✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आले अंबानीच्या मना

स
स्वधर्म यांनी
Wed, 07/30/2025 - 19:38  ·  लेख
लेख
नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला. या निकालाचा संबंध कोल्हापुर जिल्ह्यातील जयसिंगपूर जवळच्या नांदणी गावाशी आहे. तर झाले असे की या गावात जैन धर्मीयांचा एक मोठा आहे. या मठा गेली ते 30 वर्ष एक हत्तीण राहत होती. महादेवी तिचे नाव. गावकर् यांमध्ये माधुरी या नावाने पण ती प्रसिद्ध आहे. जैन धर्मीयांमध्ये हत्ती या प्राण्याला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे या महादेवीचा जैन धर्मियांच्या सर्व धार्मिक उत्सवांमध्ये समावेश होता. गावकर् यांसाठी एक अभिमानाची बाब होती. 2019 साली पेटा या नावाच्या एका संस्थेने या हत्तीची दुरावस्था आहे असा आरोप केला. त्यानंतर शासनाचे वनविभागाचे अधिकारी, पशुवैद्य हे सर्व नांदणी येथें आले होते. त्यांनी महादेवीची तपासणी केली. या तपासणीत त्या हत्तीणीला कोणताही रोग अथवा त्रास आढळून आला नव्हता व तसा हो तसा अहवालही देण्यात आला होता. नंतरच्या कालावधीमध्ये अंबानी यांचे वनतारा हे खासगी अभयारण्य आकारास येत होते. यानंतर या वनताराचे काही अधिकारी एक दिवस नांदणी येथें आले. त्यांनी या हत्तीची पाहणी केली व ते निघून गेले. काही दिवसांनी काही मध्यस्थांच्या मार्फत या मठाला एक ऑफर देण्यात आली. ही हत्तीण आम्हाला द्यावी व त्या बदल्यामध्ये मठाला मोठी देणगी दिली जाईल किंवा मठाचे बांधकाम करून दिले जाईल. मठाने धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या मानलेल्या आपल्या लाडक्या हत्ति‍णीचा असा सौदा करण्यास अर्थातच मान्यता दिली नाही. नंतर पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट टू एनिमल्स) या संस्थेने या हत्तिणीच्या तब्येतीची अत्यंत हेळसांड होत असून साखळदंड बांधल्यामुळे पाय सुजले आहेत व नखेही वाढली आहे असा दावा करत या हत्तीला वनतारा येथे हलवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यानंतर एक हाय पॉवर कमिटी नेमण्यात आली व त्या कमिटीने पुन्हा तपासणी करून आधीचा वैद्यकीय अहवाल बाजूला ठेवून, या हत्तीणीची हेळसांड होत असल्याचा नवीन अहवाल दिला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या अहवालाच्या आधारे महादेवी हत्तीणीला वनतारा येथे हलवण्याचा निर्णय दिला. केरळपेक्षा गुजरात जवळ असलेल्याने हत्ति‍णीला वनतारा येथेच हलवावे असा अजब तर्क न्यायालयाने लावला आहे. नुकतेच आलेले व्हिडिओज पाहता ही हत्तीण आजारी तरी वाटत नव्हती. मजेत केळी खाताना व भाविकांना आशीर्वाद देतानाचे तिचे व्हिडिओज आहेत. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे नांदणीचे गावकरी अस्वस्थ असून त्यांना आपल्यावर अन्याय झाला असे वाटत आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्याचे ठरवले आहे. आता सध्या हत्तिणीला व तारा येथे हलवण्याचे काम सुरू असून मठाचे पुजारी वो भाविक तसेच नांदणी गावचे गावकरी महादेवीला निरोप देताना शोकाकुल झाल्याचे व्हिडिओज येताहेत. गावकर् यांनी सामूहिकपणे आपले जिओ कनेक्शन्स परत करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबानी यांच्या वन तारा या संस्थेची नजर या हत्तीवर पडते काय आणि अखेर पूर्ण कायदेशीररीत्या ती हत्तीण वनताराकडे सुपूर्त केली जाते काय! सुप्रीम कोर्टात जाऊन गावकरी कितपत लढाई करू शकतील याची शंकाच आहे. शिवाय अंबानी यांचे सत्ताधार्याशी असलेले संबंध व प्रभाव पाहता गावकरी फार काही करू शकतील आणि आपल्या हत्ति‍णीला परत मिळवू शकतील याबाबत शंका वाटते. शेवटी आले अंबानीच्या मना तेथे कोणाचे चालेना हेच खरे. नांदणी ग्रामस्थांचा जिओ सिम पोर्ट करताना जिओ कॉल सेंटरशी झालेला अस्सल कोल्हापुरी संवाद ऐकाच https://www.youtube.com/watch?v=awNs8pLz-k0 या घटनेचे एबीपी माझा ने केलेले वृत्तांकन https://www.youtube.com/watch?v=oQu7uAHU0G8&t=446s https://www.youtube.com/watch?v=JAInPRJrSlY&t=39s नांदणी येथील सध्याची जनभावना सांगणारा व्हिडिओ https://www.youtube.com/watch?v=XZ13tB4o1jA
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23420 वाचन

💬 प्रतिसाद (141)

प्रतिक्रिया

अंबानी, मठ आणि सरकार सगळे एक

श्वेता व्यास
गुरुवार, 08/07/2025 - 11:15 नवीन
अंबानी, मठ आणि सरकार सगळे एक झाले, आपण बसू भांडत :D
  • Log in or register to post comments

:(

Bhakti
गुरुवार, 08/07/2025 - 12:38 नवीन
:( खरोखर भारतात सूज्ञ सामान्यांच्या मताला काहीच किंमत नाही.सगळेच स्वार्थी भासत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता व्यास

हत्तीसाठी अंबानी २ कोटी देतो?

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/07/2025 - 11:25 नवीन
हत्तीसाठी अंबानी २ कोटी देतो? आपण सर्व मिपाकर मिळून एक छोटा हत्ती पाळुयात, तो मोठा झाल्यावर अंबानीला विकून पैसा कमावू, मिपावर तसेही अनेक रिटायर्ड ज्येष्ठ नागरिक आहेत ते हत्तीची निगराणी करतील, हत्तीला मूवी काकांच्या शेतात ठेवू, डॉक खरे हत्तीची तब्येत पाहतील, चंद्रसूर्यकुमार अर्थतज्ज्ञ आहेत जमा खर्चाचा हिशेब ठेवतील.
  • Log in or register to post comments

नक्की हत्तीच ना? देखभाल

आग्या१९९०
गुरुवार, 08/07/2025 - 12:10 नवीन
नक्की हत्तीच ना? देखभाल करणाऱ्यांची नावे बघून जास्तीत जास्त कागदी वाघ बनू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तुम्ही पुरूष लोक कशातही

Bhakti
गुरुवार, 08/07/2025 - 12:38 नवीन
तुम्ही पुरूष लोक कशातही बिजनेस दिसतो राव तुम्हाला...हा हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भारीच प्रस्ताव आहे.

स्वधर्म
गुरुवार, 08/07/2025 - 13:41 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हा हा हा

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 08/07/2025 - 15:46 नवीन
हा हा हा भारी कल्पना बाहुबली ! ह्या बाबतीत आम्हीही तुमच्या सोबत आहोत :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कुणाचातरी हत्ती कुणीतरी विकत

कंजूस
गुरुवार, 08/07/2025 - 13:28 नवीन
कुणाचातरी हत्ती कुणीतरी विकत घेतला तर आपल्या पोटात का दुखावे? रानटी हत्ती पाळीव करण्यासाठी क्रूरपणा करतात हे मान्य . पण अशा पाळीव प्राण्यांना/ हत्तींना पिल्ले होतात ती अगोदरपासूनच पाळीव असतात. दक्षिणेत बऱ्याच देवळांत असे हत्ती आहेत आणि त्या देवस्थानाला दिलेल्या देणग्यांतून हत्तींचा खर्च भागतो. पिढ्यानपिढ्या माहूत असतात आणि त्यांचे हत्तींशी संबंध फारच कौटुंबिक असतात. या देवळातल्या हत्तींकडून काही लाकडाचे ओंडके ओढणे वगैरे काम नसतं. देवळांत आठ ते बारा आणि पाच ते सात उभे राहून भाविकांना आशिर्वाद देणे हेच काम. आता प्राणी कोणताही म्हटला की त्याला आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू आलेच. महाराष्ट्र सरकारने ती हत्तीण अंबानीकडून परत आणली तरी जैन मठवाले घेणार नाहीत. मग सांभाळणार कोण? मठवाल्यांना हा हत्ती नव्हे तर एकूण हत्तीच ठेवायचा नसेलही. म्हणून तो निर्णय घेतला असेल.
  • Log in or register to post comments

अखेर माधुरी परत येणार.

स्वधर्म
गुरुवार, 08/07/2025 - 13:48 नवीन
लोकसत्ताची बातमी: https://www.loksatta.com/kolhapur/kolhapur-public-representatives-welcome-vantaras-stance-on-returning-elephants-phm-00-5286136/ 'जनभावना लक्षात घेऊन' असे सर्व लोक, वनताराचे मु. का. आ. इ. म्हणत आहेत. १० हजाराहून जास्त जिओ सिम परत करणे, रिलायन्सच्या पंपावर पेट्रोल न भरणे याही गोष्टी 'वर' पर्यंत गेल्या असतीलच.
  • Log in or register to post comments

गाव करील ते राव काय करील?

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/07/2025 - 15:38 नवीन
गाव करील ते राव काय करील? पैसा, सत्ता, अंबानी, पेटा नी माजलेले सत्ताधीश नी त्यांचे मीपावरील समर्थक ह्यांच्या नाकावर टिच्चून लढा देऊन हत्तीण परत आणाऱ्या कोल्हापूर करांचे अभिनंदन! :) हत्ती पळवणारी टोळी तरीही सुधारेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

अभिनंदन

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 08/07/2025 - 15:52 नवीन
करणार शंभर टक्के अभिनंदन करणार ! फक्त हत्ती परत यायची वाट पहात आहे. एकदा का हत्ती परत आला की मिपावर लेख लिहिणार ! अहो लोकोत्तर असा हा क्षण आहे, असेल. धर्मसत्तेने राजसत्तेवर मिळवलेला विजय असेल हा . आजवर सरकारने शाहाबानो साठी सुप्रीम कोर्टाला तोंडावर पाडल्याचे पाहिले होते, आता पहिल्यांदाच "जनभावनेचा" रेट्याने "महादेवी" साठी देखील सुप्रीम कोर्ट आणि सर्व व्यवस्था चारीमुंड्या चीत करता येऊ शकते हे सिद्ध होईल. आता हत्ती परत येण्याची वाट पाहूयात फक्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आईवडील

कपिलमुनी
गुरुवार, 08/07/2025 - 13:57 नवीन
उद्या एखादे गरीब आईवडील मुलांची काळजी घेउ शकत नसतिल तर सरकारने मुलांची पण सोय करावी .. ती पोरे पण काढून घेऊन कोणाला तरी संभाळायला द्यावीत ( परदेशात अशी सोय आहे म्हणे )
  • Log in or register to post comments

मठाची हत्तीण यावरून आठवलं,

रामचंद्र
गुरुवार, 08/07/2025 - 22:30 नवीन
मठाची हत्तीण यावरून आठवलं, पूर्णचंद्र तेजस्वींची उमा कुलकर्णी अनुवादित 'कृष्णेगौडाची हत्तीण' कुणी वाचली आहे का? अस्सल भारतीय परिस्थितीचं वास्तव हसतखेळत उभं केलं आहे. अंदाजे वीसएक वर्षांपूर्वी एका साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती.
  • Log in or register to post comments

वनताराच्या पत्रातील काही मजकूर..

Bhakti
Fri, 08/08/2025 - 11:27 नवीन
मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे. न्यायालय आणि परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी मान्य केल्यास, मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरु करेल. उच्चाधिकार समितीच्या तज्ञांशी सल्लामसलत करून ही सुविधा विकसित केली जाईल. हे केंद्र प्राणी कल्याण मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि हत्तींच्या देखभाल आणि शुश्रूषेसाठीच्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पद्धतींनुसार असेल. प्रस्तावित केंद्रामध्ये पुढील सोयी-सुविधा निर्माण करण्यात येतीलः सांधे आणि स्नायूंवर उपचार करण्यासाठी हायड्रोथेरपी तलाव पोहणे आणि नैसर्गिक हालचालीसाठी वेगळे तळे शारीरिक पुनर्वसनासाठी लेसर थेरपी आणि उपचार कक्ष विश्रांती आणि संरक्षणासाठी रात्री निवास साखळ्या शिवाय मोकळेपणाने हालचाली करण्यासाठी हिरवीगार मोकळी जागा पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि माधुरीच्या नैसर्गिक विधींसाठी वाळूने भरलेला हौद सतत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज ऑन-साइट पशुवैद्यकीय दवाखाना माधुरीला सुरक्षित आणि आरामदायी विश्रांती घेता यावी यासाठी रबराइज्ड फ्लोअरिंग प्लॅटफॉर्म पाय कुजल्याचे दुखणे बरे होण्यास, संधिवाताचा त्रास कमी होण्यास आणि सांध्यांवरील ताण कमी होण्यासाठी मदत व्हावी यासाठी आडवे होऊन झोपण्यासाठी खास काळजी घेऊन तयार केलेले मऊ वाळूचे ढिगारे. मठाचे परमपूज्य भट्टारक महास्वामीजी आणि महाराष्ट्र शासन यांच्याशी चर्चा करून या सुविधेसाठी जागा निश्चित केली जाईल
. -माझा असा प्रश्न असा आहे की यातील कोणत्या सुविधा मठात आधी उपलब्ध होत्या? -नसतील तर का नव्हत्या? यासाठीच वनताराला पाठवावं लागावं.अंबानी, हायकोर्टाने ,पेटाने मध्यस्थी करावी यात गावकऱ्यांना काहीच कमीपणा वाटत नाही का? -मी माधुरीचा वनतारामधील नवीन व्हिडिओ पाहिला, अक्षरशः एका पायावर ती खूप कमी भार देत चालत आहे.हे स्पष्ट दिसत आहे. - हे मठावाले,गावकरी यांच्याकडूनही माधुरीला साखळदंड बांधणार नाही,तिला रस्त्यावर,मिरवणूकीत फिरविणार नाही अशा काही अटी लिहूनच घ्याव्यात.
  • Log in or register to post comments

वनताराच का?

अमरेंद्र बाहुबली
Fri, 08/08/2025 - 12:39 नवीन
वनताराच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

बरं मग,या वनतारा आधी अशा

Bhakti
Fri, 08/08/2025 - 13:19 नवीन
बरं मग,या वनतारा आधी अशा हत्तींना ज्या ठिकाणी उपचारांसाठी पाठवले जायचे तिथे माधुरीला या आधी का पाठवले नाही? वनतराला हत्ती बळकावयाचे असतील तर ,तिथल्या सगळ्याच हत्तींना बरं झालं की तिथून जंगलात पाठवा यासाठी आंदोलन का नाही करावं मग? एकाच हत्तीसाठी काळेबेरे वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

जपा

अभ्या..
Fri, 08/08/2025 - 13:23 नवीन
खरंच ताई. फार भाबड्या आणि निर्मळ मनाच्या आहात तुम्ही. . जपून राहा, दुर्मिळ प्रजाती होतेय ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

वॉव....

अभ्या..
Fri, 08/08/2025 - 12:56 नवीन
मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे. चला.... हुडका जरा मोक्याची तीनचारशे एकर जागा निसर्गरम्य कोल्हापूरजवळ.. अरे ते राधानगरी आहेच की. बघा त्याला कपांऊंड टाकून वनतारा झाले आता टूतारा ची कोनशिला ठेवता येते का सीएम साहेबांच्या हस्ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

अच्छा वनतारा पार्ट -२ का?

Bhakti
Fri, 08/08/2025 - 16:07 नवीन
अच्छा वनतारा पार्ट -२ का? घ्या आता, महाराष्ट्राने स्वतःच्या पायावर धोंडा मारला आहे का मग?
फक्त तेवढाच विषय नाही हो जर त्या हत्ती ची एवढीच काळजी होती, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे तर तिला 1.एकदाही मातृ सुख का दिलं गेलं नाही 2. तिला पैसे मिळतात म्हणून बाहेर भाड्याने का दिलं गेलं 3. अंकुश टोचणे गरजेचे आहेस का. 4. हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे त्यात मादा प्रमुख असते मग तिला तसं का राहू दिलं नाही किंवा तसा प्रयत्न का केला गेला नाही. 5. हत्तीचे तळवे हे डांबरी रोडवर किंवा सिमेंट रोडवर किंवा दगडावर चालण्यासाठी किंवा राहण्यासाठी बनलेले आहेत का. 6. हत्तीचा अन्न कोणतं तिला पेढे किंवा शिजवलेले पदार्थ भरवणे योग्य आहे का आता सरते शेवटी आला वनताराचा मुद्दा.... आठवते का बघा . वनमंत्र्यांनी वनतारा च्या धर्तीवर सूर्यतारा सुरू करण्याचे संकेत आधीच दिले आहेत आणि त्यातही हे सूर्यतारा अंबानी किंवा अदानीकडे सोपवणार असेही सांगितले होते. आता विचार करा कोणी कोणाच्या खांद्यावर कधी कशी केव्हा बंदूक ठेवली आणि कोणाला गोळी मारली निमित्त नांदणीचा हत्ती आणि इप्सीत सांगली_कोल्हापूर मध्ये वनतारा पार्ट टू........ #copied
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

माझा असा प्रश्न असा आहे की

अभ्या..
Fri, 08/08/2025 - 13:13 नवीन
माझा असा प्रश्न असा आहे की यातील कोणत्या सुविधा मठात आधी उपलब्ध होत्या? -नसतील तर का नव्हत्या? यासाठीच वनताराला पाठवावं लागावं.अंबानी, हायकोर्टाने ,पेटाने मध्यस्थी करावी यात गावकऱ्यांना काहीच कमीपणा वाटत नाही का? -मी माधुरीचा वनतारामधील नवीन व्हिडिओ पाहिला, अक्षरशः एका पायावर ती खूप कमी भार देत चालत आहे.हे स्पष्ट दिसत आहे. - हे मठावाले,गावकरी यांच्याकडूनही माधुरीला साखळदंड बांधणार नाही,तिला रस्त्यावर,मिरवणूकीत फिरविणार नाही अशा काही अटी लिहूनच घ्याव्यात. अगदी कुठल्या जंगलात, अभयारण्यात, प्राणीसंग्रहालयात किंवा शासनाच्या प्राणी उपचार फॅसिलिटीमध्ये ह्या सुविधा उपलब्ध असतात? बरं ठिक आहे, सध्या हत्ती आजारी आहे त्याच्यावर उपचाराची गरज आहे तेम्व्हा हे उपचार करुन तो ठिक झाला तर डिसचार्ज ची सोय असणार आहे का? म्हणजे एकवेळ तुम्ही मठात त्रास होतोय हत्तीला असे कन्सीडर करुन तेथून हलवले तर दुसरे कोणते नैसर्गिक ठिकाण (लाईक केरळ, कर्नाटक, तमिळनाडू वगैरे) बघून तेथे सोडून देणार आहात का? का तेही सगळ्यात बेस्ट वनतारा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

हत्तीण म्हातारी झाली आहे ओ

Bhakti
Fri, 08/08/2025 - 13:27 नवीन
हत्तीण म्हातारी झाली आहे ओ,जंगलात डायरेक्ट कसं पाठवणार.आणि पाठवलं तरी काही अडचणी येऊ शकतील.तज्ञांचे मत हा तर प्रकारचं गावकरी,मठावाले पाहत नाहीयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

वनतारात हत्ती नेण्याचा पॅटर्न पहा

स्वधर्म
Fri, 08/08/2025 - 15:05 नवीन
मठाने ३३ वर्षांपूर्वी हत्तीचे पिल्लू आणले होते. हत्तीचे आयुष्यमान ७०+ वर्षे असते. म्हणजे माधुरी चाळीसच्याही आत आहे. मी वर दिलेलाच व्हिडिओ पुन्हा पहा Madhuri Elephant Kolhapur: मंगळवारच्या बैठकीत काय तोडगा निघणार? माधुरी परतण्याची किती शक्यता? यात ३ मिनिटानंतर सांगितल्याप्रमाणे वनताराने पद्मावती हत्तीण ही आसाममधून हजारो किमीचा प्रवास करून जेंव्हा वनताराला नेली, तेंव्हा ती ५५ वर्षांची असून गरोदर होती. तिचा हा सगळा प्रवास गरोदर अवस्थेत केला गेला. त्यामुळे माधुरी हत्तीण म्हातारीआहे असे म्हणता येणार नाही. पण तुंम्ही वनतारात हत्ती नेण्याचा पॅटर्न पहा: जानेवारी २०२५ मधील बातमीनुसार वनताराने अरूणाचल प्रदेशमधून एका वेळेस २० हत्ती नेले आहेत. त्यात एक बछडाही होता. आता हे सगळे हत्ती अर्थातच म्हातारे नाहीत. २०२१ पासून वनताराने ३९ हत्ती फक्त अरूणाचल प्रदेश मधून नेले आहेत. आजमितीला सदर याचिकेच्या बाबत वनताराने स्वतःच कोर्टात त्यांच्याकडे असलेल्या हत्तींची संख्या २३८ सांगितली आहे. तरी पण तुंम्ही या प्रकाराकडे इतकं सरळ बघत असाल तर, अभ्या यांनी म्हटल्याप्रमाणे खूप भाबडा किंवा पक्षपाती दृष्टीकोन आहे. बाकी मठातील लोक काळजी घेतात का? घेऊ शकतात का, हे तज्ञच ठरवू शकतील. पण दोन बाजू मठाच्या बाजूच्या आहेत. १. माधुरी तिथे गेली ३३ वर्षे जगली आहे. २. गावकृयांचे तिच्यावर खरोखर प्रेम आहे हे स्पष्ट दिसते आहे. नाहीतर कोण पूर्ण वर्षाचा रिचार्ज भरला असताना जिओचा फोन परत करेल? टीपः असे असले तरी हत्ती हा कळपात रहाणारा व जंगली प्राणी असून त्याला एकट्याला माणसांनी व मानवी वस्तीत पाळणे, मग त्याच्यावर कितीही प्रेम असले तरी अन्यायकारक आहे. बाय द वे: भारत सरकार ला एक वनखातं असतं, त्याला एक मंत्री असतो. त्यात अनेक आय एफ एस अधिकारी बंगला गाडी व नोकर दिमतीला असे रहातात असे ऐकून आहे. त्यांचा याच्याशी काही संबंध नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

बरं ती म्हातारी नाही ?

Bhakti
Fri, 08/08/2025 - 15:48 नवीन
बरं ती म्हातारी नाही ? ३३ एकटी राहून तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते,जे वयानुसार नाही नसेल पण अकाली म्हातारपणासारखेच आहे. पण आजारीही नाही का? का वनविभागातील डॉक्टरही गावकऱ्यांना,अंबानीला फसवत आहेत? मला तर एक हत्ती जंगलात गेला याचा आनंद झाला,मग ते त्रिपुरा,केरळ,काझीरंगा जरी असते तरी तेवढाच आनंद झाला असता.पण वनतारा हे मुद्दामहून हत्ती बळकावत आहेत तर सर्वच हत्तींची वनिताला मधून थेट जंगलात मुक्तता करावी यासाठी आता माणूसकी असणाऱ्या कोल्हापूरकरांनी मोहिम उघडावी. तिला कोल्हापूरला आणून काय हाशील होणार‌ काय माहिती? परत तेच म्हणते "झेपत नाही तर हत्ती पाळू नये" आणि वनताराला सांगेन की "कशाला पैशे वाया घालवता,ज्याचा हत्ती ते पाळतील नाहीतर भाड्याने देतील , तुम्हाला काय करायचं?कशाला हत्तींना ५ तारांकित सुविधा देता,जाऊ द्या की उडत"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

तुम्हाला नाही झेपणार

अभ्या..
Fri, 08/08/2025 - 16:14 नवीन
मला तर एक हत्ती जंगलात गेला याचा आनंद झाला,मग ते त्रिपुरा,केरळ,काझीरंगा जरी असते तरी तेवढाच आनंद झाला असता. म्हणूनच म्हणले आहे. भाबडेपणा सोडा. नुसती चार भिंती व छप्पर म्हणजे घर अशी व्याख्या केली तरी त्यात झोपडी, बंगला, शाळा, हॉटेल, बस स्टॅन्ड, दवाखाना, वेड्यांचा दवाखाना, तुरुंग, स्मशान असे सगळे येते. प्रत्येक ठिकाणच्या मालक्या, तिथे जायचे/राहायचे/ आणि मुख्य म्हण्णजे परत यायचे नियम असतात. तिथे कुणाचा हुकूम चालतो हे ही महत्त्वाचे असते. . तसेच मोकळी जागा, सार्वजनिक जागा, खाजगी जागा, प्राणीसंगहालय, प्राण्यांचा दवाखाना, अभयारण्य, वनक्षेत्र आणि खरे जंगल ह्या सर्वातला (त्यातही सर्व खाजगी आणि सरकारी) फरक समजून घ्या. . साधारणपणे लक्षात आला फरक की सांगा. इल्लीगल वाईल्ड अ‍ॅनिमल ट्रेडिंग मधले अगदी लेटेस्ट रिपोर्ट च्या लिंका देईन तुम्हाला. सोबतच रिपोर्ट बनवणार्‍यांना कशा लगेच अनंत लीगल नोटीसा आल्या त्याचीही लिंक देईन. . काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

तुंम्ही संदर्भ बघताय का?

स्वधर्म
Fri, 08/08/2025 - 16:26 नवीन
>> का वनविभागातील डॉक्टरही गावकऱ्यांना,अंबानीला फसवत आहेत? या व्हिडिओत स्पष्ट सांगितलेले आहे, की वनविभागाच्या डॉक्टरांचा महादेवी निरोगी असल्याचा रिपोर्ट बाजूला ठेवण्यात आला व हाय पेटाच्या याचिकेनंतर पॉवर कमिटी नेमण्यात आली होती, त्यांनी वेगळा रिपोर्ट दिला. Nandni Elephant Kolhapur: जैन मठातील हत्ती अंबानींच्या वनतारात, नांदणीच्या महादेवीचं काय होणार? बाकी >> ३३ एकटी राहून तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते या बाबत मी आधीच सहमती नोंदवली आहे. पण 'तुंम्ही अजूनही अंबानी बिचारे किती प्रेमाने हत्तीला सुविधा द्यायला गेले होते, किती उदात्त विचार होता' यातून बाहेर येणार की नाही? अख्या भारतातून हत्ती कसे वनताराला नेले जात आहेत, याचे वर दिलेले संदर्भ तरी बघा. Madhuri Elephant Kolhapur: मंगळवारच्या बैठकीत काय तोडगा निघणार? माधुरी परतण्याची किती शक्यता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

घटनाक्रम असा आकलनात येतोय.

Bhakti
Fri, 08/08/2025 - 16:43 नवीन
घटनाक्रम असा आकलनात येतोय. म्हणजे माधुरी ठणठणीत होती,तिला अंबानीनेने विकत घेतलेल्या यंत्रणेमुळे वनाताऱ्यात हलवले,ओके. पुढे गावकऱ्यांनी आंदोलन केले ,ओके आता हत्ती परत गावात येणार ,ओके पण २०० एकर जागा महाराष्ट्राची बळकवणार(जे आता सांगितले जात आहे),नॉट ओके आता मठाने सरळ कोर्टात जाऊन हत्ती बरा झाला की सरकारी/मोकळ्या जंगलात सोडावा अशी केस करावी.तर खरंच सर्व हत्तींना न्याय मिळेल.
पण 'तुंम्ही अजूनही अंबानी बिचारे किती प्रेमाने हत्तीला सुविधा द्यायला गेले होते, किती उदात्त विचार होता' यातून बाहेर येणार की नाही?
अहो,आजारी माणसाला थेट जंगलात सोडता येते का?(तुमच्या म्हणण्याप्रमाणे आजारी असल्याचा रिपोर्ट खोटा पण आरोग्याविषयी कोणतीच रिस्क आजारी असणाऱ्यांच्या जवळची व्यक्ती घेत नाही,या दृष्टिकोनातून मी तिला मानसिक आजारी (एकटी) तर नक्कीच समजते) नाही मग वनतारात जायची वेळ यायच्या आधी आम्हाला ती मुक्त पाहिजे तिला जंगलात सोडा हा मोठेपणा सर्वांनी ज्यांनी हत्ती पाळला त्यांनी घ्यावा ,हीच आता कळकळीची विनंती आहे. थांबते आता,माधुरी देव तुला खूप आरोग्यदायी आयुष्य देवो! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

सहमती

स्वधर्म
Fri, 08/08/2025 - 16:53 नवीन
>> ती मुक्त पाहिजे तिला जंगलात सोडा याबाबत मी आधीच सहमत आहे. गावकर्‍यांचे कितीही प्रेम असले तरी जंगलातील राहणे तिच्यासाठी मठापेक्षा चांगलेच आहे असे मी अनेकदा म्हटलेच आहे. >> तिला अंबानीनेने विकत घेतलेल्या यंत्रणेमुळे वनाताऱ्यात हलवले,ओके. याला तुंम्ही ओके म्हणत आहात, माझेही तेच म्हणणे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

अर्

अभ्या..
Fri, 08/08/2025 - 17:01 नवीन
३३ एकटी राहून तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते, मला तर हे वाक्य वाचल्यापासूनच आमच्या राहुल्यासह तमाम ब्रह्मचार्‍यांची काळजी वाटू लागली. पण नंतर विचार केला प्राणी आणि माणूस ह्यात काही फरक आहे की नाही. मग जाणवले धागा त्या फरकावरच तर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

रावल्या बँकॉकला जातो असे

आग्या१९९०
Fri, 08/08/2025 - 17:09 नवीन
रावल्या बँकॉकला जातो असे कोणीतरी म्हणेल इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

गावाकऱ्यांचे प्रेम आहे म्हणजे

कॉमी
Sat, 08/09/2025 - 18:53 नवीन
गावाकऱ्यांचे प्रेम आहे म्हणजे हत्तीची अगदी व्यवस्थित काळजी घेतली जातीये असे असेलच असे नाही. कितीही प्रेम असले तरी शेवटी हत्तीची काळजी घेण्याचे कसब, रिसोर्सेस त्यांच्याकडे असतीलच असे नाही. एकूण हया चर्चेत मला असे वाटले - अंबानीचे नाव आल्यावर जे कोणी "मठात हत्तीची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही" असे मत देणाऱ्या सगळ्या संस्था, व्यक्ती ऑटोमॅटिकली बायस्ड आहेत असा सूर जाणवला. हे फारसे पटले नाही. समाजमाध्यमांत दिसणाऱ्या फोटो आणि व्हिडीओज वरून मठात हत्ती टूणटूणीत आहे असा निष्कर्ष घाईघाईचा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

सहमत आहे

स्वधर्म
Sat, 08/09/2025 - 21:37 नवीन
बरोबर! प्रेम असणे वेगळे, काळजी घ्यायची क्षमता असणे वेगळे व हत्तीसाठी माणसांत रहावे लागते हे ही वेगळे! हा लेख लिहिताना मलाही फक्त मठ व नांदणीचे गावकरी यांच्यावर अन्याय झालाय असे वाटत होते. पण जसजशी चर्चा पुढे गेली तसतसे काही सदस्यांच्या प्रतिसादामुळे हत्तीवरही कसा अन्याय होत होता हे लक्षात आले. मिपाचे हेच तर वैशिष्ट्य आहे. अर्थात आपले म्हणणे अधिक माहिती मिळाली तर बदलण्याची लवचिकता हवी. हे सगळे केवळ माणसाच्या हट्टासाठी, भावनेसाठी व हौसेसाठी असते असे लोकसत्ताचा आजचा अग्रलेख म्हणतो. माधुरी हत्ती व मुंबईतली कबुतरे या दोन वादांच्या संदर्भात. भूतदयेचे भूत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

खरा प्लॅन

कपिलमुनी
Fri, 08/08/2025 - 14:37 नवीन
पुष्पक विमानातून फिरत असताना राधिका नामे भार्येने अनंतास पृच्छा केली , ही खाली गर्द हिरवी वनराई दिसते ती कोणती बरे ? अनंत वदला , करवीर नगरीहून काही कोस दूर असलेले हे राधानगरी नावाचे निबिड अरण्य आहे , इथे वेगवेगळे पशु पक्षी रहतात, त्या अरण्यावर मोहीत होउन ती स्त्री म्हणाली, नाथ ..मजला या अरण्यात निवास करायचा आहे . अनंत करवदला, "करवीर नगरीची माणसे लई वांड ! हित पैसा नाय माणुस्की बघत्यात".. नाथाचे हे बोलणे ऐकून राधिका रुष्ट झाली .. भार्येचा म्लान मुखकमल पाहून अनंतास गमेना.. सर्व पिझ्झा , बर्गर त्यास तॄणासमान भासू लागले.. अरण्य तर हवे पण कोल्हापूरकर तर लैच हार्ड अशी त्याची द्विधा मनस्थिति झाली.. तेव्ढ्यात त्याला नारदमुनींची आठवण झाली.. फोन फिरवताच मुनी हजर झाले , मनीची व्यथा ओळखली .. म्हणाले, राजन , अशी स्कीम करा की कोल्हापूरकरांनी २००-३०० एकर स्व:ताहून तुम्हाला द्यायला हवी.. नारदाने अनंताशी कानगोष्ट केली आणि गालातल्या गालात हसत अंबानी पुत्राने पेटास्त्र बाहेर काढले .. --------------------------------------------------------------- बाकी तुम्ही सूज्ञ आहातच .. आता वनतारा पार्ट २ सूरू झाला की भेटू
  • Log in or register to post comments

तुमच्या जंगलात नेऊ नका,

Bhakti
Fri, 08/08/2025 - 15:00 नवीन
तुमच्या जंगलात नेऊ नका, आमच्याकडे मोकळी जागा मागू नका.साखळदंडात राहू द्या हत्ती ,एकटा रडत डोलत. ह्यांना म्हणे माणूसकी,आणि म्हणे अंबानीच तेवढा व्यापारी!! झेपत नाही तर पाळावाच कशाला हत्ती??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सहमत पण

स्वधर्म
Fri, 08/08/2025 - 15:12 नवीन
आपल्या प्रतिसादाची चुकामूक झाली. पण हत्तीला त्याच्या नैसर्गिक अधिवासाशिवाय व एकटे ठेऊ नये याबाबत सहमत आहे. प्राण्याच्या लैंगिक सुखावर माणसाच्या हौशीसाठी घाला घालणे कमालीचे क्रूर आहे. पण... वनताराच का? केरळ, काझीरंगा, अरूणाचल, आसाम, त्रिपुरा ही भारतीय वनखात्याच्या अखत्यारितील ठिकाणे का नकोत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

पाळीव हत्ती थेट जंगलात सोडला

कॉमी
Sat, 08/09/2025 - 18:57 नवीन
पाळीव हत्ती थेट जंगलात सोडला तर जगणार नाही. वनतारा मध्ये बऱ्यापैकी नैसर्गिक अधिवास आणि आरोग्याची काळजी घेतली जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

ओह्ह्ह्हो,

अभ्या..
Sat, 08/09/2025 - 20:17 नवीन
ओह्ह्ह्हो, जरा उशीर केला मालक तुम्ही. हत्ती तर परत येणारेच आहे, सोबत नांदणीला सरकारमान्य अंबानींच्या वनताराची सॅटेलाईट सेंटरची ग्रँड ऑफर घेऊन आलाय. नुसती लक्ष्मी न्हाई, गजान्तलक्ष्मी हाय गजान्तलक्ष्मी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

हत्तीच्या तब्येतीची काळजी

अमरेंद्र बाहुबली
Sat, 08/09/2025 - 20:27 नवीन
हत्तीच्या तब्येतीची काळजी वनताऱ्याला पळवून नेल्यावरच कशी झाली? आणी खरोखर काळजी असेल तर वनताराच का? स्थानिक डॉक्टरनी हत्तीची तब्येत चांगली आहे असा रिपोर्ट दिला, तरीही तो रिपोर्ट झिडकारून सत्तेचा गैरवापर करून हत्ती पळवणे समर्थनीय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

अगदी रास्त शंका

स्वधर्म
Sat, 08/09/2025 - 21:45 नवीन
मलाही एका वन्यजीवांचा अभ्यास असलेल्या व्यक्तीने सांगितले की जंगली हत्तींना सगळी झाडे, पाणी, खायला कुठे मिळेल व त्याच्या वाटा माहित असतात. ऋतूमानानुसार हे सगळे त्यांना माहित असते. त्यामुळे एका हत्तीला सोडले तर तगेल की नाही हा प्रश्नच आहे. एकट्या नंतर सोडलेल्या हत्तीला इतर हत्ती कळपात सामावून घेतील का हाही प्रश्नच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

झेपत नाही तर पाळावाच कशाला

अमरेंद्र बाहुबली
Fri, 08/08/2025 - 15:51 नवीन
झेपत नाही तर पाळावाच कशाला हत्ती?? तरी पण मग झेपत नाही तर पाळावाच कशाला हत्ती??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

झेपत नाही तर पाळावाच कशाला

अमरेंद्र बाहुबली
Fri, 08/08/2025 - 16:49 नवीन
झेपत नाही तर पाळावाच कशाला हत्ती?? तरी पण वनताराच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

सहमत

रीडर
Sat, 08/09/2025 - 22:38 नवीन
या मठ, गावकरी वगैरे लोकांचा कांगावा बंद करून हत्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जिथे नीट काळजी घेतली जाईल तिथेच तिला राहू द्यायला हवं. या लोकांनी तिची काळजी काय घेतली ते दिसतयंच. वनतारा मध्ये या मठापेक्षा नक्कीच चांगलं आयुष्य मिळेल तिला. स्वतःच्या स्वार्थासाठी प्राण्यांना त्रास देणं बंद करायला हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा