Skip to main content

चालू घडामोडी- एप्रील-मे -२०२६

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 20/04/2026 16:30 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी !

एप्रिल महिना आता सरत आला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपलं मिपा आता एकदाचं नव्या रूपात आपल्या भेटीला आलं आहे. वेबसाइटवर हळूहळू सकारात्मक बदल होत आहेत आणि नवनवीन गोष्टींची भर पडत आहे. अधूनमधून मिपा जे बंद पडतं, ते पडद्यामागे सुरू असलेल्या याच तांत्रिक कामांमुळे.

मालकांची स्वतःची नोकरी अत्यंत जबाबदारीची आणि धावपळीची आहे. पण तरीही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून ते मिपासाठी राबत आहेत. अगदी रात्री उशिरापासून ते पहाटेपर्यंत त्यांची ही धडपड सुरू असते. कुणाचीही आर्थिक मदत न घेता, स्वतःच्या खिशाला मोठी झळ सोसून ते केवळ मिपाकरांसाठी ही सर्व मेहनत घेत आहेत, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

मालक, तुमच्या या निस्वार्थ आणि अथक परिश्रमांसाठी आमच्या सर्व मिपाकरांकडून तुम्हाला एक 'स्टँडिंग ओव्हेशन' आणि मानाचा मुजरा! मनापासून खूप खूप आभार!


एकीकडे उन्हाचा कडाका वाढत आहे, तर दुसरीकडे देशातील आणि जगातील घडामोडींमुळे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक वातावरणही चांगलंच तापलं आहे. आपल्या मिपा कट्ट्यावर नेहमीच सखोल, अभ्यासपूर्ण आणि बऱ्याचदा खुमासदार चर्चा होतात, म्हणूनच सध्याच्या महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आपलं हे दळण. 

१. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेचे राजकारण, तर काही माणसांचा पायगुणच असा असतो की, ज्याला हात लावतील त्याची माती होते. महिला आरक्षणाच्या उदात्त हेतूआडून रेटला जाणारा 'मतदारसंघ पुनर्रचनेचा' (Delimitation) डाव असाच अंगलट आला आहे. संसदेत विरोधकांनी दाखवलेल्या अभूतपूर्व एकजुटीमुळे हे विधेयक बारगळले आणि सरकारला राजकीय पातळीवर एक मोठा पराभव स्वीकारावा लागला.

वरवर पाहता हा पराभव वाटत असला तरी, यामागील राजकीय गणिते अधिक गुंतागुंतीची आहेत. या मुद्द्यावर आपला निभाव लागणार नाही आणि विरोधक एकवटतील, याची सरकारला बहुधा आधीच पुरेपूर कल्पना असावी. परंतु, सध्याच्या घडीला देशातील वाढती बेरोजगारी, महागाई आणि इतर पायाभूत प्रश्नांसारख्या गैरसोयीच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष जाणीवपूर्वक विचलित करण्यासाठीच हा 'नॅरेटिव्ह' (Narrative) सेट करण्याचा अजेंडा राबवला गेला का, अशी दाट शंका निर्माण होते.

कोणत्याही ठोस धोरणात्मक चर्चेपेक्षा राजकीय धुरळा उडवून देण्यातच सरकारला फायदा वाटतो. आणि या सगळ्या राजकीय नाट्यावर पडदा टाकण्यासाठीच की काय, दुसऱ्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता 'भाइयों और बहनों...' अशी साद घालत पुन्हा एकदा मूळ प्रश्नांना बगल देणारे आणि केवळ भावनांना हात घालणारे भाषण देशाला ऐकावे लागले. ठोस कृतीऐवजी केवळ 'इव्हेंट मॅनेजमेंट' आणि भाषणांच्या जोरावर मूलभूत प्रश्न सुटणार आहेत का?

माझा काही प्रारब्ध नियती, कर्मफळाची फळं भोगणे यावर विश्वास नाही पण आता त्याची प्रचिती सद्य सरकारची धोरणे पाहिल्यावर यायला लागली आहे.एखाद्या व्यवस्थेपुढे किंवा परिस्थितीपुढे माणसाला स्वतःचे प्रयत्न थिटे वाटू लागतात, तेव्हा नकळतपणे 'प्रारब्ध' आणि 'नियती' या शब्दांचा आधार घेतला जातो. सध्याची एकंदरीत परिस्थिती, महागाई, सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारी करांची कात्री आणि त्याबदल्यात मिळणाऱ्या तुटपुंज्या सुविधा पाहिल्यावर, "हेच का आपले कर्मफळ?" असा उद्विग्न प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे.

राजकीय विश्लेषणात अनेकदा गमतीने असं म्हटलं जातं की, निवडणुकीच्या दिवशी बोट दाबणे हे जनतेचे 'कर्म' असते आणि त्यानंतरची पाच वर्षे सरकारची येणारी नवनवीन धोरणे हे त्या कर्माचे 'कर्मफळ' असते! पण यात सगळ्यात मोठी गोम अशी आहे की, हे 'कर्मफळ' मात्र ज्यांनी ते कर्म केले नाही त्यांनाही निमूटपणे भोगावेच लागते.

मंडळी, तमाशाच्या फडावर आधी नांदी होते, मग गण-गवळण रंगते, गवळणींचा रस्ता अडवला जातो आणि ही सगळी रंगतदार पूर्वतयारी झाल्यावर मग मूळ 'वगाला' सुरुवात होते. तसंच, आता मालकांचे आभार मानून आपली 'नांदी आणि गणगवळण' पार पडली आहे. आता मुख्य वगाकडे वळुया....


वाचने 904
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

In reply to by विजुभाऊ

आपल्या हातात काही राहिलं नाही. च्यायला, सगळं व्यवस्थित करुन आणलं होतं.
धागा प्रकाशित होत नव्हता येरर होता, झटल्यानंतर एकदाचा धागा प्रकाशित झाला.

आपण टाकलेले दळण कसंय,  आता निवांत पाहावं म्हटलं तर, सगळ्या एचटीएमलच्या लेंड्या
धाग्यात पसरुन गेल्या. सर्व सुरळीत झाल्यावर करतो दुरुस्ती.

टंकायचं कामही अवघड झालं. खात्या संपादनातून बदल करता येईल. पण सध्या त्यावरही मर्यादा आहेत.
दुसीकडून टायपून आणलं.

-दिलीप बिरुटे


 

१. इराण इजरायल अमेरिका युद्धाचा  नवा टप्पा आणि पाकिस्तानी मध्यस्थी यावर टिप्पणी 

https://youtu.be/Fun_PEUpASg?si=L1fhxoEmb-0f6FZy

२. अमेरिका उपाध्यक्ष जेडीवान्स यांनी एक वेगळेच मत नोंदवले. "इराण जे करत आहे ते यांची तुलना wife's right to skydive"शी केली. अमेरिकन महिलांनी यास आक्षेप घेतला. "बायकांनी नवऱ्याचं ऐकून निर्णय घ्यायचे का?"

३. इकडे भारतात महिला आरक्षण विधेयक लोकसभेतील एकूण जागांच्या संख्येशी निगडित असल्याने दक्षिण भारतातील राज्यांनी विरोध केला. ठराव फेटाळला गेला. घटनादुरुस्तीसाठी लागणारी दोन तृतियांश मते मिळवू शकला नाही. पण विरोधी पक्ष महिलांच्या विरोधात आहेत असा कल्लोळ करायला सत्ताधारी मोकळे झाले.


युद्धातल्या घडामोडींचा नीट अर्थ लागणे अवघड झाले आहे. अत्यंत तपशिलात जाऊन न्यूज फॉलो करणं वेळेअभावी शक्य होत नाहीये. इथे वाचून काहीतरी उलगडा होईल अशी आशा. उदा. अमेरिकेने मध्ये नाकाबंदीच केली. किंवा आजकालच एक इराणी नौका ताब्यात घेतली. यातून युद्धाचा कोणता उद्देश साध्य होतो आहे ? फक्त इराणची आर्थिक नाकेबंदी इतकाच का? व्यापारी जहाजे , कोणत्याही देशाची, अडवणे, हे तंत्र यापूर्वीही युद्धात वापरलं जात होतं का?


In reply to by गवि

अधिक स्पष्टतेसाठी.. समजा एखादी व्यापारी बोट अडवली, पकडली, ताब्यात घेतली, तर तिच्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना काय म्हणून ताब्यात ठेवतात ? युद्धकैदी ? की अन्य गुन्हेगार ?


In reply to by गवि

वरच्या विडिओत १२:५२ येथे इराणने स्पष्ट केलंय की आंतरराष्ट्रीय कायदा लागू करा. म्हणजे अमेरिका जे करतोय ते बेकायदा आहे.


In reply to by गवि

कायद्यात नागरी युद्धबंदी  बद्दल स्पष्ट नियम आहेत. 

इराणी नेतृत्वाने स्पष्ट केले आहे की धमक्या आणी वार्ता एकत्र चालणार  नाहीत.  अमेरिका दबाव तंत्राचा वापर करताना दिसत आहे परंतू इराणने स्पष्ट केले आहे की इराण म्हणजे व्हेनेझुयेला नव्हे. 

 

इतर देशांच्या जहाजांची नाकेबंदी करून त्या देशांना इनडायरेक्टली मध्यस्थी साठी उकसवत आहे. 

अमेरिकेची प्रचंड प्रमाणात गोची झालेली आहे आता तात्या मार्ग  शोधत आहे. 

युद्ध  एस्कलेट होईल का? तर मला वाटते नाही. असेच भिजत घोंगडे काही दिवस रहाणार . नंतर निसर्गदत्  स्वभावानुसार तात्या गुपचूप  हळूच पाय काढून घेणार. 

 


अमेरिकेचे रेडारविरोधक विमानही पाडण्याचे अस्त्र इराणकडे आहे हे सिद्ध झाले. इजरायलचे संरक्षण कवच आयन डोमही कुचकामी ठरले. अमेरिका निष्प्रभ झाले. युद्धात मार खाल्ल्याने आणि अमेरिकन कॉन्ग्रेसचीही अनुमती नाही. एकच माणूस चालवत असलेली जगातली एकमेव मोठी लोकशाही असे वर्णन करता येईल असे झाले. त्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ आणि त्यात एरंडीची झाडे पिळत आहे.


टी सी एस चे प्रकरण बऱ्याच वेगवेगळ्या दिशानी पसरत चाललेय.

मुळात हे लोक नोकरीच्या ठिकाणी धर्म आणतातच कशाला.

मुंबैत साधे उभे राहिले तरी उकाडा असाह्य होतो. मुस्लीम स्त्रीया काल्या बुरख्यात  ऊन आणि उकाडा कसा सहन करत असतील हे त्याच जाणोत.   मुंबी मधे पुर्वी नव्हते इतक्या मोट्भ्या प्रमाणात  बुरखाधारी आणि  जाळीची टोपी धारी दिसायला लागले आहेत.

काही ठिकाणी तर अरबी झगे घातलेले दाढीवाली पहायला मिळतात.


In reply to by विजुभाऊ

 बांगलादेशी आणून सरकारी आशिर्वादाने वसवले जाताहेत, त्याना आधार, पैन असे सगळे कार्ड पुरवले जाताहेत, त्यांच्या वाढलेल्या संखेकडे बोट दाखवून बघा बघा “ते” किती वाढताहेत, अशी भिति दाखवून मते खेचता येतील असे सत्ताधाऱ्यांना वाटते.


In reply to by विजुभाऊ

बुरखाधारी महिलानी या विरुद्ध लढा द्यायला पाहिजे ,पण हे फक्त दिवास्वप्नच ठरणार..त्यामुळे कधीच समानता येणार नाही.

 


In reply to by विजुभाऊ

अहो ख्रिस्ती आणि मुसलमानांत शर्यत लागली आहे कोण आधी सर्व जगाला कन्व्हर्ट करणार. १०० पैकी ९० ते ९५ टक्के हिंदूंना इस्लाम बद्दल काहीच माहित नसत बेसिक गोष्टी सोडल्या तर जस नमाज, ईद वैगरे म्हणून त्यांनी केलेल्या आपल्या देवाची निंदासाठी आपल्याकडे उत्तर नसते. जर आपल्यापैकी बराच लोकांनी एक्स-मुस्लिमांचे विडिओ youtube वर पहिले तर आपणही त्यांना प्रश्न विचारून गप्प करू शकतो कारण मुळात इस्लाम म्हणजे समर्पण प्रश्न विचाराचे नाहीत. उदा. नुपूर शर्मा.

चीन आणि नॉर्थ कोरिया सोडून हे लोक कदाचित यशस्वीही होतील सर्व जगाला कन्व्हर्ट करण्यात कारण या दोन्ही देशांत लोकशाही नाही आहे.


****महिला आरक्षण: पर किस महिला को बिठाओगे संसद में? आचार्य प्रशांत यांचा व्हिडिओ पाहिला .महिला बिलाविषयक ते खूप छान बोलले आहेत .ज्या देशात आजही महिला सरपंच "कन्सेप्ट सर्वार्थाने रुजली नाही ,घरगुती स्वातंत्र्य नाही तिथे थेट आकाशावर स्वार होण्याचे नाटक का ??आधी महिलांसाठी जमिनीवर काम करा .Video लिंक नक्की ऐका !

महिला आरक्षण: पर किस महिला को बिठाओगे संसद में? 

*****आरक्षणाने महिला सशक्त होणार का?

सध्या लोकसभेत महिलांची संख्या फक्त १२-१५% आहे. आरक्षणामुळे सुमारे १८० महिला खासदार होतील.पण प्रश्न असा: ही अतिरिक्त १००+ महिला कोण असतील?बहुतेक महिला राजकीय कुटुंबातून येतील जसे पत्नी, मुलगी,सून  किंवा नातेवाईक. पुरुष खासदारांमध्ये राजकीय कुटुंबीयांचे प्रमाण २५% आहे, तर महिलांमध्ये ५०% पेक्षा जास्त.उदाहरण: ग्रामपंचायत स्तरावर "सरपंच फेनोमेनन"  प्रभावशाली पुरुषांची पत्नी सरपंच बनते, पण खरी सत्ता पुरुषाकडेच राहते. ती फक्त "नामधारी" असते.संसदेतही तेच होईल. महिलांना कठपुतली बनवले जाईल. खरी स्वतंत्र, विद्रोही, स्वावलंबी महिला पार्ट्या सहन करणार नाहीत.

****सशक्तिकरण कुठून सुरू होते?

बदल घरापासून, समाजापासून सुरू व्हायला हवा.मुलींना जन्म द्या, चांगले शिक्षण द्या, स्वतंत्र निर्णय घेण्याची स्वातंत्र्य द्या.आज समाज काय करतो? आज्ञाधारक, आज्ञाकारी, "चांगल्या संस्कारांची" मुली तयार करतो. त्यांना बाहेर जाऊ देत नाही, काम करू देत नाही. घरात दाबतो (हुंडा, घरेलू हिंसा, मॅरिटल रेप इ.).मग बाहेर संसदेत "सजावट" म्हणून ३३% महिला ठेवतो. हे दिखावा आहे.

****हे सशक्तिकरण आहे की वोट बँक?

हे मुख्यतः वोट बँक साठी आहे. महिलांचा मतदानाचा टर्नआउट वाढत आहे, म्हणून पार्ट्या त्यांना खुश करत आहेत.आंतरराष्ट्रीय स्तरावर "लिबरल" आणि "प्रोग्रेसिव्ह" दिसण्यासाठीही हे केले जाते.पण वास्तव: घरात महिलांना दाबा, बाहेर ३३% दाखवा आणि सांगायचे "आम्ही महिला सशक्तिकरण करतोय". हे पाखंड (hypocrisy) आहे.

****जुनी  परंपरा परत येत आहे का?

होय. पूर्वी महिलांना "देवी" म्हणून घरात कैद ठेवायचे. आता "सशक्त" म्हणून संसदेत कठपुतली बनवायचे.दोन्हीही पितृसत्तात्मक व्यवस्था (patriarchy) ला मजबूत करतात.खरा धर्म किंवा आध्यात्मिकता (गीता, उपनिषद) लिंगभेद पाहत नाही. पण समाज अजूनही पुरुषप्रधान आहे.

आचार्य प्रशांत म्हणतात:"आरक्षणाने संसद भरेपर्यंत थांबू नका. खरा बदल घरात आणि समाजात घडवा. अन्यथा ३३% महिला खासदार येणार, पण खरी शक्ती पुरुषांकडेच राहील."

 


In reply to by Bhakti

>> बदल घरापासून, समाजापासून सुरू व्हायला हवा.
- तुंम्हाला 'जशोदाबेन' म्हणायचं आहे का? :-)

>> आचार्य प्रशांत

यांचे काही व्हिडिओ पाहिले आहेत. वरवर बंडखोर, प्रश्न विचारल्यासारखे वाटते, पण शेवटी तोच सनातनी गाभा वाटला. उत्कृषट वक्तृत्व असेकळते मी सावध होतो, पण लोक प्रभावित होतात. जग्गी वासुदेव पण मुलाखतीत असेच बिनतोड अध्यात्मिक, आयुर्वेदिक दावे करून प्रभावित करतात, पण खरे नंतर कळते.


In reply to by स्वधर्म

वरवर बंडखोर, प्रश्न विचारल्यासारखे वाटते, पण शेवटी तोच सनातनी गाभा वाटला.

आचार्य प्रशांत 'अद्वैत वेदांताचे' पुरस्कर्ते आहेत. त्यांची बंडखोरी लोकधर्म (हिंदू सांप्रदायिकता) आणि सनातन धर्म (फक्त वेद आणि उपनिषदांच्या परिघातला) ह्यातला फरक समजावून सांगणारी आहे त्यामुळे ती बंडखोरी आवश्यक आहे.  तेच जग्गी वासुदेव यांच्याबद्दल, ते उघड उघड शैव (योगी आदिनाथ) पुरस्कर्ते आहेत. 

मी सावध होतो / पण खरे नंतर कळते

हे का ते कळले नाही, नेमकं काय म्हणायचं आहे?

- (अवांतर करणारा) सोकाजी 


In reply to by स्वधर्म

फेबुवरही हा लेख दिला.तिथे डिस्केमर दिले होते.इथेहि द्यावे असे वाटल नाही.पण देते 😃

>>>>खूप काळापूर्वीच गुरु वगैरे मानणं बंद केल.मी माझ्या आई वडिलांची आणि स्वतःचीच फक्त भक्त आहे ,बाकी कोणाचीच नाही .रोज नवनवीन हुशार लोकांना इंटरनेटवर ऐकत राहणे मला आवडते .पण मी अनेकदा सांगते त्याप्रमाणे मला वेदांताची प्रचंड आवड आहे त्यामुळे युट्युबवर याबाबत अनेक व्हिडीओ पाहत असते .त्यापैकी आचार्य प्रशांत मला पूर्णपणे आधुनिकपणे ,व्यावहारिक वेदांत सांगणारे वाटतात .अजिबात भावनिक अतिशोयक्ती ते करत ना>>>><<<

>>उत्कृषट वक्तृत्व असेकळते मी सावध होतो, पण लोक प्रभावित होत <<

हे मी समजु शकते.पण सतत त्रयस्थ विचारसरणी करायची कला मी आत्मसात केलीये 🙂

पण मी अजुन एक आचर्य प्रशांत यांचा व्हिडिओ देतेय ,delimitation वर जरा सहन करा 😅

 


In reply to by Bhakti

@भक्ती 

आचार्य प्रशांत हे वरवर बंडखोर आहेत असे वाटते परंतु नंतर मूळ गाभा अद्वैत वेदांताचाच सांगत असतात. त्यांच्या अनुयायांमध्ये प्रामुख्याने नवशिक्षित तरुण पिढी आहे ज्यांना जाणवलेलं आहे की आपल्या पारंपारिक धार्मिक ग्रंथात, सनातन धर्मात काहीतरी चुकीचं आहे. अशांना त्यांचं म्हणणं खूप पटण्यासारखं आहे कारण प्रशांत वरवर इतर सर्व धार्मिक परंपरा, ग्रंथ, गुरु यांना नाकारतात (उदा. पुनर्जन्म आत्मा इ.) आणि आपण काहीतरी वेगळं सांगतो आहोत आपल्याला सगळं कळलेलं आहे अशा प्रकारे अत्यंत उत्कृष्ट वक्तृत्वाच्या सहाय्याने मांडणी करतात. खरे तर आत्म्याचे अस्तित्व व पुनर्जन्म काढला तर कर्मसिध्दांत जो अद्वैत वेदांताचाच आत्मा आहे, तो टिकत नाही. पण प्रशांत त्याचा अर्थ मोडून तोडून स्वत:ची वेगळीच मांडणी करतात. त्यामुळे लोक गोंधळून जातात व यांनाच खरे काय ते कळले आहे असे मानू लागतात. ते प्रश्नांना कसे भाळतीकडेच वळवतात याची अनेक उदाहरणे सांगता येतील.  उदाहरणार्थ त्यांना जेव्हा सनातन धर्मातीलजातीभेदावरती प्रश्न विचारण्यात आला. आपल्या अद्वैत वेदांताच्या ग्रंथांमध्ये उदाहरणार्थ भगवद्गीता, वर्ण हे मी स्वतःच निर्माण केलेले आहेत असा श्लोक श्रीकृष्णांच्या तोंडी घालण्यात आलेली आहे. आणि वर्णातूनच जाती तयार झाल्या. आता ज्याचे शिक्षण झालेले आहे, ज्याने स्वतः विचार केलेला आहे त्याला ही भेदभावमोलक मांडणी सरळसरळ चुकीची वाटते परंतु आचार्य प्रशांत ती चूक आहे  म्हणत नाहीत. ते म्हणतात की समाजात कुठे भेदभाव नाहीये सांगा. आर्थिक दृष्ट्या संपन्न लोक गरीब लोकांच्या मिसळत नाहीत, जिथे शिपाई पाणी पितात त्या ठिकाणी ऑफिसर्स पाणी पीत नाहीत, त्यांचं कॅन्टीन वेगळं असतं इत्यादी. थोडक्यात वर्ण व जातीभेद चुकीचा आहे असं न म्हणता समाजात इतरही भेद आहेत, अशा पद्धतीचा प्रतिसाद देतात. ज्यांनी प्रश्न विचारला, ज्याला थोडी जाग येत होती, त्याला कळत होतं की आपण धर्मग्रंथांना का नाकारलं पाहिजे त्याला हळूच असा एक दिलासा मिळतो, की भेद हे  सदैव सर्वत्र असणारच आहेत. त्याच्यामुळे याच्यावर डोकं आपटून काय होणार?

 

मग बहुतेकांना आपल्या धर्मग्रंथात काहीही चूक नसून फक्त आपलं इंटरप्रिटेशन चुकलेलं आहे असं वाटू लागत. ही लबाडी झाली. जी विषमता मूलक मांडणी आहे ती चूक आहे असं सांगणं, ही एक प्रामाणिक मांडणी होऊ शकली असती. शिवाय प्रशांत अगदी शंकराचार्य भगवद्गीता पासून अद्वैत वेदांत इत्यादीत मिस इंटरप्रिटेशन आहे आणि खरा धर्म मलाच कळलेला आहे असा एक बुलंद आत्मविश्वास घेऊन मांडणी करत असतात, ज्याची ऐकणाऱ्यांवर छाप पडते. ते म्हणतात की जे खरं ज्ञान खरं अध्यात्म आहे ते फक्त उपनिषदांमध्ये आहे. परंतु उपनिषदामध्येही चांडाळचा जन्म कोणाला मिळतो, ब्राह्मणांचे आदरातिथ्य कसे करावे इत्यादी अर्थाचे श्लोक आहेत. खाली दिलेल्या अर्पितच्या व्हीडिओमध्ये ते अतिशय साधार ससंदर्भ दाखवून दिलेले आहे. खरे तर त्यात प्रशांत यांच्यासारख्यांमुळे काय नुकसान होते ते अगदी नेमके सांगितले आहे.

https://youtu.be/MCUWXe47cwQ?si=zeosbNzngJ455IJ0

 

आचार्य प्रशांत अनेक आहेत.  अविनाश धर्माधिकारींचे गीतेवरील व्हिडिओ बघा किंवा राजीव सानेंचे गीतेवरील चार व्हिडिओ आहेत तेही पहा.  हे कोणीही भगवद्गीतेत जे अन्यायकारक आणि विषमता मुलक आहे ते चूक म्हणू शकलेले नाही.  अतिशय प्रभावी वक्तृत्वाच्या साह्याने खूप  खूप विस्तारपूर्वक मांडणी करून ही लोक   अन्यायकारक गोष्टीसुद्धा कशा नैसर्गिक आहेत हे सांगू लागतात. हे म्हणजे जागे झालेल्या ला, प्रश्न विचारणाऱ्यांना पुन्हा धर्मग्रंथांची, रूढी परंपरांची, अभिमानाची गुंगीची गोळी साखर लावून देण्यासारखे आहे.

 

@सोत्री,

>> उत्कृष्ट  वक्तृत्व असेले की मी सावध होतो, पण लोक प्रभावित होतात

असे म्हटले कारण माझा गीता शिकण्याचा अनुभव. जेंव्हा प्रश्न विचारले तेव्हा साध्या सध्या शंकांना मोठमोठी उत्तरे अतिशय उत्कृष्ट भाषेत दिली गेली. मला शिकवणाऱ्या सरांच्या गुरुजींचे गुरुजी स्वामी दयानंद सरस्वाती यांचा होम स्टडी कोर्स मागवला. दोन हजार पानांचे चार खंड. मोठ्या चिकाटीने वाचायचा प्रयत्नही केला. त्यात कमालीच्या उदात्त आणि मधुर भाषेत एवढा विस्तार करून सांगितले आहे तरी प्रश्नाचे उत्तर मिळाले नाहीच पण काही काळ एकदम दिव्य ज्ञान वगैरे मिळाले असे वाटू लागले होते. 


In reply to by स्वधर्म

स्वधर्म,

>> जे अन्यायकारक आणि विषमता मुलक आहे ते चूक म्हणू शकलेले नाही. अतिशय प्रभावी वक्तृत्वाच्या साह्याने खूप  खूप विस्तारपूर्वक मांडणी करून ही लोक अन्यायकारक गोष्टीसुद्धा कशा नैसर्गिक आहेत हे सांगू लागतात. 

दीर्घ प्रतिसादाबद्दल धन्यवाद, वरच्या कोटमधे माझ्या आधिच्या प्रतिसादातील प्रश्नाचे उत्तर मिळाले. बहुतांशी सहमत आहे. 

>> माझा गीता शिकण्याचा अनुभव

ह्याच्याशीही संपूर्ण सहमत. गीतेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात असं म्हटलं जातं, पण गीता वाचून पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मात्र गीतेत नाहीत. असो अतीअवांतरच्या विस्तारभयामुळे आवरते घेतो, गीतेवर वेगळा धागा काढून तिथे चर्चा करूया. (आता व्यनीतून चर्चा करुया असं म्हणयची सोय उरली नाही ;) )

- (सावध राहण्याबद्दल सहमत असलेला) सोकाजी 


In reply to by स्वधर्म

https://youtu.be/6-WH3BcZO6U

हा सगळा व्हिडीयोच पण खासकरून ६ः०८ व्या मिनीटापासूनची चर्चा ऐकल्यावर तुमच्या सावध का व्हायचं ह्या मुद्द्याचं चपखल उत्तर मिळतं! सगळा व्हिडीयोच मज्जामज्जा आहे. 😃

 

-(सावध राहण्यास सहमत असलेला) सोकाजी


In reply to by सोत्रि

वरील यादीत पटनाईक राहिले होते. धमाल व्हिडिओ आहे खरा. नंतर पटनाईक यांनी 'ढोल पशु शुद्र नारी सब ताडन के अधिकारी' या लाईनवर आक्षेप घेणाऱ्यांनाच दोष दिला आहे, नंतर इतर सगळं किती चांगलं आहे अशी मखलाशी सुरू केली आहे. दुर्दैव असे की यामुळे विचार करणारे थोडेसे लोक जे प्रश्न विचारतात ते (या निवेदकासारखे) प्रभावित होतात. त्यांना आपलंच चुकलं असं वाटू लागतं. अशांना गोल गोल बोलून पुन्हा सगळे पूज्य माणणाऱ्यांच्या गटात नकळत ओढले जाते. म्हणून गोडबोल्यांपासून कमालीचं सावध राहिलं पाहिजे.
अविनाश धर्माधिकारींनी गीता वाचताना कुठे श्वास रोखला होता, आणि कसा मग सोडला हेही शोधून पहा. 


महिला आरक्षणाआडून आणलेल मतदारसंघ पुनर्र्चनाचा फुगा फुटल्यानंतर, आता काय परिस्थिती राहील. म्हणजे, संसंदेने,  २०२३ मध्ये संसदेने मंजूर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाला (नारीशक्ती वंदन अधिनियम - १०६ वी घटनादुरुस्ती) राष्ट्रपतींची संमती मिळाली आहे, पण ते लगेच लागू झालेले नव्हते. कारण हा कायदा लागू करण्यासाठी प्रथम जनगणना (Census) आणि त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना (Delimitation) होणे आवश्यक आहे, अशी अट घालण्यात आली होती.  या प्रक्रियेनंतरच महिलांसाठी ३३% जागा आरक्षित केल्या जातील असे म्हटले होते. 

आता, जनगणना आणि मग मतदारसंघाची पुनर्रचना  आणि मग महिलांसाठी आरक्षण लागू होईल. आता जनगणनेचं नाटक सुरु होईल पण मग मतदार संघ पुनर्रचनेचं काय असा प्रश्न आहे ? जाणकार लिहितील अशी अपेक्षा..

-दिलीप बिरुटे


होणार आहे जनगणनेप्रमाणे. ५४३ वरून ७५३. 

पण दक्षिणेचा हिस्सा कमी होणार . त्यामुळे त्यांना ते नको आहे. 


In reply to by कंजूस

प्रत्येक राज्याच्या जागा ५०% वाढत असतील तर काही फारक पडणार नाही. फक्त संसदेत प्रश्नोत्तराच्या कालावधीत वाढ करावी लागेल. लोकप्रतिनिधींच्या वेतन आणि निवृत्ती वेतनावर खर्च वाढेल.  


या वेळची मोठी बातमी

मिपावरचा खरडफळा आणि खरडवही सुरू झालेली आहे हो.

ढुम ढुम ढुमाक्क ढुम ढुम ढुमाक्क ढुम ढुम ढुमाक्क  ढुम्म्म्म्म्म्म्म्म


आचार्य प्रशांत यांचा हा व्हिडिओ भारतातील लोकसभा मतदारसंघांचे पुनर्नियोजन delimitationया विषयावर आहे आणि विशेषतः दक्षिण भारतावर अन्याय होतो का? हा प्रश्न उभा करतो.

आचार्य प्रशांत यांचा डिलिमिटेशन वर व्हिडिओ 

Delimitation म्हणजे काय?--Delimitation म्हणजे लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची सीमा आणि संख्या ठरवणे/बदलणे

--***याचा उद्देश:
-प्रत्येक मतदारसंघात साधारण समान लोकसंख्या असावी
-प्रत्येक मताला समान मूल्य (equal representation) मिळावे
-भारतात delimitation कधी होते?
भारतात हे काम Delimitation Commission of India करते
शेवटचं पूर्ण delimitation 2002 मध्ये (2008 पासून लागू)
पण महत्वाचं म्हणजे 1976 पासून 2026 पर्यंत seat distribution freeze आहे

-- हे freeze का केलं?
जे राज्ये लोकसंख्या नियंत्रण करत आहेत त्यांना शिक्षा होऊ नये म्हणून

--आता समस्या काय आहे?-2026 नंतर delimitation होणार आहे आणि तेव्हा:
-लोकसंख्येच्या आधारावर सीट्स पुन्हा वाटल्या जातील
-ज्या राज्यांची लोकसंख्या जास्त वाढली आहे (मुख्यतः उत्तर भारत) त्यांना जास्त seats मिळतील

उत्तर vs दक्षिण भारत मुद्दा
*** उत्तर भारत:
लोकसंख्या जास्त वाढली
भविष्यात अधिक लोकसभा जागा मिळण्याची शक्यता
***दक्षिण भारत:
शिक्षण, आरोग्य, family planning चांगले
लोकसंख्या वाढ कमी
त्यामुळे seat वाढ कमी होईल किंवा proportion कमी होईल

त्यामुळे प्रश्न असा आहे कि  “ज्यांनी population control केलं, त्यांना political power कमी का?”

लोकसंख्या आधारित representation हे लोकशाहीत logical आहेपण यामुळे regional imbalance निर्माण होऊ शकतो.दक्षिण राज्यांना वाटतं की त्यांच्यावर अन्याय होतो आहे
उदाहरण 
State A (उत्तर) → लोकसंख्या 20 कोटी   आणि State B (दक्षिण) → लोकसंख्या 10 कोटी

मग State A ला जास्त MPs मिळतील त्यामुळे संसदेत त्यांचा प्रभाव जास्त

-- मोठा धोका काय सांगितला आहे?
भारतात regional political tension वाढू शकते.
उत्तर भारताचा political dominance वाढू शकतो
दक्षिण राज्यांना policy making मध्ये कमी influence

--संभाव्य उपाय (व्हिडिओत चर्चा)
Seats वाढवणे (increase total seats)
सर्व राज्यांना वाढ मिळेल
Population + development factors वापरणे.फक्त लोकसंख्या नाही, तर performance देखील consider.Federal balance maintain करणे
सर्व राज्यांना न्याय मिळावा

--Delimitation हा फक्त technical विषय नाही
--तो भारताच्या federal structure आणि political balance वर परिणाम करतो

मुख्य प्रश्न आहेत .
समान प्रतिनिधित्व vs राज्यांमधील न्याय
लोकसंख्या vs विकास



कोणीतरी आवरा रे......

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूमध्ये निवडणूक प्रचारात गेल्यावर आपली त्वचा इतर दाक्षिणात्य लोकांसारखी दिसावी म्हणून त्यावर डार्क टोनिंग केलं होतं अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत...

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

 

 मी मागच्या महिन्यात दक्षिण भारतात गेले होते. केवळ दोन  दिवसांत मी भयंकर टॅन झाले.ते फोटो पाहून लेक म्हणाली, तुला असाच स्किन टोन सूट होतो😅त्यामुळे मला ही मुद्दाम टोन ची शक्यता कमी वाटते.

खरे काय मोदी, मोदींच भक्त, मोदींचे विरोधक जाणो 😅

ते जलमूरीचे दुकानातला माल-बरण्या पाकिट  मात्र खचाखचं भरले होते. जसे काय आजच दुकानाची ओपनिंग आहे.

 


In reply to by Bhakti

>>>जलमूरीचे दुकानातला माल-बरण्या पाकिट  मात्र खचाखचं भरले होते. जसे काय आजच दुकानाची ओपनिंग आहे.

नौटँकीची काय लिमिट राहिली नाही.

 

-दिलीप बिरुटे

( मिपावरील मुरमु-यावाला )


In reply to by Bhakti

मोदी विरोधकांना मस्त खुळखुळा वाजवायला देऊन व्यग्र ठेवतात, म्हणजे ते महत्त्वाच्या कामात व्यत्यय आणणार नाही. जलमुरी काय, टोनिंग काय . . .‌ विरोधक कायम जाळ्यात अडकतात. 


In reply to by श्रीगुरुजी

>> मोदी विरोधकांना मस्त खुळखुळा वाजवायला देऊन व्यग्र ठेवतात, म्हणजे ते महत्त्वाच्या कामात व्यत्यय आणणार नाही.

विरोधकांनी त्यांच्या महिला विधेयक म्हणून आणलेल्या डिलिमिटेशन विधेयकाला यशस्वी विरोध करुन काम''त्यांचे महत्त्वाचे काम' हाणून पाडले आहे.
 

>> जलमुरी काय, टोनिंग काय

त्यांचा जाईल तिथे तिथली वेशभूषा करून लोकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न आजपर्यंत शेकडो वेळा दिसलेला आहे. तशाच प्रकारे इथेही त्वचेचा रंग बदलणे सहज केले असेल. 

यात तुंम्हाला त्यांचे महत्त्वाचे काम यशस्वीपणे चालू आहे असे वाटते किंवा रंग बदलण्याच्या चलाखीत काहीच खटकत नाही. यालाच कन्फर्मेशन बायसचा सापळा असे म्हणतात. यात माणूस कोणतीही नवीन माहिती  मिळाली तरी आपले पूर्वीचे मत कदापि बदलू  शकत नाही. उद्या खुद्द मोदी जरी माझे चुकले म्हणाले, तरी तुंम्ही ते कदापि मान्य करणार नाही याची खात्री आहे. असे समर्थक हीच त्यांच्या पक्षाची खरी ताकद आहे.


In reply to by Bhakti

ताई, त्या दुकानाला आधी रंग मारण्यात आला, मग बरण्या स्वच्छ पुसून खचाखच माल भरण्यात आला मग त्यांनी विज़िट केली. :)
आणी दुकानदार बिहारी आहे , बिहारात भाजप आणी नितीश सरकारने केलेल्या प्रचंड विकास सहन झाला अनाही म्हणून ममताच्या राज्यात पोट भरायला आहे. :) 


In reply to by Bhakti

ते जलमूरीचे दुकानातला माल-बरण्या पाकिट  मात्र खचाखचं भरले होते. जसे काय आजच दुकानाची ओपनिंग आहे.

इतर वेळेस किती माल  भरलेला असतो याविषयी तुम्हाला माहिती आहे का? त्या दुकानदाराने तो माल कधी भरला होता- समजा आठवड्यातून दोनदा तो माल तसा भारत असेल तर तो त्या दिवशीच कशावरून भरला नसेल? जर पंतप्रधानांचा रोड शो/सभा किंवा जे काही असेल ते झारग्राममध्ये असेल तर भरपूर गर्दी होणार हे अपेक्षित होतेच. अशावेळेस आपल्याला बिझनेस करायला चांगला दिवस आहे हे कोणाही सामान्य माणसाला समजून घ्यायला काहीही अडचण येऊ नये. त्यामुळे त्याने त्या दिवशीची तयारी म्हणून कशावरून माल भरून ठेवला नसेल?

पण कसं असतं एकदा द्वेषाचा चष्मा लावला की मग सगळ्या गोष्टी काळ्याच दिसायला लागतात. 


 


जलमूरीचे दुकानातला माल-बरण्या पाकिट  मात्र खचाखचं भरले होते. जसे काय आजच दुकानाची ओपनिंग आहे.

नौटँकीची काय लिमिट राहिली नाही.

 विक्रांत जहाजा वरची एक कहाणी आठवते आहे.

श्रीमती इंदिरा गांधी (पंतप्रधान असताना) येणार म्हणून नौसैनिकांबरोबर "बडा खाना" आयोजित केला होता.

तो चालला असताना एक आगाऊ नौसैनिक श्रीमती गांधी  याना म्हणाला मॅडम आज आप आ रही है इस लिये ऐसा खान बनाया है रोज ऐसा खाना नही होता है!

हे ऐकून वातावरण थोडेसे  तंग झाले. पण श्रीमती इंदिरा गांधी त्याला म्हणाल्या बेटे आपके घर कोई मेहमान आते है तो उनके लिये कुछ अच्छा खास खाना बनता है  कि नही? या आप उसे भी दाल चावल हि खिला देते हो?

सर्व नौसैनिक हसले आणि वातावरण एकदम बदलले.

आता प्रत्यक्ष पंतप्रधान तेथे येणार म्हटल्यावर एखादा सामान्य माणूस सुद्धा आपली घर किंवा दुकान स्वच्छ करून रंग रंगोटी करेल सर्व सामान भरून ठेवेल कि नाही?

त्यात नौटंकी दिसण्यासारखे काय आहे?

एकदा द्वेष मनात भरला कि चांगल्या रंगाच्या ऐवजी काळाच रंग दिसू लागतो हे खरं.

बाकी चालू द्या             


In reply to by सुबोध खरे

म्हणजे पंतप्रधान येणार म्हणून ही साफसफाई, बरण्या भरणे वगैरे केले गेले हे मान्य ना? म्हणजे पंतप्रधान रँडमली त्या दुकानात गेले नाहीत, सर्व काही प्लॅन होते. :) ह्याला नौटंकी म्हणू नये फक्त असेच ना?


In reply to by अमरेंद्र बाहुबली

महागडे मश्रुम खाणा-याला १० रुपयाचे झालमुडी  खायला लावली तिचं नाव ममता बॅनर्जी आहे म्हणे... ;)

-दिलीप बिरुटे


 

 

 

पण कसं असतं एकदा द्वेषाचा चष्मा लावला की मग सगळ्या गोष्टी काळ्याच दिसायला लागतात.  

 

एकदा द्वेष मनात भरला कि चांगल्या रंगाच्या ऐवजी काळाच रंग दिसू लागतो हे खरं.

 

बाकी मोदी रागा वगैरे चालू द्या, पण कृपा करून काळ्या रंगाला नावे ठेवू नका. काळा रंग माझा अतिशय आवडता आहे, माझे वंदनीय श्री शनि महाराज यांचाही आवडता आहे, dark mode हाही सध्या मोबाईल व डेस्कटॉप वर लोकप्रिय आहे. जगभरातले अनेक ब्रँड्स, उदा रोल्स राईस पासून ते रॉयल एनफिल्ड पर्यंत अनेकांचा आवडता आहे. त्यामुळे काळा रंग वाईट आहे असा अर्थ निघेल असे काही विधान करू नका.‌ 

 

अवांतर: मिसळ पाव वर "भुजबळांच्या नादी काय लागता?" असं अनेकदा वाचायला मिळालं आहे.


मोदी विरोधकांना मस्त खुळखुळा वाजवायला देऊन व्यग्र ठेवतात,>>>>

सहमत, जलमूरी खाण्यावर टीका करणारे बरेच व्हिडीओ दिसलें. मोदी म्हणाले ते बरोबरच आहे "जलमूरी मैने खाई लेकिन झाल TMC को लगी है।"मोदींना माहिती नसेल पण कारण  नसतान आग  तर  महाराष्ट्त पण लागली आहे.