केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, आसाम व बंगाल या ५ राज्यांची विधानसभा निवडणुक एप्रिल २०२१ मध्ये होत आहे. निकाल २ मे २०२१ या दिवशी जाहीर होतील.
याच राज्यांच्या २०१६ मधील निवडणुकीनिमित्त काढलेला हा धागा.
५ राज्यांची विधानसभा निवडणुक - २०१६
या राज्यातील प्रमुख पक्षांची माहिती वरील धाग्यात सविस्तर दिली असल्याने पुनरावृत्ती करीत नाही.
२०१६ च्या तुलनेत यावेळी वेगवेगळ्या पक्षांच्या आघाड्यांमध्ये काही बदल झालेत. २०१६ मध्ये भाजपबरोबर आघाडीत असलेल्या बोडोलँड पीपल्स फ्रंट पक्षाने आता कॉंग्रेसबरोबर घरोबा केलाय. तामिळनाडूतही नवीन आघाड्या होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागील ३० वर्षे प्रभाव असलेले जयललिता व करूणानिधी नसलेली ही पहिलीच निवडणुक आहे.
आतापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या मतपूर्व सर्वेक्षणांनुसार तामिळनाडूत यावेळी द्रमुक आघाडीला मोठे बहुमत मिळून करूणानिधींचे चिरंजीव स्टॅलिन मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील १० वर्षे सत्तेत असणाऱ्या अद्रमुकची सत्ता जाणार आहे.
पुदुच्चेरी या अत्यंत लहान असलेल्या केंद्रशासित प्रदेशातही सत्तांतर होण्याची शक्यता असून कॉंग्रेस ऐवजी भाजप आघाडीत असलेले सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये मागील अनेक दशकांची परंपरा खंडीत होऊन विद्यमान डाव्या आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे.
बंगालमध्ये अत्यंत चुरशीची लढत असून विद्यमान तृणमूल कॉंग्रेस सरकार सत्ता टिकविण्याची शक्यता आहे. परंतु तृणमूलला किमान ५७ जागा गमावून १५७ जागा व भाजपला ३ वरून १००+ जागा मिळण्याची शक्यता आहे. या राज्यात डावे पक्ष व कॉंग्रेसची वाट लागण्याची शक्यता आहे.
आसाममध्ये विद्यमान भाजप आघाडीचे सरकार काही जागा गमावून १२६ पैकी ६७ जागा मिळवून सत्ता टिकविण्याची शक्यता आहे.
एकंदरीत भाजप बऱ्यापैकी फायद्यात दिसतो. कॉंग्रेसला तामिळनाडू वगळता कोठेही भवितव्य दिसत नाही. ममता सलग तिसऱ्यांदा निवडणुक जिंकून राष्ट्रीय स्तरावर मोदींना पर्याय म्हणून प्रथम क्रमांकावर पोहोचेल.
हे काल प्रसिद्ध झालेल्या सी-व्होटर मतपूर्व सर्वैक्षणाचे अंदाज -
https://maharashtratimes.com/india-news/assembly-election-2021-west-ben…
तामिळनाडूत भाजपच्या अपेक्षांना मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत. तिथे यूपीएचे सरकार बनू शकते.
दुसरीकडे पुदुच्चेरीत मात्र एनडीएचे सरकार सत्तेत येऊ शकते, असा अंदाज आहे.
आसाममध्ये एनडीए पुन्हा सत्तेत येताना दिसते आहे.
केरळमध्ये एलडीएफ पुन्हा सत्तेत येऊ शकते.
आसाममध्ये भाजप १२६ पैक ६७ जागा जिंकेल आणि सत्ता कायम ठेवेल असा अंदाज आहे.
तर पश्चिम बंगालमध्ये मोठी शक्ती लावणाऱ्या भाजपची कामगिरी दमदार असेल. पण सत्ता मिळण्याची शक्यता कमीच आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपची कामगिरी या निवडणुकीत दमदार असेल. गेल्या निवडणुकीत ३ जागा जिंकणारा भाजप या निवडणुकीत १०० हून अधिक जागा जिंकेल, असा अंदाज आहे. तर सत्ताधारी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला ५७ जागांचे नुकसान होऊ शकते. ममता यांना गेल्या निवडणुकीत २११ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ममतांच्या तृणमूल काँग्रेसला १५४ जागा मिळतील. तर काँग्रेस-डाव्या पक्षांच्या आघाडील ३३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागांसाठी निवडणूक होतेय.
तामिळनाडूमध्ये AIADMK सोबत भाजपने युती केली आहे. पण इथे भाजपच्या अपेक्षांना मोठा झटक बसेल असा अंदाज आहे. राज्यातील विधानसभेच्या २३४ जागांपैकी यूपीए (डीएमके-काँग्रेस ) १५८ जागा जिंकेल. तर एआयएडीएमके- भाजप युतीला ६५ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर एमएनएमला ५, एएमएमकेला ३ आणि इतरांना ३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. तामिळनाडूत डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांना मुख्यमंत्रीपदाची पहिली पंसती देण्यात आली आहे. तर कमल हसन, रजनीकांत आणि शशीकला यांना १० टक्के नागरिकांनीही मुख्यमंत्री म्हणून पसंती दिलेली नाही.
आसाममध्ये एनडीएच्या जागा कमी होतील पण सत्ता राहणार
आसाममध्ये भाजपसाठी चांगली बातमी आहे. राज्यात एनडीएची पुन्हा सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. इथे एनडीएला १२६ पैकी ६७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर यावेळी यूपीएची कामगिरी चांगली होईल आणि गेल्या वेळेच्या ३९ जागांवरून ५७ पर्यंत जागा वाढतील. तसंच इतरांना २ जागा मिळतील, असा अंदाज आहे.
पुदुच्चेरीतील विधानसभेच्या ३० जागांपैकी एनडीए १६ ते २० जागा जिंकेल असा अंदाज आहे. तर यूपीएच्या खात्यात १३ जागा मिळतील असं बोललं जातंय. पुदुच्चेरीत ६ एप्रिलला मतदान होणार आहे.
सर्वेक्षणानुसार केरळमधील १४० जागांवर डाव्या पक्षांचे नेतृत्व असलेल्या सत्ताधारी एलडीएफला ८२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसप्रणित यूडीएफला ५६ जागा जिंकेल असा अंदाज आहे. या सर्वेक्षणात मुख्यमंत्री पी. विजयन हे जनतेची पहिली पसंत आहेत. तर केरळमध्ये भाजपला झटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपला फार फार तर १ जागा मिळेल, असा अंदाज आहे.
वाचने
53086
प्रतिक्रिया
167
मिसळपाव
प्रतिक्रिया
टप्पा अजिबात लांबचा नव्हता.
In reply to नक्की समजेल. by शाम भागवत
असा महत्वाचा निर्णय, एकटे फडणवीस घेऊ शकणार नाहीत...
In reply to टप्पा अजिबात लांबचा नव्हता. by श्रीगुरुजी
जाऊ द्या हो.
In reply to असा महत्वाचा निर्णय, एकटे फडणवीस घेऊ शकणार नाहीत... by मुक्त विहारि
एकाच व्यक्तीच्या हातात, भाजप निर्णय घेणे सोपवत नाही ....
In reply to जाऊ द्या हो. by शाम भागवत
पक्षांतर्गत आणि बाहेरून विरोध
In reply to एकाच व्यक्तीच्या हातात, भाजप निर्णय घेणे सोपवत नाही .... by मुक्त विहारि
पक्षांतर्गत आणि बाहेरून विरोध होत असतांनाही, फडणवीस यांनी कार्यकाल पुर्ण केला, हेच कौतुकास्पद आहे...कसला विरोध? कोणीही मुख्यमंत्री असता तरी पक्षाबाहेर विरोध होतोच. त्याचे कसले कौतुक? पक्षांतर्गत कोणी विरोध केला होता? पक्षांतर्गत विरोध असता तर ५ वर्षे टिकले असते का? पक्षातील सर्वांनीच सहकार्य केले होते. खडसे, पंकजा मुंडे आणि तावडे यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करण्याचा घोर अपराध केला म्हणून त्यांना अनेक खोट्या खटल्यात अडकविणे योग्य होते का? हे करताना महाराष्ट्रात पक्ष दुर्बल केला नाही का? त्यामुळे इतर पक्षातील भ्रष्ट, नालायक गणंगांची भाजपत भरताड केली नाही का? आणि कार्यकाल पूर्ण केला यात काय कौतुकास्पद आहे? राष्ट्रवादीतील भ्रष्टांना अभय देऊन, ठाकरेंची ५ वर्षे अर्वाच्य शिवीगाळ सहन करीत चाटुगिरी करणे हे कौतुकास्पद नसून ही लाळघोटेपणाची परीसीमा आहे.तुम्हाला कोण हवेत?
In reply to पक्षांतर्गत आणि बाहेरून विरोध by श्रीगुरुजी
फडणवीस व चंपा अजिबात नको.
In reply to तुम्हाला कोण हवेत? by शाम भागवत
कोण आहे असा?
In reply to फडणवीस व चंपा अजिबात नको. by श्रीगुरुजी
खडसे यांनी मग....
In reply to पक्षांतर्गत आणि बाहेरून विरोध by श्रीगुरुजी
फडणवीसांवर काबू ठेवता येत
In reply to खडसे यांनी मग.... by मुक्त विहारि
फडणवीसांवर काबू ठेवता येत नाही, हे समजताच, काही नेत्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरूवात केली ...फडणवीसांनीच पक्षातील इतर नेत्यांना त्रास दिला का त्यांना इतरांनी त्रास दिला? तसे असेल तर कोणत्या नेत्यांनी काम त्रास दिला?कुठल्या पक्षाबरोबर युती करायची आणि कुठल्या पक्षाबरोबर युती करायची नाही, हे निर्णय भाजपची कार्यकारिणी घेते. त्या कार्यकारिणीत जो निर्णय ठरेल, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम, त्या त्या नेत्यांकडे असते.कोणत्याही पक्षाबरोबर युती करणार नाही असे ठाकरेंनी अनेकदा सांगूनही सेनेबरोबर युती करण्यासाठी कोणता नेता कासावीस झाला होता? सेनेला खुश ठेवण्यासाठी कोणता नेता ठाकरेंची चाटुगिरी करीत होता? सेनेला खुश ठेवण्यासाठी कोणत्या नेत्याने राज्याचे व पक्षाचे नुकसान होत असूनही ठाकरेंची प्रत्येक मागणी मान्य केली होती?शिवसेनेची आणि भाजपची युती, आज नाही तर उद्या तुटणारच होती.भाजपच्या सुदैवाने २०१४ मध्येच ती युती तुटली होती. फडणवीसांच्या अत्याग्रहामुळे २०१९ मध्ये स्वतःचे नुकसान होत असतानाही भाजपने पुन्हा युती करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. अजूनही फडणवीसांनी आशा सोडलेली नाही. आम्ही सेनेला पाठिंबा देण्यास तयार आहोत ही चंपाची ऑफर, फडणवीस-राऊत २ तासांची भेट, फडणवीस-ठाकरेंची पुढील काही दिवसात होणारी भेट यातून हे स्पष्ट आहे. उद्या ठाकरेंनी एखादे सूचक विधान केले तर फडणवीस धावत धावत मातोश्रीवर जातील हे नक्की.दोन वेगळ्या बाजू आहेत ...
In reply to फडणवीसांवर काबू ठेवता येत by श्रीगुरुजी
भारतात राष्ट्रीय पक्षांना स्वतःची ताकत नाही
In reply to अगदी बरोबर आहे. राष्ट्रीय by श्रीगुरुजी
जसा गुजराती बेल्टने
In reply to भारतात राष्ट्रीय पक्षांना स्वतःची ताकत नाही by Rajesh188
नाही शक्य
In reply to जसा गुजराती बेल्टने by चौथा कोनाडा
१९९१ मध्ये संरक्षणमंत्री,
In reply to जसा गुजराती बेल्टने by चौथा कोनाडा
कलमाडी पण त्याच वेळी रेल्वे
In reply to १९९१ मध्ये संरक्षणमंत्री, by श्रीगुरुजी
नाही. २१ जून १९९१ ते ऑक्टोबर
In reply to कलमाडी पण त्याच वेळी रेल्वे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
गुरूजी तुम्ही फक्त फडणविसांना
In reply to अगदी बरोबर आहे. राष्ट्रीय by श्रीगुरुजी
मी पण असेच मत मांडलं होते
In reply to गुरूजी तुम्ही फक्त फडणविसांना by शाम भागवत
फडणवीस का नको याची अनेक
In reply to गुरूजी तुम्ही फक्त फडणविसांना by शाम भागवत
गुरूजी,
In reply to फडणवीस का नको याची अनेक by श्रीगुरुजी
फडणवीसांचा युतीसाठी अत्याग्रह
In reply to गुरूजी, by शाम भागवत
बादवे, दुर्बुद्धी सुचणे
In reply to गुरूजी तुम्ही फक्त फडणविसांना by शाम भागवत
अन्वयार्थ जवळपास तसाच. असो.
In reply to बादवे, दुर्बुद्धी सुचणे by श्रीगुरुजी
फडणवीस अत्यंत धूर्त व
In reply to अन्वयार्थ जवळपास तसाच. असो. by शाम भागवत
तसे नसावे हो.
In reply to बादवे, दुर्बुद्धी सुचणे by श्रीगुरुजी
मूळात अशी कुठली 'चूक' त्यांनी
In reply to तसे नसावे हो. by कानडाऊ योगेशु
१. राकाँ व काँग्रेसच्या
In reply to मूळात अशी कुठली 'चूक' त्यांनी by बिटाकाका
पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट
In reply to १. राकाँ व काँग्रेसच्या by शाम भागवत
शिवसेनेने स्थापनेपासून प्रजा
In reply to पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट by चंद्रसूर्यकुमार
माझ्यामते शिवसेना +
In reply to १. राकाँ व काँग्रेसच्या by शाम भागवत
माहिती बद्दल धन्यवाद .....
In reply to माझ्यामते शिवसेना + by आनन्दा
आनंदा,
In reply to माझ्यामते शिवसेना + by आनन्दा
केंद्रीय मंत्र्यासह भाजपचे ४ खासदार निवडणुकीच्या मैदानात
काँग्रेस का हरली ह्याची कारणं शोधली तर
बंगालमधील काही भाजप उमेदवार
बंगालमध्ये भाजपमध्ये तर केरळमध्ये काँग्रेसमध्ये असंतोष
केरळ निवडणुकांसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी
“तुम्हाला पायचं दुखणं जाणवतं पण........
अभिनेते अरुण गोविल यांचा भाजपामध्ये प्रवेश!
मूवी
तुमचे प्रतिसाद मस्त असतात ....
In reply to मूवी by Rajesh188
@राजेश १८८
In reply to मूवी by Rajesh188
मला पण असेच वाटते ....
In reply to @राजेश १८८ by सुबोध खरे
सचीन पोटे असेच काहीतरी नाव
In reply to मला पण असेच वाटते .... by मुक्त विहारि
ते अवतारी बाबा आहेत ....
In reply to सचीन पोटे असेच काहीतरी नाव by बापूसाहेब
मूवी
In reply to मला पण असेच वाटते .... by मुक्त विहारि
कसचं कसचं ....
In reply to मूवी by Rajesh188
“नागपुरात जन्मलेली संघटना आख्ख्या देशाला नियंत्रित करू पाहतेय”,
“नागपुरात जन्मलेली संघटना
In reply to “नागपुरात जन्मलेली संघटना आख्ख्या देशाला नियंत्रित करू पाहतेय”, by मुक्त विहारि
“नागपुरात जन्मलेली संघटना आख्ख्या देशाला नियंत्रित करू पाहतेय”, राहुल गांधींची परखड टीका!नागपूर भारतातच आहे आणि तिथे भारतीय लोकच राहतात.. त्यांनी देश नियंत्रणात नाही ठेवायचा तर मग इटली वरून नियंत्रणात ठेवायचा का?? आणि एका इंग्रजाने तयार केलेल्या संघटनेने स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर देखील आख्या देशाला नियंत्रित केले त्याचे काय??तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला हे पटते ...
In reply to “नागपुरात जन्मलेली संघटना by बापूसाहेब
…आणि राहुल गांधी चहापत्ती वेचणाऱ्या महिलांसोबतच बसले जेवायला!
भाजपच आसामला वाचवू शकतो – शहा
आसाम पुढे कोणते महत्वाचे प्रश्न आहेत
In reply to भाजपच आसामला वाचवू शकतो – शहा by मुक्त विहारि
तुमचे प्रतिसाद मस्त असतात ....
In reply to आसाम पुढे कोणते महत्वाचे प्रश्न आहेत by Rajesh188
आसाम पुढे कोणते महत्वाचे प्रश्न आहेत
In reply to भाजपच आसामला वाचवू शकतो – शहा by मुक्त विहारि
बंगाल विधानसभा निवडणुकीवर
MIM
In reply to बंगाल विधानसभा निवडणुकीवर by श्रीगुरुजी
उतरली पाहिजे, मजा येईल.
In reply to MIM by मुक्त विहारि
ते व्यवस्थित आराखडा तयार करून उतरतील....
In reply to उतरली पाहिजे, मजा येईल. by रंगीला रतन
बरोबर. तृणमूल आणि काँग्रेसला
In reply to ते व्यवस्थित आराखडा तयार करून उतरतील.... by मुक्त विहारि
काल आसाम विधानसभेसाठी व बंगाल
आसाममध्ये तिसऱ्या आणि अंतिम
दोन मुद्दे आणि जुने संदर्भ
धन्यवाद माहितीबद्दल!
In reply to दोन मुद्दे आणि जुने संदर्भ by चंद्रसूर्यकुमार
बंगालमध्ये मतदानाची ७ वी फेरी
पाच राज्यांच्या निवडणुकीचे
चाचण्या
In reply to पाच राज्यांच्या निवडणुकीचे by रात्रीचे चांदणे
एक्झिट पोल.
पण ममता जर सत्तेच्या जवळ
In reply to एक्झिट पोल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे