आधीच्या भागात जवळपास २०० प्रतिसाद होत आले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या कलकत्ता शहरातील भवानीपूर या विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुक न लढवता पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविणार आहेत. एखादा माणूस इरेला पेटला तर तो कशी चूक करतो याचे हे एक उदाहरण आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बंगालमधून तृणमूल काँग्रेसला २२, भाजपला १८ तर काँग्रेसला २ लोकसभेच्या जागा मिळाल्या. भाजपची राज्याच्या मध्य आणि उत्तर भागात कामगिरी खूपच चांगली होती. पण राज्याच्या दक्षिण भागात तृणमूलने विजय मिळवला होता. विकीपीडीयावरून घेतलेल्या या नकाशावरून आपल्याला अधिक चांगली कल्पना येईल.
या नकाशात चौकटीत कलकत्ता शहरातील लोकसभा मतदारसंघ आहेत तर ३० आणि ३१ क्रमांकाचे अनुक्रमे तामलूक आणि कंठी मतदारसंघ आहेत. तर १९ आणि २० क्रमांकाचे अनुक्रमे जॉयनगर आणि मथुरापूर हे लोकसभा मतदारसंघ आहेत. या सगळ्या दहाच्या दहा मतदारसंघांमध्ये २०१९ मध्ये तृणमूलने विजय मिळवला होता. यावरून बंगालचा दक्षिण भाग तृणमूलसाठी किती महत्वाचा आहे याची कल्पना येईल.
तामलूक मतदारसंघातून २००९ आणि २०१४ मध्ये तृणमूलचे नेते शुभेंदू अधिकारी जिंकले होते. ते २०१६ मध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून बंगाल विधानसभेवर निवडून गेले आणि ममतांच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले. २००६ मध्ये सिंगूर आणि नंदीग्राम मध्ये जमिन संपादनाविरूध्द ममतांनी लढा उभा करून नंतर डाव्यांची ३४ वर्षे जुनी राजवट जमिनदोस्त करून टाकली होती. त्या नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी आंदोलनात पुढे होते. २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी चांगली ६७% मते घेऊन दणदणीत विजय मिळवला होता. हा नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ शुभेंदू अधिकारी पूर्वी निवडून गेले होते त्या तामलूक लोकसभा मतदारसंघात येतो. शुभेंदू अधिकारी विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्या जागेवर शुभेंदूंचे बंधू दिब्येंदू अधिकारी पोटनिवडणुकीत निवडून आले. तामलूकच्या शेजारी असलेल्या कंठी लोकसभा मतदारसंघातून २००९ पासून शुभेंदू-दिब्येंदू या बंधूंचे वडील शिशिर अधिकारी लोकसभेवर निवडून येत आहेत. तेव्हा सांगायचा उद्देश म्हणजे नकाशात दाखविलेल्या ३० आणि ३१ या मतदारसंघांच्या क्षेत्रात या अधिकारींची पकड चांगली आहे. त्याच मतदारसंघांच्या बाजूला असलेल्या ३४ (मेदिनीपूर- पूर्वीचे मिदनापूर) मतदारसंघातून भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष २०१९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. त्या बाजूलाच असलेल्या ३३ (झारग्राम), ३५ (पुरूलिया), ३६ (बांकूडा) आणि ३७ (विष्णूपूर) या लोकसभेच्या जागाही भाजपनेच जिंकल्या होत्या. या सगळ्या जागा राज्याच्या मध्य आणि पश्चिम भागातील आहेत.
डिसेंबर २०२० मध्ये या शुभेंदू अधिकारींनी ममतांच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. त्यामुळे भाजपला २०१९ मध्ये राज्याच्या ज्या दक्षिण भागातून फार यश मिळाले नव्हते त्या भागात या अधिकारींच्या मदतीने हातपाय रोवायची संधी भाजपला मिळणार आहे. अशावेळी ममता बॅनर्जी इरेला पेटून शुभेंदू अधिकारींविरूध्द त्यांच्या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत. हा मतदारसंघ आणि आजूबाजूचा तामलूक लोकसभा मतदारसंघात येणारा भाग या अधिकारींचे प्रभावक्षेत्र आहे. तसेच बाजूलाच पश्चिमेला भाजपचे प्रभावक्षेत्र आहे.
अशावेळी इरेला पेटून स्वतःचा हक्काचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघ सोडून आपल्या प्रतिस्पर्ध्याविरूध्द लढायला त्याच्याच प्रभावक्षेत्रात ममतांनी जायची काही गरज आहे का? खरं तर मुख्यमंत्री वगैरेंना स्वतःच्या मतदारसंघाची कधी काळजी नसते त्यामुळे ते राज्याच्या इतर भागात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करायला मोकळे असतात. आणि तृणमूल काँग्रेस मते ममतांच्या नावावर मागणार असेल तर स्वतः ममतांनी प्रचारात मोठा भाग घ्यायला हवा. अर्थात बंगालमध्ये ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे तेव्हा नंदीग्राममध्ये नक्की कधी मतदान होणार आहे हे बघायला हवे. पण निदान काही दिवस तरी ममता आपल्याच मतदारसंघात अडकणार आहेत. त्यातून शुभेंदू अधिकारींनी ममतांना हरवले तर ममतांच्या भविष्यातील राजकारणाला मोठा धोका पोहोचेल. आणि ममता जिंकल्या तरी त्याची किंमत मोठी भरावी लागणार आहे.
वास्तविक पक्षाचे सर्वोच्च नेते आपल्याला गमावण्यासारखे फार काही नसेल तरच अशा मोठ्या लढाया लढायला जातात. उदाहरणार्थ राममनोहर लोहियांनी जवाहरलाल नेहरूंविरूध्द निवडणुक लढवली होती किंवा केजरीवालांनी शीला दिक्षित यांच्याविरूध्द निवडणुक लढवली होती. असे असताना इतके इरेला पेटायचे कारण समजत नाही.
बघू पुढे काय होते ते. घोडामैदान जवळच आहे.
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
47119
प्रतिक्रिया
164
मिसळपाव
प्रतिक्रिया
तृणमुल काय आहे?
शंभर प्रतिसाद
खरं तर १४०+ प्रतिसाद
काही दिवसांपूर्वी मुकेश
https://www.loksatta.com
हिरेन
मुकेश अंबानी यांच्या बाबतीत ....
अंबु / मनसुख / सचिन वाझे / एनआयए ची मागणी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Din Mahine Saal Gujarte jayege... :- Avatarजम्बो कोविड सेंटरमध्ये मोठा आर्थिक घोटाळा,
सर्व न्यूज मोबाईल वर येतात
वीज दरात कपात
जास्त विचार करू नका ....
In reply to वीज दरात कपात by सॅगी
राज्यात करोनाचा धोका आणखी वाढला,
आपणच जबाबदारी घ्यायची
In reply to राज्यात करोनाचा धोका आणखी वाढला, by मुक्त विहारि
सहमत आहे
In reply to आपणच जबाबदारी घ्यायची by सॅगी
सुशांतसिंग राजपूत प्रकरण,
हाती लागणे वगैरे महत्वाचे
In reply to सुशांतसिंग राजपूत प्रकरण, by श्रीगुरुजी
भाजप करतोय तो सक्षम विरोध
In reply to हाती लागणे वगैरे महत्वाचे by पिनाक
हे सरकार पडणे, शिवसेना सोडून, कुणाच्याच हिताचे नाही ...
In reply to भाजप करतोय तो सक्षम विरोध by श्रीगुरुजी
पुढील निवडणुकीत कदाचित
In reply to हे सरकार पडणे, शिवसेना सोडून, कुणाच्याच हिताचे नाही ... by मुक्त विहारि
+ १
In reply to पुढील निवडणुकीत कदाचित by कानडाऊ योगेशु
सहमत
In reply to पुढील निवडणुकीत कदाचित by कानडाऊ योगेशु
शिवसेनेचे अस्तित्व फक्त
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
शिवसेना हा किळसवाणा पक्ष
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
हा पर्याय चांगला आहे
In reply to शिवसेना हा किळसवाणा पक्ष by पिनाक
नोटा हा कधीही उत्तम पर्याय
In reply to हा पर्याय चांगला आहे by मुक्त विहारि
सहमत.
In reply to नोटा हा कधीही उत्तम पर्याय by कानडाऊ योगेशु
नोटा
In reply to शिवसेना हा किळसवाणा पक्ष by पिनाक
शिवसेना हा किळसवाणा पक्ष
In reply to शिवसेना हा किळसवाणा पक्ष by पिनाक
शिवसेना हा किळसवाणा पक्ष झालेला आहे.+ ९९९९९९९९९ . . . जन्मापासून हा पक्ष असाच आहे.शिवसेनेचे अस्तित्व हाच
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
शिवसेनेचे अस्तित्व हाच महाराष्ट्राच्य राजकारणाला लागलेला कलंक आहे.+ ९९९९९९९९ . . . हा कलंक १९८९ पर्यंत मुंबईतील काही प्रभागांपुरता मर्यादित होता. परंतु संपूर्ण महाराष्ट्राच्या भाळी हा कलंक वारंवार थापण्याचा अपराध भाजपचाच आहे.हो
In reply to शिवसेनेचे अस्तित्व हाच by श्रीगुरुजी
श्रीगुरुजींशी मी सहमत आहेच
In reply to शिवसेनेचे अस्तित्व हाच by श्रीगुरुजी
आयला म्हणजे मोदीना जाहीर
In reply to श्रीगुरुजींशी मी सहमत आहेच by स्वलिखित
असांसदीय शब्दांची यादी जाहीर
In reply to आयला म्हणजे मोदीना जाहीर by आनन्दा
आपण तर बुवा ....
In reply to असांसदीय शब्दांची यादी जाहीर by स्वलिखित
तसे होईल असे वाटते. भाजप ११५
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
तसे होईल असे वाटते. भाजप ११५-१२० पर्यंत गेल्यास आणि सेना १५-२० मध्ये आटोपल्यास परत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येऊन राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनू शकतो.सेना एकटी लढली तर १५-२० पर्यंतच जाऊ शकते. परंतु सद्यस्थितीत भाजप युती करूनही तीन अंंकी आमदार निवडून आणू शकणार नाही. एकटा लढला तर सद्यस्थितीत भाजप फार तर ६० पर्यंत जाईल. मागील ३-४ वर्षात भाजपने आपले बरेच हक्काचे मतदार दुखावले आहेत. ते परत भाजपकडे आणण्यासाठी काही काळ लागेल व त्यासाठी महाराष्ट्रात नेतृत्वबदल करणे आवश्यक आहे.आकड्यांचा मेळ बसत नाही
In reply to तसे होईल असे वाटते. भाजप ११५ by श्रीगुरुजी
सद्यस्थितीत भाजप व सेना हे
In reply to आकड्यांचा मेळ बसत नाही by चंद्रसूर्यकुमार
गुरूजी तुम्ही मतदान टक्केवारी
In reply to सद्यस्थितीत भाजप व सेना हे by श्रीगुरुजी
तुमची काय अपेक्षा होती की
In reply to भाजप करतोय तो सक्षम विरोध by श्रीगुरुजी
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करून,
In reply to तुमची काय अपेक्षा होती की by बिटाकाका
प्रकरणे फसली म्हणजे प्रचंड
In reply to तुमची काय अपेक्षा होती की by बिटाकाका
भाजप खऱ्याखुऱ्या समस्यांवर तर
In reply to प्रकरणे फसली म्हणजे प्रचंड by श्रीगुरुजी
रेल्वे ची खासगी करणाकडे वाटचाल
सगळ्या सवलती बंद कराव्यात.
सुरुवात तर झाली आहे
In reply to सगळ्या सवलती बंद कराव्यात. by आग्या१९९०
मला खात्री आहे .. तुम्ही ..
In reply to सुरुवात तर झाली आहे by Rajesh188
@ सुक्या ...
In reply to मला खात्री आहे .. तुम्ही .. by सुक्या
मिळालेली माहिती
सुशांतसिंह राजपूत - आत्महत्या
हिरेन
आंशिक स्वतंत्र
शेतकरी आंदोलन १०० वा दिवस....
पोलीसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणारे, माणसे तरी आहेत का?
In reply to शेतकरी आंदोलन १०० वा दिवस.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फारच अपेक्षा करता तुम्ही.
