Skip to main content

चालू घडामोडी । ऑगस्ट २०२६ । श्रावण १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी बुधवार, 05/08/2026 15:20 या दिवशी प्रकाशित केले.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे.

 

श्रावण महिना सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे या महिन्यात आकाशातील पांढरे-काळे ढग, सरसर येणाऱ्या पावसाच्या सरी, मध्येच दिसणारे निरभ्र आकाश, पुन्हा पडणारा रिपरिप पाऊस हे निसर्गचित्र नेहमीचंच असतं.  

मिपावरचे लेखन-प्रतिसाद-प्रतिप्रतिसाद असेच असतात, नाही का?

श्रावण मास हा हिंदूंचा पवित्र काळ असतो. नागपंचमी, राखीपौर्णिमा, पोळा यांची धामधूम सुरु असते. बेसिकली, उत्सवी वातावरणाची, व्रतवैकल्याची, उपवास-निराहारांची सुरुवात या इथून सुरु होते.

मिपाकरांना श्रावण मासाच्या आगाऊ शुभेच्छा. 


संसदेत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात - परिसीमन विधेयक, आयकरसुधारणा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३३ वरून ३७ पर्यंत वाढवणारं विधेयक, FCRA विधेयक, MSME साठी विलंबित पेमेंट्सवरचं संरक्षण देणारं विधेयक अशी प्रमुख विधेयकं सरकारच्या अजेंड्यावर आहेत. यातली FCRA दुरुस्ती विधेयक आणि उच्चशिक्षण नियामकांना एकत्र आणणारं VBSA विधेयक हे दोन विरोधकांच्या रडारवर आहेत, काँग्रेसने या दोन्हींना विरोध करण्याचं आधीच जाहीर केलंय. शिवाय NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरही चर्चा होत आहे. यांतील काही विधेयकं मंजूर झाली आहेत काही होतील.

परिसीमन विधेयकावरून सरकार व विरोधी पक्षांत नुकतीच वैठक पार पडली. या मुद्द्यावर संसद चांगलीच तापणार आहे. जंतरमंतरवरचं आंदोलनात अजून काही काळ धुगधुगी राहील असे दिसते आहे.

नुकत्याच झालेल्या विविध विधानसभांच्या पोटनिवडणुकांत भाजपचा एक विजय आणि दोन पराभव असा निकाल लागला आहे. 

आर्थिक आघाडीवर सरकारने भारतीय स्मार्टफोन ब्रँड्स जगात पुढे यावेत यासाठी साडेबासष्ट हजार कोटींची योजना जाहीर केलीय, चिनी-कोरियन ब्रँड्सच्या तुलनेत भारतीय कंपन्या किती पुढे सरकतात ते बघावे लागेल.

शेतीसाठी ऑगस्ट महिना नेहमीच कसोटीचा असतो. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात पावसाची चातक प्रतीक्षा, हे नेहमीचं विषम चित्र यंदाही आहे. 

माझ्या स्वतःच्या निरीक्षणानुसार मागच्या दहा वर्षांत भारतातील पावसाळा हा जून ते सप्टेंबर असा पारंपारिक न राहता जुलै मध्य ते नोव्हेंबर असा पुढे सरकला आहे. शेतकऱ्यांनी पेरणी वेळापत्रकात त्यानुसार बदल करावा असे सरकार चारपाच वर्षांपासून सांगते आहे पण सगळेच शेतकरी त्याला प्रतिसाद देतात असे नाही. (आम्ही मात्र आमची मराठवाड्यातील शेती पावसावर अवलंबून ठेवलीच नाहीय!)

या वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केलीय; कुस्ती-बॅडमिंटन-हॉकीसारखे हुकमी मेडल मिळवणारे खेळ नसतानाही बॉक्सिंग-ज्युदो-ट्रॅक अँड फील्डच्या जोरावर पदकतालिकेत भारत बऱ्यापैकी वर सरकलाय, हे विशेष कौतुकास्पद.

भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६, शनिवारी साजरा होईल. 


बाकी महिनाभरात काय काय घडतं, कोणत्या बातम्या गाजतात ते इथे नोंदवत जाऊया. चर्चा करत राहु या. 

 

- कांदा लिंबू 

 


वाचने 4899
प्रतिक्रिया 199

प्रतिक्रिया

In reply to by अप्पा जोगळेकर

अप्पा, मार्केट मध्ये बटाट्यांचा भाव काय आहे हल्ली ? साखर कशी घेतली ? 


In reply to by श्रीगुरुजी

होर्मूझ च्या खाडीत पाकिस्तानी गरोदर महिलांनी धाव घेतली आता त्या सर्व बालकांना अमेरिकत नागरिकत्व मिळेल ह्या भीतिने तात्काळ ट्रम्प तात्यांनी माघार घेऊन खाडी इराण चीच आहे असे घोषित केले. 


जपानने त्यांचे डिफेन्स pamplet प्रसिद्ध केले असून एकूण जीडीपी च्या 2 टक्के रक्कम संरक्षण क्षेत्रासाठी खर्च करणार असल्याचे जाहीर केले आहे. जपानी कंपन्यांचा 1945 पूर्वीचा संरक्षण क्षेत्रातील इतिहास आणि त्यांची तंत्रज्ञान, रोबोटिक्स इत्यादी क्षेत्रात असलेली पकड ह्यामुळे जगाने कान टवकारले आहेत. पुतिन यांनी kurul बेटांना दिलेली भेट, चीनच्या वारंवार तैवानल दिलेल्या धमक्या आणि उत्तर कोरियाच्या वारंवार होणाऱ्या मिसाईल टेस्ट ह्या पार्श्वभूमीवर ही घडामोड जगाचे लक्ष वेधून घेत आहे. जर्जर झालेल्या आणि खचलेल्या अमेरिकन सैन्याच्या भरवशावर जपानचे संरक्षण कसे करणार हा प्रश्नसुद्धा ह्यामुळे सोडवला जाण्याची शक्यता आहे.


घेणे न देणे फुकट कंदील लावणे ह्या उक्तीचे प्रात्यक्षिक दिल्यामुळे मिसळपाव सरकार ह्यांच्याकडून अर्णब खोंडे ह्यांच्या प्राईम टाईम विशेष "xxx xx" सदराला लागला चाप. 

न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने घेतली अर्णब खोंडेंच्या सादरीकरणावर हरकत. तरीही, लढा जारी ठेवणार, अर्णब खोंडे ह्यांचे प्रतिपादन !.  

 

ऐसपैस गप्पांचे साप्ताहिक विश्लेषण करण्यासाठी नवीन कार्यक्रम जाहीर. तर आजचा गंभीर विषय, अमेरिका झटली इराणला, इराण झटली अमेरिकेला, मधल्यामध्ये अब्राहम लिंकन वर बंडाळी झाल्याचे अमेरिकन (देशद्रोही) न्यूज मीडियाने प्रसारित केले अन् चोखंदळ विश्लेषक मंडळींच्या चेहऱ्यावर हसू पसरले, 

मग काही नानू सरंजामे जनतेने मी करतो हिमालयाची उशी केले आणि जुन्याकाळी शिकार करताना राजे महाराजे आपल्या मांडीत रानडुक्कर दाबून शिकार करण्याचे वर्णन "आणि एकलुग्ग्याने लेंडी टाकली" असे करत तसेच काही महान हस्ती अख्खे विमानवाहू गलबत दाबते झाले

 

तर सांगा तुमचे आमचे काय गेले, जो जे वांछील ते ते लाहो .

 

जय मिसळपाव, 

सत्यमेव जयते

(कायदपालक) खोंडे


FIR सरसकट रद्द करा ह्या खुळ्या मागणीला सुप्रीम कोर्टाने झिडकारून टाकले आणि ज्या FIR रद्द करायच्या आहेत त्याची यादी द्या ती पाहिल्यानंतर मग काय रद्द करायचे, काय नाही हे पाहता येईल अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने आज केली. निवृत्त एअर फोर्स ऑफिसर मनीष सोळंकी यांच्या वतीने ऍडव्होकेट रिझवान Ahmad यांनी आंदोलकांच्या विरोधात युक्तिवाद केला. 
Justice Joymalya Bagchi said the state cannot refer to “undesirable elements” in “generic” terms. “You have to at least identify them,” Justice Bagchi said.


In reply to by अप्पा जोगळेकर

मथळा, मराठीत लिहिलेले आणि इंग्रजीत लिहिलेले मॅच होत नाहीये. 

मथळा - आंदोलक गळपटले 

मराठी भाग - (आंदोलकांची) खुळी मागणी कोर्टाने झिडकारली, सरसकट एफआयआर मागे घेणार नाही, यादी द्या विचार करू. 

इंग्रजी भाग - तुम्ही (सरकार पक्षाला उद्देशून) सरसकट सर्वत्रीकरण करून "undesirable elements" वगैरे म्हणत बसू नका त्यांना identify करा. 

मला वाटते संबंधितांनी  मागे जे FRS/ SIM टेक्नॉलॉजी इत्यादी लावून ती मंडळी identify केली होती बघा, ती लिस्ट कोर्टात जमा करण्याची वेळ आली आहे. सरकार किती लवकरात लवकर पुढच्या तारखा न घेता हे कार्य पार पाडून आंदोलकांना शिक्षा देते ते पाहणे रोचक ठरेल

 

वेल डन अब्बा (सिनेमा ) सारखं न्यायदान पहायला मिळालं शेवटी तर मजा येईल.

 


In reply to by अप्पा जोगळेकर

दोनेक आठवड्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने असेच म्हटले होते तेव्हा त्यांच्यातील सौरभ दास नावाच्या झुरळाने 'न्यायालयाला काय कळते आहे' अशाप्रकारचे- अशा अर्थाचे ट्विट केले होते. खरं तर त्याची सुओ मोटो दखल घेऊन न्यायालयाचा अवमान केला म्हणून न्यायालयाने त्याला ठोकायला हवे होते. 

२००२ मध्ये मनीषा कोईराला या अभिनेत्रीचा 'एक छोटीसी लव्ह स्टोरी' म्हणून चित्रपट आला होता. त्या चित्रपटात तिचे काही आक्षेपार्ह सीन्स तिच्या संमतीविना चित्रपटात टाकले होते असा दावा करत त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रतिबंध करण्यात यावा अशी मागणी तिने मुंबई उच्च न्यायालयात केली. तिच्या मागणीप्रमाणे असा कोणताही प्रतिबंध घालायला न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर ती शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरेंना जाऊन भेटली आणि शिवसैनिकांकडून या चित्रपटाचे प्रयोग बंद पाडावेत  अशी विनंती तिने केली. न्यायालयाने नकार दिला असतानाही न्यायालयाबाहेरच्या मार्गाने आपल्याला हवे ते करून घ्यायचा प्रयत्न करणे हा नक्कीच न्यायालयाचा अवमान होता. त्या प्रकाराची दखल न्यायालयाने घेतल्यावर मनीषाला माफी मागावी लागली होती.  तशाप्रकारचे काही तरी या झुरळाविषयी करायला हवे होते. 

 

बाकी स्वत:ला जेन-झी म्हणविणारे काही काही हल्ली जाम माजलेत. सध्या एक व्हिडिओ फिरतोय- एक बया लडाखमध्ये लष्कराने एका ठिकाणी जायला बंदी केल्यामुळे 'आम्ही जेन-झी आहोत असला फालतूपणा आम्ही सहन करणार नाही' असले काहीतरी बडबडताना त्यात दिसत आहे. लडाखसारख्या सीमावर्ती प्रदेशात सुरक्षेच्या कारणामुळे लष्कराकडे असे अधिकार असतात तसेच लडाखसारख्या प्रचंड थंडीच्या प्रदेशात कधीकधी काही ठिकाणे हवामानाच्या कारणानेही बंद केली जातात एवढी साधी माहिती तिला नाही का? दुसरे म्हणजे त्याच व्हिडिओत ती बोलताना दिसत आहे- "लष्कराने काश्मीरी लोकांवरही अशीच दडपशाही केली आहे" याचा अर्थ ती डापु गॅंगच्या टोळक्यातील (जनेयु, टीस, जादवपूर विद्यापीठ वगैरेंमधील दीडशहाणे अशांचे अध्वर्यू) असावी - प्रत्यक्षात नसली तरी विचारांनी तरी- हे नक्की. मोदींना हे घाणेरडे लोक नेहमी हुकुमशहा-हुकुमशहा म्हणतच असतात. खरं तर मोदी हुकुमशहा का बनत नाहीत हाच प्रश्न पडतो. कोणीही लुंगासुंगा उठतो आणि देशाचे तुकडे व्हावेत असे म्हणतो, देशातून हिंदूंचे शिरकाण व्हावे अशी इच्छा व्यक्त करतो, काश्मीरी फुटिरतावाद्यांचे समर्थन करतो, लष्कराला शिव्या घालतो. काय चालू काय आहे? अशा लोकांवर कडक कारवाई कधी होणार की नाही?


In reply to by चंद्रसूर्यकुमार

देशातून हिंदूंचे शिरकाण व्हावे अशी इच्छा व्यक्त करतो,

 

ह्यावर काही सांगावे अशी नम्र विनंती. हिंदूंचे शिरकाण (आपल्याला वंश विच्छेदक अर्थात अभिप्रेत असल्यास तसे स्पष्ट करावे) करण्याचे कोण जाहीर बोलला ? In those words. हल्लीच्या परिप्रेक्षात.... 

 

On the लेंगे स्वराज लेंगे लाईन्स 

आज प्रताप सरनाईक (भारतातील टेस्ला कारचे पहिले ग्राहक) ह्यांनी ऑटो रिक्षा ड्रायव्हर/ टॅक्सी/कॅब ड्रायव्हर मंडळीला मराठी बोलता न आल्यास परवाना रद्द नियमाचे उद्यापासून अंमलबजावणी सुरू होण्याचे सुतोवाच केले. मराठी न येणार टॅक्सी/ऑटो चालक पकडल्या गेल्यास तीन महिने वाहन परवाना रद्द करण्याचे ठरले आहे. 

 

आदरणीय प्रताप सरनाईक ह्यांनी मुंब्रा येथे बंदोबस्त टाकल्यास रोज भरपूर राजस्व गोळा होईल काही दंड इत्यादी असल्यास मराठी न बोलल्याबद्दल.

 

(कायदे पालक ओ पानीर) सेल्वन खोंडे मिश्रा 


In reply to by वृषभ खोंडे

देशातून हिंदूंचे शिरकाण व्हावे अशी इच्छा व्यक्त करतो,


सिर्फ नाम रहेगा अल्लाका असल्या घोषणा दिल्लीतील जंतरमंतरमधील झुरळांच्या आंदोलनात दिल्या गेल्या होत्या हे कदाचित तुम्हाला माहित नसावे. त्याचा अर्थ काय होतो? 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

सिर्फ नाम रहेगा अल्लाह का

तो भांकसपणा नीट माहिती आहे, त्यातून अर्थ "सगळे हिंदू शिरकाण करु" असा काढून (उलगडून) सांगा प्लीज. 

In those words असे मी इंग्रजीत सुस्पष्ट लिहिलेले आहेच. Besides, सिर्फ नाम रहेगा अल्लाह का म्हणण्याने (~८०%) "हिंदूंचे शिरकाण" ध्वनीत होते हे तुमचे आकलन असल्यास ते असण्याचा तुमचा हक्क मला मान्य आहे पण माझ्या आकलनानुसार ते तसे नसल्याचं वाटत असेल तर फक्त माझ्या अकलेचे माप काढू नका. 

कुठलेही थेट विधान नसताना झुरळ आंदोलनातील एका मूर्ख क्षणाचे भांडवल करून कर आपल्यासारखे बुद्धिवादी लोक निष्कर्ष काढणार असतील तर त्याच्या विरुद्ध निष्कर्ष काढण्याचा हक्क सुद्धा मान्य करावा असे वाटते.

 

(तर्कतीर्थ) खोंडे


In reply to by वृषभ खोंडे

चान्सुकू सर देशातून हिंदूंचे शिरकाण व्हावे अशी इच्छा व्यक्त करतो,

असे कुणीही बोललेले नाही तरीही तुमच्या सारख्या माणसाने एस बेखालस धडधडीत खोटे विधान करावे कोकोरचेसना बदनाम करण्यासाठी? नाही पटले, मागे श्रीगुर्जिनीही म्हणजे कॉक्रोच परतीला ४०-५० टक्के सपोर्ट पाकिस्तानातून आहे अशी काहीतरी खोटी पोस्ट टाकली होती.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

** 

सिर्फ नाम रहेगा अल्लाका असल्या घोषणा दिल्लीतील जंतरमंतरमधील झुरळांच्या आंदोलनात दिल्या गेल्या होत्या हे कदाचित तुम्हाला माहित नसावे. त्याचा अर्थ काय होतो? 
*** 

 

आपल्या बुद्धीला ग्रहण लागले आहे असा होत असावा.

१९७७ मध्ये जनरल झिया उल हअक़ ह्यांनी पाकिस्तानात आणीबाणी लावून झुल्फिकार अली भुट्टो ह्यांना पदच्युत केले. १९७९ मध्ये भुट्टो ह्यांना देहदंड दिला. झिया ह्यांनी सर्व स्वातंत्र्यावर बंदी घातली आणि देशांत कडव्या इस्लाम चा वापर करून आपली सत्ता प्रस्थापित केली. फैझ ह्यांनी १९७९ झिया ह्यांच्या विरोधांत हि कविता लिहिली. फैझ स्वतः मार्क्सवादी होते आणि हि कविता देशांतील इस्लामिक कट्टरवाद आणि झिया ह्यांच्या विरोधांत लिहिली होती. इस्लामिक प्रतीकांचा ह्या कवितेत वापर केला गेला असला तरी "बस नाम रहेगा अल्लाह का" ह्या ओळीचा अर्थ इतर धर्मांचा विरोध हा नसून सत्याचा शेवटी विजय होईल अशी अशा त्यांनी व्यक्त केली होती.

कवितेचा अंत :

उट्ठेगा **अनल-हक़** का नारा
जो मैं भी हूँ और तुम भी हो

और राज करेगी ख़ल्क़-ए-ख़ुदा
जो मैं भी हूँ और तुम भी हो

--

अन-एल -हअक़ ह्याचा अर्थ "मीच सत्य आहे", "मीच तो आहे"  किंवा "तत्त्वमसि" असा होतो. हे वेदान्तिक वाटले  (छांदोग्य उपनिषद) तर हा योगायोग नाही.

हा शब्द फैझ ह्यांनी मन्सूर हल्लज ह्या सुफी विचारवंतांकडून घेतला आहे. मन्सूर हल्लज ह्यांनी सर्वप्रथम अन-अल-हअक़ चा उद्घोष केला होता आणि हे प्रेरणा त्यांना त्यांच्या भारत भ्रमणातून आली. हिंदू धर्मातील मोक्ष हि संकल्पना त्यांनी "फना" स्वरूपांत इस्लाम मध्ये आणली आणि ईश्वर आणि आत्मा एकाच आहेत आणि हि "फना" हे आत्म्याचे ध्येय आहे हि वेदान्तिक विचारसरणी घेऊन ते जगले. म्हणून शेवटी त्यांना बगदाद मध्ये प्रचंड छळ करून थोर मारण्यात आले. म्हणे त्यांना ३०० कोडे मारण्यात आले, हात छाटण्यात आले इत्यादी. त्याआधी ८ वर्षे त्यांना कैदेत ठेवण्यात आले होते पण त्यांनी आपली विचारसरणी त्यांनी सोडली नाही.

फैज ह्यांनी म्हणून मुद्दाम ह्या वेदान्तिक वाटणाऱ्या विचारसरणीचा उल्लेख त्यांच्या वरील कवितेत केला.

ह्यासाठी फैझ ह्यांना स्वतः इस्लामिक मुल्ला कडून शिव्या खाव्या लागल्या. झिया स्वतः मुल्ला मौलवींच्या मदतीने सत्तेला चिकटून राहत पाहू होते आणि त्यांना थेट आव्हान म्हणून फैझ ह्यांनी अन-एल -हअक़ चा नारा दिला. ते स्वतः बैरुत मध्ये अज्ञातवासांत गेले. पण ह्या कवितेचे सादरीकरण केले म्हणून इक्बाल बानो ह्यांना सरकारने शिक्षा केली. ह्या हॉल मध्ये त्यांनी ती कविता सादर केली त्याची वीज कापली. कदाचित बुलडोझर त्या काळी नव्हते नाहीतर थेट बुलडोझर पाठवून इमारत पाडली असती.

कवितेचा एकूण इतिहास पाहता, कुठल्याही प्रोटेस्ट मध्ये कविता चपखल बसते. ह्या कवितेवर डाव्या किंवा इस्लामिक लोकांची काहीही मक्तेदारी किंवा हक्क नाही. अगदी प्रतीकात्मक स्वरूपांत सुद्धा कविता इस्लाम धार्जिणी नाही. फैझ सुद्धा इस्लाम धार्जिणे नव्हते पण मार्क्सवादी होते. त्यानं "बस नाम रहेगा अल्लाह का" हि कुठल्याही प्रकारची धमकी नाही. कुणाला त्यांत धमकी दिसत असेल तर त्यांच्या सुमार बुद्धिमत्तेचा आणि आकलनशक्तीचा अभाव हे कारण आहे.  

गोबीजींची भजने गाता गाता भाजीपाव मंडळींना कविता वगैरे वाचायला वेळ मिळत नाही हा काही इतरांचा दोष नाही.

 

 


In reply to by साहना

खरं तर याच चर्चेतील दुसऱ्या प्रतिसादाला उत्तर देणार होतो पण हा प्रतिसाद बघितल्यानंतर तुमच्याशी यापुढे कोणत्याही प्रकारची चर्चा करायची इच्छा राहिलेली नाही. 

१. एक तर  नेहमीची गोबी-कोबी ही भाषा 

२. इतिहासाचे पूर्ण अज्ञान - सिर्फ नाम रहेगा अल्लाका म्हणजे इतर सगळ्यांचे शिरकाण हा इतिहासाचा धडा असूनही त्याकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष

३. सिर्फ नाम रहेगा अल्लाका म्हणजे  अहं तत्त्वमसि. बोंबला.  

 

गोबीजींची भजने गाता गाता भाजीपाव मंडळींना कविता वगैरे वाचायला वेळ मिळत नाही हा काही इतरांचा दोष नाही.

आणि आपण म्हणजे कोण हा अहंगंड बाळगून इतर कोणालाही अक्कल नाही असे समजत सगळ्या जगाला अकला वाटत फिरणाऱ्या तुमच्यासारख्यांना समोर दिसणाऱ्या साध्या गोष्टी दिसत नसतील हा काही इतरांचा दोष नाही.

 

सबब यापुढे तुमच्याशी कोणतीही चर्चा करायची माझी इच्छा नाही. अभ्या वगैरेंचे नाव बघून खाली स्क्रोल करायचो त्या यादीत साहना हे नाव ॲड झाले आहे.


 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

१. एक तर  नेहमीची गोबी-कोबी ही भाषा 

 

प्रत्येक ठिकाणी देशद्रोही, तुकडे तुकडे, दापु वगैरे गोष्टी विना पुरावे आणायच्या आणि मग कोबी गोबी म्हटले म्हणून व्यथित व्हायचे. 

 

२. इतिहासाचे पूर्ण अज्ञान - सिर्फ नाम रहेगा अल्लाका म्हणजे इतर सगळ्यांचे शिरकाण हा इतिहासाचा धडा असूनही त्याकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष

 

हो का ? कुठला इतिहास हा ? "सिर्फ नाम रहेगा अल्लाका" संपूर्ण कविता मी वाचलेली आहे, पार्शवभूमी वर दिली आहे. आपण AI वगैरेची मदत घेऊन कविता , त्याची पार्शवभूमी इत्यादी सहज समजू शकता. नको असेल तर आपला प्रॉब्लेम आहे. शिरकाण करणारी मंडळी आधी कविता वगैरे वाचून दाखवीत नाहीत.

