राम राम मंडळी !
एप्रिल महिना आता सरत आला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपलं मिपा आता एकदाचं नव्या रूपात आपल्या भेटीला आलं आहे. वेबसाइटवर हळूहळू सकारात्मक बदल होत आहेत आणि नवनवीन गोष्टींची भर पडत आहे. अधूनमधून मिपा जे बंद पडतं, ते पडद्यामागे सुरू असलेल्या याच तांत्रिक कामांमुळे.
मालकांची स्वतःची नोकरी अत्यंत जबाबदारीची आणि धावपळीची आहे. पण तरीही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून ते मिपासाठी राबत आहेत. अगदी रात्री उशिरापासून ते पहाटेपर्यंत त्यांची ही धडपड सुरू असते. कुणाचीही आर्थिक मदत न घेता, स्वतःच्या खिशाला मोठी झळ सोसून ते केवळ मिपाकरांसाठी ही सर्व मेहनत घेत आहेत, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
मालक, तुमच्या या निस्वार्थ आणि अथक परिश्रमांसाठी आमच्या सर्व मिपाकरांकडून तुम्हाला एक 'स्टँडिंग ओव्हेशन' आणि मानाचा मुजरा! मनापासून खूप खूप आभार!
एकीकडे उन्हाचा कडाका वाढत आहे, तर दुसरीकडे देशातील आणि जगातील घडामोडींमुळे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक वातावरणही चांगलंच तापलं आहे. आपल्या मिपा कट्ट्यावर नेहमीच सखोल, अभ्यासपूर्ण आणि बऱ्याचदा खुमासदार चर्चा होतात, म्हणूनच सध्याच्या महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आपलं हे दळण.
१. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेचे राजकारण, तर काही माणसांचा पायगुणच असा असतो की, ज्याला हात लावतील त्याची माती होते. महिला आरक्षणाच्या उदात्त हेतूआडून रेटला जाणारा 'मतदारसंघ पुनर्रचनेचा' (Delimitation) डाव असाच अंगलट आला आहे. संसदेत विरोधकांनी दाखवलेल्या अभूतपूर्व एकजुटीमुळे हे विधेयक बारगळले आणि सरकारला राजकीय पातळीवर एक मोठा पराभव स्वीकारावा लागला.
वरवर पाहता हा पराभव वाटत असला तरी, यामागील राजकीय गणिते अधिक गुंतागुंतीची आहेत. या मुद्द्यावर आपला निभाव लागणार नाही आणि विरोधक एकवटतील, याची सरकारला बहुधा आधीच पुरेपूर कल्पना असावी. परंतु, सध्याच्या घडीला देशातील वाढती बेरोजगारी, महागाई आणि इतर पायाभूत प्रश्नांसारख्या गैरसोयीच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष जाणीवपूर्वक विचलित करण्यासाठीच हा 'नॅरेटिव्ह' (Narrative) सेट करण्याचा अजेंडा राबवला गेला का, अशी दाट शंका निर्माण होते.
कोणत्याही ठोस धोरणात्मक चर्चेपेक्षा राजकीय धुरळा उडवून देण्यातच सरकारला फायदा वाटतो. आणि या सगळ्या राजकीय नाट्यावर पडदा टाकण्यासाठीच की काय, दुसऱ्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता 'भाइयों और बहनों...' अशी साद घालत पुन्हा एकदा मूळ प्रश्नांना बगल देणारे आणि केवळ भावनांना हात घालणारे भाषण देशाला ऐकावे लागले. ठोस कृतीऐवजी केवळ 'इव्हेंट मॅनेजमेंट' आणि भाषणांच्या जोरावर मूलभूत प्रश्न सुटणार आहेत का?
माझा काही प्रारब्ध नियती, कर्मफळाची फळं भोगणे यावर विश्वास नाही पण आता त्याची प्रचिती सद्य सरकारची धोरणे पाहिल्यावर यायला लागली आहे.एखाद्या व्यवस्थेपुढे किंवा परिस्थितीपुढे माणसाला स्वतःचे प्रयत्न थिटे वाटू लागतात, तेव्हा नकळतपणे 'प्रारब्ध' आणि 'नियती' या शब्दांचा आधार घेतला जातो. सध्याची एकंदरीत परिस्थिती, महागाई, सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारी करांची कात्री आणि त्याबदल्यात मिळणाऱ्या तुटपुंज्या सुविधा पाहिल्यावर, "हेच का आपले कर्मफळ?" असा उद्विग्न प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे.
राजकीय विश्लेषणात अनेकदा गमतीने असं म्हटलं जातं की, निवडणुकीच्या दिवशी बोट दाबणे हे जनतेचे 'कर्म' असते आणि त्यानंतरची पाच वर्षे सरकारची येणारी नवनवीन धोरणे हे त्या कर्माचे 'कर्मफळ' असते! पण यात सगळ्यात मोठी गोम अशी आहे की, हे 'कर्मफळ' मात्र ज्यांनी ते कर्म केले नाही त्यांनाही निमूटपणे भोगावेच लागते.
मंडळी, तमाशाच्या फडावर आधी नांदी होते, मग गण-गवळण रंगते, गवळणींचा रस्ता अडवला जातो आणि ही सगळी रंगतदार पूर्वतयारी झाल्यावर मग मूळ 'वगाला' सुरुवात होते. तसंच, आता मालकांचे आभार मानून आपली 'नांदी आणि गणगवळण' पार पडली आहे. आता मुख्य वगाकडे वळुया....
मिसळपाव
प्रतिक्रिया
मास्तर ;लेख कोड सहीत दिसतोय…
मास्तर ;लेख कोड सहीत दिसतोय. त्यामुळे वाचताना खडा आल्यासारखे होतंय.
थोडे एडीट करून रीपोसट कराल का?
लै अवघड झालं आज.
In reply to मास्तर ;लेख कोड सहीत दिसतोय… by विजुभाऊ
आपल्या हातात काही राहिलं नाही. च्यायला, सगळं व्यवस्थित करुन आणलं होतं.
धागा प्रकाशित होत नव्हता येरर होता, झटल्यानंतर एकदाचा धागा प्रकाशित झाला.
आपण टाकलेले दळण कसंय, आता निवांत पाहावं म्हटलं तर, सगळ्या एचटीएमलच्या लेंड्या
धाग्यात पसरुन गेल्या. सर्व सुरळीत झाल्यावर करतो दुरुस्ती.
टंकायचं कामही अवघड झालं. खात्या संपादनातून बदल करता येईल. पण सध्या त्यावरही मर्यादा आहेत.
दुसीकडून टायपून आणलं.
-दिलीप बिरुटे
बिरुटे सरांची चिकाटी वाखाणण्याजोगी आहे.
१. इराण इजरायल अमेरिका युद्धाचा नवा टप्पा आणि पाकिस्तानी मध्यस्थी यावर टिप्पणी
https://youtu.be/Fun_PEUpASg?si=L1fhxoEmb-0f6FZy
२. अमेरिका उपाध्यक्ष जेडीवान्स यांनी एक वेगळेच मत नोंदवले. "इराण जे करत आहे ते यांची तुलना wife's right to skydive"शी केली. अमेरिकन महिलांनी यास आक्षेप घेतला. "बायकांनी नवऱ्याचं ऐकून निर्णय घ्यायचे का?"
३. इकडे भारतात महिला आरक्षण विधेयक लोकसभेतील एकूण जागांच्या संख्येशी निगडित असल्याने दक्षिण भारतातील राज्यांनी विरोध केला. ठराव फेटाळला गेला. घटनादुरुस्तीसाठी लागणारी दोन तृतियांश मते मिळवू शकला नाही. पण विरोधी पक्ष महिलांच्या विरोधात आहेत असा कल्लोळ करायला सत्ताधारी मोकळे झाले.
युद्धातल्या घडामोडींचा नीट…
युद्धातल्या घडामोडींचा नीट अर्थ लागणे अवघड झाले आहे. अत्यंत तपशिलात जाऊन न्यूज फॉलो करणं वेळेअभावी शक्य होत नाहीये. इथे वाचून काहीतरी उलगडा होईल अशी आशा. उदा. अमेरिकेने मध्ये नाकाबंदीच केली. किंवा आजकालच एक इराणी नौका ताब्यात घेतली. यातून युद्धाचा कोणता उद्देश साध्य होतो आहे ? फक्त इराणची आर्थिक नाकेबंदी इतकाच का? व्यापारी जहाजे , कोणत्याही देशाची, अडवणे, हे तंत्र यापूर्वीही युद्धात वापरलं जात होतं का?
अधिक स्पष्टतेसाठी.. समजा…
In reply to युद्धातल्या घडामोडींचा नीट… by गवि
अधिक स्पष्टतेसाठी.. समजा एखादी व्यापारी बोट अडवली, पकडली, ताब्यात घेतली, तर तिच्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना काय म्हणून ताब्यात ठेवतात ? युद्धकैदी ? की अन्य गुन्हेगार ?
युद्धकैदी ? की अन्य गुन्हेगार ?
In reply to अधिक स्पष्टतेसाठी.. समजा… by गवि
वरच्या विडिओत १२:५२ येथे इराणने स्पष्ट केलंय की आंतरराष्ट्रीय कायदा लागू करा. म्हणजे अमेरिका जे करतोय ते बेकायदा आहे.
जिनेव्हा कन्व्हेन्शन आणी अंतरराष्ट्रिय मानवतावादी
In reply to अधिक स्पष्टतेसाठी.. समजा… by गवि
कायद्यात नागरी युद्धबंदी बद्दल स्पष्ट नियम आहेत.
इराणी नेतृत्वाने स्पष्ट केले आहे की धमक्या आणी वार्ता एकत्र चालणार नाहीत. अमेरिका दबाव तंत्राचा वापर करताना दिसत आहे परंतू इराणने स्पष्ट केले आहे की इराण म्हणजे व्हेनेझुयेला नव्हे.
इतर देशांच्या जहाजांची नाकेबंदी करून त्या देशांना इनडायरेक्टली मध्यस्थी साठी उकसवत आहे.
अमेरिकेची प्रचंड प्रमाणात गोची झालेली आहे आता तात्या मार्ग शोधत आहे.
युद्ध एस्कलेट होईल का? तर मला वाटते नाही. असेच भिजत घोंगडे काही दिवस रहाणार . नंतर निसर्गदत् स्वभावानुसार तात्या गुपचूप हळूच पाय काढून घेणार.
इराण ला तेल निर्यातीतून पैसे…
In reply to युद्धातल्या घडामोडींचा नीट… by गवि
इराण ला तेल निर्यातीतून पैसे मिळतात. त्याशिवाय इराण इतर गोष्टी आयात निर्यात सुद्धा करतो. नाकेबंदी केल्याने इराणी अर्थव्यवस्थेला धक्का बसेल अशी अपेक्षा आहे.
युद्ध एस्कलेट होईल का?
अमेरिकेचे रेडारविरोधक विमानही पाडण्याचे अस्त्र इराणकडे आहे हे सिद्ध झाले. इजरायलचे संरक्षण कवच आयन डोमही कुचकामी ठरले. अमेरिका निष्प्रभ झाले. युद्धात मार खाल्ल्याने आणि अमेरिकन कॉन्ग्रेसचीही अनुमती नाही. एकच माणूस चालवत असलेली जगातली एकमेव मोठी लोकशाही असे वर्णन करता येईल असे झाले. त्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ आणि त्यात एरंडीची झाडे पिळत आहे.
टी सी एस चे प्रकरण बऱ्याच…
टी सी एस चे प्रकरण बऱ्याच वेगवेगळ्या दिशानी पसरत चाललेय.
मुळात हे लोक नोकरीच्या ठिकाणी धर्म आणतातच कशाला.
मुंबैत साधे उभे राहिले तरी उकाडा असाह्य होतो. मुस्लीम स्त्रीया काल्या बुरख्यात ऊन आणि उकाडा कसा सहन करत असतील हे त्याच जाणोत. मुंबी मधे पुर्वी नव्हते इतक्या मोट्भ्या प्रमाणात बुरखाधारी आणि जाळीची टोपी धारी दिसायला लागले आहेत.
काही ठिकाणी तर अरबी झगे घातलेले दाढीवाली पहायला मिळतात.
बांगलादेशी आणून सरकारी…
In reply to टी सी एस चे प्रकरण बऱ्याच… by विजुभाऊ
बांगलादेशी आणून सरकारी आशिर्वादाने वसवले जाताहेत, त्याना आधार, पैन असे सगळे कार्ड पुरवले जाताहेत, त्यांच्या वाढलेल्या संखेकडे बोट दाखवून बघा बघा “ते” किती वाढताहेत, अशी भिति दाखवून मते खेचता येतील असे सत्ताधाऱ्यांना वाटते.
बुरखाधारी महिलानी या विरुद्ध…
In reply to टी सी एस चे प्रकरण बऱ्याच… by विजुभाऊ
बुरखाधारी महिलानी या विरुद्ध लढा द्यायला पाहिजे ,पण हे फक्त दिवास्वप्नच ठरणार..त्यामुळे कधीच समानता येणार नाही.
मुळात हे लोक नोकरीच्या ठिकाणी धर्म आणतातच कशाला.
In reply to टी सी एस चे प्रकरण बऱ्याच… by विजुभाऊ
अहो ख्रिस्ती आणि मुसलमानांत शर्यत लागली आहे कोण आधी सर्व जगाला कन्व्हर्ट करणार. १०० पैकी ९० ते ९५ टक्के हिंदूंना इस्लाम बद्दल काहीच माहित नसत बेसिक गोष्टी सोडल्या तर जस नमाज, ईद वैगरे म्हणून त्यांनी केलेल्या आपल्या देवाची निंदासाठी आपल्याकडे उत्तर नसते. जर आपल्यापैकी बराच लोकांनी एक्स-मुस्लिमांचे विडिओ youtube वर पहिले तर आपणही त्यांना प्रश्न विचारून गप्प करू शकतो कारण मुळात इस्लाम म्हणजे समर्पण प्रश्न विचाराचे नाहीत. उदा. नुपूर शर्मा.
चीन आणि नॉर्थ कोरिया सोडून हे लोक कदाचित यशस्वीही होतील सर्व जगाला कन्व्हर्ट करण्यात कारण या दोन्ही देशांत लोकशाही नाही आहे.
ते नाशिक आहे आणी कौल सेटर…
In reply to टी सी एस चे प्रकरण बऱ्याच… by विजुभाऊ
ते नाशिक आहे आणी कौल सेटर आहे
तिकडे ए सी असतो
मोठा प्रतिसाद ....
****महिला आरक्षण: पर किस महिला को बिठाओगे संसद में? आचार्य प्रशांत यांचा व्हिडिओ पाहिला .महिला बिलाविषयक ते खूप छान बोलले आहेत .ज्या देशात आजही महिला सरपंच "कन्सेप्ट सर्वार्थाने रुजली नाही ,घरगुती स्वातंत्र्य नाही तिथे थेट आकाशावर स्वार होण्याचे नाटक का ??आधी महिलांसाठी जमिनीवर काम करा .Video लिंक नक्की ऐका !
महिला आरक्षण: पर किस महिला को बिठाओगे संसद में?
*****आरक्षणाने महिला सशक्त होणार का?
सध्या लोकसभेत महिलांची संख्या फक्त १२-१५% आहे. आरक्षणामुळे सुमारे १८० महिला खासदार होतील.पण प्रश्न असा: ही अतिरिक्त १००+ महिला कोण असतील?बहुतेक महिला राजकीय कुटुंबातून येतील जसे पत्नी, मुलगी,सून किंवा नातेवाईक. पुरुष खासदारांमध्ये राजकीय कुटुंबीयांचे प्रमाण २५% आहे, तर महिलांमध्ये ५०% पेक्षा जास्त.उदाहरण: ग्रामपंचायत स्तरावर "सरपंच फेनोमेनन" प्रभावशाली पुरुषांची पत्नी सरपंच बनते, पण खरी सत्ता पुरुषाकडेच राहते. ती फक्त "नामधारी" असते.संसदेतही तेच होईल. महिलांना कठपुतली बनवले जाईल. खरी स्वतंत्र, विद्रोही, स्वावलंबी महिला पार्ट्या सहन करणार नाहीत.
****सशक्तिकरण कुठून सुरू होते?
बदल घरापासून, समाजापासून सुरू व्हायला हवा.मुलींना जन्म द्या, चांगले शिक्षण द्या, स्वतंत्र निर्णय घेण्याची स्वातंत्र्य द्या.आज समाज काय करतो? आज्ञाधारक, आज्ञाकारी, "चांगल्या संस्कारांची" मुली तयार करतो. त्यांना बाहेर जाऊ देत नाही, काम करू देत नाही. घरात दाबतो (हुंडा, घरेलू हिंसा, मॅरिटल रेप इ.).मग बाहेर संसदेत "सजावट" म्हणून ३३% महिला ठेवतो. हे दिखावा आहे.
****हे सशक्तिकरण आहे की वोट बँक?
हे मुख्यतः वोट बँक साठी आहे. महिलांचा मतदानाचा टर्नआउट वाढत आहे, म्हणून पार्ट्या त्यांना खुश करत आहेत.आंतरराष्ट्रीय स्तरावर "लिबरल" आणि "प्रोग्रेसिव्ह" दिसण्यासाठीही हे केले जाते.पण वास्तव: घरात महिलांना दाबा, बाहेर ३३% दाखवा आणि सांगायचे "आम्ही महिला सशक्तिकरण करतोय". हे पाखंड (hypocrisy) आहे.
****जुनी परंपरा परत येत आहे का?
होय. पूर्वी महिलांना "देवी" म्हणून घरात कैद ठेवायचे. आता "सशक्त" म्हणून संसदेत कठपुतली बनवायचे.दोन्हीही पितृसत्तात्मक व्यवस्था (patriarchy) ला मजबूत करतात.खरा धर्म किंवा आध्यात्मिकता (गीता, उपनिषद) लिंगभेद पाहत नाही. पण समाज अजूनही पुरुषप्रधान आहे.
आचार्य प्रशांत म्हणतात:"आरक्षणाने संसद भरेपर्यंत थांबू नका. खरा बदल घरात आणि समाजात घडवा. अन्यथा ३३% महिला खासदार येणार, पण खरी शक्ती पुरुषांकडेच राहील."
बदल आणि वक्तृत्व
In reply to मोठा प्रतिसाद .... by Bhakti
>> बदल घरापासून, समाजापासून सुरू व्हायला हवा.
- तुंम्हाला 'जशोदाबेन' म्हणायचं आहे का? :-)
>> आचार्य प्रशांत
यांचे काही व्हिडिओ पाहिले आहेत. वरवर बंडखोर, प्रश्न विचारल्यासारखे वाटते, पण शेवटी तोच सनातनी गाभा वाटला. उत्कृषट वक्तृत्व असेकळते मी सावध होतो, पण लोक प्रभावित होतात. जग्गी वासुदेव पण मुलाखतीत असेच बिनतोड अध्यात्मिक, आयुर्वेदिक दावे करून प्रभावित करतात, पण खरे नंतर कळते.
वरवर बंडखोर, प्रश्न…
In reply to बदल आणि वक्तृत्व by स्वधर्म
आचार्य प्रशांत 'अद्वैत वेदांताचे' पुरस्कर्ते आहेत. त्यांची बंडखोरी लोकधर्म (हिंदू सांप्रदायिकता) आणि सनातन धर्म (फक्त वेद आणि उपनिषदांच्या परिघातला) ह्यातला फरक समजावून सांगणारी आहे त्यामुळे ती बंडखोरी आवश्यक आहे. तेच जग्गी वासुदेव यांच्याबद्दल, ते उघड उघड शैव (योगी आदिनाथ) पुरस्कर्ते आहेत.
हे का ते कळले नाही, नेमकं काय म्हणायचं आहे?
- (अवांतर करणारा) सोकाजी
धन्यवाद सोत्रि!छान सांगितले …
In reply to वरवर बंडखोर, प्रश्न… by सोत्रि
धन्यवाद सोत्रि!छान सांगितले 👋
फेबुवरही हा लेख दिला.तिथे…
In reply to बदल आणि वक्तृत्व by स्वधर्म
फेबुवरही हा लेख दिला.तिथे डिस्केमर दिले होते.इथेहि द्यावे असे वाटल नाही.पण देते 😃
>>>>खूप काळापूर्वीच गुरु वगैरे मानणं बंद केल.मी माझ्या आई वडिलांची आणि स्वतःचीच फक्त भक्त आहे ,बाकी कोणाचीच नाही .रोज नवनवीन हुशार लोकांना इंटरनेटवर ऐकत राहणे मला आवडते .पण मी अनेकदा सांगते त्याप्रमाणे मला वेदांताची प्रचंड आवड आहे त्यामुळे युट्युबवर याबाबत अनेक व्हिडीओ पाहत असते .त्यापैकी आचार्य प्रशांत मला पूर्णपणे आधुनिकपणे ,व्यावहारिक वेदांत सांगणारे वाटतात .अजिबात भावनिक अतिशोयक्ती ते करत ना>>>><<<
>>उत्कृषट वक्तृत्व असेकळते मी सावध होतो, पण लोक प्रभावित होत <<
हे मी समजु शकते.पण सतत त्रयस्थ विचारसरणी करायची कला मी आत्मसात केलीये 🙂
पण मी अजुन एक आचर्य प्रशांत यांचा व्हिडिओ देतेय ,delimitation वर जरा सहन करा 😅
अजिबात भावनिक अतिशोयक्ती ते…
In reply to फेबुवरही हा लेख दिला.तिथे… by Bhakti
अजिबात भावनिक अतिशोयक्ती ते करत नाही**
प्रशांत आणि सावध का व्हायचे
In reply to फेबुवरही हा लेख दिला.तिथे… by Bhakti
@भक्ती
आचार्य प्रशांत हे वरवर बंडखोर आहेत असे वाटते परंतु नंतर मूळ गाभा अद्वैत वेदांताचाच सांगत असतात. त्यांच्या अनुयायांमध्ये प्रामुख्याने नवशिक्षित तरुण पिढी आहे ज्यांना जाणवलेलं आहे की आपल्या पारंपारिक धार्मिक ग्रंथात, सनातन धर्मात काहीतरी चुकीचं आहे. अशांना त्यांचं म्हणणं खूप पटण्यासारखं आहे कारण प्रशांत वरवर इतर सर्व धार्मिक परंपरा, ग्रंथ, गुरु यांना नाकारतात (उदा. पुनर्जन्म आत्मा इ.) आणि आपण काहीतरी वेगळं सांगतो आहोत आपल्याला सगळं कळलेलं आहे अशा प्रकारे अत्यंत उत्कृष्ट वक्तृत्वाच्या सहाय्याने मांडणी करतात. खरे तर आत्म्याचे अस्तित्व व पुनर्जन्म काढला तर कर्मसिध्दांत जो अद्वैत वेदांताचाच आत्मा आहे, तो टिकत नाही. पण प्रशांत त्याचा अर्थ मोडून तोडून स्वत:ची वेगळीच मांडणी करतात. त्यामुळे लोक गोंधळून जातात व यांनाच खरे काय ते कळले आहे असे मानू लागतात. ते प्रश्नांना कसे भाळतीकडेच वळवतात याची अनेक उदाहरणे सांगता येतील. उदाहरणार्थ त्यांना जेव्हा सनातन धर्मातीलजातीभेदावरती प्रश्न विचारण्यात आला. आपल्या अद्वैत वेदांताच्या ग्रंथांमध्ये उदाहरणार्थ भगवद्गीता, वर्ण हे मी स्वतःच निर्माण केलेले आहेत असा श्लोक श्रीकृष्णांच्या तोंडी घालण्यात आलेली आहे. आणि वर्णातूनच जाती तयार झाल्या. आता ज्याचे शिक्षण झालेले आहे, ज्याने स्वतः विचार केलेला आहे त्याला ही भेदभावमोलक मांडणी सरळसरळ चुकीची वाटते परंतु आचार्य प्रशांत ती चूक आहे म्हणत नाहीत. ते म्हणतात की समाजात कुठे भेदभाव नाहीये सांगा. आर्थिक दृष्ट्या संपन्न लोक गरीब लोकांच्या मिसळत नाहीत, जिथे शिपाई पाणी पितात त्या ठिकाणी ऑफिसर्स पाणी पीत नाहीत, त्यांचं कॅन्टीन वेगळं असतं इत्यादी. थोडक्यात वर्ण व जातीभेद चुकीचा आहे असं न म्हणता समाजात इतरही भेद आहेत, अशा पद्धतीचा प्रतिसाद देतात. ज्यांनी प्रश्न विचारला, ज्याला थोडी जाग येत होती, त्याला कळत होतं की आपण धर्मग्रंथांना का नाकारलं पाहिजे त्याला हळूच असा एक दिलासा मिळतो, की भेद हे सदैव सर्वत्र असणारच आहेत. त्याच्यामुळे याच्यावर डोकं आपटून काय होणार?
मग बहुतेकांना आपल्या धर्मग्रंथात काहीही चूक नसून फक्त आपलं इंटरप्रिटेशन चुकलेलं आहे असं वाटू लागत. ही लबाडी झाली. जी विषमता मूलक मांडणी आहे ती चूक आहे असं सांगणं, ही एक प्रामाणिक मांडणी होऊ शकली असती. शिवाय प्रशांत अगदी शंकराचार्य भगवद्गीता पासून अद्वैत वेदांत इत्यादीत मिस इंटरप्रिटेशन आहे आणि खरा धर्म मलाच कळलेला आहे असा एक बुलंद आत्मविश्वास घेऊन मांडणी करत असतात, ज्याची ऐकणाऱ्यांवर छाप पडते. ते म्हणतात की जे खरं ज्ञान खरं अध्यात्म आहे ते फक्त उपनिषदांमध्ये आहे. परंतु उपनिषदामध्येही चांडाळचा जन्म कोणाला मिळतो, ब्राह्मणांचे आदरातिथ्य कसे करावे इत्यादी अर्थाचे श्लोक आहेत. खाली दिलेल्या अर्पितच्या व्हीडिओमध्ये ते अतिशय साधार ससंदर्भ दाखवून दिलेले आहे. खरे तर त्यात प्रशांत यांच्यासारख्यांमुळे काय नुकसान होते ते अगदी नेमके सांगितले आहे.
https://youtu.be/MCUWXe47cwQ?si=zeosbNzngJ455IJ0
आचार्य प्रशांत अनेक आहेत. अविनाश धर्माधिकारींचे गीतेवरील व्हिडिओ बघा किंवा राजीव सानेंचे गीतेवरील चार व्हिडिओ आहेत तेही पहा. हे कोणीही भगवद्गीतेत जे अन्यायकारक आणि विषमता मुलक आहे ते चूक म्हणू शकलेले नाही. अतिशय प्रभावी वक्तृत्वाच्या साह्याने खूप खूप विस्तारपूर्वक मांडणी करून ही लोक अन्यायकारक गोष्टीसुद्धा कशा नैसर्गिक आहेत हे सांगू लागतात. हे म्हणजे जागे झालेल्या ला, प्रश्न विचारणाऱ्यांना पुन्हा धर्मग्रंथांची, रूढी परंपरांची, अभिमानाची गुंगीची गोळी साखर लावून देण्यासारखे आहे.
@सोत्री,
>> उत्कृष्ट वक्तृत्व असेले की मी सावध होतो, पण लोक प्रभावित होतात
असे म्हटले कारण माझा गीता शिकण्याचा अनुभव. जेंव्हा प्रश्न विचारले तेव्हा साध्या सध्या शंकांना मोठमोठी उत्तरे अतिशय उत्कृष्ट भाषेत दिली गेली. मला शिकवणाऱ्या सरांच्या गुरुजींचे गुरुजी स्वामी दयानंद सरस्वाती यांचा होम स्टडी कोर्स मागवला. दोन हजार पानांचे चार खंड. मोठ्या चिकाटीने वाचायचा प्रयत्नही केला. त्यात कमालीच्या उदात्त आणि मधुर भाषेत एवढा विस्तार करून सांगितले आहे तरी प्रश्नाचे उत्तर मिळाले नाहीच पण काही काळ एकदम दिव्य ज्ञान वगैरे मिळाले असे वाटू लागले होते.
ओके!
In reply to प्रशांत आणि सावध का व्हायचे by स्वधर्म
स्वधर्म,
>> जे अन्यायकारक आणि विषमता मुलक आहे ते चूक म्हणू शकलेले नाही. अतिशय प्रभावी वक्तृत्वाच्या साह्याने खूप खूप विस्तारपूर्वक मांडणी करून ही लोक अन्यायकारक गोष्टीसुद्धा कशा नैसर्गिक आहेत हे सांगू लागतात.
दीर्घ प्रतिसादाबद्दल धन्यवाद, वरच्या कोटमधे माझ्या आधिच्या प्रतिसादातील प्रश्नाचे उत्तर मिळाले. बहुतांशी सहमत आहे.
>> माझा गीता शिकण्याचा अनुभव
ह्याच्याशीही संपूर्ण सहमत. गीतेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात असं म्हटलं जातं, पण गीता वाचून पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मात्र गीतेत नाहीत. असो अतीअवांतरच्या विस्तारभयामुळे आवरते घेतो, गीतेवर वेगळा धागा काढून तिथे चर्चा करूया. (आता व्यनीतून चर्चा करुया असं म्हणयची सोय उरली नाही ;) )
- (सावध राहण्याबद्दल सहमत असलेला) सोकाजी
https://youtu.be/6…
In reply to प्रशांत आणि सावध का व्हायचे by स्वधर्म
https://youtu.be/6-WH3BcZO6U
हा सगळा व्हिडीयोच पण खासकरून ६ः०८ व्या मिनीटापासूनची चर्चा ऐकल्यावर तुमच्या सावध का व्हायचं ह्या मुद्द्याचं चपखल उत्तर मिळतं! सगळा व्हिडीयोच मज्जामज्जा आहे. 😃
-(सावध राहण्यास सहमत असलेला) सोकाजी
पटनाईक हेही तसलेच
In reply to https://youtu.be/6… by सोत्रि
वरील यादीत पटनाईक राहिले होते. धमाल व्हिडिओ आहे खरा. नंतर पटनाईक यांनी 'ढोल पशु शुद्र नारी सब ताडन के अधिकारी' या लाईनवर आक्षेप घेणाऱ्यांनाच दोष दिला आहे, नंतर इतर सगळं किती चांगलं आहे अशी मखलाशी सुरू केली आहे. दुर्दैव असे की यामुळे विचार करणारे थोडेसे लोक जे प्रश्न विचारतात ते (या निवेदकासारखे) प्रभावित होतात. त्यांना आपलंच चुकलं असं वाटू लागतं. अशांना गोल गोल बोलून पुन्हा सगळे पूज्य माणणाऱ्यांच्या गटात नकळत ओढले जाते. म्हणून गोडबोल्यांपासून कमालीचं सावध राहिलं पाहिजे.
अविनाश धर्माधिकारींनी गीता वाचताना कुठे श्वास रोखला होता, आणि कसा मग सोडला हेही शोधून पहा.
महिला आरक्षण...
महिला आरक्षणाआडून आणलेल मतदारसंघ पुनर्र्चनाचा फुगा फुटल्यानंतर, आता काय परिस्थिती राहील. म्हणजे, संसंदेने, २०२३ मध्ये संसदेने मंजूर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाला (नारीशक्ती वंदन अधिनियम - १०६ वी घटनादुरुस्ती) राष्ट्रपतींची संमती मिळाली आहे, पण ते लगेच लागू झालेले नव्हते. कारण हा कायदा लागू करण्यासाठी प्रथम जनगणना (Census) आणि त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना (Delimitation) होणे आवश्यक आहे, अशी अट घालण्यात आली होती. या प्रक्रियेनंतरच महिलांसाठी ३३% जागा आरक्षित केल्या जातील असे म्हटले होते.
आता, जनगणना आणि मग मतदारसंघाची पुनर्रचना आणि मग महिलांसाठी आरक्षण लागू होईल. आता जनगणनेचं नाटक सुरु होईल पण मग मतदार संघ पुनर्रचनेचं काय असा प्रश्न आहे ? जाणकार लिहितील अशी अपेक्षा..
-दिलीप बिरुटे
लोकसभा संख्याबळ ७५३!
होणार आहे जनगणनेप्रमाणे. ५४३ वरून ७५३.
पण दक्षिणेचा हिस्सा कमी होणार . त्यामुळे त्यांना ते नको आहे.
प्रत्येक राज्याच्या जागा ५०%…
In reply to लोकसभा संख्याबळ ७५३! by कंजूस
प्रत्येक राज्याच्या जागा ५०% वाढत असतील तर काही फारक पडणार नाही. फक्त संसदेत प्रश्नोत्तराच्या कालावधीत वाढ करावी लागेल. लोकप्रतिनिधींच्या वेतन आणि निवृत्ती वेतनावर खर्च वाढेल.
या वेळची मोठी बातमीमिपावरचा…
या वेळची मोठी बातमी
मिपावरचा खरडफळा आणि खरडवही सुरू झालेली आहे हो.
ढुम ढुम ढुमाक्क ढुम ढुम ढुमाक्क ढुम ढुम ढुमाक्क ढुम्म्म्म्म्म्म्म्म
मोठा प्रतिसाद ....delimitation
आचार्य प्रशांत यांचा हा व्हिडिओ भारतातील लोकसभा मतदारसंघांचे पुनर्नियोजन delimitationया विषयावर आहे आणि विशेषतः दक्षिण भारतावर अन्याय होतो का? हा प्रश्न उभा करतो.
आचार्य प्रशांत यांचा डिलिमिटेशन वर व्हिडिओ
Delimitation म्हणजे काय?--Delimitation म्हणजे लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची सीमा आणि संख्या ठरवणे/बदलणे
--***याचा उद्देश:
-प्रत्येक मतदारसंघात साधारण समान लोकसंख्या असावी
-प्रत्येक मताला समान मूल्य (equal representation) मिळावे
-भारतात delimitation कधी होते?
भारतात हे काम Delimitation Commission of India करते
शेवटचं पूर्ण delimitation 2002 मध्ये (2008 पासून लागू)
पण महत्वाचं म्हणजे 1976 पासून 2026 पर्यंत seat distribution freeze आहे
-- हे freeze का केलं?
जे राज्ये लोकसंख्या नियंत्रण करत आहेत त्यांना शिक्षा होऊ नये म्हणून
--आता समस्या काय आहे?-2026 नंतर delimitation होणार आहे आणि तेव्हा:
-लोकसंख्येच्या आधारावर सीट्स पुन्हा वाटल्या जातील
-ज्या राज्यांची लोकसंख्या जास्त वाढली आहे (मुख्यतः उत्तर भारत) त्यांना जास्त seats मिळतील
उत्तर vs दक्षिण भारत मुद्दा
*** उत्तर भारत:
लोकसंख्या जास्त वाढली
भविष्यात अधिक लोकसभा जागा मिळण्याची शक्यता
***दक्षिण भारत:
शिक्षण, आरोग्य, family planning चांगले
लोकसंख्या वाढ कमी
त्यामुळे seat वाढ कमी होईल किंवा proportion कमी होईल
त्यामुळे प्रश्न असा आहे कि “ज्यांनी population control केलं, त्यांना political power कमी का?”
लोकसंख्या आधारित representation हे लोकशाहीत logical आहेपण यामुळे regional imbalance निर्माण होऊ शकतो.दक्षिण राज्यांना वाटतं की त्यांच्यावर अन्याय होतो आहे
उदाहरण
State A (उत्तर) → लोकसंख्या 20 कोटी आणि State B (दक्षिण) → लोकसंख्या 10 कोटी
मग State A ला जास्त MPs मिळतील त्यामुळे संसदेत त्यांचा प्रभाव जास्त
-- मोठा धोका काय सांगितला आहे?
भारतात regional political tension वाढू शकते.
उत्तर भारताचा political dominance वाढू शकतो
दक्षिण राज्यांना policy making मध्ये कमी influence
--संभाव्य उपाय (व्हिडिओत चर्चा)
Seats वाढवणे (increase total seats)
सर्व राज्यांना वाढ मिळेल
Population + development factors वापरणे.फक्त लोकसंख्या नाही, तर performance देखील consider.Federal balance maintain करणे
सर्व राज्यांना न्याय मिळावा
--Delimitation हा फक्त technical विषय नाही
--तो भारताच्या federal structure आणि political balance वर परिणाम करतो
मुख्य प्रश्न आहेत .
समान प्रतिनिधित्व vs राज्यांमधील न्याय
लोकसंख्या vs विकास
(No subject)
काळं तोंड ?
कोणीतरी आवरा रे......
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूमध्ये निवडणूक प्रचारात गेल्यावर आपली त्वचा इतर दाक्षिणात्य लोकांसारखी दिसावी म्हणून त्यावर डार्क टोनिंग केलं होतं अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत...
-दिलीप बिरुटे
आफ्रिकेत प्रचार असता तर काय…
In reply to काळं तोंड ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आफ्रिकेत प्रचार असता तर काय केल असत ह्यांनी? :)
=))
In reply to आफ्रिकेत प्रचार असता तर काय… by अमरेंद्र बाहुबली
लै अवघड केस होत चालली आहे...=))
-दिलीप बिरुटे
Modi ji getting ready for elections in antlantis
In reply to आफ्रिकेत प्रचार असता तर काय… by अमरेंद्र बाहुबली
https://photos.fife…
In reply to Modi ji getting ready for elections in antlantis by एकुलता एक डॉन
https://photos.fife.usercontent.google.com/pw/AP1GczN2tPVJPmxvk64ghhIDhVcffaY7-s0ecIHIHItcUKLcVEJtdHZdsvRf=w1080-h589-s-no-gm?authuser=0
मी मागच्या महिन्यात दक्षिण…
In reply to काळं तोंड ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी मागच्या महिन्यात दक्षिण भारतात गेले होते. केवळ दोन दिवसांत मी भयंकर टॅन झाले.ते फोटो पाहून लेक म्हणाली, तुला असाच स्किन टोन सूट होतो😅त्यामुळे मला ही मुद्दाम टोन ची शक्यता कमी वाटते.
खरे काय मोदी, मोदींच भक्त, मोदींचे विरोधक जाणो 😅
ते जलमूरीचे दुकानातला माल-बरण्या पाकिट मात्र खचाखचं भरले होते. जसे काय आजच दुकानाची ओपनिंग आहे.
=))
In reply to मी मागच्या महिन्यात दक्षिण… by Bhakti
>>>जलमूरीचे दुकानातला माल-बरण्या पाकिट मात्र खचाखचं भरले होते. जसे काय आजच दुकानाची ओपनिंग आहे.
नौटँकीची काय लिमिट राहिली नाही.
-दिलीप बिरुटे
( मिपावरील मुरमु-यावाला )
मोदी विरोधकांना मस्त खुळखुळा…
In reply to मी मागच्या महिन्यात दक्षिण… by Bhakti
मोदी विरोधकांना मस्त खुळखुळा वाजवायला देऊन व्यग्र ठेवतात, म्हणजे ते महत्त्वाच्या कामात व्यत्यय आणणार नाही. जलमुरी काय, टोनिंग काय . . . विरोधक कायम जाळ्यात अडकतात.
कन्फर्मेशन बायस
In reply to मोदी विरोधकांना मस्त खुळखुळा… by श्रीगुरुजी
>> मोदी विरोधकांना मस्त खुळखुळा वाजवायला देऊन व्यग्र ठेवतात, म्हणजे ते महत्त्वाच्या कामात व्यत्यय आणणार नाही.
विरोधकांनी त्यांच्या महिला विधेयक म्हणून आणलेल्या डिलिमिटेशन विधेयकाला यशस्वी विरोध करुन काम''त्यांचे महत्त्वाचे काम' हाणून पाडले आहे.
>> जलमुरी काय, टोनिंग काय
त्यांचा जाईल तिथे तिथली वेशभूषा करून लोकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न आजपर्यंत शेकडो वेळा दिसलेला आहे. तशाच प्रकारे इथेही त्वचेचा रंग बदलणे सहज केले असेल.
यात तुंम्हाला त्यांचे महत्त्वाचे काम यशस्वीपणे चालू आहे असे वाटते किंवा रंग बदलण्याच्या चलाखीत काहीच खटकत नाही. यालाच कन्फर्मेशन बायसचा सापळा असे म्हणतात. यात माणूस कोणतीही नवीन माहिती मिळाली तरी आपले पूर्वीचे मत कदापि बदलू शकत नाही. उद्या खुद्द मोदी जरी माझे चुकले म्हणाले, तरी तुंम्ही ते कदापि मान्य करणार नाही याची खात्री आहे. असे समर्थक हीच त्यांच्या पक्षाची खरी ताकद आहे.
महिला विधेयक लोकसभेत पराभूत…
In reply to कन्फर्मेशन बायस by स्वधर्म
महिला विधेयक लोकसभेत पराभूत होणे हेच भाजपचे महत्त्वाचे काम होते व ते यशस्वी पार पडले.
ज्या राज्यात जाणार तेथील वेशभूषा करणे हे सर्वच राष्ट्रीय नेते करतात. इंदिरा गांधींनी महाराष्ट्रात सभेत नऊवारी साडी नेसली होती, एक महान नेता हमालाचा लाल डगला घालून मिरवत होता, डोक्यावर जाळीदार टोपी घालणारे तर पैशाला पासरी सापडतील, हिमाचल प्रदेशात गेले की सर्वपक्षीय नेते तेथील टोपी घालतात . . . पण मोदींनी केले तर चूक आणि इतरांनी केले तर बरोबर.
ताई, त्या दुकानाला आधी रंग…
In reply to मी मागच्या महिन्यात दक्षिण… by Bhakti
ताई, त्या दुकानाला आधी रंग मारण्यात आला, मग बरण्या स्वच्छ पुसून खचाखच माल भरण्यात आला मग त्यांनी विज़िट केली. :)
आणी दुकानदार बिहारी आहे , बिहारात भाजप आणी नितीश सरकारने केलेल्या प्रचंड विकास सहन झाला अनाही म्हणून ममताच्या राज्यात पोट भरायला आहे. :)
??
In reply to मी मागच्या महिन्यात दक्षिण… by Bhakti
ते जलमूरीचे दुकानातला माल-बरण्या पाकिट मात्र खचाखचं भरले होते. जसे काय आजच दुकानाची ओपनिंग आहे.
इतर वेळेस किती माल भरलेला असतो याविषयी तुम्हाला माहिती आहे का? त्या दुकानदाराने तो माल कधी भरला होता- समजा आठवड्यातून दोनदा तो माल तसा भारत असेल तर तो त्या दिवशीच कशावरून भरला नसेल? जर पंतप्रधानांचा रोड शो/सभा किंवा जे काही असेल ते झारग्राममध्ये असेल तर भरपूर गर्दी होणार हे अपेक्षित होतेच. अशावेळेस आपल्याला बिझनेस करायला चांगला दिवस आहे हे कोणाही सामान्य माणसाला समजून घ्यायला काहीही अडचण येऊ नये. त्यामुळे त्याने त्या दिवशीची तयारी म्हणून कशावरून माल भरून ठेवला नसेल?
पण कसं असतं एकदा द्वेषाचा चष्मा लावला की मग सगळ्या गोष्टी काळ्याच दिसायला लागतात.
झोपलेल्यांना जाग करता येतं…
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
झोपलेल्यांना जाग करता येतं,पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना नाही....
झोपेचे सोंग
In reply to झोपलेल्यांना जाग करता येतं… by Bhakti
कोण झोपलंय आणि कोण झोपेचं सोंग घेत आहे हे सोडा हो.
वर त्या झालमुरीवाल्याकडे सगळ्या भरलेल्या बाटल्या कशा आल्या- जसे काही त्याच्या दुकानाचे ओपनिंग होते अशी काहीशी टिप्पणी तुम्ही केली आहे. त्यावर काही पॉईंटेड प्रश्न विचारले आहेत. त्याविषयी काय? उगीच आपल्या मताच्या नसलेल्याला झोपेचे सोंग वगैरे म्हणत आहात त्यावरून तुमच्याकडे त्याविषयी लिहिण्यासारखे काहीही नाही आणि मोदी त्या दुकानात गेले म्हणून उगीच त्या झालमुरीमाल्यावर तुम्ही टिप्पणी करत आहात यापेक्षा दुसरे कोणते अनुमान काढायचे?
उगीच आपल्या मताच्या…
In reply to झोपेचे सोंग by चंद्रसूर्यकुमार
उगीच आपल्या मताच्या नसलेल्याला झोपेचे सोंग वगैरे म्हणत आहात
मी माझ निरिक्षण ,मत बिरुटे सर यांच्या प्रदिसादाला दिले होते..तुम्हाला आमंत्रण दिले नव्हते.
<<<<पण कसं असतं एकदा द्वेषाचा चष्मा लावला की मग सगळ्या गोष्टी काळ्याच दिसायला लागतात.>>>>
मी स्किन टोन मुद्दाम तसा केला नाही हे हि म्हट्ल आहे....फॅKट धरुन
आणि झालमुरीत काही तरी काळबेर,ठरवुन केल्यागत वाट्तय अशी शंकाही घेउ नये असे सुचवत ,
तुम्ही कोणाला द्वेषी म्हणताय??
सध्या राजकारणाकडे भावनिक होत पाहणारे..कोणत ना कोणत सतत, ढोंग,सोंग पांघणारे असतात.
तुम्ही इकडचे नाही तर तिकडचे तरी पाहिजे....नाहीतर तुम्हि ट्रोल होणार.सामान्य नागरिक राहुच नका?
बोंबला
In reply to उगीच आपल्या मताच्या… by Bhakti
मी माझ निरिक्षण ,मत बिरुटे सर यांच्या प्रदिसादाला दिले होते..तुम्हाला आमंत्रण दिले नव्हते.
बोंबला. माझ्या प्रतिसादाला उत्तर म्हणून ते लिहिले आहे हे वर दिसत आहे तरी ते इतर कोणाला दिले होते असे समजायचे? कमाल आहे. तरी असे समजू की तो प्रतिसाद चुकून माझ्या प्रतिसादाला उत्तर म्हणून पडला.
तुम्ही इकडचे नाही तर तिकडचे तरी पाहिजे....नाहीतर तुम्हि ट्रोल होणार.सामान्य नागरिक राहुच नका?
तसे असेल तर मग सामान्य नागरीक म्हणूनच राहावे. तुम्हीच वर म्हटले आहे त्यावरून असे वाटते की तुम्हाला तो प्रतिसाद बिरूटे मास्तरना द्यायचा होता पण चुकून माझ्या प्रतिसादाला उत्तर म्हणून आला. म्हणजे तुम्ही बिरूटे मास्तरसारख्या नोन मोरू माणसाच्या हो ला हो करणार असाल तर मग दुसऱ्या बाजूकडून ट्रोल होणार याचीही तयारी ठेवावी. मग उगीच सामान्य नागरीक म्हणून राहूच नये का वगैरे बोलून अर्थ नाही.
हे राम!!
In reply to बोंबला by चंद्रसूर्यकुमार
यात कुठे हो ला हो दिसत आहे ???
उगाच काहीही बरळु नका!!
आणि हो आहेच मी सामान्य नागरिक....ना इकडची ना तिकडची!!!
ऑ?
In reply to हे राम!! by Bhakti
असे कसे चालेल?
तुमचा झोपलेल्यांना जागं करता येतं..... हा प्रतिसाद इथे आहे- २३ एप्रिलला रात्री १० वाजता. समजा तो प्रतिसाद बिरूटे मास्तरांना असला तरी झोपलेल्यांना जागं करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्यांना नाही याचा अर्थ एखाद्या गोष्टीविषयी काही विरूध्द लिहिण्यासाठी किंवा काही विरूध्द लिहिलेल्याच्या हो मध्ये हो मिसळविण्यासाठीच असतो- निदान रूढ मराठीत तरी.
बिरूटे मास्तरांचा वर दिलेला तो प्रतिसाद २३ एप्रिलला सकाळी ७.५२ ला आणि त्यावर तुमचे ते दक्षिण भारतात गेल्यानंतरच्या अनुभवाचे उत्तर आहे २३ एप्रिलला दुपारी १२.१३ वाजता.
दुपारी १२.१३ वाजता तो प्रतिसाद दिल्यानंतर जवळपास १० तासांनी मला उत्तर म्हणून दिलेला प्रतिसाद- तो पण झोपलेल्यांना जागं करता येतं अशा स्वरूपाचा बिरूटे मास्तरांसाठी होता हे इतरांनी समजून घ्यायचे. समजा घेतले. तरी मग बिरूटे मास्तरांच्या काळं तोंड या शीर्षकाचा आणि कोणीतरी आवरा रे.. असे लिहिलेला (म्हणजे मोदींच्या विरोधातील) प्रतिसादाला तो झोपलेल्यांना जागं करता येतं... वाला म्हणजे निदान रूढ मराठी भाषेतील अर्थाप्रमाणे तरी सहमती दर्शविणारा प्रतिसाद तसा नव्हताच तर एकदम तटस्थ होता हे पण इतरांनी समजून घ्यायचे. मुळातील मुद्दल समजा समजून घेता येईल पण त्यावर चढलेले हे व्याज कुठून समजून घ्यायचे आणि कसे?
उगाच काहीही बरळु नका!!
अगदी असेच म्हणतो.
??चंद्रसूर्यकुमारगुरुवार, 23…
In reply to ऑ? by चंद्रसूर्यकुमार
??
In reply to मी मागच्या महिन्यात दक्षिण… by Bhakti
ते जलमूरीचे दुकानातला माल-बरण्या पाकिट मात्र खचाखचं भरले होते. जसे काय आजच दुकानाची ओपनिंग आहे.
इतर वेळेस किती माल भरलेला असतो याविषयी तुम्हाला माहिती आहे का? त्या दुकानदाराने तो माल कधी भरला होता- समजा आठवड्यातून दोनदा तो माल तसा भारत असेल तर तो त्या दिवशीच कशावरून भरला नसेल? जर पंतप्रधानांचा रोड शो/सभा किंवा जे काही असेल ते झारग्राममध्ये असेल तर भरपूर गर्दी होणार हे अपेक्षित होतेच. अशावेळेस आपल्याला बिझनेस करायला चांगला दिवस आहे हे कोणाही सामान्य माणसाला समजून घ्यायला काहीही अडचण येऊ नये. त्यामुळे त्याने त्या दिवशीची तयारी म्हणून कशावरून माल भरून ठेवला नसेल?
पण कसं असतं एकदा द्वेषाचा चष्मा लावला की मग सगळ्या गोष्टी काळ्याच दिसायला लागतात.
हा प्रतिसाद तुम्हि कोणाला दिला??
त्यावरच तुमचा झोपलेल्यांना जागं करता येतं हा प्रदिसाद आहे. आणि नंतरचा पण
उगीच आपल्या मताच्या…
In reply to झोपेचे सोंग by चंद्रसूर्यकुमार
उगीच आपल्या मताच्या नसलेल्याला झोपेचे सोंग वगैरे म्हणत आहात
मी माझ निरिक्षण ,मत बिरुटे सर यांच्या प्रदिसादाला दिले होते..तुम्हाला आमंत्रण दिले नव्हते.
<<<<पण कसं असतं एकदा द्वेषाचा चष्मा लावला की मग सगळ्या गोष्टी काळ्याच दिसायला लागतात.>>>>
मी स्किन टोन मुद्दाम तसा केला नाही हे हि म्हट्ल आहे....फॅKट धरुन
आणि झालमुरीत काही तरी काळबेर,ठरवुन केल्यागत वाट्तय अशी शंकाही घेउ नये असे सुचवत ,
तुम्ही कोणाला द्वेषी म्हणताय??
सध्या राजकारणाकडे भावनिक होत पाहणारे..कोणत ना कोणत सतत, ढोंग,सोंग पांघणारे असतात.
तुम्ही इकडचे नाही तर तिकडचे तरी पाहिजे....नाहीतर तुम्हि ट्रोल होणार.सामान्य नागरिक राहुच नका?
आणि हा पण
हे राम!!
In reply to बोंबला by चंद्रसूर्यकुमार
यात कुठे हो ला हो दिसत आहे ???
उगाच काहीही बरळु नका!!
आणि हो आहेच मी सामान्य नागरिक....ना इकडची ना तिकडची!!!
शांतपणे अभ्यास करा..
जलमूरीचे दुकानातला माल…
जलमूरीचे दुकानातला माल-बरण्या पाकिट मात्र खचाखचं भरले होते. जसे काय आजच दुकानाची ओपनिंग आहे.
नौटँकीची काय लिमिट राहिली नाही.
विक्रांत जहाजा वरची एक कहाणी आठवते आहे.
श्रीमती इंदिरा गांधी (पंतप्रधान असताना) येणार म्हणून नौसैनिकांबरोबर "बडा खाना" आयोजित केला होता.
तो चालला असताना एक आगाऊ नौसैनिक श्रीमती गांधी याना म्हणाला मॅडम आज आप आ रही है इस लिये ऐसा खान बनाया है रोज ऐसा खाना नही होता है!
हे ऐकून वातावरण थोडेसे तंग झाले. पण श्रीमती इंदिरा गांधी त्याला म्हणाल्या बेटे आपके घर कोई मेहमान आते है तो उनके लिये कुछ अच्छा खास खाना बनता है कि नही? या आप उसे भी दाल चावल हि खिला देते हो?
सर्व नौसैनिक हसले आणि वातावरण एकदम बदलले.
आता प्रत्यक्ष पंतप्रधान तेथे येणार म्हटल्यावर एखादा सामान्य माणूस सुद्धा आपली घर किंवा दुकान स्वच्छ करून रंग रंगोटी करेल सर्व सामान भरून ठेवेल कि नाही?
त्यात नौटंकी दिसण्यासारखे काय आहे?
एकदा द्वेष मनात भरला कि चांगल्या रंगाच्या ऐवजी काळाच रंग दिसू लागतो हे खरं.
बाकी चालू द्या
म्हणजे पंतप्रधान येणार…
In reply to जलमूरीचे दुकानातला माल… by सुबोध खरे
म्हणजे पंतप्रधान येणार म्हणून ही साफसफाई, बरण्या भरणे वगैरे केले गेले हे मान्य ना? म्हणजे पंतप्रधान रँडमली त्या दुकानात गेले नाहीत, सर्व काही प्लॅन होते. :) ह्याला नौटंकी म्हणू नये फक्त असेच ना?
खेला होबे...
In reply to म्हणजे पंतप्रधान येणार… by अमरेंद्र बाहुबली
महागडे मश्रुम खाणा-याला १० रुपयाचे झालमुडी खायला लावली तिचं नाव ममता बॅनर्जी आहे म्हणे... ;)
-दिलीप बिरुटे
खिक्क! बंगाली वाघिणीने…
In reply to खेला होबे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खिक्क! बंगाली वाघिणीने झालमुरी खायला लावली. कुणे एकेकाळी म्हणे इंदिरा गांधीनी एवढे चोपले होते जनसंघीना की जंगलात लपून गवत खात होते. :)
बाकी तामिळनाडूत डार्क स्किन व्हावी म्हणून काय खाल्ले असावे? :)
पण कसं असतं एकदा द्वेषाचा…
बाकी मोदी रागा वगैरे चालू द्या, पण कृपा करून काळ्या रंगाला नावे ठेवू नका. काळा रंग माझा अतिशय आवडता आहे, माझे वंदनीय श्री शनि महाराज यांचाही आवडता आहे, dark mode हाही सध्या मोबाईल व डेस्कटॉप वर लोकप्रिय आहे. जगभरातले अनेक ब्रँड्स, उदा रोल्स राईस पासून ते रॉयल एनफिल्ड पर्यंत अनेकांचा आवडता आहे. त्यामुळे काळा रंग वाईट आहे असा अर्थ निघेल असे काही विधान करू नका.
अवांतर: मिसळ पाव वर "भुजबळांच्या नादी काय लागता?" असं अनेकदा वाचायला मिळालं आहे.
मोदी विरोधकांना मस्त खुळखुळा…
मोदी विरोधकांना मस्त खुळखुळा वाजवायला देऊन व्यग्र ठेवतात,>>>>
सहमत, जलमूरी खाण्यावर टीका करणारे बरेच व्हिडीओ दिसलें. मोदी म्हणाले ते बरोबरच आहे "जलमूरी मैने खाई लेकिन झाल TMC को लगी है।"मोदींना माहिती नसेल पण कारण नसतान आग तर महाराष्ट्त पण लागली आहे.
(No subject)
काही जण हमालाचा लाल डगला…
काही जण हमालाचा लाल डगला चढवून चाके असलेली रिकामी बॅग डोक्यावर घेऊन फोटो काढून घेतात, काही जण मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन जाळीदार टोपी परिधान करतात, काही जणी महाराष्ट्रात आल्या की नऊवारी नेसून सभा घेतात, काही जण महाराष्ट्रात मुस्लिम समुदायासमोर हिंदीत बोलतात . . . तसेच काही जण दुकानात जाऊन झालमुरी खातात.
पण झालमुरी खाणारे नाटकी आणि इतर सर्वजण प्रामाणिक असतात बरं का.
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात
In reply to काही जण हमालाचा लाल डगला… by श्रीगुरुजी
मोदींनी अनेक वर्षे संघाचे स्वयंसेवक म्हणून काम केले होते. निदान त्यावेळी तरी म्हणजे ४०+ वर्षांपूर्वी असे स्वयंसेवक रेल्वेच्या दुसऱ्या श्रेणीने किंवा लाल डब्बा एस.टीने अशा साध्या वाहनांनी प्रवास करायचे, साध्या साध्या ठिकाणी राहायचे आणि मिळेल ते खाऊन आपल्या कामाला मार्गस्थ व्हायचे. असे मोदींनी अनेक वर्षे केले होते. स्वत:चा वाढदिवस चार्टर्ड विमानात साजरा करणे किंवा आपल्या आवडता सिगरेटचा ब्रॅंड मिळाला नाही म्हणून भोपाळहून इंदूरला विमान पाठविणे अशा प्रकारचे उद्योग करणे परवडेल अशा श्रीमंत घरात जन्माला आले नव्हते. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करताना मोदींनी अशा लहानसहान टपऱ्यांमधून अनेकदा काही खाऊन आपले पोट भरले असेल याची कल्पना करता येते. मोदींनी स्वत: पूर्वी कधी झालमुरी खाल्ली होती की नाही याची कल्पना नाही- पण तशाप्रकारच्या टपऱ्यांमधून/लहान दुकानांमधून नक्कीच काहीतरी खाल्ले असणार असे म्हणायला जागा आहे. आता मोठ्या पदावर गेल्यावरही त्यांच्या मनात कुठेतरी ती जुनी आठवण असेलच. तो मानवी स्वभाव झाला. मोठ्या पदावर गेलेल्या लोकांच्या मनात 'त्या माजघरातिल मंद दिव्याची वात' तेवत असतेच. त्या जुन्या आठवणी ताज्या करायला समजा मोदींनी झालमुरी खाल्ली तर या लोकांना इतकी मिरची लागायचे कारण समजत नाही. अगदी त्याच दुकानात किंवा तोच पदार्थ कदाचित मोदींनी पूर्वी खाल्ला नसेल पण तशाप्रकारच्या वातावरणात त्यांनी पूर्वी काही खाले असेल ही शक्यता खूप जास्त आहे. जॉर्ज फर्नांडिस कामगार नेते असताना मुंबईत बनमस्का खायचे. मंत्री झाल्यावर ते पहिल्यांदा मुंबईत आल्यावर ती जुनी आठवण ताजी करायला त्याच दुकानात बनमस्का खायला गेले होते. यात इतका आक्षेप घेण्यासारखे काय आहे समजत नाही. तो मोठ्या लोकांचा मानवी चेहरा दाखविते.
ढोंगीपणा कोणता? अशाप्रकारचे कधीही काहीही केलेले नसतानाही उगीच चाकं असलेल्या बॅगा उचलायला जाणे, दुचाकी दुरूस्त करायला जाणे वगैरे. असो.
मोदी १९८८ साली अमेरिका फिरून…
In reply to त्या माजघरातिल मंद दिव्याची वात by चंद्रसूर्यकुमार
मोदी १९८८ साली अमेरिका फिरून आले, त्या काळात चहा विकणे, भिक्षा मागून खाणे असे जगणारा मनुष्य अमेरिका फिरण्या एवढा श्रीमंत असायचा का?
ज्या काळात ८ वी पास झालेल्या माणसाला नोकरी मिळायची त्या काळात मोदीना चहा विकावी लागली, त्यांचा सख्खा भाऊ बोलला की मोदीनी कधीही चहा विकला नाही. जो माणूस अमेरिका फिरून आला तो माणूस झालमुरी खाऊन दिवस ढकलत होता हे काही पटत नाही. तसेच चहा विकली हे देखील खोटे असल्याचे त्यांच्या भावनेव्ह सांगितले अस सगळ विरोधाभासी दिसत असल्याने ह्या झालमुरी खायच्या प्रकाराला लोक नौटंकी म्हणत असावेत का?
??
In reply to मोदी १९८८ साली अमेरिका फिरून… by अमरेंद्र बाहुबली
मोदी अमेरिकेला स्वातंत्र्यदेवीचा पुतळा, नायगारा धबधबा, डिस्ने लॅंड वगैरे बघायच्या उद्देशाने गेले होते असे वाटते आहे का?सगळे राजकीय पक्ष अमेरिकेतील भारतीयांशी संवाद साधायला म्हणून शिष्टमंडळे पाठवत असतात. त्याचा भाग म्हणून मोदी तिथे गेले होते ना? न्यू जर्सी भागात गुजराती लोकांची संख्या लक्षणीय आहे. अमेरिकेत मोटेल्स मोठ्या प्रमाणावर गुजराती लोकांच्या मालकीची आहेत. मुंबईत अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये गुजरातीमधूनही अनाऊंसमेंट होत असल्याचे मी स्वत: बघितले आहे- त्याला बरीच वर्षे झाली. आताची परिस्थिती माहित नाही. तेव्हा तिकडच्या गुजराती लोकांशी संवाद साधायला म्हणून गुजराती माणूस तिथे पक्षाने पाठवला तर त्यात आश्चर्य काय?
आणि अमेरिकेत जाणारे सगळे लोक गडगंज श्रीमंत असतात? त्या न्यायाने डॉ.आंबेडकर एकदम धनाड्य कुटुंबातील होते असे म्हणायला हवे. काही दिवस तिथल्या लोकांशी संवाद साधायला अमेरिकेला पक्षाने पाठविले याचा अर्थ मोदी एकदम गडगंज श्रीमंत होते? वा वा.
काही वर्षांपूर्वी पवारांनी…
In reply to काही जण हमालाचा लाल डगला… by श्रीगुरुजी
काही वर्षांपूर्वी पवारांनी एका सभेत "मागासवर्गीयांच्या हक्काची सनद" या नावाने काहीतरी प्रसिद्ध केले होते. त्याप्रसंगी ते फुल्यांच्या वेशभूषेत म्हणजे धोतर, उघड्या अंगावर कांबळे, डोक्यावर फुले पागोटे असा पेहराव करून व्यासपीठावर आले होते. पवार आडनावाच्या ६-७ मागासवर्गीयांना त्यांनी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा इ. ठिकाणी संधी देऊन मागासवर्गीयांशी असलेली आपली बांधिलकी सिद्ध केली आहे.
ते सगळे जाऊ दे.
व्ख्या विख्खि वुखू
ते झाडुवाले मुख्यमंत्री (माजी), दिल्ली उच्च न्यायालयात झाडुची तोफ करुन सन्माननीय न्यायमुर्तींनाच झाडुन काढ्ले, आवडले आपल्याला, इश्वरचरणी हिच प्रार्थना कि संबधित न्यायमुर्तींच्या घरी आग लागु नये
शांतता क्षेत्रांमध्ये मोफत रेशन
एक निर्णय आठवला,
अरुण जेटली संरक्षण मंत्री असताना खालील प्रमाणे निर्णय घेतला
शांतता क्षेत्रांमध्ये मोफत रेशन: एक अत्यंत वादग्रस्त पाऊल म्हणजे, अशांतता नसलेल्या (non-operational) किंवा शांतता क्षेत्रांमध्ये (peace locations) तैनात असलेल्या अधिकाऱ्यांसाठी 'वस्तू स्वरूपातील रेशन' (मोफत रेशन) देणे थांबवण्याचा निर्णय. या निर्णयाची जागा 'रेशन भत्ता' (अंदाजे ₹९६ प्रतिदिन) या सुविधेने घेतली; ही रक्कम थेट संबंधित अधिकाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात असे.
टीप: या निर्णयाचा नंतर माजी सैनिकांनी तीव्र निषेध केला होता आणि त्यानंतरच्या संरक्षण मंत्र्यांनी (निर्मला सीतारामन) २०१८-२०१९ मध्ये ही सुविधा पुन्हा पूर्ववत केली.
हा निर्णय फक्त न फक्त संरक्षण दलातील अधिकाऱ्यांसाठी होता जवान जे सी ओ यांच्यासाठी नव्हता
सार काय सगळे अधिकारी काहि या निर्णयाने खुश नव्हते.
मिपावरील संरक्षण दलातील यावर प्रकाश टाकतील का ??
नरक
ट्रंम्प ने भारत को कहां नरक
भारत को नही पड़ता फरक
नंतर.
भारत महान आहे, भारत मैत्री वगैरे.
-दिलीप बिरुटे
ट्रंपच्या डोक्यावर परिणाम…
In reply to नरक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट्रंपच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तो जगभर हास्याचा विषय झालाय व त्याला कोणीही गांभीर्याने घेत नाही. अपवाद केवळ भारतातील मोदीद्वेष्ट्यांचा. ट्रंपच्या बरळण्याने भारताची जगभर अपकीर्ति होईल व त्यातून भारतात मोदींविरोधात वातावरण निर्माण होईल या भाबड्या आशेवर ते आहेत. आपला नेता नाकर्ता ठरलाय, मोदींसमोर तो टिकला नाही व त्यामुळे निदान ट्रंपच्या माध्यमातून तरी मोदींना हरवता येईल हे स्वप्नरंजन सुरू आहे.
जगभर पसरत चाललेला आजार...
In reply to ट्रंपच्या डोक्यावर परिणाम… by श्रीगुरुजी
आत्ममग्नतेचा आजार फक्त ट्रम्प किंवा मोदींपुरता मर्यादित नाही. तुर्कीचे एर्दोगान, रशियाचे पुतिन किंवा हंगेरीचे व्हिक्टर ऑर्बन यांच्याकडे पाहिले तर 'पॉप्युलिझम' ही एक जागतिक लाट असल्याचे लक्षात येते. यात नेता थेट जनतेशी संवाद साधतो आणि लोक वेडे होतात. भावनिक आवाहन, टोकाचा राष्ट्रवाद यात जनतेचं नुकसान होतं पण मंद लोकांना दुर्दैवाने ते कळत नाही.
-दिलीप बिरुटे
मोदींविरोधात आणि भारतविरोधात…
In reply to जगभर पसरत चाललेला आजार... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोदींविरोधात आणि भारतविरोधात जे जे बरळतात ते ते दुर्दैवाने मंदबुद्धी लोकांना खरे वाटते.
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष,…
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान अमेरिका इराण युद्धात मध्यस्थी करताहेत नी आपले पंतप्रधान झालमुरी खाणे, निवडणुकीसाठी स्किन टोन चेंज करणे असे प्रकार करताहेत. कुठे नेऊन ठेवला देश माझा? खो खो खो.
पंतप्रधानांचे प्रमुख काम…
In reply to पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष,… by अमरेंद्र बाहुबली
पंतप्रधानांचे प्रमुख काम आपल्या देशाचा कारभार पाहणे हा आहे, दुसऱ्यांच्या फाटलेल्यात पाय घालणे हा नाही. त्यामुळे कोबी इराण अमेरिकेच्या भानगडीत न पडता बंगाल प्रदेश, सिक्कीम इत्यादी ठिकाणी फिरत आहेत हि चांगली गोष्ट आहे.
पाकिस्तानी मध्यस्तीने नक्की काय साध्य झाले आहे आणि त्यामुळे पाकिस्तानी जनतेचा काय फायदा झाला आहे ?
भुजबळांच्या नादी काय लागता…
भुजबळांच्या नादी काय लागता?
माझा प्रतिसाद बिरुटे मास्तरां साठी होता.
भुजबळ याचा संबंध नाही
आता पंतप्रधान रँडमली त्या दुकानात गेले नाहीत, सर्व काही प्लॅन होते. हा त्यांचा प्रतिसाद पहा.
ज्याला Z + च्या वर सुरक्षा दिलेली आहे असा पंतप्रधान रॅन्डमली कुठेही जात नाही. इतकी मूलभूत माहिती न घेता रॅन्डमली प्रतिसाद टंकत असतात त्याला काय आणि कशासाठी उत्तर देणार>
श्री मोदी अगदी वाकडी वाट करून नवाझ शरीफ याना भेटायला गेले तेंव्हा सुद्धा त्यांच्या सुरक्षेची जय्य्त तयारी झाल्याशिवाय त्यांनी पाकिस्तानात पाऊल ठेवले नव्हते.
जाऊ द्या...
In reply to भुजबळांच्या नादी काय लागता… by सुबोध खरे
' झारमूली' चा व्हीडीयो पाहिला का नाही. हसून हसून पुरेवाट होती. या पेक्षा सुंदर मनोरंजन असू शकत नाही देशासाठी. =))
मी इंजॉय केलं झारमुरी.... =))
-दिलीप बिरुटे
आता राहुल गांधींनी डोसा…
In reply to जाऊ द्या... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता राहुल गांधींनी डोसा बनवला तो पण एन्जॉय करा.
https://youtube.com/shorts/rWRomeXrmco?si=hFYkUlqO39ifG1ms
Yesss.....
In reply to आता राहुल गांधींनी डोसा… by प्रचेतस
इंजॉय करायचं.
-दिलीप बिरुटे
+११११
In reply to Yesss..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इंजॉय करायचं.
एंजॉय? खरं की काय? बऱ्याच…
In reply to जाऊ द्या... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एंजॉय? खरं की काय? बऱ्याच जणांना तर मिरची लागलेली दिसते.
आपले प्रधानमंत्री बिना सूचना…
In reply to भुजबळांच्या नादी काय लागता… by सुबोध खरे
आपले प्रधानमंत्री बिना सूचना, असे नेहमीच वागतात. त्यांना जनतेपासून भीती वाटत नाही. अर्थात एसपीजीसाठी ही डोकेदुखी असते. मी एसपीजीत प्रतिनियूक्तीवर काही काळ राहिलो आहे. बाकी सुरक्षा अधिकारांचे काम राजाची सुरक्षा करणे असते . राजाने कधी कसे वागावे हा सल्ला देण्याची शक्ती नसते.
इकडे हे मोरू लोक्स उष्टी…
इकडे हे मोरू लोक्स उष्टी झालमुरी चघळत आहेत आणि तिकडे मात्र मोदी बंगाल पादाक्रांत करून सर्व बंगाल्यांना मोगू करण्याकडे वेगाने वाटचाल करत आहेत!
चुना आयोगाला दणका दिल्यामुळे…
In reply to इकडे हे मोरू लोक्स उष्टी… by कांदा लिंबू
चुना आयोगाला दणका दिल्यामुळे तिथे प्रामाणिकपणे काम करावे लागणार आहे, चुना आयोगाची मदत मिळू शकणार नसल्याने नी इडी भाजप पक्षभरती करण्यास अपयशी ठरल्यामुळे भाजप जिंकेलच ह्याची शाश्वती नाही. :)
धाग्याचे नाव बदलुन "मोदी…
धाग्याचे नाव बदलुन "मोदी घडामोडी"" किंवा "मोदी चहाडी" ठेवावे असे सुचवुन गप्प बसतो.
"मोदीळ" ह्या नावाचाहि विचार…
In reply to धाग्याचे नाव बदलुन "मोदी… by सुक्या
"मोदीळ" ह्या नावाचाहि विचार व्हावा हे टंकून मी ह्या धाग्या वरून रजा घेतो. 🙏
महिला राखीव जागा व मतदारसंघ…
महिला राखीव जागा व मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत अमान्य झाल्याने मनोमन सुखावलेल्या परंतु महिलांवर अन्याय झाला असा मानभावी वरकरणी कांगावा करण्यासाठी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून नागरिकांची अतिशय अडचण केली होती. त्यावर एका महिलेने संतप्त दुर्गावतार धारण करून अत्यंत कडक शब्दात गिरीश महाजनांना धारेवर धरून निरूत्तर केले. जनतेला छळणारे मोर्चे, मिरवणुका, सार्वजनिक उत्सव, फटाके, जयंती उ्सव हे सर्व प्रकार कायमस्वरूपी बंद व्हायला हवे.
महिलांवर अन्याय झाला असा…
In reply to महिला राखीव जागा व मतदारसंघ… by श्रीगुरुजी
महिलांवर अन्याय झाला असा मानभावी वरकरणी कांगावा करण्यासाठी
>>>$
भाजपे असतातच ढोंगी!
'आप'घात
आआपच्या राज्यसभेतील १० सदस्यांपैकी ७ जणांनी भाजपत प्रवेश केलाय. त्यात बहुचर्चित राघव चढ्ढा, क्रिके खेळाडू हरजनह सिंह, केजरीवालांच्या वैक्तिक सचिवाने मारहाण केलेल्या स्वाती मालिवाल यांचा समावेश आहे.
बंगालमध्ये पहिल्या फेरीत ९२ टक्क्यांपेक्षा जास्त व तामिळनाडूत ८५ टक्कयांपेक्षा जास्त मतदारांनी मत दिले आहे. २०२१ च्या तुलनेत दोन्ही राज्यात १० टक्क्यांपेक्षा जास्त मते वाढली आहेत.
इराण व अमेरिका यांच्यातील तथाकथित चर्चा होणे अजूनही अनिश्चित आहे. नेहमीप्रमाणेच ट्रंप मनाला येईल ते दावे करीत आहे व वाटेल त्या धमक्या देत आहे, परंतु इराण किंवा जगातील कोणताही देश अमेरिकेला काडीचीही किंमत द्यायला तयार नाही. या युद्धात हात पोळल्याने काही तरी करून युद्धातून सन्मानपूर्वक माघार घ्यावी यासाठी ट्रंपची धडपड सुरू आहे, परंतु स्वतःचा ताठा व मगरूरी कायम आहे. इराण अर्थातच आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अमेरिकेच्या इतिहासात अमेरिकची इतकी नाचक्की कधीही झाली नव्हती.
आपच्या खासदाराना ईडी त्रास…
In reply to 'आप'घात by श्रीगुरुजी
आपच्या खासदाराना ईडी त्रास देत होती, राघव चड्डा ना हटवून क्या खासदाराला संसदेतील समितीचा अध्यक्ष केले गेले होते, त्याच्या घरी दहा दिवसाधीच इडी ने धाड टाकली होती, नाईलाज म्हणून त्याना भाजपात प्रवेश करणे भाग होते नाहीतर इडी ने जगू नसते दिले. भाजप प्रवेशामूळ इडीच्या त्रासापासून आपच्या खासदारान सुटका मिळेल. नमो नमो, भारत माता की जय, मेरा भारत महान!
भारतात हिंदू परीक्षार्थींना…
भारतात हिंदू परीक्षार्थींना जाणवे काढून टाकायला लावले!
https://hindi.opindia.com/news-updates/two-college-staff-suspended-for-… जनेऊ उतरवाने वाले कॉलेज के प्रिंसिपल और स्टाफ हुए सस्पेंड: कर्नाटक में ब्राह्मण छात्र को पेपर देने से रोका था
बातमीची लिंक तर मागच्या वर्षीची आहे असे म्हणू नका; यावर्षीही हाच प्रकार झालाय. यापूर्वी असे प्रकार झालेले आहेत असे लोकांचे म्हणणे आहे.
BTW, कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आहे असेही म्हणू नका; संघप्रणित मोदी सत्तेत येऊन बारा वर्षे झाली आहेत.
बागेश्वर धाम...
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती छ. शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. महाराजांच्या पराक्रमाबद्दल आणि त्यांच्या संघर्षाबद्दल शास्त्रींनी केलेल्या दाव्यांमुळे महाराष्ट्र दुखावला होता.
काल त्यांनी माफ़ी मागितली माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला वगैरे.
दोन हजार चौदा पासून अशा काही बुवा बाबांना फार चांगले दिवस आले, तोंडाला येईल ते बोलू लागले. काही जेलात गेलेत काही वाटेवर आहेत.
सुधरा रे जरा....
-दिलीप बिरुटे
+१ मला वाटते मुद्दाम हे…
In reply to बागेश्वर धाम... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१ मला वाटते मुद्दाम हे बोलायला लावतात असल्या बाबाबुवाना, इतिहासाची मोडतोड करून काही शिवद्वेष्ट्यांना आनंद मिळतो!
२०१४ पासून नव्हे तर १९१४…
२०१४ पासून नव्हे तर १९१४ पासून
पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सुद्धा चांगले सुशिक्षित लोक सुद्धा अशा बुवा महाराजांच्या नादाला कसे काय लागतात हे पाहून आश्चर्य वाटते.
अगदी आचार्य अत्रे यांनी नारायण महाराजांवर लिहिलेला लेख वाचल्यास हे लक्षात येते.
पु ल यांचा गुरुदेव लेख तेच सांगतो - बेंबट्या, कुंभार हो या जगात गाढवांस तोटा नाही
ही बाबाबुवा मंडळी मला आजीबात…
In reply to २०१४ पासून नव्हे तर १९१४… by सुबोध खरे
ही बाबाबुवा मंडळी मला आजीबात आवडत नाहीत, आजूबाजूला भटकत असतील तर त्याना वास येतो की हा माणूस आपल्याला मानत नाही मग जवळ बोलावून विचारपूस करून काहीतरी दीक्षा देतात, उदा, सोमवारी उपवास करा वगैरे. न मागता सल्ले असे करून भजनी लावायचे प्रयत्न करतात, ह्या बाबाबुवाना मानणारे थोर नि त्यांच्या भजनी लागून त्याना घरात घालणारे किंवा सहकुटुंब त्यांच्या भजनी लागणारे तर फारच थोर म्हनायला हवेत.
१९१४च्याही पूर्वीपासून...अगदी पार पूर्वीपासून...
In reply to २०१४ पासून नव्हे तर १९१४… by सुबोध खरे
१९१४ हे ही फारच उशीराचं होतंय.
हे खरंतर सगळं सगळ्या आचार्यांनी चालू केलं होते आणि लोकं तेव्हापासूनच नादाला लागले होते.
शंकराचार्य, रामानुजाचार्य, माध्वाचार्य, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य, चैतन्य महाप्रभू, सांदिपनी यांच्यापासूनच त्यांच्या त्यांच्या परंपरा किंवा संप्रदाय यांच्या नादी लागणं सुरू आहे लोकांचं.
-(नादी न लागणारा) सोकाजी
सद्य सरकार...
In reply to २०१४ पासून नव्हे तर १९१४… by सुबोध खरे
सद्य सरकार, त्यांचे मंत्री, आमदार, खासदार कायम या भोंदूच्या विळख्यात दिसतात. आपलं हिंदूचं सरकार आहे म्हणून भोंदूना प्रोत्साहन देणे, त्यांची गर्दी, त्यांचे ढोंग, त्यांचे चमत्कार, सगळे गोड मानून घेणे त्यामुळे बाबा-बुवा यांचे प्रस्थ वाढले आणि ते शेफ़ारुन गेले आहेत.
पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचे हे हाल बघवत नाहीत.
-दिलीप बिरुटे
हायला खरं कि काय ?धीरेंद्र…
हायला
खरं कि काय ?
धीरेंद्र ब्रम्हचारी, चंद्रास्वामी इ इतिहासातून पुसले गेले कि स्मरण शक्तीतून?
हे तर थेट पंतप्रधानांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळात होते.
काय बिरुटे मास्तर, इतक्यात विशिष्ट स्मृतिभ्रंश?
+१
In reply to हायला खरं कि काय ?धीरेंद्र… by सुबोध खरे
सत्यसाईबाबांना पण टाका यात.
लवकर बरे व्हा....
In reply to हायला खरं कि काय ?धीरेंद्र… by सुबोध खरे
>>> काय बिरुटे मास्तर, इतक्यात विशिष्ट स्मृतिभ्रंश?
चांगली चर्चा सुरु झाली की तुमचं व्यक्तिगत लिहिणे सुरु होतं, या आजाराला काही उपचार असेल तर उपचार करुन घ्या...
लवकर बरे व्हा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...
-दिलीप बिरुटे
शक्तिशाली प्रधानमंत्री के…
शक्तिशाली प्रधानमंत्री के योग गुरु होने के नाते धीरेंद्र ब्रह्मचारी का ज़बरदस्त राजनीतिक रसूख हुआ करता था और उनसे मिलने के लिए केंद्रीय मंत्रियों, नौकरशाहों और महत्वपूर्ण व्यक्तियों की लाइन लगा करती थी.
वो नीली टोयोटा कार में चला करते थे जिसे वे खुद ड्राइव करते थे. यही नहीं उनके पास कई प्राइवेट जेट थे, जिसमें 4 सीटर सेसना, 19 सीटर डॉर्नियर और मॉल- 5 विमान शामिल थे. इन्हें ब्रह्मचारी खुद उड़ाया करते थे.
उनका राजनीतिक रसूख़ इतना था कि नाराज़ हो जाने पर वो किसी भी नौकरशाह का तबादला करवा सकते थे और मंत्रियों का विभाग तक बदलवा सकते थे.
https://www.bbc.com/hindi/india-64597527
हि तुमच्या आवडत्या बी बी सी…
हि तुमच्या आवडत्या बी बी सी मधील बातमी आहे. पांचजन्य मधली नाही हां!
Chandraswami (born Nemi…
Chandraswami (born Nemi Chand Jain) was a controversial Indian self-styled "godman" and tantric who gained immense political influence in the 1970s and 80s, reportedly acting as a spiritual advisor to Indira Gandhi before influencing P.V. Narasimha Rao. He was famous for organizing massive, high-profile yagnas (rituals), with some reports alleging Indira Gandhi allowed him to perform secret rituals for protection in the late 1970s.
Alleged Tantric Influence: Some reports mention him conducting secret tantric rituals for the protection of Indira Gandhi's son, Sanjay Gandhi, after the Emergency.
Influential Network: Apart from Indira Gandhi, he served as a "spiritual adviser" to various global figures, including the Sultan of Brunei, Margaret Thatcher, arms dealer Adnan Khashoggi, and was controversially linked to underworld figures.
Later Life and Scandals: Chandraswami was later arrested in 1996 for cheating and involved in various investigations, including alleged ties to the Rajiv Gandhi assassination and foreign exchange violations, before passing away in 2017
बिरुटे मास्तर
आपला चष्मा किती काळा आहे हे एकदा चष्मा काढून तरी पहा.
The Congress in submissions…
The Congress in submissions before the Jain Commission in 1997 accused Chandraswami of having financed the assassination of Rajiv Gandhi after playing a key role in the conspiracy jointly hatched by various terrorist outfits in London and executed by the LTTE.
In its report, the Jain Commission dedicated a volume to his alleged involvement. The Enforcement Directorate also investigated his alleged role as financier of the killing
Read more at:
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/chandraswami-the-rise-and-fall-of-a-high-flyer/articleshow/58811428.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
तुमची आवडती इ डी तेंव्हा सुदधा काम करत होती बरं का.
नाही म्हणजे काही वेळेस दुर्लक्ष होतं माणसाचं, म्हणून नजरेस आणून देतो आहे.
ऐकावे ते नवलच Late British…
ऐकावे ते नवलच
Late British premier Margaret Thatcher was also said to have held secret meetings with Chandraswami in London when the Tory leader was in the opposition.
The Iron Lady, who was renowned for her no-nonsense direct approach, conversed with Chandraswami in 1975 in her Commons office.
And the future prime minister was so impressed with his apparent powers that she agreed to his request to wear a special red dress and a battered talisman around her wrist to a second meeting.
There, it is claimed the bearded guru correctly predicted that she would come to power within four years and remain there for more than a decade.
Details of the extraordinary meetings were revealed by former diplomat Natwar Singh, who was present when they took place.
काय बिरुटे मास्तर, इतक्यात…
काय बिरुटे मास्तर, इतक्यात विशिष्ट स्मृतिभ्रंश?
बाकी काही म्हणा डॉक्टर साहेब, पण ही कॉमेंट मला फार आवडली!
हे मोरू लोक्स् खरंच विशिष्ट स्मृतिभ्रंश नामक आजाराने नेहमीच ग्रस्त असतात!
राष्ट्रसेवेचा मुखवटा आणि लाभार्थ्यांची धडपड...
आम आदमी पक्षाचे राघव चढ्ढा आणि इतर मान्यवर भाजपच्या गोदामात काल विराजमान झाले. वेगवेगळ्या पक्षांचे आमदार, खासदार, पक्ष, आपल्या राष्ट्रसेवेसाठी भाजपच्या वळचणीला जात आहेत. दिल्लीच्या मद्य घोटाळ्यात अरविंद केजरीवाल आणि सिसोदीया जेव्हा तुरुंगात होते तेव्हा राघव चड्ढा लंडनला निघून गेले होते तिथून सोशीयल मिडियावर दळन टाकायचे तेव्हाच ही दाळ आप मधे शिजणार नाही, हे लक्षात येतबिरुटे, अर्थात त्यांच्या राज्यसभेतील बोटचेपी भूमिकेमुळेही ते भाजपच्या जाळ्यात चालले आहे, हे लक्षात यायला लागले होते. प्रश्न तो नाही-
सध्या, देशाच्या राजकारणात सध्या सुरू असलेला पक्षांतराचा आणि विलीनीकरणाचा खेळ हा लोकशाहीच्या मूल्यांचा अध:पात दर्शवणारा आहे. 'राष्ट्रसेवा' या नावाखाली ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधींना आपल्याकडे खेचले जात आहे, ते पाहता सद्य सत्ताधारी पक्षाची नैतिकता ( तशी ती होतीच कुठे म्हणा ) रसातळाला चालली आहे, हे स्पष्ट होते. किरकोळ राजकीय तडजोडी करण्यापेक्षा थेट दुसऱ्या पक्षाचा मोठा गट किंवा खासदारच पळवून नेण्यावर सत्ताधाऱ्यांचा कल आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा वापर करून जनतेच्या मतांवर टाकलेला एक प्रकारचा 'राजकीय दरोडा'च आहे. जेव्हा एखादा नेता सत्तेच्या मोहापायी आपली मूळ विचारधारा सोडतो, तेव्हा तो केवळ आपला पक्ष सोडत नाही, तर ज्या मतदारांनी त्याच्यावर विश्वास टाकला होता, त्या मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत असतो.
आम आदमी पक्षासारख्या पर्यायी राजकारणाची कास धरणाऱ्या पक्षाचे खासदार जेव्हा भाजपात विलीन होतात, तेव्हा तो केवळ एका संघटनेचा पराभव नसून तो सामान्य माणसाच्या आशेचा पराभव ठरतो. मतदारांनी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जाऊन ज्यांना निवडून दिले, तेच प्रतिनिधी जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या दबावापुढे झुकतात, तेव्हा लोकशाहीतील 'निवड' करण्याच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहते. हा पराभव पक्षांचा किंवा नेत्यांचा नसून तो त्या सर्वसामान्य नागरिकांचा पराभव आहे, ज्यांनी आपला अमूल्य वेळ आणि विश्वास एका विशिष्ट विचारधारेला दिला होता. अशा फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनतेमध्ये व्यवस्थेबद्दल कमालीची अनास्था निर्माण होत आहे, तिचा विस्फोट होतो पण वेळ लागतो, हा सर्व प्रवास भविष्यातील लोकशाहीच्या अस्तित्वासाठी एक धोक्याची घंटा आहे.
बजाव थाली.
-दिलीप बिरुटे
सत्ताधारी पक्षाने लालूच…
In reply to राष्ट्रसेवेचा मुखवटा आणि लाभार्थ्यांची धडपड... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सत्ताधारी पक्षाने लालूच दाखवून किंवा दमदाटी करून विरोधी पक्ष फोडणे अत्यंत जुनी व उच्च परंपरा कॉंग्रेसने सुरू केली.
आणिबाणीत जनसंघातून कॉंग्रेसमध्ये गेलेले माधवराव सिंधिया, १९८० मध्ये हरयाणातील जनता पक्षाचे संपूर्ण मंत्रीमंडळ कॉंग्रेसमध्ये नेणारे भजनलाल, संपूर्ण समाजवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसमध्ये नेणारे शरद पवार, १९९३ मध्ये अविश्वास ठरावाविरूद्ध पाठिंबा मिळविण्यासाठी अजितसिंह व जनता दलाचे इतर ६ खासदार फोडून कॉंग्रेसमध्ये आणणारे नरसिंह राव, १९९१ मध्ये शिवसेनेचे ५२ पैकी १८ आमदार फोडून कॉंग्रेसमध्ये आणणारे सुधाकर नाईक . . .
हीच उच्च परंपरा भाजप चालवितोय.
लाभार्थ्यांची परंपरा...
In reply to सत्ताधारी पक्षाने लालूच… by श्रीगुरुजी
>>>>> हीच उच्च परंपरा भाजप चालवितोय.
भाजपा वेगळा वगैरे पक्ष आहे, असे वाटायचे पण तसं काही कारण नाही, हे तसं लक्षात येत चालले आहे जनतेच्या.
तो प्रश्न नाही. लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भाजपचं पोतं झटकलं तर,
वरीजनल भाजपचे किती कार्यकर्ते नेते, पडतील इतकाच प्रश्न उरला आहे.
-दिलीप बिरुटे
दोन्ही पक्षात काही साम्य व…
In reply to लाभार्थ्यांची परंपरा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन्ही पक्षात काही साम्य व काही भेद आहेत. भाजपत कॉंग्रेसमधील बरेच वाईट गुण आले आहेत, परंतु अनेक चांगल्या गोष्टी भाजप करतो ज्या कॉंग्रेसने शक्य असूनही केल्या नाही.
प्रतिसादाच्या मतितार्थाशी…
प्रतिसादाच्या मतितार्थाशी सहमत आहे. पण
या विधानामुळे पूर्वी काँग्रेसच्या काळात सर्व काही नैतिक होतं, सगळे धुतल्या तांदळाचे होते, संविधानभिरू होते असा काही समाजवादी सूर लावण्याचा प्रयत्न होतोय ते अमान्य आहे. भाजप जिथे अनैतिकपणे वागते तिथे सर्वात आधी भाजप समर्थकच टीका करतात. इथे मिपावरही अनेक कट्टर भाजप-संघ समर्थकांनी वेळोवेळी त्यांवर टीका केली आहे.
पण तुमच्यासारखे काँग्रेस समर्थक (किंवा पक्षाचे नेते-कार्यकर्ते) कधीही काँग्रेसच्या चुकलेल्या बाबींवर टीका करत नाहीत, उलट त्या चुकांचे समर्थनच करत राहतात.
भाजप हा party-with-difference राहिला आहे असे खात्रीने म्हणता येणार नाही पण अनेक भाजप समर्थक मात्र अजूनही party-workers-with-difference निश्चित आहेत.
दोन्हीत फरक आहे.
आम आदमी पक्षासारख्या पर्यायी…
आम आदमी पक्षासारख्या पर्यायी राजकारणाची कास धरणाऱ्या पक्षाचे खासदार जेव्हा भाजपात विलीन होतात, तेव्हा तो केवळ एका संघटनेचा पराभव नसून तो सामान्य माणसाच्या आशेचा पराभव ठरतो.
सामान्य माणसाने अरविंद केजरीवाल सारख्या पाताळयंत्री, खोटारड्या आणि अत्यंत स्वार्थी माणसावर विश्वास ठेवला तेथेच त्याच्या आशा आकांक्षांचा पराभव झाला.
मी कधीही निवडणूक लढवणार नाही कोणत्याही सरकारी सोयीसुविधेचा लाभ घेणार नाही म्हणणारा हा माणूस काँग्रेस इतका भ्रष्ट पक्ष जगात दुसरा नसेल आणि जीव गेला तरी काँग्रेसशी युती करणार नाही असे सार्वजनिक व्यासपीठावरून बोलतो ( हे सर्व व्हिडीओ सर्वत्र उपलब्ध आहेत),
तोच माणूस सर्वात जास्त अय्याशीचा शीश महाल बांधतो आणि सर्वात पहिल्या संधीचा वापर करून मुख्य मंत्री होतो आणि दुसऱ्या आघाडीत त्याच काँग्रेस आणि मित्रपक्षांशी हातमिळवणी करतो तेंव्हाच सामान्य माणसा च्या आशा आकांक्षांचा पराभव झाला.
बाकी मी कधीही निवडणूक लढवणार नाही म्हणणारा माणूस आप हा राजकीय पक्ष स्थापन कसा काय करू शकतो हे आपण विचारत नाही.
BMR बेसिक्स मध्ये राडा असलेला हा पक्ष स्थापन झाल्यापासून केजरीवाल या नेत्याने आपल्या बरोबरच्या सगळ्याच्या सगळ्या स्वतंत्र विचाराच्या माणसांना हाकलून देऊन स्वतः सर्वेसर्वा झाला तेंव्हाच सामान्य माणसा च्या आशा आकांक्षांची राख रांगोळी झाली .
आता त्या आशाआकांक्षांचे फक्त अस्थिविसर्जन बाकी आहे
स्वतःचे दिल्लीत सरकार असताना…
In reply to आम आदमी पक्षासारख्या पर्यायी… by सुबोध खरे
स्वतःचे दिल्लीत सरकार असताना रस्त्यावर उतरून आंदोलन करून केजरीवालने आपण भंपक असल्याचे दाखवून दिले आहे. त्याचेच अनुकरण सध्या महाराष्ट्र सरकारने रस्ता्यावर आंदोलन करुन ( महिला विधेयक ) केजरीवालच्या पंक्तीत जाऊन बसले. अनुकरण आणि आदर्श असावा तर असा !
सामान्य माणसाने अरविंद…
In reply to आम आदमी पक्षासारख्या पर्यायी… by सुबोध खरे
सामान्य माणसाने अरविंद केजरीवाल सारख्या पाताळयंत्री, खोटारड्या आणि अत्यंत स्वार्थी माणसावर विश्वास ठेवला तेथेच त्याच्या आशा आकांक्षांचा पराभव झाला.>>>>
नेत्याचे माव चुकले आहे बहुतेक!
आपचे खासदार धुलाई मशिनात.
आपचे खासदार धुलाई मशिनात.
राहुल गांधी 26-28 एप्रिल…
राहुल गांधी 26-28 एप्रिल अंदमानच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीबाबत त्यांची भूमिका - काहीही फरक पडत नाही. फालतू वेळ घालवणे पेक्षा समुद्र किनाऱ्याचा आनंद घेणे जास्त अल्हाददायक.
अंगावर लाल डगला परिधान करून…
In reply to राहुल गांधी 26-28 एप्रिल… by विवेकपटाईत
अंगावर लाल डगला परिधान करून डोक्यावर चाके असलेली रिकामी बॅग घेऊन फोटोसेशन, डोसा करताना फोटोसेशन, रस्त्यावर जोर बैठका मारताना फोटोसेशन आणि आणि आता अंदमांनात कोलू ओढताना फोटोसेशन होणार.
नशीब
In reply to अंगावर लाल डगला परिधान करून… by श्रीगुरुजी
नशीब, तुम्हाला ओरिजनल खुळखुळा मिळतोय.
खेळत बसा.
कॉपी कॅट खुळ्या पेक्षा बराच बरा आहे.
केजरीवालच्या विरोधात…
केजरीवालच्या विरोधात षडयंत्र सुरू होते. चाहूल लागतास केजरीवाल ने राघवचे पंख कापून टाकले. आपले राजनीतिक अस्तित्व वाचविण्यासाठी राघव जावळ दुसरा कुठलाच पर्याय नव्हता.
शिवाय ed च्या त्रासापासून…
In reply to केजरीवालच्या विरोधात… by विवेकपटाईत
शिवाय ed च्या त्रासापासून सुटका!
२०२६ पासून पुढे होणाऱ्या…
२०२६ पासून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकात ७५ टक्के काँग्रेसी कार्यकर्त्याना राहुल गांधी आपला नेता म्हणून हवा आहे.
तर भाजपच्या १०० टक्के कार्यकर्त्या ना २०२६ पासून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकात राहुल गांधी हाच काँग्रेसचा नेता म्हणून हवा आहे
भाजप कार्यकर्त्यांना की…
In reply to २०२६ पासून पुढे होणाऱ्या… by सुबोध खरे
भाजप कार्यकर्त्यांना की अंधभक्ताना?
भाजप कार्यकर्त्यांना की…
In reply to भाजप कार्यकर्त्यांना की… by अमरेंद्र बाहुबली
भाजप कार्यकर्त्यांना की अंधभक्ताना?
बीजेपीवाले जेव्हा असे म्हणतात तेव्हा समजून जायचे की ते राहुल गांधींना टरकून आहेत. असे नसते तर राहुल गांधीची खासदारकी रद्द करण्याकरता आटापिटा कशाला केला असता?
ते राहुल गांधींना टरकून आहेत…
In reply to भाजप कार्यकर्त्यांना की… by आग्या१९९०
ते राहुल गांधींना टरकून आहेत.
हा हा हा
हा छान होता
अजून येऊ द्या!
घाव वर्मी लागला.
In reply to ते राहुल गांधींना टरकून आहेत… by सुबोध खरे
घाव वर्मी लागला.
ते राहुल गांधींना टरकून आहेत…
In reply to भाजप कार्यकर्त्यांना की… by आग्या१९९०
ते राहुल गांधींना टरकून आहेत. >>>
+१
असे मॅसेज पसरवून काँग्रेसी जनात संभ्रम निर्माण होऊन ते राहुल गांधीना अध्यक्षपदावरून दूर करा अशी मागणी करतील असा केविलवाणा आशावाद त्यांच्या रेशिमबागी कुजबुज गँगच्या टूलकीट मध्ये असावा! :)
पण राहुल गांधी वाघ आहेत, उघडे पाडतात वेळोवेळी त्यांच्या खोट्या डिग्रीवाल्या, इंग्रजीचा ओ का थोट न कळणाऱ्या आकाला! :)
राहुल गांधी नक्की कोणाचे…
In reply to ते राहुल गांधींना टरकून आहेत… by अमरेंद्र बाहुबली
राहुल गांधी नक्की कोणाचे अध्यक्ष आहेत. भाजपाचे तर नितीन नाबीन आहेत.
राहुल हा भाजपने…
In reply to राहुल गांधी नक्की कोणाचे… by रात्रीचे चांदणे
राहुल हा भाजपने कॉंग्रेसमध्ये पाठविलेला ट्रोजन अश्व आहे.
>>> भाजपच्या १०० टक्के…
In reply to २०२६ पासून पुढे होणाऱ्या… by सुबोध खरे
>>> भाजपच्या १०० टक्के कार्यकर्त्या ना २०२६ पासून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकात राहुल गांधी हाच काँग्रेसचा नेता म्हणून हवा आहे
राहुल प्रमुख नेता असेपर्यंत भाजप निश्चिंत आहे. राहुल, पवन खेडा, केजरीवाल, उठा, राऊत, सपकाळ, खरगे हे भाजपचे मुख्य प्रचारक आहेत.
म्हणून बीजेपीच ४०० पारचे…
In reply to >>> भाजपच्या १०० टक्के… by श्रीगुरुजी
म्हणून बीजेपीच ४०० पारचे स्वप्न दुभंगले. खरं की खोटं?
४०० काय आणि २४० काय. सत्तेवर…
In reply to म्हणून बीजेपीच ४०० पारचे… by आग्या१९९०
४०० काय आणि २४० काय. सत्तेवर शेवटी तेच कायम राहिले आणि नंतरच्या दोन वर्षात आहे ती हरयाणा व महाराष्ट्र ही राज्ये टिकवून दिल्ली नव्याने जिंकली आणि आता बिहारमध्येही मुख्यमंत्री झालाय. महाराष्ट्रातही २-३ महापालिका वगळता मुंबईसह जवळपास सर्व महापालिका जिंकल्या. ठाकरे ब्रॅण्ड आणि पवार ब्रँड फुसका आहे हे पन्हा एकदा सिद्ध झाले.
एकेिकडे राहुल गांधी स्टार…
In reply to ४०० काय आणि २४० काय. सत्तेवर… by श्रीगुरुजी
एकेिकडे राहुल गांधी स्टार प्रचारक म्हणायचं आणि ४०० पार दूर , बहुमतासाठी कुबड्या घ्याव्या लागल्या . स्टार प्रचारकाने दगा दिला की काय?
४०० पासून दूर राहिल्याने…
In reply to एकेिकडे राहुल गांधी स्टार… by आग्या१९९०
४०० पासून दूर राहिल्याने काहीच नुकसान झाले नाही. सत्ता कायम राहिली. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाले पण जागतिक विक्रम तोडला नाही म्हणून काहीच नुकसान नसते. सुवर्णपदक मिळणे पुरेसे आहे.
स्टार प्रचारकाने धोबीपछाड़…
In reply to ४०० पासून दूर राहिल्याने… by श्रीगुरुजी
स्टार प्रचारकाने धोबीपछाड़ केल्याने दगडगोटे गोळा करून सत्ता मिळाली . असा कसा हो तुमचा स्टार प्रचारक?
सत्ता ही सत्ता असते…
In reply to स्टार प्रचारकाने धोबीपछाड़… by आग्या१९९०
सत्ता ही सत्ता असते. दगडधोंडे गोळा करून मिळवा किंवा हिरे माणके गोळा करून मिळवा. ऑलिंपिकमध्ये किती वेगात पळून शर्यत जिंकली याला महत्त्व नसते. इतर सर्व स्पर्धकांपेक्षा ०.०१ कमी सेकंदात शर्यत पूर्ण केली तरीही सुवर्णपदक मिळते. ९९ टक्के मते मिळवून निवडणूक जिंकली काय किंवा ३५ टक्के मते मिळूनही इतर सर्व उमेदवारांपेक्षा जास्त मते असतील, तरी विजय होतो. लोकशाहीमध्ये ५१ म्हणजे १०० असतात आणि ४९ असले तरी ते शून्य असतात.
स्टार प्रचारक प्रचारात नसता तर भाजपने सत्ता गमाविली असती. सुदैवाने पुढील निवडणुकीतही स्टार प्रचारक प्रचारात असणार आहे व त्यामुळे भाजप परत सत्तेवर येणे निश्चित आहे.
मिनी पहलगाम - बातमीनुसार -…
मिनी पहलगाम -
बातमीनुसार -
ठाणे जिल्ह्यात, "तू हिंदू आहेस का" असे विचारून दोघांना चाकूने भोसकले. हल्लेखोर मुसलमान अमेरिकेहून परत आलेला होता.
Forced guard to recite kalma': Maharashtra's knife-wielding ..
http://m.timesofindia.com/articleshow/130569666.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
- - -
हिंदुद्वेषी संघ भाजप प्रणित मोदी सरकारची गजवा-ए-हिंद २०४७ च्या दिशेने दमदार वाटचाल सुरू आहे. मागच्या बारा वर्षात असे प्रकार सातत्याने वाढत चालले आहेत यात नवल ते काय?
मोदी/भाजप हिंदुत्ववादी आहेत…
In reply to मिनी पहलगाम - बातमीनुसार -… by कांदा लिंबू
मोदी/भाजप हिंदुत्ववादी आहेत ह्या अंधश्रद्धेतून बाहेर या!
गुजरातमधील स्थानिक निवडणुकीत…
गुजरातमधील स्थानिक निवडणुकीत सर्व १५ महापालिकांमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. कॉंग्रेस व आआप या दोन्ही पक्षांची संपूर्ण वाताहत झाली.
एकूण १०३४ पैकी भाजपा ८७९ जगा मिळालया. कॉंग्रेसला केवळ ७८ जागा मिळाल्या. आआपने सुरत महापालिकेत ४६ जागा जिंकल्या, परंतु इतर १४ महापालिकेत केवळ १३ जागा मिळाल्या. कॉंग्रेसला सर्वाधिक १३ जागा अहमदाबाद महापालिकेत मिळाल्या.
जिल्हा पंचायत, नगरपंचायत व तालुका पंचायत निवडणुकीतही भाजपने दणदणीत यश मिळविले आहे.
भाजपच्या विजयाबद्दल चूना…
In reply to गुजरातमधील स्थानिक निवडणुकीत… by श्रीगुरुजी
भाजपच्या विजयाबद्दल चूना आयोगाचे अभिनंदन!
मतदान कुणाला?
आज संध्याकाळी सातनंतर मतदान आडाखे येणार.
पश्चिम बंगाल -एवढ्या…
पश्चिम बंगाल -
एवढ्या उन्हातही प्रचंड मतदा-!
मोदी आजच्या काळातील राजा…
मोदी आजच्या काळातील राजा बाबू आहेत. :)))
झालमूड़ी ची नौटंकी इतर नौटंकी प्रमाणेच होती. या दुकानाचा खरा मालक आता त्याच्या गल्ल्यावर परत आला आहे.
तेव्हा मोदींच्या वेळी गल्ल्यावर कोण बसला होता? दुकानदाराचा मुलगा की एसपीजी जवान होता, ते आता कोण शोधणार?
असाम मधे एसपीजी जवान खांबाच्या आड लपवला गेला होता.
जाता जाता: गोवा : अत्याचारी क्रूरकर्मा झेविअर : गोवा भाजपा : खट्टर बंधु : अटक प्रकरण : पोकळ खोटा हिंदुत्वाचा बुरखा टराटरा कसा फाटला?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- VAARI JAAVAN (Full Video)| Dhurandhar The Revenge |
मतदानोत्तर चाचणी अंदाजानुसार…
मतदानोत्तर चाचणी अंदाजानुसार बंगाल, आसाम व पॉंडिचेरीत मतयंत्रात प्रचंड बनवाबनवी झाली आहे. केवळ केरळमध्ये मतयंत्रात गडबड करता आली नाही. तामिळनाडूत काही प्रमाणात मतयंत्रात गडबड झाली आहे.
जाता जाता: गोवा : अत्याचारी…
गौतम खट्टर प्रकरण - केंद्रात भाजप, राज्यात भाजप - अन्यायपूर्ण अटक
निदा खान प्रकरण - केंद्रात भाजप, राज्यात भाजप - सौहार्दपूर्ण ना-अटक
संघ-भाजप प्रणित हिंदुद्वेष्टी मोदी-भागवत जोडगोळी ठामपणे गझवा ए हिंद २०४७ च्या दिशेने पाऊले टाकत आहे.
आधी मला वाटायचे, मिपावरील…
आधी मला वाटायचे, मिपावरील काही हिंदुत्ववादीसदृश्य लिखाण करणारे ऐदी खरेच हिंदुत्ववादी आहेत, पण हळूहळू कळायला लागले, ते त्यांच्या नेत्यांप्रमाणेच हिंदुत्ववादाच्या केवळ बुरखा पांघरून वावरताहेत. सध्या बंगालात भाजपाची सत्ता येणार आहे म्हणून हर्षोल्हास सुरु आहे (२०२१ मध्येही सुरु होता, प्रत्यक्षात मात्र तिथे ममता बानोने दोनशेवर जागा मिळवल्या) आणि इथे महाराष्ट्रात मात्र वर्षानुवर्षे भाजपाची सत्ता असूनही लोन वूल्फ हिंदूंवर कलमा पढायला लावून हल्ले करत आहेत. त्याबद्धल हे ऐदी सोयीस्कर मौन बाळगतात.
फडणवीसांचे मुस्लिमधार्जिणे,…
In reply to आधी मला वाटायचे, मिपावरील… by कांदा लिंबू
फडणवीसांचे मुस्लिमधार्जिणे, हिंदूविरोधी, ब्राह्मणविरोधी, मराठाधार्जिणे, भ्रष्टाचारधार्जिणे, गुन्हेगारधार्जिणे, जातीयवादीधार्जिणे, मराठीविरोधी, हिंदीधार्जिणे धोरण याविषयी मी अनेकदा टीका केली आहे. परंतु मराठी मतदारांनाच ते लक्षात येत नाही. २०२४ विधानसभा निवडणुकीत पैसे वाटून ते प्रचंड बहुमताने निवडून आले.
अनेक कट्टर फडणवीस समर्थकांनाच आता फडणवीसांचे बेगडी स्वरूप ध्यानात आले आले आहे. परंतु फडणवीसांची सद्गुणविकृती (खरं तर आव्हाड, संजय राठोड, राणे कुटुंबीय, पवार कुटुंबीय, ठाकरे कुटुंबीय, भुजबळ, तटकरे, चव्हाण अशांना सर्व कायदेशीर कारवाईपासून सरकारी संरक्षण देणे ही दुर्गुणविकृती आहे), फडणवीसांनी कसे पवार व ठाकरेंना संपविले, दोन पवार म्हणजे एक फडणवीस (भाजप समर्थक पवारांवर कठोर टीका करतात, मग डबल पवार किती वाईट आहेत हे यांना समजतच नाही), फडणवीस विकासपुरूष अशी बिरूदे देऊन त्यांच्या सर्व दोषांवर पांघरूण घालून आनंदात आत्ममग्न होतात.
महाराष्ट्रात फडणवीसांनी पहिलीपासून हिंदी लादल्याचेही हे समर्थन करतात. महाराष्ट्र हिंदीभाषिक राज्य करण्यासाठी फडणवीस जोमाने प्रयत्न करताहेत हे यांना समजत नाही की समजून घ्यायचेच नाही? फडणवीसांनी महाराष्ट्रात भाजपचा तुंबलेला संडास केलाय हे यांना समजूनही तो फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक आहे असे कौतुक सुरू आहे.
दुसरीकडे मोदींची कारकीर्द संमिश्र आहे. त्यांनी काही खूप चांगले निर्णय नक्कीच घेतलेत. पण अनेक चुकीचे निर्णयही घेतलेत. सर्व विरोधी पक्ष अत्यंत दुर्बल आहेत व राहुल या प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्याने काँग्रेसचे कायमस्वरूपी नुकसान केले आहे. कॉंग्रेस पुन्हा सत्तेत येणे हे भारतासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे मोदी कायम टिकावे ही इच्छा आहे. मोदींंनंतर योगी आदित्यनाथ किंवा हिमंता बिस्व सर्मा किंवा अमित शाह हे योग्य पर्याय ठरतील.
१. मतदारांना दुसरा चांगला पर्याय कोण देणार?
जोपर्यंत हे होत नाही विरोधकांकडून तोपर्यंत हीच स्थिती राहणार.
२. बंगालमध्ये समजा तृणमूलच्या जागा कमी झाल्या ( असे एग्झीट पोलवाले सांगत आहेत..) तर त्याची कारणे काय देणार?
३. अ- दीदीचं राजकारण चुकलं?/
३ब-भ्रष्टाचार वाढला?
३क-राज्यात येणाऱ्या मोठ्या उद्योगांना हाकललं?
३ड- इतर राज्यांत दिलेल्या सवलती इकडे आल्या नाहीत ?(बस प्रवास महिलांना फुकट, वीज बिलांत सवलत वगैरे?
३इ- बांगला देशींनी इकडे घुसून स्थानिक बंगाल्यांचा रोजगार बुडवला?
एक्झीट पोल....
बंगालमधे टीएमसी की झालमूरी ? एक्झीट पोल बंगाल मधे झालमूरीला सत्ता दाखवत आहेत, निकाल अजून बाकी आहे.
-दिलीप बिरुटे
मतयंत्रात गडबड केली असेल तर…
In reply to एक्झीट पोल.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मतयंत्रात गडबड केली असेल तर झालमुरी. नाहीतर टीएमसी. As simple as that. कसाही निकाल लागला तरी आमची कारणे तयार आहेत.
पण एक हाती सत्ता देशभरात एकाच पक्षाला......
In reply to मतयंत्रात गडबड केली असेल तर… by श्रीगुरुजी
उसको मिरची लगी तो मै क्या करू?
१ मे महाराष्ट्र दिन...
सह्याद्रीच्या कड्यांसारखा कणा असलेला, आणि अरबी समुद्रासारखे विशाल हृदय लाभलेला आमचा महाराष्ट्र! या महाराष्ट्र दिनी केवळ परंपराच नाही, तर नव्या युगाची प्रगती, तंत्रज्ञान आणि सुसंस्कृतपणा जपूया.
सामाजिक समता, एकता आणि अखंडतेचा वसा घेऊया आणि महाराष्ट्राला देशातील अव्वल राज्य बनवण्याचा निश्चय करूया.
१ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
-दिलीप बिरुटे
संयुक्त महाराष्ट्रदिनाच्या…
संयुक्त महाराष्ट्रदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आपली मातृभाषा मराठी जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने मराठीसाठी व हिंदीविरोधात अत्यंत कट्टर व दुराग्रही भूमिका घेतली तरच मराठी जिवंत राहील. सर्व राजकीय पक्ष व नेते मराठीचा व माठी माणसांचा बी दऊन महाराष्ट्राचे हिंदीभाषिक राज्य करण्यासाठी जिवापाड प्रयत्न करीत आहेत.
बळी देऊन
In reply to संयुक्त महाराष्ट्रदिनाच्या… by श्रीगुरुजी
बळी देऊन
+१भाषा हे फक्त संपर्क…
In reply to संयुक्त महाराष्ट्रदिनाच्या… by श्रीगुरुजी
+१
भाषा हे फक्त संपर्क साधण्याचे माध्यम आहे वगैरे ज्ञान वाटणाऱ्यांच्या तोंडावर चप्पल हाणावीशी वाटते! हिंदी भाषिकांना हे ज्ञान देतील का हे लोक?
सर्व मिपाकरांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्व मिपाकरांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
चालू घडामोडींच्या या धाग्यावर दीडशेच्या घरात प्रतिसाद आल्यानं दुसरा धागा काढत आहे.
चालू घडामोडी । मे २०२६ । वैशाख अधिक ज्येष्ठ १९४८
अच्छे दिनाच्या शुभेच्छा.
1 मे 2026 पासून देशात व्यावसायिक (Commercial) गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे महागाईत भर पडली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत प्रति सिलिंडर सुमारे ₹993 ची मोठी वाढ करण्यात आली आहे. धन्यवाद.
अजून किती अच्छे दिन पाहिजेत. घ्या बेट्या हो.....
-दिलीप बिरुटे