Skip to main content

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शुक्रवार, 05/03/2021 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात जवळपास २०० प्रतिसाद होत आले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या कलकत्ता शहरातील भवानीपूर या विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुक न लढवता पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविणार आहेत. एखादा माणूस इरेला पेटला तर तो कशी चूक करतो याचे हे एक उदाहरण आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बंगालमधून तृणमूल काँग्रेसला २२, भाजपला १८ तर काँग्रेसला २ लोकसभेच्या जागा मिळाल्या. भाजपची राज्याच्या मध्य आणि उत्तर भागात कामगिरी खूपच चांगली होती. पण राज्याच्या दक्षिण भागात तृणमूलने विजय मिळवला होता. विकीपीडीयावरून घेतलेल्या या नकाशावरून आपल्याला अधिक चांगली कल्पना येईल. bengal या नकाशात चौकटीत कलकत्ता शहरातील लोकसभा मतदारसंघ आहेत तर ३० आणि ३१ क्रमांकाचे अनुक्रमे तामलूक आणि कंठी मतदारसंघ आहेत. तर १९ आणि २० क्रमांकाचे अनुक्रमे जॉयनगर आणि मथुरापूर हे लोकसभा मतदारसंघ आहेत. या सगळ्या दहाच्या दहा मतदारसंघांमध्ये २०१९ मध्ये तृणमूलने विजय मिळवला होता. यावरून बंगालचा दक्षिण भाग तृणमूलसाठी किती महत्वाचा आहे याची कल्पना येईल. तामलूक मतदारसंघातून २००९ आणि २०१४ मध्ये तृणमूलचे नेते शुभेंदू अधिकारी जिंकले होते. ते २०१६ मध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून बंगाल विधानसभेवर निवडून गेले आणि ममतांच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले. २००६ मध्ये सिंगूर आणि नंदीग्राम मध्ये जमिन संपादनाविरूध्द ममतांनी लढा उभा करून नंतर डाव्यांची ३४ वर्षे जुनी राजवट जमिनदोस्त करून टाकली होती. त्या नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी आंदोलनात पुढे होते. २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी चांगली ६७% मते घेऊन दणदणीत विजय मिळवला होता. हा नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ शुभेंदू अधिकारी पूर्वी निवडून गेले होते त्या तामलूक लोकसभा मतदारसंघात येतो. शुभेंदू अधिकारी विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्या जागेवर शुभेंदूंचे बंधू दिब्येंदू अधिकारी पोटनिवडणुकीत निवडून आले. तामलूकच्या शेजारी असलेल्या कंठी लोकसभा मतदारसंघातून २००९ पासून शुभेंदू-दिब्येंदू या बंधूंचे वडील शिशिर अधिकारी लोकसभेवर निवडून येत आहेत. तेव्हा सांगायचा उद्देश म्हणजे नकाशात दाखविलेल्या ३० आणि ३१ या मतदारसंघांच्या क्षेत्रात या अधिकारींची पकड चांगली आहे. त्याच मतदारसंघांच्या बाजूला असलेल्या ३४ (मेदिनीपूर- पूर्वीचे मिदनापूर) मतदारसंघातून भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष २०१९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. त्या बाजूलाच असलेल्या ३३ (झारग्राम), ३५ (पुरूलिया), ३६ (बांकूडा) आणि ३७ (विष्णूपूर) या लोकसभेच्या जागाही भाजपनेच जिंकल्या होत्या. या सगळ्या जागा राज्याच्या मध्य आणि पश्चिम भागातील आहेत. डिसेंबर २०२० मध्ये या शुभेंदू अधिकारींनी ममतांच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. त्यामुळे भाजपला २०१९ मध्ये राज्याच्या ज्या दक्षिण भागातून फार यश मिळाले नव्हते त्या भागात या अधिकारींच्या मदतीने हातपाय रोवायची संधी भाजपला मिळणार आहे. अशावेळी ममता बॅनर्जी इरेला पेटून शुभेंदू अधिकारींविरूध्द त्यांच्या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत. हा मतदारसंघ आणि आजूबाजूचा तामलूक लोकसभा मतदारसंघात येणारा भाग या अधिकारींचे प्रभावक्षेत्र आहे. तसेच बाजूलाच पश्चिमेला भाजपचे प्रभावक्षेत्र आहे. अशावेळी इरेला पेटून स्वतःचा हक्काचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघ सोडून आपल्या प्रतिस्पर्ध्याविरूध्द लढायला त्याच्याच प्रभावक्षेत्रात ममतांनी जायची काही गरज आहे का? खरं तर मुख्यमंत्री वगैरेंना स्वतःच्या मतदारसंघाची कधी काळजी नसते त्यामुळे ते राज्याच्या इतर भागात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करायला मोकळे असतात. आणि तृणमूल काँग्रेस मते ममतांच्या नावावर मागणार असेल तर स्वतः ममतांनी प्रचारात मोठा भाग घ्यायला हवा. अर्थात बंगालमध्ये ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे तेव्हा नंदीग्राममध्ये नक्की कधी मतदान होणार आहे हे बघायला हवे. पण निदान काही दिवस तरी ममता आपल्याच मतदारसंघात अडकणार आहेत. त्यातून शुभेंदू अधिकारींनी ममतांना हरवले तर ममतांच्या भविष्यातील राजकारणाला मोठा धोका पोहोचेल. आणि ममता जिंकल्या तरी त्याची किंमत मोठी भरावी लागणार आहे. वास्तविक पक्षाचे सर्वोच्च नेते आपल्याला गमावण्यासारखे फार काही नसेल तरच अशा मोठ्या लढाया लढायला जातात. उदाहरणार्थ राममनोहर लोहियांनी जवाहरलाल नेहरूंविरूध्द निवडणुक लढवली होती किंवा केजरीवालांनी शीला दिक्षित यांच्याविरूध्द निवडणुक लढवली होती. असे असताना इतके इरेला पेटायचे कारण समजत नाही. बघू पुढे काय होते ते. घोडामैदान जवळच आहे.

वाचने 46920
प्रतिक्रिया 164

प्रतिक्रिया

कांग्रेस का कामुनिस्ट? टाटाला विरोध केला त्यात फायदा राजकीय का आर्थिक?

खरं तर १४०+ प्रतिसाद झाल्यानंतर १५० प्रतिसाद होण्यापूर्वी नवीन धागा सुरू केल्यास नवीन पानावर प्रतिसाद जाणार नाहीत.

काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानींंच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ मिळाली होती. ती स्कॉर्पिओ चोरीची होती असे नंतरच्या तपासात निष्पन्न झाले होते. जैश उल हिंद नावाच्या संघटनेने ती गाडी ठेवल्याचे एका सामाजिक माध्यमातील पोस्टवर कोणी तरी लिहिले होते. नंतर या संघटनेने त्यात आपला हात असल्याचे नाकारले. काल रात्रीपासून गाडीचा मालक मनसुख हिरेन बेपत्ता होता व आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला. एकंदरीत हे प्रकरण बरेच रहस्यमय दिसते. संजय राठोड प्रकरणातील धुरळा खाली बसण्याच्या आतच भाजपच्या हातात नवे प्रकरण आले आहे.

मुकेश अंबानी ह्यांच्या घराबाहेर स्फोटकानी भरलेली गाडी सापडली होती, त्या गाडीच्या मालकाचा मृतदेह ठाणे येथे रेतीबंदर खाडीत सापडला. गाडी १७ तारखेला चोरी झाली होती. 'स्टीयरिंग व्हील जॅम झाले होते म्हणून गाडी तशीच सोडुन मी दुसर्या दिवशी पाहतो तर गाडी नव्हती' असा खुलासा हिरेन ह्यांनी टी.व्हीवर दिला होता. आता स्टीयरिंग व्हील जॅम झालेली गाडी दुरुस्त केली व नंतर चोरी केली? https://www.businesstoday.in/current/economy-politics/mansukh-hiren-who…

आणि प्रतेक जन न्यूज वाचत असतो परत त्या लिंक वाचायचा कंटाळा येतो. न्यूज chya लिंक देण्या पेक्षा स्वतःची मत काय आहेत ते मांडा ती तुमची मतं वाचायला आवडतील. मीडिया trial मध्ये कोणालाच इंटरेस्ट नाही

Rate Cut प्रति युनिट सरासरी २ पैशांची दणदणीत कपात केल्याबद्दल महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील जनतेचे हार्दीक अभिनंदन!!!

In reply to by सॅगी

शेतकरी वर्गाच्या तोंडाला पाने पुसून झाली आहेत, आता सामान्य माणसासाठी, वीज दरात कपात केली आहे... शांतपणे आयुर्वेदिक कोंबडी खा आणि बरे वाटत नसेल तर,कंपाउंडर कडून औषध घ्या.करोना समोरून हल्ला करतो, त्याची काळजी घ्या...

आज तब्बल १० हजारावर नवीन रुग्णांची भर https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-report… आता जबाबदार कोण? आधी म्हणाले की, तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो...

In reply to by मुक्त विहारि

आपली जबाबदारी आपणच घ्यायची.... . . . "ते" फक्त दसरा मेळाव्यातली भाषणे सगळीकडे देणार, "त्यांची" जबाबदारी तेवढीच...

सुशांतसिंग राजपूत प्रकरण, धनंजय मुंडे प्रकरण याप्रमाणे मनसुख हिरेन या प्रकरणातूनही भाजपच्या हाती फारसे काही लागण्याची शक्यता नाही.

In reply to by श्रीगुरुजी

हाती लागणे वगैरे महत्वाचे नसते.सक्षम विरोधी पक्षाची भूमिका भाजप पार पाडते आहे. ते महत्वाचे आहे. शिवाय जनतेला लक्षात येते आहे की कायदा आणि सुव्यवस्था राज्यात काडीमात्र उरलेली नाही.

In reply to by पिनाक

भाजप करतोय तो सक्षम विरोध वगैरे नसून ठाकरेंना अडचणीत आणणे व हे सरकार पाडणे हा एकमेव उद्देश त्यामागे आहे. सुशांतसिंह रजपूत प्रकरणात भाजपने आदित्य ठाकरेचा संबंध जोडून आकाशपाताळ एक करून ठाकरेंना अडचणीत आणण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यामागे हाच एकमेव उद्देश होता. पण तो प्रयत्न पूर्ण फसला. पालघर साधू हत्याकांड, धनंजय मुंडे ही प्रकरणे सुद्धा पूर्ण फसली. संजय राठोडने चुका केल्या नसत्या तर ते प्रकरण सुद्धा फसले असते. मुळात या प्रकरणातील विरोधामागे भाजपची भूमिका प्रामाणिक विरोधाची नाही हे जनता सुद्धा ओळखून आहे. केवळ विरोधासाठी विरोध करण्यासाठी भाजप फुसक्या प्रकरणात आकांडतांडव करीत आहे. मागील संपूर्ण वर्षात मुलांच्या शिक्षणाची पूर्ण वाट लागली आहे. महाविद्यालयांंच्या परीक्षा, स्पर्धापरीक्षा, महाविद्यालयातील प्रवेश हे पूर्ण ठप्प आहेत. अशा खऱ्याखुऱ्या समस्यांवर भाजपने भूमिका घेतली तर नक्कीच उपयोग होईल. परंतु भाजपला खऱ्या समस्यांंवर बोलण्याऐवजी अशा सनसनाटी प्रकरणात तेल ओतून ठाकरेंना अडचणीत आणण्यातच रस आहे. परंतु त्याच्याशी जनतेला घेणेदेणे नाही.

In reply to by श्रीगुरुजी

शिवसेना स्वतः होऊन आपली, मराठी आणि हिंदुत्वाची, कवचकुंडले उतरवत असतांना, कोण झाकायला जाईल? भाजप फक्त ती कवचकुंडले उतरलेली दाखवत आहे... पुढच्या प्रत्येक निवडणूकीत, शिवसेनेला कॉंग्रेस फरफटत नेणार... मुंबई महानगर पालिकेत समजेलच...

In reply to by मुक्त विहारि

पुढील निवडणुकीत कदाचित शिवसेनेला प्रचंड तोटा होईल पण भाजपला जास्त काही फायदा होणार नाही.राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांनाही अतिरिक्त फायदा मिळेल असे वाटते. हे म्हणजे पंचतंत्रातल्या आपल्या बेडुक जातभाईंना धडा शिकवायला सापाला बोलावणे धाडण्यासारख्या गोष्टीसारखे झालेय.

In reply to by कानडाऊ योगेशु

पुढील निवडणुकीत कदाचित शिवसेनेला प्रचंड तोटा होईल पण भाजपला जास्त काही फायदा होणार नाही.
तसे होईल असे वाटते. भाजप ११५-१२० पर्यंत गेल्यास आणि सेना १५-२० मध्ये आटोपल्यास परत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येऊन राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनू शकतो. शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनलेला कधीही परवडले. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे १५ वर्षे सरकार होते पण सरकारविरोधात बोलल्यास नेव्ही अधिकार्‍याला मारहाण होणे, जेसीबी आणणे वगैरे प्रकार कधी घडलेले नव्हते. शिवसेनेचे अस्तित्व हाच महाराष्ट्राच्य राजकारणाला लागलेला कलंक आहे. तो लवकरात लवकर मिटायला हवा. इतकी वर्षे वाजपेयी-अडवाणी शिवसेनेला महत्व देत होते म्हणून शिवसेना कधीच आवडत नसतानाही शिवसेनेचे समर्थन करावे लागत होते. नशीबाने शिवसेना उमेदवाराला मत द्यायचा प्रसंग कधी आला नाही. मला वाटते एम.आय.एम/मुस्लिम लीग/पीडीपी वगैरे पक्षच फक्त शिवसेनेपेक्षा वाईट आहेत बाकी कोणताही पक्ष शिवसेनेपेक्षा चांगलाच आहे. त्यामुळे दगडापेक्षा वीट मऊ म्हणून राष्ट्रवादीचे सरकार आलेले कधीही परवडेल. काँग्रेसचे इतके वर्षे मुख्यमंत्री असताना राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर ठाकरेंनी जे किळसवाणे भाषण करून लाज आणली तसे कधी केले नव्हते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मुंबई आणि ठाणे, आणि थोड्या प्रमाणात, कोकणांत आहे.... त्यामुळे आता, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे कठीण आहे.... मुख्यमंत्री पदाची एक वेगळी भाषा आणि देहबोली असते, हे शिवसेनेला कधीच समजणार नाही...

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवसेना हा किळसवाणा पक्ष झालेला आहे. आता भाजप ने शिवसेनेबरोबर युती केली तर मी राष्ट्रवादी ला मत देईन. आणि जर काँग्रेस चा candidate उभा असेल तर मग नोटा.

In reply to by मुक्त विहारि

नोटा हा कधीही उत्तम पर्याय ठरु शकत नाही कारण नियमानुसार नोटाची मते जास्त असतील तर दुसर्या क्रमांकाच्या उमेदवाराला विजेता घोषित केले जाते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवसेनेचे अस्तित्व हाच महाराष्ट्राच्य राजकारणाला लागलेला कलंक आहे. + ९९९९९९९९ . . . हा कलंक १९८९ पर्यंत मुंबईतील काही प्रभागांपुरता मर्यादित होता. परंतु संपूर्ण महाराष्ट्राच्या भाळी हा कलंक वारंवार थापण्याचा अपराध भाजपचाच आहे.

In reply to by श्रीगुरुजी

संपूर्ण महाराष्ट्राच्या भाळी हा कलंक वारंवार थापण्याचा अपराध भाजपचाच आहे.
नक्कीच. याबद्दल भाजप नेत्यांनी खरं तर महाराष्ट्राची जाहीर माफी मागायला हवी.

In reply to by श्रीगुरुजी

पण ज्या लेव्हल वर जाऊन शिवसेनेला शिव्या द्यायचा कार्यक्रम या धाग्यावर चालू झालाय , जर कुण्या सेनेच्या नेत्याने पाहिले तर मिसळपाव अडचणीत येऊ नये , भलेही मिपा सर्वांसाठी खुले आहे , आपली मते मांडू शकतात , पण ते सेनेचे अक्कलशुन्य नेते आहे , ते एका ऑफिसर च्या कानफाटात देऊ शकतात तर काहीही करू शकतात , (आमची बापुडी शंका दुसरे काय )

In reply to by स्वलिखित

आयला म्हणजे मोदीना जाहीर शिव्या घातल्या तेव्हा कोणी मारायला येणार नव्हते वाटते? इतक्या थराला हे प्रकरण जाईल असे वाटले नव्हते.

In reply to by आनन्दा

असांसदीय शब्दांची यादी जाहीर झालीय , पप्पू , दीदी , बालबुद्धी , कुटुंब, भैया अशा शब्दावर संसदेत बंदी घातलीय , त्यामुळे राहुल ला( राहुल्याला) कोणत्या शब्दाने संबोधित करावे हा प्रश्न गोची करतोय , मोदी गरीबय ओ , 1. हाय हाय मोदी मर जा तू म्हणले तरी तो गप्प बसतो ,

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तसे होईल असे वाटते. भाजप ११५-१२० पर्यंत गेल्यास आणि सेना १५-२० मध्ये आटोपल्यास परत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येऊन राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनू शकतो. सेना एकटी लढली तर १५-२० पर्यंतच जाऊ शकते. परंतु सद्यस्थितीत भाजप युती करूनही तीन अंंकी आमदार निवडून आणू शकणार नाही. एकटा लढला तर सद्यस्थितीत भाजप फार तर ६० पर्यंत जाईल. मागील ३-४ वर्षात भाजपने आपले बरेच हक्काचे मतदार दुखावले आहेत. ते परत भाजपकडे आणण्यासाठी काही काळ लागेल व त्यासाठी महाराष्ट्रात नेतृत्वबदल करणे आवश्यक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सेना एकटी लढली तर १५-२० पर्यंतच जाऊ शकते. परंतु सद्यस्थितीत भाजप युती करूनही तीन अंंकी आमदार निवडून आणू शकणार नाही. एकटा लढला तर सद्यस्थितीत भाजप फार तर ६० पर्यंत जाईल.
आकड्यांचा मेळ लागत नाही. समजा भाजप ६० आणि सेना २० असे धरले. तसेच अपक्ष आणि इतर लहान पक्ष यांचे ३० आमदार धरले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी वगळून ११० आमदार होतील. म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीला १७५-१८० जागा मिळतील असे म्हणायचे आहे? या दोन पक्षांना मिळून १९९९ मध्ये १३३, २००४ मध्ये १४० आणि २००९ मध्ये १४४ जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला/आघाडीला १८० जागा गेल्या ४० वर्षात एकदाही मिळालेल्या नाहीत. शिवसेना-भाजप युती यापुढे होणार नाही असे गृहित धरले तरी गेल्या सव्वा वर्षात घातलेल्या नंगानाचामुळे शिवसेनेचे हक्काचे मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपकडे वळतील असे वाटते. त्याप्रमाणेच भाजपचे मतदार कितीही दुखावले असले तरी फार तर मत देणार नाहीत किंवा नोटाला मत देतील पण काहीही झाले तरी शिवसेनेला किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीला मत देणार नाहीत. तसेच अनेक वर्षे युतीमुळे शिवसेनेला दिले गेलेले कोथरूडसारखे मतदारसंघ भाजपने २०१४ मध्ये जिंकले होते. अशा अनेक मतदारसंघांमध्ये भाजपमुळे शिवसेनेला फायदा होत होता पण ती मते भाजप उमेदवारांनाच मिळतील. तेव्हा भाजप ६० मध्ये आटपेल हे मला तरी शक्य वाटत नाही. बघू काय होते ते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सद्यस्थितीत भाजप व सेना हे दोघेही स्वबळावर लढले तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती किमान बहुमत मिळवेल हे नक्की. १७५-१८० पर्यंत जाण्याची शक्यता बरीच कमी आहे. २०१९ मध्ये भाजप-सेना युतीला १६१ जागा होत्या. मधल्या २५-३० जागांचा फरक हा निवडणुकीच्या वेळी मनसे, सप, शेकाप सारखे लहान पक्ष कोणाशी युती करतील त्यावर ठरू शकेल. लागोपाठ २ निवडणुकीत पूर्ण वाट लागल्याने मनसे आता एकटे लढतील असे वाटत नाही. १९९५ मध्ये भाजप-सेना युतीला १३८ तर कॉंग्रेसला ८० जागा होत्या. उर्वरीत ७० जागा या शेकाप, जनता दल, सप, अपक्ष अशा अनेकांमध्ये विभागल्या गेल्या होत्या. पुढील निवडणुकीत लहान पक्षांचा वाटा तुलनेने बराच मोठा असू शकतो. २००९ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी युतीला १४४ जागा होत्या. पण त्यावेळी सेना व भाजप युती होती. पुढील निवडणुकीत भाजप व सेना एकटे लढतील असे आतातरी वाटत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती नक्की असणार. अशा परिस्थितीत या युतीला सर्वाधिक जागा मिळतील हे नक्की. कोणाला नक्की किती जागा मिळतील याचा अंदाज प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळीच येईल.

In reply to by श्रीगुरुजी

तुमची काय अपेक्षा होती की मागच्या प्रत्येक प्रकारणावेळी सरकार पडेल? असं कुठं होत असतं का राव? प्रकरण फसली म्हणजे नेमकं काय झालं? थोडक्यात तुमची अपेक्षा असावी की अशाच प्रकरणात भाजप ने बोलावे ज्याने त्यांना सत्ता मिळेल नाहीतर बोलू नये आणि माझ्या मते ही विचित्र अपेक्षा आहे.

In reply to by बिटाकाका

सगळे पक्ष आपापली पोळी भाजून घेत आहेत 1. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने, शिवसेनेला उदारमतवादी बनवले 2. भाजप, विरोधी पक्षाची भुमिका व्यवस्थित मांडत आहे 3. 80% जनता, आपण शिवसेनेला मत दिले नाही, हे योग्यच केले, असे समजत आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळाले पण, अर्थखाते आणि गृहमंत्री खाते, ही महत्वाची खाती, शिवसेनेकडे नाहीत... आता शिवसेनेची मदार फक्त हाॅटेल्स आणि बाॅलीवूड, यांच्यावरच अवलंबून आहे.. पण तिथेही, इतर पक्षांचा सहभाग आहेच.... आता शिवसेनेची मदार आहे ती फक्त, फेरीवाले, रिक्षा संघटना आणि इतर संघटीत मतदारांवर, मराठी आणि हिंदू, असंघटीत मतदार शिवसेनेला मत देण्याची शक्यता कमीच आहे...

In reply to by बिटाकाका

प्रकरणे फसली म्हणजे प्रचंड जोर लावूनही प्रकरणातून काहीही निष्पन्न झाले नाही. भाजपने खऱ्याखुऱ्या समस्यांवर बोलावे. अशा फालतू प्रकरणात ताकद वाया घालवू नये, अशी माझी अपेक्षा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

भाजप खऱ्याखुऱ्या समस्यांवर तर बोलतच आहे त्याव्यतिरिक्त ही अशी एरवी सहज दडपली गेली असती अशी प्रकरणे उचलून धरून जो द्यायचा तो योग्य संदेश देत आहे असे मला वाटते. विरोधी पक्षाचे ते कामच आहे. युसलेस मीडिया ने घातलेला गोंधळ आणि भाजप ने अधिकृत रित्या लावून धरलेले मुद्दे यात गल्लत करू नये असे मला वाटते. फडणवीस हे दुसऱ्यांदा अतिशय उत्तमपणे विरोधी पक्षनेतेपद सांभाळत आहे असे माझे मत आहे.

Corona च्या नावाखाली प्लॅटफॉर्म तिकीट दर प्रचंड वाढवले आहेत आता प्लॅटफॉर्म तिकीट दर ५० रुपये केला आहे. खासगी रेल्वे सारखे exp train मधील ज्येष्ठ नागरिक किंवा बाकी लोकांना मिळणाऱ्या तिकीट दरातील सुविधा बंद केल्या आहेत. गुपचूप रेल्वे चे खासगीकरण तर करण्याचा सरकार चा डाव नाही ना.

In reply to by आग्या१९९०

काही रेल्वे मार्गावर खासगी रेल्वे गाड्या धावायला पण लागल्या. एकदम केले की विरोध होईल म्हणून हळू हळू चालू आहे. लोक covid मध्ये अडकली आहेत त्याचा फायदा घेणे चालू आहे

In reply to by Rajesh188

मला खात्री आहे .. तुम्ही .. प्रायवेट चानेल न बघता दुरदर्शन बघत असाल. प्रायवेट कंपणीची गाडी न वापरता आंबेसिडर वापरत असाल प्रायवेट बँके ऐवजी एस बी आइ मधे बन्किन्ग करत असाल प्रायवेट नेट ऐवजी एम्टीएनेल / बीएसएनएल वापरत असाल प्रायवेट होस्पिटल ऐवजी सरकारी दवाखाना वापरत असाल ... रामदास स्वामींची ती गोष्ट माहीत आहे ना ज्यात एक माता आपला मुलगा खुप गूळ खातो असे सांगत होती ? तेव्हा आधी प्रायवेट जे काही असेल ते वापरणे सोडा. . . .मग बोला ...

सचिन वाझे नामक अधिकारी अम्बानी प्रकरणात तपास करत होता. हा सचिन वाझे कोण? ६०-६५ एन्काऊन्टरमध्ये सहभागी असलेला हा गृहस्थ 'एन्काउन्टर स्पेशालिस्ट' म्हणून ओळखला जायचा. २००२ साली घाटकोपर येथे बेस्ट बस स्फोटात 'ख्वाजा युनुस' ह्या संगणक अभियंत्याला अटक करण्यात आली होती. तपासात त्याला थर्ड डिग्री देउन नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे 'शौर्य' ज्यानी दाखवले त्यात सचिन वाझे होता. न्यायालयाने मग त्यांच्यावर कारवाई केली होती. २००८ साली रामदास कदम ह्या शिवसेना नेत्याचा ड्रायव्हर बनण्याचे कामही ह्या वाझेसाहेबानी केले होते. २०१९ मध्ये नविन सरकार आल्यावर ह्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले. असो. तर असा हा 'कर्तबगार' अधिकारी हिरेन मनसुख ह्यांच्याबरोबर बराच काळ संपर्कात असल्याचे पुढे आले आहे. हिरेन मनसुख काही दिवसापुर्वी क्रॉफर्ड मार्केट येथे एका व्यक्तीला भेटला. त्या व्यक्तीचे नाव जाहीर करा अशी मागणी फडणवीस ह्यानी केली आहे. क्रॉफर्ड मार्केट येथे हिरेन मनसुख कशासाठी गेले? क्रॉफर्ड मार्केट येथे पोलिस मुख्यालय आहे! https://www.indiatoday.in/india/story/khwaja-yunus-murder-case-encounte…

मनसुख हिरेन प्रकरण गुंतागुंतीचे दिसतय. हिरेन मनसुख ह्यांचा गाडी-डेकॉरचा धंदा होता. नेमकी ह्यांची गाडी चोरीला जावी हा योगायोग समजायचा का? हे सचिन वझे मुंबईतील अधिकारी पण हिरेन ह्यांचा मृत्यु झाल्यावर हे अधिकारी मुंबईतून ठाण्यात गेले व ह्या प्रकरणात रस घेउ लागले. आता हे प्रकरण ए.टी.एस.कडे गेले आहे.

The फ्रीडम हाऊस च्या अहवालात भारताला स्वतंत्र देशाच्या यादीत खाली आणून 'आंशिक स्वतंत्र ' देशाच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. शेवटी भारताचे जगात नाव करून दाखवले च. 'मोदी हे तो मुणकिन hai'

शेतकरी आंदोलकांच्या आंदोलनाचा आज शंभरावा दिवस. प्रसिद्धी माध्यमांमधे शेतकरी आंदोलनाची धग कुठेच दिसणार याची पुरेपुर काळजी सरकार घेत आहे, त्यामुळे केवळ युट्यूब आणि सोशियल मिडियाद्वारे या आंदोलनाची माहिती येत असते. सत्य लपवून ठेवता येत नाही. भविष्याचा अंदाज येत नसतांनाही संघर्षाच्या निर्धारावर ठाम असल्याचे दिल्लीच्या पाच सीमांवर सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनाचे हे चित्र आहे. शंभराव्या दिवसापर्यंत मोदीसरकार हलले नसले तरी, शेतक-यांचा निर्धारही ढळलेला नाही. कृषी कायदे रद्द करण्यासाठी आणखी किती दिवस आंदोलन करावे लागेल याचा कोणताही अंदाज आंदोलकांना नसेल, एकदा असे आंदोलन मोडून काढल्या गेले, त्याकडे दुर्लक्ष झाले तर येत्या काळात कोणतेही आंदोलन असेच सरकार दडपून टाकेल, २८७ च्या जवळपास शेतक-यांना आपल्या जीवाला गमवावे लागले (संख्या संदर्भ दै. लोकसत्त्ता) आणि अशा वेळी आंदोलन थांबले तर, देशात असे आंदोलन पुन्हा कधीच उभे राहणार नाही, ही जाणीव शेतकरी आंदोलकांना असल्यामुळे ते सहजासहजी मागे हटणार नाहीत असे चिन्ह आहेत, एक भारतीय म्हणून त्याच्या लढ्याला-संघर्षाला आपला कडक सॅल्यूट आहे. २६ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या या आंदोलनात अनेक वळणे आली. सरकारसोबत ११ पेक्षा अधिक चर्चेच्या फे-या झाल्या. कडाक्याची थंडी, पाण्याचे फवारे, रस्त्यात रोवलेले खिळे, प्रजासत्ताकदिनी आंदोलन बदनाम करण्याचा झालेला प्रयत्न, त्यामुळे तर आंदोलनाचे कंबरडे मोडल्याचे चित्र निर्माण झाले होते, पोलिसांनी घेराव घालून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला. अनेक शेतक-यांवर गुन्हे दाखल केले. तंबु उखडून फेकले, लंगर बंद केले. वीज बंद केली, पाणी बंद केले. शौचालये हटवली. मारहाण केली. खोटे समर्थक आणून आम्हाला शेतक-यांच्या आंदोलनाचा त्रास होत आहे, त्यांना हटवावे असे खोटे बोलणारे लोक उभे केले. तरीही आंदोलकांनी हळुहळु आपला जम बसवला. सरकारने साम-दाम-दंड भेद नितीचा वापर केला पण दिल्लीच्या सीमेवर सिंधु-गाझीपूर-टीकरी, शाहाजनपूर, ढासा सीमेवर बसलेले शेतकरी हलले नाहीत. चाळीसपेक्षा अधिक संघटनामधे फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, तोही प्रयत्न यशस्वी झाला नाही. शेतकरी समर्थक अजून एकजूट झाले, शक्ती वाढली, सरकारने शेतकरी आंदोलकांवर केलेला अन्याय लाखो लोकांनी पाहिला तीच शक्ती या आंदोलकांची झाली. आता आंदोलकांनी आपल्या आंदोलनाचे डावपेचही बदलत असल्याचे लक्षात येत आहे. सरकारने शेतकरी आंदोलकांशी २२ जानेवारीपासून संवाद बंद केल्यानंतर, एक कॉल की दुरी या निव्वळ सरकारच्या बाता आहेत हे आंदोलकांना माहिती आहे, तेव्हा सरकारवर दबाव आणन्यासाठी जेलभरो आंदोलन, संसदेस घेराव, पाकच्या अटारीसीमेपासून ते सिंधु सीमेपर्यंत मानवी साखळी उभारणे, आमरण उपोषण करणे यासारखा उपायांवर आंदोलन अधिक तीव्र करण्यावर किसान मोर्चा विचार करणार आहे. आंदोलनात २६ जानेवारीच्या हिंसाचारामुळे आंदोलनाने सहानुभूती गमावली असे चित्र निर्माण केले गेले पण टीकैत यांचा अश्रुंचा बांध फुटला आणि पुन्हा आंदोलनात जान भरल्या गेली. पंजाबच्या शेतक-या नंतर जाट आणि गुजर समुदायाचा सहभाग वाढला. आज शेतक-यांची संख्या रोडावली असली तरी आंदोलनाच्या भविष्यावर फरक पडणार नाही. शेतकरी कापणी करुन पुन्हा मोठ्या संखेने आंदोलनात पुन्हा सहभागी होतील. आंदोलकांनी आंदोलनाचे स्वरुप बदलले आहे, दिवसभर भाषणे चालू असतात. आंदोलनाला देशातील ४४ गुरुद्वाराच्या प्रबंधन समित्यांकडून पूर्ण पाठबळ लाभलेले आहे. गुरुद्वारांच्या लंगरच्या माध्यमातून नाश्ता, भोजनाची व्यवस्था होत आहे. तंबूंची काळजी, वीजेची सोय, स्वच्छ स्नानगृहे, या सर्वांची व्यवस्था गुरुद्वारा प्रबंधन समितीकडून केली जात आहे. आंदोलकांची संख्या वाढली की व्यवस्था काही काळासाठी विस्कळीत होते आणि पुन्हा एक दोन दिवसानंतर ती व्यवस्था पूर्वपदावर येते. मोफत पुस्तके, पुस्तके स्टॉल, वृत्तपत्रे, मोबाईल चार्जींग व्यवस्था तिकडे असते. वीज-पाण्याची व्यवस्था दिल्ली सरकारने केली आहे. टीव्ही, डीटीएच, चर्चा हुक्कापाणी घरच्यांशी संवाद, मनोरंजनासाठी गाणे असा आंदोलनस्थळी माहोल असतो. तिन्ही कायदे रद्द करण्यासोबत किमान आधारभूत किंमतीसाठी कायदा रद्द करण्याची मागणी मान्य झाल्याशिवाय परत जायचेच नाही या निर्धाराने दिल्लीच्या सीमा बाधित करणारे आंदोलन सहजासहजी गुंडाळले जाईल असे चिन्ह आज तरी दिसत नाही. जाता जाता : टाइमच्या मुखपृष्ठावर महिला शेतकरी '' आम्हाला कोणी धमकावू शकत नाही, आम्हाला कोणी खरेदी करु शकत नाही'' या ओळींसह जगप्रसिद्ध 'टाइम' नियतकालिकाच्या मुखपृष्ठांवर दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनकर्त्या महिला शेतक-यांना स्थान मिळाले आहे. प्रतिसाद माहिती संदर्भ : दै. सकाळ, लोकमत, लोकसत्ता आणि टाइम. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेतकरी तर नक्कीच नाहीत... कायदा हातात घेणारा, अस्सल शेतकरी असूच शकत नाही... जो जनावरांसाठी डोळ्यातून पाणी काढतो, तो मानवहत्या कशी करेल?

In reply to by मुक्त विहारि

फारच अपेक्षा करता तुम्ही. शेतकरी कायद्यांमध्ये काय चुकीचं आहे या प्रश्नाचं उत्तर जरी प्राध्यापक महाशयांनी दिलं तरी फार आहे.

In reply to by पिनाक

शेतकरी कायद्यांमध्ये काय चुकीचं आहे या प्रश्नाचं उत्तर जरी प्राध्यापक महाशयांनी दिलं तरी फार आहे.
मोदींनी ते कायदे केले आहेत हेच अशा लोकांच्या मते चुकीचे आहे. असल्या लोकांच्या रोमारोमात मोदीद्वेष इतका भिनला आहे की समजा मोदींनी म्हटले की दररोज सकाळी तिकडे (म्हणजे कुठे ते विचारू नका) जावे तर ते लोक मरायला टेकले तरी तिकडे जायचे नाहीत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"प्रजासत्ताकदिनी आंदोलन बदनाम करण्याचा झालेला प्रयत्न" प्रतीवाद करण्याची ईच्छा नाहीये .. पण प्रजासत्ताकदिनी जे झाले ते लाज वाटावी असेच होते ... त्यामुळे चालु द्या. वर्गणी दिली तरी चालेल ...

In reply to by मुक्त विहारि

सहमत ... रिकामटेकडे लोक असले धंदे करतात. सगळे फुकट मिळते आहे तर गजाली करायला काय जाते ... "मोफत पुस्तके, पुस्तके स्टॉल, वृत्तपत्रे, मोबाईल चार्जींग व्यवस्था तिकडे असते. वीज-पाण्याची व्यवस्था दिल्ली सरकारने केली आहे. टीव्ही, डीटीएच, चर्चा हुक्कापाणी घरच्यांशी संवाद, मनोरंजनासाठी गाणे असा आंदोलनस्थळी माहोल असतो." असले प्रकार आम्ही ग्लँपिंग ला करतो ... च्यायला आंदोलन आहे की टाइमपास?

In reply to by सुक्या

नाहीतर, ह्या आंदोलनाच्या निमित्ताने, ऐश करायला गेलो असतो... ऑगस्ट ते ऑक्टोबर, हा तसा फ्री काळ असतो, तितके दिवस चालले तर, जाऊन यायचा विचार आहे...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेलेल्या म्हशीला मणभर दूध अशी या दलालांच्या आंदोलनाची अवस्था आहे. ते केव्हाच संपले आहे. परंतु बिरबलाच्या मेलेल्या पोपटासारखी यांची अवस्था आहे.

शेतकरी कायदे कसे शेतकऱ्यांचे अहित करतील ह्याची कारणं खूप वेळा सांगून झाली आहेत. तीच परत वाचावीत. ज्यांच्या साठी कायदे करत आहात त्यांनाच ते nako आहेत. जबरदस्ती नी कशाला भले करताय

In reply to by Rajesh188

तुम्हाला कितीतरी वेळा तुम्ही किंवा प्राडॉ नी लेख लिहून सविस्तर उहापोह करा म्हणून सांगितले. पण तुम्ही मुद्देसूद चर्चा करायला कधी येतच नाही. अजूनही सांगतो, आंदोलन आहे आंदोलन आहे म्हणून ओरडण्याचा अगोदर त्या कायद्यात नेमक्या काय चुका आहेत, आणि त्या दुरुस्त करण्यासारख्या आहेत का, असतील तर कश्या, नसतील तर का नाहीत याचा एक सविस्तर लेख लिहा. उगीच प्रच्छन्नपणे बिनबुडाचे आरोप करत फिरू नका.. उगीच नसलेली अजून जाते.

In reply to by Rajesh188

राजेश १८८ शेतकरी कायद्यात काय चुकीचे आहे हे तुम्ही कधीच सांगितलेले नाही .. उगाच गळा मात्र काढताय

In reply to by मुक्त विहारि

तसा तृणमूलमध्ये कोणी चांगला माणूस असेल असे वाटत नाही. बरेचसे सारदा-नारदा चिट फंड घोटाळ्यात गुंतलेले आहेत. त्यातील मुकुल रॉय आणि शुभेंदू अधिकारी यांनी भाजपत प्रवेश केला पण आहे. तरीही दिनेश त्रिवेदी हा त्यातल्या त्यात बरा माणूस आहे असे दिसते. २०१२ मध्ये रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेची तिकिटे एक रूपयाने वाढवल्यावर ममतांनी थयथयाट केला होता आणि त्यांना राजीनामा द्यायला लावला होता. तेव्हा रेल्वेला दुसरी एअर इंडिया बनू द्यायची नाही ही रेल्वेमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे असे बरेच सेन्सिबल विधान त्यांनी केले होते. तसेच ममतांच्या आक्रस्ताळेपणात आणि इतर थयथयाटात डेरेक ओ ब्रायन सारखे सहभागी असतात त्याप्रमाणे दिनेश त्रिवेदी कधी सहभागी असल्याचे वाचल्याचे माझ्या तरी लक्षात नाही.