श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे.
श्रावण महिना सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे या महिन्यात आकाशातील पांढरे-काळे ढग, सरसर येणाऱ्या पावसाच्या सरी, मध्येच दिसणारे निरभ्र आकाश, पुन्हा पडणारा रिपरिप पाऊस हे निसर्गचित्र नेहमीचंच असतं.
मिपावरचे लेखन-प्रतिसाद-प्रतिप्रतिसाद असेच असतात, नाही का?
श्रावण मास हा हिंदूंचा पवित्र काळ असतो. नागपंचमी, राखीपौर्णिमा, पोळा यांची धामधूम सुरु असते. बेसिकली, उत्सवी वातावरणाची, व्रतवैकल्याची, उपवास-निराहारांची सुरुवात या इथून सुरु होते.
मिपाकरांना श्रावण मासाच्या आगाऊ शुभेच्छा.
संसदेत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात - परिसीमन विधेयक, आयकरसुधारणा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३३ वरून ३७ पर्यंत वाढवणारं विधेयक, FCRA विधेयक, MSME साठी विलंबित पेमेंट्सवरचं संरक्षण देणारं विधेयक अशी प्रमुख विधेयकं सरकारच्या अजेंड्यावर आहेत. यातली FCRA दुरुस्ती विधेयक आणि उच्चशिक्षण नियामकांना एकत्र आणणारं VBSA विधेयक हे दोन विरोधकांच्या रडारवर आहेत, काँग्रेसने या दोन्हींना विरोध करण्याचं आधीच जाहीर केलंय. शिवाय NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरही चर्चा होत आहे. यांतील काही विधेयकं मंजूर झाली आहेत काही होतील.
परिसीमन विधेयकावरून सरकार व विरोधी पक्षांत नुकतीच वैठक पार पडली. या मुद्द्यावर संसद चांगलीच तापणार आहे. जंतरमंतरवरचं आंदोलनात अजून काही काळ धुगधुगी राहील असे दिसते आहे.
नुकत्याच झालेल्या विविध विधानसभांच्या पोटनिवडणुकांत भाजपचा एक विजय आणि दोन पराभव असा निकाल लागला आहे.
आर्थिक आघाडीवर सरकारने भारतीय स्मार्टफोन ब्रँड्स जगात पुढे यावेत यासाठी साडेबासष्ट हजार कोटींची योजना जाहीर केलीय, चिनी-कोरियन ब्रँड्सच्या तुलनेत भारतीय कंपन्या किती पुढे सरकतात ते बघावे लागेल.
शेतीसाठी ऑगस्ट महिना नेहमीच कसोटीचा असतो. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात पावसाची चातक प्रतीक्षा, हे नेहमीचं विषम चित्र यंदाही आहे.
माझ्या स्वतःच्या निरीक्षणानुसार मागच्या दहा वर्षांत भारतातील पावसाळा हा जून ते सप्टेंबर असा पारंपारिक न राहता जुलै मध्य ते नोव्हेंबर असा पुढे सरकला आहे. शेतकऱ्यांनी पेरणी वेळापत्रकात त्यानुसार बदल करावा असे सरकार चारपाच वर्षांपासून सांगते आहे पण सगळेच शेतकरी त्याला प्रतिसाद देतात असे नाही. (आम्ही मात्र आमची मराठवाड्यातील शेती पावसावर अवलंबून ठेवलीच नाहीय!)
या वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केलीय; कुस्ती-बॅडमिंटन-हॉकीसारखे हुकमी मेडल मिळवणारे खेळ नसतानाही बॉक्सिंग-ज्युदो-ट्रॅक अँड फील्डच्या जोरावर पदकतालिकेत भारत बऱ्यापैकी वर सरकलाय, हे विशेष कौतुकास्पद.
भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६, शनिवारी साजरा होईल.
बाकी महिनाभरात काय काय घडतं, कोणत्या बातम्या गाजतात ते इथे नोंदवत जाऊया. चर्चा करत राहु या.
- कांदा लिंबू
प्रतिक्रिया
उहू तसे नाही
In reply to सिर्फ नाम रहेगा अल्लाका by चंद्रसूर्यकुमार
सिर्फ नाम रहेगा अल्लाह का
तो भांकसपणा नीट माहिती आहे, त्यातून अर्थ "सगळे हिंदू शिरकाण करु" असा काढून (उलगडून) सांगा प्लीज.
In those words असे मी इंग्रजीत सुस्पष्ट लिहिलेले आहेच. Besides, सिर्फ नाम रहेगा अल्लाह का म्हणण्याने (~८०%) "हिंदूंचे शिरकाण" ध्वनीत होते हे तुमचे आकलन असल्यास ते असण्याचा तुमचा हक्क मला मान्य आहे पण माझ्या आकलनानुसार ते तसे नसल्याचं वाटत असेल तर फक्त माझ्या अकलेचे माप काढू नका.
कुठलेही थेट विधान नसताना झुरळ आंदोलनातील एका मूर्ख क्षणाचे भांडवल करून कर आपल्यासारखे बुद्धिवादी लोक निष्कर्ष काढणार असतील तर त्याच्या विरुद्ध निष्कर्ष काढण्याचा हक्क सुद्धा मान्य करावा असे वाटते.
(तर्कतीर्थ) खोंडे
चान्सुकू सर देशातून हिंदूंचे…
In reply to उहू तसे नाही by वृषभ खोंडे
चान्सुकू सर देशातून हिंदूंचे शिरकाण व्हावे अशी इच्छा व्यक्त करतो,
असे कुणीही बोललेले नाही तरीही तुमच्या सारख्या माणसाने एस बेखालस धडधडीत खोटे विधान करावे कोकोरचेसना बदनाम करण्यासाठी? नाही पटले, मागे श्रीगुर्जिनीही म्हणजे कॉक्रोच परतीला ४०-५० टक्के सपोर्ट पाकिस्तानातून आहे अशी काहीतरी खोटी पोस्ट टाकली होती.
https://www.youtube.com/shorts/rhd_rBUfwTc
In reply to चान्सुकू सर देशातून हिंदूंचे… by अमरेंद्र बाहुबली
https://www.youtube.com/shorts/rhd_rBUfwTc
** सिर्फ नाम रहेगा अल्लाका…
In reply to सिर्फ नाम रहेगा अल्लाका by चंद्रसूर्यकुमार
**
सिर्फ नाम रहेगा अल्लाका असल्या घोषणा दिल्लीतील जंतरमंतरमधील झुरळांच्या आंदोलनात दिल्या गेल्या होत्या हे कदाचित तुम्हाला माहित नसावे. त्याचा अर्थ काय होतो?
***
आपल्या बुद्धीला ग्रहण लागले आहे असा होत असावा.
१९७७ मध्ये जनरल झिया उल हअक़ ह्यांनी पाकिस्तानात आणीबाणी लावून झुल्फिकार अली भुट्टो ह्यांना पदच्युत केले. १९७९ मध्ये भुट्टो ह्यांना देहदंड दिला. झिया ह्यांनी सर्व स्वातंत्र्यावर बंदी घातली आणि देशांत कडव्या इस्लाम चा वापर करून आपली सत्ता प्रस्थापित केली. फैझ ह्यांनी १९७९ झिया ह्यांच्या विरोधांत हि कविता लिहिली. फैझ स्वतः मार्क्सवादी होते आणि हि कविता देशांतील इस्लामिक कट्टरवाद आणि झिया ह्यांच्या विरोधांत लिहिली होती. इस्लामिक प्रतीकांचा ह्या कवितेत वापर केला गेला असला तरी "बस नाम रहेगा अल्लाह का" ह्या ओळीचा अर्थ इतर धर्मांचा विरोध हा नसून सत्याचा शेवटी विजय होईल अशी अशा त्यांनी व्यक्त केली होती.
कवितेचा अंत :
उट्ठेगा **अनल-हक़** का नारा
जो मैं भी हूँ और तुम भी हो
और राज करेगी ख़ल्क़-ए-ख़ुदा
जो मैं भी हूँ और तुम भी हो
--
अन-एल -हअक़ ह्याचा अर्थ "मीच सत्य आहे", "मीच तो आहे" किंवा "तत्त्वमसि" असा होतो. हे वेदान्तिक वाटले (छांदोग्य उपनिषद) तर हा योगायोग नाही.
हा शब्द फैझ ह्यांनी मन्सूर हल्लज ह्या सुफी विचारवंतांकडून घेतला आहे. मन्सूर हल्लज ह्यांनी सर्वप्रथम अन-अल-हअक़ चा उद्घोष केला होता आणि हे प्रेरणा त्यांना त्यांच्या भारत भ्रमणातून आली. हिंदू धर्मातील मोक्ष हि संकल्पना त्यांनी "फना" स्वरूपांत इस्लाम मध्ये आणली आणि ईश्वर आणि आत्मा एकाच आहेत आणि हि "फना" हे आत्म्याचे ध्येय आहे हि वेदान्तिक विचारसरणी घेऊन ते जगले. म्हणून शेवटी त्यांना बगदाद मध्ये प्रचंड छळ करून थोर मारण्यात आले. म्हणे त्यांना ३०० कोडे मारण्यात आले, हात छाटण्यात आले इत्यादी. त्याआधी ८ वर्षे त्यांना कैदेत ठेवण्यात आले होते पण त्यांनी आपली विचारसरणी त्यांनी सोडली नाही.
फैज ह्यांनी म्हणून मुद्दाम ह्या वेदान्तिक वाटणाऱ्या विचारसरणीचा उल्लेख त्यांच्या वरील कवितेत केला.
ह्यासाठी फैझ ह्यांना स्वतः इस्लामिक मुल्ला कडून शिव्या खाव्या लागल्या. झिया स्वतः मुल्ला मौलवींच्या मदतीने सत्तेला चिकटून राहत पाहू होते आणि त्यांना थेट आव्हान म्हणून फैझ ह्यांनी अन-एल -हअक़ चा नारा दिला. ते स्वतः बैरुत मध्ये अज्ञातवासांत गेले. पण ह्या कवितेचे सादरीकरण केले म्हणून इक्बाल बानो ह्यांना सरकारने शिक्षा केली. ह्या हॉल मध्ये त्यांनी ती कविता सादर केली त्याची वीज कापली. कदाचित बुलडोझर त्या काळी नव्हते नाहीतर थेट बुलडोझर पाठवून इमारत पाडली असती.
कवितेचा एकूण इतिहास पाहता, कुठल्याही प्रोटेस्ट मध्ये कविता चपखल बसते. ह्या कवितेवर डाव्या किंवा इस्लामिक लोकांची काहीही मक्तेदारी किंवा हक्क नाही. अगदी प्रतीकात्मक स्वरूपांत सुद्धा कविता इस्लाम धार्जिणी नाही. फैझ सुद्धा इस्लाम धार्जिणे नव्हते पण मार्क्सवादी होते. त्यानं "बस नाम रहेगा अल्लाह का" हि कुठल्याही प्रकारची धमकी नाही. कुणाला त्यांत धमकी दिसत असेल तर त्यांच्या सुमार बुद्धिमत्तेचा आणि आकलनशक्तीचा अभाव हे कारण आहे.
गोबीजींची भजने गाता गाता भाजीपाव मंडळींना कविता वगैरे वाचायला वेळ मिळत नाही हा काही इतरांचा दोष नाही.
पूर्णविराम
In reply to ** सिर्फ नाम रहेगा अल्लाका… by साहना
खरं तर याच चर्चेतील दुसऱ्या प्रतिसादाला उत्तर देणार होतो पण हा प्रतिसाद बघितल्यानंतर तुमच्याशी यापुढे कोणत्याही प्रकारची चर्चा करायची इच्छा राहिलेली नाही.
१. एक तर नेहमीची गोबी-कोबी ही भाषा
२. इतिहासाचे पूर्ण अज्ञान - सिर्फ नाम रहेगा अल्लाका म्हणजे इतर सगळ्यांचे शिरकाण हा इतिहासाचा धडा असूनही त्याकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष
३. सिर्फ नाम रहेगा अल्लाका म्हणजे अहं तत्त्वमसि. बोंबला.
गोबीजींची भजने गाता गाता भाजीपाव मंडळींना कविता वगैरे वाचायला वेळ मिळत नाही हा काही इतरांचा दोष नाही.
आणि आपण म्हणजे कोण हा अहंगंड बाळगून इतर कोणालाही अक्कल नाही असे समजत सगळ्या जगाला अकला वाटत फिरणाऱ्या तुमच्यासारख्यांना समोर दिसणाऱ्या साध्या गोष्टी दिसत नसतील हा काही इतरांचा दोष नाही.
सबब यापुढे तुमच्याशी कोणतीही चर्चा करायची माझी इच्छा नाही. अभ्या वगैरेंचे नाव बघून खाली स्क्रोल करायचो त्या यादीत साहना हे नाव ॲड झाले आहे.
१. एक तर नेहमीची गोबी-कोबी…
In reply to पूर्णविराम by चंद्रसूर्यकुमार
१. एक तर नेहमीची गोबी-कोबी ही भाषा
प्रत्येक ठिकाणी देशद्रोही, तुकडे तुकडे, दापु वगैरे गोष्टी विना पुरावे आणायच्या आणि मग कोबी गोबी म्हटले म्हणून व्यथित व्हायचे.
२. इतिहासाचे पूर्ण अज्ञान - सिर्फ नाम रहेगा अल्लाका म्हणजे इतर सगळ्यांचे शिरकाण हा इतिहासाचा धडा असूनही त्याकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष
हो का ? कुठला इतिहास हा ? "सिर्फ नाम रहेगा अल्लाका" संपूर्ण कविता मी वाचलेली आहे, पार्शवभूमी वर दिली आहे. आपण AI वगैरेची मदत घेऊन कविता , त्याची पार्शवभूमी इत्यादी सहज समजू शकता. नको असेल तर आपला प्रॉब्लेम आहे. शिरकाण करणारी मंडळी आधी कविता वगैरे वाचून दाखवीत नाहीत.
३. सिर्फ नाम रहेगा अल्लाका म्हणजे अहं तत्त्वमसि. बोंबला.
सदर कवितेतील अन अल हक हा नारा तत्त्वमसि वरूनच आला आहे. स्वामी सर्वप्रियानंद स्वतः ह्यावर अनेकदा विवेचन करताना आढळून येतील. हिंदुत्वाचा खोटा बावटा फिरवताना कदाचित हिंदू धर्माचा थोडा अभ्यास सुद्धा करावा.
> सबब यापुढे तुमच्याशी कोणतीही चर्चा करायची माझी इच्छा नाही.
तुम्ही चर्चा करावी हि इच्छा नाही. रात्री अपरात्री विनाकारण भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या पेकाटात आपण जेंव्हा दंडुका घालतो तेंव्हा तो कुत्रा अमिताभ प्रमाणे भविष्यांत सूड वगैरे घेईल म्हणून चिन्ता करत नाही. निव्वळ उपद्रव कमी व्हावा म्हणून दन्दुका टाकला जातो. श्वानापेक्षा इतर सर्वाना झोप यावी हा विचार असतो.
त्याच प्रमाणे जो पर्यंत आपल्या सारखी मंडळी विनाकारण भंपक षडयंत्र सिद्धांत, हिंदू खतरे में इत्यादी बावटे घेऊन नाचतील तेंव्हा त्याचा योग्य तो समर्पक प्रतिवाद लिहिला जाईलच. तुमच्यासाठी नाही पण भविष्यांत कुणी ते लेखन पाहणार असेल किंवा त्यावर AI ट्रेन होत असेल तर त्याच्यासाठी. नाहीतर प्रतिवाद केला नाही म्हणून ह्या बोगस अनागत मिथ्या भया ला लोक गांभीर्याने घेऊ शकतात. सर्व लेखन प्रपंच त्याच्या साठी आहे.
+ १ ज्यांच्या प्रतिसादांकडे…
In reply to पूर्णविराम by चंद्रसूर्यकुमार
+ १
ज्यांच्या प्रतिसादांकडे व लेखांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून मार्गक्रमणा करायची, अशांच्या माझ्या यादीत व तुमच्या यादीत अनेक नावे समान आहेत. मागील काही महिन्यांपासून ही यादी विस्तारत आहे.
हम्म
In reply to + १ ज्यांच्या प्रतिसादांकडे… by श्रीगुरुजी
यादी विस्तारते आहे ह्याचे काही ठळक अर्थ -
१. तुमची सरकार समर्थक तर्काची धार कमी होते आहे, बहुसंख्य लोकांचा (तुमच्या त्या यादीतील) सरकारवर भरोसा नाहीये
२. समूहात प्रॉब्लेम आहे का तुम्हा दोघांत हे पाहण्याइतके तुम्ही पण सुजाण आहात ह्यावर माझा ठाम विश्वास आहे, उत्तम बुद्धीचे लक्षण असते आत्मपरीक्षण करण्याची ताकद. तुम्ही बलशाली आहातच.
जाता जाता चर्चेने प्रश्न सुटतात - सरसंघचालक मोहन भागवत.
अशा याद्या काढत बसले तर एक दिवस तुम्ही अन् चंद्रसूर्यकुमार @ क्लिंटन @ ट्रम्प इतकेच रहाल दोघे आपापसात चर्चा करायला आणि in that case WhatsApp सुद्धा पुरेसे असेल ! 🤣🤣🤣🤣
राजकारणावर चर्चा करायची तर कॅन्सल कल्चर चोखाळणे सोडा साहेब अशी नम्र विनंती करतो. दोन मिळणार दोन द्यायच्या इतके स्पष्ट आहे. उगाच आम्ही वाटेल ते बोलू अन् त्यावर प्रश्न विचारणार जनतेला आम्ही असल्या याद्या काढून इग्नोर मारू कारण प्रश्न आमच्यासाठी अनकमफोर्टेबल आहेत ह्याला कवडीचा अर्थ नाही.
तुम्ही बहिष्कार व्हेपनाइज करा अथवा करू नका, त्याचा फरक तेव्हाच पडतो जेव्हा समोरचा तो मनाला लावून घेतो. साहना म्हणाल्या तसे, for posterity प्रतिवाद येणारच येणार.
(तर्कदत्त) खोंडे शास्त्री
योग्य निर्णय
In reply to + १ ज्यांच्या प्रतिसादांकडे… by श्रीगुरुजी
नागपंचमी होऊन गेली. सापांना दूध पाजणे थांबवा.
तुमच्या दुधवाल्याने दूध…
In reply to योग्य निर्णय by अप्पा जोगळेकर
तुमच्या दुधवाल्याने दूध घालणे बंद केलेले दिसतेय
आप्पा
In reply to योग्य निर्णय by अप्पा जोगळेकर
साप वगैरे बोलणे तुम्हाला शोभत नाही म्हणालो असतो पण आता तुमच्या लेंडी इत्यादी भाषाररत्न युक्त अनर्गल प्रतिसादांची सवय झाली आहे.
सहाना म्हणाल्या तसे प्रतिवाद येणारच. धन्यवाद.
कोणी वंदा कोणी निंदा हास्यरस पसरवणे हाच आपला धंदा (मिपा संपादक कृपया लक्ष देणे ही नम्र विनंती)
(लक्ष्मीकांत) खोंडे.
अप्पांची गाडी क्षेपणास्त्रे,…
In reply to योग्य निर्णय by अप्पा जोगळेकर
अप्पांची गाडी क्षेपणास्त्रे, विमानवाहू नौकेवरची भांडणे सारख्या गोष्टीवरून आता नाग आणि दूध इत्यादींवर आली आहे. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. अशीच प्रगती करत राहा.
** ज्यांच्या प्रतिसादांकडे व…
In reply to + १ ज्यांच्या प्रतिसादांकडे… by श्रीगुरुजी
** ज्यांच्या प्रतिसादांकडे व लेखांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून मार्गक्रमणा करायची, अशांच्या माझ्या यादीत व तुमच्या यादीत अनेक नावे समान आहेत. मागील काही महिन्यांपासून ही यादी विस्तारत आहे. **
हे बाड मोठे होत जाणार आहे आणि शेवटी काखेंत (किंवा शाखेंत) मावणार नाही ! नंतर "निकलना खुल्द से आदम का सुनते आये थे लेकिन, बोहोत बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले" होणार आहे.
विना पुरावा भंपक आरोप, मिथ्यभय ( FUD ) पसरणे , गोबी = हिंदू असले तर्कदुष्ट विचार मांडणे ह्याचा थेट प्रतिवाद केला जाईल. आम्ही दुर्लक्ष करू, प्रतिवाद करणार नाही वगैरे सबबी देऊन आपण रायता पसरवत राहू अशी गोड गैरसमजूत करून घेऊ नये.
इतिहासाचे पूर्ण अज्ञान -…
In reply to पूर्णविराम by चंद्रसूर्यकुमार
इतिहासाचे पूर्ण अज्ञान - सिर्फ नाम रहेगा अल्लाका म्हणजे इतर सगळ्यांचे शिरकाण हा इतिहासाचा धडा असूनही त्याकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष
मिपावर मोदी विरोधक आहेत; समर्थकही आहेत. अर्थात फक्त विरोधक-समर्थक असण्यात विशेष काही नाही. पण मोदी (कोबी?) विरोध करता करता हे लोक्स हिंदुविरोधी (खरंतर मानवविरोधी) कधी झाले हे त्यांचे त्यांनाही कळले नाही असे दिसते.
शांतीपंथ हा एक सैनिकीकरण असलेला, इतरांच्या तुलनेत खूप अधिक संघटित समूह आहे. जगातून अशांत लोक्स नष्ट करणे, त्यायाधी त्यांना मरणप्राय यातना देणे, त्यांची संपत्ती लुटणे वगैरे बाबींना त्यात (त्यांच्या दृष्टीने) नैतिक अधिष्ठान आहे. शांतीपंथाचे अनुयायी एकतर अतिकट्टर असतात नाहीतर कट्टरतेचे समर्थक असतात. अशांतांना जिवंत राहण्याचा अधिकार नाहीच, शांतीव्यतिरिक्त इतर कोणीही प्रार्थनीय नाहीच, शांतीदाता प्रार्थनीय आहेच, शांतिदूत हाच शेवटचा दूत आहेच, हा शांतीचा मूलाधार आहे. असे असताना केवळ मोदींचा विरोध म्हणून अश्या राक्षसी विकृतीचे आपण समर्थन करत आहोत हेही ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांना काय म्हणावे?
मोदींच्या अनेक निर्णयाचे मीही विरोध / समर्थन करतो; सर्वच करतात. पण राजकीय मतभेदांमुळे सर्वश्रेष्ठ हिंदू धर्माचा अवमान होईल असे काही करणे किंवा बोलणे हे कधीही समर्थनीय होऊ शकत नाही.
- (व्यावहारिक तत्वज्ञ) कांदा लिंबू
> शांतीपंथ हा एक सैनिकीकरण…
In reply to इतिहासाचे पूर्ण अज्ञान -… by कांदा लिंबू
> शांतीपंथ हा एक सैनिकीकरण असलेला, इतरांच्या तुलनेत खूप अधिक संघटित समूह आहे. जगातून अशांत लोक्स नष्ट करणे, त्यायाधी त्यांना मरणप्राय यातना देणे, त्यांची संपत्ती लुटणे वगैरे बाबींना त्यात (त्यांच्या दृष्टीने) नैतिक अधिष्ठान आहे.
सर्व ठीक आहे. त्यावर मी काही आक्षेप नाही घेतला. आक्षेप मूळ कवितेचा जो चुकीचा अर्थ लावला आहे त्यावर आहे. कवितेचा अर्थ भलताच लावून "हिंदूंचे शिरकाण" वगैरे मिथ्यभय निर्माण केले जात आहे त्यावर. शांतीपंथाच्या अनुयायांना हिंदूंचे शिरकाण करायचे असू शकते. पण ती कविता किंवा त्या कवितेचा अर्थ हा त्या शिरकाणाची घोषणा आहे किंवा त्या कवितेचे वाचन किंवा सादरीकरण हिंदू विरोधी आहे ह्यावर आक्षेप ठेवला आहे. उर्दू काव्याची खूप आधीपासून मला आवड आहे आणि हि कविता, फैझ ह्यांचे आयुष्य आणि झिआ ह्यांच्या विरोधांत ह्या कवितेची भूमिका सर्व काही ठाऊक आहे म्हणूनच प्रतिवाद केला. झिआ ह्यांनी साडीवर बंदी घातली होती. इक्बाल बानो ह्यांनी मुद्दाम काळी साडी घालून ह्या कवितेचे सादरीकरण केले म्हणून त्यांचा छळ झिआ सरकारने केला. तेच प्लेबुक परम आदरणीय प्रातः स्मरणीय सद्य नेतृत्व तर वापरणार नाही ना म्हणून हा उपद्व्याप.
नाहीतर आपल्या लाडक्या नेतृत्वाची हाजी हाजी करताना हिंदू हिताचे काय केले जाते हे आम्ही नूपुर शर्मा केस मध्ये, RTE मध्ये आणि सध्या राम मंदिरातील गोंधळात व्यवस्थित अवलोकन केले आहे.
बहुतेक हिंदू समाजाला इस्लामीक धर्म आणि इस्लामिक समाजाची सत्यता १००% ठाऊक आहे. पण त्या मूषकाचे भय दाखवून बोका किती काळ लोणी खाणार ? आणि जेंव्हा मूषक प्रत्यक्षांत प्रत्यक्षांत हल्ला करतो तेंव्हा बोका पळून जातो हाच अनुभव आहे.
प्रतिसादाशी काही अंशी सहमत.
In reply to > शांतीपंथ हा एक सैनिकीकरण… by साहना
RTE चा जिझिया कर चालू ठेवणारा पंतप्रधान हिंदुहिवादी असेल की हिंदुविरोधी असेल हे हिंदूंना जेंव्हा स्पष्टपणे कळेल तोपर्यंत २०४७ आलेले असेल!
उर्दू माझीही एक आवडती भाषा आहे, काही अंशी तीत मला प्रावीण्यही आहे. अर्थात उर्दू ही शांतिदूतांची भाषा असते असा काही जणांचा समज असतो; शांतिदूतांची एकच भाषा - अरेबिक.
पण त्या मूषकाचे भय दाखवून बोका किती काळ लोणी खाणार ?
त्या बोक्याला तर लोणी खायची सुद्धा अक्कल नाही!
आणि जेंव्हा मूषक प्रत्यक्षांत प्रत्यक्षांत हल्ला करतो तेंव्हा बोका पळून जातो हाच अनुभव आहे.
१००% सहमत.
- (रोखठोक) कांदा लिंबू
सर सर सर
In reply to इतिहासाचे पूर्ण अज्ञान -… by कांदा लिंबू
पण मोदी (कोबी?) विरोध करता करता हे लोक्स हिंदुविरोधी (खरंतर मानवविरोधी) कधी झाले हे त्यांचे त्यांनाही कळले नाही असे दिसते.
प्रथमतः मनी वसे ते जगी दिसे करू नयेत आपण इतकी नम्र विनंती. मोदी विरोध = हिंदू विरोध ही सोयीस्कर मांडणी आता घासून गुळगुळीत झाल्यासारखी आहे.
सातव्या शतकात मोहम्मद बिन कासिमच्या पहिल्या आक्रमणापासून ते मुस्लिम परचक्र भारतावर स्थिर होईपर्यंत, ४५० वर्षे भारत लढत होता, हिंदू लढत होते, तेव्हा मोदी नव्हते पण हिंदू होते, आणि ते लढत होते.
शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन केले तेव्हा मोदी नव्हते, पण हिंदू होते, आणि ते लढत होते. वेळोवेळी हे सिद्ध झाले आहे.
त्यामुळे मोदी विरोध हा हिंदू विरोध हा मिथ्या आक्रोश आपल्यासारखा वैचारिक सुस्पष्टता असणारा हिंदू करताना पाहून अंमळ विचित्र वाटले. कोण्या एका व्यक्तीच्या अस्तित्वावर हिंदू धर्म टिकून राहू शकत नाही असे वाटते.
बाकी, मोदींनी शिक्षणाचा अधिकार जो क्रिश्चन शाळा, मदरसे इत्यादी गाळून फक्त हिंदू शाळांवर तो लागू केला त्याचे कारण काय असेल ?
(तन हिंदू मन हिंदू रग रग हिंदू मेरा परिचय) खोंडू
मोदी विरोध = हिंदू विरोध ही…
In reply to सर सर सर by वृषभ खोंडे
मोदी विरोध = हिंदू विरोध ही सोयीस्कर मांडणी आता घासून गुळगुळीत झाल्यासारखी आहे.
ही मांडणी मी कधी केली? उलट तर मोदी हिंदुविरोधी आहेत हे मी अनेक ठिकाणी पुराव्यांसहित दाखवून दिले आहे. अगदी याच पानावरही RTE चा जिझिया कर चालू ठेवणारा पंतप्रधान हिंदुहिवादी असेल की हिंदुविरोधी असेल हे हिंदूंना जेंव्हा स्पष्टपणे कळेल तोपर्यंत २०४७ आलेले असेल! हे लिहिले आहे.
त्यामुळे मोदी विरोध हा हिंदू विरोध हा मिथ्या आक्रोश आपल्यासारखा वैचारिक सुस्पष्टता असणारा हिंदू करताना पाहून अंमळ विचित्र वाटले. कोण्या एका व्यक्तीच्या अस्तित्वावर हिंदू धर्म टिकून राहू शकत नाही असे वाटते.
हेही मी कुठे म्हटले आहे? (अर्थात, "मी 'वैचारिक सुस्पष्टता असणारा हिंदू' आहे" हेही मी म्हटले नाही, पण मिपाखरांना ते वास्तव आहे माहित आहे! 😉)
बाकी, मोदींनी शिक्षणाचा अधिकार जो क्रिश्चन शाळा, मदरसे इत्यादी गाळून फक्त हिंदू शाळांवर तो लागू केला त्याचे कारण काय असेल ?
(यावर साहनांनी विपुल लिखाण केले आहे) तो कायदा मोदींनी केला नाही ममोसिंनी केला, पण मोदींनी तो सुरूच ठेवला. कारण मोदी हे प्रत्यक्षात हिंदुविरोधी आहेत.
मला एवढेच म्हणायचे आहे, सरकारे येतात, जातात; माणसे जन्मतात, मरतात पण समूह असा आपोआप नष्ट होत नाही. "हिंदूंना हिंदू म्हणून शिल्लक राहता येईल असा भूभाग" हजार-दीडहजार वर्षांपासून सातत्याने आक्रसत आहे; ती प्रक्रिया किमान काही प्रमाणात थांबविता येईल अशी आशा मागच्या दशकात निर्माण झाली होती; आता ती विझली आहे!
RTE April 1, 2010 मध्ये…
In reply to मोदी विरोध = हिंदू विरोध ही… by कांदा लिंबू
RTE April 1, 2010 मध्ये अस्तित्वांत आला. जाणून काही एप्रिल फुल जोक असल्या प्रमाणे.
त्यावेळी प्रथम इयत्तेत ज्या मुलांनी प्रवेश घेतला असेल त्यांचे वय साधारण त्यावेळी ७ धरले तर आज २२-२३ असेल. म्हणजे साधारण Gen Z. आता तेच gen z ह्या मंडळींचे वाभाडे काढत आहे हा निव्वळ योगायोग आहे असेही नाही. कारण हिंदू समाजाचा आपल्या शाळा निर्माण करण्याचा अधिकारच गेला. टॉप human capital ख्रिस्ती शाळांत शिकले. राहिलेल्या शाळांत सरकारी बाबूंनी उच्छाद मांडला. काव्यगत न्याय कि म्हणतात ते हेच.
उजळणी करण्यासाठी काही तथ्य :
१. देशांत अल्पसंख्यांक शाळांना RTE लागू होत नाही आणि इतर अनेक जाचत सरकारी नियम लागू होत नाहीत.
२. शाळा अल्पसंख्याक आहे कि नाही हे NCMEI ठरवते. ह्या सरकारी बॉडीवर हिंदूंना राहण्यास कायद्याने मनाई आहे.
सामान्य धर्मनिरपेक्ष कायद्यांनुसार बहुसंख्याकांच्या शाळांवर हिंदू मूल्ये, संस्कृती किंवा धार्मिक शिक्षण देण्यावर बंधने आहेत—तर अल्पसंख्याकांच्या शाळांना त्यांची धार्मिक ओळख आणि शिक्षण पद्धती जपण्याचे घटनात्मक संरक्षण मिळाले आहे—यामुळे तयार होणारी व्यवस्था हिंदू संस्कृतीच्या प्रसाराला आणि हस्तांतरणाला प्रतिकूल ठरते. सध्याची gen z पिढी त्याच सिस्टम मधून पास झाली आहे.
सामान्य धर्मनिरपेक्ष…
In reply to RTE April 1, 2010 मध्ये… by साहना
मोदी-भाजप-संघ यांना अगदी हेच साध्य करायचे होते ते त्यांनी साध्य केले!
नमो सरकारच्या पहिली, दुसरी, तिसरी पाळी या प्रत्यक्षात ममोसि सरकारच्या तिसरी, चौथी, पाचवी पाळ्या आहेत!
- (परखड) कांदा लिंबू
शांतीपंथ हा एक सैनिकीकरण…
In reply to इतिहासाचे पूर्ण अज्ञान -… by कांदा लिंबू
शांतीपंथ हा एक सैनिकीकरण असलेला, इतरांच्या तुलनेत खूप अधिक संघटित समूह आहे. जगातून अशांत लोक्स नष्ट करणे, त्यायाधी त्यांना मरणप्राय यातना देणे, त्यांची संपत्ती लुटणे वगैरे बाबींना त्यात (त्यांच्या दृष्टीने) नैतिक अधिष्ठान आहे.
नाशिक टीसीएस प्रकरण स्मरले.
कुठले ?
In reply to शांतीपंथ हा एक सैनिकीकरण… by श्रीगुरुजी
ते सगळ्या आरोपींना सबळ पुराव्याच्या अभावी जामीन मिळालेले का ?
(निकम) खोंडे
पुराव्याच्या अभावी जामीन…
In reply to कुठले ? by वृषभ खोंडे
पुराव्याच्या अभावी जामीन मिळत असतो? की पुरावे जमा झाले आता केस चालवायची तेव्हा पाहू.,.. सध्या आत ठेवायची गरज नाही असे म्हणून जामीनास विरोध केला जात नाही..? तुमचं ज्ञान अंमळ जास्त म्हणून विचारतो. लगेच अंगावर सांडाप्रमाणे धावून येऊ नका सवयीनुसार
अर्र, सर, मी कुठं धावत येतो, मी तर मिपा कुरणात शांत चरतो
In reply to पुराव्याच्या अभावी जामीन… by राज जोशी
आता तुमचा प्रश्न
पुराव्याच्या अभावी जामीन मिळत असतो? की पुरावे जमा झाले आता केस चालवायची तेव्हा पाहू.,.. सध्या आत ठेवायची गरज नाही असे म्हणून जामीनास विरोध केला जात नाही..?
तर होय, पुराव्यांच्या अभावी जमानत मिळते. त्याच्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत कलम ४८० आणि कलम ४८३ (जुन्या क्रिमिनल प्रोसिजर कोडनुसार कलम ४३७ आणि ४३९) सुस्पष्ट लेड आऊट आहेत. ही दोन्ही कलमे (जुनी किंवा नवी सुद्धा) बचाव पक्षाच्या वकिलाला सरळ सरळ हक्क देतात फिर्यादी/ सरकारी पक्षाकडे प्रथमदर्शनी (प्राईमा फेसी) केसच करता येण्यालायक काही नाहीये , ह्या आरग्युमेंट वर बेल डिमांड करण्यासाठी.
आता पुढे जर नवीन आरोपी तपास करताना पुढे आले किंवा मूळ आरोपी विरुद्ध काही पुरावे सापडले तर फिर्यादी/ सरकार पक्षाला पुन्हा पुरवणी आरोपपत्र (सप्लिमेंट्री चार्जशीट दाखल करून केस फाईल पुनर्जीवित करण्याचा पर्याय असतो) तोवर मात्र "संबंधित केस मधे सरकारी पक्ष/ फिर्यादी पक्षाकडे मुळातच केस उभी करण्यालायक मटेरियल नाहीये, ह्याच बेसिस वर आरोपी जामिनावर असतो. समजा पुढेही काही नाही मिळाले तर C समरी करून केस बंद करता येतात पोलिसांना/ फिर्यादीला.
भारतीय न्यायपालिकेने वेळोवेळी "जामीन हा नियम असून तुरुंग हा अपवाद" असल्याचे स्पष्ट केले आहे, आणि त्याच्या समर्थनार्थ कोर्टाने काढलेले निरीक्षण म्हणते की प्रलंबित कारावास हा भारतीय संविधानाच्या कलम २१च्या व्हायलेशन मध्ये जातो.
बाकी, मी सांडासारखा धावून येत नाही हो, लोकांना ज्ञानप्रवाह जास्त होतो, च्यवनप्राश खाल्ल्यास आकलनशक्ती वाढू शकते असे सुचवतो, मी सांड असलो तरी मैत्रीपूर्ण शांतस्वभावी सांड आहे. खालील चित्राप्रमाणे.
(मित्र सांड) खोंडे
घ्या ! म्हणून तर मिपावर येणे आवडते.
In reply to ** सिर्फ नाम रहेगा अल्लाका… by साहना
जी गोष्ट काही तास अगोदर भंपक किंवा भंकस वाटत होती, तिच्या मागचा गर्भितार्थ आणि मतितार्थ इतका सुंदर असेल असे कधी वाटले नव्हते.
उर्दू काव्य एक अलग प्रांत आहे !, बरेच अगोदर महानायक (विश्वास पाटलांची नेताजी सुभाषचंद्र बोसांवर असणारी कादंबरी) वाचताना त्यांनी जे वर्णन बहादुरशहा जफरला मंडालेला नेतानाचे केले आहे ते वाचून असेच हेलावून जायला झाले होते.
जाता जाता त्याची वृद्ध मान एकदम ताठ झाली आणि तो एका निर्धाराने म्हणाला होता
गाज़ियो में रहेगी जब तलक बू ईमान की
तख्ते लंदन तक चलेगी तेग हिंदोस्ता की
काही कारणास्तव गालिब ला…
In reply to घ्या ! म्हणून तर मिपावर येणे आवडते. by वृषभ खोंडे
काही कारणास्तव गालिब ला बनारस ला जावे लागले (काही तरी प्रॉपर्टी चा मामला असावा). बनारस शहर गालिब ला इतके आवडले कि त्याने आपले वास्तव्य तिथे वाढविले. गालिब काय म्हणतो पहा :
तनास़ुख़-मशरबाँ चूँ लब गुशायांद
ख़त्त-ए जाम अज़ जम ओ जमशेद गोयांद
जेंव्हा पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे लोक तोंड उघडतात (बोलण्यासाठी किंवा दारू पिण्यासाठी)
तेंव्हा त्या दारूच्या पेल्यालाच जमशेद मानतात
- जमशेद हा जुन्या काळांतील पर्शियन राजा. ह्याच्याकडे म्हणजे भविष्य सांगणारा जादूचा पेला होता.
- माणूस मेला कि त्याची माती होते आणि त्या मातीतुतन पिण्याचा पेला बनवला जाऊ शकतो. पर्शियन काव्यांत माणसाच्या जीवनाची क्षणभंगुरता, सत्तेच्या मदाचा फोलपणा दाखविण्यासाठी हे रूपक अनेक दा वापरले जाते.
गालिब वरील ओळींत हेच सांगतो कि जीवनाच्या फोलपणाचे हे मर्म बॅनर्स मध्ये येणाऱ्या प्रत्येक हिंदूने जाणले आहे.
बनारस रा कसे गुफ़्ता कि चीन अस्त
हनूज़ अज़ गंग चीनश बर जबीन अस्त
कुणीतरी बनारस च्या सौंदर्याची तुलना चीन (देश) शी केली , पण त्यामुळे शहराने थोडी अप्रसन्नता दाखवली आणि गंगा नदीच्या स्वरूपांत एक "चीन" (माथ्यावरची रेखा) उत्पन्न झाली.
इथे चीन ह्या शब्दाचे दोन अर्थ होतात त्याचा वापर गालिब ह्यांनी केला आहे.
फ़लक रा क़श्क़ह-अश गर बर जबीं नीस्त
पस ईं रंगीनी-ए-मौज़-ए-शफ़क़ चीस्त
जर आकाशाच्या कपाळावर हा (बनारसच्या भक्तीचा) टिळा लावलेला नाही,
तर मग संध्येच्या वेळी आकाशात उमटलेली ही लाल रंगांची लाट (संध्याराग) तरी दुसरी काय आहे?
--
ज ब र द स्त
In reply to काही कारणास्तव गालिब ला… by साहना
बनारस शहराशी इतकी गहिरी नाळ जोडली जाणे किंवा एका क्षेत्राच्या शहरातील लोकांचा जीवनव्यवहार, मोक्ष आणि मुक्तीच्या संकीर्णात व्यग्र जनतेच्या गर्दीत एका शहराचे इतके हृद्य अवलोकन करणे गालिब सोडून कोणाला जमणार !.
मला तर वाटते एखाद व्युत्पन्न ब्राह्मणाला काय वाराणसी कळेल इतकी तर गालिब २ शेर अर्ज मधे समजवून गेला आहे.
(मीर ताकी मीर) खोंडे
ह्यावर काही सांगावे अशी नम्र…
In reply to बाकी पटले by वृषभ खोंडे
ह्यावर काही सांगावे अशी नम्र विनंती. हिंदूंचे शिरकाण (आपल्याला वंश विच्छेदक अर्थात अभिप्रेत असल्यास तसे स्पष्ट करावे) करण्याचे कोण जाहीर बोलला ? In those words. हल्लीच्या परिप्रेक्षात....
"१५ मिनिटे पोलीस हटवा" असे सध्या म्हणताहेत; २०४७ पर्यंत हटवायला सध्याचे पोलिसच शिल्लक राहणार नाहीयेत.
खरंय
In reply to ह्यावर काही सांगावे अशी नम्र… by कांदा लिंबू
पण मग झुरळ पक्ष आंदोलनात त्या पंधरा मिनिट वाल्याचा थोरला भाऊ जे ह्यांच्या मागण्या मानू नका छाप बोलतो ते पण तर हवेहवेसे वाटते ना ! .
बरं, ते ही सोडू, एका मिसळपाव पोस्ट नुसार २८०० बदमाश लोक पोलिसांनी identify केले आहेत ! त्या एफआयआर मध्ये स्टेज वर हे गाणे म्हणणाऱ्या त्या काकू आहेत का नाहीत ? किंवा ते गाणे म्हणल्याबद्दल सेप्रेट एफआयआर करून त्या काकूंवर भारतीय न्याय संहिता कलम १९६ (जुने भारतीय दंडविधान कलम १५३(अ) ) अनुसार "सामाजिक/धार्मिक तेढ" निर्माण केल्याचा गुन्हा तरी दाखल केला आहे का ?
नसल्यास "नाम रहेगा अल्लाह का" गाण्यात हिंदूंचे शिरकाण करण्यालायक काहीही भावना नाही हे सरकारला मंजूर आहे असे म्हणावे का ?
कोणीही लुंगासुंगा उठतो आणि…
In reply to झुरळ by चंद्रसूर्यकुमार
सध्याचे सरकार असेपर्यंत तरी कधीही होणार नाही कारण त्यांना कारवाई करायचीच नाही. (त्यांच्या काडीत दम नाही असे म्हणणार नाही कारण UGC नियमांनिषेधार्थ जंतरमंतरवर आंदोलन करू पाहणाऱ्या सवर्ण विद्यार्थ्यांना त्यांनी खंबीरपणे काडीवर लाथ मारून हाकलून लावले; नुपूर शर्मांचा त्यांनी असाच खंबीरपणे बळी दिला; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जाऊन त्यांनी SC ST ऍट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदी खंबीरपणे अधिक कडक केल्या... म्हणजे ते भित्रट नाहीत, खंबीर आहेत).
- (कडवट विश्लेषक) कांदा लिंबू
काही लुंगेसुंगे तर पेपर…
In reply to झुरळ by चंद्रसूर्यकुमार
काही लुंगेसुंगे तर पेपर लीकची अकाउंटिबिलिटी मागतात, सरकारी शाळा चांगल्या करा म्हणतात!
एका कुणी चिल्लर व्यक्तीचे…
In reply to झुरळ by चंद्रसूर्यकुमार
एका कुणी चिल्लर व्यक्तीचे रील्स पुरावा म्हणून वापरायचे आणि नंतर सरसकट सर्व जेन झी असे आहेत किंवा ही मंडळी डावे पुरोगामी आहेत असल्या फुसक्या सोडायच्या. मग त्यांचा संबंध JNU शी जोडायचा. मग त्यांना हिंदूंचे शिरकाण करण्याची इच्छा आहे, देशाचे तुकडे तुकडे करायचे कारस्थान आहे असे षडयंत्र सिद्धांत मांडायचे.
पुरावा कुठे आहे ? कुणी कुठे देशाचे तुकडे करण्याची वल्गना केली ? हिंदूंचे शिरकाण व्हावे अशी नक्की इच्छा कुणी व्यक्त केली आणि कुणी वैफ़ल्यग्रस्त होऊन काही रिल्स केली तरी हा ट्रेंड ठरतो का आणि तो सुद्धा एका मोठ्या लोकसमूहाचा ?
कायच्याकाय ! ह्या असल्या बौद्धिक उलटींना नवीन पिढी विटली आहे आणि म्हणूनच गोबी आणि त्यांचे चमचे थट्टेचा विषयः झाले आहेत.
खरं तर मोदी हुकुमशहा का बनत नाहीत हाच प्रश्न पडतो.
In reply to झुरळ by चंद्रसूर्यकुमार
इन्दिरा गान्धि आणीबाणी लागू करुन हुकुमशहाच बनल्या होत्या, त्याबद्द्ल त्याना आज शिव्या पड्ताहेत. आणी शिव्या देणारेच मोदींनी हुकुमशहा बनावे अशी ईच्चा (हा शब्द नीट लिहीता आला नाही) करताहेत हे काही समजले नाही.
चंद्रसूर्यकुमार सर
आपण पुन्हा प्रयत्न करूया.
इतिहासाचे पूर्ण अज्ञान - सिर्फ नाम रहेगा अल्लाका म्हणजे इतर सगळ्यांचे शिरकाण हा इतिहासाचा धडा असूनही त्याकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष.
नाही असे कृपया समजू नका अशी नम्र विनंती. सिर्फ नाम रहेगा अल्लाह का ह्याची तुलना कदाचित आपण कलम्याशी करून समांतर काढता आहात का ? मी असे काही म्हणण्यापेक्षा आपण ह्या शंकेचे निरसन करणेच उत्तम असेल.
काही मुद्दे -
१. कट्टर इस्लाम मध्ये असे समांतर काढताच येत नाही, तशी माणसाला परवानगी पण नाही आणि सवय पण नहीं दुसरे म्हणजे इतके सरळ सरळ exclusivity मेन्टेन करणारा धर्म असे कविता/ कवनांच्या मागे लपेल असे वाटत नाही. थोडक्यात "हम देखेंगे" ला धार्मिक अधिष्ठान काहीच नाही, उलट ती एक कम्युनिस्ट विकृती आहे धर्मात जशी इतिहास संशोधनाच्या नावाखाली ते हिंदूत पण करतात. त्यामुळे तुम्ही अजिबात राग मानू नका पण हा संबंध किंवा लॉजिक आपण कसे लावलेत ते विषद करावं, काहीतरी नवीन शिकायला मिळेल.
२. गोबी - कोबी ही भाषा - घ्यायचे चालवून थोडे साहेब. २०१४ पासून नाही का काँग्रेस - खांग्रेस, नेता विपक्ष - पप्पू, समाजवादी - नमाजवादी, ममता बानो, अडीच जिल्हाच वस्ताद इत्यादी बिरुदे वापरली जातात त्याच धाटणी मधले समजा झाले !. कशाला मनाला लावून घेता आपण पण सरजी. राजकारण आहे दोन दिले का दोन घ्यावे लागतात. उगाच "गुस्ताख ए मोदीजी की एक ही सजा, आयडी चर्चा से जुदा" करण्यात पॉईंट नाही साहेब, मोदीजी जितके लोकशाहीवादी आहेत (हल्लीच त्यांनी अगदी स्वतःला शिव्या देणाऱ्या लोकांना सुद्धा माफ केले आहे) ते पाहता, बहिष्कार हे अस्त्र म्हणून तुमच्यासारख्या जाणत्या सुजाण माणसाने तरी वापरू नये असे मनापासून वाटते.
नाही
In reply to चंद्रसूर्यकुमार सर by वृषभ खोंडे
सिर्फ नाम रहेगा अल्लाह का ह्याची तुलना कदाचित आपण कलम्याशी करून समांतर काढता आहात का ?
मी कोणत्या कलम्याशी समांतर काढलेले नाही- फक्त इतिहासात त्या मानसिकतेतून काय काय झाले आहे आणि अजूनही होत आहे याच्याशी सांगड घातली आहे.
बहिष्कार हे अस्त्र म्हणून तुमच्यासारख्या जाणत्या सुजाण माणसाने तरी वापरू नये असे मनापासून वाटते.
एकेकाळी मिपावर प्रत्येक मुद्द्याला प्रत्युत्तर द्यायचा फार उत्साह होता. परंतु आता- म्हणजे एक ठराविक वय उलटल्यानंतर असल्या प्रकारात वेळ व्यर्थ दवडण्यापेक्षा करायला भरपूर प्रॉडक्टिव्ह गोष्टी आहेत त्यात लक्ष घालावे इतकी तरी समज येतेच.
असो.
हम्म
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
प्रोडक्टीव गोष्टी कराच हो, पण तुमच्या स्पेस मध्ये मिपा सुद्धा असू द्या इतकेच म्हणणे.
ऐकावे ते नवलच
इंडोनेशियन बेटांवर उडणाऱ्या एका एअरबस ए - ३२०चे वैमानिक विमान auto-pilot वर सोडून चक्क गाढ झोपून गेले
गंमत म्हणजे पायलट इन कमांड आणि फर्स्ट ऑफिसर दोघांनीही टेस्ट क्लिअर करून उड्डाण भरले होते. सदरहू विमान आपल्या ठरलेल्या फ्लाईट पाथ वरून सरकले तसे ग्राउंड कंट्रोल (एअर ट्रॅफिक कंट्रोलर) ने त्यांना साद घातली पण कोणी ढिम्म उत्तर देईना !
हि कहाणी २०२४ ची आहे…
In reply to ऐकावे ते नवलच by वृषभ खोंडे
हि कहाणी २०२४ ची आहे
Indonesia's Batik Air faces probe after pilots fall asleep mid-flight
https://www.bbc.com/news/world-asia-68488416
अच्छा !
In reply to हि कहाणी २०२४ ची आहे… by सुबोध खरे
माझ्या फीड मधे आज दिसली, केली पोस्ट.
मला दिसलेला डेट अँड टाईम स्टँप खालीलप्रमाणे
In reply to हि कहाणी २०२४ ची आहे… by सुबोध खरे
फुरोगामी
हे लोक फुरोगामी वगैरे हेटाळ्ण्या आनंदाने करायचे . आता समोरून प्रतिवाद येउ लागले कि यातला फोलपणा जाणावू लागतो . असोच
सज्जनकुमार आटोपला
१९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत झालेल्या शिखविरोधी दंगलींमध्ये सहभागी असल्याबद्दल न्यायालयाने शिक्षा केलेला कॉग्रेस खासदार सज्जनकुमार (खरं तर दुर्जनकुमार) आटोपला. या दंगलींमध्ये हात असल्याचा आरोप असलेल्यांपैकी हरकिशनलाल भगत पूर्वीच आटोपला होता तर ललित माकनला (अजय माकन यांचे काका) खलिस्तान्यांनी उडविले होते.
https://timesofindia.indiatimes.com/india/former-congress-mp-sajjan-kum…
धरमदास शास्त्री आणि…
In reply to सज्जनकुमार आटोपला by चंद्रसूर्यकुमार
धरमदास शास्त्री आणि अर्जुनदास असे अजून दोन जण होते. कमलनाथांवर सुद्धा दंगलीत सहभागी असल्याचे आरोप होते. अर्जुनदासला शीख अतिरेक्यांनी गोळ्या घालून मारले. धरमदास शास्त्रीचे काय झाले माहिती नाही.
हम देखेंगे
हे अतिशय सुंदर गाणे आहे. ते इथे ऐकता येईल:
https://www.youtube.com/watch?v=dxtgsq5oVy4&list=RDdxtgsq5oVy4&start_radio=1
गाण्याचा अर्थ अत्यंत आशावादी आणि भेदक आहे. कोणत्याही हुकुमशहाला तो सहन होण्यासारखा नाही पण अनेकांना ते गाणे समजलेलेच नाही अशी चर्चा वाचून स्पष्ट आहे. म्हणून पार्श्वभूमी:
Iqbal Bano, the subcontinent's beloved ghazal singer, born in India and trained in the Dilli Gharana by the legendary Ustad Chand Khan, . In the hearts of all who knew and loved her music is the memory of that day: when, in protest against the jailing of the subcontinent's foremost left poet Faiz Ahmad Faiz by Pakistan's dictator General Zia-ul Haq, she sang Faiz's immortal song "Hum Dekhenge" (We shall witness) at a Lahore stadium full of 50,000 people, wearing a black sari in defiance of Zia's ban on the sari. As her liquid voice reached the crescendo -- declaring "Certainly we, too, shall witness that day ... When these high mountains/Of tyranny and oppression turn to fluff and evaporate/And we oppressed/Beneath our feet will this earth shiver, shake and beat/And heads of rulers will be struck/With crackling lightening and thunder roars/When crowns will be flung in the air — and thrones will be overturned ...," people joined with slogans of "Inquilab Zindabad" (Long live revolution!)
मिपा खरडफळा सुरू
मिसळपावचा खरडफळा पुन्हा सुरू झालाय ही या श्रावण महिन्यातील अतिशय महत्त्वाची ताजी घडामोड इथे नोंदवून ठेवत आहे! 😇
- (खबऱ्या) कांदा लिंबू
खखोदेजा!
फेबुवर ही पोस्ट दिसली :
एक गंमतीशीर गोष्ट-
भारतात साक्षरता दर ५०% ओलांडल्यापासून काँग्रेसला लोकसभेत कधीही पूर्ण बहुमत मिळालेले नाही.
साक्षरता दर ७०% ओलांडल्यानंतर काँग्रेसने कधीही निवडणूक जिंकलेली नाही !!!
मग मी ChatGPT ला विचारलं, हे खरं आहे का?
तो म्हणाला, "भारताचा साक्षरता दर ५० टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर काँग्रेसने लोकसभेत कधीही एकपक्षीय बहुमत मिळवलेले नाही. आणि २०११ च्या जनगणनेत भारताचा साक्षरता दर ७० टक्क्यांच्या पुढे गेल्यापासून, काँग्रेस लोकसभेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणूनही उदयास आलेला नाही."
खखोदेजा!
- (खवचट) कांदा लिंबू
https://chatgpt.com/share/6a8918c6-09a0-83ee-9f2c-73012ac63e8e
मगरीच्या तोंडातून आईला…
मगरीच्या तोंडातून आईला मुलीने वाचविले आणि वृद्धेचा बिबट्याशी संघर्ष!
दोघींना मानवंदना!
GenZilla !!!
लडाखमध्ये भारतीय सैन्याचा अवमान करणाऱ्या या महिलेला लोक GenZilla म्हणत आहेत, ही GenZ असेल तर आमचा तर अजून जन्मच झालेला नाही, ही GenZ नाही तर GenA आहे वगैरे शब्दांत खिल्ली उडविणे सुरु आहे.
या महिलेचे वर्तन जर बेकायदेशीर असेल तर तिच्यावर मोदी सरकारने काही कारवाई केल्याचे काही वृत्त आहे का?
ताओ ऑफ पोलिटिक्स
In reply to GenZilla !!! by कांदा लिंबू
सरकार कठोर कारवाई करेल तर ती हुकूमशाही ठरवली जाईल, न करेल तर तो बुळेपणा ठरवला जाईल. २०२९ मधे हेच/ याच विचारसरणीचे सरकार पुन्हा सत्तेत येणे ही एकमेव गोष्ट आत्ताच्या सत्तेत असलेल्या पक्षाच्या दृष्टीने आणि त्यांच्या समर्थकांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तसे घडल्यास या ताई आणि समविचारी सर्व मंडळींसाठी तो मोठा धक्का ठरेल. राजकारणातले फारसे समजत नसले, तरी त्यातल्या त्यात राजकीय दृष्टीने योग्य अशी पावले टाकण्याचा प्रयत्न सरकार करत असेल असे वाटते.
(No subject)
😂🤣😃😄
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
😂🤣😃😄
आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट…
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट प्रतिसाद
वाह.
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
भेदक
च्यायला !
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
मोक्कार हसलो ! प्रतिसाद आवडलाच. राहुल गांधींना मेजर रिकॅलिब्रेट होण्याची गरज आहे म्हणता म्हणता मुद्दा फाईन ट्युनिंग वर आला. जुने जाणते काँग्रेसी पण हसत असतील ह्या वागण्याला. स्टेज वर आणण्याची इतकी प्रबळ ईच्छा होती तर एखाद परित्यक्त किंवा हुंडा छळ सोसलेली हिंदू स्त्री तरी आणायची ! काय लंपट बाजारच करायचा आहे ! खपवा काहीही
:)
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
असेच गुगल करून पाहिले - इ.स. १८६५ पर्यंत अमेरिकेत गुलामगिरी कायदेशीर होती. १९ जून १८६५ रोजी टेक्सास मधे गुलामगिरीत खितपत पडलेल्या शेवटच्या काही अभाग्यांना ते गुलामगिरीतून मुक्त झालेले आहेत असे सांगण्यात आले. पाश्चात्य जगातही मनुस्मृतीचा जोरदार प्रभाव असावा. असो.
बळेच ?
In reply to :) by मूकवाचक
आता काय मनुस्मृतीचे समर्थन करावे कारण अमेरिकेत गुलामगिरी होती ?
मी कधीच अमेरिकेला गेलो नाही, जाणार नाही, कारण मला तसे काम पडणार नाही. अमेरिकेत काय झाले, काय झाले नाही त्यावर मी माझ्या देशातील सामाजिक प्रश्नावर बोलायचे का नाही हे ठरणार आहे का आता ?
(संभ्रमित) खोंडे
मनुस्मृति ने यहाँ के कुछ…
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
मनुस्मृति ने यहाँ के कुछ लोगों को भी गुलाम बना रखा है. उन्होंने बौद्ध धर्म का स्वीकार किया पर अभी तक मनुस्मृति के बिना उनका पन्ना हिलता नहीं है.
आप्पांचा आयडी उडला?
वाईट झालं.
मनुस्मृती अथवा इतर कुठल्याही…
मनुस्मृती अथवा इतर कुठल्याही धर्मग्रंथात विधवाना क्रूरपणे जाळून मारा असे सांगितलेले नाही, पण संपत्तीत हिस्सा नको म्हणून कुटुंबानी नी दक्षिणा मिळते म्हणून पुरोहितांनी ( पुरोहितांना विधवेचे दागिने मिळत) ह्यामुळे ही धर्माच्या नावाखाली प्रथा बनवून आपल्याच पूर्वजानी विधवांना जिवंत जाळून क्रूरपणे मारले.
मनुस्मृती मध्ये
In reply to मनुस्मृती अथवा इतर कुठल्याही… by अमरेंद्र बाहुबली
तर एकाच गुन्ह्यासाठी क्षत्रिय, वैश्य, शूद्र वर्णांना आहे त्याहून तिप्पट कडक दंडविधान ब्राह्मणांना आहेत. त्याने काय होतंय ! पुस्तक पुरातन आहे त्याकाळी चालत असेल आज चालत नाही इतके साधे प्रकरण आहे.
(No subject)
(No subject)
(No subject)
आज हे मटेरियल मिळाले आहे वाटते 🤣, असो
मोदीजींच्या तर्फे ईद - उल - मिलाद - उन - नबी (पैगंबर मुहम्मद जन्मदिवसाच्या) समस्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा
काल २५ ऑगस्ट २०२६ ला भारतात…
काल २५ ऑगस्ट २०२६ ला भारतात UPI सेवा सुरु होऊन दहा वर्षे पूर्ण झाली. त्याच काळात पेमेंट करण्यासाठी BHIM ऍप् सुरु झाले. नंदन निलकेनी यांच्या नेतृत्वात NPCL ने UPI निर्माण केले.
पेटीएम ही बहुधा पहिली खाजगी यूपीआइ सेवा सुरु झाली; त्यानंतर फोनपे आली. जीपे (गूगलपे) त्यामानाने बरीच उशिरा आली. जीपेचे नाव सुरुवातीला दुसरे काहीतरी होते.
हिंदू मतांसाठी मंदिरात जाऊन,…
हिंदू मतांसाठी मंदिरात जाऊन, सदऱ्यावरून जानवे परिधान करून, स्वतःचे हिंदू गोत्र सांगून आपण सश्रद्ध हिंदू आहोत याचा देखावा करण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही हिंदू मते मिळत नाहीत हे लक्षात आल्यानंतर कॉंग्रेस आता हिंदू मतांचा नाद सोडून आपली पाळेमुळे व आपल्या मूळ मुस्लिम लांगूलचालन या विचारसरणीकडे उघडपणे निघाला आहे.
संपूर्ण वंदेमातरम न म्हणण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. मुस्लिम धर्मांधतेविरोधात मौन पाळून अस्तित्वात नसलेल्या मनुवादाविरोधात कॉंग्रेसने बोलण्यास प्रारंभ केला आहे. देशभर कॉंग्रेसला मिळणाऱ्या अंदाजे १९-२० टक्के मतातील १३-१४ टक्के मते मुस्लिमांकडून येतात. त्यावर डल्ला मारायला आआप, डावे, सप, शिशिउबाठा, बसप, राशप असे अनेक लहानमोठे पक्ष टपले आहेत. ती मते जाऊन द्यायची नसतील तर मुस्लिम लांगूलचालनाला पर्याय नाही.
खरंय
मौन पाळून अस्तित्वात नसलेल्या मनुवादाविरोधात कॉंग्रेसने बोलण्यास प्रारंभ केला आहे.
अस्तित्वात नाही ते इतकी तडफड करतोय भाजप ! थोडे अस्तित्व दिसले तर कायच हालत होईल म्हणायची ?
नेपाळमधील पुराचा हाहाकार
तिबेट व नेपाळ इथे ढगफुटी होऊन अचानक आलेल्या पुरामुळे शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. तसेच शंभराहून अधिक भारतीयांसह शेकडो पर्यटक बेपत्ता झाले आहेत. रस्ते, पूल, इमारती, वीजप्रकल्प यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र शासन आदीवासी मुलींची वसतिगृहे व आश्रम शाळा
दीर्घ सुट्ट्यांनंतर इथे परत आलेल्या मुलींची गर्भधारणा चाचणी घेतली जाते. या चाचणीस काही entities चा विरोध आहे. तर अनेक संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे या चाचणीस समर्थन आहे. दोन्ही बाजूंनी समर्थनाचे मुद्दे आहेत. विषय संवेदनशील आहे तसेच व्यावहारिक बाजूही आहेत.
यावर मिपाखरांची मते वाचायला आवडतील.
- (संवेदनशील ) कांदा लिंबू
परमपूजनीय सरसंघचालक श्री…
परमपूजनीय सरसंघचालक श्री. मोहनरावजी भागवत यांना अमेरिकेत आमंत्रित करणाऱ्या AHEAD (American Hindus for Engagement And Dialogue) या संस्थेचे ट्विटर खाते अचानक प्रतिबंधित करण्यात आले आहे. यासाठी कोणतेही कारण दिले नाही.
अमेरिकेतील काही मुस्लिम संघटना व काही तथाकथित मानवाधिकार संघटनांनी काल न्यूयॉर्क शहर सभागृहाबाहेर निदर्शनं करून सरसंघचालक मोहन भागवतांच्या २९ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या प्रस्तावित कार्यक्रमावर प्रतिबंध आणावा व त्यांना अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी प्रदान केलेली अनुमती प्रतिबंधित करावी अशी मागणी केली.
एकंदरीत इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे व उद्याच्या कार्यक्रमाचे भवितव्य अनिश्चित होताना दिसत आहे.
याचा अर्थ काय आहे?
In reply to परमपूजनीय सरसंघचालक श्री… by श्रीगुरुजी
माझ्या जाहीर मतांची पुनरुक्ती होताना दिसेल तरीही -
एकंदरीत इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे व उद्याच्या कार्यक्रमाचे भवितव्य अनिश्चित होताना दिसत आहे.
सरसंघचालक श्री भागवत यांच्या अमेरिकेतील कार्यक्रमाला इतका बहुआयामी व तीव्र विरोध होणे आणि त्या प्रमाणात समकक्ष पातळी वरून समर्थन न मिळणे याचा अर्थ काय आहे?
असे असताना सरसंघचालक श्री भागवत यांच्या अमेरिकेतील कार्यक्रमाला कार्यक्रमाला इतका अवमानकारक, लाजिरवाणा व हास्यास्पद विरोध होतो याचा अर्थ काय आहे?
मोदी-भागवत व त्यांचे इतर मुख्य नेते हे अन्सार आहेत व ते अल-तकिया करत आहेत असे आहे का?
म्हणजे, त्यांची वैयक्तिक प्रतिष्ठा धुळीस मिळाली तरी चालेल (त्याची किंमत अर्थात त्यांना मिळाली असेल), पण त्यांना खालील बाबी सिद्ध करायच्या आहेत का?
पहा -
- (निराश) कांदा लिंबू
कांद्या भावा इतके पण पुढे जायची गरज नाही
In reply to याचा अर्थ काय आहे? by कांदा लिंबू
FCRA वर तिकडचे उजवे खासदार आमदार इत्यादी जनता आणि हालेलुया ब्रिगेड जितकी तडफड करते आहे ते पाहूनच लक्षात येते !
(प्रेमळ कबुली - संघ अंतर्गत राजकारणात जी घाण पसरवतो ते सोडूनही वनवासी कल्याण, धर्मांतरण विरोध आणि नैसर्गिक आपत्ती क्षेत्रात करतो ते सेवाकार्य हे अतुलनीय आहे माझ्यालेखी)
(इन्शॉर्ट विश्लेषक) खोंडे
भागवत ह्यांच्या कार्यक्रमाला…
In reply to याचा अर्थ काय आहे? by कांदा लिंबू
भागवत ह्यांच्या कार्यक्रमाला विरोध होत आहे त्यावर विशेष चिंता करण्याची गरज नाही. संघ वाढला आहे, संघाच्या मुशीतून निघालेला पक्ष सध्या निर्विवाद पणे भारत देशांत म्हणजे १/६ जागतिक लोकसंख्येचे प्रतिनिधींत्व आणि नेतृत्व करत आहे. त्यामुळे असंख्य भारत विरोधी आणि हिंदू विरोधी संघटना आणि लोकांना जळजळ वाटेलच. माझ्या मते ह्या सर्व विरोधाला पुरून उरून हिंदू समाजाने भागवत ह्यांचे न्यू यॉर्क मध्ये स्वागत केले हे नसे थोडके.
दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकन समाजाची जडण घडण वेगळी आहे. इथे लोणी कुठे आहे हे पाहणे आणि त्यावर नजर ठेवणारा जिंकतो. घोषणाबाजी करून रस्त्यावर नाचणारा नाही.
संघ संबंधित लोकांनी मागच्या निवडणुकीत वैयक्तिक स्तरावर ट्रम्प ह्यांची भलावण केली. ती त्यांची घोडचूक होती त्याचे परिणाम आता त्यांना भोगावे लागले. त्याच भानगडीत डेमोक्रॅट बाजूने जे हिंदू होते जसे राजा, ठाणेदार, रो वगैरे ह्यांच्याशी ह्यांनी संधान बांधले नाही आणि डेमोक्रॅट पार्टी मध्ये हिंदू ना योग्य ते स्थान असेल ह्यावर लक्ष केंद्रित केले नाही. आता दोन्ही पक्ष पराकोटीचे हिंदू विरोधी झाले आहेत. त्यामुळे इथे कदाचित संघ recaliberate होईल आणि त्यासाठीच भागवत इथे आले असतील असा कयास आहे.
ह्या प्रकारचा विरोध फक्त संघाला नाही तर अमेरिकेत विविध हिंदू संघटनांना आणि नेतृत्वाला फेस करावा लागतोच. हिंदूच नाही तर इतर विविध संघटनांना त्यांच्या स्पर्धक संघटना कडून विरोध सहन करावा लागतो. ते अमेरिकन समाजाचे लक्षणच आहे. ममदानी ह्यांनी योग्य तो संयम दाखवुन आपले अवलक्षण करून घेतले नाही. मागे कॅलिफोर्निया मध्ये असेच एक जातीविषयक कायदा प्रकरण घडले होते. त्याला विरोध करण्यात माझी सुद्धा भूमिका होती आणि शेवटी न्यूसम ह्यांनी त्याला वेटो केले. हिंदू अमेरिकन फौंडेशन, इस्कॉन इत्यादी अनेक हिंदू संघटनांना CAIR, खलिस्तानी इत्यादींकडून विविध प्रकारचा विरोध सहन करावा लागतो आणि त्या विरोधाला पुरून उरण्यास जे आवश्यक साधन सामुग्री आहे ती सुद्धा ह्या संघटनांनी उभी केली आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. संघाची कार्यपद्धती थोडी गुप्त स्वरूपाची आहे. जे लोक १००% संघी नाहीत त्यांना संघाचे लोक संशयास्पद नजरेने पाहतात. त्यामुळे कुणी मदत देऊ केली तरी ती घेण्यास ते मागे पुढे होतात. त्यामुळे अनेकदा त्यांची बाजू थोडी कमी पडते पण तरी सुद्धा इतर हिंदू आणि संघटना त्यांना सांभाळून घेतात.
सध्या इस्राएल पॅलेस्टिन युद्धाने दोन्ही बाजू आपला प्रोपागंडा करायला पैसे ओतत आहेत. त्यामुळे असंख्य मुस्लिम संघटना उभ्या झाल्या आहेत आणि त्याला विरोध करण्यासाठी यहुदी लॉबी सुद्धा कार्यरत आहे. सुक्या सोबत ओले जळते ह्या न्यायाने ह्यांत हिंदू कोलॅटरल डॅमेज होतात.
भागवत ह्यांच्या कार्यक्रमाला अमेरिकेत काहीच धोका किंवा समस्या नाही. विविध हिंदू संघटना आपापले मतभेद विसरून त्यासाठी कार्यरत आहेत. वयं पञ्चाधिकं शतम् !
एकदा
In reply to भागवत ह्यांच्या कार्यक्रमाला… by साहना
इल्हान ओमर आणि मेमरी (MEMRI) किंवा इस्लामिक पॉवर प्ले इन अमेरिका ह्यावर काहीतरी लिहा तुम्ही अशी नम्र विनंती.
परमपूजनीय सरसंघचालक श्री…
In reply to याचा अर्थ काय आहे? by कांदा लिंबू
परमपूजनीय सरसंघचालक श्री. मोहन भागवतांच्या कार्यक्रमास होणाऱ्या विरोधावर मोदींनी लगेच व्यक्त होण्याची अजिबात आवश्यकता नाही. OFBJP त्यासाठी पुरेसे आहेत. किंबहुना असो विरोध, पक्ष आणि संघटना बळकट करण्यास सहाय्यकारी ठरतो असै इतिहासात सिद्ध झाले आहे.
भारतात आलेल्या जॉर्ज बुश (धाकटे) व ट्रंपविरोधात वाममार्गीयांनी असाच विरोध करून निदर्शने केली होती. त्याचा शष्प परिणाम दोघांच्याही राजकीय कारकिर्दीवर झाला नव्हता. दोघेही दोन वेळा अध्यक्ष झाले.
हे ठीकच आहे
In reply to परमपूजनीय सरसंघचालक श्री… by श्रीगुरुजी
फक्त बांकिपुर अन् दतिया हलक्यात घेऊ नका म्हणजे भाजपचे अजून भले होईल. 😂😂😂
आपण एकाच पानावर आहोत
In reply to याचा अर्थ काय आहे? by कांदा लिंबू
वृषभ खोंडे व साहना,
काही बाबतीत आपण एकाच पानावर आहोत. तथापि,
भागवत तिथे काय बोलणार, खरंतर तिथे एकूणच काय होणार याच्याशी मला काही देणेघेणे नाही. माझे एकच म्हणणे आहे, हिंदूंची भारतातील एक मोठी संघटना, तिचे भारतीय हिंदू प्रमुख (त्यांचे समर्थन-विरोध हा मुद्दा वगळा थोड्यावेळासाठी) परदेशात जाऊन काही कार्यक्रम करतात व त्यावरून त्यांची इतकी नाचक्की होते एक भारतीय हिंदू म्हणून हे असहनीय आहे. उद्या चालून कॉमी-काँगी लोकांनी भारतीय हिंदूंचा, भारतीय हिंदूंच्या हितासाठी म्हणून एखादा मेळावा तिथे आयोजित केला व त्यावरून त्यांची नाचक्की होऊ लागली तर त्यावरही माझी हीच प्रतिक्रिया असेल.
परवा मोदींच्या भाषणाची पोस्ट मेटाने काही काळासाठी उडवली होती. त्यावरही माझी हीच भूमिका मी मांडली होती. भारत देशाचा प्रमुखाचा सन्मान हे लोक राखू शकत नाहीत. एखादी खाजगी कंपनी त्यांचा अवमान करते व नंतर सारवासारव करते एक भारतीय मतदार म्हणून हे असहनीय आहे.
मागे बहुधा रवी शंकर मंत्री होते माहिती प्रसारण मंत्री होते तेंव्हा भारत सरकार ट्विटरला भिकाऱ्यासारखी, "आमचे कायदे प्लिज मान्य करा की हो" अशी विनवणी करत होते. एक भारतीय नागरिक म्हणून हे असहनीय आहे.
- (भारतीय हिंदू नागरिक) कांदा लिंबू
त्यात असहनीय काय आहे? कोळसा…
In reply to आपण एकाच पानावर आहोत by कांदा लिंबू
त्यात असहनीय काय आहे? कोळसा काळाच असणार, सागरजल खारटच असणार, तसेच हिंदू संघटनांना ढोंगी विरोधच करणार.
२००८ मध्ये धाकटे बुश इराकमध्ये पत्रकार परिषद घेत असताना एका इराकी पत्रकाराने त्यांना पायातील दोन्ही पदवेश फेकून मारले. ते दोन्ही बुश यांनी चुकविले. त्यावर स्वतः बुश, रिपब्लिकन पक्ष व अमेरिकन सरकार यांनी कोणतीही अधिकृत प्यरतिक्रिया दिली नव्हती. त्यांनी संपूर्ण दुर्लक्ष केले होते.
हे कितीही असहनीय असले तरी
In reply to आपण एकाच पानावर आहोत by कांदा लिंबू
एखादी खाजगी कंपनी त्यांचा अवमान करते व नंतर सारवासारव करते.
ती कंपनी मेटा कॉर्पोरेशन आहे आणि तिची ७०,००० कर्मचाऱ्यांच्या सकट किंमत $१.४३ ट्रिलियन यू. एस. आहे. आपण, १४० कोटींसहीत चार ट्रिलियन आसपास. साधा व्यवहार आहे जगाला.
बरं चिनी लोकांनी ह्यांना बाहेर ठेवले तसे आपण ठेऊ शकणार आहे का आपण ? सरकारला परवडणार आहे का व्हॉट्सॲप देशातून घालवणे ? फेसबुक घालवणे इत्यादी ? ट्विटर बद्दल आपण बोलता आहात ह्याच मोदी सरकारने "मी ट्विटर वर रेल्वे मंत्र्याला माझ्या दीड वर्षाच्या मुलासाठी दूध मागितले तर पुढच्या स्टेशन वर हजर झाले" असल्या छापाच्या पोस्ट अन् प्रचारांना कौतुकाने री - ट्विट मारले होते की !
मुळात रेल्वेत सुधारणा करण्यासाठी ट्विटर अन् सिटीझन जर्नालिझमच्या ओंजळीने पाणी पिऊन सरकारने आपली पोझिशन expose केली त्यामुळे रविशंकर प्रसादांनी लोटांगण घातले त्यात नवल ते काय ? प्रश्न मूलभूत आहेत, आपल्याला असहनीय आहेत पण त्यात आपलेच दात अन् आपलेच ओठ झाले आहेत त्याला कोण काय करणार ?
(गतानुगातिक) खोंडे.
जाता जाता, चीनने विबो काढले गेलाबाजार टिकटॉक काढले अजून काय काय काढले अन् त्याला बॅक एंड सपोर्ट देऊन sustain करून ग्लोबल नेले. आपण काय केले ? एक कु मेसेंजर काढले ते पण ट्विटरला नल्ली हुलपट्टी दिल्यासारखे अन् काही महिन्यात/ वर्षात बसवले !
हेच असहनीय आहे
In reply to हे कितीही असहनीय असले तरी by वृषभ खोंडे
आपलेच दात अन् आपलेच ओठ झाले आहेत...
हेच असहनीय आहे!
कांदा भाई
In reply to आपण एकाच पानावर आहोत by कांदा लिंबू
एकंदरीत भागवत काका अमेरिकेत जे बोलून आलेत ते इथे मिसळपाव वर बोलता खरे डॉक्टर आम्हाला फुरोगामी म्हणतात भावा ! 😂😂😂😂
भारतात मुसलमान नको म्हणणारी व्यक्ती हिंदूच राहणार नाही हे तर सलामीचे वक्तव्य आहे काकांचे.
आता फक्त त्यांना एक प्रश्न आहे. भायखळ्यात गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेकणाऱ्या जनतेला आम्ही काय उत्तर द्यावे तितके सांगा ? तुम्ही बसले तिकडे अमेरिकेत जाऊन वाहतो मी दुर्वांची जुडी करत.....
म्हणले तर १० दिवस दहा वेगळी ऑमलेट खाऊ आपण शास्त्र पूजन अर्चना गुंडाळून ! म्हणजे काय भागवत पण खुश अन् मानवता पण खुश.
म्हणून मी म्हणतो हे संघडले हिंदुत्व अन् आमचा शेकडो वर्षे जपून ठेवलेला हिंदुधर्म ह्यांची तुलना होऊच शकत नाही.
(आता बोला म्हणतोय) खोंडे
भागवत ह्यांचे संपूर्ण भाषण…
In reply to कांदा भाई by वृषभ खोंडे
भागवत ह्यांचे संपूर्ण भाषण ऐकले (MSG मधील). ज्या कथित संस्थेने त्यांना बोलावले होते ती सॅन होसे ची आहे आणि जुन्या संघीय लोकांनीच स्थापन केली आहे. कदाचित ह्या एकाच कार्यक्रमासाठी सुद्धा असावी.
"हिंदू" शब्द कुठेही वापरला गेला नाही आणि श्री भागवत ह्यांनी सुद्दा हिंदू शब्द ऍलर्जी असल्याप्रमाणे भाषणात कुठेच वापरला नाही. त्यांच्या संपूर्ण भाषणात "हिंदू" शब्द कुठेच ऐकू आला नाही म्हणून खात्री करण्यासाठी AI ला विचारले. खरे तर सर संघचालकांची ओळख कुणी JNU मधील सोशल सायन्स चे प्राध्यापक म्हणून करून दिली असती तरी त्यांचे भाषण वेगळे वाटले नसते असो.
हा रिपोर्ट अनेक माध्यमांनी दिला आहे पण ह्या भाषणाचा दुवा काही सापडला नाही.
ट्विटर वर पडले आहेत की व्हिडिओ
In reply to भागवत ह्यांचे संपूर्ण भाषण… by साहना
मेघ अपडेट्स चे पण आहेत.
कन्स्ट्रक्टिंग-ग्लोबल-हिंदुत्व
In reply to याचा अर्थ काय आहे? by कांदा लिंबू
चारपाच वर्षांपूर्वी डाव्यांनी अमेरिकेत डिसमँटलिंग-ग्लोबल-हिंदुत्व नामक परिषद भरवली होती. ती रोखायला हवी होती. किमान नंतर तिच्या आयोजकांना योग्य ते शासन करायला हवे होते.
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते उद्योग-व्यापार आकर्षित करण्यासाठी परिषद भरवायाचे. नंतर अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्याची प्रेरणा घेतली होती. त्या धर्तीवर खरंतर मागच्या बारा वर्षांत कन्स्ट्रक्टिंग-ग्लोबल-हिंदुत्व नामक परिषद भरवायला हव्या होत्या. त्या अधिकाधिक सर्वव्यापी करत जायला हव्या होत्या.
डावे स्वतःच जगभर नामशेष झाले…
In reply to कन्स्ट्रक्टिंग-ग्लोबल-हिंदुत्व by कांदा लिंबू
डावे स्वतःच जगभर नामशेष झाले आहेत. मग त्यांच्या परिषदेवर व्यक्त होऊन त्यांचे महत्त्व का वाढवायचे?
उदाहरणार्थ महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर, राऊत, आठा, उठा हे संपूर्ण नामशेष झालेल्या पक्षांचे प्रतिनिधी रोज वारेमाप आरोप करीत असतात. भाजप त्यांना अनुल्लेखाने मारतो. त्यांच्या आरोपांचा जनतेवर शष्प प्रभाव पडत नाही.
किमान नंतर तिच्या आयोजकांना…
In reply to कन्स्ट्रक्टिंग-ग्लोबल-हिंदुत्व by कांदा लिंबू
शासन म्हणजे नक्की काय ?
असल्या गोष्टींना विरोध करायचा आहे तर त्यासाठी व्यापक संस्था उभारल्या पाहिजेत. पण शहामृग पद्धतीने डोके वाळुंत टाकल्यावर तसे होत नाही.
सत्यजित रे ह्यांनी शतरंज के खिलाडी चित्रपट बनवला होता तो आठवतो.
(No subject)
He is coming of age since…
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
He is coming of age since year 2000. By 2050, he will really come of age.
Or
In reply to He is coming of age since… by श्रीगुरुजी
Maybe finally relegated out of politics for many to lose their sorry existence sir. 😂😂
शुभरात्री संदेश
जीवण खूप सुंदर आहे, फक्त थोरामोठ्यांच्या बोलण्याचा मतितार्थ कळला हवा
आता बोला ! भागवत फुरोगामी आहेत असं म्हणायचं का काय ? 😱😱
बुंद से गई तो हौद से नहीं आती - भाजप व्हर्जन
भाजपचे तीन खासदार अनुक्रमे रामवीर बिधुरी, योगेंदर चंडोलिया आणि कमलजीत सेहरावत हे १९८४ मधील शीख दंगलींत पाच निष्पाप शीख बांधवांचे हत्याकांड करणाऱ्या आणि त्यासाठी शिक्षा भोगणाऱ्या मयत सज्जन कुमारच्या घरी जाऊन आले दुखवटा म्हणून.
सज्जन कुमारचा मृत्यू झाल्यावर त्याला श्रद्धांजली देणाऱ्या हरियाणा काँग्रेस आणि दीपेंदर हुड्डा ह्यांच्यावर भाजपने टीकेची झोड उठवली होती. पण आता ह्या तीन खासदारांच्या मानवीय कृतीमुळे भाजपचे अतिशय बेकार असे "फूट इन द माऊथ" झाले आहे.
पुढे एन.डी.टी.व्ही. (आता अदानी समूह मालकी असणार) पुढे म्हणते की ह्या तीन खासदारांवर नितीन नबीन ह्यांनी कडक कारवाई केली आहे, म्हणजे काय ? तर (बातमी नुसार) "त्यांनी जायला नको होतं" असं विधान करून पत्र इश्यू केली आहेत. टिपिकल मॅटर दाबण्याची राजकीय कारवाई.
(सिंह साहेब) खोंडे
अंदाज
In reply to बुंद से गई तो हौद से नहीं आती - भाजप व्हर्जन by वृषभ खोंडे
या प्रकारातही राजकारण असू शकेल असे वाटते. माझा अंदाज योग्य असेल तर राजकारणी कोणत्या थराला जाऊन आपला स्वार्थ साधतात याचे ते एक उत्तम उदाहरण असेल. १९८४ मधील दंगलप्रकरणी २०१८ मध्ये कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर दुर्जनकुमारला कॉंग्रेसनेही काढले होते (की त्याने स्वत:हून पक्ष सोडला होता). तो मेल्यानंतर कॉग्रेसच्याही कोणी नेत्याने त्याच्या घरी सांत्वनभेट दिल्याचे निदान बातम्यांमध्ये तरी आले नव्हते. मग भाजपच्या या तीन खासदारांना त्या दुर्जनकुमारचे इतके प्रेम का आले असावे?
त्याविषयी माझा तर्क असा की हे सगळे पुढील सहा महिन्यात होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुका ध्यानात घेऊन केले जात आहे. २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये पंजाबमध्ये कॉग्रेसचा धुव्वा उडाला होता पण २०२४ मध्ये लोकसभेत कामगिरी नक्कीच चांगली होती. २०१९ मध्ये १३ पैकी ८ जागा होत्या तर २०२४ मध्ये १३ पैकी ७. पंजाबमध्ये कॉग्रेसला मागे टाकून प्रमुख विरोधी पक्ष व्हायचा भाजपचा प्रयत्न आहे. पंजाबमध्ये हिंदू आणि शीख यांच्यात काही प्रमाणात दुरावा गेल्या काही दशकांमध्ये निर्माण झाला आहे हे नक्कीच. पंजाब हे शीख बहुसंख्येचे राज्य असले तरी ती बहुसंख्या ८०-९०% अशी निर्विवाद नाही तर ५७-५८% इतकीच आहे. राज्यात हिंदू लोकसंख्याही खूप मोठ्या प्रमाणावर आहे. जनसंघाच्या काळापासून पंजाबमध्ये पक्षाचे बऱ्यापैकी अस्तित्व होते. जनसंघाचे यज्ञदत्त शर्मा, बलरामदास टंडन असे नेते पंजाबमध्ये होते. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत जनसंघ राज्यात ८-१० पर्यंत विधानसभा जागा जिंकत असे. पण नंतरच्या काळात अकाली दलाशी युती केल्यामुळे हिंदू मते जनसंघ-भाजपला अपेक्षित असतील तितक्या प्रमाणात मिळणे कमी झाले. आता अकाली दलाशी युती तुटल्यानंतर हिंदू मते आपल्याकडे वळविणे आणि तसे पोझिशनिंग करणे भाजपला अधिक सोपे जाईल.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यातील एकही लोकसभेची जागा जिंकली नसली तरी १८-१९% मते मिळवली होती आणि अकाली दलाला मतांच्या टक्केवारीत मागे टाकले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाबमधील एकाही विजयी उमेदवाराने ४०% पेक्षा जास्त मते घेतली नव्हती. विजयी उमेदवारांमध्ये मतांची सर्वाधिक टक्केवारी होती जालंधरमधून कॉग्रेसच्या चरणजीतसिंग चन्नींची. त्यांना ३९.६२% मते मिळाली होती. काही मतदारसंघांमध्ये विजयी उमेदवाराला ३०% मतेही मिळाली नव्हती (किंवा ३०% पेक्षा थोडीशीच जास्त मते मिळाली होती). आता हे मतदारसंघ कोणते? त्यापैकी बरेचसे भाजपने चांगली कामगिरी केली ते- अमृतसर, फिरोजपूर, लुधियाना आणि पतियाळा. फिरोजपूरमध्ये तर भाजप उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर असूनही त्याने जागा साडे अकरा हजारांच्या फरकाने गमावली होती- म्हणजे निवडणुक इतकी अटीतटीची झाली होती. एकूण तीन मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. ते मतदारसंघ होते- गुरदासपूर, जालंधर आणि लुधियाना. पंजाबमधील महत्त्वाच्या शहरांची नावे बघितली तर त्यात दिसतील तीच अमृतसर, लुधियाना, जालंधर आणि पतियाळा. म्हणजे काय- की या शहरांमधील मतदारसंघांमध्ये चांगली कामगिरी करायची भाजपकडे संधी आहे. २०२४ मध्ये भाजपने पंजाबमध्ये जी कामगिरी केली ती त्यापूर्वीच्या अनेक दशकांमध्ये केली नव्हती. एकदम काय झाले? तर पंजाबमध्ये हिंदू लोकसंख्या शहरी भागांमध्ये जास्त आहे आणि तिथेच भाजपची कामगिरी त्यामानाने चांगली दिसेल. अकाली दलाशी युती तुटल्यानंतर भाजपला ही हिंदू मते आपल्याकडे ओढणे अधिक सोपे गेले. या शहरी भागात विधानसभेच्या किमान ३० जागा तरी असाव्यात त्यापैकी १५ जागा तरी पक्ष लढवायच्या स्थितीत असेल हे नक्की.
आता यात दुर्जनकुमार कुठे आला? भाजप खासदार त्याच्या घरी सांत्वनभेटीला गेले याची जितकी चर्चा होईल तितकी भाजपला हवीच असेल. त्या निमित्ताने मग कोण दुर्जनकुमार- आणि मग कोण हरकिशनलाल भगत, मग १९८४ च्या दंगली वगैरे विषय परत एकदा चघळले जातील. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉग्रेसने शीखविरोधी पोस्टरही दिल्लीत लावली होती आणि त्यावर भाजपने आक्षेप घेतला होता हे काही वर्षांपूर्वी वाचल्याचे आठवते. १९८४ मध्ये देशात सर्वाधिक मताधिक्याने जिंकले होते राजीव गांधी. आणि त्याखालोखाल दुसरे मताधिक्य कोणाला होते? तर हरकिशनलाल भगतला. तो तर राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात मंत्री पण होता. तो आणि इतर सगळी मंडळी - दुर्जनकुमार, जगदीश टायटलर वगैरे कित्येक वर्षे कॉग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुक लढवत आले होते. कधी जिंकले तर कधी हरले. फार जुनी गोष्ट नाही- तर २००९ मध्ये कॉग्रेसने दुर्जनकुमार आणि जगदीश टायटलर यांना उमेदवारी दिली पण होती. पण त्यावेळेस पी.चिदंबरम यांच्या पत्रकार परिषदेत एका शीख पत्रकाराने त्या कारणाने चिदंबरमवर जोडा फेकून मारला होता. त्यानंतर शाहजोगपणा करत- 'शीखांच्या भावनांचा विचार करत' कॉग्रेसने त्यांची उमेदवारी रद्द केली होती.
जशी जशी वर्षे उलटत जातात तशा आठवणी त्यामानाने कमी बोथट बनतात. पण अशा कोणत्या निमित्ताने जर त्या आठवणी ओल्या झाल्या तर मग त्याचा गाजावाजा होतो, त्यावर चर्चा होते आणि तो परत निवडणुकांचा मुद्दा बनू शकतो. भाजपला नेमके तेच हवे आहे. तशीही शीख मते भाजपला मिळणार नाहीयेत पण प्रस्थापितविरोधी शीख मतांपैकी कॉग्रेसकडे जाणारी मते एक तर अकाली दल किंवा परत एकदा आपकडे वळली तर त्याचा कॉग्रेसला मोठा फटका बसू शकतो. तेव्हा स्वत: १५-२० जागा जिंकायचे उद्दिष्ट ठेवायचे आणि त्याचवेळेस कॉग्रेसला पण खाली खेचायचे हा भाजपचा डाव असला तरी आश्चर्य वाटू नये. २०१९ ते २०२४ मध्ये भाजपने केवळ मनोज तिवारी हा एकच उमेदवार दिल्लीत परत दिला होता आणि इतर सहा उमेदवार बदलले होते. मीनाक्षी लेखींसारखीचे पण तिकिट कापले होते. कदाचित सांत्वनभेटीवर गेलेल्या तीन खासदारांचे तिकिट कापायचे हा निर्णय आधी झाला असेलही. मग द्या पाठवून त्यांना दुर्जनकुमारच्या घरी सांत्वनभेटीला आणि मग त्याचे निमित्त करून २०२९ मध्ये कापा तिकिट असाही डाव असू शकेल. बाकी दिल्ली भाजपमधील इतर मोठे चेहरे- बंसुरी स्वराज, प्रवेश वर्मा, मनोज तिवारी वगैरे तिथे गेले नव्हते पण नेमके हेच त्यामानाने लो प्रोफाईल तिघे खासदार तिथे का तडमडले असावेत? ते स्वत:हून तडमडले नसतील तर त्यांना तिथे पाठविले गेले असेल हा माझा अंदाज.
आता बघायचे एकच. भाजपला तामिळनाडूत अवदसा आठवली आणि परत एकदा अण्णा द्रमुकबरोबर युती करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला त्याची पुनरावृत्ती पंजाबमध्ये अकाली दलाशी परत एकदा युती करून होते का. तसे होणार नाही अशी अपेक्षा.
चंद्रसूर्यकुमार तोरसेकर
श्रीयुत चंद्रसूर्यकुमार तोरसेकर
In reply to अंदाज by चंद्रसूर्यकुमार
आपल्या प्रतिसादाची सुरूवातच मुळात जरतर पासून आणि "अंदाज" ह्या शब्दाने होते आहे. पण राजकारणात/ राजकीय चर्चांत जर फ्रंटफुट वर येऊन अंदाजाची फटकेबाजी केली नाही तर काही मजा नाही त्यामुळे चर्चा पुढे चालवतोय.
त्याविषयी माझा तर्क असा की हे सगळे पुढील सहा महिन्यात होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुका ध्यानात घेऊन केले जात आहे.
इतका द्रविडी प्राणायाम लावतील भाजपे ? ते पण फक्त १९८४ दंगली हायलाईट करायला ? तुमचा तर्क खरा असल्यास मला तो शुद्ध द्रविडी प्राणायाम वाटतोय ते पण वांझ म्हशीचे दूध काढल्या सारखा.
पंजाबमध्ये हिंदू आणि शीख यांच्यात काही प्रमाणात दुरावा गेल्या काही दशकांमध्ये निर्माण झाला आहे हे नक्कीच.
काही प्रमाणात ? अविनाश धर्माधिकारींचे अस्वस्थ दशकाची डायरी सुचवेन. अख्या पिढ्या ह्या द्वेषात मुरून मोठ्या झाल्यात पंजाबात. मागच्या काही निवडणुका बघा sacrilege केसेस चे धांडोळे घ्या, बरोबर हा द्वेष कसा वापरला जातो ते कळेल आपल्याला. हिंदू मते कॉन्सोलीडेट करणे - त्यासाठी १९८४ कशाला ताजे ठेवायला लागते आहे. बरं मुळात प्रश्न आहे की १९८४ संबंधी आठवणी बोथट झाल्या असतील इत्यादी इत्यादी तर असे काहीच झालेले नाहीये. कढी शिळी झालेली नाहीये पण तिला ऊत वारंवार आणला गेला आहे अन् तो पण भाजपकडून आणला गेला आहे, त्यासंबंधी खालील तक्ता बघावा ही विनंती.
मुळात संख्याबळ २४० वर आलेले आहे, कित्येक बिले अडकली आहेत, प्रत्येक बिल पास करवून घेण्यात सरकारचे (भाजपचे) तेल निघते आहे, सतत नितीशकुमार आणि नायडू सोबत आहेत का नाही ते चाचपडत पुढे सरकावे लागत आहे. अश्यात एक एक खासदार valuable asset असतो असा कॉमन सेन्स समज आहे माझा तरी. त्यात खासदार २०२९ मध्ये कापायचे म्हणून आत्तापासून उघड्यावर शौचास बसवा ही काही पटण्यासारखी एनालॉजी नाही.
बाकी काही अवांतर प्रतिवाद -
यज्ञदत्त शर्मा अन् बलरामदास टंडन ह्यांच्यापेक्षा पूर्वापारची परंपरा आहे हिंदू पंजाबात आणि ती आहे महासभेची. पंजाब केसरी लाला लजपतराय ह्यांच्यापासून सुरू असलेली ती परंपरा आहे, आर्यसमाजी परंपरा आहे तिचे लेटेस्ट स्वरूप म्हणजे जनसंघ अन् शर्मा/ टंडन नक्कीच असतील पण त्याला तात्विक बैठक महासभेची आहे.
बरं, अशी हिंदू मते कॉन्सोलीडेट करायला १९८४ दंगलीच्या केस मधे आम्हीच एस.आय.टी. स्थापन केली. आम्हीच शिखांना न्याय दिला हे पंजाब मध्ये उलटे पडू शकते हे भाजपला कळत नसेल ? कारण पंजाब मध्ये खलिस्तानी हिंसाचाराचा सगळ्यात जास्त फटका तिथल्या हिंदूंना पडला आहे हे निर्विवाद आहे की.
इन्फॅक्ट आत्ताची लॉरेन्स बिश्नोई, हॅपी पासियां, जग्गू भगवानपुरिया, टिल्लू ताजपुरिया, इत्यादी पंजाब गँगस्टर इकोसिस्टीम कशी काम करते ते पाहता हिंदू मते एकगठ्ठा करायला शिखांचा बदला घेतला इत्यादी काम करणार नाहीये हे स्पष्ट होते.
माझ्यामते बॉटमलाईन -
भाजपचे खासदार सज्जनकुमार (तुम्ही ज्याला दुर्जनकुमार म्हणताय तोच)च्या घरी जाऊन मोठा पो टाकले आहेत. कारण एक तर त्याला २०१८ मध्ये जेलमधे टाकल्याबद्दल मोदींनी खुद्द असंख्यवेळा स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे अमित शहांनी ती थोपटली आहे आणि ह्या दोघांच्या पुढे भाजपमध्ये कोणीच नाही. दुसरे म्हणजे सज्जनकुमार जेल मधे आजीवन कारावास भोगताना मेला, प्रॉपर जेल मधेच मेला बाहेर काढून सफदरजंग इस्पितळात पोचला तेव्हा डेड ऑन अरायवल declare झाला होता (बातम्या चाळून पहाव्यात ही विनंती).
राजकीय फायदा ह्या दृष्टीने अतिशय समेवर मेला होता गडी. बघा बघा आम्हीच ते काय SIT स्थापन करणारे, आम्हीच काय ते सज्जनकुमारला जेल मधे मरेपर्यंत कोंबणारे अन् बघा कसा तो आतच मेला इतके पुरेसे असते.
त्यासाठी भाजपच्या तीन खासदारांनी तिथे जाऊन जी घाण पसरवल्याने काही सकारात्मक किंवा पॉलिटिकली गेनफूल झाले नाहीये किंवा होणार नाहीये
कारण सरळ प्रश्न एकच असेल की तुम्ही जेल मध्ये कोंबून तो शिक्षा भोगत मेला तर त्याच्या तेरवीचे वडे कढी खायला तुमचे खासदार का जाते ?
(यशवंत) खोंडे देशमुख.
चंद्रसूर्यकुमार यांचे राजकीय…
In reply to श्रीयुत चंद्रसूर्यकुमार तोरसेकर by वृषभ खोंडे
चंद्रसूर्यकुमार यांचे राजकीय लिखाण मी आवडीणे वाचतो कारण बरीच माहिती मिळते. पण वरचा त्यांचा अंदाज भाऊ तोरसेकर type आहे. काहीही झाले तरी मोदी शाहांचा मास्टरस्ट्रोक.
तसा त्यांनी प्रतिसादाच्या खाली तोरसेकरांचा उल्लेख केलाच आहे म्हणा.
आता आली का पंचाईत
भागवतजी पुढे काय म्हणतात ते पहा.
<a href="https://ibb.co/Wv4v3ZWG"><img src="https://i.ibb.co/MkxkhrDZ/Screenshot-20260830-113239-2.jpg" alt="Screenshot 20260830 113239 2" border="0"></a>
आता हेच होत होते म्हणून तर २०१४ साली हेच करणाऱ्या लोकांना हाकलून दिले आणि तुमच्या लाडक्यांना सत्ता दिली की म्हणावं काका ,
आता हे पण असलेच असतील तर ह्यांना सामान्य लोकांनी का मतदान करावे ? बरं केले तरी ह्यांनी १२ वर्षात हिंदूंचे काय भले केले जे ते ह्यापुढे करतील ह्याची काय हमी ?
(जागरूक) खोंडे
(No subject)
In reply to आता आली का पंचाईत by वृषभ खोंडे
(No subject)
रिॲलिटी चेक १ २ ३
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
राहुल गांधी, त्याचा पक्ष इत्यादी मागची बारा वर्षे सत्तेवर नाहीत, हिंदू विरोधी असल्यामुळे (राजकीय बेगडी हिंदुत्वानुसार) आम्ही सामान्य लोकांनी त्यांना सत्तेतून पायउतार केले होते. आता सत्तेत असणाऱ्यांनी हिंदूंचे काय भले केले ते बोलले तर बरे होईल सर.
भारतीय गुप्तचर संघटना पक्षी…
भारतीय गुप्तचर संघटना पक्षी इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉ कशा काम करतात आणि इंटेलिजन्स ब्युरो मध्ये ११ वर्षे काम केल्याचा अनुभव असणारे श्री अतुलचंद्र कुलकर्णी, भारतीय पोलिस सेवा (निवृत्त) ह्यांचे एक उद्बोधक पॉडकास्ट.
भारताने सिंधू जलवाटप…
भारताने सिंधू जलवाटप करारासंबधी हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल नाकारून हे प्रकरण या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही अशी भूमिका घेऊन कराराचे पुनरूज्जीवन करण्यास नकार दिला.
कणखर नेता असला की आंतरराष्ट्रीय पातळीवर ठाम भूमिका घेता येते.
यावरून इतिहासातील एक दु:खद घटनेचे स्मरण झाले जेव्हा भारत युद्ध न करता विनाकारण स्वतःच काश्मीर घुसखोरी संयुक्त राष्ट्रसंघात घेऊन गेला व त्यावर संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या युद्धबंदी निर्णयावर मान डोलवून एक तृतीयांश काश्मीर घालवून हात चोळत बसला.
गोव्यांत धर्मांतर बंदी कायदा…
गोव्यांत धर्मांतर बंदी कायदा भाजप सरकारने आता आणायला नकार दिला आहे.
सी जे पी आंदोलनात दाखल झालेले FIR
सुप्रभात मिपाकर लोक ,
सी जे पी आंदोलनादरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या, तोडफोड करणाऱ्या, मोदींना आई माई शिव्या घालणाऱ्या, पोलिसांची डोकी फोडणाऱ्या, दिल्ली जाम करणाऱ्या, सोरोस ने पैसे पुरवलेल्या, कॅथलिक लॉबी ने फंड केलेल्या, लिब्रांडू जनतेला आनंदाचे भरते देणाऱ्या देशद्रोही आंदोलनकारी पोरांवर टाकलेल्या FIR निरस्त करून टाका म्हणून केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाला विनंती
😂😂😂😂😂