५ राज्यांची विधानसभा निवडणुक - २०२१
केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, आसाम व बंगाल या ५ राज्यांची विधानसभा निवडणुक एप्रिल २०२१ मध्ये होत आहे. निकाल २ मे २०२१ या दिवशी जाहीर होतील.
याच राज्यांच्या २०१६ मधील निवडणुकीनिमित्त काढलेला हा धागा.
५ राज्यांची विधानसभा निवडणुक - २०१६
या राज्यातील प्रमुख पक्षांची माहिती वरील धाग्यात सविस्तर दिली असल्याने पुनरावृत्ती करीत नाही.
२०१६ च्या तुलनेत यावेळी वेगवेगळ्या पक्षांच्या आघाड्यांमध्ये काही बदल झालेत. २०१६ मध्ये भाजपबरोबर आघाडीत असलेल्या बोडोलँड पीपल्स फ्रंट पक्षाने आता कॉंग्रेसबरोबर घरोबा केलाय. तामिळनाडूतही नवीन आघाड्या होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागील ३० वर्षे प्रभाव असलेले जयललिता व करूणानिधी नसलेली ही पहिलीच निवडणुक आहे.
आतापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या मतपूर्व सर्वेक्षणांनुसार तामिळनाडूत यावेळी द्रमुक आघाडीला मोठे बहुमत मिळून करूणानिधींचे चिरंजीव स्टॅलिन मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील १० वर्षे सत्तेत असणाऱ्या अद्रमुकची सत्ता जाणार आहे.
पुदुच्चेरी या अत्यंत लहान असलेल्या केंद्रशासित प्रदेशातही सत्तांतर होण्याची शक्यता असून कॉंग्रेस ऐवजी भाजप आघाडीत असलेले सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये मागील अनेक दशकांची परंपरा खंडीत होऊन विद्यमान डाव्या आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे.
बंगालमध्ये अत्यंत चुरशीची लढत असून विद्यमान तृणमूल कॉंग्रेस सरकार सत्ता टिकविण्याची शक्यता आहे. परंतु तृणमूलला किमान ५७ जागा गमावून १५७ जागा व भाजपला ३ वरून १००+ जागा मिळण्याची शक्यता आहे. या राज्यात डावे पक्ष व कॉंग्रेसची वाट लागण्याची शक्यता आहे.
आसाममध्ये विद्यमान भाजप आघाडीचे सरकार काही जागा गमावून १२६ पैकी ६७ जागा मिळवून सत्ता टिकविण्याची शक्यता आहे.
एकंदरीत भाजप बऱ्यापैकी फायद्यात दिसतो. कॉंग्रेसला तामिळनाडू वगळता कोठेही भवितव्य दिसत नाही. ममता सलग तिसऱ्यांदा निवडणुक जिंकून राष्ट्रीय स्तरावर मोदींना पर्याय म्हणून प्रथम क्रमांकावर पोहोचेल.
हे काल प्रसिद्ध झालेल्या सी-व्होटर मतपूर्व सर्वैक्षणाचे अंदाज -
https://maharashtratimes.com/india-news/assembly-election-2021-west-bengal-bjp-mamata-banerjee-tamil-nadu-assam-kerala-and-puducherry/articleshow/81397589.cms
तामिळनाडूत भाजपच्या अपेक्षांना मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत. तिथे यूपीएचे सरकार बनू शकते.
दुसरीकडे पुदुच्चेरीत मात्र एनडीएचे सरकार सत्तेत येऊ शकते, असा अंदाज आहे.
आसाममध्ये एनडीए पुन्हा सत्तेत येताना दिसते आहे.
केरळमध्ये एलडीएफ पुन्हा सत्तेत येऊ शकते.
आसाममध्ये भाजप १२६ पैक ६७ जागा जिंकेल आणि सत्ता कायम ठेवेल असा अंदाज आहे.
तर पश्चिम बंगालमध्ये मोठी शक्ती लावणाऱ्या भाजपची कामगिरी दमदार असेल. पण सत्ता मिळण्याची शक्यता कमीच आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपची कामगिरी या निवडणुकीत दमदार असेल. गेल्या निवडणुकीत ३ जागा जिंकणारा भाजप या निवडणुकीत १०० हून अधिक जागा जिंकेल, असा अंदाज आहे. तर सत्ताधारी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला ५७ जागांचे नुकसान होऊ शकते. ममता यांना गेल्या निवडणुकीत २११ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ममतांच्या तृणमूल काँग्रेसला १५४ जागा मिळतील. तर काँग्रेस-डाव्या पक्षांच्या आघाडील ३३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागांसाठी निवडणूक होतेय.
तामिळनाडूमध्ये AIADMK सोबत भाजपने युती केली आहे. पण इथे भाजपच्या अपेक्षांना मोठा झटक बसेल असा अंदाज आहे. राज्यातील विधानसभेच्या २३४ जागांपैकी यूपीए (डीएमके-काँग्रेस ) १५८ जागा जिंकेल. तर एआयएडीएमके- भाजप युतीला ६५ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर एमएनएमला ५, एएमएमकेला ३ आणि इतरांना ३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. तामिळनाडूत डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांना मुख्यमंत्रीपदाची पहिली पंसती देण्यात आली आहे. तर कमल हसन, रजनीकांत आणि शशीकला यांना १० टक्के नागरिकांनीही मुख्यमंत्री म्हणून पसंती दिलेली नाही.
आसाममध्ये एनडीएच्या जागा कमी होतील पण सत्ता राहणार
आसाममध्ये भाजपसाठी चांगली बातमी आहे. राज्यात एनडीएची पुन्हा सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. इथे एनडीएला १२६ पैकी ६७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर यावेळी यूपीएची कामगिरी चांगली होईल आणि गेल्या वेळेच्या ३९ जागांवरून ५७ पर्यंत जागा वाढतील. तसंच इतरांना २ जागा मिळतील, असा अंदाज आहे.
पुदुच्चेरीतील विधानसभेच्या ३० जागांपैकी एनडीए १६ ते २० जागा जिंकेल असा अंदाज आहे. तर यूपीएच्या खात्यात १३ जागा मिळतील असं बोललं जातंय. पुदुच्चेरीत ६ एप्रिलला मतदान होणार आहे.
सर्वेक्षणानुसार केरळमधील १४० जागांवर डाव्या पक्षांचे नेतृत्व असलेल्या सत्ताधारी एलडीएफला ८२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसप्रणित यूडीएफला ५६ जागा जिंकेल असा अंदाज आहे. या सर्वेक्षणात मुख्यमंत्री पी. विजयन हे जनतेची पहिली पसंत आहेत. तर केरळमध्ये भाजपला झटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपला फार फार तर १ जागा मिळेल, असा अंदाज आहे.
वाचने
53045
वाचनखूण
प्रतिक्रिया
167
अरेरे, लिंक चुकली.
जिथे जिथे
तामिनाडूमधील bjp ची अवस्था
बंगालमध्ये त्रिशंकू परिस्थिती
In reply to बंगालमध्ये त्रिशंकू परिस्थिती by आनन्दा
फारच थोडी शक्यता
In reply to फारच थोडी शक्यता by चंद्रसूर्यकुमार
समजा बंगाल आणि केरळ दोन्ही
In reply to समजा बंगाल आणि केरळ दोन्ही by आनन्दा
केरळमध्ये द्विआघाडीय लढत
In reply to समजा बंगाल आणि केरळ दोन्ही by आनन्दा
नाही
माहितीपूर्ण धागा.
In reply to माहितीपूर्ण धागा. by बापूसाहेब
मोदींच्या मिळणार्या सभांना
In reply to मोदींच्या मिळणार्या सभांना by रात्रीचे चांदणे
महाराष्ट्रातही मोदींच्या
In reply to महाराष्ट्रातही मोदींच्या by श्रीगुरुजी
महाराष्ट्र आणि बंगाल ह्यांची
In reply to महाराष्ट्रातही मोदींच्या by श्रीगुरुजी
भाजपला जनतेने नाकारल्यामुळे
Bjp चे
२०११ मध्ये अत्यंत चुरशीची लढत
बंगालमध्ये सुद्धा त्रिशंकू
In reply to बंगालमध्ये सुद्धा त्रिशंकू by चौथा कोनाडा
अरे देवा..
सरबानंद सोनोवालांना शुभेच्छा
In reply to सरबानंद सोनोवालांना शुभेच्छा by चंद्रसूर्यकुमार
सोनोवालांचा पुढचा मार्ग
नंदीग्राम - ममता विरुद्ध सुवेंदू अधिकारी.
In reply to नंदीग्राम - ममता विरुद्ध सुवेंदू अधिकारी. by जॅक द रिपर
काही बंगाली हिंदू मंडळींना विचारले ....
In reply to नंदीग्राम - ममता विरुद्ध सुवेंदू अधिकारी. by जॅक द रिपर
केवढी ती महान बुध्दी मत्ता
In reply to नंदीग्राम - ममता विरुद्ध सुवेंदू अधिकारी. by जॅक द रिपर
ममतादीदीच त्या..
In reply to ममतादीदीच त्या.. by अनन्त अवधुत
दोन वेगळ्या गोष्टी
In reply to दोन वेगळ्या गोष्टी by चंद्रसूर्यकुमार
नंदीग्राम मतदारसंघ भाजपचा नव्हताच.
In reply to दोन वेगळ्या गोष्टी by चंद्रसूर्यकुमार
नवीन पटनायक
आता दुसरा सक्षम पर्याय
In reply to आता दुसरा सक्षम पर्याय by जॅक द रिपर
तेच तिथल्या हिंदूंना हवे आहे....
In reply to तेच तिथल्या हिंदूंना हवे आहे.... by मुक्त विहारि
हिंदू नी BJP ल मत का द्यावीत
In reply to हिंदू नी BJP ल मत का द्यावीत by Rajesh188
हिंदूनी भाजपला का मतं देऊ
In reply to हिंदू नी BJP ल मत का द्यावीत by Rajesh188
डोळ्यावरची झांपड काढा
In reply to हिंदू नी BJP ल मत का द्यावीत by Rajesh188
प्रधानमंत्री आवास योजनेत
In reply to प्रधानमंत्री आवास योजनेत by अनिरुद्ध.वैद्य
+१
In reply to तेच तिथल्या हिंदूंना हवे आहे.... by मुक्त विहारि
मुवि..
In reply to मुवि.. by गणेशा
गणेशा, थोडा विचार करा
In reply to गणेशा, थोडा विचार करा by आनन्दा
आनंदा,
एका हिंदू व्यक्ती नी जरी कबूल केले
In reply to एका हिंदू व्यक्ती नी जरी कबूल केले by Rajesh188
प्रतिसाद संपादित.
In reply to प्रतिसाद संपादित. by सुक्या
प्रतिसाद संपादित.
गुरुजी,
In reply to गुरुजी, by गणेशा
काही आयाराम तृणमूल सोडून
In reply to काही आयाराम तृणमूल सोडून by श्रीगुरुजी
Ok, म्हणजे यावेळेस bjp मध्ये
In reply to काही आयाराम तृणमूल सोडून by श्रीगुरुजी
आयारामांची व्याख्या काय तुमची
In reply to आयारामांची व्याख्या काय तुमची by बिटाकाका
भाजपमध्ये साधारणपणे २०१८-१९
In reply to भाजपमध्ये साधारणपणे २०१८-१९ by श्रीगुरुजी
याव्यतिरिक्त राहुल कुल (रासप)
In reply to भाजपमध्ये साधारणपणे २०१८-१९ by श्रीगुरुजी
पैकी, मंदा म्हात्रे, समीर
अपेक्षित जागा न मिळाल्याने
काँग्रेसचं मिशन प. बंगाल! स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर
भाजपला जोरदार हादरा
In reply to भाजपला जोरदार हादरा by श्रीगुरुजी
ते मुळचे बंगाली नाहीत, पण...
In reply to भाजपला जोरदार हादरा by श्रीगुरुजी
यशवंत सिन्हा
In reply to यशवंत सिन्हा by चंद्रसूर्यकुमार
मला एक समजत नाही की,
In reply to मला एक समजत नाही की, by मुक्त विहारि
काँग्रेस किंवा अन्य पक्षांचे
In reply to काँग्रेस किंवा अन्य पक्षांचे by Vichar Manus
माझ्या माहितीत साधारण पणे 500-600 माणसे आहेत
In reply to यशवंत सिन्हा by चंद्रसूर्यकुमार
यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा
तामिळनाडूचा राजकीय इतिहास- भाग १
In reply to तामिळनाडूचा राजकीय इतिहास- भाग १ by चंद्रसूर्यकुमार
तामिळनाडू बद्दल छान माहिती मिळाली...
In reply to तामिळनाडूचा राजकीय इतिहास- भाग १ by चंद्रसूर्यकुमार
अगदी बरोबर आहे. राष्ट्रीय
In reply to अगदी बरोबर आहे. राष्ट्रीय by श्रीगुरुजी
फडणवीसांना दुर्बुद्धी सुचली
In reply to फडणवीसांना दुर्बुद्धी सुचली by बिटाकाका
त्यांनासुद्धा दुर्बुद्धी
In reply to फडणवीसांना दुर्बुद्धी सुचली by बिटाकाका
माझ्या मते कारण
In reply to माझ्या मते कारण by चंद्रसूर्यकुमार
पुण्यातही २ जागा गेल्या.
In reply to माझ्या मते कारण by चंद्रसूर्यकुमार
तुमच्याशी बऱ्यापैकी सहमत आहे.
In reply to तुमच्याशी बऱ्यापैकी सहमत आहे. by बिटाकाका
पहिल्यांदाच मंत्रिमंडळात असून
पहिल्यांदाच मंत्रिमंडळात असून फडणवीसांनी ५ वर्षे ज्या कुशलतेने कुठल्याही वादात न सापडता, विरोधकांनी केलेले अनेक प्रयत्न हाणून पाडले हे वाखाणण्याजोगे होते.भ्रष्ट विरोधकांशी तडजोड करणे, स्वपद टिकविण्यासाठी उद्धव ठाकरेंना खुश ठेवून त्यांची प्रत्येक मागणी मान्य करणे व ते करताना राज्यहिताचा व पक्षहिताचा बळी देणे, मताधार वाढविण्यासाठी लांड्यालबाड्या करून पारंपरिक समर्थक मतदारांचा विश्वासघात करून त्यांचे नुकसान करणे, पक्षस्थापनेपासून पक्षाबरोबर असलेल्या व पक्ष वाढविलेल्या सहकाऱ्यांना खोट्या प्रकरणात गु़ंंतवून त्यांचा काटा काढणे अशा मार्गांनी त्यांनी सत्ता टिकविली होती. परंतु शेरास सव्वाशेर भेटतोच. तसा त्यांनाही भेटला. म्हणूनच चिडचिड सुरू आहे.आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील ज्या प्रमाणे, सरकार ऐवजी विरोधकांवर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडणारा त्यांचा आवेश पाहिल्यानंतर मला तरी नक्की वाटते की महाराष्ट्र भाजप ला फडणवीसांशीवाय पर्याय नाही.यांचा आवेव पाहून हसू आवरत नव्हते. "नाही, नाही, नाही. भाजप कधीही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करणार नाही. एकदा नाही, त्रिवार नाही." असे त्यांनीच २०१४ मध्ये आवेशात सांगितले होते. "आम्ही सत्तेत आलो की अजितदादा तुरुंगात चक्की पिसिंग, चक्की पिसिंग, चक्की पिसिंग" हे सुध्दा सांगताना जोरदार आवेश होता. पण मग २०१९ मध्ये ती आश्वासने, तो आवेश कोठे गेला होता? ____________________ हे कायप्पावर आलेले ढकलपत्र . . . फडणवीसांनी काल विधानसभेत प्रचंड आवेशपूर्ण भाषण केलं. पण असं भाषण आणि आरोप करण्याची त्यांची ही पहिली वेळ नव्हती. याच सभागृहात ते २०१४ पूर्वी विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मोठ्या आवेशात विजयकुमार गावित यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप करुन सभागृह दणाणून सोडलं होतं. त्यानंतर काय झालं? - गावितांची मुलगी २०१४ ला भाजप खासदार झाली आणि ते आमदार झाले. याच सभागृहात त्यांनी सिंचन घोटाळ्यावर जबरदस्त फटकेबाजी करत अजितदादा आणि तटकरे यांच्यावर आरोप केले होते. तसंच त्यांनी या घोटाळ्याचे गाडीभर पुरावे दिले होते. त्यानंतर काय झालं? - स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी अजितदादा किंवा तटकरे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट याच अजितदादांसोबत त्यांनी पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन केलं. अगदी याच सभागृहात ते मुख्यमंत्री असताना राणेंनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना त्यांनी राणेंवरील आरोपांची आणि दाखल झालेल्या गुन्ह्यांची जंत्रीच सभागृहात वाचून दाखवली. राणेंचा पहाण्यालायक झालेला चेहरा अनेकांना आठवत असेल. त्यानंतर काय झालं? - हेच राणे भाजपचे खासदार झाले आणि त्यांचा मुलगा आमदार झाला. याच सभागृहात प्रवीण दरेकरांच्या मुंबई बँक मध्ये घोटाळा झाल्याचे पुरावे असलेले पेपर दाखवत कारवाईची मागणी करायचे. त्यानंतर काय झालं ? - २०१४ मुख्यमंत्री झाल्यावर प्रवीण दरेकरांनाच भाजप मध्ये घेतले, विधानपरीषदेतून आमदार केले आणि आता ते विधानपरीषदेत भाजपचे विरोधी पक्षनेता आहेत. इतकंच नाही तर मुख्यमंत्री असतांना मामुनीं शिक्षकांची वेतन बँक खाती मुंबई बँकेत वळवली. नंतर आधी हाय कोर्ट मग सुप्रीम कोर्ट ने फटकारल्यावर तोंडावर पडले आणि मग खाती मागे घ्यावी लागली. - याच सभागृहात कृपाशंकर सिंग यांनी केलेल्या घोटाळ्यांबद्दल पण अनेक आरोप केले. त्यानंतर काय झालं ? - विरोधी पक्षनेता असतांना कृपाशंकर च्या घोटाळ्याची कागद नाचवली. पण स्वता मुख्यमंत्री, गृहमंत्री झाल्यावर त्याच कृपाशंकर विरुद्ध आम्हाला पुढे चौकशी करायची नाहीये अस प्रतिज्ञापत्र कोर्टाला दिलं आणि त्याला निर्दोष सिद्ध केला. अशी अनेक उदाहरणे देता येतील. एकंदर ज्या लोकांवर आधी फडणवीसांनी आरोप केले किंवा सभागृहात आवेशपूर्ण आणि अभ्यासपूर्ण(?) भाषण केलं, त्यांना आपल्याच पक्षात सामावून घेतलं किंवा ज्यांना घेता येणं शक्य नव्हतं (जसे की दादा, तटकरे, कृपाशंकर) त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. २०१४ पूर्वी ठीक होतं. पण आता एक पूर्ण टर्म स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या फडणवीसांची कारकीर्द लोकांनी पाहिलेली आहे. त्यामुळे दरवेळी प्रत्येक विषयात फडणवीस मी मी करत आकांडतांडव करत आहेत. ते लोकांच्या सहज पचनी पडताना दिसत नाहीये. उलट ते मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताना दिसत आहेत, कारण यांच्या हातात सत्तासूत्र असतांना हे आधी ज्यांना गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी म्हणायचे त्यांना शासन करायचं सोडून त्यांना जवळ करत पक्ष वाढवण्यात त्यांनी आपल्या पदाचा वापर केला. मागच्या एक वर्षात विरोधीपक्ष नेता म्हणून करोना महामारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, लॉक डाऊन, सुशांतसिंग राजपूत, कंगना राणावत, अर्णब गुस्वामी आणि आता सचिन वाझे वगैरे विषयात त्यांनी आणि एकूणच भाजपने केलेला आकांडतांडव पाहता, मुख्यमंत्री म्हणून मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांना मुख्यमंत्री नव्हे तर विरोधीपक्ष नेता म्हणून पुन्हा येण्याची संधी मिळाली आहे याचं जास्तच नैराश्य आलेलं दिसत आहे. असो, अनेक भक्तांना फडणवीस अजूनही अभ्यासू नेते वाटत असले तरी त्यांचा अभ्यास दिवसेंदिवस उघडा पडून त्यांची चिडचिडच जास्त होतांना दिसत आहे.In reply to पहिल्यांदाच मंत्रिमंडळात असून by श्रीगुरुजी
तुम्ही चक्क तुमचा विरोध
In reply to तुम्ही चक्क तुमचा विरोध by बिटाकाका
तुम्ही चक्क तुमचा विरोध
तुम्ही चक्क तुमचा विरोध दर्शवण्यासाठी (किंबहुना त्याला कुरवाळण्यासाठी) कायप्पावरील बिनबुडाचे मेसेजेस पुढे ढकलत आहात यातच बोलणे खुंटले.वरील कायप्पा संदेशातील कोणते आरोप बिनबुडाचे आहेत ते सांगा.कसलाही आधार नसलेली ही वाक्ये, तुमचा फडणवीस विरोध हा साधारणपणे, मोदींविरोधकांच्या अंधविरोधाच्या लेवल ला पोहोचला आहे असे प्रामाणिक मत नोंदवतो आणि खाली बसतो. तुमच्यासारखा अभ्यासू व्यक्तित्व याचा शांतपणाने विचार करेल अशी अपेक्षा करतो.ही सर्व वाक्ये वस्तुस्थिती आधारीत आहेत. यातील कोणत्या वाक्याला आधार नाही ते सांगा. मी कायमच भाजपसमर्थक होतो व आहे. मी फडणवीसांचा २०१६ पर्यंत कट्टर समर्थक होतो. परंतु त्यांनी २०१७ पासून घेतलेल्या निर्णयांमुळे चीड येत गेली व व पर्यवसान विरोधात झाले. मी कोणाचाही अंधभक्त नाही किंवा अंधविरोधक नाही.In reply to तुम्ही चक्क तुमचा विरोध by श्रीगुरुजी
उलटी गंगा नही बहेगी. तुम्ही
In reply to पहिल्यांदाच मंत्रिमंडळात असून by श्रीगुरुजी
पहाटेचा तो अगत्म्य सोहळा
In reply to पहाटेचा तो अगत्म्य सोहळा by चौकस२१२
त्या दीड दिवसांत काय झाले?
In reply to त्या दीड दिवसांत काय झाले? by मुक्त विहारि
नक्की समजेल.
In reply to नक्की समजेल. by शाम भागवत
टप्पा अजिबात लांबचा नव्हता.
In reply to टप्पा अजिबात लांबचा नव्हता. by श्रीगुरुजी
असा महत्वाचा निर्णय, एकटे फडणवीस घेऊ शकणार नाहीत...
In reply to असा महत्वाचा निर्णय, एकटे फडणवीस घेऊ शकणार नाहीत... by मुक्त विहारि
जाऊ द्या हो.
In reply to जाऊ द्या हो. by शाम भागवत
एकाच व्यक्तीच्या हातात, भाजप निर्णय घेणे सोपवत नाही ....
In reply to एकाच व्यक्तीच्या हातात, भाजप निर्णय घेणे सोपवत नाही .... by मुक्त विहारि
पक्षांतर्गत आणि बाहेरून विरोध
पक्षांतर्गत आणि बाहेरून विरोध होत असतांनाही, फडणवीस यांनी कार्यकाल पुर्ण केला, हेच कौतुकास्पद आहे...कसला विरोध? कोणीही मुख्यमंत्री असता तरी पक्षाबाहेर विरोध होतोच. त्याचे कसले कौतुक? पक्षांतर्गत कोणी विरोध केला होता? पक्षांतर्गत विरोध असता तर ५ वर्षे टिकले असते का? पक्षातील सर्वांनीच सहकार्य केले होते. खडसे, पंकजा मुंडे आणि तावडे यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करण्याचा घोर अपराध केला म्हणून त्यांना अनेक खोट्या खटल्यात अडकविणे योग्य होते का? हे करताना महाराष्ट्रात पक्ष दुर्बल केला नाही का? त्यामुळे इतर पक्षातील भ्रष्ट, नालायक गणंगांची भाजपत भरताड केली नाही का? आणि कार्यकाल पूर्ण केला यात काय कौतुकास्पद आहे? राष्ट्रवादीतील भ्रष्टांना अभय देऊन, ठाकरेंची ५ वर्षे अर्वाच्य शिवीगाळ सहन करीत चाटुगिरी करणे हे कौतुकास्पद नसून ही लाळघोटेपणाची परीसीमा आहे.In reply to पक्षांतर्गत आणि बाहेरून विरोध by श्रीगुरुजी
तुम्हाला कोण हवेत?
In reply to तुम्हाला कोण हवेत? by शाम भागवत
फडणवीस व चंपा अजिबात नको.
In reply to फडणवीस व चंपा अजिबात नको. by श्रीगुरुजी
कोण आहे असा?
In reply to पक्षांतर्गत आणि बाहेरून विरोध by श्रीगुरुजी
खडसे यांनी मग....
In reply to खडसे यांनी मग.... by मुक्त विहारि
फडणवीसांवर काबू ठेवता येत
फडणवीसांवर काबू ठेवता येत नाही, हे समजताच, काही नेत्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरूवात केली ...फडणवीसांनीच पक्षातील इतर नेत्यांना त्रास दिला का त्यांना इतरांनी त्रास दिला? तसे असेल तर कोणत्या नेत्यांनी काम त्रास दिला?कुठल्या पक्षाबरोबर युती करायची आणि कुठल्या पक्षाबरोबर युती करायची नाही, हे निर्णय भाजपची कार्यकारिणी घेते. त्या कार्यकारिणीत जो निर्णय ठरेल, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम, त्या त्या नेत्यांकडे असते.कोणत्याही पक्षाबरोबर युती करणार नाही असे ठाकरेंनी अनेकदा सांगूनही सेनेबरोबर युती करण्यासाठी कोणता नेता कासावीस झाला होता? सेनेला खुश ठेवण्यासाठी कोणता नेता ठाकरेंची चाटुगिरी करीत होता? सेनेला खुश ठेवण्यासाठी कोणत्या नेत्याने राज्याचे व पक्षाचे नुकसान होत असूनही ठाकरेंची प्रत्येक मागणी मान्य केली होती?शिवसेनेची आणि भाजपची युती, आज नाही तर उद्या तुटणारच होती.भाजपच्या सुदैवाने २०१४ मध्येच ती युती तुटली होती. फडणवीसांच्या अत्याग्रहामुळे २०१९ मध्ये स्वतःचे नुकसान होत असतानाही भाजपने पुन्हा युती करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. अजूनही फडणवीसांनी आशा सोडलेली नाही. आम्ही सेनेला पाठिंबा देण्यास तयार आहोत ही चंपाची ऑफर, फडणवीस-राऊत २ तासांची भेट, फडणवीस-ठाकरेंची पुढील काही दिवसात होणारी भेट यातून हे स्पष्ट आहे. उद्या ठाकरेंनी एखादे सूचक विधान केले तर फडणवीस धावत धावत मातोश्रीवर जातील हे नक्की.In reply to फडणवीसांवर काबू ठेवता येत by श्रीगुरुजी
दोन वेगळ्या बाजू आहेत ...
In reply to अगदी बरोबर आहे. राष्ट्रीय by श्रीगुरुजी
भारतात राष्ट्रीय पक्षांना स्वतःची ताकत नाही
In reply to भारतात राष्ट्रीय पक्षांना स्वतःची ताकत नाही by Rajesh188
जसा गुजराती बेल्टने
In reply to जसा गुजराती बेल्टने by चौथा कोनाडा
नाही शक्य
In reply to जसा गुजराती बेल्टने by चौथा कोनाडा
१९९१ मध्ये संरक्षणमंत्री,
In reply to १९९१ मध्ये संरक्षणमंत्री, by श्रीगुरुजी
कलमाडी पण त्याच वेळी रेल्वे
In reply to कलमाडी पण त्याच वेळी रेल्वे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
नाही. २१ जून १९९१ ते ऑक्टोबर
In reply to अगदी बरोबर आहे. राष्ट्रीय by श्रीगुरुजी
गुरूजी तुम्ही फक्त फडणविसांना
In reply to गुरूजी तुम्ही फक्त फडणविसांना by शाम भागवत
मी पण असेच मत मांडलं होते
In reply to गुरूजी तुम्ही फक्त फडणविसांना by शाम भागवत
फडणवीस का नको याची अनेक
In reply to फडणवीस का नको याची अनेक by श्रीगुरुजी
गुरूजी,
In reply to गुरूजी, by शाम भागवत
फडणवीसांचा युतीसाठी अत्याग्रह
In reply to गुरूजी तुम्ही फक्त फडणविसांना by शाम भागवत
बादवे, दुर्बुद्धी सुचणे
In reply to बादवे, दुर्बुद्धी सुचणे by श्रीगुरुजी
अन्वयार्थ जवळपास तसाच. असो.
In reply to अन्वयार्थ जवळपास तसाच. असो. by शाम भागवत
फडणवीस अत्यंत धूर्त व
In reply to बादवे, दुर्बुद्धी सुचणे by श्रीगुरुजी
तसे नसावे हो.
In reply to तसे नसावे हो. by कानडाऊ योगेशु
मूळात अशी कुठली 'चूक' त्यांनी
In reply to मूळात अशी कुठली 'चूक' त्यांनी by बिटाकाका
१. राकाँ व काँग्रेसच्या
In reply to १. राकाँ व काँग्रेसच्या by शाम भागवत
पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट
In reply to पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट by चंद्रसूर्यकुमार
शिवसेनेने स्थापनेपासून प्रजा
In reply to १. राकाँ व काँग्रेसच्या by शाम भागवत
माझ्यामते शिवसेना +
In reply to माझ्यामते शिवसेना + by आनन्दा
माहिती बद्दल धन्यवाद .....
In reply to माझ्यामते शिवसेना + by आनन्दा
आनंदा,
केंद्रीय मंत्र्यासह भाजपचे ४ खासदार निवडणुकीच्या मैदानात
काँग्रेस का हरली ह्याची कारणं शोधली तर
बंगालमधील काही भाजप उमेदवार
बंगालमध्ये भाजपमध्ये तर केरळमध्ये काँग्रेसमध्ये असंतोष
केरळ निवडणुकांसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी
“तुम्हाला पायचं दुखणं जाणवतं पण........
अभिनेते अरुण गोविल यांचा भाजपामध्ये प्रवेश!
मूवी
In reply to मूवी by Rajesh188
तुमचे प्रतिसाद मस्त असतात ....
In reply to मूवी by Rajesh188
@राजेश १८८
In reply to @राजेश १८८ by सुबोध खरे
मला पण असेच वाटते ....
In reply to मला पण असेच वाटते .... by मुक्त विहारि
सचीन पोटे असेच काहीतरी नाव
In reply to सचीन पोटे असेच काहीतरी नाव by बापूसाहेब
ते अवतारी बाबा आहेत ....
In reply to मला पण असेच वाटते .... by मुक्त विहारि
मूवी
In reply to मूवी by Rajesh188
कसचं कसचं ....
“नागपुरात जन्मलेली संघटना आख्ख्या देशाला नियंत्रित करू पाहतेय”,
In reply to “नागपुरात जन्मलेली संघटना आख्ख्या देशाला नियंत्रित करू पाहतेय”, by मुक्त विहारि
“नागपुरात जन्मलेली संघटना
“नागपुरात जन्मलेली संघटना आख्ख्या देशाला नियंत्रित करू पाहतेय”, राहुल गांधींची परखड टीका!नागपूर भारतातच आहे आणि तिथे भारतीय लोकच राहतात.. त्यांनी देश नियंत्रणात नाही ठेवायचा तर मग इटली वरून नियंत्रणात ठेवायचा का?? आणि एका इंग्रजाने तयार केलेल्या संघटनेने स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर देखील आख्या देशाला नियंत्रित केले त्याचे काय??In reply to “नागपुरात जन्मलेली संघटना by बापूसाहेब
तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला हे पटते ...
…आणि राहुल गांधी चहापत्ती वेचणाऱ्या महिलांसोबतच बसले जेवायला!
भाजपच आसामला वाचवू शकतो – शहा
In reply to भाजपच आसामला वाचवू शकतो – शहा by मुक्त विहारि
आसाम पुढे कोणते महत्वाचे प्रश्न आहेत
In reply to आसाम पुढे कोणते महत्वाचे प्रश्न आहेत by Rajesh188
तुमचे प्रतिसाद मस्त असतात ....
In reply to भाजपच आसामला वाचवू शकतो – शहा by मुक्त विहारि
आसाम पुढे कोणते महत्वाचे प्रश्न आहेत
बंगाल विधानसभा निवडणुकीवर
In reply to बंगाल विधानसभा निवडणुकीवर by श्रीगुरुजी
MIM
In reply to MIM by मुक्त विहारि
उतरली पाहिजे, मजा येईल.
In reply to उतरली पाहिजे, मजा येईल. by रंगीला रतन
ते व्यवस्थित आराखडा तयार करून उतरतील....
In reply to ते व्यवस्थित आराखडा तयार करून उतरतील.... by मुक्त विहारि
बरोबर. तृणमूल आणि काँग्रेसला
काल आसाम विधानसभेसाठी व बंगाल
आसाममध्ये तिसऱ्या आणि अंतिम
दोन मुद्दे आणि जुने संदर्भ
In reply to दोन मुद्दे आणि जुने संदर्भ by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद माहितीबद्दल!
बंगालमध्ये मतदानाची ७ वी फेरी
पाच राज्यांच्या निवडणुकीचे
In reply to पाच राज्यांच्या निवडणुकीचे by रात्रीचे चांदणे
चाचण्या
एक्झिट पोल.
In reply to एक्झिट पोल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण ममता जर सत्तेच्या जवळ
सर्व मतदानोत्तर
गुरुजी जसे मोदींना पर्याय कोण
In reply to गुरुजी जसे मोदींना पर्याय कोण by Vichar Manus
मोदींना पर्याय कोण हा प्रश्न
पंढरपूर पोटनिवडणुक
In reply to पंढरपूर पोटनिवडणुक by चंद्रसूर्यकुमार
२०१९ मध्ये राष्ट्रवादी
In reply to पंढरपूर पोटनिवडणुक by चंद्रसूर्यकुमार
दुर्दैवाने पोटनिवडणुकीसाठी
२ मे नंतर
प्रतिसाद खूप उजवीकडे गेल्याने
क्रिकेटचेच उदाहरण देतो, संघ निवडायचे काम कॅप्टन करत नाही संघ निवडायचे काम, समिती करते ..हे पूर्णांंशाने खरे नाही. अंतिम संघात कोणते खेळाडू खेळवायचे हे ठरविण्यात कर्णधाराचे मत सुद्धा महत्त्वाचे असते. २००७ मध्ये ट-२० विश्वचषक स्पर्धेसाठी धोनीला कर्णधार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर धोनीने सचिन, गांगुली, द्रविड वगैरे तुलनेने वयस्कर खेळाडूंना संघात घेण्यास विरोध केला होता व निवड समितीने त्याचे म्हणणे ऐकले होते. त्यामुळे रोहीत शर्मा, युसुफ पठाण, जोगिंदर शर्मा, रूद्र प्रताप सिंंग अशा तरूण नव्या खेळाडूंना संधी मिळाली होती.फडणवीस केंद्रीय मंत्रीमंडळात, आज नाही तर उद्या, नक्कीच जाणार....ते केंद्रात जाऊ देत किंवा एखादा राज्याचे राज्यपाल होऊ देत, ते कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात नको आणि त्यांच्याबरोबर त्यांचे शेपूटही पाठवा.आणि त्यांना अर्थमंत्री किंवा संरक्षण दल, ह्यापैकी एक खाते नक्कीच मिळेल... काही नेत्यांचा जळफळाट इथेच आहे...अर्थमंत्री नक्कीच नाही, संरक्षण मंत्री शक्य आहे. बघू या ते केंद्रात जाऊन काय दिवे लावतात कारण तेथे जाऊन कोणाची चाटुगिरी करणार? बरं, यामुळे कोणत्या नेत्यांचा जळफळाट होतोय ते सांगा.काही नेत्यांना फडणवीस मुख्यमंत्री पदावर नको आहेत आणि त्यासाठी फडणवीस हे सत्तेसाठी कसे हपापलेले आहेत, हे चित्र रंगवण्यात आले आहे....फडणवीस सत्तेसाठी किती हपापलेले होते हे वेगळे चित्र रंगविण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांची सत्तेसाठीची वखवख, त्यासाठी केलेल्या असंख्य तडजोडी, लाळघोटेपणा व जनतेचा आणि समर्थकांचा वेळोवेळी केलेला विश्वासघात हे ५ वर्षात अनेकदा दिसले आहे. तुरूंगात चक्की पिसायला पाठविणार असे जाहीर सांगून त्याच माणसाशी हातमिळवणी करणे, "नाही नाही नाही, भाजप राष्ट्रवादी बरोबर कधीही युती करणार नाही, एकदा नाही, त्रिवार नाही" असे काळी पाच स्वरात किंचाळून सांगूनही भल्या पहाटे राष्ट्रवादी बरोबरच युती करणे हे सत्तेसाठी अत्यंत हपापलेल्या व अत्यंत कासावीस झालेल्या व्यक्तीचेच उदाहरण आहे.In reply to प्रतिसाद खूप उजवीकडे गेल्याने by श्रीगुरुजी
मला भ्रष्टाचार न करणारा मुमं
In reply to मला भ्रष्टाचार न करणारा मुमं by शाम भागवत
भागवत साहेब,