Skip to main content

चालू घडामोडी- एप्रील-मे -२०२६

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 20/04/2026 16:30 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी !

एप्रिल महिना आता सरत आला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपलं मिपा आता एकदाचं नव्या रूपात आपल्या भेटीला आलं आहे. वेबसाइटवर हळूहळू सकारात्मक बदल होत आहेत आणि नवनवीन गोष्टींची भर पडत आहे. अधूनमधून मिपा जे बंद पडतं, ते पडद्यामागे सुरू असलेल्या याच तांत्रिक कामांमुळे.

मालकांची स्वतःची नोकरी अत्यंत जबाबदारीची आणि धावपळीची आहे. पण तरीही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून ते मिपासाठी राबत आहेत. अगदी रात्री उशिरापासून ते पहाटेपर्यंत त्यांची ही धडपड सुरू असते. कुणाचीही आर्थिक मदत न घेता, स्वतःच्या खिशाला मोठी झळ सोसून ते केवळ मिपाकरांसाठी ही सर्व मेहनत घेत आहेत, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

मालक, तुमच्या या निस्वार्थ आणि अथक परिश्रमांसाठी आमच्या सर्व मिपाकरांकडून तुम्हाला एक 'स्टँडिंग ओव्हेशन' आणि मानाचा मुजरा! मनापासून खूप खूप आभार!


एकीकडे उन्हाचा कडाका वाढत आहे, तर दुसरीकडे देशातील आणि जगातील घडामोडींमुळे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक वातावरणही चांगलंच तापलं आहे. आपल्या मिपा कट्ट्यावर नेहमीच सखोल, अभ्यासपूर्ण आणि बऱ्याचदा खुमासदार चर्चा होतात, म्हणूनच सध्याच्या महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आपलं हे दळण. 

१. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेचे राजकारण, तर काही माणसांचा पायगुणच असा असतो की, ज्याला हात लावतील त्याची माती होते. महिला आरक्षणाच्या उदात्त हेतूआडून रेटला जाणारा 'मतदारसंघ पुनर्रचनेचा' (Delimitation) डाव असाच अंगलट आला आहे. संसदेत विरोधकांनी दाखवलेल्या अभूतपूर्व एकजुटीमुळे हे विधेयक बारगळले आणि सरकारला राजकीय पातळीवर एक मोठा पराभव स्वीकारावा लागला.

वरवर पाहता हा पराभव वाटत असला तरी, यामागील राजकीय गणिते अधिक गुंतागुंतीची आहेत. या मुद्द्यावर आपला निभाव लागणार नाही आणि विरोधक एकवटतील, याची सरकारला बहुधा आधीच पुरेपूर कल्पना असावी. परंतु, सध्याच्या घडीला देशातील वाढती बेरोजगारी, महागाई आणि इतर पायाभूत प्रश्नांसारख्या गैरसोयीच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष जाणीवपूर्वक विचलित करण्यासाठीच हा 'नॅरेटिव्ह' (Narrative) सेट करण्याचा अजेंडा राबवला गेला का, अशी दाट शंका निर्माण होते.

कोणत्याही ठोस धोरणात्मक चर्चेपेक्षा राजकीय धुरळा उडवून देण्यातच सरकारला फायदा वाटतो. आणि या सगळ्या राजकीय नाट्यावर पडदा टाकण्यासाठीच की काय, दुसऱ्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता 'भाइयों और बहनों...' अशी साद घालत पुन्हा एकदा मूळ प्रश्नांना बगल देणारे आणि केवळ भावनांना हात घालणारे भाषण देशाला ऐकावे लागले. ठोस कृतीऐवजी केवळ 'इव्हेंट मॅनेजमेंट' आणि भाषणांच्या जोरावर मूलभूत प्रश्न सुटणार आहेत का?

माझा काही प्रारब्ध नियती, कर्मफळाची फळं भोगणे यावर विश्वास नाही पण आता त्याची प्रचिती सद्य सरकारची धोरणे पाहिल्यावर यायला लागली आहे.एखाद्या व्यवस्थेपुढे किंवा परिस्थितीपुढे माणसाला स्वतःचे प्रयत्न थिटे वाटू लागतात, तेव्हा नकळतपणे 'प्रारब्ध' आणि 'नियती' या शब्दांचा आधार घेतला जातो. सध्याची एकंदरीत परिस्थिती, महागाई, सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारी करांची कात्री आणि त्याबदल्यात मिळणाऱ्या तुटपुंज्या सुविधा पाहिल्यावर, "हेच का आपले कर्मफळ?" असा उद्विग्न प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे.

राजकीय विश्लेषणात अनेकदा गमतीने असं म्हटलं जातं की, निवडणुकीच्या दिवशी बोट दाबणे हे जनतेचे 'कर्म' असते आणि त्यानंतरची पाच वर्षे सरकारची येणारी नवनवीन धोरणे हे त्या कर्माचे 'कर्मफळ' असते! पण यात सगळ्यात मोठी गोम अशी आहे की, हे 'कर्मफळ' मात्र ज्यांनी ते कर्म केले नाही त्यांनाही निमूटपणे भोगावेच लागते.

मंडळी, तमाशाच्या फडावर आधी नांदी होते, मग गण-गवळण रंगते, गवळणींचा रस्ता अडवला जातो आणि ही सगळी रंगतदार पूर्वतयारी झाल्यावर मग मूळ 'वगाला' सुरुवात होते. तसंच, आता मालकांचे आभार मानून आपली 'नांदी आणि गणगवळण' पार पडली आहे. आता मुख्य वगाकडे वळुया....


वाचने 6849
प्रतिक्रिया 245

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

' झारमूली' चा व्हीडीयो पाहिला का नाही. हसून हसून पुरेवाट होती. या पेक्षा सुंदर मनोरंजन असू शकत नाही देशासाठी.  =))

मी इंजॉय केलं झारमुरी.... =))

 

-दिलीप बिरुटे

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता राहुल गांधींनी डोसा बनवला तो पण एन्जॉय करा.

 

https://youtube.com/shorts/rWRomeXrmco?si=hFYkUlqO39ifG1ms

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एंजॉय? खरं की काय? बऱ्याच जणांना तर मिरची लागलेली दिसते.


In reply to by सुबोध खरे

आपले प्रधानमंत्री बिना सूचना, असे नेहमीच  वागतात. त्यांना जनतेपासून भीती वाटत नाही.  अर्थात एसपीजीसाठी ही डोकेदुखी असते.  मी   एसपीजीत प्रतिनियूक्तीवर काही काळ राहिलो आहे.  बाकी सुरक्षा अधिकारांचे काम राजाची सुरक्षा करणे असते . राजाने कधी कसे वागावे हा सल्ला देण्याची शक्ती नसते.


इकडे हे मोरू लोक्स उष्टी झालमुरी चघळत आहेत आणि तिकडे मात्र मोदी बंगाल पादाक्रांत करून सर्व बंगाल्यांना मोगू करण्याकडे वेगाने वाटचाल करत आहेत! 
 


In reply to by कांदा लिंबू

चुना आयोगाला दणका दिल्यामुळे तिथे प्रामाणिकपणे काम करावे लागणार आहे, चुना आयोगाची मदत मिळू शकणार नसल्याने नी इडी भाजप पक्षभरती करण्यास अपयशी ठरल्यामुळे भाजप जिंकेलच ह्याची शाश्वती नाही. :)


In reply to by सुक्या

"मोदीळ" ह्या नावाचाहि विचार व्हावा हे टंकून मी ह्या धाग्या वरून रजा घेतो.   🙏


महिला राखीव जागा व मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत अमान्य झाल्याने मनोमन सुखावलेल्या परंतु महिलांवर अन्याय झाला असा मानभावी वरकरणी  कांगावा करण्यासाठी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून नागरिकांची अतिशय अडचण केली होती. त्यावर एका महिलेने संतप्त दुर्गावतार धारण करून अत्यंत कडक शब्दात गिरीश महाजनांना धारेवर धरून निरूत्तर केले. जनतेला छळणारे मोर्चे, मिरवणुका, सार्वजनिक उत्सव, फटाके, जयंती उ्सव  हे सर्व प्रकार कायमस्वरूपी बंद व्हायला हवे. 


In reply to by श्रीगुरुजी

महिलांवर अन्याय झाला असा मानभावी वरकरणी  कांगावा करण्यासाठी
>>>$
भाजपे असतातच ढोंगी!


आआपच्या राज्यसभेतील १० सदस्यांपैकी ७ जणांनी भाजपत प्रवेश केलाय. त्यात बहुचर्चित राघव चढ्ढा,  क्रिके खेळाडू हरजनह सिंह, केजरीवालांच्या वैक्तिक सचिवाने मारहाण केलेल्या  स्वाती मालिवाल यांचा समावेश आहे. 

 

बंगालमध्ये पहिल्या फेरीत ९२ टक्क्यांपेक्षा जास्त व तामिळनाडूत ८५ टक्कयांपेक्षा जास्त   मतदारांनी मत दिले आहे. २०२१ च्या तुलनेत दोन्ही राज्यात १० टक्क्यांपेक्षा जास्त मते वाढली आहेत. 

 

इराण व अमेरिका यांच्यातील तथाकथित चर्चा होणे अजूनही अनिश्चित आहे. नेहमीप्रमाणेच ट्रंप मनाला येईल ते दावे करीत आहे व वाटेल त्या धमक्या देत आहे, परंतु इराण किंवा जगातील कोणताही देश अमेरिकेला काडीचीही किंमत द्यायला तयार नाही. या युद्धात हात पोळल्याने काही तरी करून युद्धातून सन्मानपूर्वक माघार घ्यावी यासाठी ट्रंपची धडपड सुरू आहे, परंतु स्वतःचा ताठा व मगरूरी कायम आहे. इराण अर्थातच आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अमेरिकेच्या इतिहासात अमेरिकची इतकी नाचक्की कधीही झाली नव्हती. 


In reply to by श्रीगुरुजी

आपच्या खासदाराना ईडी त्रास देत होती, राघव चड्डा ना हटवून क्या खासदाराला संसदेतील समितीचा अध्यक्ष केले गेले होते, त्याच्या घरी दहा दिवसाधीच इडी ने धाड टाकली होती, नाईलाज म्हणून त्याना भाजपात प्रवेश करणे भाग होते नाहीतर इडी ने जगू नसते दिले. भाजप प्रवेशामूळ इडीच्या त्रासापासून आपच्या खासदारान सुटका मिळेल. नमो नमो, भारत माता की जय, मेरा भारत महान!


भारतात हिंदू परीक्षार्थींना जाणवे काढून टाकायला लावले!

https://hindi.opindia.com/news-updates/two-college-staff-suspended-for-…  जनेऊ उतरवाने वाले कॉलेज के प्रिंसिपल और स्टाफ हुए सस्पेंड: कर्नाटक में ब्राह्मण छात्र को पेपर देने से रोका था 

बातमीची लिंक तर मागच्या वर्षीची आहे असे म्हणू नका; यावर्षीही हाच प्रकार झालाय. यापूर्वी असे प्रकार झालेले आहेत असे लोकांचे म्हणणे आहे. 

 

BTW, कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आहे असेही म्हणू नका; संघप्रणित मोदी सत्तेत येऊन बारा वर्षे झाली आहेत.


बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती छ. शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. महाराजांच्या पराक्रमाबद्दल आणि त्यांच्या संघर्षाबद्दल शास्त्रींनी केलेल्या दाव्यांमुळे महाराष्ट्र दुखावला होता.

काल त्यांनी माफ़ी मागितली माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला वगैरे. 

दोन हजार चौदा पासून अशा काही बुवा बाबांना फार चांगले दिवस आले, तोंडाला येईल ते बोलू लागले. काही जेलात  गेलेत काही वाटेवर आहेत.  

सुधरा रे जरा....

 

-दिलीप बिरुटे

 

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ मला वाटते मुद्दाम हे बोलायला लावतात असल्या बाबाबुवाना, इतिहासाची मोडतोड करून काही शिवद्वेष्ट्यांना आनंद मिळतो!


२०१४ पासून नव्हे तर १९१४ पासून

पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सुद्धा चांगले सुशिक्षित लोक सुद्धा अशा बुवा महाराजांच्या नादाला कसे काय लागतात हे पाहून आश्चर्य वाटते.

अगदी आचार्य अत्रे यांनी नारायण महाराजांवर लिहिलेला लेख वाचल्यास हे लक्षात येते.

पु ल यांचा गुरुदेव लेख तेच सांगतो   - बेंबट्या,  कुंभार हो या जगात गाढवांस तोटा नाही    


In reply to by सुबोध खरे

ही बाबाबुवा मंडळी मला आजीबात आवडत नाहीत, आजूबाजूला भटकत असतील तर त्याना वास येतो की हा माणूस आपल्याला मानत नाही मग जवळ बोलावून विचारपूस करून काहीतरी दीक्षा देतात, उदा, सोमवारी उपवास करा वगैरे. न मागता सल्ले असे करून भजनी लावायचे प्रयत्न करतात, ह्या बाबाबुवाना मानणारे थोर नि त्यांच्या भजनी लागून त्याना घरात घालणारे किंवा सहकुटुंब त्यांच्या भजनी लागणारे तर फारच थोर म्हनायला हवेत. 


In reply to by सुबोध खरे

१९१४ हे ही फारच उशीराचं होतंय.

हे खरंतर सगळं सगळ्या आचार्यांनी चालू केलं होते आणि लोकं तेव्हापासूनच नादाला लागले होते. 

शंकराचार्य, रामानुजाचार्य, माध्वाचार्य, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य, चैतन्य महाप्रभू, सांदिपनी यांच्यापासूनच त्यांच्या त्यांच्या परंपरा किंवा संप्रदाय यांच्या नादी लागणं सुरू आहे लोकांचं.

 

-(नादी न लागणारा) सोकाजी


In reply to by सुबोध खरे

सद्य सरकार, त्यांचे मंत्री, आमदार, खासदार कायम या भोंदूच्या विळख्यात दिसतात. आपलं हिंदूचं सरकार आहे म्हणून भोंदूना प्रोत्साहन देणे, त्यांची गर्दी, त्यांचे ढोंग, त्यांचे चमत्कार, सगळे गोड मानून घेणे त्यामुळे बाबा-बुवा यांचे प्रस्थ वाढले आणि ते शेफ़ारुन गेले आहेत.

 

पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचे हे हाल बघवत नाहीत.

 

-दिलीप बिरुटे


हायला  

खरं कि काय ?

धीरेंद्र ब्रम्हचारी, चंद्रास्वामी इ इतिहासातून पुसले गेले कि स्मरण शक्तीतून?

 

हे तर थेट पंतप्रधानांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळात होते.  

 

काय बिरुटे मास्तर, इतक्यात विशिष्ट स्मृतिभ्रंश?     
 


In reply to by सुबोध खरे

>>> काय बिरुटे मास्तर, इतक्यात विशिष्ट स्मृतिभ्रंश?

 

चांगली चर्चा सुरु झाली की तुमचं व्यक्तिगत लिहिणे सुरु होतं, या आजाराला काही उपचार असेल तर उपचार करुन घ्या...

 

लवकर बरे व्हा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...

 

-दिलीप बिरुटे

     


शक्तिशाली प्रधानमंत्री के योग गुरु होने के नाते धीरेंद्र ब्रह्मचारी का ज़बरदस्त राजनीतिक रसूख हुआ करता था और उनसे मिलने के लिए केंद्रीय मंत्रियों, नौकरशाहों और महत्वपूर्ण व्यक्तियों की लाइन लगा करती थी.

वो नीली टोयोटा कार में चला करते थे जिसे वे खुद ड्राइव करते थे. यही नहीं उनके पास कई प्राइवेट जेट थे, जिसमें 4 सीटर सेसना, 19 सीटर डॉर्नियर और मॉल- 5 विमान शामिल थे. इन्हें ब्रह्मचारी खुद उड़ाया करते थे.

उनका राजनीतिक रसूख़ इतना था कि नाराज़ हो जाने पर वो किसी भी नौकरशाह का तबादला करवा सकते थे और मंत्रियों का विभाग तक बदलवा सकते थे.

https://www.bbc.com/hindi/india-64597527


Chandraswami (born Nemi Chand Jain) was a controversial Indian self-styled "godman" and tantric who gained immense political influence in the 1970s and 80s, reportedly acting as a spiritual advisor to Indira Gandhi before influencing P.V. Narasimha Rao. He was famous for organizing massive, high-profile yagnas (rituals), with some reports alleging Indira Gandhi allowed him to perform secret rituals for protection in the late 1970s.

  • Initial Prominence: Chandraswami was well-connected within top Indian political circles before his rise to prominence during the Narasimha Rao government, with his influence spanning back to the Indira Gandhi era.
  • Ashram Land:
The land for his extensive New Delhi ashram, Vishwa Dharmayatan Sansathan, was reportedly allotted during Indira Gandhi's tenure.

Alleged Tantric Influence: Some reports mention him conducting secret tantric rituals for the protection of Indira Gandhi's son, Sanjay Gandhi, after the Emergency.

Influential Network: Apart from Indira Gandhi, he served as a "spiritual adviser" to various global figures, including the Sultan of Brunei, Margaret Thatcher, arms dealer Adnan Khashoggi, and was controversially linked to underworld figures.

Later Life and Scandals: Chandraswami was later arrested in 1996 for cheating and involved in various investigations, including alleged ties to the Rajiv Gandhi assassination and foreign exchange violations, before passing away in 2017

 

बिरुटे मास्तर

आपला चष्मा किती काळा आहे हे एकदा चष्मा काढून तरी पहा.  


The Congress in submissions before the Jain Commission in 1997 accused Chandraswami of having financed the assassination of Rajiv Gandhi after playing a key role in the conspiracy jointly hatched by various terrorist outfits in London and executed by the LTTE.

In its report, the Jain Commission dedicated a volume to his alleged involvement. The Enforcement Directorate also investigated his alleged role as financier of the killing

Read more at:
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/chandraswami-the-rise-and-fall-of-a-high-flyer/articleshow/58811428.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

 

तुमची आवडती इ डी तेंव्हा सुदधा   काम करत होती बरं का.

नाही म्हणजे काही वेळेस दुर्लक्ष होतं माणसाचं, म्हणून नजरेस आणून देतो आहे.   


ऐकावे ते नवलच 

 

Late British premier Margaret Thatcher was also said to have held secret meetings with Chandraswami in London when the Tory leader was in the opposition.

The Iron Lady, who was renowned for her no-nonsense direct approach, conversed with Chandraswami in 1975 in her Commons office.

And the future prime minister was so impressed with his apparent powers that she agreed to his request to wear a special red dress and a battered talisman around her wrist to a second meeting.


There, it is claimed the bearded guru correctly predicted that she would come to power within four years and remain there for more than a decade.

Details of the extraordinary meetings were revealed by former diplomat Natwar Singh, who was present when they took place.

 

 


काय बिरुटे मास्तर, इतक्यात विशिष्ट स्मृतिभ्रंश?  

 

बाकी काही म्हणा डॉक्टर साहेब, पण ही कॉमेंट मला फार आवडली!  

 

हे मोरू लोक्स् खरंच विशिष्ट स्मृतिभ्रंश नामक आजाराने नेहमीच ग्रस्त असतात!


आम आदमी पक्षाचे राघव चढ्ढा आणि इतर मान्यवर भाजपच्या गोदामात काल विराजमान  झाले.  वेगवेगळ्या पक्षांचे आमदार, खासदार, पक्ष,  आपल्या राष्ट्रसेवेसाठी भाजपच्या वळचणीला जात आहेत. दिल्लीच्या मद्य घोटाळ्यात अरविंद केजरीवाल आणि सिसोदीया जेव्हा तुरुंगात होते तेव्हा राघव चड्ढा लंडनला निघून गेले होते तिथून सोशीयल मिडियावर दळन टाकायचे तेव्हाच ही दाळ आप मधे शिजणार नाही, हे लक्षात येतबिरुटे, अर्थात त्यांच्या  राज्यसभेतील बोटचेपी भूमिकेमुळेही ते भाजपच्या जाळ्यात चालले आहे, हे लक्षात यायला लागले होते. प्रश्न तो नाही- 


सध्या,  देशाच्या राजकारणात सध्या सुरू असलेला पक्षांतराचा आणि विलीनीकरणाचा खेळ हा लोकशाहीच्या मूल्यांचा अध:पात दर्शवणारा आहे. 'राष्ट्रसेवा' या नावाखाली ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून ज्या पद्धतीने  लोकप्रतिनिधींना आपल्याकडे खेचले जात आहे, ते पाहता सद्य सत्ताधारी पक्षाची नैतिकता ( तशी ती होतीच कुठे म्हणा ) रसातळाला चालली आहे, हे  स्पष्ट होते.  किरकोळ राजकीय तडजोडी करण्यापेक्षा थेट दुसऱ्या पक्षाचा मोठा गट किंवा खासदारच पळवून नेण्यावर सत्ताधाऱ्यांचा कल आहे.  हा प्रकार म्हणजे लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा वापर करून जनतेच्या मतांवर टाकलेला एक प्रकारचा 'राजकीय दरोडा'च आहे. जेव्हा एखादा नेता  सत्तेच्या मोहापायी आपली मूळ विचारधारा सोडतो, तेव्हा तो केवळ आपला पक्ष सोडत नाही, तर ज्या मतदारांनी त्याच्यावर विश्वास टाकला होता, त्या मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत असतो.

आम आदमी पक्षासारख्या पर्यायी राजकारणाची कास धरणाऱ्या पक्षाचे खासदार जेव्हा भाजपात विलीन होतात, तेव्हा तो केवळ एका संघटनेचा पराभव नसून तो सामान्य माणसाच्या आशेचा पराभव ठरतो. मतदारांनी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जाऊन ज्यांना निवडून दिले, तेच प्रतिनिधी जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या दबावापुढे झुकतात, तेव्हा लोकशाहीतील 'निवड' करण्याच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहते. हा पराभव पक्षांचा किंवा नेत्यांचा नसून तो त्या सर्वसामान्य नागरिकांचा पराभव आहे, ज्यांनी आपला अमूल्य वेळ आणि विश्वास एका विशिष्ट विचारधारेला दिला होता. अशा फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनतेमध्ये व्यवस्थेबद्दल कमालीची अनास्था निर्माण होत आहे, तिचा विस्फोट होतो पण वेळ लागतो, हा सर्व प्रवास  भविष्यातील लोकशाहीच्या अस्तित्वासाठी एक धोक्याची घंटा आहे. 

बजाव थाली. 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सत्ताधारी पक्षाने लालूच दाखवून किंवा दमदाटी करून विरोधी पक्ष फोडणे अत्यंत जुनी व उच्च परंपरा कॉंग्रेसने सुरू केली. 

 

आणिबाणीत जनसंघातून कॉंग्रेसमध्ये गेलेले माधवराव सिंधिया, १९८० मध्ये हरयाणातील जनता पक्षाचे संपूर्ण मंत्रीमंडळ कॉंग्रेसमध्ये नेणारे भजनलाल, संपूर्ण समाजवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसमध्ये नेणारे शरद पवार, १९९३ मध्ये अविश्वास ठरावाविरूद्ध पाठिंबा मिळविण्यासाठी अजितसिंह व जनता दलाचे इतर ६ खासदार फोडून कॉंग्रेसमध्ये आणणारे नरसिंह राव, १९९१ मध्ये शिवसेनेचे ५२ पैकी १८ आमदार फोडून कॉंग्रेसमध्ये आणणारे सुधाकर नाईक . . . 

 

हीच उच्च परंपरा भाजप चालवितोय. 


In reply to by श्रीगुरुजी

>>>>>   हीच उच्च परंपरा भाजप चालवितोय. 

भाजपा वेगळा वगैरे पक्ष आहे, असे वाटायचे पण तसं काही कारण नाही, हे तसं लक्षात येत चालले आहे जनतेच्या. 
तो प्रश्न नाही. लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भाजपचं पोतं झटकलं तर,  
वरीजनल भाजपचे किती कार्यकर्ते  नेते,    पडतील इतकाच  प्रश्न उरला आहे. 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन्ही पक्षात काही साम्य व काही भेद आहेत. भाजपत कॉंग्रेसमधील बरेच वाईट गुण आले आहेत, परंतु अनेक चांगल्या गोष्टी भाजप करतो ज्या कॉंग्रेसने शक्य असूनही केल्या नाही. 



प्रतिसादाच्या मतितार्थाशी सहमत आहे. पण

सध्या, देशाच्या राजकारणात सध्या सुरू असलेला पक्षांतराचा आणि विलीनीकरणाचा खेळ हा लोकशाहीच्या मूल्यांचा अध:पात दर्शवणारा आहे.

या विधानामुळे पूर्वी काँग्रेसच्या काळात सर्व काही नैतिक होतं, सगळे धुतल्या तांदळाचे होते, संविधानभिरू होते असा काही समाजवादी सूर लावण्याचा प्रयत्न होतोय ते अमान्य आहे. भाजप जिथे अनैतिकपणे वागते तिथे सर्वात आधी भाजप समर्थकच टीका करतात. इथे मिपावरही अनेक कट्टर भाजप-संघ समर्थकांनी वेळोवेळी त्यांवर टीका केली आहे.

पण तुमच्यासारखे काँग्रेस समर्थक (किंवा पक्षाचे नेते-कार्यकर्ते) कधीही काँग्रेसच्या चुकलेल्या बाबींवर टीका करत नाहीत, उलट त्या चुकांचे समर्थनच करत राहतात.

भाजप हा party-with-difference राहिला आहे असे खात्रीने म्हणता येणार नाही पण अनेक भाजप समर्थक मात्र अजूनही party-workers-with-difference निश्चित आहेत.

दोन्हीत फरक आहे. 
 


आम आदमी पक्षासारख्या पर्यायी राजकारणाची कास धरणाऱ्या पक्षाचे खासदार जेव्हा भाजपात विलीन होतात, तेव्हा तो केवळ एका संघटनेचा पराभव नसून तो सामान्य माणसाच्या आशेचा पराभव ठरतो.

 

सामान्य माणसाने अरविंद केजरीवाल सारख्या पाताळयंत्री, खोटारड्या आणि अत्यंत स्वार्थी माणसावर विश्वास ठेवला तेथेच त्याच्या आशा आकांक्षांचा पराभव झाला.

मी कधीही निवडणूक लढवणार नाही  कोणत्याही सरकारी सोयीसुविधेचा लाभ घेणार नाही म्हणणारा हा माणूस काँग्रेस इतका भ्रष्ट पक्ष जगात दुसरा नसेल आणि जीव गेला तरी काँग्रेसशी युती करणार नाही असे सार्वजनिक व्यासपीठावरून बोलतो  ( हे सर्व व्हिडीओ सर्वत्र उपलब्ध आहेत),

 

  तोच माणूस सर्वात जास्त अय्याशीचा शीश महाल बांधतो आणि सर्वात पहिल्या संधीचा वापर करून मुख्य मंत्री होतो आणि दुसऱ्या आघाडीत त्याच काँग्रेस आणि मित्रपक्षांशी हातमिळवणी करतो तेंव्हाच  सामान्य माणसा च्या आशा आकांक्षांचा पराभव झाला.

 

बाकी मी कधीही निवडणूक लढवणार नाही म्हणणारा माणूस आप हा राजकीय पक्ष स्थापन कसा काय करू शकतो हे आपण विचारत नाही.  

 

BMR बेसिक्स मध्ये राडा असलेला हा पक्ष स्थापन  झाल्यापासून केजरीवाल या नेत्याने आपल्या बरोबरच्या सगळ्याच्या सगळ्या स्वतंत्र विचाराच्या माणसांना हाकलून देऊन स्वतः सर्वेसर्वा झाला तेंव्हाच सामान्य माणसा च्या आशा आकांक्षांची राख रांगोळी  झाली .

 

आता त्या आशाआकांक्षांचे फक्त अस्थिविसर्जन बाकी आहे  


 


In reply to by सुबोध खरे

स्वतःचे दिल्लीत सरकार असताना रस्त्यावर उतरून आंदोलन करून  केजरीवालने आपण भंपक असल्याचे दाखवून दिले आहे. त्याचेच अनुकरण सध्या महाराष्ट्र सरकारने रस्ता्यावर आंदोलन करुन ( महिला विधेयक ) केजरीवालच्या  पंक्तीत जाऊन बसले. अनुकरण आणि आदर्श असावा तर असा !


In reply to by सुबोध खरे

सामान्य माणसाने अरविंद केजरीवाल सारख्या पाताळयंत्री, खोटारड्या आणि अत्यंत स्वार्थी माणसावर विश्वास ठेवला तेथेच त्याच्या आशा आकांक्षांचा पराभव झाला.>>>> 

नेत्याचे माव चुकले आहे बहुतेक!


राहुल गांधी 26-28 एप्रिल अंदमानच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीबाबत त्यांची भूमिका - काहीही फरक पडत नाही. फालतू वेळ घालवणे पेक्षा समुद्र किनाऱ्याचा आनंद घेणे जास्त अल्हाददायक. 


In reply to by विवेकपटाईत

अंगावर लाल डगला परिधान करून डोक्यावर चाके असलेली रिकामी बॅग घेऊन फोटोसेशन, डोसा करताना फोटोसेशन, रस्त्यावर जोर बैठका मारताना फोटोसेशन आणि आणि आता अंदमांनात कोलू ओढताना फोटोसेशन होणार.


In reply to by श्रीगुरुजी

 नशीब, तुम्हाला ओरिजनल खुळखुळा मिळतोय.

खेळत बसा.

कॉपी कॅट खुळ्या पेक्षा बराच बरा आहे.


 केजरीवालच्या विरोधात षडयंत्र सुरू होते. चाहूल  लागतास केजरीवाल ने राघवचे पंख कापून टाकले. आपले राजनीतिक अस्तित्व वाचविण्यासाठी राघव जावळ  दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. 


२०२६ पासून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकात  ७५ टक्के काँग्रेसी कार्यकर्त्याना राहुल गांधी आपला नेता म्हणून हवा आहे.

 

 

 

 

 

तर  भाजपच्या १०० टक्के कार्यकर्त्या ना २०२६ पासून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकात  राहुल गांधी हाच काँग्रेसचा नेता म्हणून हवा आहे 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

भाजप कार्यकर्त्यांना की अंधभक्ताना?

बीजेपीवाले जेव्हा असे म्हणतात तेव्हा समजून जायचे की ते राहुल गांधींना टरकून आहेत. असे नसते तर राहुल गांधीची खासदारकी रद्द करण्याकरता आटापिटा कशाला केला असता?


In reply to by आग्या१९९०

ते राहुल गांधींना टरकून आहेत.

 

हा हा हा

हा छान होता

अजून येऊ द्या! 


In reply to by आग्या१९९०

ते राहुल गांधींना टरकून आहेत. >>>
+१
असे मॅसेज पसरवून काँग्रेसी जनात संभ्रम निर्माण होऊन ते राहुल गांधीना अध्यक्षपदावरून दूर करा अशी मागणी करतील असा केविलवाणा आशावाद त्यांच्या रेशिमबागी कुजबुज गँगच्या टूलकीट मध्ये असावा! :) 
  पण राहुल गांधी वाघ आहेत, उघडे पाडतात वेळोवेळी त्यांच्या खोट्या डिग्रीवाल्या, इंग्रजीचा ओ का थोट न कळणाऱ्या आकाला! :)


In reply to by अमरेंद्र बाहुबली

राहुल गांधी नक्की कोणाचे अध्यक्ष आहेत. भाजपाचे तर नितीन नाबीन आहेत.


In reply to by रात्रीचे चांदणे

राहुल हा भाजपने कॉंग्रेसमध्ये पाठविलेला ट्रोजन अश्व आहे. 


In reply to by सुबोध खरे

>>> भाजपच्या १०० टक्के कार्यकर्त्या ना २०२६ पासून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकात  राहुल गांधी हाच काँग्रेसचा नेता म्हणून हवा आहे 

 

राहुल प्रमुख नेता असेपर्यंत भाजप निश्चिंत आहे. राहुल, पवन खेडा, केजरीवाल, उठा, राऊत, सपकाळ, खरगे हे भाजपचे मुख्य प्रचारक आहेत. 
 


In reply to by श्रीगुरुजी

म्हणून बीजेपीच  ४०० पारचे स्वप्न दुभंगले. खरं की खोटं?


In reply to by आग्या१९९०

४०० काय आणि २४० काय. सत्तेवर शेवटी तेच कायम राहिले आणि नंतरच्या दोन वर्षात आहे ती हरयाणा व महाराष्ट्र  ही राज्ये टिकवून दिल्ली नव्याने जिंकली आणि आता बिहारमध्येही मुख्यमंत्री झालाय. महाराष्ट्रातही २-३ महापालिका वगळता मुंबईसह जवळपास सर्व महापालिका जिंकल्या. ठाकरे ब्रॅण्ड आणि पवार ब्रँड फुसका आहे हे पन्हा एकदा  सिद्ध झाले. 


In reply to by श्रीगुरुजी

एकेिकडे राहुल गांधी स्टार प्रचारक म्हणायचं आणि ४०० पार दूर , बहुमतासाठी कुबड्या घ्याव्या लागल्या . स्टार  प्रचारकाने दगा दिला की काय? 


In reply to by आग्या१९९०

४००  पासून दूर राहिल्याने काहीच नुकसान झाले नाही.  सत्ता कायम राहिली. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाले पण जागतिक विक्रम तोडला नाही म्हणून काहीच नुकसान नसते. सुवर्णपदक मिळणे पुरेसे आहे. 


In reply to by श्रीगुरुजी

स्टार प्रचारकाने  धोबीपछाड़ केल्याने दगडगोटे   गोळा करून सत्ता मिळाली . असा कसा हो तुमचा स्टार प्रचारक?  


In reply to by आग्या१९९०

सत्ता ही सत्ता असते. दगडधोंडे गोळा करून मिळवा किंवा हिरे माणके गोळा करून मिळवा. ऑलिंपिकमध्ये किती वेगात पळून शर्यत जिंकली याला महत्त्व नसते. इतर सर्व स्पर्धकांपेक्षा ०.०१ कमी सेकंदात शर्यत पूर्ण केली तरीही सुवर्णपदक मिळते. ९९ टक्के मते मिळवून निवडणूक जिंकली काय किंवा ३५ टक्के मते मिळूनही इतर सर्व उमेदवारांपेक्षा जास्त मते असतील, तरी विजय होतो. लोकशाहीमध्ये ५१ म्हणजे १०० असतात आणि ४९ असले तरी ते शून्य असतात. 

 

स्टार प्रचारक प्रचारात नसता तर भाजपने सत्ता गमाविली असती. सुदैवाने पुढील निवडणुकीतही स्टार प्रचारक प्रचारात असणार आहे व त्यामुळे भाजप परत सत्तेवर येणे निश्चित आहे.


 

मिनी पहलगाम - 

बातमीनुसार - 

ठाणे जिल्ह्यात, "तू हिंदू आहेस का" असे विचारून दोघांना चाकूने भोसकले. हल्लेखोर मुसलमान अमेरिकेहून परत आलेला होता.‌ 

 

Forced guard to recite kalma': Maharashtra's knife-wielding  ..

http://m.timesofindia.com/articleshow/130569666.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst 

 - - -  

हिंदुद्वेषी संघ भाजप प्रणित मोदी सरकारची गजवा-ए-हिंद २०४७ च्या दिशेने दमदार वाटचाल सुरू आहे. मागच्या बारा वर्षात असे प्रकार सातत्याने वाढत चालले आहेत यात नवल ते काय?


 


In reply to by कांदा लिंबू

मोदी/भाजप हिंदुत्ववादी आहेत ह्या अंधश्रद्धेतून बाहेर या!


गुजरातमधील स्थानिक निवडणुकीत सर्व १५ महापालिकांमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. कॉंग्रेस व आआप या दोन्ही पक्षांची संपूर्ण वाताहत झाली. 

 

एकूण १०३४ पैकी भाजपा  ८७९ जगा मिळालया. कॉंग्रेसला केवळ ७८ जागा मिळाल्या. आआपने सुरत महापालिकेत ४६ जागा जिंकल्या, परंतु इतर १४ महापालिकेत केवळ १३ जागा मिळाल्या. कॉंग्रेसला सर्वाधिक १३ जागा अहमदाबाद महापालिकेत मिळाल्या.‌ 

 

जिल्हा पंचायत, नगरपंचायत व तालुका पंचायत निवडणुकीतही भाजपने दणदणीत यश मिळविले आहे.


In reply to by श्रीगुरुजी

भाजपच्या विजयाबद्दल चूना आयोगाचे अभिनंदन!


मोदी आजच्या काळातील राजा बाबू आहेत. :)))  

झालमूड़ी ची नौटंकी इतर नौटंकी प्रमाणेच होती. या दुकानाचा खरा मालक आता त्याच्या गल्ल्यावर परत आला आहे.

तेव्हा मोदींच्या वेळी गल्ल्यावर कोण बसला होता? दुकानदाराचा मुलगा की एसपीजी जवान होता, ते आता कोण शोधणार? 

असाम मधे एसपीजी जवान खांबाच्या आड लपवला गेला होता.

 

जाता जाता:  गोवा : अत्याचारी क्रूरकर्मा झेविअर : गोवा भाजपा : खट्टर बंधु : अटक प्रकरण : पोकळ खोटा हिंदुत्वाचा बुरखा टराटरा कसा फाटला?

 

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-  VAARI JAAVAN (Full Video)| Dhurandhar The Revenge | 


मतदानोत्तर चाचणी अंदाजानुसार बंगाल, आसाम व पॉंडिचेरीत मतयंत्रात प्रचंड बनवाबनवी झाली आहे. केवळ केरळमध्ये मतयंत्रात गडबड करता आली नाही. तामिळनाडूत काही प्रमाणात मतयंत्रात गडबड झाली आहे. 


जाता जाता:  गोवा : अत्याचारी क्रूरकर्मा झेविअर : गोवा भाजपा : खट्टर बंधु : अटक प्रकरण : पोकळ खोटा हिंदुत्वाचा बुरखा टराटरा कसा फाटला?

 

गौतम खट्टर प्रकरण - केंद्रात भाजप, राज्यात भाजप - अन्यायपूर्ण अटक 
निदा खान प्रकरण - केंद्रात भाजप, राज्यात भाजप - सौहार्दपूर्ण ना-अटक 

संघ-भाजप प्रणित हिंदुद्वेष्टी मोदी-भागवत जोडगोळी ठामपणे गझवा ए हिंद २०४७ च्या दिशेने पाऊले टाकत आहे.

 


 

आधी मला वाटायचे, मिपावरील काही हिंदुत्ववादीसदृश्य लिखाण करणारे ऐदी खरेच हिंदुत्ववादी आहेत, पण हळूहळू कळायला लागले, ते त्यांच्या नेत्यांप्रमाणेच हिंदुत्ववादाच्या केवळ बुरखा पांघरून वावरताहेत. सध्या बंगालात भाजपाची सत्ता येणार आहे म्हणून हर्षोल्हास सुरु आहे (२०२१ मध्येही सुरु होता, प्रत्यक्षात मात्र तिथे ममता बानोने दोनशेवर जागा मिळवल्या) आणि इथे महाराष्ट्रात मात्र वर्षानुवर्षे भाजपाची सत्ता असूनही लोन वूल्फ हिंदूंवर कलमा पढायला लावून हल्ले करत आहेत. त्याबद्धल हे ऐदी सोयीस्कर मौन बाळगतात.

 


In reply to by कांदा लिंबू

फडणवीसांचे मुस्लिमधार्जिणे, हिंदूविरोधी, ब्राह्मणविरोधी, मराठाधार्जिणे, भ्रष्टाचारधार्जिणे, गुन्हेगारधार्जिणे, जातीयवादीधार्जिणे, मराठीविरोधी, हिंदीधार्जिणे धोरण याविषयी मी अनेकदा टीका केली आहे. परंतु मराठी मतदारांनाच ते लक्षात येत नाही. २०२४ विधानसभा निवडणुकीत पैसे वाटून ते प्रचंड बहुमताने निवडून आले. 

 

अनेक कट्टर फडणवीस समर्थकांनाच आता फडणवीसांचे बेगडी स्वरूप ध्यानात आले आले आहे. परंतु फडणवीसांची सद्गुणविकृती (खरं तर आव्हाड, संजय राठोड, राणे कुटुंबीय, पवार कुटुंबीय, ठाकरे कुटुंबीय, भुजबळ, तटकरे, चव्हाण अशांना सर्व कायदेशीर कारवाईपासून सरकारी संरक्षण देणे ही दुर्गुणविकृती आहे), फडणवीसांनी कसे पवार व ठाकरेंना संपविले, दोन पवार म्हणजे एक फडणवीस (भाजप समर्थक पवारांवर कठोर टीका करतात, मग डबल पवार किती वाईट आहेत हे यांना समजतच नाही), फडणवीस विकासपुरूष अशी बिरूदे देऊन त्यांच्या सर्व दोषांवर पांघरूण घालून आनंदात आत्ममग्न होतात. 

 

महाराष्ट्रात फडणवीसांनी पहिलीपासून हिंदी लादल्याचेही हे समर्थन करतात. महाराष्ट्र हिंदीभाषिक राज्य करण्यासाठी फडणवीस जोमाने प्रयत्न करताहेत हे यांना समजत नाही की समजून घ्यायचेच नाही? फडणवीसांनी महाराष्ट्रात भाजपचा तुंबलेला संडास केलाय हे यांना समजूनही तो फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक आहे असे कौतुक सुरू आहे. 

 

दुसरीकडे मोदींची कारकीर्द संमिश्र आहे. त्यांनी काही खूप चांगले निर्णय नक्कीच घेतलेत. पण अनेक चुकीचे निर्णयही घेतलेत. सर्व विरोधी पक्ष अत्यंत दुर्बल आहेत व राहुल या प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्याने काँग्रेसचे कायमस्वरूपी नुकसान केले आहे. कॉंग्रेस पुन्हा सत्तेत येणे हे भारतासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे मोदी कायम टिकावे ही इच्छा आहे. मोदींंनंतर योगी आदित्यनाथ किंवा हिमंता बिस्व सर्मा किंवा अमित शाह हे योग्य पर्याय ठरतील.