In reply to पोलीसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणारे, माणसे तरी आहेत का? by मुक्त विहारि
मोदींनी ते कायदे केले आहेत हेच
In reply to फारच अपेक्षा करता तुम्ही. by पिनाक
"प्रजासत्ताकदिनी आंदोलन बदनाम
In reply to शेतकरी आंदोलन १०० वा दिवस.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुठल्याही शेतकरी वर्गाला, इतका वेळ मिळत नाही
In reply to "प्रजासत्ताकदिनी आंदोलन बदनाम by सुक्या
सहमत ...
In reply to कुठल्याही शेतकरी वर्गाला, इतका वेळ मिळत नाही by मुक्त विहारि
सध्या इतर कामे चालू असल्याने जाता आले नाही
In reply to सहमत ... by सुक्या
दोन महिने आंदोलनजीवी बनून ऐश
In reply to सध्या इतर कामे चालू असल्याने जाता आले नाही by मुक्त विहारि
हो ना ....
In reply to दोन महिने आंदोलनजीवी बनून ऐश by शाम भागवत
मेलेल्या म्हशीला मणभर दूध अशी
In reply to शेतकरी आंदोलन १०० वा दिवस.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कृषी
In reply to शेतकरी आंदोलन १०० वा दिवस.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला वाटतं
पद्धत आहे आमची. काय म्हणणं
In reply to मला वाटतं by Rajesh188
तुम्हाला कितीतरी वेळा तुम्ही
In reply to मला वाटतं by Rajesh188
राजेश १८८
In reply to मला वाटतं by Rajesh188
तृणमूल कॉंग्रेस मधून अजून एक जण भाजप मध्ये
त्यातल्या त्यात बरा माणूस
In reply to तृणमूल कॉंग्रेस मधून अजून एक जण भाजप मध्ये by मुक्त विहारि
पण शुभेंदु अधिकारीपुढे दिनेश
In reply to त्यातल्या त्यात बरा माणूस by चंद्रसूर्यकुमार
पण शुभेंदु अधिकारीपुढे दिनेश
हो
In reply to पण शुभेंदु अधिकारीपुढे दिनेश by शाम भागवत
युती मोडल्याची किंमत
लोकसभेच्या निवडणुकीत
माझं तर म्हणणं आहे कृषी
https://www.loksatta.com/pune
https://m.rediff.com/news
https://www.loksatta.com
महाराष्ट्रातील 82 टक्के
कसला विरोध? माझे निम्मे
In reply to महाराष्ट्रातील 82 टक्के by Vichar Manus
सहमत आहे
In reply to कसला विरोध? माझे निम्मे by धनावडे
राम मंदिर देणगी
पाकिस्तान मध्ये हिंदू हत्याकांड
बोगस सरकारी कर्मचारी स्कॅन्डल
मते द्या नाहीतर, वीज आणि पाणी मिळणार नाहीत
पुरोगामी विचारवंतांची प्रतिक्रिया?
In reply to मते द्या नाहीतर, वीज आणि पाणी मिळणार नाहीत by मुक्त विहारि
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष,
In reply to पुरोगामी विचारवंतांची प्रतिक्रिया? by चंद्रसूर्यकुमार
फारतर "ममताद्रोही" किंवा
In reply to पुरोगामी विचारवंतांची प्रतिक्रिया? by चंद्रसूर्यकुमार
दीदी आणि त्यांचे शासन
मी हीच बातमी दिली आहे ....
In reply to दीदी आणि त्यांचे शासन by सॅगी
झोपेत स्वप्न
In reply to मी हीच बातमी दिली आहे .... by मुक्त विहारि
२०१४ मधील निवडणुकीच्या
In reply to दीदी आणि त्यांचे शासन by सॅगी
अभिनेता
रामा रामा.
In reply to अभिनेता by उपयोजक
मिथुन
सेने विषयी चांगलीच बातमी येते आहे नशीब खराब आहे bjp च
अच्छी बात है
In reply to सेने विषयी चांगलीच बातमी येते आहे नशीब खराब आहे bjp च by Rajesh188
कल्याण-डोंबिवली
In reply to अच्छी बात है by स्वलिखित
मोदी प्रचारात DNA हा शब्द
हे कोण बोलले, बोला ....
नक्की कोणाचा आहे?
In reply to हे कोण बोलले, बोला .... by मुक्त विहारि
ज्यांनी आयुष्यभर जातीयवादी
In reply to हे कोण बोलले, बोला .... by मुक्त विहारि
तुम्हाला आणि काही लोकांना समजते ते
In reply to ज्यांनी आयुष्यभर जातीयवादी by श्रीगुरुजी
कृपया पवारांना काही बोलू नये. दीर्घायुषी व्हावे.
In reply to हे कोण बोलले, बोला .... by मुक्त विहारि
कृपया पवारांना काही बोलू नये. दीर्घायुषी व्हावे.
In reply to हे कोण बोलले, बोला .... by मुक्त विहारि
सलमान खानच्या कारचा अपघात आठवला...
आत्मनिर्भर
शिवसेनेचे मुख्यमंत्री होताच वाझे पुन्हा सेवेत कसे रूजू झाले?
देर है लेकिन अंधेर नहीं
दारूच्या धंद्यात किती पैसा मिळतो?
आज आपला अर्थसंकल्प आहे. आणि
In reply to दारूच्या धंद्यात किती पैसा मिळतो? by मुक्त विहारि
असू देत .....
In reply to आज आपला अर्थसंकल्प आहे. आणि by शलभ
पुजा राठोड आत्महत्या
नाणार, मनसे आणि ग्रामस्थ
नाणार होणारच हे भविष्य मी 2
In reply to नाणार, मनसे आणि ग्रामस्थ by मुक्त विहारि
शिवसेना नेहमीच असे करते
In reply to नाणार होणारच हे भविष्य मी 2 by आनन्दा
श्री मोदींचा नाकर्तेपणा जसजसा
दोन गोष्टी
In reply to श्री मोदींचा नाकर्तेपणा जसजसा by नगरीनिरंजन
रामराव आदिक आठवले
In reply to दोन गोष्टी by चंद्रसूर्यकुमार
राजीव गांधी पण आठवायला हवेत
In reply to रामराव आदिक आठवले by मुक्त विहारि
जुने विसरा
In reply to राजीव गांधी पण आठवायला हवेत by चंद्रसूर्यकुमार
मोदींनी काय केले ह्या
In reply to जुने विसरा by Rajesh188
आदर
In reply to मोदींनी काय केले ह्या by बिटाकाका
खरे सांगायचे तर
In reply to आदर by चंद्रसूर्यकुमार
लेकी बोले सुने लगे करायचा
In reply to आदर by चंद्रसूर्यकुमार
प्रतिसादांमध्ये १८८ चे नाव
In reply to आदर by चंद्रसूर्यकुमार
प्रतिसादांमध्ये १८८ चे नाव दिसले की ताबडतोब प्रतिसाद दुर्लक्षित करायचा. पुढचे काही वाचायचेच नाही.+ १ मिपावर काही विशिष्ट सदस्यनामे दिसली की मी प्रतिसाद न वाचता पुढे जातो. हा त्यातलाच एक आयडी.त्यांनी काय होते
In reply to प्रतिसादांमध्ये १८८ चे नाव by श्रीगुरुजी
रेटून बोलले
In reply to त्यांनी काय होते by Rajesh188
तसेही आपल्यासाठी विमानात
In reply to दोन गोष्टी by चंद्रसूर्यकुमार
तसेही आपल्यासाठी विमानात नुसता आरडाओरडा नाही तर विमान अपहरण करणार्यांना पक्षात घेऊन आमदारकीचे तिकिट देऊन आमदार बनवायला मोदी हे इंदिरा गांधी थोडीच आहेत?इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण करणाऱ्या पांडे बंधू या हवाई चाच्यांना इंदिरा गांधींनी मंत्रीपदाचे बक्षीस दिले होते. अजून एका विमानात मंत्रीपदावर असताना रामराम आदिकांनी शिवास रीगलची आख्खी बाटली ढोसून हवाईसुंदरी बरोबर गैरवर्तन केले होते. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.तो उच्चवर्णीय आहे याला काही
In reply to श्री मोदींचा नाकर्तेपणा जसजसा by नगरीनिरंजन
नगरकरांना तेवढा विचार करायची
In reply to तो उच्चवर्णीय आहे याला काही by आनन्दा
खरं सांगायचं तर विमानात गोंधळ
In reply to नगरकरांना तेवढा विचार करायची by पिनाक
प्रश्न सांख्यिकीचा आहे. फक्त
In reply to तो उच्चवर्णीय आहे याला काही by आनन्दा
BJP चे चमचे
यात मोदींचा काय संबंध आहे? हा
एका अभ्यासानुसार विमानात गोंधळ करणारे ९०% प्रवासी....
In reply to यात मोदींचा काय संबंध आहे? हा by श्रीगुरुजी
ते सर्व
In reply to एका अभ्यासानुसार विमानात गोंधळ करणारे ९०% प्रवासी.... by मुक्त विहारि
गुलामगिरी करणारे अडाणी असतात
In reply to ते सर्व by Rajesh188
मोदी नी
नशेत किंवा मानसिकदृष्ट्या
नशेत किंवा मानसिकदृष्ट्या
In reply to नशेत किंवा मानसिकदृष्ट्या by नगरीनिरंजन
नशेत किंवा मानसिकदृष्ट्या आस्थिर आसलेली व्यक्ती मोदी मोदी करुन ओरडत असेल तर चिंतेची बाब अधिकच आहे.त्यात कसली चिंता आणि कोणाला चिंता? नशा उतरली की येईल तो ताळ्यावर. मुळात असल्या तद्दन फालतू, संध्यानंद टाईप सनसनाटी घडामोडी येथे टाकणे व त्या निमित्ताने दुरान्वयाने संबंध नसलेल्या मोदींना झोडपण्याची खाज शमविणे हा मोदीद्वेष्ट्यांचा आवडता छंद आहे कारण प्रतिसादातील उर्वरीत भाग तसाच आहे.हिंदू हित वादी
In reply to नशेत किंवा मानसिकदृष्ट्या by श्रीगुरुजी
किती निरागस आहात तुम्ही!
In reply to नशेत किंवा मानसिकदृष्ट्या by श्रीगुरुजी
मृत्युवरहत्येवर अत्यंत हीणकस भाषेत शेरेबाजी करणे असल्या उद्योगांना शिक्षा करायची सोडून मोदी त्यांना फॉलो करतात. हा विद्वेष आता अधिकृतच नव्हे तर विभूषण ठरायला लागला आहे. ह्य विद्वेषाने लोकांची मानसिकता बदलते आहे. बाबू बजरंगी व साध्वी प्रज्ञांची उदाहरणे पाहून लोकांना त्यात वावगं वाटतच नाही. पोलिसांच्या देखत आंदोलकांवर बंदूक चालवणार्या उच्चवर्णीय हिंदू मुलाला काहीच होत नाही; जेएनयुमध्ये जाऊन झोडपलं विद्यार्थ्यांना तरी काहीही होत नाही हे कोणी दाखवून दिलं? हे कोणी घडवलं? विद्वेषाला खतपाणी घालून असे रेबीड लोक तयार करण्याचे काम कोण करतंय हे सगळ्या जगाला कळतंय; परंतु उच्चवर्णीय हिंदूंचे हितसंबंध गुंतलेले असल्याने ते डिनायल मध्ये आहेत.कसली द्वेषाला मान्यता?
In reply to किती निरागस आहात तुम्ही! by नगरीनिरंजन
सकल हिंदूंच्या रक्षणाची भाषा
हिंदू जेवढे आता पर्यंत कमजोर आणि असमर्थ झाले नाही नाहीत
In reply to सकल हिंदूंच्या रक्षणाची भाषा by स्वलिखित
आपला औरंगजेबाबद्दलचा अभ्यास
In reply to हिंदू जेवढे आता पर्यंत कमजोर आणि असमर्थ झाले नाही नाहीत by Rajesh188
अर्थातच. बीजेपीला पूर्वापार
In reply to सकल हिंदूंच्या रक्षणाची भाषा by स्वलिखित
पूर्वी इलेक्ट्रॉनिक
पूर्वी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट इतका नसल्याने व्हॉट्सॅपवर वगौरे खोटे संदेश पाठवून लोकांना ब्रेनवॉश करणे अवघड होते.काहीही. शालेय पाठ्यपुस्तके, दूरचित्रवाणी, आकाशवाणी, मुद्रित माध्यमे, सेन्सॉरशिप या माध्यमातून पन्नासेक वर्षे लोकांचे ब्रेनवॉश सुरू होते की. आता आंतरजाल, सामाजिक माध्यमे वगैरे असल्याने लोकांना वस्तुस्थिती समजायला लागली आहे.