Skip to main content

मालक मला एखादा डूआयडी द्याना!

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 11/05/2026 19:26 या दिवशी प्रकाशित केले.

मालक मला एखादा डूआयडी द्याना!
डू आय डी घेईन 
जिलेब्या पाडीन 
भक्ताना चोपीन 
चाप चाप चाप!

मालक मला एखादी डूआयडी द्याना!
डू आयडी घेईन
खरडफळा गाजवीन 
वादविवाद करीन 
ठप ठप ठप

मालक मला एखादा डुआयडी द्याना,
डू आयडी घेईन,
चिखलफेक करीन
दोन चार आयडी उडवीन 
धप धप धप!

मालक मला एखादा डू आयडी द्याना
डू आयडी घेईन 
मूळ आयडी ठेवीन 
पुन्हा पुन्हा येईन 
ख्या ख्या ख्या!

काव्यरस

वाचने 480
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

सदर कविता आधी प्रकाशित करण्यात आली होती पण मिपा अपडेट मध्ये ती गहाळ झाली, मिपाकरांच्या दुर्दैवाने नी माझ्या सुदैवाने तो एका समूहात पोस्टवलेली होती. तिथून उचलून पुन्हा इथे आणली! :) 


ही कविता वाचून जो ह्यावर प्रतिसाद देईल त्याला ८ दिवसात चांगली बातमी मिळेल, जो कविता आणी हा प्रतिसाद वाचूनही प्रतिसाद देणार नाही त्याला भगंदर, मुळव्याध असे आजार होतील. :)


थोडक्यात वाचलो, आधीच प्रतिसाद देउन टाकला हे बरे झाले नाहीतर.....


In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हाहा! :) आता पाहू कुणाला मूळव्याध भगंदर, फिशर असे आजार लाऊन घ्यायचे आहेत :)


बाकी सगळं राहू दे पण लेखनविषय म्हणून जे काही विषय दिले आहेत त्याचा आणि या कवितेचा नक्की संबंध काय? बीजेपी सोडून देऊ. अनेकांना प्रत्येक ठिकाणी बीजेपी-मोदींचा संबंध जोडायचा असतो. पण अपराध, अंमली पदार्थ, गांजा वगैरेंचा काय संबंध? जिझिया कर? त्याचा काय संबंध? आणि सायकल कुठली घ्यावी? कविता ड्यु.आयडी विषयी आहे ना की सायकलीविषयी?


तुम्ही आधीच डू आय डी आहात.  डबक्यातील मगर,  रात्रीचा किडा ,  कावळ्याच्या शाप , शकुनीचा मामा   पप्पूचा काका ...

 

 

 


In reply to by विवेकपटाईत

अहो काका, मला तुम्ही (नी अनेक मिपाकरानी) ह्याची देही ह्याची डोळा पाहिले आहे. तरीही मी तुम्हाला डू आय डी वाटतोय? :)


In reply to by अमरेंद्र बाहुबली

कधीकधी मी पण एक ड्यु आय डी आहे असे वाटते. मला याची देही याची डोळा बघितलेले मिपाकर फार नाहीत. आणि ज्यांनी बघितले आहे त्यांपैकी कोणीच सक्रीय नाही.


मिपा करानो आणखी एक दिवस आहे तुमच्याकडे, मेहंदळे, डॉक खरे, चान्सुकू आणी सुरिया हे लोक वाचले, आता उरलेल्या मिपाकरांच्या नावाने मी उद्या लिंबू फिरवणार! मग प्रतिसाद न देणाऱ्याना मुळव्याध, भगंदर फिशर नी काही काही आजार होतील. नंतर मला बोलू नये वेळ दिला नाही वगैरे. 😌


प्रतिसाद न देणाऱ्याना मुळव्याध, भगंदर फिशर नी काही काही आजार होतील.

तुम्ही बंगाली बाबांसारखे झोलाछाप वर्तन करताय 

लिंबू फिरवून आजार होणार असते तर लिंबू फिरवूनच  ते गेले हि असते.

मुळात तुमचा आय डी  हाच मूळ नावाने नाही जसा माझा आय डी किंवा इतरांचा आहे.

त्या आय डी  ने "खरडफळा गाजवीन, वादविवाद करीन, चिखलफेक करीन" हे सगळं करताच आहात

मग अजून डू आय डी कशाला हवाय?     
 

 

 


In reply to by सुबोध खरे

मग अजून डू आय डी कशाला हवाय?      >>>
इथले काही नतद्रष्ट माझ्या माझ्या मूळ आयडी सोबत स्वतच्या डू आयडीने कुस्ती खेळतात, माग मालक आले की दोघांना बैन मारतात, नतद्रष्टाचा उद्देश सध्या होतो नी मूळ आयडीही शाबूत राहतो! माझा मात्र मूळ आयडी जातो. त्यामुळे डू आय डी हवाच! 😌


In reply to by कर्नलतपस्वी

नक्की कर्नल साहेब, चिलापी नाहियात्र सुरमई असूच देतो. :)


मिपाकरानो लिंबू फिरवण्यात आला आहे, ज्या ज्या मिपा करानी प्रतिसाद दिले ते वाचलेत ज्यांनी नाही दिलेत त्यांच्या मागे आता मुळव्याध, भगंधर फिशर लागतील. 🤣