✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध आणि IMEC चे भवितव्य!

ट
टर्मीनेटर यांनी
गुरुवार, 10/12/2023 - 17:13  ·  लेख
लेख

७ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे सहाच्या सुमारास 'हमास' (Hamas) ह्या पॅलेस्टाईन मधील 'सत्ताधारी' दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून (Gaza Strip) अवघ्या वीस मिनिटांत सुमारे ४ ते ५ हजार रॉकेट्स डागून इस्रायलवर हल्ला केला.

एकीकडे रॉकेट हल्ला सुरु असताना हमासच्या दहशतवाद्यांनी 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) म्हणून ओळखली जाणारी, गाझा पट्टी हा पॅलेस्टाईनचा भूप्रदेश आणि इस्रायल ह्यांच्या सीमेवर बांधलेली मजबूत तटबंदी भेदून इस्रायलच्या प्रदेशात घुसखोरी करून स्डेरोट (Sderot) ह्या तटबंदीपासून सुमारे ८५० मीटर अंतरावर असलेल्या इस्त्रायली शहरात तसेच, बीरी (Be'eri) आणि नेतीव हासरा (Netiv HaAsara) अशा इस्रायलच्या सीमावर्ती भागातील कृषी वसाहतींमध्ये शिरत अंदाधुंद गोळीबार करून शेकडो नागरिक आणि सैनिकांना ठार मारले व १५० हुन अधिक इस्रायली महिला आणि लहान मुलांचे अपहरण केले.

१९४८ साली एक देश म्हणून अस्तित्वात आल्यापासूनच अक्षरशः 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असे जीवन जगणाऱ्या इस्त्रायली नागरिकांसाठी युद्ध आणि दहशतवादी हल्ले अजिबात नवे नाहीत, पण इस्रायलच्या दिशेने येणारी रॉकेट्स/क्षेपणास्त्रे हवेतल्या हवेत नष्ट करणारी त्यांची 'आयर्न डोम' (Iron Dome) हि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, गाझा पट्टी ह्या पॅलेस्टाईनच्या भूप्रदेशाला दोन बाजूंनी वेढून (तिसऱ्या बाजूला इजिप्तची सीमा तर चौथ्या बाजूला भूमध्य समुद्र आहे) इस्रायलच्या सीमा सुरक्षित करणारे, 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) हे काँक्रीट आणि पोलादापासून तयार केलेले; शेकडो कॅमेरे, सेन्सर्स आणि रडार्सनी सुसज्ज असलेले आणि इस्रायल कडून 'स्मार्ट फेन्स' (Smart Fence) आणि 'आयर्न वॉल' (Iron Wall) म्हणून गौरवण्यात आलेले चाळीस मैल लांबीचे अत्यंत मजबूत असे कुंपण, आणि जगातली 'अत्यंत धाडसी, हुशार आणि सतर्क' असा नावलौकिक कमावलेली 'मोसाद' (Mossad) हि त्यांची गुप्तचर संस्था हे घटक 'हमास' ने डागलेल्या रॉकेट्स पासून तसेच जमिनीवरून तटबंदी भेदून आणि ड्रोन्स व ग्लायडर्सच्या साहाय्याने हवेतून इस्त्रायलच्या सीमावर्ती प्रदेशात दहशतवाद्यांनी घुसखोरी करून केलेल्या हल्ल्यांपासून इस्रायली नागरिकांचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याने गेल्या कित्येक वर्षांमध्ये इस्रायलच्या भूमीवर ७ ऑक्टोबर रोजी झालेला हा हल्ला इस्त्रायलच्या अत्यंत जिव्हारी लागला आहे.

अर्थात हमासने 'ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म' (Operation Al-Aqsa Storm) असे नाव देऊन इस्त्रायलवर केलेल्या ह्या हल्ल्यांना अवघ्या काही तासांत चोख प्रत्युत्तर देत इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ह्यांनी हमासला "त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी अद्दल घडवू" असा सज्जड इशारा देऊन पॅलेस्टाईन विरुद्ध युद्ध घोषित केले असून संरक्षण विभागाने ह्या हल्ल्यांची तुलना '९/११' आणि 'पर्ल हार्बरच्या' हल्ल्यांशी केली आहे.

अशांत मध्यपूर्वेतील लेबनॉन, सिरीया, जॉर्डन आणि उत्तर आफ्रिकेतील इजिप्त अशा इस्लामिक देशांनी वेढलेल्या पॅलेस्टाईनच्या अरब बहुल भूप्रदेशात अस्तित्वात आलेल्या ह्या देशाला सातत्याने उद्भवणारी युद्धजन्य परिस्थिती आणि दहशतवादी हल्ले हाताळण्याचा तब्बल पंचाहत्तर वर्षांचा अनुभव आहे आणि 'रोज मरे त्याला कोण रडे' म्हणतात त्याप्रमाणे उर्वरित जगातील सर्वसामान्य नागरिकांनाही आता वारंवार होणाऱ्या ह्या घटनांच्या बातम्या विचलित करत नाहीत इतक्या त्याविषयीच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, ह्याला बहुसंख्य भारतीयही अपवाद नाहीत!

इतकी वर्षे भारताला दूर तिकडे मध्यपूर्वेत होणाऱ्या ह्या संघर्षाची प्रत्यक्ष झळ बसत नव्हती त्यामुळे कोणाचातरी थातुरमातुर निषेध नोंदवून बाकी घडामोडींपासून अलिप्तता राखणे शक्य होते पण आता परिस्थिती थोडी बदलली आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या G-20 परिषदेत 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) हा भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा प्रकल्प मंजूर होण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे.

परंतु नुकत्याच सुरु झालेल्या इस्रायल - पॅलेस्टाईन युद्धामुळे 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' अशा देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भवितव्याविषयी चिंताजनक परिस्थिती उद्भवली असल्याने भारताच्या मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका आणि युरोपात नव्याने स्थापीत होऊ पाहणाऱ्या व्यापक हितसंबंधांना बाधा येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने हे युद्ध, त्याची व्याप्ती आणि परिणाम व इतर घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवणे आता आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे.

['इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) अस्तित्वात आल्यास 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' हे त्याचे सर्वात मोठे लाभार्थी असतील, पण त्याचा सर्वात मोठा फटका (सुवेज कालव्यातुन होणारी मालवाहतूक जवळपास नगण्य होणार असल्याने) इजिप्तला, आणि 'बेल्ट अँड रोड' (BRI ) ह्या चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी असलेल्या पाकिस्तान, इराण, टर्की ह्या देशांना बसणार आहे त्यामुळे IMEC च्या निर्मितीत खोडा घालण्यासाठी सध्या सुरु असलेले हे युद्ध ओढवून घेण्यास हमासला चिथावणी देण्यामागे ह्या देशांचा हात असल्याचा संशय देशो-देशीच्या अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे!]

इस्रायल हा एक देश म्हणून जरी १९४८ साली म्हणजे पंचाहत्तर वर्षांपूर्वी अस्तित्वात आला असला तरी इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन आणि समस्त इस्लामिक जगताच्या ह्या संघर्षाला शंभर वर्षांहून अधीक जुना इतिहास आहे, त्याची बीजे १९१७ साली रोवली गेली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी आपल्या वसाहती सोडताना जगभर ज्या पाचरी मारून ठेवल्या आहेत त्यापैकीच हि एक पाचर आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये! वरकरणी ह्या संघर्षाचे मूळ कारण जरी धार्मिक असले तरी एकंदरीत ह्या विषयाला ऐतिहासिक, भौगोलिक, राजनैतिक, आर्थिक असे अनेक पैलू आहेत आणि त्या पैलूंचे विश्लेषण करण्यासाठी हा धागा प्रपंच.