 

३. सिर्फ नाम रहेगा अल्लाका म्हणजे  अहं तत्त्वमसि. बोंबला.  

 

सदर कवितेतील अन अल हक हा नारा  तत्त्वमसि वरूनच आला आहे. स्वामी सर्वप्रियानंद स्वतः ह्यावर अनेकदा विवेचन करताना आढळून येतील. हिंदुत्वाचा खोटा बावटा फिरवताना कदाचित हिंदू धर्माचा थोडा अभ्यास सुद्धा करावा.


> सबब यापुढे तुमच्याशी कोणतीही चर्चा करायची माझी इच्छा नाही.

 

तुम्ही चर्चा करावी हि इच्छा नाही. रात्री अपरात्री विनाकारण भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या पेकाटात आपण जेंव्हा दंडुका घालतो तेंव्हा तो कुत्रा अमिताभ प्रमाणे भविष्यांत सूड वगैरे घेईल म्हणून चिन्ता करत नाही. निव्वळ उपद्रव कमी व्हावा म्हणून दन्दुका टाकला जातो. श्वानापेक्षा इतर सर्वाना झोप यावी हा विचार असतो.

त्याच प्रमाणे जो पर्यंत आपल्या सारखी मंडळी विनाकारण भंपक षडयंत्र सिद्धांत, हिंदू खतरे में इत्यादी बावटे घेऊन नाचतील तेंव्हा त्याचा योग्य तो समर्पक प्रतिवाद लिहिला जाईलच. तुमच्यासाठी नाही पण भविष्यांत कुणी ते लेखन पाहणार असेल किंवा त्यावर AI ट्रेन होत असेल तर त्याच्यासाठी. नाहीतर प्रतिवाद केला नाही म्हणून ह्या बोगस अनागत मिथ्या भया ला लोक गांभीर्याने घेऊ शकतात. सर्व लेखन प्रपंच त्याच्या साठी आहे. 

 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

+ १

 

ज्यांच्या प्रतिसादांकडे व लेखांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून मार्गक्रमणा करायची, अशांच्या माझ्या यादीत व तुमच्या यादीत अनेक नावे समान आहेत. मागील काही महिन्यांपासून ही यादी विस्तारत आहे.


In reply to by श्रीगुरुजी

मागील काही महिन्यांपासून ही यादी विस्तारत आहे.

यादी विस्तारते आहे ह्याचे काही ठळक अर्थ -

१. तुमची सरकार समर्थक तर्काची धार कमी होते आहे, बहुसंख्य लोकांचा (तुमच्या त्या यादीतील) सरकारवर भरोसा नाहीये 

२. समूहात प्रॉब्लेम आहे का तुम्हा दोघांत हे पाहण्याइतके तुम्ही पण सुजाण आहात ह्यावर माझा ठाम विश्वास आहे, उत्तम बुद्धीचे लक्षण असते आत्मपरीक्षण करण्याची ताकद. तुम्ही बलशाली आहातच. 

 

जाता जाता चर्चेने प्रश्न सुटतात - सरसंघचालक मोहन भागवत. 

 

अशा याद्या काढत बसले तर एक दिवस तुम्ही अन् चंद्रसूर्यकुमार @ क्लिंटन @ ट्रम्प इतकेच रहाल दोघे आपापसात चर्चा करायला आणि in that case WhatsApp सुद्धा पुरेसे असेल ! 🤣🤣🤣🤣

 

राजकारणावर चर्चा करायची तर कॅन्सल कल्चर चोखाळणे सोडा साहेब अशी नम्र विनंती करतो. दोन मिळणार दोन द्यायच्या इतके स्पष्ट आहे. उगाच आम्ही वाटेल ते बोलू अन् त्यावर प्रश्न विचारणार जनतेला आम्ही असल्या याद्या काढून इग्नोर मारू कारण प्रश्न आमच्यासाठी अनकमफोर्टेबल आहेत ह्याला कवडीचा अर्थ नाही.

 

तुम्ही बहिष्कार व्हेपनाइज करा अथवा करू नका, त्याचा फरक तेव्हाच पडतो जेव्हा समोरचा तो मनाला लावून घेतो. साहना म्हणाल्या तसे, for posterity प्रतिवाद येणारच येणार.

 

(तर्कदत्त) खोंडे शास्त्री


In reply to by अप्पा जोगळेकर

साप वगैरे बोलणे तुम्हाला शोभत नाही म्हणालो असतो पण आता तुमच्या लेंडी इत्यादी भाषाररत्न युक्त अनर्गल प्रतिसादांची सवय झाली आहे

 

सहाना म्हणाल्या तसे प्रतिवाद येणारच. धन्यवाद

 

कोणी वंदा कोणी निंदा हास्यरस पसरवणे हाच आपला धंदा (मिपा संपादक कृपया लक्ष देणे ही नम्र विनंती) 

 

(लक्ष्मीकांत) खोंडे.


In reply to by अप्पा जोगळेकर

अप्पांची गाडी क्षेपणास्त्रे, विमानवाहू नौकेवरची भांडणे सारख्या गोष्टीवरून आता नाग आणि दूध इत्यादींवर आली आहे. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. अशीच प्रगती करत राहा. 


In reply to by श्रीगुरुजी

** ज्यांच्या प्रतिसादांकडे व लेखांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून मार्गक्रमणा करायची, अशांच्या माझ्या यादीत व तुमच्या यादीत अनेक नावे समान आहेत. मागील काही महिन्यांपासून ही यादी विस्तारत आहे. **

 

हे बाड मोठे होत जाणार आहे आणि शेवटी काखेंत (किंवा शाखेंत) मावणार नाही ! नंतर "निकलना खुल्द से आदम का सुनते आये थे लेकिन, बोहोत बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले" होणार आहे.

विना पुरावा भंपक आरोप, मिथ्यभय  ( FUD ) पसरणे , गोबी = हिंदू असले तर्कदुष्ट विचार मांडणे ह्याचा थेट प्रतिवाद केला जाईल. आम्ही दुर्लक्ष करू, प्रतिवाद करणार नाही वगैरे सबबी देऊन आपण रायता पसरवत राहू अशी गोड गैरसमजूत करून घेऊ नये. 
 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

इतिहासाचे पूर्ण अज्ञान - सिर्फ नाम रहेगा अल्लाका म्हणजे इतर सगळ्यांचे शिरकाण हा इतिहासाचा धडा असूनही त्याकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष

 

मिपावर मोदी विरोधक आहेत; समर्थकही आहेत. अर्थात फक्त विरोधक-समर्थक असण्यात विशेष काही नाही. पण मोदी (कोबी?) विरोध करता करता हे लोक्स हिंदुविरोधी (खरंतर मानवविरोधी) कधी झाले हे त्यांचे त्यांनाही कळले नाही असे दिसते.

शांतीपंथ हा एक सैनिकीकरण असलेला, इतरांच्या तुलनेत खूप अधिक संघटित समूह आहे. जगातून अशांत लोक्स नष्ट करणे, त्यायाधी त्यांना मरणप्राय यातना देणे, त्यांची संपत्ती लुटणे वगैरे बाबींना त्यात (त्यांच्या दृष्टीने) नैतिक अधिष्ठान आहे. शांतीपंथाचे अनुयायी एकतर अतिकट्टर असतात नाहीतर कट्टरतेचे समर्थक असतात. अशांतांना जिवंत राहण्याचा अधिकार नाहीच, शांतीव्यतिरिक्त इतर कोणीही प्रार्थनीय नाहीच, शांतीदाता प्रार्थनीय आहेच, शांतिदूत हाच शेवटचा दूत आहेच, हा शांतीचा मूलाधार आहे. असे असताना केवळ मोदींचा विरोध म्हणून अश्या राक्षसी विकृतीचे आपण समर्थन करत आहोत हेही ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांना काय म्हणावे?

मोदींच्या अनेक निर्णयाचे मीही विरोध / समर्थन करतो; सर्वच करतात. पण राजकीय मतभेदांमुळे सर्वश्रेष्ठ हिंदू धर्माचा अवमान होईल असे काही करणे किंवा बोलणे हे कधीही समर्थनीय होऊ शकत नाही.

- (व्यावहारिक तत्वज्ञ) कांदा लिंबू 


In reply to by कांदा लिंबू

> शांतीपंथ हा एक सैनिकीकरण असलेला, इतरांच्या तुलनेत खूप अधिक संघटित समूह आहे. जगातून अशांत लोक्स नष्ट करणे, त्यायाधी त्यांना मरणप्राय यातना देणे, त्यांची संपत्ती लुटणे वगैरे बाबींना त्यात (त्यांच्या दृष्टीने) नैतिक अधिष्ठान आहे.

सर्व ठीक आहे. त्यावर मी काही आक्षेप नाही घेतला. आक्षेप मूळ कवितेचा जो चुकीचा अर्थ लावला आहे त्यावर आहे. कवितेचा अर्थ भलताच लावून "हिंदूंचे शिरकाण" वगैरे मिथ्यभय निर्माण केले जात आहे त्यावर. शांतीपंथाच्या अनुयायांना हिंदूंचे शिरकाण करायचे असू शकते. पण ती कविता किंवा त्या कवितेचा अर्थ हा त्या शिरकाणाची घोषणा आहे किंवा त्या कवितेचे वाचन किंवा सादरीकरण हिंदू विरोधी आहे ह्यावर आक्षेप ठेवला आहे. उर्दू काव्याची खूप आधीपासून मला आवड आहे आणि हि कविता, फैझ ह्यांचे आयुष्य आणि झिआ ह्यांच्या विरोधांत ह्या कवितेची भूमिका सर्व काही ठाऊक आहे म्हणूनच प्रतिवाद केला. झिआ ह्यांनी साडीवर बंदी घातली होती. इक्बाल बानो ह्यांनी मुद्दाम काळी साडी घालून ह्या कवितेचे सादरीकरण केले म्हणून त्यांचा छळ झिआ सरकारने केला. तेच प्लेबुक परम आदरणीय प्रातः स्मरणीय सद्य नेतृत्व तर वापरणार नाही ना म्हणून हा उपद्व्याप.

नाहीतर आपल्या लाडक्या नेतृत्वाची हाजी हाजी करताना हिंदू हिताचे काय केले जाते हे आम्ही नूपुर शर्मा केस मध्ये, RTE मध्ये आणि सध्या राम मंदिरातील गोंधळात व्यवस्थित अवलोकन केले आहे.

बहुतेक हिंदू समाजाला इस्लामीक धर्म आणि इस्लामिक समाजाची सत्यता १००% ठाऊक आहे. पण त्या मूषकाचे भय दाखवून बोका किती काळ लोणी खाणार ? आणि जेंव्हा मूषक प्रत्यक्षांत प्रत्यक्षांत हल्ला करतो तेंव्हा बोका पळून जातो हाच अनुभव आहे.

 

 


In reply to by साहना

RTE चा जिझिया कर चालू ठेवणारा पंतप्रधान हिंदुहिवादी असेल की हिंदुविरोधी असेल हे हिंदूंना जेंव्हा स्पष्टपणे कळेल तोपर्यंत २०४७ आलेले असेल!  

उर्दू माझीही एक आवडती भाषा आहे, काही अंशी तीत मला प्रावीण्यही आहे. अर्थात उर्दू ही शांतिदूतांची भाषा असते असा काही जणांचा समज असतो; शांतिदूतांची एकच भाषा - अरेबिक.

 

पण त्या मूषकाचे भय दाखवून बोका किती काळ लोणी खाणार ?

त्या बोक्याला तर लोणी खायची सुद्धा अक्कल नाही!

 

आणि जेंव्हा मूषक प्रत्यक्षांत प्रत्यक्षांत हल्ला करतो तेंव्हा बोका पळून जातो हाच अनुभव आहे.

१००% सहमत.

 

- (रोखठोक) कांदा लिंबू


In reply to by कांदा लिंबू

पण मोदी (कोबी?) विरोध करता करता हे लोक्स हिंदुविरोधी (खरंतर मानवविरोधी) कधी झाले हे त्यांचे त्यांनाही कळले नाही असे दिसते.

प्रथमतः मनी वसे ते जगी दिसे करू नयेत आपण इतकी नम्र विनंती. मोदी विरोध = हिंदू विरोध ही सोयीस्कर मांडणी आता घासून गुळगुळीत झाल्यासारखी आहे. 

सातव्या शतकात मोहम्मद बिन कासिमच्या पहिल्या आक्रमणापासून ते मुस्लिम परचक्र भारतावर स्थिर होईपर्यंत, ४५० वर्षे भारत लढत होता, हिंदू लढत होते, तेव्हा मोदी नव्हते पण हिंदू होते, आणि ते लढत होते

 

शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन केले तेव्हा मोदी नव्हते, पण हिंदू होते, आणि ते लढत होते. वेळोवेळी हे सिद्ध झाले आहे. 

 

त्यामुळे मोदी विरोध हा हिंदू विरोध हा मिथ्या आक्रोश आपल्यासारखा वैचारिक सुस्पष्टता असणारा हिंदू करताना पाहून अंमळ विचित्र वाटले. कोण्या एका व्यक्तीच्या अस्तित्वावर हिंदू धर्म टिकून राहू शकत नाही असे वाटते. 

 

बाकी, मोदींनी शिक्षणाचा अधिकार जो क्रिश्चन शाळा, मदरसे इत्यादी गाळून फक्त हिंदू शाळांवर तो लागू केला त्याचे कारण काय असेल ?

 

(तन हिंदू मन हिंदू रग रग हिंदू मेरा परिचय) खोंडू


In reply to by वृषभ खोंडे

मोदी विरोध = हिंदू विरोध ही सोयीस्कर मांडणी आता घासून गुळगुळीत झाल्यासारखी आहे.

ही मांडणी मी कधी केली? उलट तर मोदी हिंदुविरोधी आहेत हे मी अनेक ठिकाणी पुराव्यांसहित दाखवून दिले आहे. अगदी याच पानावरही RTE चा जिझिया कर चालू ठेवणारा पंतप्रधान हिंदुहिवादी असेल की हिंदुविरोधी असेल हे हिंदूंना जेंव्हा स्पष्टपणे कळेल तोपर्यंत २०४७ आलेले असेल!  हे लिहिले आहे.

 

त्यामुळे मोदी विरोध हा हिंदू विरोध हा मिथ्या आक्रोश आपल्यासारखा वैचारिक सुस्पष्टता असणारा हिंदू करताना पाहून अंमळ विचित्र वाटले. कोण्या एका व्यक्तीच्या अस्तित्वावर हिंदू धर्म टिकून राहू शकत नाही असे वाटते.

हेही मी कुठे म्हटले आहे? (अर्थात, "मी 'वैचारिक सुस्पष्टता असणारा हिंदू' आहे" हेही मी म्हटले नाही, पण मिपाखरांना ते वास्तव आहे माहित आहे! 😉)  
 

बाकी, मोदींनी शिक्षणाचा अधिकार जो क्रिश्चन शाळा, मदरसे इत्यादी गाळून फक्त हिंदू शाळांवर तो लागू केला त्याचे कारण काय असेल ?

(यावर साहनांनी विपुल लिखाण केले आहे) तो कायदा मोदींनी केला नाही ममोसिंनी केला, पण मोदींनी तो सुरूच ठेवला. कारण मोदी हे प्रत्यक्षात हिंदुविरोधी आहेत.


मला एवढेच म्हणायचे आहे, सरकारे येतात, जातात; माणसे जन्मतात, मरतात पण समूह असा आपोआप नष्ट होत नाही. "हिंदूंना हिंदू म्हणून शिल्लक राहता येईल असा भूभाग" हजार-दीडहजार वर्षांपासून सातत्याने आक्रसत आहे; ती प्रक्रिया किमान काही प्रमाणात थांबविता येईल अशी आशा मागच्या दशकात निर्माण झाली होती; आता ती विझली आहे! 


In reply to by कांदा लिंबू

RTE April 1, 2010 मध्ये अस्तित्वांत आला. जाणून काही एप्रिल फुल जोक असल्या प्रमाणे.

त्यावेळी प्रथम इयत्तेत ज्या मुलांनी प्रवेश घेतला असेल त्यांचे वय साधारण त्यावेळी ७ धरले तर आज २२-२३ असेल.  म्हणजे साधारण Gen Z. आता तेच gen z ह्या मंडळींचे वाभाडे काढत आहे हा निव्वळ योगायोग आहे असेही नाही. कारण हिंदू समाजाचा आपल्या शाळा निर्माण करण्याचा अधिकारच गेला. टॉप human capital ख्रिस्ती शाळांत शिकले. राहिलेल्या शाळांत सरकारी बाबूंनी उच्छाद मांडला. काव्यगत न्याय कि म्हणतात ते हेच. 

 

उजळणी करण्यासाठी काही तथ्य :

१. देशांत अल्पसंख्यांक शाळांना RTE लागू होत नाही आणि इतर अनेक जाचत सरकारी नियम लागू होत नाहीत. 
२. शाळा अल्पसंख्याक आहे कि नाही हे NCMEI ठरवते. ह्या सरकारी बॉडीवर हिंदूंना राहण्यास कायद्याने मनाई आहे.


सामान्य धर्मनिरपेक्ष कायद्यांनुसार बहुसंख्याकांच्या शाळांवर हिंदू मूल्ये, संस्कृती किंवा धार्मिक शिक्षण देण्यावर बंधने आहेत—तर अल्पसंख्याकांच्या शाळांना त्यांची धार्मिक ओळख आणि शिक्षण पद्धती जपण्याचे घटनात्मक संरक्षण मिळाले आहे—यामुळे तयार होणारी व्यवस्था हिंदू संस्कृतीच्या प्रसाराला आणि हस्तांतरणाला प्रतिकूल ठरते. सध्याची gen z पिढी त्याच सिस्टम मधून पास झाली आहे.  
 


In reply to by साहना

सामान्य धर्मनिरपेक्ष कायद्यांनुसार बहुसंख्याकांच्या शाळांवर हिंदू मूल्ये, संस्कृती किंवा धार्मिक शिक्षण देण्यावर बंधने आहेत—तर अल्पसंख्याकांच्या शाळांना त्यांची धार्मिक ओळख आणि शिक्षण पद्धती जपण्याचे घटनात्मक संरक्षण मिळाले आहे—यामुळे तयार होणारी व्यवस्था हिंदू संस्कृतीच्या प्रसाराला आणि हस्तांतरणाला प्रतिकूल ठरते. सध्याची gen z पिढी त्याच सिस्टम मधून पास झाली आहे.  

मोदी-भाजप-संघ यांना अगदी हेच साध्य करायचे होते ते त्यांनी साध्य केले!

 

नमो सरकारच्या पहिली, दुसरी, तिसरी पाळी या प्रत्यक्षात ममोसि सरकारच्या तिसरी, चौथी, पाचवी पाळ्या आहेत!

 

- (परखड) कांदा लिंबू


In reply to by कांदा लिंबू

शांतीपंथ हा एक सैनिकीकरण असलेला, इतरांच्या तुलनेत खूप अधिक संघटित समूह आहे. जगातून अशांत लोक्स नष्ट करणे, त्यायाधी त्यांना मरणप्राय यातना देणे, त्यांची संपत्ती लुटणे वगैरे बाबींना त्यात (त्यांच्या दृष्टीने) नैतिक अधिष्ठान आहे.

 

नाशिक टीसीएस प्रकरण स्मरले.

 

 


In reply to by श्रीगुरुजी

ते सगळ्या आरोपींना सबळ पुराव्याच्या अभावी जामीन मिळालेले का ? 

(निकम) खोंडे


In reply to by वृषभ खोंडे

पुराव्याच्या अभावी जामीन मिळत असतो? की पुरावे जमा झाले आता केस चालवायची तेव्हा पाहू.,.. सध्या आत ठेवायची गरज नाही असे म्हणून जामीनास विरोध केला जात नाही..? तुमचं ज्ञान अंमळ जास्त म्हणून विचारतो. लगेच अंगावर सांडाप्रमाणे धावून येऊ नका सवयीनुसार


In reply to by राज जोशी

आता तुमचा प्रश्न

पुराव्याच्या अभावी जामीन मिळत असतो? की पुरावे जमा झाले आता केस चालवायची तेव्हा पाहू.,.. सध्या आत ठेवायची गरज नाही असे म्हणून जामीनास विरोध केला जात नाही..?

 

तर होय, पुराव्यांच्या अभावी जमानत मिळते. त्याच्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत कलम ४८० आणि कलम ४८३ (जुन्या क्रिमिनल प्रोसिजर कोडनुसार कलम ४३७ आणि ४३९) सुस्पष्ट लेड आऊट आहेत. ही दोन्ही कलमे (जुनी किंवा नवी सुद्धा) बचाव पक्षाच्या वकिलाला सरळ सरळ हक्क देतात फिर्यादी/ सरकारी पक्षाकडे प्रथमदर्शनी (प्राईमा फेसी) केसच करता येण्यालायक काही नाहीये , ह्या आरग्युमेंट वर बेल डिमांड करण्यासाठी. 

 

आता पुढे जर नवीन आरोपी तपास करताना पुढे आले किंवा मूळ आरोपी विरुद्ध काही पुरावे सापडले तर फिर्यादी/ सरकार पक्षाला पुन्हा पुरवणी आरोपपत्र (सप्लिमेंट्री चार्जशीट दाखल करून केस फाईल पुनर्जीवित करण्याचा पर्याय असतो) तोवर मात्र "संबंधित केस मधे सरकारी पक्ष/ फिर्यादी पक्षाकडे मुळातच केस उभी करण्यालायक मटेरियल नाहीये, ह्याच बेसिस वर आरोपी जामिनावर असतो. समजा पुढेही काही नाही मिळाले तर C समरी करून केस बंद करता येतात पोलिसांना/ फिर्यादीला. 

 

भारतीय न्यायपालिकेने वेळोवेळी "जामीन हा नियम असून तुरुंग हा अपवाद" असल्याचे स्पष्ट केले आहे, आणि त्याच्या समर्थनार्थ कोर्टाने काढलेले निरीक्षण म्हणते की प्रलंबित कारावास हा भारतीय संविधानाच्या कलम २१च्या व्हायलेशन मध्ये जातो.  

बाकी, मी सांडासारखा धावून येत नाही हो, लोकांना ज्ञानप्रवाह जास्त होतो, च्यवनप्राश खाल्ल्यास आकलनशक्ती वाढू शकते असे सुचवतो, मी सांड असलो तरी मैत्रीपूर्ण शांतस्वभावी सांड आहे. खालील चित्राप्रमाणे.

(मित्र सांड) खोंडे

images (33) 3

In reply to by साहना

जी गोष्ट काही तास अगोदर भंपक किंवा भंकस वाटत होती, तिच्या मागचा गर्भितार्थ आणि मतितार्थ इतका सुंदर असेल असे कधी वाटले नव्हते. 

उर्दू काव्य एक अलग प्रांत आहे !, बरेच अगोदर महानायक (विश्वास पाटलांची नेताजी सुभाषचंद्र बोसांवर असणारी कादंबरी) वाचताना त्यांनी जे वर्णन बहादुरशहा जफरला मंडालेला नेतानाचे केले आहे ते वाचून असेच हेलावून जायला झाले होते. 

जाता जाता त्याची वृद्ध मान एकदम ताठ झाली आणि तो एका निर्धाराने म्हणाला होता 

 

गाज़ियो में रहेगी जब तलक बू ईमान की 

तख्ते लंदन तक चलेगी तेग हिंदोस्ता की


In reply to by वृषभ खोंडे

काही कारणास्तव गालिब ला बनारस ला जावे लागले (काही तरी प्रॉपर्टी चा मामला असावा). बनारस शहर गालिब ला इतके आवडले कि त्याने आपले वास्तव्य तिथे वाढविले. गालिब काय म्हणतो पहा :

तनास़ुख़-मशरबाँ चूँ लब गुशायांद
ख़त्त-ए जाम अज़ जम ओ जमशेद गोयांद

जेंव्हा पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे लोक तोंड उघडतात (बोलण्यासाठी किंवा दारू पिण्यासाठी) 
तेंव्हा त्या दारूच्या पेल्यालाच जमशेद मानतात

- जमशेद हा जुन्या काळांतील पर्शियन राजा. ह्याच्याकडे म्हणजे भविष्य सांगणारा जादूचा पेला होता. 
- माणूस मेला कि त्याची माती होते आणि त्या मातीतुतन पिण्याचा पेला बनवला जाऊ शकतो. पर्शियन काव्यांत माणसाच्या जीवनाची क्षणभंगुरता, सत्तेच्या मदाचा फोलपणा दाखविण्यासाठी हे रूपक अनेक दा वापरले जाते.

