आले अंबानीच्या मना
नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला. या निकालाचा संबंध कोल्हापुर जिल्ह्यातील जयसिंगपूर जवळच्या नांदणी गावाशी आहे. तर झाले असे की या गावात जैन धर्मीयांचा एक मोठा आहे. या मठा गेली ते 30 वर्ष एक हत्तीण राहत होती. महादेवी तिचे नाव. गावकर् यांमध्ये माधुरी या नावाने पण ती प्रसिद्ध आहे. जैन धर्मीयांमध्ये हत्ती या प्राण्याला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे या महादेवीचा जैन धर्मियांच्या सर्व धार्मिक उत्सवांमध्ये समावेश होता. गावकर् यांसाठी एक अभिमानाची बाब होती.
2019 साली पेटा या नावाच्या एका संस्थेने या हत्तीची दुरावस्था आहे असा आरोप केला. त्यानंतर शासनाचे वनविभागाचे अधिकारी, पशुवैद्य हे सर्व नांदणी येथें आले होते. त्यांनी महादेवीची तपासणी केली. या तपासणीत त्या हत्तीणीला कोणताही रोग अथवा त्रास आढळून आला नव्हता व तसा हो तसा अहवालही देण्यात आला होता.
नंतरच्या कालावधीमध्ये अंबानी यांचे वनतारा हे खासगी अभयारण्य आकारास येत होते. यानंतर या वनताराचे काही अधिकारी एक दिवस नांदणी येथें आले. त्यांनी या हत्तीची पाहणी केली व ते निघून गेले. काही दिवसांनी काही मध्यस्थांच्या मार्फत या मठाला एक ऑफर देण्यात आली. ही हत्तीण आम्हाला द्यावी व त्या बदल्यामध्ये मठाला मोठी देणगी दिली जाईल किंवा मठाचे बांधकाम करून दिले जाईल. मठाने धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या मानलेल्या आपल्या लाडक्या हत्तिणीचा असा सौदा करण्यास अर्थातच मान्यता दिली नाही.
नंतर पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट टू एनिमल्स) या संस्थेने या हत्तिणीच्या तब्येतीची अत्यंत हेळसांड होत असून साखळदंड बांधल्यामुळे पाय सुजले आहेत व नखेही वाढली आहे असा दावा करत या हत्तीला वनतारा येथे हलवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यानंतर एक हाय पॉवर कमिटी नेमण्यात आली व त्या कमिटीने पुन्हा तपासणी करून आधीचा वैद्यकीय अहवाल बाजूला ठेवून, या हत्तीणीची हेळसांड होत असल्याचा नवीन अहवाल दिला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या अहवालाच्या आधारे महादेवी हत्तीणीला वनतारा येथे हलवण्याचा निर्णय दिला. केरळपेक्षा गुजरात जवळ असलेल्याने हत्तिणीला वनतारा येथेच हलवावे असा अजब तर्क न्यायालयाने लावला आहे. नुकतेच आलेले व्हिडिओज पाहता ही हत्तीण आजारी तरी वाटत नव्हती. मजेत केळी खाताना व भाविकांना आशीर्वाद देतानाचे तिचे व्हिडिओज आहेत. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे नांदणीचे गावकरी अस्वस्थ असून त्यांना आपल्यावर अन्याय झाला असे वाटत आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्याचे ठरवले आहे.
आता सध्या हत्तिणीला व तारा येथे हलवण्याचे काम सुरू असून मठाचे पुजारी वो भाविक तसेच नांदणी गावचे गावकरी महादेवीला निरोप देताना शोकाकुल झाल्याचे व्हिडिओज येताहेत. गावकर् यांनी सामूहिकपणे आपले जिओ कनेक्शन्स परत करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबानी यांच्या वन तारा या संस्थेची नजर या हत्तीवर पडते काय आणि अखेर पूर्ण कायदेशीररीत्या ती हत्तीण वनताराकडे सुपूर्त केली जाते काय! सुप्रीम कोर्टात जाऊन गावकरी कितपत लढाई करू शकतील याची शंकाच आहे. शिवाय अंबानी यांचे सत्ताधार्याशी असलेले संबंध व प्रभाव पाहता गावकरी फार काही करू शकतील आणि आपल्या हत्तिणीला परत मिळवू शकतील याबाबत शंका वाटते. शेवटी आले अंबानीच्या मना तेथे कोणाचे चालेना हेच खरे.
नांदणी ग्रामस्थांचा जिओ सिम पोर्ट करताना जिओ कॉल सेंटरशी झालेला अस्सल कोल्हापुरी संवाद ऐकाच
https://www.youtube.com/watch?v=awNs8pLz-k0
या घटनेचे एबीपी माझा ने केलेले वृत्तांकन
https://www.youtube.com/watch?v=oQu7uAHU0G8&t=446s
https://www.youtube.com/watch?v=JAInPRJrSlY&t=39s
नांदणी येथील सध्याची जनभावना सांगणारा व्हिडिओ
https://www.youtube.com/watch?v=XZ13tB4o1jA
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अंहं
प्राणिसंग्रहालय हा प्रकार हळूहळू बंद करून अभयारण्यइथे दोन्हिमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश असतो. वनतारा जरी झू म्हणून लिहित असले तरी ते रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर अॅनिमल्स आहे. तिथे सध्यातरी सर्वसामान्यांना प्रवेश नाहीये.मग तर चांगलंच आहे की. किमान
+१
आत्ताच हाती आलेल्या माहिती
मुळातच अन्याय
तसे कसे....
त्यात माहूताचा धर्म पाहून सगळा रोख धर्मावर डायव्हर्ट करायला खूप मोठी तपश्चर्या पाहिजे :-)त्यापेक्षा मोट्ठी तपःश्चर्या १५ हत्ती वेळा भाड्याने दिल्याने नोंदी आहेत, त्यातल्या १४ मिरवणुका आणि गणेशोत्सव वगैरे सोडून एकच मिरवणूक मोहरमची तीही शेवटची (कारण इथे तेलंगणा पोलिसांनी हत्ती आणि त्याला वाहून नेणारे वाहन जप्त केले. त्या जप्तीच्या पंचनाम्यात हत्तीची हेल्दी अशी कंडीशन मेंशन केली आहे बरं का) इथे विषय डायव्हर्ट करण्यासाठी पहिजे.रोचक माहिती
पेटाचा पेटारा
तेलंगणा
माझ्या वरील प्रतिसादात
बरं बरं
एकाच धर्माच्या एकाच
कमाल आहे
हो मग !
वनतारा
+१
बेगडी हत्ती प्रेम
सुखद बदल !
हत्ती. एक लघु निबंध
प्रत्येक हत्तीला स्वतःच्या
काय ठरलं ?
नेत नाहीत.
मजेशीर प्रयोग
हो, कारण हत्ती हा जैन मठाचा
चैला
इति ग्रोक आणि मेटाAI
मराठीत प्रश्न विचारल्यास काही
एवढा पैसा असून जे लोक
अंबानींविषयी रोष असला तरी हे
मुळातच व्यक्तीद्वेष हा
एवढा पैसा असून जे लोक
किती ते प्रेम पण? कोणता आजार
मी प्रतिसादात कुणाचे नाव
पुनर्विचार याचिका
असे सांगून याप्रकरणी राज्य
असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.झाले म्हणजे हत्ती परत येणार नाहीये तर!हत्ती नाही हत्तीण
हायला
राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयातमग सीएम पण गंडवताहेत की काय? ते हत्ती म्हणताहेत.हत्ती
परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.सुधारीत
सुधारीत
दोनदा?
तासगावची गौरी हत्तीण
हत्ती हा पाळीव प्राणी नाही.
हत्ती
हाय पॉवर कमिटी... अर्थात हत्ती पळवणारी टोळी
सगळ्यात धक्कादायक (सद्यकाळात
+१
असं असेल तर...
नागरिक कधी जागे होणार
या सगळ्या प्रकारात हत्तीविषयक
गडचिरोलीतले हत्ती मात्र नक्कीच पूर्णपणे नैसर्गिक सहवासामध्ये,