Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by क्लिंटन on Mon, 08/01/2022 - 10:43
ऑगस्ट २०२२ हा महिना सुरू झाला असल्याने ताज्या घडामोडींचा नवा धागा काढत आहे. ६ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होईल. या निवडणुकीत भाजपकडून बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनकड आणि तृणमूल काँग्रेस सोडून इतर सगळ्या विरोधी पक्षांकडून काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा हे उमेदवार आहेत. मार्गारेट अल्वांची उमेदवारी जाहीर करताना आपल्याला विश्वासात घेतले नाही या कारणाने तृणमूल काँग्रेस हा एक प्रमुख विरोधी पक्ष मतदानात भाग घेणार नाही. तसेच बिजू जनता दलानेही जगदीप धनकड यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे ते देशाचे पुढचे उपराष्ट्रपती बनतील हे जवळपास नक्की आहे. राजकारणात (खरं तर कुठेही) कधी कोणाचे नशीब फळफळेल हे सांगता येत नाही. जगदीप धनकड हे त्यातीलच एक. jagdeep त्याचे झाले असे की १९८९ च्या लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना २५ सप्टेंबर १९८९ रोजी काँग्रेसविरोधी राजकारणातील एक महत्वाचे नेते आणि हरियाणाचे मुख्यमंत्री देवीलाल यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत बोट क्लबवर विरोधी पक्षांची विराट सभा झाली होती. त्या सभेसाठी जगदीप धनकड यांनी राजस्थानातील त्यांच्या झुनझुनू या ठिकाणाहून ७५ ट्रकभरून लोक आणले होते. त्या सभेत ७ लाख लोक हजर होते असे मी अन्यत्र वाचले आहे. एका ट्रकमध्ये कितीसे लोक मावत असतील? मला नाही वाटत ५०-६० पेक्षा जास्त लोक एका ट्रकमध्ये मावत असतील. अगदी १०० लोक एका ट्रकमध्ये कोंबले असे धरले तरी एकूण सभेला उपस्थित असलेल्या लोकांच्या तुलनेत १% हून थोडे जास्त लोक धनकड यांनी आणले होते. खुद्द देवीलालांच्या लक्षात जगदीप धनकड यावेत असे त्यात काय होते कल्पना नाही. पण ते आले. त्यावेळी धनकड ३८ वर्षाचे होते. 'ये छोरा होनहार है' असे म्हणत देवीलालांनी त्यांना जनता दलाची झुनझुनूमधून उमेदवारी मिळवून दिली. त्यापूर्वीचे १० वर्षे ते जयपूरला राजस्थान उच्च न्यायालयात वकीली करत होते. ते झुनझूनूमधून जिंकून लोकसभेत गेले आणि मग वि.प्र.सिंग यांच्या सरकारांमध्ये उपमंत्री होते. पुढे १९९१ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळच्या दोनेक महिन्यात त्यांनी राजीव गांधींचा विश्वास संपादन केला. त्यावेळेसही धनकड यांना झुनझुनूमधूनच उमेदवारी हवी होती पण १९८९ मध्ये स्वतः धनकड यांनी ज्यांना पराभूत केले ते काँग्रेस उमेदवार कॅप्टन अयुबखान यांची १९६५ च्या युध्दात वीरचक्र मिळाल्यामुळे असलेली ओळख आणि तसेच ते अल्पसंख्य समुदायातील असल्याने त्यांना उमेदवारी नाकारून धनकड यांना उमेदवार बनवायला राजीव गांधी तयार नव्हते. म्हणून शेवटी त्यांना अजमेरमधून उमेदवारी देण्यात आली. त्यांच्यासाठी राजीव गांधींनी स्वतः प्रचारसभा घेऊनही त्यांचा भाजप उमेदवाराने पराभव केला. पुढे १९९३ ते १९९८ या काळात धनकड राजस्थान विधानसभेत काँग्रेस पक्षाकडून आमदार होते. १९९८ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी परत एकदा झुनझुनूमधून काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणुक लढवली. त्यावेळी त्यांच्यासमोर ज्येष्ठ नेते शीशराम ओला (तिवारी काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा गट स्थापन केला होता त्याचे ते उमेदवार होते) आणि भाजपचे मदनलाल सैनी होते. त्या निवडणुकीत धनकड यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. धनकड यांचे त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले अशोक गेहलोत यांच्याशी जमायचे नाही. १९९८ च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत ८-९ महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरलेल्यांना उमेदवारी द्यायची नाही हा नियम काढून गेहलोत यांनी जगदीप धनकड यांचे तिकीट कापले. त्यानंतर धनकड १९९९ मध्ये काही महिने राष्ट्रवादीत आणि २००० मध्ये भाजपत सामील झाले. जवळपास २० वर्षे भाजपत काढूनही भाजपने त्यांना कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी दिली नाही की कोणते महत्वाचे पद दिले नाही. तरीही ते पक्षात राहिले आणि आपल्या वकिलीत रमले होते. २०१२ च्या सुमारास दोन वर्षांनी होणार्‍या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप स्वतःच्या बहुमताने सत्तेत येईल याची सुतराम शक्यता दिसत नव्हती. तरीही ते भाजपमध्येच राहिले. काँग्रेसमध्ये परत जायचा विचार त्यांनी केला नाही. अशोक गेहलोत यांच्याशी त्यांचे जमायचे नाही हे एक कारण असू शकेल. म्हणजे १९८९ मध्ये देवीलालांच्या नजरेत ते भरणे जसे त्यांच्या पथ्यावर पडले त्याप्रमाणेच अशोक गेहलोत यांच्याशी न जमणेही त्यांच्या पथ्यावर पडले असे दिसते. हा त्यांच्या नशीबाचाच भाग म्हणायला हवा. मधल्या वर्षांमध्ये जगदीप धनकड हे नाव विसरायलाच झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकींच्या वेळेस विकीपीडीया की अन्यत्र कुठे झुनझुनू लोकसभा मतदारसंघाविषयी वाचत असताना तिथे पूर्वी जिंकलेल्यांची नावे होती त्यात ते नाव वाचल्यावर 'अरे हे पण होते' हे आठवले. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे पक्षात कोणतेही पद न मिळता कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी न मिळताही जगदीप धनकड टिकून राहिले. गेल्या २० वर्षात रा.स्व.संघाशी त्यांनी जुळवून घेतले. लॉकडाऊनपूर्वी राजस्थानातील संघ पदाधिकार्‍यांची बैठक होती त्यासाठी मोहन भागवत राजस्थानात आले होते तेव्हा ते जगदीप धनकड यांच्या फार्महाऊसवरही आवर्जून गेले होते.वास्तविकपणे सर्वोच्च न्यायालयातील आघाडीचे वकील आहेत त्यांच्यात त्यांच्या नावाची गणना होते. पण कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, प्रशांत भूषण हे इतर त्याच लीगमधले वकील कोणत्या ना कोणत्या उचापात्या मधून मधून करत असतात. असे कशातही नाव धनकड यांचे सहसा येत नाही. तरी नाही म्हणायला त्यांच्या नावावर एक बट्टा म्हणजे काळवीट शिकारप्रकरणी त्यांनी सलमानखानचे वकीलपत्र घेतले होते ही एक वादग्रस्त केस त्यांच्या नावावर आहे. पण ती केस वगळता बातम्यांमध्ये यावी अशी कोणतीही केस त्यांनी लढवलेली नाही. अशा जगदीप धनकड यांची निवड जुलै २०१९ मध्ये अचानक बंगालच्या राज्यपालपदावर झाली. नियमावर बोट ठेऊन ममता सरकारला ते व्यवस्थित नडले. फेब्रुवारी २०२२ मध्ये ममता सरकारने बंगाल विधानसभेचे अधिवेशन ७ मार्चला बोलावायची शिफारस राज्यपालांकडे केली. पण राज्यपालांकडे शिफारस गेली त्यात एक घोळ होता. नेहमी सभागृहाची बैठक सकाळी ११ ला भरते (११ ए.एम) त्याऐवजी काही कारणांनी ती दुपारी २ ला भरवावी (२ पी.एम) अशी शिफारस ममता सरकारला करायची होती. पण ए.एम आणि पी.एम मध्ये घोळ झाला आणि राज्यपालांना गेलेल्या शिफारसीत विधानसभेची बैठक ७ मार्चला रात्री २ वाजता (२ ए.एम) बोलवावी अशी शिफारस गेली. ती शिफारस बघून राज्यपालांनी सरकारच्या मुख्य सचिवांना राजभवनावर बोलावून घेतले. पण ममता सरकार आणि राज्यपाल यांच्यातून विस्तव जात नसल्याने मुख्य सचिव तिथे गेलेच नाहीत. मग राज्यपालांनी सरकारने केलेल्या शिफारशीप्रमाणे ७ मार्चला रात्री २ वाजता विधानसभेची बैठक बोलावली. राज्यपाल मंत्रीमंडळाने केलेल्या शिफारशीला बांधील असतात आणि मला विधानसभेचे सत्र रात्री दोनला बोलवायची शिफारस आली त्याला मी काय करू असे त्यांनी म्हटले. मग पळापळ झाली. मुख्य सचिव राज्यपालांकडे गेले आणि त्यांनी पी.एम च्या ऐवजी ए.एम लिहिणे ही चूक आहे हे राज्यपालांना सांगितले. त्यावर मग नियमावर बोट ठेऊन मंत्रीमंडळाच्या शिफारसीला आय.ए.एस अधिकारी कोणत्या आधारात चूक म्हणत आहेत हा प्रश्न विचारला. मग परत मंत्रीमंडळाने सुधारीत शिफारस राज्यपालांकडे पाठवली आणि विधानसभेची बैठक दुपारी २ ला बोलावण्यात आली. कलकत्त्याजवळचे जादवपूर विद्यापीठ हे दिल्लीतील जे.एन.युची कनिष्ठ आवृत्ती शोभावी असे आहे. तिथे तत्कालीन केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो गेलेले असताना सी.ए.ए च्या प्रश्नावरून विद्यार्थ्यांनी त्यांना घेरले. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो की काय अशी परिस्थिती आली. हे कळल्यावर राज्यपाल जगदीप धनकड स्वतः तिथे गेले आणि आपल्या सुरक्षारक्षकांचा वापर करून त्यांनी बाबूल सुप्रियोंची सुटका केली. भाजपने आतापर्यंत भैरोसिंग शेखावत आणि वैंकय्या नायडू या वरीष्ठ नेत्यांना उपराष्ट्रपतीपदाची संधी दिली आहे. शेखावत तर पक्षाचे खूपच मोठे नेते होते- वाजपेयी- अडवाणींच्या बरोबरचे. वैंकय्या नायडू तितके ज्येष्ठ नसले तरी बर्‍यापैकी वरीष्ठ होते. त्यामानाने जगदीप धनकड हे नाव एकदम किरकोळ दिसते. असे म्हटले जात आहे की शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने जाट समाज भाजपपासून दुरावला आहे त्याला एका जाटाला उपराष्ट्रपती करून परत जवळ करायचा प्रयत्न आहे. तसेच जगदीप धनकड हे सुध्दा शेतकरी कुटुंबातील आहेत. पण शेतकरी आंदोलनाचा राजस्थानात फारसा प्रभाव नव्हता. जो काही होता तो पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात. तसेच हरियाणा-पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट राजस्थानातील जाटांना आपल्या बरोबरचे मानतात का हा एक प्रश्न आहे. त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे असे कोणाला राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती बनवून त्याचा निवडणुकांच्या राजकारणावर किती फरक पडतो? फार नसावा. नाहीतर प्रणव मुखर्जींना राष्ट्रपती केल्यावर काँग्रेसने बंगालमध्ये मोठे यश मिळवायला हवे होते. तसे झाले नव्हते. असो. जगदीप धनकड यांना शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
  • 34867 views

