✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बडिशोप

अ — अत्रुप्त आत्मा, Wed, 01/15/2025 - 06:30
बडीशोप काही गोड नाही, ती फार मोठी खोडंही नाही . तंबाखू सारखी वाट लावणारी, ती सर्वांगिण ओढंही नाही . हातावर चोळावी लागत नाही. चुन्यासह पोळावी लागत नाही ! तोंडामध्ये कडेला ठेवून, तासंतास घोळावी लागत नाही ! तशी ही सोपी आहे साध्या सहज स्वभावाची कुणाशी मैत्री / वैर / ना प्रेम जो हातावर घेइल , ती त्याची ! आता म्हणणारच तुम्ही ,तंबाखू आणि हिच्यात वेगळं काय ? अहो - हिचे नुसतेच दोन हात ! तिला आणखीन दोन पाय ! आय आय आय ! आला ना आवाज आतून ? हाय हाय हाय ! भाजला ना गाल त्यातून ? आम्ही वळिखले ,तुम्ही आमचे पूर्वाश्रमीचे तंबाखूप प्रेमी ! म्हणूनशानच आम्माला बी म्हैतेत तुमच्या सगळ्याच गेमि ! अहो तंबाखू कुटं ? सौफ कुटं ? दोघींचा काही संबंध आहे का ? हिनी नुसती तल्लफ भागती, तिनी कॅन्सर होत नाय का ? तिचाच नाद सोडून आम्ही हिच्याकडं आलो . . आणि थोड्या दिवसातच हिचेच झालो ! आता हि ही आम्हाला तिच्यासारखीच वाटू लागलीये . कारण दिवसातनं सात आठ वेळा हि ही भेटू लागलीये ! नादच आहे खुळा मला कुणाला तरी भेटण्याचा ! जेवढा मिळेल तेवढा आनंद घेऊन तो चार चौघात वाटण्याचा ! म्हणून निमित्त काढून बडीशोपेचं मी तंबाखूवर कविता केली जास्त राडा न घालता, जशी आली तशी तुम्हाला दिली ! सांगायचे कारण इतकेच की आता मी निकोटीन मुक्त आहे ! फक्त मन माझे वाट पाहते, की कधी मी व्यसनमुक्त आहे ? आसक्तता ही मूळची , वरची पुटे नंतर ! आत्ता एवढेच कळलंय, बाकीचं सांगतो . . समजल्यानंतर ! -------------------------

प्रतिक्रिया द्या
1841 वाचन

💬 प्रतिसाद (5)

आवडली

कर्नलतपस्वी
Wed, 01/15/2025 - 07:30 नवीन
आता आवळा सुपारी वर लिहा.
  • Log in or register to post comments

खिक्क !

अत्रुप्त आत्मा
Sat, 01/18/2025 - 12:47 नवीन
खिक्क ! - धन्यवाद . कविता आवळल्या . . . आपलं ते हे . . आवडल्या बद्दल ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

चान, चान !

चौथा कोनाडा
Sat, 01/18/2025 - 12:58 नवीन
चान, चान ! गायछाप चुना नसली तरी नाही संपली होप गडे चला मिळुनि खाऊ आपण आत्मुसंगे बडीशोप गडे
  • Log in or register to post comments

=))))) ल्लुल्लुल ल्लुल्लु :p

अत्रुप्त आत्मा
Sat, 01/18/2025 - 13:15 नवीन
=))))) ल्लुल्लुल ल्लुल्लु :p
  • Log in or register to post comments

मनोगत आवडले...

मुक्त विहारि
Mon, 01/20/2025 - 16:18 नवीन
छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा