्ध काय कट करत असतील त्याची बित्तम बातमी असणे त्यांना आवश्यक असते. अन्यथा आमदार सुरत गुवाहाटी मार्गे जाऊ शकतात        

तेंव्हा सनदी अधिकारी सरकारी धोरणाशी संलग्न असायला त्याला काही भरती करताना तावून सुलाखून घ्यायची गरज नसते.  

 

 

  


In reply to by चंद्रसूर्यकुमार

असे आरोप आल्यानंतर विरोधक लगेच ते गॉस्पेल ट्रुथ आहे अशाप्रकारे त्यावर उड्या मारणार आणि सत्ताधारी त्याकडे दुर्लक्ष करणार. अशा प्रकारांमधून आपल्यासारख्या सामान्यांचे मनोरंजन होण्यापेक्षा अधिक काही साध्य होत नाही.

बरोब्बर, म्हणूनच मी आरोप खरा असला तर हा रायडर आधीच टाकला आहे. पण तुम्ही म्हणता ते सार्वत्रिक आहे, इंदिरा गांधी मैमुना गांधी झाली, संजय गांधीला तिनेच ठार मारले, राहुल गांधींनी एका कोलंबियन बाईशी लग्न केले आहे, राहुल गांधी ब्रिटिश नागरिक आहेत (ह्यावर एक तोंडदेखली केस दाखल आहे) असे आरोप झाल्यावर पण त्यावर पटापट उड्या पडताना पाहून तेच मनात आले जे तुम्ही मांडले आहे 👍🏾👍🏾


झु.अभिजीत दीपकेने गेल्या काही दिवसांत अशी वक्तव्ये केली आहेत ती करून झुजपचा जितका कितका असेल तितका प्रभाव कमी व्हायची शक्यता आहे.  त्याचे कारण झुजप म्हणजे विरोधकांना आणि विचारवंतांना मोदींविरोधात मधूनमधून कोणी एक चेहरा आपला मसीहा म्हणून हवा असतो त्यातलाच एक मसीहा आहे- नव्या बाटलीत जुनीच दारू आहे हे माझ्यासारख्या समर्थकांना कळले असले तरी त्यावर पूर्ण शिक्कामोर्तब दीपकेने स्वत:च्याच वक्तव्यांमधून केले आहे.  

जुलैमधील जंतरमंतरवरील आंदोलनाच्या वेळेसही लिहिले होते की बाकी अनेक क्षेत्रांमध्ये मोदी सरकारची कामगिरी चांगली असली तरी शिक्षण आणि परीक्षा या क्षेत्रांमध्ये पूर्ण निराशाजनक कामगिरी आहे. त्यात सगळ्यात मोठा खलनायक सरकारनेच नियुक्त केलेली एन.टी.ए आहे. नीट परीक्षा जवळपास २० लाख विद्यार्थी देतात तो आकडा प्रचंड आहे आणि पेपर फुटल्याने परीक्षाच रद्द झाल्याने त्याचा गदारोळ जास्त झाला. पण दरवेळेस परीक्षा रद्द व्हायलाच हवी असे नाही. काही वेळेस सीमॅटसारख्या परीक्षेत १०० पैकी तब्बल ११ प्रश्न चुकीचे असलेले मला माहित आहे. इतरही अनेक परीक्षांमध्ये चुकीचे प्रश्न आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे जर झुजपने त्यांचे आंदोलन केवळ आणि केवळ शिक्षणक्षेत्र आणि परीक्षा याच्याशी संबंधित ठेवले असते तर त्याला मी पण समर्थनच दिले असते. पण झाले असे कीे त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला यासिन मलिकसारख्या दहशतवाद्याच्या गळ्यात गळे घालून मिरवणारी अरूंधती रॉय सारखी किळसवाणी हडळ तिथे आली आणि 'सिर्फ नाम रहेगा अल्लाका' सारख्या घोषणा दिल्या गेल्या त्यातच या लोकांना विद्यार्थ्यांच्या अडचणींविषयी काहीही पर्वा नाही आणि सगळे विरोधक गेल्या १२ वर्षांपासून तुकडे तुकडे गॅंग, माझ्या वडिलांना पाकिस्तानने मारले नाही तर युध्दाने मारले वगैरे बकवास चालू आहे त्यातीलच ही पुढची आवृत्ती आहे हे माझ्यासारख्या मोदी समर्थकांना लगेच कळले. तरीही सुरवातीच्या काळात वरकरणी का होईना त्यांचे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी आहे असा देखावा तरी निर्माण केला जात होता.

मागच्या आठवड्यात दिल्ली विद्यापीठाच्या छात्रसंघांच्या निवडणुकीत अभाविपने चारपैकी तीन पदे जिंकली आणि दिल्ली विद्यापीठातील बहुसंख्य कॉलेजांमध्येही बरीचशी पदे अभाविपनेच जिंकल्यानंतर दीपकेचे पहिले वक्तव्य आले- कॉग्रेस आणि डाव्यांच्या विद्यार्थी संघटनांनी एकत्र यायला हवे होते. जर त्याचे आंदोलन विद्यार्थ्यांपुढील समस्यांविषयी असेल तर कॉग्रेस आणि डावे यांच्याशी त्याला काय घेणेदेणे असायला हवे? आता ज्ञानेश कुमार प्रकरणी पण लगेच राजकीय पक्षांचे आंदोलन सुरू व्हायच्या आधीच झुजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि राजीनामा न दिल्यास २ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू करायची धमकी दिली. याचाच अर्थ झुजप म्हणजे गेली १२ वर्षे येनकेनप्रकारेण मोदींना अडचणीत आणायचे विरोधकांचे प्रयत्न चालू आहेत त्यातीलच पुढचे पाऊल आहे हे समोर दिसतच आहे. 

यातून होणार असे की शिक्षणक्षेत्रात घातलेल्या घोळामुळे भाजपची मोठी व्होटबॅंक प्रभावित होऊ शकली असती ते मतदारपण झुजपचा खरा चेहरा पुढे आल्यानंतर त्यांना ज्या कारणांनी ज्यांना मत द्यायचे आहे त्यांनाच देतील- झुजपचा त्यांच्या मतावर प्रभाव पडेल ही शक्यता कमी होईल. 

 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

दिपकेचा कन्हैया कुमार किंवा विनोद कांबळी झालाय. 

 

जाता जाता . . . विनोद कांबळी (वय ५४) सध्या वृद्धाश्रमात आहेत. जीभ जड झाल्याने बोलणे समजत नाही. त्याची अवस्था पाहून खूप वाईट वाटले. 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

दीपकेचे नवीन वक्तव्य- जर निवडणुक आयोग असा पक्षपाती असेल तर विरोधी पक्षांनी निवडणुकाच लढवू नयेत. त्या झुरळ आंदोलनाचा विद्यार्थ्यांच्या समस्यांशी काहीही संबंध नाही तर ते एक निमित्त होते तर खरा उद्देश येनकेनप्रकारेण मोदींपुढे अडचणी निर्माण करणे हा होता यापेक्षा वेगळे अनुमान कसे काढणार?

विरोधी पक्षांनी निवडणुका जिंकल्या नाहीत का? केरळ, तामिळनाडू, तेलंगण, झारखंड वगैरे विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकांमध्ये युपीसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यात विरोधी पक्ष जिंकला नव्हता का?

की हा वेगळाच गेमप्लॅन आहे? विरोधी पक्षांनी समजा निवडणुकांवर बहिष्कार घातला तर मोदी अगदी आरामात निवडून येतील. पण या निवडणुका वैध नाहीत अशी हाकाटी विरोधी पक्ष करून मग सरकारविरोधात रस्त्यावर उतरा- बांगलादेशात झाले तसे करा वगैरे प्रयत्न असेल का?

मोदी परिपूर्ण आहेत असे कोणीच म्हणू नये- ते नाहीतच. पण मोदी परिपूर्ण नाहीत म्हणून त्यांच्यापेक्षा अब्जावधी पटींनी वाईट असलेल्यांच्या ढोंगाला लोक जाणून असतील ही अपेक्षा.


तामिळनाडूचे मुख्यमंत्री थळपती विजय जोसेफ यांच्या सरकारने राज्यातील सरकारी रूग्णालयात जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोने द्यायची योजना आजपासून सुरू केली आहे.

https://maharashtratimes.com/india-news/tamilnadu-cm-vijay-government-launch-sceme-of-giving-gold-ring-to-new-born-baby/articleshow/134537832.cms

 

आता यात कसा आणि किती प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि भ्रष्टाचार करायचे कोणते नावीन्यपूर्ण मार्ग अवलंबले जातात ते बघायचे. 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

तमिळनाडु चे हे सरकार एक अजब रसायन आहे. निधर्मी म्हणावे की अजुन काही हेच समजत नाही. म्हणजे विजय जोसेफ हे ख्रिस्चन धर्म पाळतात, आपण किती निधर्मी आहोत हे दाखवायला ते एका मंदिरात जाउन आरती वगेरे करतात. नंतर फक्त मुसलमान मुलींना शिक्षणात सुट देतात. मग बोंबाबोंब झाल्यावर ख्रिस्चन मुलींना  पण शिक्षणात सुट देतात.

एवढे झाल्यावर ज्या हिंदु मतदारांनी त्यांना मते देउन निवडुन आणले ते तसेच उभे आहेत. म्हणजे सुवेधा देताना धर्माच्या आधारावर द्यायच्या वर बोलायचे की आमचे सरकार हे कित्ती कित्ती सेकुलर आहे बघा. 

मजा च मजा.  


ही बातमी खरडफळ्यावर आली होती. संदर्भ राहावा म्हणून इथे देत आहे.‌

 

सामाजिक सन्मानासाठी लढा! या जातीची दलित समुदायातून बाहेर पडण्याची इच्छा! SC/ST कायद्याचाही वापर न करण्याचा निर्णय 

 

एकीकडे देशात आरक्षणाच्या सवलतीसाठी अनेक जाती, स्वतःला मागास घोषित करण्यासाठी धडपडत असतानाच, तमिळनाडूतील 'देवेंद्रकुला वेल्लालर' (DVK) हा समाज अनुसूचित जातीच्या अर्थात SC यादीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाहीतर, यापुढे कुणावरही SC/ST कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न करण्याचा निर्णय या समाजाने घेतला आहे. कारण या कायद्याच्या गैरवापरामुळे सामाजिक कटुता आणि वैर वाढते, असे त्यांचे म्हणणे आहे.


In reply to by कांदा लिंबू

अत्यंत योग्य निर्णय! सवर्णांनी सुद्धा त्यांना बरोबरीचे स्थान देऊन प्रोत्साहन द्यायला हवे. अन्यथा दलितातून बाहेर पडले म्हणून दलित वाळीत टाकणार आणि सवर्ण कायद्यामुळे अंतर ठेवून राहणार, यातून त्यांची त्रिशंकू अवस्था होईल.


In reply to by कांदा लिंबू

गेल्या काही वर्षात अधिकाधिक समुदाय स्वत:ला मागास म्हणून जाहीर करा यासाठी आंदोलन करत असताना कोणीतरी आम्ही मागास नाही असे म्हणत आहे हे वाचून खरोखर बरे वाटले. 


In reply to by कांदा लिंबू

एकतर आपल्याला भाषिक बॅरियर मुळे तमिळनाडू मधले काहीच माहिती नसते. किंबहुना आमचे बाहुबली किती का पेरियार पेरियार करू दे भारतातील एक सर्वाधिक जातियवादी राज्य म्हणजे आजही तामिळनाडू आहे. असो ! 

तर आता देवेंद्रकुल वेल्लालर समाजाबद्दल बोलता खालील गोष्टी लक्षात घेणे अगत्याचे आहे - देवेंद्र कुल वेलालर (DKV) समाजाला पल्लर पण म्हणतात, मुळात ते शेतकरी आहेत. पण त्यांची पोझिशन vulnerable असल्याने त्यांना SC मध्ये include केले होते. 

त्यांचा एक गट म्हणतो की आम्हाला SC स्टेटस नको, त्यामुळे आमची dignity कमी होते, आम्ही अस्पृश्य कधीच नव्हतो, त्या ऐवजी OBC किंवा MBC कोटा द्या. हा समाज जयललिता चा कट्टर समर्थक होता आणि DMK सोबत सरळ वाकडे आहे यांचे 

आता ग्यानबाची मेख ही आहे की तामिळनाडू मध्ये आरक्षण उपवर्गीकरण आहे, त्यात DKV ला लॉस झाला (DMK ने करवला) आणि यांचा कोटा कमी करून दुसऱ्या जातीला दिला, याना अपेक्षा आहे की MBC मध्ये अधिक कोटा मिळेल (मोस्ट बॅकवर्ड कास्ट, उपवर्गीकरण अंतर्गत), ती पण अर्थातच पूर्ण समाजाची मागणी नाहीच 2 4 लोक बोललेत तर काय समाजाचे मत होत नाही. 

तामिळ नाडूत ST अलमोस्ट नाहीत 1% आरक्षण आहे फक्त SC ला 18% 50% ओबीसी/एमबीसी -yes 50% त्यात उपवर्गीकरण आहेत 3% sc कोटा एकाच जातीला आहे. 50% ओबीसी मध्ये- 3.5% ओबीसी कोटा मुस्लिम लोकांना आहे 20% MBC 26.5% BC Ews कोटा नाहीच DKV ही अशी जात आहे जी 18% च्या 18% जागा खात असे एससी मधल्या जशा मीणा समाज प्राबल्यात आहेत शेड्युल ट्राइब मध्ये किंवा जाटव आहेत शेड्युल कास्ट मध्ये. 

पहिले उपवर्गीकरण झाले त्यात DVK कोटा कमी झाला. उपवर्गीकरणात त्यांना डेडिटेकेटेड कोटा SC मध्ये राहता मिळणार नाही कारण ते ओव्हर रिप्रेझेंटेड आहेत त्या वर्गीकरणात., मात्र bc mbc मध्ये ते सर्वाधिक vulnerable किंवा अंडर रिप्रेझेंटेड राहतील, तिथे स्वातंत्र कोटा मिळेल नाही मिळाला तरी 26+31 = 57 किंवा 20+31=51 जागा असतील स्पर्धेला आता 15+ 31= 46 जागा आहेत, ज्या कमी होत जाणारेत 

उपवर्गीकरणानंतर त्यांच्या एका सेक्शन ची डिमांड आहे आम्हाला जनरल करा,v पण आम्ही अद्याप गरीब आहोत आणि ब्राह्मण नाही त्यामुळे राज्यात ews लागू करा, मग 10% जागांवर त्यांचाच क्लेम कारण ब्राह्मण असेही पळून गेलेत, 1.5% असतील, जे आहेत त्यातले 90% ews ला बसत नाहीत कारण सर्व्हिस इन्कम आहे जे 8 लाख पार सहज जाते, लपवता येत नाही. 

जाता जाता - अपरिचित सिनेमाचा हिरो आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रम हा सुद्धा DVK समाजाचा आहे. किंवा एक जुना सिनेमा होता बघा जीन्स म्हणून त्याचा हिरो प्रशांत होता आणि ऐश्वर्या लीड हिरोईन होती, तो प्रशांत पण DVK आहे. 

 

(मुरुगवेल) खोंडे


In reply to by वृषभ खोंडे

धन्यवाद. महत्त्वाची माहिती उलगडून सांगितल्याबद्दल. वर वर पाहता बातमी वेगळी वाटते पण शेवटी अधिकच्या लाभासाठीच आहे सगळे. 


In reply to by स्वधर्म

भारत हा एकमेव देश असा आहे जेथे प्रत्येकाला आपण मागास असावे असे वाटते. - एन आर नारायण मूर्ती.

Narayana Murthy famously stated that India has become "perhaps, the only nation in the world where people fight to be called backward rather than forward


In reply to by स्वधर्म

आपल्याला तामिळनाडू बद्दल काहीही माहिती नसते. कितीही केले तरी, कारण अभ्यासाची अस्सल साधने तमिळ भाषेत असतात, भाषा तिथे एक मोठे बॅरियर आहे. तामिळनाडूचे सामाजिक स्ट्रक्चर खूपच जास्त वेगळे आहे चातुर्वर्णी नाही तर त्रिवर्णी स्वरूप असणारे. त्यामुळे तिथे सामाजिक न्याय, अत्याचार इत्यादी संकल्पनांचे डायनॅमिक बदलतात बऱ्यापैकी. पेरियार कित्येक लोकांना पूजनीय आहेत ते पण ऐकीव माहितीवर किंवा त्याज्य आहेत ते पण ऐकीव माहितीवर. कम अस्सल पुरावे तर पूर्ण मी पण वाचले नसतील.