प्रतिक्रिया

Submitted by आग्या१९९० on Tue, 08/02/2022 - 11:30

Permalink

2G स्पेक्ट्रम वाटपातील

2G स्पेक्ट्रम वाटपातील चुकीच्या पद्धतीमुळे सरकारचे रु १.७६ लाख कोटी इतके नुकसान झाले असे आरोप विरोधी पक्षाने केले होते, अर्थात ते तसे सिद्ध करू शकले नव्हते. कपिल सिब्बल तेव्हाच म्हणाले होते हा " नोशनल लॉस " म्हणू शकता, प्रत्यक्षात एक रुपयाचाही सरकारला तोटा झालेला नाही. आज १२ वर्षानंतर त्यांचे शब्द खरे ठरले. 5G लिलावातून सरकारला फक्त १.५ लाख कोटी इतकेच मिळू शकले. कच्ची मडकी ती कच्ची मडकीच.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Tue, 08/02/2022 - 11:37

In reply to 2G स्पेक्ट्रम वाटपातील by आग्या१९९०

Permalink

??

का हो १२ वर्षांपूर्वी तुम्ही फोनचे बिल किती भरत होता आणि आता किती भरता? मी त्यावेळी महिन्याला ५५० रूपये नुसत्या कॉलिंगसाठी भरायचो. डेटा वगैरे भानगड त्यावेळी माझ्याकडे नव्हती. आता वर्षाला २५०० मध्ये ४जी डेटा आणि अमर्याद कॉलिंग मिळते. तेव्हा एका एस.एम.एस ला १ रूपया लागायचा. आता एम.एस.एस ही भानगडच व्हॉट्सअ‍ॅपने काढून टाकली आहे. त्यावेळी एकूण टेलिकॉम इंडस्ट्रीचा जितका रेव्हेन्यु होता त्यापेक्षा आता या कारणांमुळे कमी आहे. या सगळ्या कारणांचा कंपन्यांनी किती रक्कमेचे लिलाव लावले याच्याशी संबंध असेल ही शक्यताही ध्यानात घ्यावीशी वाटली नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by सर टोबी on Tue, 08/02/2022 - 13:57

In reply to ?? by क्लिंटन

Permalink

अढळ निष्ठा

आपल्या प्रतिसादातून आपली अढळ निष्ठा तेवढी दिसते आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला आपण फार निरक्षर विवेक बुद्धीने वागतो आहोत असे वाटत असावे पण तसे नाहीय. कोणतेही तंत्रज्ञान त्याच्या सुरुवातीच्या काळात कमी ग्राहक वर्गामुळे, उत्पादन विकसित करण्याच्या खर्चामुळे सुरुवातीस महागच असते. मारुती ८०० सुरुवातीला लब्ध प्रतिष्ठितांमध्ये बोलबाला असलेली आणि वरकड रक्कम देऊन विकत घेतली जाणारी मोटार होती. आता पुण्यात त्या गाडीपेक्षा चांगल्या दर्जाच्या बेवारसपणे सोडून दिलेल्या गाड्या रस्तोरस्ती दिसतील. ते काही असले तरी भ्रष्टाचाराचा मुद्दा तरी प्रचाराचा भाग म्हणून भाजपच्या हातून निसटला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 08/02/2022 - 12:16

In reply to 2G स्पेक्ट्रम वाटपातील by आग्या१९९०

Permalink

अभ्यास व वाचन वाढवावे. २-जी

अभ्यास व वाचन वाढवावे. २-जी तरंगलहरी मनमोहन सिंगांच्या काळात किती रूपयांना विकल्या होत्या व नंतर मोदी सरकारच्या काळात त्याच तरंगलहरीच्या लिलावातून किती रूपये मिळाले याचा शोध घ्यावा. मग सारे भ्रम दूर होतील.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Tue, 08/02/2022 - 11:43

Permalink

धन्यवाद! तुमच्या प्रश्नातच

धन्यवाद! तुमच्या प्रश्नातच उत्तर दडले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 08/02/2022 - 14:42

Permalink

मनमोहन सिंग सरकारने २-जी

मनमोहन सिंग सरकारने २-जी तरंगलहरी फक्त ७,५०० कोटी रूपयांना विकल्या होत्या. परंतु सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द करून लिलावाद्वारे तरंगलहरी विकण्याचा निर्णय दिल्यानंतर लिलावाच्या पहिल्या फेरीतच जवळपास ६५,७८९ कोटी रूपये मिळाले होते. https://www.google.com/amp/s/www.livemint.com/Industry/xt5r4Zs5RmzjdwuLUdwJMI/Spectrum-auction-ends-after-lukewarm-response-from-telcos.html%3ffacet=amp ३जी तरंगलहरी लिलावातून ५८,४१६ कोटी रुपये मिळाले होते. https://www.google.com/amp/s/www.thehindu.com/business/Industry//article61761601.ece/amp/ ७,५०० कोटी रूपये महसूलापेक्षा १,२३,००० कोटी रूपयांहून जास्त महसूल लिलावातून मिळाला. सिब्बलाची शून्य नुकसान थिअरी केव्हाच खोटी ठरली.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 08/02/2022 - 17:30

Permalink

connection with Silly Souls

connection with Silly Souls Café and Bar in Goa’s Assagao, the Delhi High Court has said that neither the restaurant nor the land on which it exists is owned by Irani and her daughter. https://indianexpress.com/article/cities/delhi/slander-malicious-intent-delhi-hc-statements-congress-smriti-irani-daughter-8064247/ कॉंग्रेसमध्ये जे हाताच्या बोटावर मोजण्याइतके विचारी व समंजस नेते शिल्लक आहेत त्यात जयराम रमेश आहेत. अश्या व्यक्तीने असे निराधार आरोप करायला नको होते.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 08/02/2022 - 20:16

Permalink

अमेरिका लोकसभेच्या सभापती

अमेरिका लोकसभेच्या सभापती नॅन्सी पेलोसी आज तैवानला अधिकृत भेट देताहेत. त्यामुळे चीनचा तिळपापड झालाय. चीन हे निमित्त करून तैवानवर हल्ला करणार असल्याचे बोलले जातंय. चिनी लष्करी विमानांनी आज तैवानच्या हद्दीतून उड्डाण केल्याच्या बातम्या आहेत. चीनने अमेरिकेला धमकी देऊन निषेधही केला आहे. कदाचित तैवान विरूद्ध चीन युद्ध सुरू होऊ शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Tue, 08/02/2022 - 21:23

In reply to अमेरिका लोकसभेच्या सभापती by श्रीगुरुजी

Permalink

कदाचित तैवान विरूद्ध चीन

कदाचित तैवान विरूद्ध चीन युद्ध सुरू होऊ शकते.
चीनमधली अंतर्गत शांतता सांभाळणे अशक्य झाले तरच चीनचे सर्वेसर्वा अशा प्रकारचे निर्णय घेतील असे वाटते. मात्र यात भारतही ओढला जाईल हे नक्की.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 08/02/2022 - 20:17

Permalink

जमिनीखाली सापडलं ४५०० वर्षे प्राचीन 'सूर्य मंदिर'

जमिनीखाली सापडलं ४५०० वर्षे प्राचीन 'सूर्य मंदिर', भूगर्भात होती मातीची भांडी अन् बिअरचे ग्लास... https://maharashtratimes.com/international/international-news/ancient-sun-temple-found-in-desert-4500-years-old-egypt-sun-temple-buried/articleshow/93296500.cms अजून एक नामशेष झालेली संस्कृती ....
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 08/02/2022 - 20:30

Permalink

संजय राऊतांच्या बाबतीत, पत्राचाळ रहिवासी काय बोलल्या...

https://www.lokmat.com/mumbai/mumbai-patra-chawl-victim-slams-shivsena-mp-sanjay-raut-a681/ ------- सामान्य माणसाचे हाल .....
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Wed, 08/03/2022 - 09:05

Permalink

ऋतुमती....

विद्यार्थीनी ऋतुमती होती म्हणून शिक्षकांनी वृक्षारोपण करून दिले नाही. राज्यभर तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. चौकशीनंतर कळाले ती मुलगी त्या दिवशी शाळेत हजर नव्हती. नेहमीच गैरहजर असते.कुठल्यातरी राजकिय पक्षाचे काम करते. काही आसो पण बिचार्‍या शिक्षकाची वाट लागली ना. आता शाळेतही राजकारण. कमाल आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी .
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Wed, 08/03/2022 - 17:39

Permalink

त्यामुळे आपल्या ब्राह्मण

त्यामुळे आपल्या ब्राह्मण समर्थकांना न दुखावता फडणवीस त्यातून सुखरूप सुटले असते. महाराष्ट्राचं राजकारणावरील चर्चेत हा मुद्दा किरकोळ नाही का? फक्त ३. ५% लोकसंखयेचं या जातीची मते कोणाला का पडली काय फरक पडतो ? उगचःचा हा मुद्दा वारंवार काढला जातो
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 08/03/2022 - 18:37

In reply to त्यामुळे आपल्या ब्राह्मण by चौकस२१२

Permalink

ही ३.५% मते एकगठ्ठा भाजपला

ही ३.५% मते एकगठ्ठा भाजपला मिळत असत. जेमतेम २५-२८% मते मिळणाऱ्या पक्षाला यातील २% मते जरी मिळाली नाहीत तरी नक्कीच फरक पडतो. ही ३.५% मते सर्व २८८ मतदारसंघात समान प्रमाणात पसरलेली नाहीत. ग्रामीण मतदारसंघात तर हे प्रमाण जवळपास शून्य असावे. परंतु काही विशिष्ट शहरी मतदारसंघात हे प्रमाण १५-२०% हून अधिक असावे. पुण्यातील ८ विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर ब्राह्मण मते न मिळाल्याने लष्कर, वडगावशेरी, खडकवासला व हडपसर मतदारसंघात कोणत्याही पक्षाला फरक पडणार नाही. परंतु शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती व कसबा मतदारसंघात ब्राह्मण मते मिळाली नाहीत तर भाजपचा उमेदवार पराभूत होऊ शकतो. अशीच परिस्थिती डोंबिवली, कल्याण, नाशिक वगैरे मतदारसंघात असावी. असे एकूण मतदारसंघ ८-१० च असले तरी ज्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी १२२ आमदार आहे, त्या पक्षाला हे हक्काचे ८-१० मतदारसंघ गमावणे परवडेल का? २०१९ मध्ये २०१४ च्या तुलनेत भाजपने १९ जागा गमावल्या. यासाठी विरूद्ध गेलेल्या काही इतर मागासवर्गीय मतांबरोबरीने विरूद्ध गेलेल्या काही ब्राह्मण मतेसुद्धा कारणीभूत आहेत. विशेषतः आपल्याला मराठा मते मिळावीत यासाठी ब्राह्मण मतांवर लाथ मारली गेली. यामुळे काही ब्राह्मण मते दूर गेलीच परंतु अपेक्षेप्रमाणे मराठा मते सुद्धा मिळाली नाहीत. हातातला पक्षी सोडून झुडपातले दोन पक्षी मिळवायला गेले की हात रिकामेच राहतात.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Wed, 08/03/2022 - 22:03

In reply to त्यामुळे आपल्या ब्राह्मण by चौकस२१२

Permalink

हेच मी आधीही बोललो आहे

त्यातही ह्या ३.५% लोकांत राजकीय व्होट बँक म्हणून सर्वपक्षीय लोकांशी वाटाघाटी करण्याइतकी राजकीय समज अन् प्रगल्भता पण नाही, उगाच जुनं काहीतरी कुरवाळत बसायचं अन् सकल हिंदुधर्माचा भार आपल्या ३.५% खांद्यावर असल्यागत सुस्कारे सोडत बसायचं ह्याला काही अर्थ नाही. अर्थात गुरुजींचे म्हणणे असते की ह्या ३.५% मतांमुळे चारदोन निर्णायक मतदारसंघांत भाजप हरते अन् सत्तेपासून दूर राहते म्हणून ३.५% महत्वाचे आहेत, पण आकडे पाहता असे वाटत नाही, २०१४ मध्ये ऐन मोदी लाट असताना पण भाजपला १२२ सीट होत्या आता ह्यात ३.५% इफेक्ट असणाऱ्या चार किंवा अगदी पाच सीट जोडल्या तरी फार काही बहुमत मिळत नव्हतं, ही गत २०१४ मधील आहे २०१९ तर डिस्कस करायलाच नको ! वादळी प्रकरण असतं ते ! ३.५% मुळे काहीही फरक पडत नाही हे क्लिअर रायटिंग ऑन द वॉल भाजपने २०१४ मध्येच वाचून घेतले आहे, अन् बहुमत मिळवून देणारे इतर ऑप्शन एक्सप्लोर करायला सुरुवात केली होती तेव्हापासूनच, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, इत्यादी प्रयत्न ह्याच मेंटलीटी मधून आलेले आहेत. ब्राह्मण समाजाने हे वेळीच ओळखून एकगठ्ठा व्हायला सुरुवात केल्यास उत्तम अर्थात कॉमी खाली म्हणालेत तसे मध्यमवर्गीय पांढरपेशा समाजाला (बहुसंख्य ब्राह्मण ह्यात मोडतील) ह्याने फरक पडत नाही कारण त्यांना वरती उल्लेखलेली चार प्रिंशीपल नावाचे इल्युजन जास्त प्रिय असते. गुरुजी convince होतील असे वाटत नाही, किंवा ते convince झाले नाहीत तरी त्यांच्या conviction किंवा मांडणीवर मात्र मी कधीही प्रश्नचिन्ह उभं करणार नाही तरीही, गरज असली तर ब्राह्मण समाजाला आहे भाजपची, भाजपला मात्र अशी काहीही गरज नाही हे माझं गृहितक मला तरी पावलोपावली दिसतंय आता.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Wed, 08/03/2022 - 17:51

Permalink

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी

आजही सर्वोच्च न्यायालयात राज्यातील आमदारांना अपात्र ठरविण्यासंबंधी आणि शिवसेना नक्की कोणाची याविषयी निकाल आलेला नाही. आता उद्या परत यावर सुनावणी होणार आहे. केसमधील गुंतागुंत लक्षात घेता हा मुद्दा घटनापीठाकडे सोपावला गेला तरी आश्चर्य वाटू नये. तसे झाल्यास आणखी काही महिने त्या प्रकरणाचा निकाल लांबेल. एक गोष्ट कळत नाही. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मंत्रीमंडळाचा विस्तार होणारच नाही का? उध्दव ठाकरे २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री झाले तेव्हा सुरवातीला ६ मंत्री होते. त्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार ३० डिसेंबर २०१९ या दिवशी म्हणजे एका महिन्यापेक्षाही जास्त काळाने झाला होता. त्यानंतर आठवड्याभराने मंत्र्याचे खातेवाटप झाले. म्हणजे २८ नोव्हेंबर २०१९ ते ५ जानेवारी २०२० या काळात ठाकरेंच्या मंत्रीमंडळात सुरवातीला ६ आणि नंतर ४० बिनखात्याचे मंत्री होते. तेव्हा एकनाथ शिंदे जास्तीतजास्त काळ मंत्रीमंडळ न नेमायचा ठाकरेंचा विक्रम मोडणार असे दिसते. त्यातही ठाकरेंच्या मंत्रीमंडळात सुरवातीला ६ मंत्री तरी होते. इथे तर एकच आहे. किती दिवस मंत्रीमंडळाशिवाय कारभार चालणार आहे समजत नाही. जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत असेच चालू राहणार असेल तर मग विधानसभा बरखास्त करून गुजरात, हिमाचल प्रदेश (आणि कदाचित जम्मू-काश्मीर) बरोबर डिसेंबर २०२२ मध्ये निवडणुका घ्यायला हव्यात असे म्हणावे तर शिवसेना नक्की कोणाची हा निकाल येत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे गटाचे आमदार कोणाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवतील याची स्पष्टता नाही. एकूणच भलतेच त्रांगडे होऊन बसले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 08/03/2022 - 18:56

In reply to सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी by क्लिंटन

Permalink

भाजपने अश्या प्रकारे सत्तेत न

भाजपने अश्या प्रकारे सत्तेत न येता पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत थांबायला हवे होते असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 08/03/2022 - 19:35

Permalink

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला.. https://www.loksatta.com/desh-videsh/new-satellite-launch-vehicle-sslv-in-isro-fleet-soon-first-flight-on-7th-august-asj-82-3054363/ इस्त्रोकडे जगातील विविध देश छोटे उपग्रह प्रक्षेपणासाठी सध्या रांगा लावून बसले आहेत. हे छोटे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी आकाराने मोठा, २९० टन वजनाचा polar satellite launch vehicle (PSLV) प्रक्षेपक सज्ज करावा लागतो. इस्त्रोचा हा भरवशाचा प्रक्षेपक ५०० किलोमीटर उंचीपर्यंत २००० पेक्षा जास्त किलोग्रॅम वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करु शकतो. मात्र हा प्रक्षेपक सज्ज कऱण्यासाठी ६०० कर्मचाऱ्यांना काही महिने आधी तयारी करावी लागते. मात्र इस्त्रोचा अवघ्या १०० टन वजनाचा SSLV हा नवा प्रक्षेपक फक्त सहा जणांची टीम अवघ्या सात दिवसांत उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज करु शकते. यामुळे SSLV प्रक्षेपणाच्या माध्यमातून इस्त्रोची मनुष्यबळ आणि पैशांची मोठी बचत होणार आहे....
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Wed, 08/03/2022 - 21:20

Permalink

मी या धाग्यावर पटाईत काकांचे

मी या धाग्यावर पटाईत काकांचे प्रतिसाद वाचायला येतो.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on गुरुवार, 08/04/2022 - 10:43

