Skip to main content

जिझिया कर

मालक मला एखादा डूआयडी द्याना!

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 11/05/2026 19:26 या दिवशी प्रकाशित केले.

मालक मला एखादा डूआयडी द्याना!
डू आय डी घेईन 
जिलेब्या पाडीन 
भक्ताना चोपीन 
चाप चाप चाप!

मालक मला एखादी डूआयडी द्याना!
डू आयडी घेईन
खरडफळा गाजवीन 
वादविवाद करीन 
ठप ठप ठप

मालक मला एखादा डुआयडी द्याना,
डू आयडी घेईन,
चिखलफेक करीन
दोन चार आयडी उडवीन 
धप धप धप!

मालक मला एखादा डू आयडी द्याना
डू आयडी घेईन 
मूळ आयडी ठेवीन 
पुन्हा पुन्हा येईन 
ख्या ख्या ख्या!

काव्यरस

शिक्षणाचा जिझिया कर : भाग २

लेखक साहना यांनी मंगळवार, 13/09/2016 04:44 या दिवशी प्रकाशित केले.
जिझिया कर म्हणजे इस्लामिक राज्याने इस्लामेतर एकेश्वर धार्मिक लोकांवर लावलेला कर. इस्लामिक राज्यांत ख्रिस्ती किंवा जू लोक हा कर देऊन जिवंत राहू शकतात. मूर्तिपूजक, अनेक-ईश्वर धर्मीय लोक हा कर भरून सुद्धा जिवंत राहू शकत नाहीत. आमच्या डाव्या इतिहासकारांच्या मते औरंगझेब हा थोर राजा होता कारण त्याने हिंदूंना सुद्धा जिझिया भरून जिवंत राहण्याची सोय केली नाहीतर त्याच्या ४ पैकी ३ सल्लागारांनी हिंदूंना धर्मांतर किंवा मृत्युदंड हीच शिक्षा सुनावली होती. भारताला आपण स्वतंत्र वगैरे समजत असलो तरी भारतीय राज्यघटनेत जिझिया प्रकारच्या कराची सोया जागो जागी आहे.