Skip to main content

गांजा

भारतीय संस्कृती, गांजा, ब्रिटीश आणि ख्रिस्ती संस्कृती

लेखक साहना
Published on गुरुवार, 17/03/2016
भारतीय संस्कृती, गांजा, ब्रिटीश आणि ख्रिस्ती संस्कृती Washignton राज्यात गांजा कायदेशीर झाल्या नंतर तिथे जावून मस्त पैकी गांजा ओढण्याची इच्छा शेवटी काही दिवस मागे पूर्ण झाली. गांजा ह्या प्रकारांत मला विशेष रस नसला तरी गांजा संस्कृती ह्यांत मात्र प्रचंड रस आहे. खूप वर्षे आधी हिमालयांत भटकत असताना एका पर्वतारोहीने मला गांजा दिला. हिमाचल प्रदेशांत आज सुद्धा गांजा अतिशय सहज पाणे उपलब्ध आहे. नंतर योग मार्गावारिल साधना करत असताना एक विदेशी योग विद्यार्थ्याने मला गांजा दिला. सदर व्यक्ती LSD वगैरेचे प्राशन करत असे. योग मार्ग आणि गांजा ह्यांतील हा संबंध मला तेंव्हा समजला नाही.