✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आले अंबानीच्या मना

स
स्वधर्म यांनी
Wed, 07/30/2025 - 19:38  ·  लेख
लेख
नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला. या निकालाचा संबंध कोल्हापुर जिल्ह्यातील जयसिंगपूर जवळच्या नांदणी गावाशी आहे. तर झाले असे की या गावात जैन धर्मीयांचा एक मोठा आहे. या मठा गेली ते 30 वर्ष एक हत्तीण राहत होती. महादेवी तिचे नाव. गावकर् यांमध्ये माधुरी या नावाने पण ती प्रसिद्ध आहे. जैन धर्मीयांमध्ये हत्ती या प्राण्याला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे या महादेवीचा जैन धर्मियांच्या सर्व धार्मिक उत्सवांमध्ये समावेश होता. गावकर् यांसाठी एक अभिमानाची बाब होती. 2019 साली पेटा या नावाच्या एका संस्थेने या हत्तीची दुरावस्था आहे असा आरोप केला. त्यानंतर शासनाचे वनविभागाचे अधिकारी, पशुवैद्य हे सर्व नांदणी येथें आले होते. त्यांनी महादेवीची तपासणी केली. या तपासणीत त्या हत्तीणीला कोणताही रोग अथवा त्रास आढळून आला नव्हता व तसा हो तसा अहवालही देण्यात आला होता. नंतरच्या कालावधीमध्ये अंबानी यांचे वनतारा हे खासगी अभयारण्य आकारास येत होते. यानंतर या वनताराचे काही अधिकारी एक दिवस नांदणी येथें आले. त्यांनी या हत्तीची पाहणी केली व ते निघून गेले. काही दिवसांनी काही मध्यस्थांच्या मार्फत या मठाला एक ऑफर देण्यात आली. ही हत्तीण आम्हाला द्यावी व त्या बदल्यामध्ये मठाला मोठी देणगी दिली जाईल किंवा मठाचे बांधकाम करून दिले जाईल. मठाने धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या मानलेल्या आपल्या लाडक्या हत्ति‍णीचा असा सौदा करण्यास अर्थातच मान्यता दिली नाही. नंतर पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट टू एनिमल्स) या संस्थेने या हत्तिणीच्या तब्येतीची अत्यंत हेळसांड होत असून साखळदंड बांधल्यामुळे पाय सुजले आहेत व नखेही वाढली आहे असा दावा करत या हत्तीला वनतारा येथे हलवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यानंतर एक हाय पॉवर कमिटी नेमण्यात आली व त्या कमिटीने पुन्हा तपासणी करून आधीचा वैद्यकीय अहवाल बाजूला ठेवून, या हत्तीणीची हेळसांड होत असल्याचा नवीन अहवाल दिला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या अहवालाच्या आधारे महादेवी हत्तीणीला वनतारा येथे हलवण्याचा निर्णय दिला. केरळपेक्षा गुजरात जवळ असलेल्याने हत्ति‍णीला वनतारा येथेच हलवावे असा अजब तर्क न्यायालयाने लावला आहे. नुकतेच आलेले व्हिडिओज पाहता ही हत्तीण आजारी तरी वाटत नव्हती. मजेत केळी खाताना व भाविकांना आशीर्वाद देतानाचे तिचे व्हिडिओज आहेत. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे नांदणीचे गावकरी अस्वस्थ असून त्यांना आपल्यावर अन्याय झाला असे वाटत आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्याचे ठरवले आहे. आता सध्या हत्तिणीला व तारा येथे हलवण्याचे काम सुरू असून मठाचे पुजारी वो भाविक तसेच नांदणी गावचे गावकरी महादेवीला निरोप देताना शोकाकुल झाल्याचे व्हिडिओज येताहेत. गावकर् यांनी सामूहिकपणे आपले जिओ कनेक्शन्स परत करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबानी यांच्या वन तारा या संस्थेची नजर या हत्तीवर पडते काय आणि अखेर पूर्ण कायदेशीररीत्या ती हत्तीण वनताराकडे सुपूर्त केली जाते काय! सुप्रीम कोर्टात जाऊन गावकरी कितपत लढाई करू शकतील याची शंकाच आहे. शिवाय अंबानी यांचे सत्ताधार्याशी असलेले संबंध व प्रभाव पाहता गावकरी फार काही करू शकतील आणि आपल्या हत्ति‍णीला परत मिळवू शकतील याबाबत शंका वाटते. शेवटी आले अंबानीच्या मना तेथे कोणाचे चालेना हेच खरे. नांदणी ग्रामस्थांचा जिओ सिम पोर्ट करताना जिओ कॉल सेंटरशी झालेला अस्सल कोल्हापुरी संवाद ऐकाच https://www.youtube.com/watch?v=awNs8pLz-k0 या घटनेचे एबीपी माझा ने केलेले वृत्तांकन https://www.youtube.com/watch?v=oQu7uAHU0G8&t=446s https://www.youtube.com/watch?v=JAInPRJrSlY&t=39s नांदणी येथील सध्याची जनभावना सांगणारा व्हिडिओ https://www.youtube.com/watch?v=XZ13tB4o1jA
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23417 वाचन

💬 प्रतिसाद (141)

प्रतिक्रिया

तरी त्यांना सुचवले होते की

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/31/2025 - 01:12 नवीन
तरी त्यांना सुचवले होते की तुम्ही "हा हत्ती हत्तीईदला कुरबानी द्यायला पाळला आहे" असे म्हणा. कुर्बानी विरुद्ध बोलण्याच्या ना PETA मध्ये दम आहे, ना दाभोळकरमध्ये, ना अंबानी मध्ये, ना हायकोर्ट मध्ये, ना सर्वोच्च कोर्ट मध्ये. इतकी सोपी तकिया करून ते लोकं स्वतःचा हत्ती स्वतःकडे ठेऊ शकले असते ! =))))
  • Log in or register to post comments

नामदेवा मी काय म्हणतो

अभ्या..
गुरुवार, 07/31/2025 - 02:55 नवीन
त्यापेक्षा हत्तीला नाम घ्यायला लावायला पाहिजे. किंवा सर्व गावकऱ्यांनी एकेक लाख नामाची कॉन्ट्री काढली असती तरी गेलाबाजार काही अब्जात नाम कलेक्ट होऊन हत्तीला पाहिजे तिथं राहता आलं असत. कुठली कुर्बाणी आणि कुठला अंबानी . बिटकॉइनच्या तोंडांत मारल असलं चलन आहे नाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

होय पण पोस्टपेड चालेल का?

स्वधर्म
गुरुवार, 07/31/2025 - 04:35 नवीन
तुम्ही सुचवलेला उपाय एकदम 'नामी, आहे. पण नांदणीच्या गावकर्‍यांना प्रिपेड पर्याय आता नाही. पोस्टपेड चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नाही.

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/31/2025 - 10:42 नवीन
नाही. नामाचा सरकारी कामात इत्यादी उपयोग होत नाही. आमच्या देवस्थानात मोर पाळलेले होते. तेही फॉरेस्ट डिपार्टमेंट ने नेले होते. नामाचा उपयोग ते मोर नेल्यानंतर " ही देखील रामाचीच इच्छा" हे कळण्यासाठी होतो. तुम्हाला नाम कळतच नाहीये अजून . अभ्यास वाढवला पाहिजे वेळ आहे त्यावर. सारखा सारखा बाष्कळपणा काय कामाचा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ओके

अभ्या..
गुरुवार, 07/31/2025 - 15:07 नवीन
तुम्हाला नाम कळतच नाहीये अजून . अभ्यास वाढवला पाहिजे वेळ आहे त्यावर. ओके, तुम्हाला कळला ना रामाच्या इच्छेने? आणि कळला असेल तर तुमची स्थिती पाहता न कळालेला बरा. सारखा सारखा बाष्कळपणा काय कामाचा ? सुरुवात कुणी केली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ही बरं झालं.

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/31/2025 - 15:58 नवीन
ही बरं झालं. स्पष्ट बोलण्याचा फार फायदा होतो बघा असा ! बाकी रामाची इच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अं SSS हं

स्वधर्म
गुरुवार, 07/31/2025 - 04:32 नवीन
पंत, एरव्ही अध्यात्म, नाम, अभंग इ. विषय असेल तर लोकांचा बुध्दीभ्रम तुंम्हाला सहज जमतो. त्याबाबत वादच नाही. पण इथे तुमचा मुसलमान किंवा मुस्लीमद्वेष कितीही आडमार्गाने आणलात तरी वडाची साल पिंपळाला चिकटणार नाहीए. ताबडतोब दाखवून दिले जाईल. हां, आता प्रत्यक्ष महानेते ज्यांच्यासाठी खपतात, त्यांचेच नांव यात आले त्यामुळे तुमची घालमेल समजू शकतो, पण त्याबद्दल 'एबीपी माझा'ला मोठ्या मनाने माफ करून टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मग बघूया आता किती बकऱ्यांसाठी

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/31/2025 - 10:46 नवीन
मग बघूया आता किती बकऱ्यांसाठी PETA याचिका करते आणि सुप्रीम कोठा किती बकऱ्यांचा जीव वाचवतो ते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

पुन्हा तेच

स्वधर्म
गुरुवार, 07/31/2025 - 15:40 नवीन
इथे तुमचा मुसलमान किंवा मुस्लीमद्वेष कितीही आडमार्गाने आणलात तरी वडाची साल पिंपळाला चिकटणार नाहीए. एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अहो काय बरळताय ?

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/31/2025 - 15:56 नवीन
अहो काय बरळताय ? कसला आलाय द्वेष अन् काय ! आम्ही स्वतः अगदी चवीने बोकड , बोल्हाई मटण खातो. तेही आमच्या मुस्लिम मित्रांच्या सोबत जाऊन ! PETA किंवा तुमच्या सारखे दुतोंडी लोकं इन जनरल जो मांसाहार चालतो त्या बाबत कधीही काहीही बोलल्याचे पुरावे नाहीत. तुमच्यात स्पष्ट बोलण्याची धमक नाही , किमान हमीद मियां तरी सुस्पष्ट बोलले आहेत हे पहा Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

हिंदू कधीही दुसर्‍या

विवेकपटाईत
Tue, 08/05/2025 - 17:26 नवीन
हिंदू कधीही दुसर्‍या धर्माच्या लोकांचा द्वेष करत नाही. त्यामुळे देशात दुसर्‍या धर्माच्या लोकांची संख्या वाढली. द्वेष असता तर पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदू कमी झाले तसे आपल्या देशात झाले असते. बाकी जे त्यांच्या परमेश्वराला मानत नाही त्यांच्या विरोधात सतत जेहाद केले पाहिजे. यावर ते 100 टक्के ठाम असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

दाभोळकर गेले

स्वरुपसुमित
गुरुवार, 08/07/2025 - 08:10 नवीन
दाभोळकर गेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

खाजगी मालकीचा प्राणी आहे. तो

कंजूस
गुरुवार, 07/31/2025 - 05:38 नवीन
खाजगी मालकीचा प्राणी आहे. तो दुसऱ्याने विकत घेतला आहे. इकडे तो मठालाही सांभाळायचा खर्च वाढत असेल. गावकऱ्यांचा विरोध झाल्यावर दुसऱ्या मालकाने इतर उपाय कामाला लावले. कोल्हापुरातले दुसरे असे एक उदाहरण म्हणजे मंगेशकर (लता) यांच्या मालकीचा स्टुडिओ विकून तिथे काही मॉल वगैरे येणार होता. कोल्हापुरातल्या लोकांनी अडसर घातला. तो हेरिटेज/ वारसा आहे इत्यादी. दोन्ही बाबतीत वस्तू तीनशे वर्षांपूर्वींच्या नाहीत. मुद्दा असा आहे की मालक आपल्या मालमत्तेचे काहीही करू शकतो कायद्याने, त्यात इतरांनी भावनावश होऊन अडथळा आणणे बरोबर आहे का?
  • Log in or register to post comments

इथे दुसरा मालक अंबानी

कंजूस
गुरुवार, 07/31/2025 - 05:48 नवीन
इथे दुसरा मालक अंबानी कुटुंबीय आहे. त्यांचे आणि केंद्रातील वरीष्ठांचे सख्य आहे. त्यामुळे त्यांची बाजू घेतली की आपण भक्त ठरू शकतो याची कल्पना आहे. अंबानींच्या टेलीकंपनी जियोचे कार्ड सर्विस वापरणारे किंवा न वापरणारे भक्त/ विरोधक ठरतील का?
  • Log in or register to post comments

आपला फोन नंबर एका सर्विस

कंजूस
गुरुवार, 07/31/2025 - 06:37 नवीन
आपला फोन नंबर एका सर्विस प्रवाइडरकडून दुसऱ्याकडे नेणे म्हणजे 'नंबर पोर्ट'. आपण बरेच जण ' pre paid' plan घेतो. Post paid/ बिलींग प्लान घेत नाही. यात धोका असतो. आपण फोन कॉल्स करतो, डेटा इंटरनेट वापरत राहतो आणि नंतर मोठ्या रकमेचे बिल येऊ शकते. Pre paid प्रकारात तसे होत नाही. अमर्याद इंटरनेट वापरले जात नाही. डेटा लिमीट संपल्यावर बंद पडते. हे इथे सांगण्याचा उद्देश असा की वोडाफोन किंवा बीएसएनेल चा नंबर जियोकडे बदलल्यास pre paid नंबर मिळतो. तसं एरटेलचं नाही. एरटेलला पोर्टिंग करायचं झाल्यास चार ते सहा महिने post paid प्लान घ्यावा लागतो. तो महागडा आहे. शिवाय सहा महिन्यांनी pre paid करायला गेल्यास ते त्रास देतात.
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 07/31/2025 - 09:29 नवीन
कोर्टाने काय म्हंटले आहे? फक्त अंबानी अंबानी म्हणून रागाने नाचण्यात अर्थ नाही. But the high court cited a June 2024 report about the elephant's health, diet and nutrition, social environment, hygiene and cleanliness of shelter, veterinary care and work schedule, and said they "appear to be absolutely dismal". citing an elephant's right to quality life must take precedence over humans' right to use it for religious purposes. https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/elephant-relocated-to-gujarat-facility-from-kolhapur-devotees-bid-emotional-adieu-101753844026798.html
  • Log in or register to post comments

सब मिले हुये है

कपिलमुनी
गुरुवार, 07/31/2025 - 11:18 नवीन
या देशात कशावरही विश्वास नाही, कोर्ट कमिटि नेमते आणि त्या अहवालावर निर्णय देते . ती कमिटी मॅनेज झाली कि जमले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

सगळं तितकं निष्पाप सरळ...

स्वधर्म
गुरुवार, 07/31/2025 - 15:38 नवीन
माई, तुमचा मुद्दा अगदीच बरोबर आहे. कोर्टाने म्हटल्याप्रमाणे मानवाच्या धार्मिक अधिकार व इच्छांपेक्षा प्राण्याचा सुरक्षित जीवनाचा अधिकार अधिक महत्वाचा आहेच. केवळ धार्मिक आहेत, किंवा गावकर्‍यांना हत्तीण हवीशी वाटते, त्यांना तिचा लळा आहे, म्हणून तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणे चुकीचे आहे. तरीही अंबानीच्या वनतारातच हत्तीणीचे चांगले संवर्धन होईल असे मानणे, म्हणजे जरा जास्तच होतंय. तुमच्या दुव्यात म्हटले आहे: The relocation took place after the Supreme Court dismissed a petition filed by the mutt, challenging the Bombay High Court order upholding the decision of a High Powered Committee to relocate the animal to the Gujarat facility. या हाय पॉवर कमिटीत कोण कोण होते? त्यांच्याविषयी कुठेच माहिती मला तरी मिळाली नाही. त्यांचे काही हितसंबंध होते का? बरं एकदा राज्याच्या पशुसंवर्धन खात्याने, डॉक्टरांनी तिच्या आरोग्याबाबत प्रमाणपत्र दिलेले होते. या हाय पॉवर कमिटीने वनतारा अधिकार्‍यांची भेट, मठाने ऑफर नाकारणे वगैरे झाल्यावर नवीन अहवाल दिलाय. हे सगळं तितकं निष्पाप सरळ दिसतंय का तुंम्हाला? राजू शेट्टी यांनी जामनगरलाच का? हा मुद्दा मांडला आहे. एक तर केरळ मध्ये हत्तींचे उत्तम संगोपन करण्याची परंपरा व क्षमता आहे. तसेच जामनगरला तापमान ४५ अंशापर्यंत जाते. हे असे असताना, 'गुजरात महाराष्ट्राला जवळ असल्याने' तिला जामनगरला हलवायचा आदेश दिला. हा न्यायालयाचा तर्क तुंम्हाला कसा वाटतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

अंबानीने अशाप्रकारे एकल

Bhakti
गुरुवार, 07/31/2025 - 10:53 नवीन
अंबानीने अशाप्रकारे एकल असणाऱ्या सर्व हत्तींना वनतारात घेऊन जावं.हत्तींचा कळप बनवावे.इतक्या पैशांचा कधी उपयोग होणार,तो वापर करावा.गावकऱ्यांना आनंद व्हायला पाहिजे.हत्तीला निसर्गात राहण्याची संधी आता यापुढे मिळणार,बास झाली की गावची सेवा.
  • Log in or register to post comments

भटकी कुत्री

कपिलमुनी
गुरुवार, 07/31/2025 - 11:19 नवीन
अंबानीला एवढा पुळका असेल तर त्यांनी भटकी कुत्री वनतारामध्ये नेउन पाळावीत
  • Log in or register to post comments

फक्त अंबानी नाही,

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/31/2025 - 12:00 नवीन
फक्त अंबानी नाही, अंबानी + PETA + हाय कोर्ट + सुप्रीम कोर्ट हे सगळेच समान दोषी आहेत. नीच लोकं. जो समाज जाहीरपणे मुक्या जनावरांची हिंसा करतो त्याला पाठीशी घालतात, अन् जो टोकाचा अहिंसक समाज मुक्या जनावराला देवासारखे प्रेमाने वागवत आहे त्याच्याकडून तो प्राणी हिसकावून घेतात. असला हा नीच समाज. ही ह्या नीच लोकांची धर्मनिरपेक्षता आणि ही ह्याचे सेक्युलॅरिझम. जे लोकं एकट्या अंबानीचे नाव घेऊन टार्गेट करत आहेत ते स्वतःचे पूर्वग्रह बायस दाखवून देत आहेत बस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

एक शंका

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 07/31/2025 - 14:31 नवीन
मी माझा पाळीव घोडा किवा गाय किवा तत्सम प्राणी विकायचे नाही किवा उलट ठरवले तर पेटा हरकत घेउ शकते? किवा गेलाबाजार एखाद्या शेजार्‍याने आकसाने पेटाकडे तक्रार केली की मी माझ्या कुत्र्याचा छळ करतो तर पेटा कारवाई करु शकते?
  • Log in or register to post comments

भरपूर हसलो लेख वाचून ...

अमर विश्वास
गुरुवार, 07/31/2025 - 15:43 नवीन
भरपूर हसलो लेख वाचून ... वनतारा मध्ये २०० हत्ती आहेत ... तरी अंबानी आपले सर्व उद्योग सोडून जयसिंगपूर मधल्या हत्तीच्या मागे लागला ... भारी लॉजिक आहे
  • Log in or register to post comments

मी पण हसलो

स्वधर्म
गुरुवार, 07/31/2025 - 15:49 नवीन
त्यांच्याकडे पॉलिमर, फोन नेटवर्क, पेट्रोकेमिकल, देशातील बहुसंख्य माध्यमे, आणि काय काय एवढे उद्योग आहेत. तरी पण किराणा दुकानं काढली... खूपच हसण्यासारखे आहे हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

अजून भारी लॉजिक ...

अमर विश्वास
गुरुवार, 07/31/2025 - 15:54 नवीन
अजून भारी लॉजिक ... किराणा दुकान ... रिटेल हा उत्तम व्यवसाय आहे ... पण जाऊदे ... असेच मस्त विनोदी लेख लिहीत राहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

200 हत्ती

कपिलमुनी
गुरुवार, 07/31/2025 - 19:50 नवीन
असेच जमवले आहेत.. 1-1 करून..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

या घटनेचे एबीपी माझा ने केलेले वृत्तांकन...

कर्नलतपस्वी
गुरुवार, 07/31/2025 - 17:04 नवीन
एका वाक्यात सारे काही आले.
  • Log in or register to post comments

तुमचा काय आकस आहे

स्वधर्म
Fri, 08/01/2025 - 16:00 नवीन
तुमचा काय आकस आहे, कल्पना नाही. पण हे सगळे खोटे वाटत असेल, तर हे घ्या दुसऱ्या माध्यमांतील दुवे सकाळने या घटनेचे सखोल वृत्तांकन केले आहे: https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/mahadevi-elephant-full-story-in-marathi-nandani-kolhapur-temple-jain-math-vanatara-relocation-supreme-court-order-emotional-farewell-ambani-peta-animal-rights-srk94 टी व्ही ९ मराठी https://www.tv9marathi.com/trending/will-mahadevi-the-elephant-return-to-nandani-math-kolhapur-1459506.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

माझ्या मते प्राणीसंग्रहालयातील प्राणी

कर्नलतपस्वी
Fri, 08/01/2025 - 17:58 नवीन
नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावेत. अमेरीकेत एक प्राणीसंग्रहालया बघीतले. सरकारने बरेच खुले,मोकळे ढाकळे नैसर्गिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलायं पण खाणे पिणे आणी सतत माणसांचा संपर्क टाळता आला नाही. त्यामुळे प्राण्यांचे नैसर्गिक स्वभाव बदलले असल्यास नवल नाही. जनुकीय बदल घडतो का यावरही कदाचित संशोधन झाले असावे. माणसाला जर जंगलात डांबून ठेवले तर कसे वाटेल? माझे मत कुणालाच पटणार नाही. जाऊ द्यात. मराठी माध्यमांतून निष्पक्ष पत्रकारिता होत नाही असे माझे मत आहे आणी लोकशाहीत मतस्वातंत्र्य आणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच कलमानुसार मी मत व्यक्त करत आहे. नाही पटलं तर सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

पटलंय

स्वधर्म
Fri, 08/01/2025 - 21:58 नवीन
>> नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावेत. हत्तींसाठी निसर्गातील रहिवासच सर्वोत्तम, हे मत मला पटते. हत्तीणीची मठात काळजी घेतली जात असेल पण तरीही ते हत्तीसाठी नैसर्गिक नाहीच. जामनगरला तापमान ४० च्या वर जाते. धागा काढण्याचे कारण हे की सगळी चक्रे हलून, जुने रिपोर्ट असताना हाय पॉवर कमिटी नेमून, ना ना प्रकार करून नेमके तिला कुणाकडे पाठवण्यात आले, ते तितके सरळ दिसले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

आयुष्यभर मानवी सहवासात

प्रचेतस
Fri, 08/01/2025 - 22:54 नवीन
आयुष्यभर मानवी सहवासात राहिलेले प्राणी नैसर्गिक सहवासात जगू शकत नाही. त्यांची स्वतःचे अन्न स्वतः मिळवण्याची क्षमता संपलेली असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

नक्की राग कुणावर आहे लोकांचा?

कंजूस
गुरुवार, 07/31/2025 - 19:26 नवीन
नक्की राग कुणावर आहे लोकांचा?
  • Log in or register to post comments

दुसरी बाजू कळायला मार्ग नाही.

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 07/31/2025 - 20:32 नवीन
दुसरी बाजू कळायला मार्ग नाही. म्हणजे खरंच पेटा वाल्याना हत्तीणीची दया आली म्हणून हे सर्व झालं हे माहिती नाही. पण अशी कोर्टाच्या निगराणीत हाय पॉवर कमिटी नेमून तपासणी केली तर पाळीव प्राणीच कांय खुद्द माणसांना पण असंच कुठं तरी सोडावं लागेल. धाग्यात लिहिल्या प्रमाणे वनतारा चे अधिकारी आधी पाहणी करून गेले नंतर त्यांनी मठाला ऑफरही दिली. ऑफर नाकारल्यावर परत पेटा वाले येऊन कोर्टात गेल्यावर हत्तीण वनतारातच जात असेल तर नक्कीच काळबोर आहे असं वाटतंय. आणि हत्तीण जर वनतारात जात असेल तर राज्य सरकार कडून मदतीची अपेक्षा ठेवणाही चुकीचं होत.
  • Log in or register to post comments

एका शेतकर्‍याने 10 किलो वजनी

विवेकपटाईत
गुरुवार, 07/31/2025 - 21:37 नवीन
एका शेतकर्‍याने 10 किलो वजनी लाल भोपळा राजाला अर्पण केला. त्याच वेळी एका श्रेष्ठी ने एक हत्ती राजाला नजराणा म्हणून दिला. राजाने हत्तीच्या बदल्यात भोपळा श्रेष्ठीला दिला. राजा शेतकर्‍याला श्रेष्ठी ने दिलेला हत्ती देऊ लागला. तर शेतकरी म्हणाला, मला हत्ती नको. मला माझा भोपळाच परत द्या. हत्ती पाळण्याचा खर्च शेतकरी उचलू शकत नव्हता. अंबानीला हत्ती पाळण्याचा खर्च उचलू द्या. बाकी पेटा ही हिंदू विरोधी संस्था आहे, हे ही तेवढेच सत्य आहे.
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 08/01/2025 - 09:47 नवीन
ह्या हत्तीणीला अझीम प्रेमजी किंवा आनंद महिंद्र ह्यांनी आपल्या घरी नेले असते तर हा धागाच निघाला नसता असा ह्यांचे मत.
  • Log in or register to post comments

वेगळंच दुखणे

प्रसाद गोडबोले
Fri, 08/01/2025 - 10:54 नवीन
वेगळंच दुखणे "त्याचं" दुखणं वेगळंच आहे, सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही असं. म्हणून कुठून कुठून कुरबुरी काढून रडत राहतात. 2020 मध्ये केरळ मध्ये एका गरोदर हत्तिणी अननस मध्ये लावलेल्या बॉम्ब मुळे जखमी झाली अन् मेली. तेव्हा ह्यांनी एक शब्दाने अवाक्षर उच्चारल्याच्या पुरावा नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे ते कृत्य कोणाचे होते ते ! Image removed. "ही " असली एककल्ली लोकं सिक्युलरिझम चां आव आणून रडतच राहणार आहेत 2029 पर्यंत. 2029 मध्ये काहीतरी करून सुधारणा होईल ह्या आशेवर जगत आहेत बिचारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

वेगळंच दुखणे

प्रसाद गोडबोले
Fri, 08/01/2025 - 10:54 नवीन
वेगळंच दुखणे "त्याचं" दुखणं वेगळंच आहे, सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही असं. म्हणून कुठून कुठून कुरबुरी काढून रडत राहतात. 2020 मध्ये केरळ मध्ये एका गरोदर हत्तिणी अननस मध्ये लावलेल्या बॉम्ब मुळे जखमी झाली अन् मेली. तेव्हा ह्यांनी एक शब्दाने अवाक्षर उच्चारल्याच्या पुरावा नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे ते कृत्य कोणाचे होते ते ! Image removed. "ही " असली एककल्ली लोकं सिक्युलरिझम चां आव आणून रडतच राहणार आहेत 2029 पर्यंत. 2029 मध्ये काहीतरी करून सुधारणा होईल ह्या आशेवर जगत आहेत बिचारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

औषध बदललं वाटतं

स्वधर्म
Fri, 08/01/2025 - 15:51 नवीन
या विशिष्ट प्रकरणात मालकांच्या मालकांवरून रोख हटवण्यासाठी विशिष्ट धर्माच्या द्वेषाची मात्रा चालत नसल्याने आता दुसर्‍यांना सेक्युलर म्हणून जुन्या घटना काढल्यावर तरी चालतंय का, याची चाचपणी सुरू आहे का? एवढ्यावर थांबू नका, नेहरू + हत्ती असं काही मिळतंय का बघा. बाकी सगळ्यांनीच या घटनेचा निषेध केला होता त्यात सेक्युलर व धर्मांध असा भेद करणे तुंम्हालाच जमते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कसला रोख हटवणे अन् कसलं काय !

प्रसाद गोडबोले
Fri, 08/01/2025 - 16:10 नवीन
कसला रोख हटवणे अन् कसलं काय ! आम्ही तुमच्या एकांगी सिक्युलारिझम आणि भूतदया वगैरे चा बुरखा फाडत आहोत बस. ह्या प्रकरणात अंबानी चे नाव नसते तर तुम्ही चकार शब्द काढला नसता . तुम्हाला हत्तीशी अन् जैन धर्मियांच्या भावनांशी काहीही घेणे देणे नाहीये. पर्युषण पर्वात हिंसा करू नका असे जैन धर्मीय म्हणतात तेव्हा त्याला विरोध करायला तुमच्या सारखी च माणसे आघाडीवर असतात. आणि नेहरू + हत्ती काय शोधायचं ! नेहरू अन् त्यांच्या बाष्कळ धोरणांमुळे 1965 च्या युद्धात चारीमुंड्या चित हार अन् झालेली मनुष्यहानी सर्वांना माहीत आहे . आणि तरीही अजून एका - नेहरूने 1949 मध्ये इंदिरा नावाची हत्तीण जपान मधील एका zoo ला गिफ्ट केली होती ! तेव्हा "आले नेहरूंच्या मना" असा लेख लिहा आता. =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

हे घ्या

प्रसाद गोडबोले
Fri, 08/01/2025 - 16:20 नवीन
हे घ्या तुमच्या लाडक्या NDTV ची लिंक आहे ! https://www.ndtv.com/offbeat/jawaharlal-nehru-death-anniversary-when-pandit-nehru-gifted-an-elephant-to-japan-2236072 Image removed. आता खरेच जर तुम्ही " आले नेहरूंच्या मना" असा नेहरूंवर टीका करणारा लेख लिहिलात तर मानलं की तुमचं सिक्युलरिझम खरं ! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

फरक

स्वधर्म
Fri, 08/01/2025 - 16:41 नवीन
अहो, नेहरूंनी हत्ती 'दिलाय' **** यांच्यासारखा 'काढून' घेतला नाहीये. कशाला वाढवताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

दिलाय म्हणजे काय ?

प्रसाद गोडबोले
Fri, 08/01/2025 - 17:53 नवीन
दिलाय म्हणजे काय ? नेहरूंनी जन्माला घातला होता का हत्ती ? कोठून तरी काढूनच दिला ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

कशाला वाढवताय?

प्रसाद गोडबोले
Fri, 08/01/2025 - 18:22 नवीन
कशाला वाढवताय?
ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे मला बघायचं आहे की तुमच्या लेखणीतून एक तरी खऱ्या अर्थाने सेक्युलर वाक्य लिहिले जाते काय ते ! उदाहरणार्थ, माझं उपहासमुक्त, सरळ स्पष्ट मत मांडून मी थांबतो : PETA चे लोकं हरामखोर आहे. जैन सारख्या अत्यंत अहिंसक धर्माच्या लोकांकडून श्रद्धेने पूजिला जाणारा हत्ती काढून घेण्याचे कारस्थान पाताळयंत्री आहे. त्याला बळ देणारे अंबानी अन् त्यांची कमिटी की काय हेही त्या पापात तितकेच भागीदार आहेत . मुळात धर्माच्या प्रश्नात सरकार ने ढवळाढवळ करणे अक्षम्य चूक आहे. इथे हाय कोर्ट चुकले अन् सुप्रीम कोर्ट ही चुकले. तेही ह्या पापाचे भागीदार आहेत. आणि सर्वात शेवटी एन सर्वात महत्वाचे म्हणजे देशाचे लोकोत्तर बहुमताने निवडून आलेले नेते म्हणून आदरणीय मोदी आणि सन्माननीय महामहीम राष्ट्रपती ह्यांच्या डोळ्यादेखत हा अन्याय झाला असल्याने तेही ह्या पापात भागीदार ठरतात. आता जैन धर्मात ढवळाढवळ करून दाखवली तितकीच अन्य धर्मात ढवळाढवळ करून त्यांनी मुक्या जनावरांचा जीव वाचवून दाखवावा . आमचे लोकमान्य टिळक म्हणाले होते तसे म्हणून मी माझे 4 शब्द संपवतो - ह्या न्यायासनाच्या वर एक उच्च न्यायासन आहे, तिथे ईश्वर साक्ष आहे . तिथे नक्की न्याय होईल, सदर पापातील सर्वांभागीदारांना एकुणएक हिशेब चुकता करायला लागेल ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे ! इत्यलम राम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

ओके

स्वधर्म
Tue, 08/05/2025 - 15:46 नवीन
तुंम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळेच या प्रकरणात चुकले आहेत हेच मत, 'हे सगळं सरळपणे घडलं नाहीये' या स्वरुपात या धाग्यात मांडले होते. माझा तुमच्या या आणि आधीच्या प्रतिसादांबद्दल हाच मुद्दा आहे की तुंम्ही या प्रकरणाला इतर असंबध्द विषय चिकटवत आहात. या धाग्यात सेक्युलर वाक्य लिहीले का नाही याचा मूळ मुद्द्याशी कसलाही संबंध नाही. सेक्युलरिझम हा विषय तुमच्यासाठी महत्वाचा असेल तर वेगळा धागा काढावा, ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तुंम्ही नेले तरी

स्वधर्म
Fri, 08/01/2025 - 15:26 नवीन
प्रेमजी, महिंद्रा सोडा, हत्तीण तुंम्ही घरी नेली असती तरी धागा निघाला नसता. फक्त ज्या पध्दतीने घटना घडत किंवा घडवून आणल्या गेल्या, त्यामुळे कोणालाही यात सगळं कसं साधं सरळ घडत गेलं असं वाटणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मठाच्या हत्ती हा आमचा हत्ती

कंजूस
Fri, 08/01/2025 - 11:56 नवीन
मठाच्या हत्ती हा आमचा हत्ती कसा?
  • Log in or register to post comments

सेम पॅटर्न

कपिलमुनी
Fri, 08/01/2025 - 12:23 नवीन
इस्कॉन चे हत्ती अशाच प्रकारे आणले पेटा , कोर्ट , समिति --- ट्रन्स्फर
  • Log in or register to post comments

अरे वाह !

प्रसाद गोडबोले
Fri, 08/01/2025 - 14:41 नवीन
अरे वाह ! तुम्ही pattern detection करायला लागला आहात हे पाहून आनंद झाला. :) इतरही जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जानारे pattern लवकरच तुमच्या लक्षात येतील अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अगदी अगदी

स्वधर्म
Fri, 08/01/2025 - 15:29 नवीन
एखादी कमिटी नेमून तिच्या कडून फक्त हवा तसा अहवाल आणला की झाले. यात आपले राज्य आणि केंद्र सरकार एकदम निष्णात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बंधयुक्त मालकी हक्कातून

रामचंद्र
Fri, 08/01/2025 - 17:55 नवीन
बंधयुक्त मालकी हक्कातून नैसर्गिक अधिवासातल्या मालकी हक्काकडील हे बळजबरीचे हस्तांतरण आहे, गडचिरोलीचे हत्ती गुजराथला नेले तसे. मग त्यातल्या त्यात पैसा घालून अंबानींनी किमान केरळमध्ये आपले केंद्र उघडावे म्हणजे किमान हत्तीला तरी बरे वाटेल. नाही तरी वनतारात प्राणी आनंदाने रहावेत अशीच अंबानींची इच्छा असणार. तर त्या त्या प्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात ठेवावे हे योग्य. म्हणजे हत्ती केरळात, पेंग्विन अंटार्क्टिकावर आणि सिंह गीरमध्ये याप्रमाणे. प्राणिसंग्रहालय हा प्रकार हळूहळू बंद करून अभयारण्य असा बदल व्हायला हवा. आणि पक्ष्यांना पिंजऱ्यात कोंडून ठेवणे, पक्षीविक्रीची दुकाने हे प्रकार पूर्णपणे आणि स्वयंस्फूर्तीने बंद व्हायला हवेत.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा