Skip to main content

अंमली पदार्थ

दुध 'उतू' गेले .....

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 12/05/2026 18:29 या दिवशी प्रकाशित केले.

 

पिशव्या शोधून काढून चावी घेतली...

येताना दोन किलो 'एक्स्ट्रा गोल्ड' घेऊन या...आणि हो, कारमधेच जा, ऊन खूप आहे. नाहीतर पेट्रोल वाचवायचे म्हणून जाल (बोंबलत) स्कुटीवर...

मी समजलो, ती सफोला गोल्ड तेला बद्दल बोलत होती. लोणचे घालायचे दिवस आहेत ना... 

लिफ्टमधे दहाव्या माळ्यावरच्या आजी भेटल्या. मोबाईलवर कुठलीतरी चित्रफित बघत होत्या. मला न बघता म्हणाल्या, "बरे झाले आगोदरच म्हाताऱ्यासाठी गुंजभर घेऊन ठेवलय!"

"ऑं?",  माझा प्रश्नार्थक चेहरा बघून पुढे म्हणाल्या, "आहो, मेल्यावर तुळशीपत्रा बरोबर तोंडात गोल्ड घालायला लागते ना! 

मालक मला एखादा डूआयडी द्याना!

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 11/05/2026 19:26 या दिवशी प्रकाशित केले.

मालक मला एखादा डूआयडी द्याना!
डू आय डी घेईन 
जिलेब्या पाडीन 
भक्ताना चोपीन 
चाप चाप चाप!

मालक मला एखादी डूआयडी द्याना!
डू आयडी घेईन
खरडफळा गाजवीन 
वादविवाद करीन 
ठप ठप ठप

मालक मला एखादा डुआयडी द्याना,
डू आयडी घेईन,
चिखलफेक करीन
दोन चार आयडी उडवीन 
धप धप धप!

मालक मला एखादा डू आयडी द्याना
डू आयडी घेईन 
मूळ आयडी ठेवीन 
पुन्हा पुन्हा येईन 
ख्या ख्या ख्या!

काव्यरस

" चिट्टा वे "

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 01/07/2016 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी स्वयंपाक करत गाणी ऐकत होते, घरी आणि ऑफिसातही गाणी ऐकत कामे करायची सवय आहे, कारण त्यामुळे आपण एका फ्लोमध्ये जातो आणि अशा फ्लो मध्ये कामे व्यवस्थित आणि लौकर होतात. रेडिओ मिर्चीवर 'चिट्टा वे' लागलं होतं. 'उडता पंजाब' सिनेमातील या गाण्याने बरेच दिवस झाले डोक्यात घर केले आहे. याच्या ट्रेलर्स, गाण्यांत शाहिद कपूर ओळखू न येण्याइतपत वेगळा दिसलाय, सिनेमा अजून पाहिला नाही पण चांगला आहे म्हणतात. अमित त्रिवेदीचे संगीत असलेले हे गाणं त्यातील बीट्स, र्‍हिदममुळे आवडतं.