७ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे सहाच्या सुमारास 'हमास' (Hamas) ह्या पॅलेस्टाईन मधील 'सत्ताधारी' दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून (Gaza Strip) अवघ्या वीस मिनिटांत सुमारे ४ ते ५ हजार रॉकेट्स डागून इस्रायलवर हल्ला केला.
एकीकडे रॉकेट हल्ला सुरु असताना हमासच्या दहशतवाद्यांनी 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) म्हणून ओळखली जाणारी, गाझा पट्टी हा पॅलेस्टाईनचा भूप्रदेश आणि इस्रायल ह्यांच्या सीमेवर बांधलेली मजबूत तटबंदी भेदून इस्रायलच्या प्रदेशात घुसखोरी करून स्डेरोट (Sderot) ह्या तटबंदीपासून सुमारे ८५० मीटर अंतरावर असलेल्या इस्त्रायली शहरात तसेच, बीरी (Be'eri) आणि नेतीव हासरा (Netiv HaAsara) अशा इस्रायलच्या सीमावर्ती भागातील कृषी वसाहतींमध्ये शिरत अंदाधुंद गोळीबार करून शेकडो नागरिक आणि सैनिकांना ठार मारले व १५० हुन अधिक इस्रायली महिला आणि लहान मुलांचे अपहरण केले.
१९४८ साली एक देश म्हणून अस्तित्वात आल्यापासूनच अक्षरशः 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असे जीवन जगणाऱ्या इस्त्रायली नागरिकांसाठी युद्ध आणि दहशतवादी हल्ले अजिबात नवे नाहीत, पण इस्रायलच्या दिशेने येणारी रॉकेट्स/क्षेपणास्त्रे हवेतल्या हवेत नष्ट करणारी त्यांची 'आयर्न डोम' (Iron Dome) हि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, गाझा पट्टी ह्या पॅलेस्टाईनच्या भूप्रदेशाला दोन बाजूंनी वेढून (तिसऱ्या बाजूला इजिप्तची सीमा तर चौथ्या बाजूला भूमध्य समुद्र आहे) इस्रायलच्या सीमा सुरक्षित करणारे, 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) हे काँक्रीट आणि पोलादापासून तयार केलेले; शेकडो कॅमेरे, सेन्सर्स आणि रडार्सनी सुसज्ज असलेले आणि इस्रायल कडून 'स्मार्ट फेन्स' (Smart Fence) आणि 'आयर्न वॉल' (Iron Wall) म्हणून गौरवण्यात आलेले चाळीस मैल लांबीचे अत्यंत मजबूत असे कुंपण, आणि जगातली 'अत्यंत धाडसी, हुशार आणि सतर्क' असा नावलौकिक कमावलेली 'मोसाद' (Mossad) हि त्यांची गुप्तचर संस्था हे घटक 'हमास' ने डागलेल्या रॉकेट्स पासून तसेच जमिनीवरून तटबंदी भेदून आणि ड्रोन्स व ग्लायडर्सच्या साहाय्याने हवेतून इस्त्रायलच्या सीमावर्ती प्रदेशात दहशतवाद्यांनी घुसखोरी करून केलेल्या हल्ल्यांपासून इस्रायली नागरिकांचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याने गेल्या कित्येक वर्षांमध्ये इस्रायलच्या भूमीवर ७ ऑक्टोबर रोजी झालेला हा हल्ला इस्त्रायलच्या अत्यंत जिव्हारी लागला आहे.
अर्थात हमासने 'ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म' (Operation Al-Aqsa Storm) असे नाव देऊन इस्त्रायलवर केलेल्या ह्या हल्ल्यांना अवघ्या काही तासांत चोख प्रत्युत्तर देत इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ह्यांनी हमासला "त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी अद्दल घडवू" असा सज्जड इशारा देऊन पॅलेस्टाईन विरुद्ध युद्ध घोषित केले असून संरक्षण विभागाने ह्या हल्ल्यांची तुलना '९/११' आणि 'पर्ल हार्बरच्या' हल्ल्यांशी केली आहे.
अशांत मध्यपूर्वेतील लेबनॉन, सिरीया, जॉर्डन आणि उत्तर आफ्रिकेतील इजिप्त अशा इस्लामिक देशांनी वेढलेल्या पॅलेस्टाईनच्या अरब बहुल भूप्रदेशात अस्तित्वात आलेल्या ह्या देशाला सातत्याने उद्भवणारी युद्धजन्य परिस्थिती आणि दहशतवादी हल्ले हाताळण्याचा तब्बल पंचाहत्तर वर्षांचा अनुभव आहे आणि 'रोज मरे त्याला कोण रडे' म्हणतात त्याप्रमाणे उर्वरित जगातील सर्वसामान्य नागरिकांनाही आता वारंवार होणाऱ्या ह्या घटनांच्या बातम्या विचलित करत नाहीत इतक्या त्याविषयीच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, ह्याला बहुसंख्य भारतीयही अपवाद नाहीत!
इतकी वर्षे भारताला दूर तिकडे मध्यपूर्वेत होणाऱ्या ह्या संघर्षाची प्रत्यक्ष झळ बसत नव्हती त्यामुळे कोणाचातरी थातुरमातुर निषेध नोंदवून बाकी घडामोडींपासून अलिप्तता राखणे शक्य होते पण आता परिस्थिती थोडी बदलली आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या G-20 परिषदेत 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) हा भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा प्रकल्प मंजूर होण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे.
परंतु नुकत्याच सुरु झालेल्या इस्रायल - पॅलेस्टाईन युद्धामुळे 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' अशा देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भवितव्याविषयी चिंताजनक परिस्थिती उद्भवली असल्याने भारताच्या मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका आणि युरोपात नव्याने स्थापीत होऊ पाहणाऱ्या व्यापक हितसंबंधांना बाधा येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने हे युद्ध, त्याची व्याप्ती आणि परिणाम व इतर घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवणे आता आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे.
['इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) अस्तित्वात आल्यास 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' हे त्याचे सर्वात मोठे लाभार्थी असतील, पण त्याचा सर्वात मोठा फटका (सुवेज कालव्यातुन होणारी मालवाहतूक जवळपास नगण्य होणार असल्याने) इजिप्तला, आणि 'बेल्ट अँड रोड' (BRI ) ह्या चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी असलेल्या पाकिस्तान, इराण, टर्की ह्या देशांना बसणार आहे त्यामुळे IMEC च्या निर्मितीत खोडा घालण्यासाठी सध्या सुरु असलेले हे युद्ध ओढवून घेण्यास हमासला चिथावणी देण्यामागे ह्या देशांचा हात असल्याचा संशय देशो-देशीच्या अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे!]
इस्रायल हा एक देश म्हणून जरी १९४८ साली म्हणजे पंचाहत्तर वर्षांपूर्वी अस्तित्वात आला असला तरी इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन आणि समस्त इस्लामिक जगताच्या ह्या संघर्षाला शंभर वर्षांहून अधीक जुना इतिहास आहे, त्याची बीजे १९१७ साली रोवली गेली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी आपल्या वसाहती सोडताना जगभर ज्या पाचरी मारून ठेवल्या आहेत त्यापैकीच हि एक पाचर आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये! वरकरणी ह्या संघर्षाचे मूळ कारण जरी धार्मिक असले तरी एकंदरीत ह्या विषयाला ऐतिहासिक, भौगोलिक, राजनैतिक, आर्थिक असे अनेक पैलू आहेत आणि त्या पैलूंचे विश्लेषण करण्यासाठी हा धागा प्रपंच.
हा विषय खूप मोठा असल्याने एका लेखात त्या सगळ्यांचा आढावा घेणे अशक्य असल्याने मालिका न लिहिता सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असावी ह्या उद्देशाने सदर धाग्यावर शक्यतो रोज एक ह्याप्रमाणे प्रतिसादरुपी लेख किंवा लघुलेखातून वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करण्याचा मानस आहे आणि त्या प्रतिसादांची (अपडेट होणारी) अनुक्रमणिका खाली देण्याचा प्रयोग करत आहे.
नमुन्यादाखल सध्या डोक्यात असलेले ५ मुद्दे / विषय खाली लिहिले आहेत, अजून काही मुद्दे सुचल्यास त्यांचीही भर घालण्यात येईल.
आगामी प्रतिसादरुपी लेख/लघुलेखांची अनुक्रमणिका:
(खालील प्रतिसाद प्रकाशित केल्यावर त्यांच्या लिंक्स अपडेट करण्यात येतील)
१) युद्धस्य कथा रम्या - 'तिसरा इंतिफादा' (इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध २०२३)
'युद्धस्य कथा रम्या' हि उक्ती प्रमाण मानून ह्या प्रयोगाची सुरुवात ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामूळे सुरु झालेल्या युद्धापासून करत आहे ज्यात इस्रायलच्या 'आयर्न डोम' (Iron Dome), 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) ह्या अत्याधुनिक सुरक्षाप्रणालींना चकवा देत हा हल्ला कसा झाला त्याविषयीची माहिती येणार आहे.
२) 'हमास' काय आहे आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे आणि पैसे कुठून येतात?
रॉकेट्स हे हमास ह्या दहशतवादी संघटनेचे आवडते अस्त्र, गाझा पट्टीत त्यांचे 'गावठी' रॉकेट/मिसाईल निर्मिती कारखाने आहेत, आणि त्यासाठी साहित्य म्हणून ते कशाचा वापर करतात, तसेच अन्य आधुनिक शस्त्रे, क्षेपणास्त्रे व प्रतिबंधित साहित्य तस्करीतून कशाप्रकारे मिळवले जाते हि माहिती फार रंजक आहे...
३) 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC)
'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' ह्या देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती...
४) २०२३ च्या इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाविषयी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रतिक्रिया.
५) इस्रायलची निर्मिती आणि मुस्लिम-अरब जगताशी असलेल्या संघर्षाचा इतिहास.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !
मिसळपाव
प्रतिक्रिया
इस्त्रायलची कठोर भूमिका...
भारतातून बसेस भरुन पाठवायच्या
In reply to इस्त्रायलची कठोर भूमिका... by मुक्त विहारि
गाझा नी वेस्ट बॅंक वर जोरात
Israel–Hamas war: संकटात
मुक्तविहारी काका कुठं हायती??
In reply to Israel–Hamas war: संकटात by अमरेंद्र बाहुबली
अतिशय चुकीचा निर्णय....
In reply to Israel–Hamas war: संकटात by अमरेंद्र बाहुबली
सहमत.
In reply to अतिशय चुकीचा निर्णय.... by मुक्त विहारि
घानेरडी मूव्ह.
In reply to Israel–Hamas war: संकटात by अमरेंद्र बाहुबली
प्रतिसाद अमरेंद्र बाहुबली
In reply to घानेरडी मूव्ह. by रंगीला रतन
भारतीय सरकारे बाय डिफोल्ट
In reply to Israel–Hamas war: संकटात by अमरेंद्र बाहुबली
मैत्री करण्यासाठी...
In reply to भारतीय सरकारे बाय डिफोल्ट by अमरेंद्र बाहुबली
काही अपडेट?? इस्रायल सैन्य
गेल्या २४ तासांत गाझा पट्टीतील सुमारे ४०० हमासच्या तळांवर
In reply to काही अपडेट?? इस्रायल सैन्य by अमरेंद्र बाहुबली
इस्रायलशी वाकडं त्याचे नदीवर
In reply to गेल्या २४ तासांत गाझा पट्टीतील सुमारे ४०० हमासच्या तळांवर by टर्मीनेटर
इस्रायलशी नीट त्याला सोन्याची वीट.
In reply to इस्रायलशी वाकडं त्याचे नदीवर by अमरेंद्र बाहुबली
हमास ने हल्ला केला तेव्हा झोपल्या होत्या का ह्या संघटना??
In reply to काही अपडेट?? इस्रायल सैन्य by अमरेंद्र बाहुबली
काल इस्रायलच्या राजदुताने
१०० पेक्षा जास्ती देशांनी दहशतवादी घोषित केलेल्या
In reply to काल इस्रायलच्या राजदुताने by अमरेंद्र बाहुबली
भुतकाळातल्या चुकांची वर्तमानात आणि भविष्यात भारताकडुन पुनरावृत्त
In reply to १०० पेक्षा जास्ती देशांनी दहशतवादी घोषित केलेल्या by टर्मीनेटर
>>>हिंदू इतिहासातून काहीही
In reply to भुतकाळातल्या चुकांची वर्तमानात आणि भविष्यात भारताकडुन पुनरावृत्त by मुक्त विहारि
कारण....
In reply to >>>हिंदू इतिहासातून काहीही by अहिरावण
>>आता, कुणीही येणार नाही...
In reply to कारण.... by मुक्त विहारि
भूतकाळातील घटना बघीतल्या की भविष्य नक्कीच समजेल...
In reply to >>आता, कुणीही येणार नाही... by अहिरावण
डिवायडेड बाय कांग्रेस भाजप
In reply to १०० पेक्षा जास्ती देशांनी दहशतवादी घोषित केलेल्या by टर्मीनेटर
+२७१०२०२३
In reply to डिवायडेड बाय कांग्रेस भाजप by अमरेंद्र बाहुबली
चुक
In reply to डिवायडेड बाय कांग्रेस भाजप by अमरेंद्र बाहुबली
आता पुढे कसं ?
बाकी काही म्हणा,
In reply to आता पुढे कसं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अधिक वाचायला आवडेल.
In reply to बाकी काही म्हणा, by टर्मीनेटर
लोकसत्ताचे अग्रलेख मात्र विनोदी असतात
In reply to बाकी काही म्हणा, by टर्मीनेटर
पुढं काय झालं??
चार दिवसांचा युध्दविराम घोषित
नाही तोडला तर इस्राईल ला
In reply to चार दिवसांचा युध्दविराम घोषित by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मानवता वगैरे ?
In reply to नाही तोडला तर इस्राईल ला by अमरेंद्र बाहुबली
गाझातील लोकांना आपण निरपराध
In reply to मानवता वगैरे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अप्रतिम! निःशब्द करणारा प्रतिसाद!
In reply to गाझातील लोकांना आपण निरपराध by अमरेंद्र बाहुबली
मानवता सर्वत्र सेम.
In reply to गाझातील लोकांना आपण निरपराध by अमरेंद्र बाहुबली
गाझा पट्टीतील सामान्य माणसे
In reply to मानवता सर्वत्र सेम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेच तर मी सांगतोय, हजारो
In reply to गाझा पट्टीतील सामान्य माणसे by सुबोध खरे
अतिरेकी लपवनारे निरपराध कसे?
In reply to मानवता सर्वत्र सेम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सरसकटीकरण
In reply to अतिरेकी लपवनारे निरपराध कसे? by अमरेंद्र बाहुबली
सरकरा विरूध्द जनतेने बंडं
In reply to सरसकटीकरण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+२७११२३
In reply to अतिरेकी लपवनारे निरपराध कसे? by अमरेंद्र बाहुबली
इस्त्रायलच्या डोक्यावर टेंगुळ
In reply to मानवता वगैरे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुरोगामी शब्द बदनाम करायचा
In reply to इस्त्रायलच्या डोक्यावर टेंगुळ by वामन देशमुख
निरपराधांचे अमानुष बळी == judicial killing
In reply to पुरोगामी शब्द बदनाम करायचा by अमरेंद्र बाहुबली
हो म्हणून पुरोगामी शब्द बदनाम
In reply to निरपराधांचे अमानुष बळी == judicial killing by वामन देशमुख
आजकाल स्वतःला पुरोगामी
In reply to हो म्हणून पुरोगामी शब्द बदनाम by अमरेंद्र बाहुबली
मनूवादी सनातनींना आपला
In reply to आजकाल स्वतःला पुरोगामी by सुबोध खरे
पुरोगामी म्हणजे नेमके कोण?
In reply to हो म्हणून पुरोगामी शब्द बदनाम by अमरेंद्र बाहुबली
- पुरोगामीची व्याख्या काय?
- पुरोगामी म्हणजे नेमके काय?
- पुरोगामी असण्याचे नेमके निकष कोणते?
- या निकषांत बसणारे कोण कोण लोक आहेत?
- त्या लोकांनी पुरोगामी असण्याची कोणकोणती लक्षणे प्रदर्शित केलेली आहेत?
- पुरोगामीबद्धल इतर अतिरिक्त माहिती
मग पुढे बोलू.फुले शाहु आंबेडकर ह्यांचे
In reply to पुरोगामी म्हणजे नेमके कोण? by वामन देशमुख
कृपया सर्व प्रश्नांची उत्तरे
In reply to फुले शाहु आंबेडकर ह्यांचे by अमरेंद्र बाहुबली
- पुरोगामीची व्याख्या काय?
- पुरोगामी म्हणजे नेमके काय?
- पुरोगामी असण्याचे नेमके निकष कोणते?
- या निकषांत बसणारे कोण कोण लोक आहेत?
- त्या लोकांनी पुरोगामी असण्याची कोणकोणती लक्षणे प्रदर्शित केलेली आहेत?
- पुरोगामीबद्धल इतर अतिरिक्त माहिती
मग पुढे बोलू.फुले शाहु आंबेडकर ह्यांचे
In reply to फुले शाहु आंबेडकर ह्यांचे by अमरेंद्र बाहुबली
मुलींच्या शिक्षणाला विरोध
In reply to फुले शाहु आंबेडकर ह्यांचे by सुबोध खरे
मग गांधीजी नेहरू ना मानणारे
In reply to मुलींच्या शिक्षणाला विरोध by अमरेंद्र बाहुबली
मनूवादी सनातनींना आपला
In reply to पुरोगामी शब्द बदनाम करायचा by अमरेंद्र बाहुबली
ह्या दोघांच्या भाडंणात
In reply to मनूवादी सनातनींना आपला by वामन देशमुख
तात्पुरता युद्ध विराम.
पुरोगामी म्हणजे कोण?
अत्यंत ऊत्कृष्ट प्रतिसाद टोबी
In reply to पुरोगामी म्हणजे कोण? by सर टोबी
जर आपण हिंदूंच्या अनिष्ट
In reply to पुरोगामी म्हणजे कोण? by सर टोबी
+१
In reply to पुरोगामी म्हणजे कोण? by सर टोबी
अरे वा !
या लेखाचे शीर्षक खरं तर आपण
अधोगामी/सनातनी दुटप्पी असतात.
चार दिवस झाले की.
इस्रायल-हमास युद्ध पुन्हा सुरू
In reply to चार दिवस झाले की. by अमरेंद्र बाहुबली
साधुसंत भरलेल्या निरपराध
In reply to इस्रायल-हमास युद्ध पुन्हा सुरू by रंगीला रतन
दक्षीण आफ्रिकेने म्हणे