Skip to main content

(ढबोला...)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 21/09/2022 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा :- प्राची ताईची अबोला.. http://misalpav.com/node/50707#comment-1153556

ढबोला...

तुझ्या ढबोल्या भावाने सोडला मागे भस्मासूर जीव झाला वेडापिसा त्याचा पाहुनिया नूर तुझ्या ढबोल्या भावाने कशी ओरपली नळी? उरे हडकांचा ढीग रस्साजाई खोल तळी तुझ्या ढबोल्या भावाने किती भाकरी हादडल्या.. अगं वेडे भातही आता आला नं संपाया! तुझ्या ढबोल्या भावापुढे मी सपशेल शरण, बघावे तेव्हा तेव्हा याचे चालूच चरणं ! (“चरणं” मधला “च” हा चरख्यातला “च” आहे याच्री कृपया नोंद घ्यावी) पैजारबुवा,

वाचने 8396
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

कुठल्याही चांगल्या कवितेची वाट लावयलाच हवी का रे भल्या माणसा?? ;)

बट आय डोन्ट अंडरस्टॅण्ड द टॅग्ज.. काणकोण कोडाईकनाल गरम पाण्याचे कुंड भूछत्री रौद्ररसइंदुरी कृष्णमुर्ती ????

फर्मास विडंबन. माझ्यासारख्या "जे न देखे रवी..." या विभागात न फिरकणाऱ्या लोकांना फक्त विडंबन वाचण्यासाठी तुम्ही यायला लावता, आणि मग पेरणा अर्थातच वाचला जातो त्याबद्दल धन्यवाद.