गालिब वरील ओळींत हेच सांगतो कि जीवनाच्या फोलपणाचे हे मर्म बॅनर्स मध्ये येणाऱ्या प्रत्येक हिंदूने जाणले आहे.


बनारस रा कसे गुफ़्ता कि चीन अस्त
हनूज़ अज़ गंग चीनश बर जबीन अस्त

कुणीतरी बनारस च्या सौंदर्याची तुलना चीन (देश) शी केली , पण त्यामुळे शहराने थोडी अप्रसन्नता दाखवली आणि गंगा नदीच्या स्वरूपांत एक "चीन" (माथ्यावरची  रेखा) उत्पन्न झाली.

इथे चीन ह्या शब्दाचे दोन अर्थ होतात त्याचा वापर गालिब ह्यांनी केला आहे.

 

फ़लक रा क़श्क़ह-अश गर बर जबीं नीस्त
पस ईं रंगीनी-ए-मौज़-ए-शफ़क़ चीस्त  


जर आकाशाच्या कपाळावर हा (बनारसच्या भक्तीचा) टिळा लावलेला नाही,
तर मग संध्येच्या वेळी आकाशात उमटलेली ही लाल रंगांची लाट (संध्याराग) तरी दुसरी काय आहे?

-- 
 


In reply to by साहना

बनारस शहराशी इतकी गहिरी नाळ जोडली जाणे किंवा एका क्षेत्राच्या शहरातील लोकांचा जीवनव्यवहार, मोक्ष आणि मुक्तीच्या संकीर्णात व्यग्र जनतेच्या गर्दीत एका शहराचे इतके हृद्य अवलोकन करणे गालिब सोडून कोणाला जमणार !. 

मला तर वाटते एखाद व्युत्पन्न ब्राह्मणाला काय वाराणसी कळेल इतकी तर गालिब २ शेर अर्ज मधे समजवून गेला आहे.

 

(मीर ताकी मीर) खोंडे 


In reply to by वृषभ खोंडे

ह्यावर काही सांगावे अशी नम्र विनंती. हिंदूंचे शिरकाण (आपल्याला वंश विच्छेदक अर्थात अभिप्रेत असल्यास तसे स्पष्ट करावे) करण्याचे कोण जाहीर बोलला ? In those words. हल्लीच्या परिप्रेक्षात....

 

"१५ मिनिटे पोलीस हटवा" असे सध्या म्हणताहेत; २०४७ पर्यंत हटवायला सध्याचे पोलिसच शिल्लक राहणार नाहीयेत.
 


In reply to by कांदा लिंबू

"१५ मिनिटे पोलीस हटवा" असे सध्या म्हणताहेत; २०४७ पर्यंत हटवायला सध्याचे पोलिसच शिल्लक राहणार नाहीयेत

पण मग झुरळ पक्ष आंदोलनात त्या पंधरा मिनिट वाल्याचा थोरला भाऊ जे ह्यांच्या मागण्या मानू नका छाप बोलतो ते पण तर हवेहवेसे वाटते ना ! . 

बरं, ते ही सोडू, एका मिसळपाव पोस्ट नुसार २८०० बदमाश लोक पोलिसांनी identify केले आहेत ! त्या एफआयआर मध्ये स्टेज वर हे गाणे म्हणणाऱ्या त्या काकू आहेत का नाहीत ? किंवा ते गाणे म्हणल्याबद्दल सेप्रेट एफआयआर करून त्या काकूंवर भारतीय न्याय संहिता कलम १९६ (जुने भारतीय दंडविधान कलम १५३(अ) ) अनुसार "सामाजिक/धार्मिक तेढ" निर्माण केल्याचा गुन्हा तरी दाखल केला आहे का ? 

 

नसल्यास "नाम रहेगा अल्लाह का" गाण्यात हिंदूंचे शिरकाण करण्यालायक काहीही भावना नाही हे सरकारला मंजूर आहे असे म्हणावे का ?


In reply to by चंद्रसूर्यकुमार

कोणीही लुंगासुंगा उठतो आणि देशाचे तुकडे व्हावेत असे म्हणतो, देशातून हिंदूंचे शिरकाण व्हावे अशी इच्छा व्यक्त करतो, काश्मीरी फुटिरतावाद्यांचे समर्थन करतो, लष्कराला शिव्या घालतो. काय चालू काय आहे? अशा लोकांवर कडक कारवाई कधी होणार की नाही?

सध्याचे सरकार असेपर्यंत तरी कधीही होणार नाही कारण त्यांना कारवाई करायचीच नाही. (त्यांच्या काडीत दम नाही असे म्हणणार नाही कारण UGC नियमांनिषेधार्थ जंतरमंतरवर आंदोलन करू पाहणाऱ्या सवर्ण विद्यार्थ्यांना त्यांनी खंबीरपणे काडीवर लाथ मारून हाकलून लावले; नुपूर शर्मांचा त्यांनी असाच खंबीरपणे बळी दिला; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जाऊन त्यांनी SC ST ऍट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदी खंबीरपणे अधिक कडक केल्या... म्हणजे ते भित्रट नाहीत, खंबीर आहेत). 

- (कडवट विश्लेषक) कांदा लिंबू 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

काही लुंगेसुंगे तर पेपर लीकची अकाउंटिबिलिटी मागतात, सरकारी शाळा चांगल्या करा म्हणतात!


In reply to by चंद्रसूर्यकुमार

एका कुणी चिल्लर व्यक्तीचे रील्स पुरावा म्हणून वापरायचे आणि नंतर सरसकट सर्व जेन झी असे आहेत किंवा ही मंडळी डावे पुरोगामी आहेत असल्या फुसक्या सोडायच्या. मग त्यांचा संबंध JNU शी जोडायचा. मग त्यांना हिंदूंचे शिरकाण करण्याची इच्छा आहे, देशाचे तुकडे तुकडे करायचे कारस्थान आहे असे षडयंत्र सिद्धांत मांडायचे.

पुरावा कुठे आहे ?  कुणी कुठे देशाचे तुकडे करण्याची वल्गना केली ? हिंदूंचे शिरकाण व्हावे अशी नक्की इच्छा कुणी व्यक्त केली आणि कुणी वैफ़ल्यग्रस्त होऊन काही रिल्स केली तरी हा ट्रेंड ठरतो का आणि तो सुद्धा एका मोठ्या लोकसमूहाचा ?

कायच्याकाय ! ह्या असल्या बौद्धिक उलटींना नवीन पिढी विटली आहे आणि म्हणूनच गोबी आणि त्यांचे चमचे थट्टेचा विषयः झाले आहेत. 
 


आपण पुन्हा प्रयत्न करूया. 

 

इतिहासाचे पूर्ण अज्ञान - सिर्फ नाम रहेगा अल्लाका म्हणजे इतर सगळ्यांचे शिरकाण हा इतिहासाचा धडा असूनही त्याकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष.

 

नाही असे कृपया समजू नका अशी नम्र विनंती. सिर्फ नाम रहेगा अल्लाह का ह्याची तुलना कदाचित आपण कलम्याशी करून समांतर काढता आहात का ? मी असे काही म्हणण्यापेक्षा आपण ह्या शंकेचे निरसन करणेच उत्तम असेल. 

 

काही मुद्दे - 

 

१. कट्टर इस्लाम मध्ये असे समांतर काढताच येत नाही, तशी माणसाला परवानगी पण नाही आणि सवय पण नहीं दुसरे म्हणजे इतके सरळ सरळ exclusivity मेन्टेन करणारा धर्म असे कविता/ कवनांच्या मागे लपेल असे वाटत नाही. थोडक्यात "हम देखेंगे" ला धार्मिक अधिष्ठान काहीच नाही, उलट ती एक कम्युनिस्ट विकृती आहे धर्मात जशी इतिहास संशोधनाच्या नावाखाली ते हिंदूत पण करतात. त्यामुळे तुम्ही अजिबात राग मानू नका पण हा संबंध किंवा लॉजिक आपण कसे लावलेत ते विषद करावं, काहीतरी नवीन शिकायला मिळेल. 

२. गोबी - कोबी ही भाषा - घ्यायचे चालवून थोडे साहेब. २०१४ पासून नाही का काँग्रेस - खांग्रेस, नेता विपक्ष - पप्पू, समाजवादी - नमाजवादी, ममता बानो, अडीच जिल्हाच वस्ताद इत्यादी बिरुदे वापरली जातात त्याच धाटणी मधले समजा झाले !. कशाला मनाला लावून घेता आपण पण सरजी. राजकारण आहे दोन दिले का दोन घ्यावे लागतात. उगाच "गुस्ताख ए मोदीजी की एक ही सजा, आयडी चर्चा से जुदा" करण्यात पॉईंट नाही साहेब, मोदीजी जितके लोकशाहीवादी आहेत (हल्लीच त्यांनी अगदी स्वतःला शिव्या देणाऱ्या लोकांना सुद्धा माफ केले आहे) ते पाहता, बहिष्कार हे अस्त्र म्हणून तुमच्यासारख्या जाणत्या सुजाण माणसाने तरी वापरू नये असे मनापासून वाटते.  


In reply to by वृषभ खोंडे

सिर्फ नाम रहेगा अल्लाह का ह्याची तुलना कदाचित आपण कलम्याशी करून समांतर काढता आहात का ?

मी कोणत्या कलम्याशी समांतर काढलेले नाही- फक्त इतिहासात त्या मानसिकतेतून काय काय झाले आहे आणि अजूनही होत आहे याच्याशी सांगड घातली आहे.  

 

बहिष्कार हे अस्त्र म्हणून तुमच्यासारख्या जाणत्या सुजाण माणसाने तरी वापरू नये असे मनापासून वाटते.  

एकेकाळी मिपावर प्रत्येक मुद्द्याला प्रत्युत्तर द्यायचा फार उत्साह होता. परंतु आता- म्हणजे एक ठराविक वय उलटल्यानंतर असल्या प्रकारात वेळ व्यर्थ दवडण्यापेक्षा करायला भरपूर प्रॉडक्टिव्ह गोष्टी आहेत त्यात लक्ष घालावे इतकी तरी समज येतेच. 

असो.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

प्रोडक्टीव गोष्टी कराच हो, पण तुमच्या स्पेस मध्ये मिपा सुद्धा असू द्या इतकेच म्हणणे.


इंडोनेशियन बेटांवर उडणाऱ्या एका एअरबस ए - ३२०चे वैमानिक विमान auto-pilot वर सोडून चक्क गाढ झोपून गेले

गंमत म्हणजे पायलट इन कमांड आणि फर्स्ट ऑफिसर दोघांनीही टेस्ट क्लिअर करून उड्डाण भरले होते. सदरहू विमान आपल्या ठरलेल्या फ्लाईट पाथ वरून सरकले तसे ग्राउंड कंट्रोल (एअर ट्रॅफिक कंट्रोलर) ने त्यांना साद घातली पण कोणी ढिम्म उत्तर देईना !


हे लोक फुरोगामी वगैरे हेटाळ्ण्या आनंदाने करायचे . आता समोरून प्रतिवाद येउ लागले कि यातला फोलपणा जाणावू लागतो . असोच


१९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत झालेल्या शिखविरोधी दंगलींमध्ये सहभागी असल्याबद्दल न्यायालयाने शिक्षा केलेला कॉग्रेस खासदार सज्जनकुमार (खरं तर दुर्जनकुमार) आटोपला. या दंगलींमध्ये हात असल्याचा आरोप असलेल्यांपैकी हरकिशनलाल भगत पूर्वीच आटोपला होता तर ललित माकनला (अजय माकन यांचे काका) खलिस्तान्यांनी उडविले होते. 

 

https://timesofindia.indiatimes.com/india/former-congress-mp-sajjan-kum…


In reply to by चंद्रसूर्यकुमार

धरमदास शास्त्री आणि अर्जुनदास असे अजून दोन जण होते. कमलनाथांवर सुद्धा दंगलीत सहभागी असल्याचे आरोप होते. अर्जुनदासला शीख अतिरेक्यांनी गोळ्या घालून मारले. धरमदास शास्त्रीचे काय झाले माहिती नाही. 


हे अतिशय सुंदर गाणे आहे. ते इथे ऐकता येईल: 
https://www.youtube.com/watch?v=dxtgsq5oVy4&list=RDdxtgsq5oVy4&start_radio=1

गाण्याचा अर्थ अत्यंत आशावादी आणि भेदक आहे. कोणत्याही हुकुमशहाला तो सहन होण्यासारखा नाही पण अनेकांना ते गाणे समजलेलेच नाही अशी चर्चा वाचून स्पष्ट आहे. म्हणून पार्श्वभूमी:

Iqbal Bano, the subcontinent's beloved ghazal singer, born in India and trained in the Dilli Gharana by the legendary Ustad Chand Khan, . In the hearts of all who knew and loved her music is the memory of that day: when, in protest against the jailing of the subcontinent's foremost left poet Faiz Ahmad Faiz by Pakistan's dictator General Zia-ul Haq, she sang Faiz's immortal song "Hum Dekhenge" (We shall witness) at a Lahore stadium full of 50,000 people, wearing a black sari in defiance of Zia's ban on the sari. As her liquid voice reached the crescendo -- declaring "Certainly we, too, shall witness that day ... When these high mountains/Of tyranny and oppression turn to fluff and evaporate/And we oppressed/Beneath our feet will this earth shiver, shake and beat/And heads of rulers will be struck/With crackling lightening and thunder roars/When crowns will be flung in the air — and thrones will be overturned ...," people joined with slogans of "Inquilab Zindabad" (Long live revolution!)


मिसळपावचा खरडफळा पुन्हा सुरू झालाय ही या श्रावण महिन्यातील अतिशय महत्त्वाची ताजी घडामोड इथे नोंदवून ठेवत आहे! 😇

- (खबऱ्या) कांदा लिंबू


फेबुवर ही पोस्ट दिसली : 

एक गंमतीशीर गोष्ट-

भारतात साक्षरता दर ५०% ओलांडल्यापासून काँग्रेसला लोकसभेत कधीही पूर्ण बहुमत मिळालेले नाही.

साक्षरता दर ७०% ओलांडल्यानंतर काँग्रेसने कधीही निवडणूक जिंकलेली नाही !!!


मग मी ChatGPT ला विचारलं, हे खरं आहे का? 

तो म्हणाला, "भारताचा साक्षरता दर ५० टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर काँग्रेसने लोकसभेत कधीही एकपक्षीय बहुमत मिळवलेले नाही. आणि २०११ च्या जनगणनेत भारताचा साक्षरता दर ७० टक्क्यांच्या पुढे गेल्यापासून, काँग्रेस लोकसभेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणूनही उदयास आलेला नाही." 


खखोदेजा! 

- (खवचट) कांदा लिंबू 

 

https://chatgpt.com/share/6a8918c6-09a0-83ee-9f2c-73012ac63e8e


लडाखमध्ये भारतीय सैन्याचा अवमान करणाऱ्या या महिलेला लोक GenZilla म्हणत आहेत, ही GenZ असेल तर आमचा तर अजून जन्मच झालेला नाही, ही GenZ नाही तर GenA आहे वगैरे शब्दांत खिल्ली उडविणे सुरु आहे. 

 

या महिलेचे वर्तन जर बेकायदेशीर असेल तर तिच्यावर मोदी सरकारने काही कारवाई केल्याचे काही वृत्त आहे का? 

GenZilla Lady