हा विषय खूप मोठा असल्याने एका लेखात त्या सगळ्यांचा आढावा घेणे अशक्य असल्याने मालिका न लिहिता सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असावी ह्या उद्देशाने सदर धाग्यावर शक्यतो रोज एक ह्याप्रमाणे प्रतिसादरुपी लेख किंवा लघुलेखातून वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करण्याचा मानस आहे आणि त्या प्रतिसादांची (अपडेट होणारी) अनुक्रमणिका खाली देण्याचा प्रयोग करत आहे.

नमुन्यादाखल सध्या डोक्यात असलेले ५ मुद्दे / विषय खाली लिहिले आहेत, अजून काही मुद्दे सुचल्यास त्यांचीही भर घालण्यात येईल.

आगामी प्रतिसादरुपी लेख/लघुलेखांची अनुक्रमणिका:
(खालील प्रतिसाद प्रकाशित केल्यावर त्यांच्या लिंक्स अपडेट करण्यात येतील)

१) युद्धस्य कथा रम्या - 'तिसरा इंतिफादा' (इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध २०२३)

'युद्धस्य कथा रम्या' हि उक्ती प्रमाण मानून ह्या प्रयोगाची सुरुवात ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामूळे सुरु झालेल्या युद्धापासून करत आहे ज्यात इस्रायलच्या 'आयर्न डोम' (Iron Dome), 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) ह्या अत्याधुनिक सुरक्षाप्रणालींना चकवा देत हा हल्ला कसा झाला त्याविषयीची माहिती येणार आहे.

२) 'हमास' काय आहे आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे आणि पैसे कुठून येतात?

रॉकेट्स हे हमास ह्या दहशतवादी संघटनेचे आवडते अस्त्र, गाझा पट्टीत त्यांचे 'गावठी' रॉकेट/मिसाईल निर्मिती कारखाने आहेत, आणि त्यासाठी साहित्य म्हणून ते कशाचा वापर करतात, तसेच अन्य आधुनिक शस्त्रे, क्षेपणास्त्रे व प्रतिबंधित साहित्य तस्करीतून कशाप्रकारे मिळवले जाते हि माहिती फार रंजक आहे...

३) 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC)

'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' ह्या देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती...

४) २०२३ च्या इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाविषयी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रतिक्रिया.

५) इस्रायलची निर्मिती आणि मुस्लिम-अरब जगताशी असलेल्या संघर्षाचा इतिहास.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थकारण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
माहिती

प्रतिक्रिया द्या
49773 वाचन

💬 प्रतिसाद (209)

प्रतिक्रिया

ज्यू लोकांनी आफ्रिकेच्या

रात्रीचे चांदणे
Fri, 10/13/2023 - 19:04 नवीन
ज्यू लोकांनी आफ्रिकेच्या युगांडा का आणखी कोणत्या देशाकडे त्याच्यासाठी जमीन विकतही मागितलेली होती, जमीन विकत घेऊन ते त्यांचा देश तिथे स्थापन करणार होते. यूट्यूब वरील एका चर्चेत हे मी ऐकेल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

वाचतोय. चांगली चर्चा चालू आहे

रंगीला रतन
Fri, 10/13/2023 - 19:26 नवीन
वाचतोय. चांगली चर्चा चालू आहे
  • Log in or register to post comments

वाचतोय

संग्राम
Sat, 10/14/2023 - 01:48 नवीन
इस्राइल आणि पॅलेस्टाईन चा इतिहास
  • Log in or register to post comments

हा विषय आधी थोडा फार माहित

चौथा कोनाडा
Sat, 10/14/2023 - 17:41 नवीन
हा विषय आधी थोडा फार माहित होताच .. या छान अभ्यासपूर्ण लेखामुळे (नकाशा सहित) आणि चर्चांमुळे ज्ञानात आणखी भर पडली. धन्यु टर्मी ! असे विषय साचत गेले की कोण जास्त बरोबर हे ति-हाईत लोक छातीठोकपणे सांगू शकत नाहीत ! कधी हा बरोबर तर कधी तो बरोबर असंच दिसतं... न्याय अन्यायाचा लढा सुरूच रहातो... युद्ध धगधगत राहतं .... आपल्यासाठी खलीस्तानचा मुद्दा धगधगत आहेच ! पुढील लेखाच्या प्रतिक्षेत !
  • Log in or register to post comments

न्याय अन्यायाचा लढा सुरूच रहातो...

मुक्त विहारि
Sat, 10/14/2023 - 23:26 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

इस्रायल - भारत - मध्य पूर्व - युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर

निनाद
Mon, 10/16/2023 - 10:41 नवीन
भारत , युनायटेड स्टेट्स , संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, फ्रान्स , जर्मनी , इटली आणि युरोपियन युनियन या सरकारांद्वारे 2023 G20 नवी दिल्ली शिखर परिषदेदरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. विकिमध्ये यात इस्रायलचे नाव नाही, व्हाईट हाऊस च्या प्रसिद्धी मध्ये ही तसा उल्लेख नाहीये. या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने, सौदी अरेबिया, युरोपियन युनियन, भारतीय प्रजासत्ताक, संयुक्त अरब अमिराती (यूएई), फ्रेंच प्रजासत्ताक, जर्मनीचे फेडरल रिपब्लिक, इटालियन प्रजासत्ताक आणि संयुक्त राज्य सरकारे अमेरिका राज्ये ("सहभागी") भारत - मध्य पूर्व - युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEC) स्थापन करण्यासाठी एकत्र काम करण्यास वचनबद्ध आहेत. इस्रायल या करारात नाहीये का?
  • Log in or register to post comments

इस्रायल लाभार्थी दिसतो तरी आहे

नठ्यारा
Mon, 10/16/2023 - 12:18 नवीन
निनाद, इस्रायल करारात नसला तरी तुम्ही दिलेल्या धवलगृहाच्या दुव्यावर लाभार्थी म्हणून दिसतो आहे :
.... enabling goods and services to transit to, from, and between India, the UAE, Saudi Arabia, Jordan, Israel, and Europe.
- नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

संस्थापक सदस्य ....

नठ्यारा
Mon, 10/16/2023 - 12:22 नवीन
निनाद, मला वाटतं की इस्रायल संस्थापक नसल्यामुळे त्याने दिल्ली करारावर स्वाक्षरी केली नसावी. यथावकाश सदस्य म्हणून दाखल होईल. - नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

व्हाइट फॉस्फोरस बॉम्ब

Bhakti
Mon, 10/16/2023 - 11:28 नवीन
इस्त्रायलने अत्यंत घातक व्हाइट फॉस्फोरस बॉम्ब वापरल्याचा आरोप होत आहे.व्हाइट फॉस्फोरस बॉम्ब हवेतल्या ओक्सिजनच्या संपर्कात आल्यावर पेट घेऊन ८०० डिग्री पर्यंत तापमान होते.
जी माणसं आगीत होरपळून मृत पडत नाहीत, त्यांचा श्वास कोंडून जीव जातो. पाणी टाकल्यानंतरही तो सहजासहजी विझत नाही. उलट धुराचे लोट तयार करत अधिक पसरतो. फॉस्फरस बॉम्ब १३०० डिग्री सेल्सिअसपर्यंत पेटू शकतो. त्यामुळे हाडंही वितळतात. या बॉम्बच्या संपर्कात आलेली व्यक्ती सुदैवानं वाचलीच, तरीही त्याला आयुष्यभर मरणयातना सहन कराव्या लागतात. त्याला सातत्यानं गंभीर संक्रमणाचा सामना करावा लागतो. त्याचं आयुष्य कमी होतं. त्वचेवरील संसर्ग बऱ्याचदा रक्तापर्यंत पोहोचतो. त्यामुळे हृदय, यकृत, किडनीचं नुकसान होतं. यामुळे शरीरातील अनेक अवयव बंद पडण्याची शक्यता वाढते. -मटा
  • Log in or register to post comments

डेंजर काम आहे.

रंगीला रतन
Mon, 10/16/2023 - 20:45 नवीन
डेंजर काम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

हे

कॉमी
Mon, 10/16/2023 - 21:14 नवीन
अजून तितके रीलायेबल नाहीये. ह्युमन राईट्स वॉच नामे संस्थेने ह्यावर रिपोर्ट केले आहे. इजरायल ने ह्या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यामुळे खरे काय माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

खरं असुदे. जन्नतमधली बिर्याणी थंड व्हायच्या

रंगीला रतन
Mon, 10/16/2023 - 21:25 नवीन
खरं असुदे. जन्नतमधली बिर्याणी थंड व्हायच्या आधी हरामखोर हमासवाल्यांना खायला तरी भेटेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

+७८६

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/16/2023 - 22:27 नवीन
+७८६
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन

रशियाने ही २०२२ मध्ये युक्रेन

Bhakti
Mon, 10/16/2023 - 21:41 नवीन
रशियाने ही २०२२ मध्ये युक्रेन विरूद्ध हा बॉम्ब वापरला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

काही नाही. ९९ प्रतिसाद होते.

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/16/2023 - 20:31 नवीन
काही नाही. ९९ प्रतिसाद होते. १०० पुर्ण केले. :)
  • Log in or register to post comments

शतक पूर्ण केल्या बद्दल

जेपी
Tue, 10/17/2023 - 22:04 नवीन
आपला सत्कार गाझा पट्टी चे तिकीट देऊन करायला पाहिजे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तीथं पाणी नाय, वीज नाय, अन्न

अमरेंद्र बाहुबली
Tue, 10/17/2023 - 22:36 नवीन
तीथं पाणी नाय, वीज नाय, अन्न नाय. कधी इस्रायलचं राकेट येऊन पडंल ह्याचा भरवसा नाय, काय कराचं जाऊन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

विस्मयकारक!

निनाद
Wed, 10/18/2023 - 06:25 नवीन
हमास चे नेतृत्त्व हे चक्क कम्युनिस्ट आहे आणि पोलिट्ब्युरो ठरवेल तशी दिशा असते. यांना कम्युनिझम चे नेतृत्त्व चालते?
  • Log in or register to post comments

कम्युनिझम पॅलेस्टाईनमध्ये तसा नवा नाही.

टर्मीनेटर
Wed, 10/18/2023 - 10:56 नवीन
यांना कम्युनिझम चे नेतृत्त्व चालते?
कम्युनिझम पॅलेस्टाईनमध्ये तसा नवा नाही. १९८७ साली अस्तित्वात आलेल्या हमास ह्या दहशतवादी संघटनेच्या आधी दोन दशके म्हणजे सिक्स डे वॉर नंतर अवघ्या सहा महिन्यांनी १९६७ च्या डिसेंबर महिन्यात पॅलेस्टाईन मुक्तीसाठी 'मार्क्सवादी-लेनिनिस्ट पॉप्युलर फ्रंट'ची स्थापना झाली होती. पुढच्या दशकात ह्या डाव्या गटांनी केलेले अनेक रक्तरंजित हल्ले आणि विमानांचे अपहरण अशा घटनांतून पॅलेस्टाईनकडे जगाचे लक्ष वेधून घेतले होते. हमास हे मुस्लिम ब्रदरहूड ह्या जिहादी/दहशतवादी संघटनेचे अपत्य मानले जाते. मुस्लिम ब्रदरहूडच्या संस्थापकाच्या विचारांवर नाझीझम आणि फॅसिझमचा प्रभाव होता. हमास ह्या त्यांच्या अपत्याने 'इस्रायलचा सर्वनाश' हे आपले एकमेव ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या कार्यपद्धतीत त्या दोन विचारांबरोबरच कम्युनिस्ट कार्यपद्धतीचाही समावेश केला. पॉलिटब्युरोतील सर्वोच्च नेत्यांना स्वतः परदेशात (मुख्यत्वे टर्की मध्ये) सुरक्षित बसून स्थानिक दुय्यम नेतेमंडळी आणि आपला जीव धोक्यात घालणाऱ्या कार्यकर्ते, अनुयायी, समर्थकांना आदेश देणे छान सोयीचे पडते. ग्राउंड लेव्हलवर काहीही होवो, ही नेतेमंडळी मात्र परदेशात सुरक्षित असतात 😀
  • Log in or register to post comments

ग्राउंड लेव्हलवर काहीही होवो,

मुक्त विहारि
Wed, 10/18/2023 - 17:45 नवीन
नेतेमंडळी मात्र परदेशात सुरक्षित असतात ... --- पटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

काय नवी खबरबात??

अमरेंद्र बाहुबली
Fri, 10/20/2023 - 16:48 नवीन
काय नवी खबरबात??
  • Log in or register to post comments

खबरबात तर आहे. तीच लिहायला मिपावर आलो होतो

टर्मीनेटर
Fri, 10/20/2023 - 17:11 नवीन
खबरबात तर आहे. तीच लिहायला मिपावर आलो होतो, पण ते पडले बाजुला, त्याऐवजी एक कथा टंकत बसलो आहे 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

सांगा की.

अमरेंद्र बाहुबली
Fri, 10/20/2023 - 19:09 नवीन
सांगा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

समाज माध्यमावर ज्यू विरोध आणि हिटलरचे समर्थन

टर्मीनेटर
Fri, 10/20/2023 - 23:05 नवीन
समाज माध्यमावर ज्यू विरोध आणि हिटलरचे समर्थन करणे पडले महाग! “No wonder why Hitler wanted to get rid of all of them,” असे इंस्टाग्राम वरील आपल्या स्टोरी मध्ये लिहिणे 'नोजिमा हुसाइनोवा' नावाच्या पंचवीस वर्षीय तरुणीला महागात पडले आहे. ही तरुणी सिटी बँकेची कर्मचारी होती आणि इंस्टाग्राम आणि X (पूर्वाश्रमीचे ट्वीटर) अशा समाज माध्यमंवर व्हायरल झालेल्या तिच्या ज्यू-विरोधी विचाराच्या आणि हिटलरने केलेल्या हत्याकांडाचे समर्थन करणाऱ्या पोस्ट्सवर उमटलेल्या वापरकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रियांच्या परिणामी तीला आपली नोकरी गमवावी लागली आहे. सिटी बँकेने ह्या प्रकरणाची गंभीर दखल घेत तीला कामावरून कमी केल्याची पोस्ट X वर केली आहे. तिच्या ह्या बेजवाबदार कॉमेंटमुळे जवळपास सर्वच समाज माध्यमांवरील तिच्या प्रोफाइल्स डिलीट करण्यात आल्या आहेत. आपली ओळख लपवून एखाद्या टोपणनावामागे लपून वाट्टेल त्या हिडीस गोष्टींचे समर्थन करणाऱ्यांच्या पराक्रमाची तुलना ही शिखंडीच्या मागे लपून शरसंधान करणाऱ्या अर्जुनाच्या त्या निंदनीय पराक्रमाशीच होऊ शकते, परंतु आपली ओळख जाहीर असताना केलेल्या विधानाचे परिणाम भोगलेल्या ह्या तरुणीविषयी तिचे कृत्य चुकीचे असले तरी वर उल्लेख केलेल्या भेकड लोकांपेक्षा जास्त आदर वाटतो 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पण नोकरी गेली ना. :(

अमरेंद्र बाहुबली
Sat, 10/21/2023 - 00:11 नवीन
पण नोकरी गेली ना. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

Al-islamic Bank of... अशा

रात्रीचे चांदणे
Sat, 10/21/2023 - 06:57 नवीन
Al-islamic Bank of... अशा कोणत्या तरी बँकेत तीला मिळेल नोकरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

>>>काय नवी खबरबात??

अहिरावण
Fri, 10/20/2023 - 19:04 नवीन
>>>काय नवी खबरबात?? काही नाही. तोच गुल तीच काडी... कधी हा पेटवतो कधी तो... कधी पेटते कधी विझते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मी इस्रायल चा साहानुभूतीदार

अमरेंद्र बाहुबली
Fri, 10/20/2023 - 19:10 नवीन
मी इस्रायल चा साहानुभूतीदार असल्यानं काळजी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

फक्त इस्त्रायल नाही...

अहिरावण
Sat, 10/21/2023 - 10:31 नवीन
आम्हाला मानवतेची काळजी वाटते. काय करणार सनातनी वृत्ती आहे आमची. पिंडच असा घडला आहे. जे खळांची व्यंकटी सांडो | तयां सत्कर्मीं रती वाढो || भूतां परस्परें जडो | मैत्र जीवांचें || दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ॐ सर्वे भवन्तु सुखिनः । सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चित् दुःख भाग्भवेत् ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मी मानवतावादी असल्यानेच मला

अमरेंद्र बाहुबली
Sat, 10/21/2023 - 12:52 नवीन
मी मानवतावादी असल्यानेच मला इस्रायल ची काळजी वाटते. आजूबाजूला सर्वच शत्रू आहेत त्यांच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

मानवतावादी आणि शत्रु?

अहिरावण
Sat, 10/21/2023 - 14:43 नवीन
शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा। शत्रु बुद्धि विनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते। खरा मानवतावादी... अर्थात फक्त आणि फक्त सनातनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

माझा सनातन प्रभातला पाठिंबा

अमरेंद्र बाहुबली
Sat, 10/21/2023 - 21:18 नवीन
माझा सनातन प्रभातला पाठिंबा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

तुम्ही छुपे सनातनी आहात असा

अहिरावण
Sun, 10/22/2023 - 10:50 नवीन
तुम्ही छुपे सनातनी आहात असा संशय होताच. आता खात्री पटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

Canada भारत वितुष्ट

कंजूस
Sat, 10/21/2023 - 20:23 नवीन
Canada भारत वितुष्ट हा एक ज्वलंत प्रश्न होत आहे. कालच्या ट्रुडोच्या वक्तव्याने जाळ वाढला आहे.
  • Log in or register to post comments

'सॅटरडे नाईट, फुल टाईट' हा

टर्मीनेटर
Sat, 10/21/2023 - 23:34 नवीन
'सॅटरडे नाईट, फुल टाईट' हा आपला फंडा असल्याने ह्या विषयावर उद्या बोलतो 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

जर्मनीच्या गृहमंत्री नॅन्सी

अमरेंद्र बाहुबली
Sat, 10/21/2023 - 21:18 नवीन
जर्मनीच्या गृहमंत्री नॅन्सी फेझर यांनी घोषणा केलीय की हमासला पाठिंबा देणाऱ्यांना देशातून हद्दपार केले जाईल.
  • Log in or register to post comments

उत्तम निर्णय घेतला ....

मुक्त विहारि
Sun, 10/22/2023 - 09:22 नवीन
उत्तम निर्णय घेतला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

>>जर्मनीच्या गृहमंत्री नॅन्सी

अहिरावण
Sun, 10/22/2023 - 10:50 नवीन
>>जर्मनीच्या गृहमंत्री नॅन्सी फेझर यांनी घोषणा केलीय की हमासला पाठिंबा देणाऱ्यांना देशातून हद्दपार केले जाईल. आणि पॅलेस्टीनला पाठिंबा दिला तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पॅलेस्टीनआड हमासला पाठिंबा

अमरेंद्र बाहुबली
Sun, 10/22/2023 - 11:17 नवीन
पॅलेस्टीनआड हमासला पाठिंबा दिला तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

ईस्त्रायलच्या आड अ‍ॅग्लो

अहिरावण
Sun, 10/22/2023 - 19:07 नवीन
ईस्त्रायलच्या आड अ‍ॅग्लो सॅक्सनांच्या फुटीर आणि विद्वेषी वृत्तीला पाठिंबा दिला तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

इस्त्रायलची कठोर भूमिका...

मुक्त विहारि
Sun, 10/22/2023 - 09:52 नवीन
""बसमध्ये भरून गाझाला पाठवेन"; युद्धादरम्यान आपल्या नागरिकांवरच संतापले इस्रायली अधिकारी - Marathi News | israeli police chief kobi shabtai threatens anti war protesters of israel to send gaza in buses | Latest international News at Lokmat.com" https://www.lokmat.com/international/israeli-police-chief-kobi-shabtai-threatens-anti-war-protesters-of-israel-to-send-gaza-in-buses-a-a597/amp/ ------ अतिशय उत्तम निर्णय.... राष्ट्र प्रथम...
  • Log in or register to post comments

भारतातून बसेस भरुन पाठवायच्या

अहिरावण
Sun, 10/22/2023 - 10:51 नवीन
भारतातून बसेस भरुन पाठवायच्या तर किती बसेस लागतील? किती डिझेल? जाऊ द्या ! आहे तसेच राहूद्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

गाझा नी वेस्ट बॅंक वर जोरात

अमरेंद्र बाहुबली
Sun, 10/22/2023 - 16:56 नवीन
गाझा नी वेस्ट बॅंक वर जोरात हल्ला चढवलाय म्हणे इस्रायलनं. मला वाटतंय वेस्च बॅंकेतील पैसा लूटायचा असावा. :)
  • Log in or register to post comments

Israel–Hamas war: संकटात

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/23/2023 - 08:16 नवीन
Israel–Hamas war: संकटात सापडलेल्या पॅलेस्टिनींसाठी भारताचा मदतीचा हात, गाझामध्ये पाठवली मोठी मदत :) https://www.esakal.com/global/israelhamas-war-india-helping-hand-for-palestinians-massive-aid-sent-to-gaza-srk94?fbclid=IwAR0Kv7lfna1GR7B6Gj9YxIN0QWxYzTs8ouAJKtd8cF_kOjwQkDDvm2ClWH4
  • Log in or register to post comments

मुक्तविहारी काका कुठं हायती??

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/23/2023 - 08:40 नवीन
मुक्तविहारी काका कुठं हायती?? दिसना झालंत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अतिशय चुकीचा निर्णय....

मुक्त विहारि
Mon, 10/23/2023 - 18:07 नवीन
भारतीय इतिहासातून काहीही शिकत नाहीत... नको तिथे उदारमतवाद... हीच गोष्ट, पृथ्वीराज चौहान यांनी केली होती आणि हीच चूक प्रतापराव गुजर यांनी केली होती... पाहुण्याच्या काठीने साप मरत असेल तर, आपण सापाला वाचवायला जाऊ नये... हीच हमास नंतर भारत विरोधी कारवाया करायला मागे पुढे पाहणार नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

सहमत.

रंगीला रतन
Mon, 10/23/2023 - 18:55 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

घानेरडी मूव्ह.

रंगीला रतन
Mon, 10/23/2023 - 19:57 नवीन
घानेरडी मूव्ह.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

प्रतिसाद अमरेंद्र बाहुबली

रंगीला रतन
Mon, 10/23/2023 - 19:59 नवीन
प्रतिसाद अमरेंद्र बाहुबली यांच्या प्रतिसादावर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन

भारतीय सरकारे बाय डिफोल्ट

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/23/2023 - 22:22 नवीन
भारतीय सरकारे बाय डिफोल्ट मुर्ख असतात हे पुन्हा सिध्द झालं मुळात जो शत्रू आहे त्याला मित्र बनवायच्या नादात जवळचा मित्र तर जाईलच पण शत्रुही शत्रुच राहील. इस्रायल हा अमावस्येचा चंद्र आहे तो वाढतच जाणार आहे कधीच आकसनार नाहीये. आणखी शंभर दिडशे वर्षांनी लेबनान, सिरीया, जार्डन वगैरे गिळून इस्रायल अमेरीकेसारखं एक महाभलाढ्य राष्ट्र म्हणून पुढे येणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा