केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, आसाम व बंगाल या ५ राज्यांची विधानसभा निवडणुक एप्रिल २०२१ मध्ये होत आहे. निकाल २ मे २०२१ या दिवशी जाहीर होतील.
याच राज्यांच्या २०१६ मधील निवडणुकीनिमित्त काढलेला हा धागा.
५ राज्यांची विधानसभा निवडणुक - २०१६
या राज्यातील प्रमुख पक्षांची माहिती वरील धाग्यात सविस्तर दिली असल्याने पुनरावृत्ती करीत नाही.
२०१६ च्या तुलनेत यावेळी वेगवेगळ्या पक्षांच्या आघाड्यांमध्ये काही बदल झालेत. २०१६ मध्ये भाजपबरोबर आघाडीत असलेल्या बोडोलँड पीपल्स फ्रंट पक्षाने आता कॉंग्रेसबरोबर घरोबा केलाय. तामिळनाडूतही नवीन आघाड्या होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागील ३० वर्षे प्रभाव असलेले जयललिता व करूणानिधी नसलेली ही पहिलीच निवडणुक आहे.
आतापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या मतपूर्व सर्वेक्षणांनुसार तामिळनाडूत यावेळी द्रमुक आघाडीला मोठे बहुमत मिळून करूणानिधींचे चिरंजीव स्टॅलिन मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील १० वर्षे सत्तेत असणाऱ्या अद्रमुकची सत्ता जाणार आहे.
पुदुच्चेरी या अत्यंत लहान असलेल्या केंद्रशासित प्रदेशातही सत्तांतर होण्याची शक्यता असून कॉंग्रेस ऐवजी भाजप आघाडीत असलेले सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये मागील अनेक दशकांची परंपरा खंडीत होऊन विद्यमान डाव्या आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे.
बंगालमध्ये अत्यंत चुरशीची लढत असून विद्यमान तृणमूल कॉंग्रेस सरकार सत्ता टिकविण्याची शक्यता आहे. परंतु तृणमूलला किमान ५७ जागा गमावून १५७ जागा व भाजपला ३ वरून १००+ जागा मिळण्याची शक्यता आहे. या राज्यात डावे पक्ष व कॉंग्रेसची वाट लागण्याची शक्यता आहे.
आसाममध्ये विद्यमान भाजप आघाडीचे सरकार काही जागा गमावून १२६ पैकी ६७ जागा मिळवून सत्ता टिकविण्याची शक्यता आहे.
एकंदरीत भाजप बऱ्यापैकी फायद्यात दिसतो. कॉंग्रेसला तामिळनाडू वगळता कोठेही भवितव्य दिसत नाही. ममता सलग तिसऱ्यांदा निवडणुक जिंकून राष्ट्रीय स्तरावर मोदींना पर्याय म्हणून प्रथम क्रमांकावर पोहोचेल.
हे काल प्रसिद्ध झालेल्या सी-व्होटर मतपूर्व सर्वैक्षणाचे अंदाज -
https://maharashtratimes.com/india-news/assembly-election-2021-west-ben…
तामिळनाडूत भाजपच्या अपेक्षांना मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत. तिथे यूपीएचे सरकार बनू शकते.
दुसरीकडे पुदुच्चेरीत मात्र एनडीएचे सरकार सत्तेत येऊ शकते, असा अंदाज आहे.
आसाममध्ये एनडीए पुन्हा सत्तेत येताना दिसते आहे.
केरळमध्ये एलडीएफ पुन्हा सत्तेत येऊ शकते.
आसाममध्ये भाजप १२६ पैक ६७ जागा जिंकेल आणि सत्ता कायम ठेवेल असा अंदाज आहे.
तर पश्चिम बंगालमध्ये मोठी शक्ती लावणाऱ्या भाजपची कामगिरी दमदार असेल. पण सत्ता मिळण्याची शक्यता कमीच आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपची कामगिरी या निवडणुकीत दमदार असेल. गेल्या निवडणुकीत ३ जागा जिंकणारा भाजप या निवडणुकीत १०० हून अधिक जागा जिंकेल, असा अंदाज आहे. तर सत्ताधारी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला ५७ जागांचे नुकसान होऊ शकते. ममता यांना गेल्या निवडणुकीत २११ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ममतांच्या तृणमूल काँग्रेसला १५४ जागा मिळतील. तर काँग्रेस-डाव्या पक्षांच्या आघाडील ३३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागांसाठी निवडणूक होतेय.
तामिळनाडूमध्ये AIADMK सोबत भाजपने युती केली आहे. पण इथे भाजपच्या अपेक्षांना मोठा झटक बसेल असा अंदाज आहे. राज्यातील विधानसभेच्या २३४ जागांपैकी यूपीए (डीएमके-काँग्रेस ) १५८ जागा जिंकेल. तर एआयएडीएमके- भाजप युतीला ६५ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर एमएनएमला ५, एएमएमकेला ३ आणि इतरांना ३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. तामिळनाडूत डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांना मुख्यमंत्रीपदाची पहिली पंसती देण्यात आली आहे. तर कमल हसन, रजनीकांत आणि शशीकला यांना १० टक्के नागरिकांनीही मुख्यमंत्री म्हणून पसंती दिलेली नाही.
आसाममध्ये एनडीएच्या जागा कमी होतील पण सत्ता राहणार
आसाममध्ये भाजपसाठी चांगली बातमी आहे. राज्यात एनडीएची पुन्हा सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. इथे एनडीएला १२६ पैकी ६७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर यावेळी यूपीएची कामगिरी चांगली होईल आणि गेल्या वेळेच्या ३९ जागांवरून ५७ पर्यंत जागा वाढतील. तसंच इतरांना २ जागा मिळतील, असा अंदाज आहे.
पुदुच्चेरीतील विधानसभेच्या ३० जागांपैकी एनडीए १६ ते २० जागा जिंकेल असा अंदाज आहे. तर यूपीएच्या खात्यात १३ जागा मिळतील असं बोललं जातंय. पुदुच्चेरीत ६ एप्रिलला मतदान होणार आहे.
सर्वेक्षणानुसार केरळमधील १४० जागांवर डाव्या पक्षांचे नेतृत्व असलेल्या सत्ताधारी एलडीएफला ८२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसप्रणित यूडीएफला ५६ जागा जिंकेल असा अंदाज आहे. या सर्वेक्षणात मुख्यमंत्री पी. विजयन हे जनतेची पहिली पसंत आहेत. तर केरळमध्ये भाजपला झटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपला फार फार तर १ जागा मिळेल, असा अंदाज आहे.
वाचने
53086
प्रतिक्रिया
167
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्व मतदानोत्तर
गुरुजी जसे मोदींना पर्याय कोण
मोदींना पर्याय कोण हा प्रश्न
In reply to गुरुजी जसे मोदींना पर्याय कोण by Vichar Manus
पंढरपूर पोटनिवडणुक
२०१९ मध्ये राष्ट्रवादी
In reply to पंढरपूर पोटनिवडणुक by चंद्रसूर्यकुमार
दुर्दैवाने पोटनिवडणुकीसाठी
In reply to पंढरपूर पोटनिवडणुक by चंद्रसूर्यकुमार
२ मे नंतर
प्रतिसाद खूप उजवीकडे गेल्याने
क्रिकेटचेच उदाहरण देतो, संघ निवडायचे काम कॅप्टन करत नाही संघ निवडायचे काम, समिती करते ..हे पूर्णांंशाने खरे नाही. अंतिम संघात कोणते खेळाडू खेळवायचे हे ठरविण्यात कर्णधाराचे मत सुद्धा महत्त्वाचे असते. २००७ मध्ये ट-२० विश्वचषक स्पर्धेसाठी धोनीला कर्णधार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर धोनीने सचिन, गांगुली, द्रविड वगैरे तुलनेने वयस्कर खेळाडूंना संघात घेण्यास विरोध केला होता व निवड समितीने त्याचे म्हणणे ऐकले होते. त्यामुळे रोहीत शर्मा, युसुफ पठाण, जोगिंदर शर्मा, रूद्र प्रताप सिंंग अशा तरूण नव्या खेळाडूंना संधी मिळाली होती.फडणवीस केंद्रीय मंत्रीमंडळात, आज नाही तर उद्या, नक्कीच जाणार....ते केंद्रात जाऊ देत किंवा एखादा राज्याचे राज्यपाल होऊ देत, ते कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात नको आणि त्यांच्याबरोबर त्यांचे शेपूटही पाठवा.आणि त्यांना अर्थमंत्री किंवा संरक्षण दल, ह्यापैकी एक खाते नक्कीच मिळेल... काही नेत्यांचा जळफळाट इथेच आहे...अर्थमंत्री नक्कीच नाही, संरक्षण मंत्री शक्य आहे. बघू या ते केंद्रात जाऊन काय दिवे लावतात कारण तेथे जाऊन कोणाची चाटुगिरी करणार? बरं, यामुळे कोणत्या नेत्यांचा जळफळाट होतोय ते सांगा.काही नेत्यांना फडणवीस मुख्यमंत्री पदावर नको आहेत आणि त्यासाठी फडणवीस हे सत्तेसाठी कसे हपापलेले आहेत, हे चित्र रंगवण्यात आले आहे....फडणवीस सत्तेसाठी किती हपापलेले होते हे वेगळे चित्र रंगविण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांची सत्तेसाठीची वखवख, त्यासाठी केलेल्या असंख्य तडजोडी, लाळघोटेपणा व जनतेचा आणि समर्थकांचा वेळोवेळी केलेला विश्वासघात हे ५ वर्षात अनेकदा दिसले आहे. तुरूंगात चक्की पिसायला पाठविणार असे जाहीर सांगून त्याच माणसाशी हातमिळवणी करणे, "नाही नाही नाही, भाजप राष्ट्रवादी बरोबर कधीही युती करणार नाही, एकदा नाही, त्रिवार नाही" असे काळी पाच स्वरात किंचाळून सांगूनही भल्या पहाटे राष्ट्रवादी बरोबरच युती करणे हे सत्तेसाठी अत्यंत हपापलेल्या व अत्यंत कासावीस झालेल्या व्यक्तीचेच उदाहरण आहे.मला भ्रष्टाचार न करणारा मुमं
In reply to प्रतिसाद खूप उजवीकडे गेल्याने by श्रीगुरुजी
भागवत साहेब,
In reply to मला भ्रष्टाचार न करणारा मुमं by शाम भागवत
माझं सामान्य मत म्हणाल तर,
In reply to भागवत साहेब, by कॉमी
फेअर इनफ.
In reply to माझं सामान्य मत म्हणाल तर, by शाम भागवत
या वरील दोघां व्यतिरिक्त आणखी
In reply to माझं सामान्य मत म्हणाल तर, by शाम भागवत
या वरील दोघां व्यतिरिक्त आणखी कोणी असल्यास ते जाणून घेण्यासाठी मी गुरूजींना प्रश्न विचारला आहे.माझ्या दृष्टीने हे दोघेही पर्याय नाहीत. मुख्यमंत्री म्हणून हे दोघेही अनुत्तीर्ण झाले आहेत. चव्हाणांचे ७५+ वय हा त्यांच्यासाठी अजून एक वाईट मुद्दा आहे. नव्याने निवडणुक झाल्यानंतर नवीन चेहरा निवडता येईल. त्यासाठी भावी मुख्यमंत्री म्हणून आधीच एखादा चेहरा समोर ठेवण्याची गरज नसते हे अनेक राज्यात अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यातून फडणवीस हाच पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर ठेवून निवडणुक लढली तर भाजपची अजून जास्त घसरण होणार हे नक्की.मला भ्रष्टाचार न करणारा मुमं
In reply to मला भ्रष्टाचार न करणारा मुमं by शाम भागवत
मला भ्रष्टाचार न करणारा मुमं पाहिजेमला भ्रष्टांशी तडजोड न करणारा, त्यांना क्लीन चिट न देता कारवाई करणारा, खूर्चीसाठी लाळघोटेपणा न करणारा, सहकाऱ्यांच्या पाठीत खंजीर न खुपसणारा, समर्थक मतदारांच्या पाठीत खंजीर न खुपसणारा, खुर्चीसाठी महत्त्वाचे प्रकल्प रद्द न करणारा, अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्याची चाटुगिरी न करणारा व त्याचा प्रत्येक आदेश न पाळणारा मुख्यमंत्री पाहिजे.फडणविसांना भरपूर शिव्या देत राहिल्याने मोदी फडणविसांना डच्चू देतील असं वाटत नाही. /code> फडणवीसांवर कितीही स्तुतीसुमनांचा वर्षाव केला तरी जनता त्यांना परत संधी देईल असे वाटत नाही.थोडक्यात फडणविसांना स्वगृही तसेच मवीआ कडूनही जास्त शिव्या मिळाल्याने, मोदींना फडणवीसच जास्त लायक वाटायचे.शक्य आहे, जनतेला फडणवीस लायक वाटायला हवे.तसेच निव्वळ पर्याय पुढे न आल्याने परत फडणवीसच मुमं व्हायचे.आता तसे होणार नाही कारण तसे होण्यासाठी भाजपला बहुमत किंवा बहुमताच्या जवळपास जागा मिळाल्या पाहिजे आणि फडणवीस हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल तर ते होणार नाही. २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा समोर नसतानाही भाजपला १२३ जागा मिळाल्या होत्या. मुख्यमंत्रीपदासाठी एखादा चेहरा समोर असण्याची गरज नसते हे अनेक राज्यात अनेकदा सिद्ध झाले आहे.ठीक आहे.
In reply to मला भ्रष्टाचार न करणारा मुमं by श्रीगुरुजी
ठीक आहे. असेच समाधानी रहा.
In reply to ठीक आहे. by शाम भागवत
हाहाहा
In reply to ठीक आहे. असेच समाधानी रहा. by श्रीगुरुजी
समाधान झाले असे लिहिले होते,
In reply to हाहाहा by शाम भागवत
हाहाहा
In reply to समाधान झाले असे लिहिले होते, by श्रीगुरुजी
तुम्ही एक बाजू बघत आहात ..... फडणवीस म्हणजे भाजप...
In reply to प्रतिसाद खूप उजवीकडे गेल्याने by श्रीगुरुजी
महाराष्ट्रात मागील ३-४
In reply to तुम्ही एक बाजू बघत आहात ..... फडणवीस म्हणजे भाजप... by मुक्त विहारि
मोदी-शहांनी त्यांना महाराष्ट्रात संपूर्ण मुक्तहस्त दिला आहे.
In reply to महाराष्ट्रात मागील ३-४ by श्रीगुरुजी
मला वाटते की नितीन गडकरींनी
फडणवीस सारख्या माणसापेक्षा
हो ना ....
In reply to फडणवीस सारख्या माणसापेक्षा by गणेशा
फडणवीस व उद्धव समान यूसलेस
In reply to फडणवीस सारख्या माणसापेक्षा by गणेशा
@श्रीगुरुजी,