 

गुजरात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीची माहिती जाहीर करण्याचे गुजरात विद्यापीठाला सांगणारा आदेश रद्द करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या एकल पीठाने दिलेल्या आदेशाविरोधात आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केलेली पुनर्विचाराची मागणी नाकारून केजरीवालांना २५ हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा दिली. 

 

मोदींचे शैक्षणिक प्रमाणपत्र सार्वजनिक माध्यमांवर उपलब्ध असून Someone's "irresponsible childish curiosity" cannot become public interest under the Right to Information (RTI) Act असे सांगून गुजरात विद्यापीठाने केजरीवालांची मागणी नाकारली होती व त्याविरोधात केजरीवाल आधी उच्च न्यायालयाच्या एकल पीठात व नंतर खंडपीठाकडे गेले होते.

 

केजरीवालांना काही संशय असेल तर त्यांनी, मोदींचे पदवी प्रमाणपत्र असत्य असल्याचे पुरावे घेऊन मोदी व गुजरात विद्यापीठ या दोघांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायला हवे. पण त्यांच्याकडे कोणतेच पुरावे नाहीत. म्हणून संशय निर्माण करण्यासाठी ते विद्यापीठाकडे जाऊन मोदींचा परीक्षाक्रमांक, मोदी ज्या वर्षी बहिस्थ विद्यार्थी होते त्या वर्षात तो पदवी अभ्यासक्रम शिकणाऱ्या इतर सर्वांची संपूर्ण वैयक्तिक माहिती, कोणत्या वर्गात परीक्षा झाली त्या वर्गाची माहिती, त्या वर्गात परीक्षा देणाऱ्या इतरांची माहिती मागितली जी वैयक्तिक माहिती न्यायालयाच्या मागणीशिवाय कोणतेही विद्यापीठ देणार नाही.

 

बरं झालं या रिकामटेकड्याला न्यायालयाने दंड केला. अर्थात अत्यंत निर्ढावलेला कोडगा माणूस माघार घेत नसतो. 


In reply to by श्रीगुरुजी

तसेही नेतृत्व हे कागदी पदव्यांचे मोताद नसते. शैक्षणिक पदव्यांवर नेतृत्वगुण कधीच अवलंबून नसतात. मोदी गर्दी जमवू शकतात, लोकभावनांवर त्यांची पकड आहेच काहीही म्हणू दे कोणाला पण. महुआ मोइत्रा इन्वेस्टमेंट बँकर होत्या, त्यांच्या क्षेत्रातील काही उच्च पदांवर विराजमान होत्या, पण त्यांच्या आयक्यूला राजकारणात शष्प किंमत नसते. कारण EQ कमी असतो आणि जनतेशी डायरेक्ट जोडल्या जाण्याची कलाच अंगी नसते. हेच शशी थरूर ह्यांच्याबाबत पण म्हणता येईल. 

 श्रीयुत केजरीवाल ह्यांना आता तरी अक्कल येईल हीच आशा.

 (लोकनेता) खोंडे.


In reply to by श्रीगुरुजी

केजरीवाल किती वर्षे त्याच त्याच झाडावर... करणार आहेत? सगळ्यात पहिल्यांदा मोदींची पदवी हा मुद्दा २०१६ मध्ये त्यांनी मांडला होता. त्यावेळेस मिपावरही त्यावरून घमासान झाले होते. मग गुजरात आणि दिल्ली विद्यापीठांनी मोदींच्या पदवीचे तपशील जारी केल्यानंतर मग कशावरून ते तपशील खरे आहेत हा प्रश्न आला. त्यावेळेस तो मकराश्रूवाला आशुतोष आणि आशिष खैतान आप मध्ये होते. ते दोघे आपल्या कार्यकर्त्यांसह दिल्ली विद्यापीठाच्या कार्यालयात खुळ्यासारखे मोदींची पदवी तपासायला दिवसभर ठाण मांडून होते. मग परत केजरीवाल मोदींची पदवी हा विषय घेऊन गुजरात उच्च न्यायालयात गेले. त्यांना २०२३ मध्ये पण फालतूची याचिका दाखल करून न्यायालयाचा वेळ व्यर्थ दवडल्याबद्दल २५ हजाराचा दंड केला गेला होता. त्याकाळी ताज्या घडामोडींचे धागे मी काढायचो. त्या एका धाग्यात या २५ हजाराच्या दंडाचा उल्लेख मीच केल्याचे पक्के आठवते. इतके झाले तरी आता परत एकदा त्याच कारणावरून न्यायालयात ते गेले? कमाल आहे.

(केजरीवाल या गृहस्थाचा अगदी पहिल्या दिवसापासून कट्टर विरोधक) चंसूकु


In reply to by चंद्रसूर्यकुमार

त्यावेळेस तो मकराश्रूवाला आशुतोष आणि आशिष खैतान आप मध्ये होते. ते दोघे आपल्या कार्यकर्त्यांसह दिल्ली विद्यापीठाच्या कार्यालयात खुळ्यासारखे मोदींची पदवी तपासायला दिवसभर ठाण मांडून होते. 

 

 

 

त्यानंतर आशुतोषने वाहिन्यांवर येऊन सांगितले होते की आम्ही कुलगुरूंच्या कार्यालयात गेलो तेव्हा ते प्रचंड भयभीत झाले होते, त्यांना घाम फुटला होता, तोंडातून शब्द फुटत नव्हते, ते अत्यंत दडपणाखाली दिसत होते. नंतर ते कसेबसे म्हणाले की मला ही माहिती द्यायची अनुमती नाही. माहिती दिली तर मला खूप त्रास सहन करावा लागेल अशी धमकी मिळाली आहे . . . 

 

अर्थात यातील एकही गोष्ट सत्य नव्हती. मोदींच्या पदवीची प्रमाणपत्रे समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत व भाजपने पत्रकार परिषदेत त्याच्या प्रती पत्रकारांना दिल्या होत्या.

 

यवर लेच केजरू टोळीने नीन वदंता पसरविण्यास प्रारंभ केला. म्हणे १९७८ मधील गुणपत्रिका संगणकीकृत कशी, तेव्हा भारतात संगणकच नव्हते, त्यावरील फॉंन्ट म्हणे १९९० नंतर आला . . . 

 

माझा एक भाऊ १९७८ मध्ये १० वी उत्तीर्ण झाला. त्याची गुणपत्रिका संगणकीकृत आहे. पुण्यात १९७० च्या दशकात किंवा त्या आधीपासूनच अनेक ठिकाणी मेनफ्रेम संगणक वापरात होते. पुणे विद्यापीठ, किर्लोस्कर कमिन्स, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, लार्सन ॲन्ड टुब्रो, वीज नियामक मंडळ यांच्याकडे आयबीएम, डिजिटल, बरोज, आयसीआयएल  या कंपन्यांचे मेनफ्रेम होते. 

 

मोदींचे पदवी प्रमाणपत्र असत्य आहे हा आरोपच असत्य आहे. केजरूकडे पुरावे असतील तर त्याने पुरावे घेऊन न्यायालयात जाऊन ते सिद्ध करावे म्हणजे मोदींची निवडणूक अपात्र ठरून त्यांना ६ वर्षे निवडणूक लढण्यासाठी प्रतिबंध येईल. परंतु केजरू त्यासाठी न्यायालयात जात नाही कारण काही पुरावेच नाहीत. म्हणून मग या टोळीने विद्यापीठाकडे विचित्र मागण्या केल्या. मोदींच्या परीक्षा प्रवेशपत्राची प्रत,  मोदी लेखी परिक्षेसाठी ज्या वर्गात बसले होते त्या वर्गात बसलेल्या इतर सर्वांचे नाव -पत्ता, त्यावर्षी त्या विद्यापीठातून तो अभ्यासक्रम शिकणाऱ्या सर्वांचा नावपत्ता इ. 

 

कोणाच्या तरी पोरकट आणि खोडसाळ राजकीय आरोपांसाठी कोणतेही विद्यापीठ कोणाचीही वैयक्तिक माहिती देत नाही. याविरोधात केजरीवाल न्यायालयात गेले आणि तोंडावर आपटले. नंतर पुन्हा एकदा न्यायालयात गेले आणि काल पुन्हा एकदा तोंडावर आपटले.

 

मुळात समजा एक क्षणभर गृहीत धरलं की मोदींकडे पदवी नाही, अगदी ते ठार अंगठाडहाद्दर आहेत, पण त्यामुळे जनतेवर व मतांवर शून्य परिणाम होतो. रागा, सोगा, प्रिव यांची पदवी कोणी पाहिली आहे का? उच्चविद्याविभूषित अर्थतज्ज्ञ असलेले एक विद्वान किती पराधीन होते हे जनतेने अनुभवले आहे. 


पाकिस्तानप्रेमी भारतविरोधी कॉंग्रेस व इतर समविचारी पक्षांसाठी आजच्या दिवसातील दुसरी दु:खद बातमी 

 

 

हेच ते २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये धर्म विचारून २६ निरपराध हिंदूंना मारणारे नराधम मुस्लिम. धर्म विचारून मारण्याइतका वेळ तरी होता का त्यांच्याकडे असे कॉंग्रेस नेत्यांनी जाहीरपणे विचारून या अतिरेकी हल्ल्यावर संशय व्यक्त केला होता.

 

 

 


In reply to by श्रीगुरुजी

सर्व चारही अतिरेक्यांना भारतीय सुरक्षा दलाने ठार मारून प्रतिशोध पूर्ण केला. 


In reply to by श्रीगुरुजी

पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार हाशिम मुसा ह्याला कंठस्नान घातलेल्या चिनार कोअरच्या/राष्ट्रीय रायफल्सच्या आणि एकंदरीतच भारतीय लष्कराच्या सर्व अधिकारी व जवानांचे हार्दिक अभिनंदन.


RTIमधून मिळालेल्या माहितीनुसार, हुर्रियतचे नेते आणि माजी आमदार गुलाम नबी सुमजी यांना मिळणारी पेन्शन २०१८ पासून तीन वेळा वाढून सुमारे २४ हजारांवरून ६० हजार झाली आहे. १९८९ मध्ये आमदारकीचा राजीनामा देऊन ते फुटीरतावादी राजकारणात सक्रिय झाले होते.

https://www.ndtv.com/india-news/j-k-separatist-banned-groups-leader-ghulam-nabi-sumji-drew-pension-got-raised-thrice-rti-12114540/amp/1 


बातमीतील मुद्दा केवळ एका व्यक्तीला पेन्शन मिळण्यापुरता मर्यादित नाही. भारताची राजकीय व्यवस्था आणि तिची घटनात्मक चौकट नाकारणाऱ्या व्यक्तीला त्याच व्यवस्थेकडून मिळणारे सार्वजनिक लाभ, आणि त्यातही पेन्शनची तीन वेळा झालेली वाढ, हा निश्चितच गंभीर प्रश्न आहे.

 

अशा प्रकरणांत भावनिक प्रतिक्रिया देण्यापेक्षा कायदेशीर तरतुदी काय आहेत, त्या कशा लागू झाल्या आणि सार्वजनिक पैशाच्या वापराबाबत जबाबदारी कोणाची, याचे स्पष्ट उत्तर मिळणे अधिक महत्त्वाचे आहे.


गुजरातेत कॉंग्रेस सोडून गेलेले शंकर सिंह वाघेला कॉंग्रेसमध्ये पुनरागमन करणारेत. त्यांचे आताचे वय केवळ ८६ आहे. उद्या पवार कॉंग्रेसमध्ये परतल्यानंतर कॉंग्रेसला जितका लाभ होईल तितकाच लाभ वाघेला कॉंग्रेसमध्ये परतल्याने होईल. 


काही जणांचे अस्तित्व मृगपुच्छ सारखे असते.

केवळ अस्तित्व - ना माशा हाकण्यासाठी उपयोग,  ना लज्जारक्षणासाठी.

सिंहासन या चित्रपटातील हे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या तोंडी असलेले  लोकप्रिय अवतरण आहे.     


आज एक ऑक्टोबर, चटकन ह्या महिन्याचा ताज्या घडामोडी धागा काढ मित्रा. मी काढला असता पण तो वाळीत टाकला जाण्याची जास्त शक्यता आहे म्हणून तुला विनंती. तू कसं व्यवस्थित यथासांग षोडशोपचारे काढतो धागे.


In reply to by वृषभ खोंडे

तू कसं व्यवस्थित यथासांग षोडशोपचारे काढतो धागे. 

 

धन्यवाद वृषभ खोंडे! 


In reply to by कांदा लिंबू

अबूधाबी धाग्यावर आय मीन अबादिबि धाग्यावर चालू घडामोडींविषयी काहीच नाही. तो धागा बहुतांशी दोघांमधला सुसंवाद आहे व सारखं सारखं एकाच झाडावर सुरू आहे.