अजित पवार, धरण आणि धमकी
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व आज पुन्हा "बोललं". पाणी प्रश्न सोडवायचा आहे ना? मग सुप्रिया सुळेंनाच मतदान करा. तसं नाही केलं तर तुमच्या गावचं पाणीच बंद करू, अशी धमकी अजित पवार यांनी दिल्याचं वृत्त आज 'मुंबई मिरर'नं दिलं. काकांचा "विनोद" ताजा असतानाच पुतण्याच्या नवीन वाचाळतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस् ची पुन्हा दातखीळ बसली आहे.
'एखाद्या गावानं माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात जाऊन मतदान केल्यानं ती काही निवडणूक हरणार नाही. मात्र मला जर समजलं की मासाळवाडी गावाने पक्षाच्या विरोधात मतदान केलं तर गावाला पाणी मिळणार नाही, हे लक्षात ठेवा' असं हे महाशय म्हणाले.
महाराष्ट्र टाईम्स च्या वृत्तानुसार 'भारतीय लष्करात जवान असलेल्या संदीप ठोंबरे यांनी २००६ मध्ये पक्षाकडून पाणी प्रश्न सोडवला जाईल असे वचन देण्यात आल्याची आठवण करून दिली. यानंतर अजित दादांनी त्याला तुरुंगाची हवा खावी लागेल, असे धमकावले'.
धरणाचे पाणी वाढवण्याची अभिनव योजना सादर केल्यानंतर अजित दादांनी एक मानभावी उपोषण केलं होतं. आता ही धमकी पहाता माध्यमे याचा सक्रीय पाठपुरावा करणार हे निश्चित. सकाळ मध्ये मात्र ही बातमी 'अजितदादांच्या बदनामीचे षडयंत्र' अशा प्रकारे दिली गेली आहे.
प्रतिक्रिया
दादागिरी
...
या मुजोर लोकांना सत्तेतून दूर करणं हा एकमेव मार्ग आहे
माझे प्रांजळ मत
खरे जनतेचे सेवक!
काय करणार जनता.....
जनतेने असल्या माजोरड्या नेत्यांना मतपेटीतून पेकाटात लाथ घालून उकिरड्यावर फेकावे.जनतेच्या पायात निवडणुकांपुरत्या पैशाच्या बेड्या घातल्यावर जनता कशाला त्यांना लाथा मारतेय. मुळात ह्या आणि अशा अनेक नेत्यांनी इतक्या वर्षात आपल्या जनतेचे पद्धतशीर ब्रेन वॉशिंग करुन त्यांची दुरचा विचार करण्याची मतीच कुंठीत करुन ठेवली आहे. जनतेला काहीही कळत नाहीये आता.नैसर्गिक साधनसंपत्ती ,
व्हॉट्स अॅपवरचा विनोद
>>> काकासाहेब, विठ्ठ्लरावांचा
अगदी
>>> बरोबर बोल्लास.अगदी सह
ईश्श
>>> ईश्श ,हे काय विचारणे झाले
हम्म
काइ राव, कै च्या कै चुकीच्या
आयला, लोकांच्या विचाररसरणीचं नवल वाटतं
वर प्रतिसाद देणारे फक्त
उपरोध असेल असं वाटलं होतं पण प्रकरण गंभीर आहे
अबकड असा आहे आणि हळक्षज्ञ तसा
सं.क्षी. आणखी एक राजकारणाच
सोडून द्या हो माहितगार साहेब.
+१
भारी!
सोडली, सोडली :)
ज्योक ऑफ द डे
>>>मला वाटतं चर्चा
आपण का गप्प बसता त्याचं कारण फक्त
लो कर लो बात!
जाउंद्या संजय सायेब ! मी काय
>>>>> परिस्थिती जरा जास्तच
मायन्यात खास नामनिर्देश करून
= ) ) हे तिन्ही स्पेस न दे ता
अनेक धन्यवाद.
हेच सर्व लोकांना कळण्यासाठी
हा वर माझा इथला पहिलाच
अगदी बरोबर
हा पहा विडिओ
सिनेमात जे दाखवतात ते अगदीच
सत्तेची मस्ती अजुन काय ?
बीडची बातमी
रामराज्यात?
एक शक्यता...
राजकारणात काहीही अशक्य नाही.
अर्थात राजकारण एवढ्यावरच असेल
आता प्रतिसाद मायना रिकामा ठेवून लिहीतो!
एक अवांतर प्रश्न