Permalink

आज आचार्य बाळकृष्ण यांचा

आज आचार्य बाळकृष्ण यांचा वाढदिवस जड़ी बूटी दिवस म्हणून साजरा केल्या जातो. पतंजलि गेल्या आठवढ्यापासून देशभरात 1 कोटी वनस्पतींची लागवण केली. आज मोठ्या प्रमाणात रक्तदान ही. आज त्यांचा 50 वा वाढ दिवस म्हणून कृषि, आयुर्वेद सहित विभिन्न विषयांवर चार दिवासीय सेमिनार ही झाले. त्यात एक दिवस एकीकृत चिकत्सा प्रणाली वर एलोपैथी डॉक्टरांचे अनेक प्रेझेंटेशन झाले. भोपाल एम्सचे अध्यक्ष डॉक्टर वाय.के. गुप्ता पासून अनेक प्रसिद्ध डॉक्टर तिथे उपस्थित होते. (बेचर्‍या आयएमए वाल्यांना किती दुख झाले असेल). या शिवाय विश्व भेजस संहिता (World Herbal Encyclopidia) चे 51 खंडांचे लोकार्पण होणार. (पहिल्या खंडाचे लोकार्पण प्रधानमंत्री यांच्या हस्ते झाले होते). पूर्ण ग्रंथ 109 खंडांचे होणार त्यात जगातील सर्व औषधी वनस्पतींची माहिती जगातील 2000 भाषेत (बोली भाषा समेत) असणार. ह्या महान ग्रंथांच्या निर्मितीच्या कार्याची सुरुवात 2008 पासून सुरू झाली होती. जगातील शेकडो विशेषज्ञांचे अनेक संस्थांचे यात योगदान आहे. विभिन्न विषयांवर अनेक ग्रंथांचे लोकार्पण ही आज होणार.
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on गुरुवार, 08/04/2022 - 11:17

In reply to आज आचार्य बाळकृष्ण यांचा by विवेकपटाईत

Permalink

बेचर्‍या आयएमए वाल्यांना किती

बेचर्‍या आयएमए वाल्यांना किती दुख झाले असेल)
टेन्शन घेऊ नका काका. आयमए वाल्यांना काय दुःख बि:ख झाले नसेल. सगळ्यांना, आचार्य बाळकृषणांसकट सगळ्यांना शेवटी ऍलोपॅथी लागते. आयुर्वेदाची प्रगती झाली तर आयएमए चा धंदा बंद पडायला अजून चिक्कार अवकाश आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Fri, 08/05/2022 - 05:32

In reply to आज आचार्य बाळकृष्ण यांचा by विवेकपटाईत

Permalink

औषधी वनस्पतींची माहिती

विश्व भेजस संहिता (World Herbal Encyclopaedia) चे 51 खंडांचे लोकार्पण
औषधी वनस्पतींची माहिती आणि लागवड हे रामदेव बाबांनी हे फार मोठे कार्य केले आहे यात शंका नाही. यासाठी मला पतंजलि चे कार्य फार भावते. सातत्याची टीका होत असूनही त्यांने आपले कार्य जिद्दीने चालू ठेवले आणि पूर्णत्वास नेले. पतंजलि आरोग्यासाठी कार्य करते औषधासाठी नाही हे पण त्यांचे एक वेगळेपण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Fri, 08/05/2022 - 05:43

In reply to औषधी वनस्पतींची माहिती by निनाद

Permalink

भारतीय शिक्षण

व्याकरण, वेद, भारतीय तत्वज्ञान आणि धर्म आधारीत एक शिक्षणाची व्यवस्था उभी करत आहेत. ते कार्य ही फार चांगले आहे. हरिद्वारमधील आचार्यकुलम २०१३ मध्ये उभे राहिले. आशा आहे की स्वतंत्र भारतीय भारतीय चेतना किंवा अमर आदर्श, ऋषीकुल जीवन, वैदिक ज्ञान यामुळे अजूनही लोक प्रेरीत होतील अशा अजून संस्था उभ्या राहतील.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 08/04/2022 - 14:13

Permalink

संजय राऊत खटल्यात आज पीएमएलए

संजय राऊत खटल्यात आज पीएमएलए न्यायालयाने आज अंमलबजावणी संचलनालयाला जोरदार झटका दिला. . . . . . . . . . . . . अंमलबजावणी संचलनालयाने राऊतांच्या चौकशीसाठी अजून १५ दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु न्यायालयाने फक्त ४ दिवसांची वाढीव कोठडी दिली आहे. त्यामुळे राऊत आता ८ ऑगस्टपर्यंत अंमलबजावणी संचलनालयाच्या ताब्यात असणार.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 08/04/2022 - 14:15

Permalink

राहुल गांधींनी लिंगायत पंथाची

राहुल गांधींनी लिंगायत पंथाची दीक्षा घेतली. https://www.lokmat.com/national/congress-leader-mp-rahul-gandhi-took-initiation-of-lingayat-sect-in-karnataka-elections-to-be-held-in-the-state-in-next-year-a653/
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on गुरुवार, 08/04/2022 - 14:18

In reply to राहुल गांधींनी लिंगायत पंथाची by श्रीगुरुजी

Permalink

हे काय नवीन?

हे काय नवीन? कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुक जवळ आली आहे म्हणून हे नाटक म्हणावे तर मधूनमधून कुठेनाकुठे निवडणुका होतच असतात आणि प्रत्येक राज्यात वेगवेगळे पंथ/ चालीरीती असतात. मग हा मनुष्य सगळ्या राज्यातील पंथांची वगैरे दीक्षा घेणार की काय? बाकी लिंगायतांमध्ये जानवे घालतात का?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 08/04/2022 - 14:30

In reply to हे काय नवीन? by क्लिंटन

Permalink

हा माणूस कोणत्या वेळी काय

हा माणूस कोणत्या वेळी काय करेल ते ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 08/04/2022 - 14:34

In reply to हा माणूस कोणत्या वेळी काय by श्रीगुरुजी

Permalink

इंदिरा झाली होती

चिकमगळुरुची सून.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 08/04/2022 - 14:33

In reply to हे काय नवीन? by क्लिंटन

Permalink

तो वाइनाडचा प्रताप आहे.

तिकडे सिआरझेडमुळे प्रापर्टी अनधिकृत झाल्यामुळे त्यांचा नेता राहुलच्या मागे लागले काही करा म्हणून. पण मालक /लोक चिडले आहेत. तर पुढच्या निवडणुकीत आजीचे चिकमगळुरु निवडणार असावेत. दूरदर्शीपणा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 08/04/2022 - 14:49

In reply to हे काय नवीन? by क्लिंटन

Permalink

जानव्याचे माहिती नाही, परंतु

जानव्याचे माहिती नाही, परंतु लिंगायत गळ्यात शिवलिंग असलेली माळ घालतात.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 08/04/2022 - 14:50

In reply to हे काय नवीन? by क्लिंटन

Permalink

हो

बाकी लिंगायतांमध्ये जानवे घालतात का?
हो
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on गुरुवार, 08/04/2022 - 16:51

Permalink

ऐकावे ते नवलच !!

नरेंद्र मोदी ह्यांनी कधी चहा विकलाच नाही असं सांगणारा त्यांचे बंधू प्रल्हाद मोदी ह्यांचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे म्हणे... खरे खोटे निष्ठावंत अन् देव जाणे
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 08/04/2022 - 16:57

In reply to ऐकावे ते नवलच !! by जेम्स वांड

Permalink

नसेल विकलेला, आम्हाला

नसेल विकलेला, आम्हाला त्याच्याशी घेणेदेणे नाही. लहानपणी चहा विकला होता म्हणून आम्ही मोदींना मत दिले नसून त्यासाठी खूप वेगळी कारणे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on गुरुवार, 08/04/2022 - 17:18

In reply to नसेल विकलेला, आम्हाला by श्रीगुरुजी

Permalink

अरे !

तुम्ही मत का दिले अन् त्याचा कार्यकारणभाव काय ह्यावर मला नाही वाटत मी दूरदूर पर्यंत काही कॉमेंट केली आहे, किंवा प्रश्नचिन्ह उभे केले आहे... उगीच कश्याला बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना व्हावं म्हणतो मी !? पण मोदींची चहावाला ही इमेज भाजपने भरपूर वापरली आहे, चायवाला पीएम, चाय पे चर्चा, संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभा (इथे तर पंतप्रधान स्वतः चहावाला असल्याचा क्लेम करतायत), इथेही बघा मोदी स्वतःच म्हणतात की आम्ही लहानपणी चहा विकत असू ह्या सगळ्यावर हरकत घेणारा मी कोणीच नाही, किंवा तुम्ही मोदींना मत का दिलेत ही कारणे तुमचा हक्क आहेतच हो गुरुजी पण एकंदरीत जर सगळे म्हणत असतील का आम्ही मोदींना चहावाला म्हणून मत दिले नाही तर मग भाजपने किंवा खुद्द मोदींनी ही इमेज क्रियेट केलीच कश्याला असेल इन द फर्स्ट प्लेस??
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on गुरुवार, 08/04/2022 - 17:54

In reply to नसेल विकलेला, आम्हाला by श्रीगुरुजी

Permalink

अजून वाचा

इथे तर मोदी म्हणतायत की देशातील १२५ कोटी लोकांनी एका चहावाल्याला पंतप्रधान केले आहे, ते काँग्रेसला बघवत नाही, म्हणजे गुरुजी तुम्ही किंवा तुमच्यासारखे दहा कोटी लोक वजा केले तरी ११५ कोटी लोकांनी आदरणीय मोदींना पंतप्रधान केले चहावाला म्हणून ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 08/04/2022 - 18:02

In reply to अजून वाचा by जेम्स वांड

Permalink

मोदी प्रचारात काय म्हणतात

मोदी प्रचारात काय म्हणतात याला माझ्या दृष्टीने शून्य महत्त्व आहे. त्यांनी काय केलंय व काय करतात हेच मी महत्त्वाचे मानतो. बाकी इतर लोकांनी मोदींना का मत दिले होते हे ते लोकच सांगू शकतील. बाकी कॉंग्रेसला चहावाले मोदी पाहवत नाही हे केव्हाच दिसलंय. मणी शंकर अय्यरने चहावाल्या मोदींबद्दल जे तुच्छ उद्गार काढले होते ते वाचावे.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on गुरुवार, 08/04/2022 - 18:11

In reply to मोदी प्रचारात काय म्हणतात by श्रीगुरुजी

Permalink

नक्कीच !

तितके नीच विचार असलेली काँग्रेस परत कधीच सत्तेत यायला नको, पण इथे तर मोदी चहावाला आहेत का नाही ह्याचीच चर्चा सुरू आहे न ? नसल्यास मणिशंकर सारख्या वाईट मनुष्याची शापवाणी अंगाला का लावून घेते ! मोदींनी गरिबी मध्ये घालवलेले बालपण, चहाविक्री केल्याच्या आठवणी अन् गरीब ओबीसी आईच्या पोटी जन्म घेतल्याचा अभिमान ह्या गोष्टी कैक निवडणुकांत कैक वेळा वापरल्या आहेत, असतो तो बहुसंख्य राजकारणाचा भाग, सगळे वापरत असतील तर मोदींनी वापरण्यावर कोणी हरकत घेऊ नये, पण मोदींनी ते वापरले नाही असे पदोपदी मानल्याने ते ढळढळीत दिसणारे fact बदलतील असेही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 08/04/2022 - 18:19

In reply to नक्कीच ! by जेम्स वांड

Permalink

हे मोदींनी वापरले असले

हे मोदींनी वापरले असले तरीसुद्धा माझ्या दृष्टीने त्यास कणभरही महत्त्व नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on गुरुवार, 08/04/2022 - 18:19

In reply to नक्कीच ! by जेम्स वांड

Permalink

मोदींनी वापरण्यावर कोणी हरकत

मोदींनी वापरण्यावर कोणी हरकत घेऊ नये, पण मोदींनी ते वापरले नाही असे पदोपदी मानल्याने कोंणी असे मानले होते ? काही प्रूफ आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on गुरुवार, 08/04/2022 - 18:23

In reply to मोदींनी वापरण्यावर कोणी हरकत by डँबिस००७

Permalink

अहो

Rhetorical असतं हो ते ! कश्याला चिडचिड करता आहात ? आता rhetorical म्हणजे काय हे तुम्हाला ठाऊक असेलच इतकी मात्र आमची रास्त अपेक्षा बरंका डांबिस भाऊ, इतकी proof तर केजरीवाल ह्यांनी सर्जिकल strikes ची मागितली नसतील गड्याहो.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on गुरुवार, 08/04/2022 - 21:14

In reply to ऐकावे ते नवलच !! by जेम्स वांड

Permalink

वांड साहेब .तुम्ही दिलेली

वांड साहेब .तुम्ही दिलेली लिन्क पाहिली. त्यात कुठेही असे म्हटले नाही आहे कि मोदींनी चहा विकलेलाच नाही आहे. बातमीनुसार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहावाला म्हण नका, उलट चहावाल्याचा मुलगा म्हणा. कारण चहा आमचे वडील विकत होते. त्यांनी इवल्याशा टपरीवर चहा विकून आम्हा सहा भावंडांना मोठं केलं आहे. तुम्ही पंतप्रधानांना चहावाला बोलून मोठी चूक करताय.”
माझ्या आकलनानुसार मोदींच्या बंधुंचा उद्देश स्वतःच्या वडिलांना ग्लोरिफाय करण्याचा असावा. म्हणजे एका चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान झाला आणि नरेंद्र मोदींनीही राजकारण करताना त्या त्या तत्सम वेळी स्वतःला चहावाला म्हणुन पोलिटिकली करेक्ट स्टँड घेतला असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on गुरुवार, 08/04/2022 - 22:41

In reply to वांड साहेब .तुम्ही दिलेली by कानडाऊ योगेशु

Permalink

मला वाटतंय

तुम्ही उद्धृत केलेला परिच्छेद बऱ्यापैकी सुस्पष्ट आहे, त्यामुळे त्यावर अजून शब्दच्छल करण्याची कसरत करावी वाटत नाहीये. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 08/05/2022 - 09:49

In reply to मला वाटतंय by जेम्स वांड

Permalink

मी वाचलेल्या माहिती नुसार

मी वाचलेल्या माहिती नुसार श्री मोदी हे लहान (अज्ञान) असताना वडिलांनी बनवलेला चहा लोकांना देण्याचे काम करत होते (वेटर सारखे). मग तुम्ही त्यांना चहावाला म्हणा किंवा वेटर काय फरक पडतो? अजून शब्दच्छल करा व करू नका
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Fri, 08/05/2022 - 10:02

In reply to मी वाचलेल्या माहिती नुसार by सुबोध खरे

Permalink

असं म्हणता !

चला मग करूच थोडा शब्दच्छल, चर्चेला प्रथमतः आपण वाचलेल्या माहितीचा स्त्रोत देऊन टाका सर, म्हणजे मी वाचून घेतो अन् जे असेल ते खरेखुरे लोकांसमोर येईल त्यातून हा भाग वेगळाच, मी चुकलो तर ते दुरुस्त करायला मला प्रत्याव्याय नसतो कारण माझा शब्दच्छल हा तर्काधरित असतो हेकट नाही, त्यामुळे स्त्रोत देऊन टाका एकदा, मी तो मान्य करण्याइतका दिलदार आपल्या सारख्या वरिष्ठ मिपाकरांसठी नक्कीच आहे ह्याची ग्वाही देतो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 08/05/2022 - 12:19

In reply to असं म्हणता ! by जेम्स वांड

Permalink

Modi's father sold tea at a

Modi's father sold tea at a tea stall near Vadnagar railway station. In his early years, he too lent a hand to his father at the tea stall. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/chaiwala-to-pm-modis-incredible-journey-from-poverty-to-power/modi-the-tea-seller/slideshow/60717962.cms
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 08/05/2022 - 12:21

In reply to Modi's father sold tea at a by सुबोध खरे

Permalink

The stories of how, as a kid,

The stories of how, as a kid, he would sell tea on the railway platform in Gujarat to fulfil basic day-to-day requirements of his big family. https://timesofindia.indiatimes.com/travel/destinations/the-stall-where-pm-modi-used-to-sell-tea-to-be-developed-as-a-tourist-spot/articleshow/70962325.cms
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 08/05/2022 - 12:23

In reply to The stories of how, as a kid, by सुबोध खरे

Permalink

Prime Minister Narendra Modi

Prime Minister Narendra Modi on Saturday said that he represents a country which is proud to be known as the mother of democracy and cited his own rise from a tea seller at a railway station to that as prime minister to underscore the strength of India’s democracy. https://www.news18.com/news/india/a-little-boy-who-once-sold-tea-pm-modi-tells-unga-about-his-humble-beginnings-4245896.html When he was six years old, the man who could be India's prime minister helped his father sell tea to passengers whenever an odd train came into the small Vadnagar station in Gujarat, https://www.indiatoday.in/india/west/story/narendra-modi-sold-tea-at-vadnagar-station-says-new-book-168568-2013-06-30
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Fri, 08/05/2022 - 13:40

In reply to Prime Minister Narendra Modi by सुबोध खरे

Permalink

बेस्ट

आता लिंक्स एकदा वाचूनही घ्या सर प्लीज.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on गुरुवार, 08/04/2022 - 18:14

Permalink

श्री गुरुजी,

श्री गुरुजी, तुमच म्हण्ण पटल ! आम्ही सुद्धा !!
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on गुरुवार, 08/04/2022 - 20:43

Permalink

हरयाणाचे काँग्रेस नेते कुलदीप

हरयाणाचे काँग्रेस नेते कुलदीप बिश्नोई ह्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश. हरयाणाचे मुख्यमंत्री श्री मनोहरलाल खट्टर आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत ह्यांच्या उपस्थितीत केला पक्षात प्रवेश. काँग्रेस नेत्या असणाऱ्या मीनाताई शेळके विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष औरंगाबाद ह्यांचा भाजप पक्षात प्रवेश, आमदार व माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे ह्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला, काँग्रेसला मोठा हादरा.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com