✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर

स
सागर यांनी
Mon, 12/24/2007 - 19:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33732 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

म
मुक्त विहारि Fri, 02/21/2025 - 05:45 नवीन

लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद....

जपानी संस्कृतीचा अभ्यास करा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 02/23/2025 - 11:27 नवीन

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मला

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मला वाटते एकच दूरदृष्टीचा नेता होता ते म्हणजे सुभाष चंद्र बोस, इंग्रजाना हरवू शकेल अश्या देशांची मदत घेण्याची कल्पना नेताजीना सुचली आणी ती त्यांनी अमलात ही आणली, जीवावर खेळून कलकत्ता - पेशावर- काबुल -ताशकन्द- मॉस्को आणी मग बर्लिन पोहोचणे तिथे थेट हिटलरला भेटणे, त्यानंतर पाणबुडीने जपानला पोहोचून टोजो ह्या जपानी पंतप्रधानाना भेटणे खरोखर अलौकिक होते त्यानंतर आझाद हिंद सेनेची स्थापना करून अंदमान निकोबार बेटे ताब्यात घेणे खरोखर अलौकिक आहे. दुसरे महायुद्ध जर्मनी जपान हरल्यामुळे त्यांच्या ह्या सर्व मेहनतीवर पाणी फेरले गेले, जर दुसरे महायुद्ध जर्मनी जपान जिंकले असते तर निश्चितच भारताचे पहिले पंतप्रधान/राष्ट्रपती अथवा भारतीय नाझी-इम्पीरियल सरकारचे प्रमुख म्हणून सुभाषचंद्र बोस असते नी जगात एक शक्तिशाली व्यक्ती म्हणून ओळखले गेले असते. भारताला जर्मनी नी जपानने महत्वाचे स्थान दिले असते ते सुभाषबाबूंमुळे. जितके मी वाचलेय त्याप्रमाणे सुभाष बाबूंचा खरोखर तैवान मध्ये मृत्यू झाला कारण त्यांचा सहकारी त्यांच्या सोबत होता नी त्याने हे सर्व पाहिले होते. अथवा सुभाषबाबू रशियाला गेले असावेत नी तिथे स्टॅलिनने काहीतरी दगाफटका केला असावा, अथवा सुभाषबाबू भारतातच असावे नी त्याना ब्रिटिशानी युद्धगुन्हेगार घोषित केल्याने अज्ञातवासात ते गेले असावेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/23/2025 - 19:12 नवीन

लोचट असलात तरी... सुभाष चंद्र बोस यांच्या बाबतीत योग्य बोललात...

पण, अजून काही पुस्तके वाचा... वीर सावरकर , बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल, हे पण उत्तम दूरदृष्टी असलेले नेते. हा एक भाग झाला. आणि आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना परमपूज्य नेहरू यांनी भारतीय सैन्य दलात सामावून घेतले नाही. अशा परिस्थितीत, सुभाष चंद्र बोस यांनी अज्ञातवास पत्करला असण्याची शक्यता जास्त. हा दुसरा भाग तिसरा महत्त्वाचा भाग असा की, नशीब ब्रिटिश सरकारच्या बाजूने होते. आसाम मध्ये आझाद हिंद सेनेने एक दिवस आधी शरणागती पत्करली. चौथा महत्वाचा भाग असा की, सुभाष चंद्र बोस कधीच जपानी किंवा जर्मनीच्या हातातील बाहुले झाले नसते. पाचवा आणि महत्वाचा भाग असा की... भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मला वाटते एकच दूरदृष्टीचा नेता होता ते म्हणजे सुभाष चंद्र बोस... चक्क तुम्हाला हे उशीरा का होईना पण जाणवलं, हे वाचून आनंद झाला....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
श
श्रीगुरुजी Fri, 03/14/2025 - 21:16 नवीन

असे म्हणतात की इंग्रजांनी देश

असे म्हणतात की इंग्रजांनी देश सोडताना एक अट घातली होती की सुभाषचंद्र बोस जेव्हा सापडतील तेव्हा ते युद्ध गुन्हेगार असल्याने भारताने त्यांना ब्रिटिशांंच्या हातात सोपविले पाहिजे व इंग्लंड आपल्या देशात त्यांचा न्यायनिवाडा करेल व नेहरूंनी ही अट मान्य केली होती कारण सुभाषचंद्र बोस सापडले असते तर त्यांना पंतप्रधान करावे असा जनतेचा दबाव येऊन नेहरूंना पंतप्रधानपद सोडावे लागले असते. म्हणून सुभाषचंद्र बोस कायम अज्ञातवासात राहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/14/2025 - 20:00 नवीन

आज एक भारी किस्सा घडला! नाझी

आज एक भारी किस्सा घडला! नाझी भस्मासुराचा उदयास्त पुस्तक मी लॅपटॉप मध्ये उघडलेले होते. त्याच्या पहिल्या पानावर हिटलरचा फोटो आहे, माझा एक कलीग जवळ आला हा कोण नी काय केल ह्याने वगैरे विचारू लागला, त्याला मी पुस्तकाबद्दल सांगितले नी चर्चा लांबत गेली, हिटलरने केलेले इंग्लंड, रशियावरील हल्ले नी ज्यू हत्याकांडाबद्दल ज्यात गॅस चेंबर मध्ये लोक नेले जायचे नी गॅस सोडून मारायचे नी बाहेर काढून भट्ट्यात जाळायचे त्याला सांगितले, तो एवढच बोलला, “हायला हा एवढा डेंजर होता म्हणून ह्याच नाव हिटलर पडले का?” कहर! मी अर्धातास हसत होतो. :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा