Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by टर्मीनेटर on गुरुवार, 10/12/2023 - 17:13
लेखनविषय (Tags)
अर्थकारण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
माहिती

७ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे सहाच्या सुमारास 'हमास' (Hamas) ह्या पॅलेस्टाईन मधील 'सत्ताधारी' दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून (Gaza Strip) अवघ्या वीस मिनिटांत सुमारे ४ ते ५ हजार रॉकेट्स डागून इस्रायलवर हल्ला केला.

एकीकडे रॉकेट हल्ला सुरु असताना हमासच्या दहशतवाद्यांनी 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) म्हणून ओळखली जाणारी, गाझा पट्टी हा पॅलेस्टाईनचा भूप्रदेश आणि इस्रायल ह्यांच्या सीमेवर बांधलेली मजबूत तटबंदी भेदून इस्रायलच्या प्रदेशात घुसखोरी करून स्डेरोट (Sderot) ह्या तटबंदीपासून सुमारे ८५० मीटर अंतरावर असलेल्या इस्त्रायली शहरात तसेच, बीरी (Be'eri) आणि नेतीव हासरा (Netiv HaAsara) अशा इस्रायलच्या सीमावर्ती भागातील कृषी वसाहतींमध्ये शिरत अंदाधुंद गोळीबार करून शेकडो नागरिक आणि सैनिकांना ठार मारले व १५० हुन अधिक इस्रायली महिला आणि लहान मुलांचे अपहरण केले.

१९४८ साली एक देश म्हणून अस्तित्वात आल्यापासूनच अक्षरशः 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असे जीवन जगणाऱ्या इस्त्रायली नागरिकांसाठी युद्ध आणि दहशतवादी हल्ले अजिबात नवे नाहीत, पण इस्रायलच्या दिशेने येणारी रॉकेट्स/क्षेपणास्त्रे हवेतल्या हवेत नष्ट करणारी त्यांची 'आयर्न डोम' (Iron Dome) हि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, गाझा पट्टी ह्या पॅलेस्टाईनच्या भूप्रदेशाला दोन बाजूंनी वेढून (तिसऱ्या बाजूला इजिप्तची सीमा तर चौथ्या बाजूला भूमध्य समुद्र आहे) इस्रायलच्या सीमा सुरक्षित करणारे, 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) हे काँक्रीट आणि पोलादापासून तयार केलेले; शेकडो कॅमेरे, सेन्सर्स आणि रडार्सनी सुसज्ज असलेले आणि इस्रायल कडून 'स्मार्ट फेन्स' (Smart Fence) आणि 'आयर्न वॉल' (Iron Wall) म्हणून गौरवण्यात आलेले चाळीस मैल लांबीचे अत्यंत मजबूत असे कुंपण, आणि जगातली 'अत्यंत धाडसी, हुशार आणि सतर्क' असा नावलौकिक कमावलेली 'मोसाद' (Mossad) हि त्यांची गुप्तचर संस्था हे घटक 'हमास' ने डागलेल्या रॉकेट्स पासून तसेच जमिनीवरून तटबंदी भेदून आणि ड्रोन्स व ग्लायडर्सच्या साहाय्याने हवेतून इस्त्रायलच्या सीमावर्ती प्रदेशात दहशतवाद्यांनी घुसखोरी करून केलेल्या हल्ल्यांपासून इस्रायली नागरिकांचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याने गेल्या कित्येक वर्षांमध्ये इस्रायलच्या भूमीवर ७ ऑक्टोबर रोजी झालेला हा हल्ला इस्त्रायलच्या अत्यंत जिव्हारी लागला आहे.

अर्थात हमासने 'ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म' (Operation Al-Aqsa Storm) असे नाव देऊन इस्त्रायलवर केलेल्या ह्या हल्ल्यांना अवघ्या काही तासांत चोख प्रत्युत्तर देत इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ह्यांनी हमासला "त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी अद्दल घडवू" असा सज्जड इशारा देऊन पॅलेस्टाईन विरुद्ध युद्ध घोषित केले असून संरक्षण विभागाने ह्या हल्ल्यांची तुलना '९/११' आणि 'पर्ल हार्बरच्या' हल्ल्यांशी केली आहे.

अशांत मध्यपूर्वेतील लेबनॉन, सिरीया, जॉर्डन आणि उत्तर आफ्रिकेतील इजिप्त अशा इस्लामिक देशांनी वेढलेल्या पॅलेस्टाईनच्या अरब बहुल भूप्रदेशात अस्तित्वात आलेल्या ह्या देशाला सातत्याने उद्भवणारी युद्धजन्य परिस्थिती आणि दहशतवादी हल्ले हाताळण्याचा तब्बल पंचाहत्तर वर्षांचा अनुभव आहे आणि 'रोज मरे त्याला कोण रडे' म्हणतात त्याप्रमाणे उर्वरित जगातील सर्वसामान्य नागरिकांनाही आता वारंवार होणाऱ्या ह्या घटनांच्या बातम्या विचलित करत नाहीत इतक्या त्याविषयीच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, ह्याला बहुसंख्य भारतीयही अपवाद नाहीत!

इतकी वर्षे भारताला दूर तिकडे मध्यपूर्वेत होणाऱ्या ह्या संघर्षाची प्रत्यक्ष झळ बसत नव्हती त्यामुळे कोणाचातरी थातुरमातुर निषेध नोंदवून बाकी घडामोडींपासून अलिप्तता राखणे शक्य होते पण आता परिस्थिती थोडी बदलली आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या G-20 परिषदेत 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) हा भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा प्रकल्प मंजूर होण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे.

परंतु नुकत्याच सुरु झालेल्या इस्रायल - पॅलेस्टाईन युद्धामुळे 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' अशा देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भवितव्याविषयी चिंताजनक परिस्थिती उद्भवली असल्याने भारताच्या मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका आणि युरोपात नव्याने स्थापीत होऊ पाहणाऱ्या व्यापक हितसंबंधांना बाधा येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने हे युद्ध, त्याची व्याप्ती आणि परिणाम व इतर घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवणे आता आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे.

['इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) अस्तित्वात आल्यास 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' हे त्याचे सर्वात मोठे लाभार्थी असतील, पण त्याचा सर्वात मोठा फटका (सुवेज कालव्यातुन होणारी मालवाहतूक जवळपास नगण्य होणार असल्याने) इजिप्तला, आणि 'बेल्ट अँड रोड' (BRI ) ह्या चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी असलेल्या पाकिस्तान, इराण, टर्की ह्या देशांना बसणार आहे त्यामुळे IMEC च्या निर्मितीत खोडा घालण्यासाठी सध्या सुरु असलेले हे युद्ध ओढवून घेण्यास हमासला चिथावणी देण्यामागे ह्या देशांचा हात असल्याचा संशय देशो-देशीच्या अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे!]

इस्रायल हा एक देश म्हणून जरी १९४८ साली म्हणजे पंचाहत्तर वर्षांपूर्वी अस्तित्वात आला असला तरी इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन आणि समस्त इस्लामिक जगताच्या ह्या संघर्षाला शंभर वर्षांहून अधीक जुना इतिहास आहे, त्याची बीजे १९१७ साली रोवली गेली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी आपल्या वसाहती सोडताना जगभर ज्या पाचरी मारून ठेवल्या आहेत त्यापैकीच हि एक पाचर आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये! वरकरणी ह्या संघर्षाचे मूळ कारण जरी धार्मिक असले तरी एकंदरीत ह्या विषयाला ऐतिहासिक, भौगोलिक, राजनैतिक, आर्थिक असे अनेक पैलू आहेत आणि त्या पैलूंचे विश्लेषण करण्यासाठी हा धागा प्रपंच.

हा विषय खूप मोठा असल्याने एका लेखात त्या सगळ्यांचा आढावा घेणे अशक्य असल्याने मालिका न लिहिता सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असावी ह्या उद्देशाने सदर धाग्यावर शक्यतो रोज एक ह्याप्रमाणे प्रतिसादरुपी लेख किंवा लघुलेखातून वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करण्याचा मानस आहे आणि त्या प्रतिसादांची (अपडेट होणारी) अनुक्रमणिका खाली देण्याचा प्रयोग करत आहे.

नमुन्यादाखल सध्या डोक्यात असलेले ५ मुद्दे / विषय खाली लिहिले आहेत, अजून काही मुद्दे सुचल्यास त्यांचीही भर घालण्यात येईल.

आगामी प्रतिसादरुपी लेख/लघुलेखांची अनुक्रमणिका:
(खालील प्रतिसाद प्रकाशित केल्यावर त्यांच्या लिंक्स अपडेट करण्यात येतील)

१) युद्धस्य कथा रम्या - 'तिसरा इंतिफादा' (इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध २०२३)

'युद्धस्य कथा रम्या' हि उक्ती प्रमाण मानून ह्या प्रयोगाची सुरुवात ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामूळे सुरु झालेल्या युद्धापासून करत आहे ज्यात इस्रायलच्या 'आयर्न डोम' (Iron Dome), 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) ह्या अत्याधुनिक सुरक्षाप्रणालींना चकवा देत हा हल्ला कसा झाला त्याविषयीची माहिती येणार आहे.

२) 'हमास' काय आहे आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे आणि पैसे कुठून येतात?

रॉकेट्स हे हमास ह्या दहशतवादी संघटनेचे आवडते अस्त्र, गाझा पट्टीत त्यांचे 'गावठी' रॉकेट/मिसाईल निर्मिती कारखाने आहेत, आणि त्यासाठी साहित्य म्हणून ते कशाचा वापर करतात, तसेच अन्य आधुनिक शस्त्रे, क्षेपणास्त्रे व प्रतिबंधित साहित्य तस्करीतून कशाप्रकारे मिळवले जाते हि माहिती फार रंजक आहे...

३) 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC)

'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' ह्या देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती...

४) २०२३ च्या इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाविषयी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रतिक्रिया.

५) इस्रायलची निर्मिती आणि मुस्लिम-अरब जगताशी असलेल्या संघर्षाचा इतिहास.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

  • Log in or register to post comments
  • 49773 views

प्रतिक्रिया

Submitted by रंगीला रतन on Fri, 10/13/2023 - 22:44

In reply to सहा मिलियन ज्यू लोकांना मारले by कॉमी

Permalink

तुम्ही या आयडीला गंभीर पने

तुम्ही या आयडीला गंभीर पने घेता???
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Sat, 10/14/2023 - 17:02

In reply to सहा मिलियन ज्यू लोकांना मारले by कॉमी

Permalink

श्री कॉमी, तुमचा मुद्दा फक्त तपशीलात फरक आहे,

सहा मिलियन ज्यू लोकांना मारले ते काय प्रत्येकाच्या स्वभावाची चाचणी करून का ?
श्री कॉमी, तुमचा मुद्दा फक्त तपशीलात फरक आहे, मुळ मुद्दा श्री हिटलर वंशद्वेषी होते का हा आहे. श्री हिटलर यांना ज्युंना न मारता मदागास्कार येथे पाठवायचे होते. पण त्या योजनेला युध्द सुरु झाल्यामुळे आणि विरोधी लढणार्‍याचा पाठींबा न मिळाल्याने ज्यु मेले. तुम्ही त्याच हत्याकांडात मेलेले रोमी, समलिंगी, साम्यवादी इ. यांना सोयीस्कररीत्या विसरलात. कधीतरी अगोरे आणि इतर लोकांसाठीही भांडा. नीट बारकाईने विचार केलात तर ज्युंना त्या हत्याकांडाचा फायदा झाला आहे. १. एक देश मिळाला. २. पाश्चिमात्य देशांची आर्थिक मदत मिळाली, लुटलेली संपत्ती परत मिळाली. ३. जगभरात कोठेही ज्यु विरोधात काही लिहु आणि बोलु शकत नाही. ४. कोठेही ज्यु कार्ड दाखवले की लगेच सहानुभुती मिळते.
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on Sat, 10/14/2023 - 18:15

In reply to श्री कॉमी, तुमचा मुद्दा फक्त तपशीलात फरक आहे, by Trump

Permalink

श्री ट्रम्प तुमचे हिटलरचे

श्री ट्रम्प तुमचे हिटलरचे समर्थन घृणास्पद आहे. १. ज्यूंना उचलून हलवणे हा वंशव्देश नाही ? २. समलिंगी आणि सम्यावाद्यांना मारले म्हणजे काय वंशद्वेश नाही असे सिद्ध होते का ? ३. इथे कोणी कोणासाठी भांडत नाहीये. तुम्हीच मध्ये येऊन हिटलर कसा वंशव्देशी नव्हता असे मांडणे चालू केले. तुम्ही उगाच निर्दयी हत्याकांड करणाऱ्यांची तळी उचल थांबवा. ४.
नीट बारकाईने विचार केलात तर ज्युंना त्या हत्याकांडाचा फायदा झाला आहे.
कोपरापासून नमस्कार. साठ लाख लोक मेले आणि त्यामुळे उसळलेल्या आक्रोषाला तुम्ही फायदा म्हणत असाल तर बोलणे खुंटले. मुळात हिटलर वंशद्वेशी नव्हता हे खुद्द हिटलर मान्य करणार नाही. हिटलर केवळ ज्यू वंश नाही, तर इतर अनेक वंशाचा विरोधक होता आणि सो कॉल्ड आर्यन वंशाच्या सत्तेसाठी झगडत होता. इतकी बेसिक माहिती तुम्हाला नसेल तर उगाच मत देणे टाळा.
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Sat, 10/14/2023 - 19:27

In reply to श्री ट्रम्प तुमचे हिटलरचे by कॉमी

Permalink

हिटलरने लाजून दुसऱ्यांदा

हिटलरने लाजून दुसऱ्यांदा आत्महत्या केली असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 10/14/2023 - 19:29

In reply to हिटलरने लाजून दुसऱ्यांदा by रात्रीचे चांदणे

Permalink

हिटलरने लाजून दुसऱ्यांदा

हिटलरने लाजून दुसऱ्यांदा आत्महत्या केली असेल. हिटलरने आत्महत्या केलीच नव्हती. हिटलरची म्हणून जी कवटी सांभाळून ठेवली होती ती एका स्त्रीची निघाली असं कुठेतरा वाचलं होतं. - मूळ धाग्याला फाटे फोडू संघटना.
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on Sat, 10/14/2023 - 19:42

In reply to हिटलरने लाजून दुसऱ्यांदा by अमरेंद्र बाहुबली

Permalink

त्याच्या बायकुची असेल... आता

त्याच्या बायकुची असेल... आता बायका नवर्याची कवटी कधी जागेवर ठेवतात काय? - फाट्यांना अजुन फाटे फोडू संघटना
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Sat, 10/14/2023 - 23:44

In reply to श्री ट्रम्प तुमचे हिटलरचे by कॉमी

Permalink

ज्यु लोकांचा वंश आणि युरोपियन लोकांचा वंश सरमिसळीमुळे जवळपास एकच

श्री ट्रम्प तुमचे हिटलरचे समर्थन घृणास्पद आहे.
तुमच्या भावना मी समजु शकतो. श्री हिटलर यांचे कोणतेही समर्थन येथे होत नाही. फक्त त्या घटनांकडे एक तटस्थ भावनेतुन बघावे अशी अपेक्षा आहे. पण श्री हिटलर यांना आताचे मानवी हक्कांच्या अर्हता लावत आहात. त्या काळात जर जाऊन तुम्ही तुलनात्मक विचार केलात तर श्री हिटलर हे सर्वसामान्य युरोपियन होते असे जाणवेल. (फळ हे झाडापासुन खुप दुर पडत नाही.) ज्यु लोकांचा वंश आणि युरोपियन लोकांचा वंश सरमिसळीमुळे जवळपास एकच आहे. श्री हिटलर हे स्वत:च ज्युचे वंशज होते का ह्याबद्दल अजुन प्रवाद आहेत. https://www.history.com/news/study-suggests-adolf-hitler-had-jewish-and-african-ancestors
मुळात हिटलर वंशद्वेशी नव्हता हे खुद्द हिटलर मान्य करणार नाही. हिटलर केवळ ज्यू वंश नाही, तर इतर अनेक वंशाचा विरोधक होता आणि सो कॉल्ड आर्यन वंशाच्या सत्तेसाठी झगडत होता. इतकी बेसिक माहिती तुम्हाला नसेल तर उगाच मत देणे टाळा.
ते फक्त मते मिळण्यासाठी होते. जेवढी विविधता जर्मनीच्या दुसर्या महायुध्दातील सैन्यात होती तेवढी आताही नाही. वंश ह्या जन्मतः मिळतो. जर नाझी जर वंशभेदी असतील तर त्यांनी ज्यु, पुर्व युरोपियन मुलांचे अपहरण करुन जर्मनीत का आणले असते ? https://www.dw.com/en/the-children-the-nazis-stole-in-poland-forgotten-victims/a-52739589 https://warfarehistorynetwork.com/article/hitlers-lebensborn-children-kidnappings-in-german-occupied-poland/ https://topdocumentaryfilms.com/stolen-children-kidnapping-campaign-nazi-germany/ सगळेच ज्यु श्री नाझीच्या विरोधात नव्हते. उदा. https://en.wikipedia.org/wiki/More_German_than_the_Germans https://en.wikipedia.org/wiki/Association_of_German_National_Jews https://www.tabletmag.com/sections/arts-letters/articles/ellen-feldman-nazi-germany
कोपरापासून नमस्कार. साठ लाख लोक मेले आणि त्यामुळे उसळलेल्या आक्रोषाला तुम्ही फायदा म्हणत असाल तर बोलणे खुंटले.
हा आक्रोश फक्त गोरे मेले म्हणुन आहे. जर हेच अगोरे असते तर सगळे युरोपियन श्री हिटलर यांचे गुणगाण कसत बसले असते. जवळपास तेवढेच लोक भारतात कृत्रिम दुष्काळ पाडुन मेलेत, त्याबद्दल काही लोकांना काहीच वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Sun, 10/15/2023 - 00:05

In reply to ज्यु लोकांचा वंश आणि युरोपियन लोकांचा वंश सरमिसळीमुळे जवळपास एकच by Trump

Permalink

श्री नेत्यान्याहु श्री हिटलर यांच्याबद्दल म्हणत आहेत ते पहा.

श्री नेत्यान्याहु श्री हिटलर यांच्याबद्दल म्हणत आहेत ते पहा. Netanyahu says Hitler didn't want to kill the Jews, but a Muslim convinced him to do it https://www.youtube.com/watch?v=f9HmkRYlVZw आता गेला बाजार, श्री नेत्यान्याहुवर ज्युद्वेषी किंवा नाझी असल्याचा आरोप करु नका म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Fri, 11/17/2023 - 03:11

In reply to ज्यु लोकांचा वंश आणि युरोपियन लोकांचा वंश सरमिसळीमुळे जवळपास एकच by Trump

Permalink

जेवढी विविधता जर्मनीच्या

जेवढी विविधता जर्मनीच्या दुसर्या महायुध्दातील सैन्यात होती तेवढी आताही नाही. श्री हिटलर आणि तात्कालिन जर्मन सैन्याचे बहुविधतेला असलेले प्राधान्य आणि त्याचा एक आढावा येथे दिसते आहे. https://www.goodreads.com/book/show/56417885-triumph-of-diversity Triumph of Diversity: A New Look at Hitler's Armed Forces
https://www.amazon.com/product-reviews/1935590316 According to this book the Nazis were not the bloodthirsty racists that almost every person in the world says they were. In fact, Veronica Clarke's research shows the Nazis were probably the very first who truly celebrated diversity. The Nazis were such non-racists they even allowed dark skinned men in their army! In fact, Hitler was the originator of Affirmative Action, several decades before LBJ. Hitler's philosophy was about promoting his "Rainbow Reich". This was Hitler's dream of getting all of Germany together and going to all the European nations with Hitler's (and Himmler's and Goebbels') humanitarian message of "peace love and diversity" to all of the vibrant cultures they could find. Then, they gathered all these people and the Nazis set up these outdoorsy recreational camps for them - mostly in lovely Poland - where all the different cultures of the world could live together and share their diverse ethnic heritages, and have fun too, all guests of Herr Hitler for as long as they liked. (They did have to do some chores, though!) A truly ground-breaking re-assesment of Nazism and Hitler's meaning in history! Five multi-colored stars!
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Fri, 02/23/2024 - 23:07

In reply to ज्यु लोकांचा वंश आणि युरोपियन लोकांचा वंश सरमिसळीमुळे जवळपास एकच by Trump

Permalink

कोर्टाने श्री हिटलर यांचा निर्णय बदलला.

अजुन एक उदाहरण. श्री हिटलर यांनी जनरल एरीक हॉंपनेर यांना १९४२ मध्ये सैन्यामध्ये काढुन टाकले, त्यांची पेन्शनचा हक्क बंद केला. जनरल एरीक हॉंपनेर यांनी जर्मनीविरोधात खटला भरला; आणि तो जिकंला सुध्दा. कोर्टाने श्री हिटलर यांचा निर्णय श्री हिटलर यांच्या राज्यात बदलला.
In January 1942, Hoepner requested permission from Kluge, the new commander of Army Group Centre, to withdraw his over-extended forces. Kluge advised him that he would discuss the matter with Hitler and ordered Hoepner to get ready. Assuming that Hitler's permission was on the way and not wanting to risk the matter any longer, Hoepner ordered his troops to withdraw on 8 January 1942. Afraid of what Hitler might think, Kluge immediately reported Hoepner, causing Hitler's fury. Hoepner was dismissed from the Wehrmacht on the same day.[42] Hitler directed that Hoepner be deprived of his pension and denied the right to wear his uniform and medals, contravening the law and Wehrmacht regulations.[43] Hoepner filed a lawsuit against the Reich to reclaim his pension. Judges at the time could not be dismissed, even by Hitler, and Hoepner won his case.[44] https://en.wikipedia.org/wiki/Erich_Hoepner#CITEREFKershaw2009
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Fri, 10/27/2023 - 14:01

In reply to श्री हिटलर यांचे विरोधात लढणारे लोकही तितकेच वंशद्वेष्टे होते, by Trump

Permalink

काही अनमोल मोती.

श्री हिटलर यांचे विरोधात लढणारे लोकही तितकेच वंशद्वेष्टे होते, अर्थात त्याचे बळी हे अगोरे असल्यामुळे त्यांचे गुन्हे बहुसंख्य वैचारीक गुलामांना स्वीकारार्ह आहेत.
श्री हॅरी ट्रुमन, अमेरीकेचे युध्दकालीन राष्ट्राध्यक्ष.
I think one man is just as good as another so long as he's honest and decent and not a nigger or a Chinaman. Uncle Wills says that the Lord made a white man from dust, a nigger from mud, and then threw what was left and it came down a Chinaman. He does hate Chinese and Japs. So do I. It is race prejudice I guess. But I am strongly of the opinion that negroes ought to be in Arica, yellow men in Asia, and white men in Europe and America. https://www.trumanlibrary.gov/library/truman-papers/correspondence-harry-s-truman-bess-wallace-1910-1919/june-22-1911
  • Log in or register to post comments

Submitted by रामचंद्र on Tue, 10/17/2023 - 19:29

In reply to . by कॉमी

Permalink

ख्रिश्चनांच्या आत्यंतिक

ख्रिश्चनांच्या आत्यंतिक द्वेषामुळे वेळोवेळी ज्यूंना राहता देश सोडून स्थलांतर करावे लागले असेच वाचायला मिळते. अगदी शेक्सपिअरच्या मर्चंट ऑफ व्हेनिसमधलंही खलपात्र हे ज्यूच आहे. आणि सावकारी करणाऱ्या अथवा धनिक पण अल्पसंख्य वर्गाबद्दल लोकभावना ही सर्वसाधारणपणे नकारात्मकच असते. खुद्द अमेरिकेतही अगदी दुसऱ्या महायुद्धापूर्वी ज्यूंबद्दल कशी भावना होती याबद्दलचा किस्सा अभिनेता कर्क डग्लसच्या आठवणींत वाचायला मिळतो. पूर्व युरोप आणि रशियातही त्यांची स्थिती काही बरी नव्हतीच. आज अमेरिका इस्राईलच्या पाठीशी आहे याचं कारण तिथल्या ज्यूंची (मुख्यतः आर्थिक आणि राजकीय) ताकद आणि एकजूट. स्वकष्टाने प्राप्त केलेली जबरदस्त क्षमता आणि जशास तसे या धोरणाचा पुरेपूर अवलंब यामुळे तिथल्या त्यातल्या त्यात मवाळ मताच्या लोकांना तिथले जहाल लोक थेट वर पोहोचवतात त्यामुळे सतत युद्धाच्या तयारीत राहण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही. आणि आपलंही काही (बरंच!) चुकलं आहे हे मानण्याची दोन्ही बाजूंची तयारी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Sun, 10/15/2023 - 00:16

In reply to अरे बापरे, फारच धाडसी विधान केले आहेत अ बा तुम्ही! by टर्मीनेटर

Permalink

हिटलर यांना फार तर सेक्युलर हुमॅनिस्ट असे म्हणता येतील.

नाझींचा ज्यू द्वेष / विरोधामागे धार्मीक पेक्षा राजकीय उद्देश होता ह्याच्याशी काही प्रमाणात सहमत आहे, आणि त्याची प्रेरणा हिटलरने अन्य युरोपियन देशांकडूनच घेतली होती. काहीही असले तरी नाझींनी केलेल्या अमानुष ज्यू हत्याकांडाचे समर्थन कोणीच करू शकत नाही, पण त्याआधी आपण केलेली पापकर्म झाकण्यासाठी नाझींनी केलेल्या 'होलोकॉस्ट' चा पुढे दोस्तराष्ट्रांनी (विशेषतः ब्रिटनने) इतका गवगवा केला की त्याआधी संपूर्ण युरोपात घडलेल्या अशा ज्यू द्वेषाच्या / हत्याकांडाच्या घटना लोकांच्या विस्मृतीत गेल्या आणि त्यातून 'नाझी = ज्यू द्वेष', ' हिटलर = ज्यूंचा एकमेव कर्दनकाळ' अशी समीकरणेच लोकांच्या मनावर ठसवली गेली.
श्री हिटलर यांना व्यकिशः रिलिजनबरोबर काही देणे घेणे नव्हते. त्यांनी युरोपियन लोकांमध्ये असलेल्या ज्युद्वेषाचा राजकीय पोळी भाजण्यासाठी वापर करुन घेतला. श्री हिटलर यांना फार तर सेक्युलर हुमॅनिस्ट असे म्हणता येतील. ज्युद्वेष हे युरोपियन समाजाचे अंग आहे, फक्त श्री हिटलर यांनी त्याच्यावर फुंकर घातली. पोलंड, फ्रान्स, पुर्व युरोप मधील नाझी पक्षाबरोबर काही संबध नसलेले लोक ज्युंच्या छळाला जबाबदार होते.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Fri, 10/13/2023 - 16:07

In reply to या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला सिद्धांत by धर्मराजमुटके

Permalink

"या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला"

"या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला"
कोणाला पटो किंवा न पटो, पण तुमचा सिद्धांत वाईट नक्कीच नाहीये आणि भले तो प्रॅक्टिकल नसला तरी "दिल को बहलाने को ये ख्याल अच्छा है..." 😀
पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले
वरील वाक्यातील ठळक केलेल्या मजकुराशी संपुर्णपणे सहमत आहे. त्यांच्या ह्या 'बिझनेस फर्स्ट' विषयी मागे परदेशात ऐकलेली (भारतातील २६/११ हल्ल्याशी संबधीत) एक कहाणी आहे, ती नंतर फुरसत मध्ये टंकतो. अनेक लोकांच्या ती पचनी पडणे अवघड असले तरी मनोमन विचार करायला लावणारी नक्की आहे!
पण अमेरीकनांनी त्या फटीत जास्त काड्या सारल्या असे म्हटले तर वावगे ठरु नये.
अर्थातच, ह्यात वावगे काहीच नाही! त्यांच्या तेलाच्या राजकारणातुन त्यांनी मध्यपुर्वेचे अतोनात नुकसान केले आहे हे जगजाहिर आहे. मध्यंतरी अपघाताने कुठल्यातरी न्युज पोर्टलवर एका माजी वरिष्ठ सी.आय.ए. अधिकाऱ्याची मुलाखत बघितली होती त्यात त्याने सांगितलेली एक गोष्ट चांगलीच लक्षात राहिली आहे. तो म्हणाला होता "मध्यपुर्वेतीलच नाही तर जगातील एकही दहशतवादी संघटना अशी नाहीये कि जीचा वापर सी.आय.ए. ने पैसा पुरवुन किंवा हत्यारे पुरवुन कुठे ना कुठे केला नाही!"
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Fri, 10/13/2023 - 23:26

In reply to "या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला" by टर्मीनेटर

Permalink

धन्यवाद !

पण तुमचा सिद्धांत वाईट नक्कीच नाहीये आणि भले तो प्रॅक्टिकल नसला तरी
सिद्धांत प्रॅक्टीकल आहेच पण जगातील बरेच लोक प्रॅक्टीकल विचार न करता भावनातिरेकाने विचार करतात हेच खरे. सिद्धांत तपासून पाहायचा तर जगातील ज्यूंची एकूण लोकसंख्या कोणत्या देशात जास्त आहे याचा अभ्यास करावा लागेल. आता याचे एकदम सोपे उत्तर म्हणजे "इस्त्रायल'. मात्र जगातील एकूण ज्यूं पैकी (४५-४७ %) इस्त्रायल मधे राहतात तर साधारण तेवढेच (४५-४७%) अमेरीकेत राहतात. कॅनडा, फ्रान्सच्या जवळपास २ ते २% लोकसंख्या ज्यूं ची आहे तर इंग्लंड आणि जर्मनीमधे साधारण २% ते १.७५% टक्याच्या आसपास आहे. जर ४०-४५% टक्के ज्यू इस्त्रायल ऐवजी अमेरीकेत राहत असेल तर पवित्र भूमीतच युद्धछायेत रहावे की इतर ठिकाणी सुखाने राहून आपापल्या धर्माची उपासना करावी यापैकी काय जास्त प्रॅक्टीकल आहे हे ठरविणे सोपे आहे. ख्रिश्चन काही कमी धर्मांध आहेत असे नाही पण त्यांच्या चुकांना विरोध करणारे धर्मबंधू त्यांच्यात शेकड्याने / हजारोने / लाखोने सापडतील मात्र मुस्लिम धर्माबद्दल तसे म्हणता येत नाही. तिथे आपले धर्मांध बांधव चूकताहेत हे कदाचित काहिंना माहित असेल देखील पण त्याचा विरोध करणारे पुढे येत नाहीत. “A known devil is better than an unknown angel” अशी एक म्हण आहे तिला अनुसरुन ज्युंना नवीन शत्रुपेक्षा जुने शत्रू परवडले असते असा विचार करणे नक्कीच प्रॅक्टीकल आहे. असो. माझ्याच प्रतिसादांचे समर्थन करण्यासाठी कळफलक बडविण्याचा मला कंटाळा येतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 10/13/2023 - 23:55

In reply to धन्यवाद ! by धर्मराजमुटके

Permalink

पवित्र भूमीतच युद्धछायेत

पवित्र भूमीतच युद्धछायेत रहावे की इतर ठिकाणी सुखाने राहून आपापल्या धर्माची उपासना करावी यापैकी काय जास्त प्रॅक्टीकल आहे हे ठरविणे सोपे आहे.धर्मराजसाहेब, तुमच्या मते पवित्र शहर, पवित्र भूमी सोडून जिवाचा भितीने ज्यूंनी अमेरीका वगैरे सुरक्षीत स्थळ गाठावं. माझ्या मते ज्यू इतके बुळचट नाहीत आणी राहूही नये. आपल्या मायभूमीसाठी सर्वस्व पणाला लावून त्यांनी लढायला हवे. पवित्र भूमी नाहीतरी त्यांनी लढून जिंकलीच आहे. थोडा दमदार मारा करून गाझा नी वेस्टबॅंक संपवावी. नंतर जोर्डन सिरीया लेबनाॅन अति करू लागले तर आजिबात दयामाया न दाखवता त्यांनाही ७२ हुरांकडे स्पीडपोस्टाने पाठवावे. आपल्या धर्मासाठी लढावे हा जास्त प्रॅक्टीकल विचार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Sat, 10/14/2023 - 17:08

In reply to पवित्र भूमीतच युद्धछायेत by अमरेंद्र बाहुबली

Permalink

तुमच्या सारख्या पुरोगामीकडुन ही अपेक्षा नव्हती.

थोडा दमदार मारा करून गाझा नी वेस्टबॅंक संपवावी. नंतर जोर्डन सिरीया लेबनाॅन अति करू लागले तर आजिबात दयामाया न दाखवता त्यांनाही ७२ हुरांकडे स्पीडपोस्टाने पाठवावे.
तुमच्या सारख्या पुरोगामीकडुन ही अपेक्षा नव्हती.
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on Sat, 10/14/2023 - 19:16

In reply to पवित्र भूमीतच युद्धछायेत by अमरेंद्र बाहुबली

Permalink

>>>आपल्या धर्मासाठी लढावे हा

>>>आपल्या धर्मासाठी लढावे हा जास्त प्रॅक्टीकल विचार आहे. अखेर पुरोगामित्वाचा बुरखा फाटलाच म्हणायचा ! मजा आहे... चालू द्या!
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 10/14/2023 - 19:18

In reply to >>>आपल्या धर्मासाठी लढावे हा by अहिरावण

Permalink

बुरखा? कधी घातला? कुणी? कसा

बुरखा? कधी घातला? कुणी? कसा फाटला? धर्मासाठी लढावं, नी धर्माच्या नावाखाली तुंबडी भरनार्यांशी जास्त लढावे.
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on Sat, 10/14/2023 - 19:22

In reply to बुरखा? कधी घातला? कुणी? कसा by अमरेंद्र बाहुबली

Permalink

हो का ? अरे वा ! छानच की !!

हो का ? अरे वा ! छानच की !!
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Sat, 10/14/2023 - 17:03

In reply to "या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला" by टर्मीनेटर

Permalink

ज्यु लोकांवर पैश्याचे लोभी असल्याचा आरोप खुप जुना आहे.

पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले
ज्यु लोकांवर पैश्याचे लोभी असल्याचा आरोप खुप जुना आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 10/14/2023 - 17:42

In reply to ज्यु लोकांवर पैश्याचे लोभी असल्याचा आरोप खुप जुना आहे. by Trump

Permalink

मी पुरोगामी व सनातनी दोन्हीही

मी पुरोगामी व सनातनी दोन्हीही नाही. ज्या वेळी जे योग्य त्याची बाजू घेतो. पण सनातनींचा पुरोगामी द्वेष ऊफाळून येत असेल तर त्याना सत्य दाखवून देतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on Sat, 10/14/2023 - 19:17

In reply to मी पुरोगामी व सनातनी दोन्हीही by अमरेंद्र बाहुबली

Permalink

>>>सनातनींचा पुरोगामी द्वेष

>>>सनातनींचा पुरोगामी द्वेष ऊफाळून येत असेल तर त्याना सत्य दाखवून देतो. आणि पुरोगाम्यांचा सनातनी द्वेष उफाळून आला की मुग गिळून गप्प बसता !! मजा आहे... चालु द्या !!!
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 10/14/2023 - 19:24

In reply to >>>सनातनींचा पुरोगामी द्वेष by अहिरावण

Permalink

पुरोगाम्यांचे पोइंट्स वॅलीड

पुरोगाम्यांचे पोइंट्स वॅलीड असतात. सनातनींसारखे आम्हीच ग्रेट असं पोथी पुरानांचे दाखले देत पुरोगामी फिरत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on Sat, 10/14/2023 - 19:30

In reply to पुरोगाम्यांचे पोइंट्स वॅलीड by अमरेंद्र बाहुबली

Permalink

अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही

अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही पॉईंट नसतात. त्यांना त्यांची मळमळ फक्त काढायची असते. दा़खले पोथीपुरानांचे देत नाही.. मार्क्सचे देत असतात. बाकी पुरोगामी पणा म्ह़णजे काय आहे हे एका पुरोगाम्याने दाखवून दिले आहे.. आयुष्यभर पोथीपुरानांवर टीका केली आणि पोराची मुंज लावली. सत्यनारायणाच्या पूजा घातल्या. :)
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 10/14/2023 - 19:45

In reply to अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही by अहिरावण

Permalink

अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही

अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही पॉईंट नसतात. पोइंट नसते तर एवढ्या सुधारणा झाल्या असत्या का? सनातनींना सळो की पळो करून सोडले असते का? चळवळ एवढी फोफावली असती का? भारताला हिंदू तालिबान बणन्या पासून वाचवले असते का? त्यांना त्यांची मळमळ फक्त काढायची असते. असं फक्त सनातनींना वाटतं. समाजाला माहीतीय की पुरोगामींनी काय केलंय ते. काहींच्या पोटावर लाथ पडल्याने ते पुरोगाम्यांच्या समाजसेवेला मळमळ म्हणतात. दा़खले पोथीपुरानांचे देत नाही.. मार्क्सचे देत असतात. पोथीपुरानांत दाखले देण्यासारखं काहीही नाही.दाखले फकित सनातनी देतात. बाकी पुरोगामी पणा म्ह़णजे काय आहे हे एका पुरोगाम्याने दाखवून दिले आहे.. आयुष्यभर पोथीपुरानांवर टीका केली आणि पोराची मुंज लावली. सत्यनारायणाच्या पूजा घातल्या. :) पुरोगाम्याने वयक्तिक काय करावे तो त्याचा प्रश्न. मुंज लावल्याने किंवा सत्यनारायण घातल्याने समाजाला त्रास होत नाही ना?
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on Sat, 10/14/2023 - 19:49

In reply to अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही by अमरेंद्र बाहुबली

Permalink

>>> पोइंट नसते तर एवढ्या

>>> पोइंट नसते तर एवढ्या सुधारणा झाल्या असत्या का? अच्छा सगळे क्रेडीत पुरोगाम्यांचे का? बर बर >>सनातनींना सळो की पळो करून सोडले असते का? >>>चळवळ एवढी फोफावली असती का? >>>भारताला हिंदू तालिबान बणन्या पासून वाचवले असते का? हिंदू तालीबान ? अक्कल गहाण आहे का तुमची? असेल असेल अनेक पुरोगाम्यांची असते हे आम्ही स्वत: पाहिले आहे >>काहींच्या पोटावर लाथ पडल्याने ते पुरोगाम्यांच्या समाजसेवेला मळमळ म्हणतात. काहींच्या ना? मग सगळे सनातनी का पुरोगाम्यंना डिवचतात? >>मुंज लावल्याने किंवा सत्यनारायण घातल्याने समाजाला त्रास होत नाही ना? हेच सनातन्याने विचारले तर??
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on Sat, 10/14/2023 - 19:51

In reply to >>> पोइंट नसते तर एवढ्या by अहिरावण

Permalink

ओ एक काम करा... ते हमास आणि

ओ एक काम करा... ते हमास आणि इस्त्रायल राहिलं बाजुला... आपलंच नेहमीचं सुरु झालं. वेगळा धागा काढा. तिथे हाणामारी करु... इथे सध्या इस्त्रायलला पाठींबा देऊ
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 10/14/2023 - 20:40

In reply to ओ एक काम करा... ते हमास आणि by अहिरावण

Permalink

इथे सध्या इस्त्रायलला पाठींबा देऊ..

मान्य..... ------- ज्यू धर्मीयांना, असे म्हणायचे आहे का? कारण, इस्रायल म्हणजेच ज्यू , आणि पाकिस्तान म्हणजेच मुस्लिम, अशी माझी विचारसरणी आहे . पाकिस्तानला, इतर धर्मीय मान्य नाहीत....
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 10/14/2023 - 21:02

In reply to ओ एक काम करा... ते हमास आणि by अहिरावण

Permalink

ओ एक काम करा... ते हमास आणि

ओ एक काम करा... ते हमास आणि इस्त्रायल राहिलं बाजुला... आपलंच नेहमीचं सुरु झालं. वेगळा धागा काढा. तिथे हाणामारी करु... इथे सध्या इस्त्रायलला पाठींबा देऊ आमचा पाठिंबा आधीच देऊन झालाय, आम्ही तर सांगत आहोत की पॅलेस्टाईन बेचिराख करावा. गाझापट्टीवर गाढवाचा नांगर फिरवून स्वराज्यात (इस्राइलच्या) सामील करावी. एकेक हमासी वेचून वेचून ठाक मारावा. फक्त इथे जे हमासशी काहीबाही संबंधं जडून पुरोगाम्यांना बदनाम करायचे सनातनींचे प्रयत्न आहेत ते प्रयत्न हाणून पाडतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on Sat, 10/14/2023 - 21:07

In reply to ओ एक काम करा... ते हमास आणि by अमरेंद्र बाहुबली

Permalink

पन्नास लाख लोकांना बेघर करून

पन्नास लाख लोकांना बेघर करून मारण्याची भाषा करताय आणि स्वताला पुरोगामी समजताय... तुम्ही पण सनातनी लोकांच्यात बसले तर सुत जुळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 10/14/2023 - 21:19

In reply to पन्नास लाख लोकांना बेघर करून by कॉमी

Permalink

तेच म्हटवं काॅमींनी अजून बाजू

तेच म्हटवं काॅमींनी अजून बाजू कशी घेतली नाही “त्यांची.” काॅमी साहेब, त्या पन्नास लाखांमूळे इस्राईलचा एकही माणूस मरत असेल तर पन्नासलाखच काय एक कोटी मारावेत इस्राइलने. बाकी तुम्ही हमास वाल्यांसोबत कींवा जिहादींसोबत बसल्यास चांगले सूत जुळेल. (तसे जुळलेही असावे म्हणा. )
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on Sat, 10/14/2023 - 21:22

In reply to तेच म्हटवं काॅमींनी अजून बाजू by अमरेंद्र बाहुबली

Permalink

तुमच्याकडून ह्यापेक्षा जास्त

तुमच्याकडून ह्यापेक्षा जास्त अपेक्षा नाहीच आहे. बालवडीतल्या मुलासारखी समज आहे तुमची. तोंड दिले आहे त्यामुळे मत द्यायला का जाते होय की नाही ? :)
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 10/14/2023 - 21:25

In reply to तुमच्याकडून ह्यापेक्षा जास्त by कॉमी

Permalink

पळ काढायचा चांगला मार्ग

पळ काढायचा चांगला मार्ग शोधलात. इस्राइलची बाजू घेणार्यांची बुध्दी बालवाडी सारखी असते नी अतिरेक्यांची बाजू घेणार्यांची ग्रॅज्यएटची असावी. हो की नाही ग्रॅज्यूएट काॅमी सर? :)
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on Sat, 10/14/2023 - 21:28

In reply to पळ काढायचा चांगला मार्ग by अमरेंद्र बाहुबली

Permalink

छे छे गैरसमज झाला बाहुबली

छे छे गैरसमज झाला बाहुबली साहेब. मी इस्त्राईल समर्थकांच्या बुद्धीबाबत नाही बोललो. तुमच्या बुद्धी बद्दल स्पेसिफिकली बोलत होतो. गैरसमज नसावा :)
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 10/14/2023 - 21:32

In reply to छे छे गैरसमज झाला बाहुबली by कॉमी

Permalink

असो. तुम्ही कितीही काहीही

असो. तुम्ही कितीही काहीही कुणालाही बोला. इस्राईल काही सूट्टी देत नाही गाझाला. तुमच्या दुखात मी सहभागी नाही हे आधीच सांगून ठेवतो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Sun, 10/15/2023 - 23:29

In reply to या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला सिद्धांत by धर्मराजमुटके

Permalink

काही लोकांना इतरांसाठी शीरा विनाकारण ताणायला आवडतात, भले समोरचा

पॅलेस्टीनी जनतेचीही काही बाजू आहे (दहशतवाद्यांची नव्हे) हे भारतीय जनतेला तर अजिबातच समजत नाही. इस्त्रायलच्या सामरीक प्रगतीवर भारतीय फार खूश असतात आणि ते इस्त्रायलवर मनापासून (भाबडे) प्रेम करतात (पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले). जगभरातल्या मुस्लीमांचे पहिले प्रेम इस्लाम आणि जगभरातल्या ज्यूंचे पहिले प्रेम इस्त्रायल असते).
+१ काही लोकांना इतरांसाठी शीरा विनाकारण ताणायला आवडतात, भले समोरचा माणुस काहीही किंमत देतो नसो.
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on गुरुवार, 10/12/2023 - 22:21

Permalink

व्वाह धर्मराज भौ...

तुमचा प्रतिसाद म्हणजे साध्या सोप्या भाषेतील प्रतिसाद थोडक्यात व सटिक वाटला. टर्मिनेटर भौ नी सुद्धा सोप्या शब्दात सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे. माझ्या मते IMEC वर फारसा परीणाम होईल असे वाटत नाही कारण हे धर्मयुद्ध बरेच वर्षापासून चालू आहे व चालू रहाणार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 10/13/2023 - 07:53

Permalink

..

अभ्यासपूर्ण लेख व चर्चा.
  • Log in or register to post comments

Submitted by अथांग आकाश on Sun, 10/15/2023 - 21:58

In reply to .. by हेमंतकुमार

Permalink

+१

+१ अभ्यासपूर्ण लेख! प्रतिसादांतुन पण चांगली माहिती मिळत आहे!! imecच्या माहितीची प्रतिक्षा करतोय!!!
  • Log in or register to post comments

Submitted by भागो on Fri, 10/13/2023 - 09:55

Permalink

टर्मीनेटर

टर्मीनेटर https://www.washingtonpost.com/world/2023/israel-palestine-conflict-timeline-history-explained/ हा लेख वाचलात तर तुमच्या विचरत कदाचित फरक पडू शकेल. आता १. ह्या वादात इस्रायल किंवा हमास कोणीही धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ नाहीत. २. मी जेव्हढे वाचाल आहे त्या प्रमाणे नेत्न्याहू हा तद्दन गुंड माणूस आहे. त्याच्यावर खटला चालू आहे. त्यातून वाचण्यासाठी त्याने बरेच उपद्व्याप केले आहेत. त्याचाच हा परिपाक आहे. ३.इजिप्तच्या गुप्त हेर खात्याने इस्रायलला हमासच्या हल्ल्याची पूर्व कल्पना दिली होती पण नेतन्याहुने त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले अशा बातम्या आहेत. ४. अल अक्सा मशिदीतील पावित्र्याचा भंग हे हि एक कारण आहेच.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Tue, 10/17/2023 - 20:59

In reply to टर्मीनेटर by भागो

Permalink

भागो शेठ,

भागो शेठ, तुम्ही दिलेल्या लिंक मधली माहिती वाचली त्यात (आज वीशी-तिशीत असलेल्यांसाठी सोडून) नवीन असे फार काही अजिबात नाही! आता तुमच्या बाकीच्या मुद्द्यांकडे वळतो,
१. ह्या वादात इस्रायल किंवा हमास कोणीही धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ नाहीत.
अगदी अगदी... इस्त्रायल हा काही साधू संतांचा देश नाही तसेच हमास ही काही सुफी संतांची संघटना नाही.
२. मी जेव्हढे वाचाल आहे त्या प्रमाणे नेत्न्याहू हा तद्दन गुंड माणूस आहे. त्याच्यावर खटला चालू आहे. त्यातून वाचण्यासाठी त्याने बरेच उपद्व्याप केले आहेत. त्याचाच हा परिपाक आहे.
इस्त्रायल सारख्या (धर्मांध) शत्रुंनी घेरलेल्या देशाचा नेता गांधींवादी किंवा 'अहिंसा परमो धर्म' वगैरे तत्वज्ञान मानणाऱ्या विचारसरणीचा असावा अशी आपली अपेक्षा आहे का? 'ठकासी असावे महाठक' म्हणतात त्याप्रमाणेच ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेल्या देशाचे नेतृत्व असावे असे माझे वैयक्तिक मत! तुमचे मत वेगळे असल्यास त्याचाही अर्थातच आदर आहे.
३.इजिप्तच्या गुप्त हेर खात्याने इस्रायलला हमासच्या हल्ल्याची पूर्व कल्पना दिली होती पण नेतन्याहुने त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले अशा बातम्या आहेत. ४. अल अक्सा मशिदीतील पावित्र्याचा भंग हे हि एक कारण आहेच.
ह्या दोन्ही मुद्द्यांचे एकत्र उत्तर देतो. युद्धकाळात किती प्रोपगंडा चालतो हे आता सर्वज्ञात आहे त्यामुळे काय खरे आणि काय खोटे हे ठरवणे सर्वसामान्यांसाठी कठीण होऊन जाते. युक्रेन युद्धाच्या सुरुवातीच्या काळातल्या घटना आठवा, अगदी मिपावारही हा प्रोपगंडा चालवण्याचे उद्योग झालेले आहेत. त्यात पुतीन ह्यांना कुठलासा रोग झाला असल्याने ते कसे इतरांपासून अंतर ठेऊन वावरत / वागत आहेत पासून अनेक विनोदी आणि धडधडीत खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या. पण ते असो... १९६७ सालच्या सिक्स डे वॉर मध्ये झालेल्या पराभवातून इजिप्तने धडा घेऊन थोड्या कालावधीने का होईना पण इस्त्रयालला सार्वभौम राष्ट्र म्हणुन मान्यता देऊन आपला प्रदेश तर परत मिळवला होता पण इस्लामिक जगताचा रोष मात्र ओढवून घेतला होता. आणि तेव्हा शांतता करारावर स्वाक्षरी केल्या पासूनच त्याची प्रचंड कोंडी होत आहे, करारातल्या अटींचे पालन करण्यासाठी इस्त्रायल बरोबर सहकार्य करावे लागत आहे आणि एकीकडे आपण इस्लामिक - अरब जगता बरोबर आहोत हे सिद्ध होत नसले तरी तशी निदान बतावणी करावी लागत आहे. इजिप्तची ही द्विधावस्था इस्त्रायलला पण माहिती असल्याने अशा बातम्या आल्या तरी त्यातले तथ्य संबंधितांना माहिती असले तरी बाकीच्यांनी (म्हणजे वॉर प्रपोगंडाला बळी पडणाऱ्यांनी) त्याला किती महत्व द्यावे हा त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा प्रश्न असतो.... आणि अल अक्सा मशिदीचे निमित्त करूनच तर हा 'ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म' नाव देऊन हा हल्ला केला आहे हे वर लेखात लिहिलेले आहे. असो, प्रतिसादसाठी आपले मनःपूर्वक आभार 👍
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Fri, 10/13/2023 - 10:36

Permalink

IMEC बदल माहिती नव्हतं ते

IMEC बदल माहिती नव्हतं ते समजलं. बाकी सध्या इस्त्रायली ज्यू अत्यंत हुशार इतिहासकार, मानववंश अभ्य युवल हरारीचे लेक्चर ऐकत होते.तेव्हा या देशाविषयी व्हिडिओ पाहत होते.त्यात इथे युद्ध सुरू झाले.तेव्हा चाणक्यचे धर्माधिकारी यांचेही व्हिडिओ पाहण्यात आले.अत्यंत खतरनाक धाडसी आहे इस्त्रायली!चहू बाजूला अरब असताना आपल्या धर्माची मुळे पुन्हा जगभरातून इथे आणून वसवले.मला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याच अनेक पराक्रमाची आठवण झाली.बाकी ब्रिटीशांनी ईथएपण काहीच्या काही भूमी डिस्ट्रिब्युटशन करून काड्या केल्या आहेत,हे पाहून चीड वाटली.पॅलेस्टाईनेपण गाजा पट्टी आग्रह सोडून इतर भाग घ्यावा.भारताच्या भुमी बाजूला अरब नसून चीन आहे हे कधीतरी नशीबच वाटतं. इस्त्रायलला माहिते होतं की इतरत्र वसले असतं तर सन्मानाने कधीच जगू शकले नसते.हक्काचे घर का सोडावं.गाजाला अनेक मोठ्या राष्ट्रांनी मदत केली आहे.अनेक राजकीय , आर्थिक वर्चस्वासाठी गुंतागुंतीची आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी रशिया-युक्रेन आणि आता इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धात आहे.जग तिसर्या महायुद्धाच्या वाटेवर आहे वाटतं...
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Fri, 10/13/2023 - 10:39

Permalink

१. हे युद्ध इसराइल आणि हम्मास

१. हे युद्ध इसराइल आणि हम्मास मध्ये नाही. २. या युद्धाची सुरुवात मक्का मध्ये असलेल्या यहूदी टोळीचा संपूर्ण नाश करून त्यांच्या बायको मुलांना गुलाम बनविण्यार्या जगातील पहिल्या जिहाद सुरू झालेली आहे. ३. जो पर्यंत यहूदी जातीचा पूर्ण विनाश होत नाही आणि इस्लामचे राज्य येत नाही जिहाद सुरू राहणार. ४. बाकी भारतात ही वेगवेगळ्या स्वरूपात हे युद्ध हजार वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे. अकबर सारख्या बादशाह ने ही चित्तोड मधील सर्व ४० हजार नागरिकांची कत्तल केली होती. येत्या ५० वर्षांत याहून भयंकर दृश्य पाहायला मिळतील. ज्या प्रमाणे आज भारतीयांना भविष्याची कल्पना नाही, इजरायला ही नव्हती. यात आश्चर्य काही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Fri, 10/13/2023 - 10:54

Permalink

१. हे युद्ध इसराइल आणि हम्मास

१. हे युद्ध इसराइल आणि हम्मास मध्ये नाही. २. या युद्धाची सुरुवात मक्का मध्ये असलेल्या यहूदी टोळीचा संपूर्ण नाश करून त्यांच्या बायको मुलांना गुलाम बनविण्यार्या जगातील पहिल्या जिहाद सुरू झालेली आहे. ३. जो पर्यंत यहूदी जातीचा पूर्ण विनाश होत नाही आणि इस्लामचे राज्य येत नाही जिहाद सुरू राहणार. ४. बाकी भारतात ही वेगवेगळ्या स्वरूपात हे युद्ध हजार वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे. अकबर सारख्या बादशाह ने ही चित्तोड मधील सर्व ४० हजार नागरिकांची कत्तल केली होती. येत्या ५० वर्षांत याहून भयंकर दृश्य पाहायला मिळतील. ज्या प्रमाणे आज भारतीयांना भविष्याची कल्पना नाही, इजरायला ही नव्हती. यात आश्चर्य काही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 10/13/2023 - 12:01

Permalink

गट क्रं. १ आणि गट क्रं. २

गट क्रं. १ आणि गट क्रं. २ आम्ही आमच्या अन्य लेखनात , प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, लोकं काय लिहितात, काय बोलतात्, ह्यावरुन त्यांचा "गट" ठरवता येतो . तेच परत एकदा ह्या युध्दातुन आणि त्यावरील चाललेल्या संवादातुन दिसुन येत आहे हे पाहुन आनंद झाला :) तुम्ही गट क्रमांक १ मधील असाल तर तुमचा इस्त्रायलला झायॉन ला पाठिंबा असेल आणि व्हाईस वर्सा . अर्थात तुम्ही इस्त्रायलला, झायॉनला पाठिंबा देत असेल तर तुम्ही गट क्रं. १ मधील आहात असे म्हणावे लागेल. तसेच तुम्ही पॅलेस्टाईन , हमास ला समर्थन देत असाल तर तुम्ही गट क्र. २ मधील आहात हे निश्चीत. हा भयंकर संवेदनशील विषय असल्याने शाहु फुले आंबेडकर ह्यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात ह्या विषयावर स्पष्टपणे न बोललेलेच बरं .
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Fri, 10/13/2023 - 13:46

Permalink

> इतकी वर्षे भारताला दूर

> इतकी वर्षे भारताला दूर तिकडे मध्यपूर्वेत होणाऱ्या ह्या संघर्षाची प्रत्यक्ष झळ बसत नव्हती त्यामुळे कोणाचातरी थातुरमातुर निषेध नोंदवून बाकी घडामोडींपासून अलिप्तता राखणे शक्य होते पण आता परिस्थिती थोडी बदलली आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या G-20 परिषदेत 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) हा भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा प्रकल्प मंजूर होण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. भारतीय सरकारची भूमिका ह्या विषयावर अत्यंत योग्य राहिली आहे. भारत सरकारने, मग कुणाचेही का असेना, पेलेस्टिनीं लोकांना जीवनावश्यक मदत केली आहे. भारताने मागील काही वर्षांत $२२ दशलक्ष डॉलर्स ची मदत ह्या लोकांना केली आहे. तुलनेने पाकिस्तान ने $८००० दिले आहेत. ह्याशिवाय विद्यार्थ्यांना मदत, एक्सचेंज प्रोग्रॅम्स, योगा दिवस असे विविध प्रकल्प वेस्ट बॅंक मध्ये राबवले आहेत. ह्यांत कुठलाही बदल होण्याची शक्यता नाही. त्याच वेळी इस्राएल पैसे घेऊन भारताला संरक्षण सामुग्री देतो, विविध प्रकारची गोपनीय माहिती पुरवतो इत्यादी मुले इस्राएल बरोबर सुद्धा विविध सरकारांनी अत्यंत चांगले संबंध ठेवले आहेत. इस्राएल पॅलेस्टिन वर भारतीय विदेश नीती योग्य राहिली आहे. राहिला विषय IMEC चा. G२० च्या इतर विषयाप्रमाणेच हि सुद्धा धूळफेक आहे आणि आमच्या हयातीत हा प्रकल्प फक्त चर्चिला जाईल. 'बेल्ट अँड रोड' हा प्रकल्प सुद्धा ह्याच प्रकारे पूर्णतः अपयशी ठरणार आहे. IMEC प्रकल्पाला इराण आणि रशिया विविध प्रकारे साबोटेज करतील तो विषय वेगळा. पॅलेस्टिनी लोकांच्या दयनीय अवस्थेबद्दल मला खरोखर वाईट वाटते. पण त्याच वेळी अत्यंत मागासलेल्या अश्या लोकांत आणखीन वेगळे काही घडले असते असे मला वाटत नाही. इस्राएल यहुदी असले तरी तेथील १०% लोकसंख्या अरब आहे. अरब लोक तिथे सुरक्षित आणि आरामात राहतात. पॅलेस्टिनी लोकांनी इराणी मदतीने हमास ला पुढे काढण्याच्या ऐवजी जर अरब राष्ट्रांची मदत घेऊन आर्थिक समृद्धीवर लक्ष केंद्रित केले असते (उदाहरणार्थ तैवान) तर शांतता पूर्ण मार्गाने ह्या प्रदेशाला इतर जगाकडून जास्त मान्यता मिळाली असती. सध्या हे लोक इतके मागासलेले आणि हिंसक आहेत कि अरब राष्ट्रे सुद्दा ह्या देशांतून पुरुष शरणार्थी घेणार नाहीत. पण ह्या प्रदेशांतील लहान मुलांबद्दल वाईट वाटते. इस्राएल ने ह्या प्रदेशांतील प्रजनन दर २ पेक्षा खाली आणण्यावर भर दिला पाहिजे होता. तो सध्या ४ च्या आसपास आहे. भारताने काश्मीर मध्ये हा रेट १.४ म्हणजे देशांत गोवा आणि सिक्कीम च्या बरोबर आणला आहे आणि त्याचे चांगले परिणाम हळू हळू दिसत आहेतच.
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on Fri, 10/13/2023 - 14:12

Permalink

बाकी इस्त्रायल, पॅलेस्टाईनशी

बाकी इस्त्रायल, पॅलेस्टाईनशी कसे वागायचे ते मरु द्या... इथल्या अनेकांशी कसे वागायचे ते कळले. अनेकांचे मुखवटे मस्त उघडे पडलेले पाहून मजा आली.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 10/13/2023 - 14:44

Permalink

टर्मिनेटर...

उत्तम लेखन मांडणी. वाचत आहे. लेखन प्रतिसाद मातीपूर्ण आहेत. पुलेशु. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Fri, 10/13/2023 - 16:16

Permalink

चांगली चर्चा चालु आहे

वर्तमान् पत्रातील बातम्या आणि तूनळीवरील चर्चा ह्यातुन मला समजले ते ईथे मांडतोय ज्यू लोकांना कधीच स्वतःची भूमि नव्हती. दुसर्‍या महायुद्धापर्यंत ज्यू लोकांनी तन मन धनाने अमेरिकेला आणि पर्यायाने दोस्त राष्ट्रांना जी मदत केली, त्याचा मोबदला म्हणुन त्यानी एक जमिनीचा तुकडा मागितला. जेरुसलेम हे पुर्वापार त्यांचे श्रद्धास्थान असल्याने ही जमीन तिथेच कुठेतरी मिळावी ही त्यांची ईच्छा असावी(?). अमेरिकेलाही भौगोलिक दृष्टीने ते सोयीचे होते कारण लांब अंतर. मग पॅलेस्टीनी लोकांची फारशी पत्रास न बाळगता काही करार मदार करुन तिथला एक तुकडा ज्यू लोकांना च्तोडुन दिला गेला. साधारण ४४% ज्यू आणि ४८% पॅलेस्टीनी असा काहीसा करार होता. पण आधीच ज्यूनी तिथे हळूहळू आपली संख्या वाढवायला सुरुवात केली होती. इस्त्रायल देश तयार झाल्यावर वेळोवेळी आपले हात्पाय पसरुन ज्यू नी अजुन अजुन भूभाग काबीज केला. आता फक्त गाझा आणि वेस्ट बँक पॅलेस्टीन कडे आहेत. पॅलेस्टीन चे स्वतंत्र सैन्य नाही ते अगतिक आहेत, तर इस्त्रायल पुर्ण सज्ज आहे. असमान संघर्ष आहे. भारताने युद्ध नको--ह्याच बाजुने राहणे चांगले.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com