(ढबोला...)
लेखनविषय:
काव्यरस
पेरणा :- प्राची ताईची अबोला..
http://misalpav.com/node/50707#comment-1153556
ढबोला...
तुझ्या ढबोल्या भावाने सोडला मागे भस्मासूर जीव झाला वेडापिसा त्याचा पाहुनिया नूर तुझ्या ढबोल्या भावाने कशी ओरपली नळी? उरे हडकांचा ढीग रस्साजाई खोल तळी तुझ्या ढबोल्या भावाने किती भाकरी हादडल्या.. अगं वेडे भातही आता आला नं संपाया! तुझ्या ढबोल्या भावापुढे मी सपशेल शरण, बघावे तेव्हा तेव्हा याचे चालूच चरणं ! (“चरणं” मधला “च” हा चरख्यातला “च” आहे याच्री कृपया नोंद घ्यावी) पैजारबुवा,
वाचने
8349
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
मस्तच.
ण वर टिबं दिले असते तरी ट्युब भक्कन पेटली असती.
In reply to ण वर टिबं by कर्नलतपस्वी
लोकाग्रहास्तव बदल केला आहे
पैजारबुवा,
चावलेतला “च” हा चरख्यातला, चरणातला 'च'नाही.
चरणं जाऊदेत..
चरण कुठेत आपले माऊली!!
:)
तुमचे विडंबन वाचणार नाही. ठसका लागला ना....हहपुवा. ढबोल्या हा शब्द आवडला...
कहर!!
ख्या ख्या ख्या :=)
अं हं ...
बात कुछ जमी नहीं पैजारबुवा
: -|
फारच भारी! ढबोला विशेषण आवडल्या गेले आहे.
कुठल्याही चांगल्या कवितेची वाट लावयलाच हवी का रे भल्या माणसा??
;)
हा तर षट्कार =))
भारिये विडंबन!!!


भारी विडंबन.:)
पैजारबुवा, घरी ही कविता वाचली गेली तर??
सं - दी - प
ढबोला शब्दाने कोषात मोलाची भर घातली आहे.
विडंबन फर्मास !
लै भारी जमेश !
हा .... हा .... हा .... !
तुल्यबळ टू ओरिजनल !
छान
बट आय डोन्ट अंडरस्टॅण्ड द टॅग्ज..
काणकोण
कोडाईकनाल
गरम पाण्याचे कुंड
भूछत्री
रौद्ररसइंदुरी
कृष्णमुर्ती ????
In reply to कविता अतिशय हुच्च आहे by तुषार काळभोर
हहपुवा :D
फर्मास विडंबन. माझ्यासारख्या "जे न देखे रवी..." या विभागात न फिरकणाऱ्या लोकांना फक्त विडंबन वाचण्यासाठी तुम्ही यायला लावता, आणि मग पेरणा अर्थातच वाचला जातो त्याबद्दल धन्यवाद.
व्वा माऊली