✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध आणि IMEC चे भवितव्य!

ट
टर्मीनेटर यांनी
गुरुवार, 10/12/2023 - 17:13  ·  लेख
लेख

७ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे सहाच्या सुमारास 'हमास' (Hamas) ह्या पॅलेस्टाईन मधील 'सत्ताधारी' दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून (Gaza Strip) अवघ्या वीस मिनिटांत सुमारे ४ ते ५ हजार रॉकेट्स डागून इस्रायलवर हल्ला केला.

एकीकडे रॉकेट हल्ला सुरु असताना हमासच्या दहशतवाद्यांनी 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) म्हणून ओळखली जाणारी, गाझा पट्टी हा पॅलेस्टाईनचा भूप्रदेश आणि इस्रायल ह्यांच्या सीमेवर बांधलेली मजबूत तटबंदी भेदून इस्रायलच्या प्रदेशात घुसखोरी करून स्डेरोट (Sderot) ह्या तटबंदीपासून सुमारे ८५० मीटर अंतरावर असलेल्या इस्त्रायली शहरात तसेच, बीरी (Be'eri) आणि नेतीव हासरा (Netiv HaAsara) अशा इस्रायलच्या सीमावर्ती भागातील कृषी वसाहतींमध्ये शिरत अंदाधुंद गोळीबार करून शेकडो नागरिक आणि सैनिकांना ठार मारले व १५० हुन अधिक इस्रायली महिला आणि लहान मुलांचे अपहरण केले.

१९४८ साली एक देश म्हणून अस्तित्वात आल्यापासूनच अक्षरशः 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असे जीवन जगणाऱ्या इस्त्रायली नागरिकांसाठी युद्ध आणि दहशतवादी हल्ले अजिबात नवे नाहीत, पण इस्रायलच्या दिशेने येणारी रॉकेट्स/क्षेपणास्त्रे हवेतल्या हवेत नष्ट करणारी त्यांची 'आयर्न डोम' (Iron Dome) हि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, गाझा पट्टी ह्या पॅलेस्टाईनच्या भूप्रदेशाला दोन बाजूंनी वेढून (तिसऱ्या बाजूला इजिप्तची सीमा तर चौथ्या बाजूला भूमध्य समुद्र आहे) इस्रायलच्या सीमा सुरक्षित करणारे, 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) हे काँक्रीट आणि पोलादापासून तयार केलेले; शेकडो कॅमेरे, सेन्सर्स आणि रडार्सनी सुसज्ज असलेले आणि इस्रायल कडून 'स्मार्ट फेन्स' (Smart Fence) आणि 'आयर्न वॉल' (Iron Wall) म्हणून गौरवण्यात आलेले चाळीस मैल लांबीचे अत्यंत मजबूत असे कुंपण, आणि जगातली 'अत्यंत धाडसी, हुशार आणि सतर्क' असा नावलौकिक कमावलेली 'मोसाद' (Mossad) हि त्यांची गुप्तचर संस्था हे घटक 'हमास' ने डागलेल्या रॉकेट्स पासून तसेच जमिनीवरून तटबंदी भेदून आणि ड्रोन्स व ग्लायडर्सच्या साहाय्याने हवेतून इस्त्रायलच्या सीमावर्ती प्रदेशात दहशतवाद्यांनी घुसखोरी करून केलेल्या हल्ल्यांपासून इस्रायली नागरिकांचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याने गेल्या कित्येक वर्षांमध्ये इस्रायलच्या भूमीवर ७ ऑक्टोबर रोजी झालेला हा हल्ला इस्त्रायलच्या अत्यंत जिव्हारी लागला आहे.

अर्थात हमासने 'ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म' (Operation Al-Aqsa Storm) असे नाव देऊन इस्त्रायलवर केलेल्या ह्या हल्ल्यांना अवघ्या काही तासांत चोख प्रत्युत्तर देत इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ह्यांनी हमासला "त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी अद्दल घडवू" असा सज्जड इशारा देऊन पॅलेस्टाईन विरुद्ध युद्ध घोषित केले असून संरक्षण विभागाने ह्या हल्ल्यांची तुलना '९/११' आणि 'पर्ल हार्बरच्या' हल्ल्यांशी केली आहे.

अशांत मध्यपूर्वेतील लेबनॉन, सिरीया, जॉर्डन आणि उत्तर आफ्रिकेतील इजिप्त अशा इस्लामिक देशांनी वेढलेल्या पॅलेस्टाईनच्या अरब बहुल भूप्रदेशात अस्तित्वात आलेल्या ह्या देशाला सातत्याने उद्भवणारी युद्धजन्य परिस्थिती आणि दहशतवादी हल्ले हाताळण्याचा तब्बल पंचाहत्तर वर्षांचा अनुभव आहे आणि 'रोज मरे त्याला कोण रडे' म्हणतात त्याप्रमाणे उर्वरित जगातील सर्वसामान्य नागरिकांनाही आता वारंवार होणाऱ्या ह्या घटनांच्या बातम्या विचलित करत नाहीत इतक्या त्याविषयीच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, ह्याला बहुसंख्य भारतीयही अपवाद नाहीत!

इतकी वर्षे भारताला दूर तिकडे मध्यपूर्वेत होणाऱ्या ह्या संघर्षाची प्रत्यक्ष झळ बसत नव्हती त्यामुळे कोणाचातरी थातुरमातुर निषेध नोंदवून बाकी घडामोडींपासून अलिप्तता राखणे शक्य होते पण आता परिस्थिती थोडी बदलली आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या G-20 परिषदेत 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) हा भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा प्रकल्प मंजूर होण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे.

परंतु नुकत्याच सुरु झालेल्या इस्रायल - पॅलेस्टाईन युद्धामुळे 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' अशा देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भवितव्याविषयी चिंताजनक परिस्थिती उद्भवली असल्याने भारताच्या मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका आणि युरोपात नव्याने स्थापीत होऊ पाहणाऱ्या व्यापक हितसंबंधांना बाधा येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने हे युद्ध, त्याची व्याप्ती आणि परिणाम व इतर घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवणे आता आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे.

['इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) अस्तित्वात आल्यास 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' हे त्याचे सर्वात मोठे लाभार्थी असतील, पण त्याचा सर्वात मोठा फटका (सुवेज कालव्यातुन होणारी मालवाहतूक जवळपास नगण्य होणार असल्याने) इजिप्तला, आणि 'बेल्ट अँड रोड' (BRI ) ह्या चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी असलेल्या पाकिस्तान, इराण, टर्की ह्या देशांना बसणार आहे त्यामुळे IMEC च्या निर्मितीत खोडा घालण्यासाठी सध्या सुरु असलेले हे युद्ध ओढवून घेण्यास हमासला चिथावणी देण्यामागे ह्या देशांचा हात असल्याचा संशय देशो-देशीच्या अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे!]

इस्रायल हा एक देश म्हणून जरी १९४८ साली म्हणजे पंचाहत्तर वर्षांपूर्वी अस्तित्वात आला असला तरी इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन आणि समस्त इस्लामिक जगताच्या ह्या संघर्षाला शंभर वर्षांहून अधीक जुना इतिहास आहे, त्याची बीजे १९१७ साली रोवली गेली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी आपल्या वसाहती सोडताना जगभर ज्या पाचरी मारून ठेवल्या आहेत त्यापैकीच हि एक पाचर आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये! वरकरणी ह्या संघर्षाचे मूळ कारण जरी धार्मिक असले तरी एकंदरीत ह्या विषयाला ऐतिहासिक, भौगोलिक, राजनैतिक, आर्थिक असे अनेक पैलू आहेत आणि त्या पैलूंचे विश्लेषण करण्यासाठी हा धागा प्रपंच.

हा विषय खूप मोठा असल्याने एका लेखात त्या सगळ्यांचा आढावा घेणे अशक्य असल्याने मालिका न लिहिता सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असावी ह्या उद्देशाने सदर धाग्यावर शक्यतो रोज एक ह्याप्रमाणे प्रतिसादरुपी लेख किंवा लघुलेखातून वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करण्याचा मानस आहे आणि त्या प्रतिसादांची (अपडेट होणारी) अनुक्रमणिका खाली देण्याचा प्रयोग करत आहे.

नमुन्यादाखल सध्या डोक्यात असलेले ५ मुद्दे / विषय खाली लिहिले आहेत, अजून काही मुद्दे सुचल्यास त्यांचीही भर घालण्यात येईल.

आगामी प्रतिसादरुपी लेख/लघुलेखांची अनुक्रमणिका:
(खालील प्रतिसाद प्रकाशित केल्यावर त्यांच्या लिंक्स अपडेट करण्यात येतील)

१) युद्धस्य कथा रम्या - 'तिसरा इंतिफादा' (इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध २०२३)

'युद्धस्य कथा रम्या' हि उक्ती प्रमाण मानून ह्या प्रयोगाची सुरुवात ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामूळे सुरु झालेल्या युद्धापासून करत आहे ज्यात इस्रायलच्या 'आयर्न डोम' (Iron Dome), 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) ह्या अत्याधुनिक सुरक्षाप्रणालींना चकवा देत हा हल्ला कसा झाला त्याविषयीची माहिती येणार आहे.

२) 'हमास' काय आहे आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे आणि पैसे कुठून येतात?

रॉकेट्स हे हमास ह्या दहशतवादी संघटनेचे आवडते अस्त्र, गाझा पट्टीत त्यांचे 'गावठी' रॉकेट/मिसाईल निर्मिती कारखाने आहेत, आणि त्यासाठी साहित्य म्हणून ते कशाचा वापर करतात, तसेच अन्य आधुनिक शस्त्रे, क्षेपणास्त्रे व प्रतिबंधित साहित्य तस्करीतून कशाप्रकारे मिळवले जाते हि माहिती फार रंजक आहे...

३) 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC)

'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' ह्या देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती...

४) २०२३ च्या इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाविषयी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रतिक्रिया.

५) इस्रायलची निर्मिती आणि मुस्लिम-अरब जगताशी असलेल्या संघर्षाचा इतिहास.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थकारण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
माहिती

प्रतिक्रिया द्या
49773 वाचन

💬 प्रतिसाद (209)

प्रतिक्रिया

मैत्री करण्यासाठी...

मुक्त विहारि
Tue, 10/24/2023 - 17:22 नवीन
पाकिस्तान, बांगलादेश किंवा पॅलेस्टाईन पेक्षा.. इस्त्रायल उत्तम... बौद्ध मूर्तींचे तोडफोड केल्या पासून, अफगाणिस्तान देखील बेभरवशी आहे.. बाकी इतर आखाती देश, आपल्या सीमेपासून दूर असल्याने, जितक्यास तितके संबंध उत्तम....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काही अपडेट?? इस्रायल सैन्य

अमरेंद्र बाहुबली
Wed, 10/25/2023 - 12:49 नवीन
काही अपडेट?? इस्रायल सैन्य गाझाच्या वेशीवर ऊभं होतं ते आत घुसलंय की नाही?? मानवतावादी, दवाखाना संघटना (WHO) इस्रायल ला हाग्यादम भरताहेत अश्या बातम्या आल्या होत्या. हमास ने हल्ला केला तेव्हा झोपल्या होत्या का ह्या संघटना??
  • Log in or register to post comments

गेल्या २४ तासांत गाझा पट्टीतील सुमारे ४०० हमासच्या तळांवर

टर्मीनेटर
Wed, 10/25/2023 - 13:25 नवीन
गेल्या २४ तासांत गाझा पट्टीतील सुमारे ४०० हमासच्या तळांवर इस्त्रायलने केलेल्या बॉम्बवर्षावात एकूण ७०४ जण (हमासचे दहशतवादी + पॅलेस्टिनी लोकं) मृत्युमुखी पडले आहेत. सध्या सुरु असलेल्या युद्धात इस्त्रायलच्या प्रतिहल्ल्यात २४ तासांत मृत्युमुखी पडणाऱ्यांचा हा आकडा आत्तापर्यंतचा सर्वात जास्त असल्याचे म्हंटले जात आहे. सुमारे २२० ओलीसांची सुटका हमास करत नाही तोपर्यंत हे हल्ले सुरूच राहणार असून गाझा पट्टी 'हमास मुक्त' करण्याचे आमचे हे अभियान दीर्घकाळ चालेल असे इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्याने म्हंटले आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

इस्रायलशी वाकडं त्याचे नदीवर

अमरेंद्र बाहुबली
Wed, 10/25/2023 - 15:22 नवीन
इस्रायलशी वाकडं त्याचे नदीवर लाकडं, इस्रायलशी नीट त्याला सोन्याची वीट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

इस्रायलशी नीट त्याला सोन्याची वीट.

मुक्त विहारि
Wed, 10/25/2023 - 16:51 नवीन
हे पण नाही... पण, इस्त्रायलची सीमा, आपल्याला लागून नसल्याने, जमीन बळकावणे हा त्रास नाही... शिवाय, येन केन प्रकारेण, आपला धर्म वाढवावा ही ज्यु लोकांची भूमिका आत्ता तरी नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हमास ने हल्ला केला तेव्हा झोपल्या होत्या का ह्या संघटना??

मुक्त विहारि
Wed, 10/25/2023 - 13:48 नवीन
ही नेहमीचीच पद्धत आहे. आधी खोडी काढायची आणि मग अशा संघटनांना ढाल म्हणुन पुढे करायचे. ते नाहीच जमले तर, आपलेच उदारमतवादी ढाल म्हणुन पुढे येतातच... हमासने हल्ला केला म्हणून फक्त निषेध व्यक्त करतील आणि हमास म्हणजे पॅलेस्टाईन नाही, अशी सारवासारव करतील. हे म्हणजे, लष्कर ते तोयबा, म्हणजे पाकिस्तानी नाहीत, असेच म्हणण्या सारखे आहे.. जाता जाता एक उदाहरण देतो... कसाबने हल्ला केला तेंव्हा मी कुवैतला होतो. कितीतरी पाकिस्तानी कसाबने हल्ला केल्याने खुष होते. बरे झाले की, मी आखाती देशांत काम केले. माझे उदारमतवादी धोरण गळून गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काल इस्रायलच्या राजदुताने

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 10/26/2023 - 20:27 नवीन
काल इस्रायलच्या राजदुताने भारताला विनंती केलीय की भारताने हमास ला दहशतवादी संघटना घोषीत करावी. ( म्हणजे पहा भारतीची भूमिका किती लेचीपेची आहे.)
  • Log in or register to post comments

१०० पेक्षा जास्ती देशांनी दहशतवादी घोषित केलेल्या

टर्मीनेटर
गुरुवार, 10/26/2023 - 21:22 नवीन
म्हणजे पहा भारतीची भूमिका किती लेचीपेची आहे.
भारताची पॅलेस्टाईन आणि इस्त्रायलबाबतची भूमिका पूर्वीपासूनच अत्यंत दळभद्री राहिली आहे. १०० पेक्षा जास्ती देशांनी दहशतवादी घोषित केलेल्या आणि 'आधुनिक दहशतवादाचा जनक' म्हणवल्या जाणाऱ्या 'यासर अराफत' सारख्या पॅलेस्टिनी नेत्याला भारताने पहिल्यांदा 'नेहरू गुड-विल पुरस्कार' हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. भारताच्या ह्या कृतीमुळे त्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची 'गरिमा' इतकी वाढली होती कि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ह्या पुरस्कार सोहळ्याला मीडिया कव्हरेज देणे बंद केले होते. हि एकच नाही, तर अशा अनंत चुका आपल्या पूर्वसुरींनी इतिहासात करून ठेवल्या आहेत पण राजकीय चर्चांना मिपावर बंदी असल्याने त्यावर भाष्य करणे टाळतो. तसेही आपल्या देशात व्यक्तिपूजक खूप लोकं जास्त असल्याने त्या निंदनीय कृतींचेही समर्थन करण्यास ते लोक मागेपुढे पाहात / पहाणार नाहीत. फक्त भुतकाळातल्या चुकांची वर्तमानात आणि भविष्यात भारताकडुन पुनरावृत्ती होउ नये एवढीच अपेक्षा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भुतकाळातल्या चुकांची वर्तमानात आणि भविष्यात भारताकडुन पुनरावृत्त

मुक्त विहारि
Fri, 10/27/2023 - 08:09 नवीन
भुतकाळातल्या चुकांची वर्तमानात आणि भविष्यात भारताकडुन पुनरावृत्ती होउ नये एवढीच अपेक्षा! ----- अपेक्षा ठेवून, काहीही फायदा नाही... हिंदू इतिहासातून काहीही शिकत नाहीत. हिन्दू कधीच एकजूट झालेले नाहीत, आज ही नाहीत आणि पुढेही होणार नाहीत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

>>>हिंदू इतिहासातून काहीही

अहिरावण
Fri, 10/27/2023 - 10:57 नवीन
>>>हिंदू इतिहासातून काहीही शिकत नाहीत. हिन्दू कधीच एकजूट झालेले नाहीत, आज ही नाहीत आणि पुढेही होणार नाहीत.... तरीही मुसलमानांना पाच पन्नास वर्षात युरोप, आफ्रिकेतील पूर्ण देश मुसलमान करायला जमले ते हजार वर्षे घालवून ५० टक्के पण जमले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कारण....

मुक्त विहारि
Fri, 10/27/2023 - 17:11 नवीन
लचीत बडफुकन, छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, राणा संगा हे जन्माला येत होते... आता, कुणीही येणार नाही... का येणार नाही? ह्याची कारणे, प्रत्येकाने आपापल्या परीने शोधावित... एक साधे उदाहरण देतो... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजात देखील एकवाक्यता किंवा एकाच पक्षात येण्याची समान विचारधारा नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

>>आता, कुणीही येणार नाही...

अहिरावण
Sat, 10/28/2023 - 10:59 नवीन
>>आता, कुणीही येणार नाही... लचीत बडफुकन, छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, राणा संगा जन्माला येण्याआधी सगळे असेच म्हणत होते >> छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजात देखील एकवाक्यता किंवा एकाच पक्षात येण्याची समान विचारधारा नाही... प्रत्येक वेळेस एकाच वंशाकडून अपेक्षा नको. मग राहुलबाबा मी पीएम होतो म्हटले तर काय चूक? माझा मुद्दा सरळ आहे - उद्याचा भविष्यकाल कोणी पाह्यला आहे? आजपासून ५, ५०, ५००, ५००० वर्षांनी काय स्थिती असेल ते आज सांगता येत नाही. पण म्हणून स्थिती अजून बिघडणारच आहे असे मानणे चूक राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

भूतकाळातील घटना बघीतल्या की भविष्य नक्कीच समजेल...

मुक्त विहारि
Sat, 10/28/2023 - 21:01 नवीन
बांगलादेश आणि पाकिस्तान, हे भारताचेच भाग होते.. आणि आत्ता हे दोन्ही वेगळे देश आहेत... हिंदू एक झाले नाहीत तर, जे पर्शिया आणि अफगानिस्तान बाबतीत झाले, ते भारतात व्हायला वेळ लागणार नाही... जाऊ दे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

डिवायडेड बाय कांग्रेस भाजप

अमरेंद्र बाहुबली
Fri, 10/27/2023 - 22:43 नवीन
डिवायडेड बाय कांग्रेस भाजप युनायटेड बाय दळभद्रीपणा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

+२७१०२०२३

रंगीला रतन
Fri, 10/27/2023 - 23:33 नवीन
+२७१०२०२३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

चुक

अहिरावण
Sat, 10/28/2023 - 11:01 नवीन
डिवायडेड बाय कास्ट युनायटेड बाय कल्चर :) कल का किसने देखा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आता पुढे कसं ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/14/2023 - 11:10 नवीन
पॅलेस्टिनी भूमितील जमीन बळकावण्याच्या इस्त्रायलच्या धोरणास विरोध करणा-या ठरावाच्या बाजूने भारताने संयुक्तराष्ट्राच्या आमसभेत मतदान केले. या धोरणाचा भारताला कसा फायदा होईल ? जाणकारांच्या मताच्या प्रतिक्षेत. ( लोकसत्ता : तोतरेपणास तिलांजली) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बाकी काही म्हणा,

टर्मीनेटर
Tue, 11/14/2023 - 11:58 नवीन
बाकी काही म्हणा, लोकसत्ताचे अग्रलेख मात्र विनोदी असतात, चांगली करमणूक होते 😀 तूर्तास इतकेच लिहून थांबतो, उगाच देशी राजकारणावरील चर्चेला तोंड फुटून मिपावरचे सध्याचे उत्सवी वातावरण दूषित व्हायला नको!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अधिक वाचायला आवडेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/14/2023 - 17:23 नवीन
लोकसत्ताचा लेख आपणास विनोदी वाटला असेल वाटु द्या. मतं व्यक्तीसापेक्ष विचारसापेक्ष असतात. भारत सरकारने घेतलेल्या मतावर आपली अभ्यासपूर्ण मतं वाचायला आवडतील. अर्थात, याच धाग्यात आपली दोन वेगवेगळी मतं इथेच वाचायला मिळाली आहेत. ''साधारणपणे दिडेक दशकापुर्वी पर्यंत पॅलेस्टाईन आणि पर्यायाने हमास सारख्या दह्शतवादी संघटनेचा सहानुभुतीदार होतो'' ''पण पुढे आंतरजालाच्या वाढत्या प्रसारामुळे ह्या संघर्षाची दुसरी बाजु समजु लागली'' पहिली आणि दुसरी बाजूबरोबर आणखी एक मत वाचायला आपल्याच प्रतिसादात मिळते ''विद्यमान सरकारच्या आधीच्या भूमिकेविषयी समाधानी असलो तरी (कालांतराने वाजवलेल्या) डबल ढोलकीवर पण भाष्य केले असते'' ? इस्रायल पैसे घेऊन भारताला संरक्षण सामुग्री देतो, मदत करतो आपण इस्त्रायलला मदत केली आहे. आता इस्त्रायलविरोधी भुमिका घेवून भारत काय साधत आहे, आता जगमानस गाझाला मदत केली पाहिजे असे म्हणत आहे. पूर्वी औषधोपचार आणि विषयावर आपण तटस्थ राहिलो आहोत आणि आता मदतीला तयार आहोत. स्थानिकांच्या जीवनमानाचा प्रश्न लोकसत्ता विचारते ते चुक आहे किंवा विनोदी आहे ? आपण या विषयावर फार सविस्तर लिहिले आहे. लोकसत्ताचा विनोद कुठे आहे, तेही समजून घ्यायचंय आणि सध्या भारताच्या धोरणाबद्दल आपलं मतही वाचायला आवडेल. उत्तर लिहिलेच पाहिजे असा आग्रह नाही. एक वाचक म्हणून सर्व नीट समजून घ्यायचंय इतकंच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

लोकसत्ताचे अग्रलेख मात्र विनोदी असतात

मुक्त विहारि
Tue, 11/14/2023 - 21:14 नवीन
उदारमतवादी असतात.. मी, लोकसत्ता मधील फक्त बातम्या वाचतो.... लोकसत्ता वाचून मी माझी मते बनवत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

पुढं काय झालं??

अमरेंद्र बाहुबली
Tue, 11/21/2023 - 22:23 नवीन
पुढं काय झालं??
  • Log in or register to post comments

चार दिवसांचा युध्दविराम घोषित

सौंदाळा
गुरुवार, 11/23/2023 - 17:56 नवीन
चार दिवसांचा युध्दविराम घोषित झाला वाटत. दोन्ही बाजू एकमेकांचे काही ओलीस \ कैदी यांची सुटका करणार आहेत असे पण वाचले. लहान मुले, म्हातारी माणसे वैगैरेंची सुटका झाली तर चांगलेच आहे. पण दक्षिण गाझाचे संपूर्ण निर्लष्करीकरण करायची इस्राईलची मागणी \ इच्छा पूर्ण होणे कठीण दिसत आहे. तरी पण ईस्राईल गाझाचा छोटा का होईना पण लचका तोडेल असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

नाही तोडला तर इस्राईल ला

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 11/23/2023 - 19:10 नवीन
नाही तोडला तर इस्राईल ला मुर्ख म्हणायल हवे. एक बरंय पण इतर देशांना भिक न घालता इस्रायल न हल्ले सुरूच ठेवले. मानवतेच्या नावाखाली इस्रायलने मुर्खपणा केला असता तर त्याचाही भारत झाला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

मानवता वगैरे ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/25/2023 - 12:02 नवीन
निरपराध माणूस युद्धात माणूस मरतो. इस्त्रायलच्या डोक्यावर टेंगुळ आला पण गाझापट्टीतील निरपराधांचे अमानुष बळी घेतले. माणसाचे मरणे दुःखदायक असतं. कोण चुक कोण बरोबर त्यापेक्षा मानवतेचा विचार मोठा वाटतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

गाझातील लोकांना आपण निरपराध

अमरेंद्र बाहुबली
Sat, 11/25/2023 - 13:02 नवीन
गाझातील लोकांना आपण निरपराध परस्पर कसे ठरवलेत?? ४८ किमीच्या चिंचोळ्या पट्टीत हमासचे लोक कुठे लपून बसलेत हे त्या बिचार्या “निरपराध” लोकांना खरंच माहीत नाही?? की त्यांनीच लपवून ठेवलेत?? इस्रायलचे लोक मेले तेव्हा ह्या निरपराध लोकांनी म्हणे आनंदत्सव साजरा केला होता. त्यावेळी मरण दुखदायक नसतं का? तेव्हा कुठे होता मानवतेचा विचार?? की फक्त गाझातील अतिरेकी लपवनारे गाझावासी मेले की मानवतेची आठवण येते?? इस्रायलचे ज्यू मेले तेव्हा मानवता कुठे जाते?? की इस्राईलच्या लोकांना माणूस मानलं जात नाही?? गाझात एकूण एक अतिरेकी आहे, त्यांनीच हमासला निवडूण दिलंय नी तेच लोक हमासचे कमांडर वगैरे लपवून ठेवतात, इस्राइलचे लोक मेले की आनंदोत्सव साजरा करतात नी इस्राईलने चांगलं झोडपून काढलं की मग जगासमोर गळे काढायला मोकळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अप्रतिम! निःशब्द करणारा प्रतिसाद!

सर टोबी
Sat, 11/25/2023 - 14:07 नवीन
एक छोटीशी शंका आहे. हमास इस्राएलच्या स्थापनेची प्रतिक्रिया म्हणून जन्माला आली कि काही उडाणटप्पू, चेंडू ऐवजी हॅन्डग्रेनेड शी खेळणाऱ्या लोकांमुळे जन्माला आली? बाकी हिंदू, त्यातही भारत आणि महाराष्ट्रात जाणीवपूर्वक जन्म घेतला त्या सर्वांविषयी मला खूपच आदर आहे. हे असं ठरवून कसा जन्म घेता येतो ये कळले तर बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मानवता सर्वत्र सेम.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/25/2023 - 15:37 नवीन
अतिरेकी गाझात असू दे की इस्रायलमधे अतिरेकी संपवायचे म्हणून निरपराध लोक मरू नयेत..मग ते इस्रायलचे ज्यु असोत की गाझातले नागरिक. दोन्हीकडील सामान्य लोक मरणे हे दुःखदायक. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

गाझा पट्टीतील सामान्य माणसे

सुबोध खरे
Sat, 11/25/2023 - 18:24 नवीन
गाझा पट्टीतील सामान्य माणसे अतिरेक्यांना आधार आणि सहाय्य्य करत असतील तर ते संपूर्णपणे निर्दोषी आणि निरपराध मानता येईल का? इस्रायली स्त्रियांवर बलात्कार होताना किंवा अर्भकांवर अत्याचार होताना हि माणसे अमानुषपणे नाचणार असतील तर त्यांच्य्याबद्दल जगाला सहानुभूती वाटेल का? According to the Organization for Economic Cooperation and Development, aid to Palestinians totaled over $40 billion between 1994 and 2020. तीन लाख वीस हजार कोटी रुपये ईतकी मानवतावादासाठी दिलेली मदत जर केवळ भुयारे/ तळघरे खणण्यात आणि क्षेपणास्त्रे अन अग्नीबाण बनवण्यात जाणार असेल तर जगातील लोकांनी नक्की विचार करायला हवा कि आपले दान सत्पात्री आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हेच तर मी सांगतोय, हजारो

अमरेंद्र बाहुबली
Sun, 11/26/2023 - 19:18 नवीन
हेच तर मी सांगतोय, हजारो करोडोची मदत घेऊनही गाझावासी भिक मागत फिरतात नी इस्राइलच्या नावाने बोटे मोडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अतिरेकी लपवनारे निरपराध कसे?

अमरेंद्र बाहुबली
Sun, 11/26/2023 - 19:53 नवीन
अतिरेकी लपवनारे निरपराध कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरसकटीकरण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/26/2023 - 22:05 नवीन
अतिरेकी लपवनारे निरपराध कसे ?
'हमास' या कडव्या संघटनेचं गाझापट्टीत शासन असलं तरी, हमास निरपराध लोकांना कवच म्हणून वापरते असा आरोप इस्त्रायल कायम करते. याचा अर्थ सरसकट नागरिक ’हमासच’ समर्थन करतात असा घ्यायचा ? सरसकट नागरिक अतिरेकी आहेत असे मानायचे ? गाझापट्टीतून स्थलांतर करणा-यांची संख्याही लाखांपेक्षा अधिक आहे. जर ते सगळेच अतिरेकीच असते तर, जीवावर उदार होऊन इस्त्रायलशी लढले असते आणि स्वर्गातील बहात्तर सुंदर-या मिळवल्या असत्या. एखाद्या देशातील, लोकनियुक्त सरकारमधील एखाद्या पंतप्रधानाने किंवा अध्यक्षाने असे फ़र्मान काढले की, उद्या आठवाजेपासून रस्त्यावर यायचं नै. घरात बसून टीव्हीवरील कार्यक्रम बघायचे. किंवा अमुक धमुक तारखेला टाळ-ढोल वाजवायचे असे फ़र्मान काढले तर करावेच लागेल की नै ? गाझातील सरकार तर, ’कडव्या संघटनेचं’ आहे. हमासची नागरिकांवर काही दहशत असेल की नाही ? नागरिक कोणाचं ऐकणार अशावेळी ? एक तर सरकारचं ऐकावे लागेल किंवा इथून परागंदा झालेलं बरं असा विचार ते करीत असतील की नाही ? अशा निरपराधांबद्दल बोलतो आहे. हमासचे हल्ले त्यांचा माज आणि इस्त्रायलचे हल्ले आणि युद्धाची खुमखुमी हे दोघेही मला निरपराधांसमोर समान आहेत. इतकंच. रेश्ट माय केस. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

सरकरा विरूध्द जनतेने बंडं

अमरेंद्र बाहुबली
Mon, 11/27/2023 - 11:06 नवीन
सरकरा विरूध्द जनतेने बंडं केल्याचे ऊदाहरणं आहेत जगात. पण त्या निरपराध लोकांना इस्राईलविरूध्द लढायचंच असेल नी हमासला पाठिंबाच द्यायचा असेल तर कोण रोखनार बिचार्या निरपराध अतिरेक्यांना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+२७११२३

रंगीला रतन
Mon, 11/27/2023 - 22:44 नवीन
+२७११२३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

इस्त्रायलच्या डोक्यावर टेंगुळ

वामन देशमुख
Sat, 11/25/2023 - 18:12 नवीन
इस्त्रायलच्या डोक्यावर टेंगुळ आला पण गाझापट्टीतील निरपराधांचे अमानुष बळी घेतले.
अत्यंत उत्तम तुलनात्मक शब्दरचना! पुरोगामी लोकांकडून हीच अपेक्षित नाही का! बाकी मानवता वगैरेंचा व पुरोगामींचा काय संबंध? बहात्तर सुंदरी मिळण्याशी मतलब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुरोगामी शब्द बदनाम करायचा

अमरेंद्र बाहुबली
Sun, 11/26/2023 - 19:17 नवीन
पुरोगामी शब्द बदनाम करायचा विडा ऊचललाय का? की ऊगाच कुठूनही पुरोगामी शब्द धरून आणून पुरोगामी नेत्यांना बदनाम करायचे कारस्थान आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

निरपराधांचे अमानुष बळी == judicial killing

वामन देशमुख
Mon, 11/27/2023 - 07:48 नवीन
तसं नाही अबा भौ,
इस्त्रायलच्या डोक्यावर टेंगुळ आला पण गाझापट्टीतील निरपराधांचे अमानुष बळी घेतले.
इस्राएलच्या अनेक नागरिकांवर हत्या, अपहरण, बलात्कार अन्वनित छळ असे प्रकार झाले ते म्हणजे फक्त टेंगुळ, आणि इस्राईलने प्रतिकार केला तर ते म्हणजे निरपराधांचे अमानुष बळी अशी तुलना योग्य आहे का? इस्राएलच्या प्रतिकारी हल्ल्यात हमासचे अनेक दहशतवादी ठार झालेले आहेत, त्यांना निरपराध म्हणण्याचा प्रयत्न योग्य आहे का? याच प्रकारचे लोक अफझलच्या न्याय्य शिक्षेला judicial killing ठरवतात, ते योग्य आहे का? अत्यंत चलाखपणे अशी शब्द रचना करून सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा असा प्रयत्न योग्य आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हो म्हणून पुरोगामी शब्द बदनाम

अमरेंद्र बाहुबली
Mon, 11/27/2023 - 09:05 नवीन
हो म्हणून पुरोगामी शब्द बदनाम करायचं काय काम?? त्यांना हमासप्रेमी, अतिरेकीप्रेमी म्हणा. तुम्ही तरी शब्दरचना करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न नाहीतर काय करताय?? आधी मा देखील पुरोगामींना असलं काहीतरी वाचून वाईट समजायचो पण पुरोगामींचं आभाळाएवढं कार्य पाहून कळाले की ते किती महान आहेत ते. त्सामुळे पुरोगामींना कुठेही गोवून बदनामी करायचं थांबवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

आजकाल स्वतःला पुरोगामी

सुबोध खरे
Mon, 11/27/2023 - 12:11 नवीन
आजकाल स्वतःला पुरोगामी म्हणवणारे सगळे एकजात भंपक, दुटप्पी आणि हलकटच दिसतात. यामुळे पुरोगामी हा शब्द्च बदनाम झालेला आहे यामुळे अस्सल पुरोगामी स्वतःला पुरोगामी म्हणवत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मनूवादी सनातनींना आपला

अमरेंद्र बाहुबली
Mon, 11/27/2023 - 12:57 नवीन
मनूवादी सनातनींना आपला चातुर्वर्णव्यवस्थावादी प्रातशाखीय संघी अजेंडा पुरोगामींमूळे रेटता येत नाही म्हणून ते गल्लीतील हाणामारी ते इस्रायल पॅलेस्टाईन प्रत्येक ठिकाणी पुरोगामी शब्द गोवून चळवळ बदनाम करू इच्छितात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पुरोगामी म्हणजे नेमके कोण?

वामन देशमुख
Mon, 11/27/2023 - 13:34 नवीन
मागेही एक दोन-वेळा मी "पुरोगामी म्हणजे नेमके काय?", "पुरोगामी असण्याचे नेमके निकष कोणते?" अश्या स्वरूपाचे प्रश्न विचारले होते. पण फारशी काही उत्तरे मिळाली नाहीत.
पुरोगामी शब्द बदनाम करायचा विडा ऊचललाय का?
की ऊगाच कुठूनही पुरोगामी शब्द धरून आणून पुरोगामी नेत्यांना बदनाम करायचे कारस्थान आहे?
हो म्हणून पुरोगामी शब्द बदनाम करायचं काय काम?
या विधानांवरून तुम्ही पुरोगामी आहात / तुम्हाला पुरोगामींबद्धल आपुलकी / सहानुभूती आहे असे मला वाटते. (माझे असे वाटणे चुकही असू शकते.) @अमरेंद्र बाहुबली, तुम्ही सांगा -
  1. पुरोगामीची व्याख्या काय?
  2. पुरोगामी म्हणजे नेमके काय?
  3. पुरोगामी असण्याचे नेमके निकष कोणते?
  4. या निकषांत बसणारे कोण कोण लोक आहेत?
  5. त्या लोकांनी पुरोगामी असण्याची कोणकोणती लक्षणे प्रदर्शित केलेली आहेत?
  6. पुरोगामीबद्धल इतर अतिरिक्त माहिती
मग पुढे बोलू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

फुले शाहु आंबेडकर ह्यांचे

अमरेंद्र बाहुबली
Mon, 11/27/2023 - 16:38 नवीन
फुले शाहु आंबेडकर ह्यांचे विचार अंगीकारनारे पुरोगामी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

कृपया सर्व प्रश्नांची उत्तरे

वामन देशमुख
Mon, 11/27/2023 - 16:58 नवीन
कृपया सर्व प्रश्नांची उत्तरे द्या ही विनंती -
  1. पुरोगामीची व्याख्या काय?
  2. पुरोगामी म्हणजे नेमके काय?
  3. पुरोगामी असण्याचे नेमके निकष कोणते?
  4. या निकषांत बसणारे कोण कोण लोक आहेत?
  5. त्या लोकांनी पुरोगामी असण्याची कोणकोणती लक्षणे प्रदर्शित केलेली आहेत?
  6. पुरोगामीबद्धल इतर अतिरिक्त माहिती
मग पुढे बोलू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

फुले शाहु आंबेडकर ह्यांचे

सुबोध खरे
Mon, 11/27/2023 - 18:47 नवीन
फुले शाहु आंबेडकर ह्यांचे विचार अंगीकारनारे पुरोगामी. मग गांधीजी नेहरू ना मानणारे प्रतिगामी काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मुलींच्या शिक्षणाला विरोध

अमरेंद्र बाहुबली
Mon, 11/27/2023 - 19:41 नवीन
मुलींच्या शिक्षणाला विरोध करनारे, फुलेंना दगडं मारनारे, शाहुंवर गरळ ओकनारे, आंबेडकरांवर टिका करनारे चातुर्वर्ण व्यवस्थावादी, सनातनी, मनुवादी प्रवृत्ती ज्या आजही प्रातशाखेत जातात ते प्रतिगामी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मग गांधीजी नेहरू ना मानणारे

सुबोध खरे
Tue, 11/28/2023 - 10:46 नवीन
मग गांधीजी नेहरू ना मानणारे प्रतिगामी काय? याचं उत्तर दिलेले नाही! त्याच बरोबर स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, श्री शिवाजी महाराजांना मानणारे प्रतिगामी आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मनूवादी सनातनींना आपला

वामन देशमुख
Mon, 11/27/2023 - 14:29 नवीन
मनूवादी सनातनींना आपला चातुर्वर्णव्यवस्थावादी प्रातशाखीय संघी अजेंडा पुरोगामींमूळे रेटता येत नाही म्हणून ते गल्लीतील हाणामारी ते इस्रायल पॅलेस्टाईन प्रत्येक ठिकाणी पुरोगामी शब्द गोवून चळवळ बदनाम करू इच्छितात.
अगदी अपेक्षित! हमास == मनुवादी की इज्राएली== मनुवादी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ह्या दोघांच्या भाडंणात

अमरेंद्र बाहुबली
Mon, 11/27/2023 - 16:38 नवीन
ह्या दोघांच्या भाडंणात पुरोगामींना बदनाम करनारे मनुवादी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

तात्पुरता युद्ध विराम.

कंजूस
Sat, 11/25/2023 - 06:17 नवीन
तात्पुरता युद्ध विराम. काही इस्रायलींना सोडले.
  • Log in or register to post comments

पुरोगामी म्हणजे कोण?

सर टोबी
Mon, 11/27/2023 - 21:01 नवीन
सध्याच्या सरकारचा पहिल्या राज्याभिषेक होण्याआधी जी वातावरण निर्मिती केली गेली त्या मंथनातले एक रत्न म्हणजे पुरोगामी हि वृत्ती. अजून काही रत्न म्हणजे गुलामगिरी, सत्तर वर्षातली निष्क्रियता (ज्यात भाजपा आणि मोदींची देखील वर्ष आहेत पण मोदी तेव्हा नवथर नवरीसारखे होते म्हणून काँग्रेसच त्या निष्क्रियतेचे कर्ते धर्ते), पराभूत मानसिकतेचा इतिहास वगैरे. खरं तर ज्ञान, तर्क, आणि अनुमान याच्या आधारावर आजच्या समाजाची ज्यांनी उभारणी केली ते पुरोगामी कुणाच्या निर्भत्सनेचा विषय कसे काय होऊ शकतात? परंतु पुरोगामी जे काही करतात त्यातून नकळतपणे सनतन्यांच्या सोग्याला हात घातला जातो. त्यातून पारंपारिकपणे पुरोगामी सनातन्यांचे शत्रू होत असत. हल्ली त्यात भर पडली ती म्हणजे पुरोगाम्यांनी निस्पृह असण्याची. म्हणजे फक्त हिंदूंवर टीका नाही करायची. असा प्रश्नच खरं तर उद्भवू नये. आपल्या नद्या, हवा, माती, आणि एकूणच सामाजिक स्वास्थ्याचं जे प्रदूषण आपण बघतो आहोत त्यात सर्वात मोठा वाटा ज्यांचा आहे त्यांना दोष नाही द्यायचा तर कुणाला द्यायचा? दाभोलकरांना हा प्रश्न जेव्हा विचारला जायचा तेव्हा त्यांचं उत्तर असायचं कि जर आपण हिंदूंच्या अनिष्ट प्रथा नियंत्रित केल्या तर इतर समाजावर तशा प्रकारच्या सुधारणांचं दडपण येऊ शकतं. असो. उन्मादी वातावरणात पहिला बळी हा तर्काचाच असतो. थोडक्यात पुरोगामी म्हणजे ज्ञान, तर्क, आणि अनुमान यांच्या कसोट्यांवर चालणारी माणसं. ती तुमच्या कौतुकासाठी आसुसले नसतात किंवा हेटाळण्यामुळे नाउमेद होणारी नसतात. तळटीप: विनाकारण सणकेल प्रतिसादांना कुठलाही उपप्रतिसाद मिळणार नाही. तेव्हा मीच जिंकलो म्हणून छाती पिटण्यास सदर आयडी मोकळे असतील.
  • Log in or register to post comments

अत्यंत ऊत्कृष्ट प्रतिसाद टोबी

अमरेंद्र बाहुबली
Tue, 11/28/2023 - 08:45 नवीन
अत्यंत ऊत्कृष्ट प्रतिसाद टोबी सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा