Skip to main content

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शुक्रवार, 05/03/2021 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात जवळपास २०० प्रतिसाद होत आले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या कलकत्ता शहरातील भवानीपूर या विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुक न लढवता पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविणार आहेत. एखादा माणूस इरेला पेटला तर तो कशी चूक करतो याचे हे एक उदाहरण आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बंगालमधून तृणमूल काँग्रेसला २२, भाजपला १८ तर काँग्रेसला २ लोकसभेच्या जागा मिळाल्या. भाजपची राज्याच्या मध्य आणि उत्तर भागात कामगिरी खूपच चांगली होती. पण राज्याच्या दक्षिण भागात तृणमूलने विजय मिळवला होता. विकीपीडीयावरून घेतलेल्या या नकाशावरून आपल्याला अधिक चांगली कल्पना येईल. bengal या नकाशात चौकटीत कलकत्ता शहरातील लोकसभा मतदारसंघ आहेत तर ३० आणि ३१ क्रमांकाचे अनुक्रमे तामलूक आणि कंठी मतदारसंघ आहेत. तर १९ आणि २० क्रमांकाचे अनुक्रमे जॉयनगर आणि मथुरापूर हे लोकसभा मतदारसंघ आहेत. या सगळ्या दहाच्या दहा मतदारसंघांमध्ये २०१९ मध्ये तृणमूलने विजय मिळवला होता. यावरून बंगालचा दक्षिण भाग तृणमूलसाठी किती महत्वाचा आहे याची कल्पना येईल. तामलूक मतदारसंघातून २००९ आणि २०१४ मध्ये तृणमूलचे नेते शुभेंदू अधिकारी जिंकले होते. ते २०१६ मध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून बंगाल विधानसभेवर निवडून गेले आणि ममतांच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले. २००६ मध्ये सिंगूर आणि नंदीग्राम मध्ये जमिन संपादनाविरूध्द ममतांनी लढा उभा करून नंतर डाव्यांची ३४ वर्षे जुनी राजवट जमिनदोस्त करून टाकली होती. त्या नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी आंदोलनात पुढे होते. २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी चांगली ६७% मते घेऊन दणदणीत विजय मिळवला होता. हा नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ शुभेंदू अधिकारी पूर्वी निवडून गेले होते त्या तामलूक लोकसभा मतदारसंघात येतो. शुभेंदू अधिकारी विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्या जागेवर शुभेंदूंचे बंधू दिब्येंदू अधिकारी पोटनिवडणुकीत निवडून आले. तामलूकच्या शेजारी असलेल्या कंठी लोकसभा मतदारसंघातून २००९ पासून शुभेंदू-दिब्येंदू या बंधूंचे वडील शिशिर अधिकारी लोकसभेवर निवडून येत आहेत. तेव्हा सांगायचा उद्देश म्हणजे नकाशात दाखविलेल्या ३० आणि ३१ या मतदारसंघांच्या क्षेत्रात या अधिकारींची पकड चांगली आहे. त्याच मतदारसंघांच्या बाजूला असलेल्या ३४ (मेदिनीपूर- पूर्वीचे मिदनापूर) मतदारसंघातून भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष २०१९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. त्या बाजूलाच असलेल्या ३३ (झारग्राम), ३५ (पुरूलिया), ३६ (बांकूडा) आणि ३७ (विष्णूपूर) या लोकसभेच्या जागाही भाजपनेच जिंकल्या होत्या. या सगळ्या जागा राज्याच्या मध्य आणि पश्चिम भागातील आहेत. डिसेंबर २०२० मध्ये या शुभेंदू अधिकारींनी ममतांच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. त्यामुळे भाजपला २०१९ मध्ये राज्याच्या ज्या दक्षिण भागातून फार यश मिळाले नव्हते त्या भागात या अधिकारींच्या मदतीने हातपाय रोवायची संधी भाजपला मिळणार आहे. अशावेळी ममता बॅनर्जी इरेला पेटून शुभेंदू अधिकारींविरूध्द त्यांच्या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत. हा मतदारसंघ आणि आजूबाजूचा तामलूक लोकसभा मतदारसंघात येणारा भाग या अधिकारींचे प्रभावक्षेत्र आहे. तसेच बाजूलाच पश्चिमेला भाजपचे प्रभावक्षेत्र आहे. अशावेळी इरेला पेटून स्वतःचा हक्काचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघ सोडून आपल्या प्रतिस्पर्ध्याविरूध्द लढायला त्याच्याच प्रभावक्षेत्रात ममतांनी जायची काही गरज आहे का? खरं तर मुख्यमंत्री वगैरेंना स्वतःच्या मतदारसंघाची कधी काळजी नसते त्यामुळे ते राज्याच्या इतर भागात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करायला मोकळे असतात. आणि तृणमूल काँग्रेस मते ममतांच्या नावावर मागणार असेल तर स्वतः ममतांनी प्रचारात मोठा भाग घ्यायला हवा. अर्थात बंगालमध्ये ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे तेव्हा नंदीग्राममध्ये नक्की कधी मतदान होणार आहे हे बघायला हवे. पण निदान काही दिवस तरी ममता आपल्याच मतदारसंघात अडकणार आहेत. त्यातून शुभेंदू अधिकारींनी ममतांना हरवले तर ममतांच्या भविष्यातील राजकारणाला मोठा धोका पोहोचेल. आणि ममता जिंकल्या तरी त्याची किंमत मोठी भरावी लागणार आहे. वास्तविक पक्षाचे सर्वोच्च नेते आपल्याला गमावण्यासारखे फार काही नसेल तरच अशा मोठ्या लढाया लढायला जातात. उदाहरणार्थ राममनोहर लोहियांनी जवाहरलाल नेहरूंविरूध्द निवडणुक लढवली होती किंवा केजरीवालांनी शीला दिक्षित यांच्याविरूध्द निवडणुक लढवली होती. असे असताना इतके इरेला पेटायचे कारण समजत नाही. बघू पुढे काय होते ते. घोडामैदान जवळच आहे.

वाचने 46920
प्रतिक्रिया 164

प्रतिक्रिया

In reply to by शाम भागवत

पण शुभेंदु अधिकारीपुढे दिनेश त्रिवेदी झाकोळला जाईल असे वाटत नाही का?
तसे होईलच. शुभेंदू अधिकारी तरूण आहे आणि नंदीग्रामसारख्या चळवळीची पार्श्वभूमी असल्याने जास्त ग्लॅमरस आहेत. तसेच त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे सगळ्यात पहिल्यांदा १९८२ मध्ये बंगाल विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले होते म्हणजे ती राजकीय पार्श्वभूमी त्यांना आहे. त्यामानाने दिनेश त्रिवेदी वयाच्या सत्तरीत आहेत आणि फार कधी मिडियामध्ये येत नाहीत. लेनिन म्हणायचा तसे हे सगळे लोक युजफूल इडियट्स आहेत. ममताच्या साम्राज्याला धक्का लावायचा कार्यभाग पूर्ण झाल्यानंतर या सगळ्यांना लवकरात लवकर फेकून द्यायला हवे. अर्थात तसे काही होईल याची शक्यता फारच थोडी.

Bjp ल बंगाल मध्ये चांगले यश मिळाले असेल पण त्या वरून विधान सभेच्या निवडणुकी मध्ये तसेच मतदान होईल हे नक्की नसते. लोकसभेच्या निवडणुकीत लोक विचार करताना देश पातळीवर चा विचार करतात. बांगलादेश ची सीमा बंगाल ला लागून आहे त्या मुळे घुसघोरी चा प्रश्न bjp सोडवेल अशी भावना असू शकते.मुस्लिम लोकसंख्या जास्त असल्या मुळे हिंदू card चालले असेल.किंवा देशभर पसरलेल्या बंगाली लोकांचे हित bjp जपेल अशी भावना असेल. पण विधान सभेच्या निवडणुकीत भाषिक अस्मिता जोरात असते.अमित शाह,आणि मोदी जी दोघे ही गैर बंगाली ,राज्य स्तरावर च राज्यभर प्रभाव असणारा नेता bjp कडे असलाच पाहिजे.तर च त्याच्या जोरावर मत मागता येतील. भाषिक अस्मिता ही अतिशय तीव्र असते आणि गैर हिंदी राज्यात त्या अस्मितेचा जोर असतो. परत पेट्रोल चे वाढलेले दर,वाढती महागाई,शेती विषयक कायदे, रेल्वे चे खासगीकरण हे मुद्दे लोकांची मत फिरवू शकतात.बंगाल मधून सुद्धा देशभर प्रचंड स्थलांतर होत आहे.त्या मुळे रेल्वे हा त्यांच्या दृष्टी नी महत्वाचा विषय आहे.

माझं तर म्हणणं आहे कृषी कायद्याचे जबरदस्त प्रतिसाद उमटतील ... भाजप चा प्रचंड पराभव होईल

https://m.rediff.com/news/column/aakar-patel-does-modi-really-care-abou… The rights to - freedom of speech and expression - practice any profession or occupation - peaceful assembly - form associations - freely practice and propagate religion - to be deprived of life and liberty do not exist in India today. These rights are Fundamental, which enjoy a high degree of protection from encroachment by the State. But they are not available to Indians today despite what the Constituent Assembly wanted. The State has taken them away and many never existed in the first place.

महाराष्ट्रातील 82 टक्के शेतकऱ्यांचा नवीन कायद्यांना विरोध आहे, पण आंदोलन करताना कोणी दिसत नाही

In reply to by Vichar Manus

कसला विरोध? माझे निम्मे नातेवाईक शेती करतात, त्यांच्या तोंडून या कायद्याबद्दल काहीच ऐकलं नाही, ज्यांना कायद्याबद्दल माहित आहे त्यांना काहीच समस्या नाही.

In reply to by धनावडे

https://www.loksatta.com/maharashtra-news/82-point-2-per-cent-farmers-o… ८२.६ टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो असे सांगितले आहे, तर ७.५ टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाला सरकारने घोषित केलेला हमी भाव मिळतो, असे सांगितले...

https://www.loksatta.com/desh-videsh-news/tmc-leader-threatens-voters-a… टीएमसीचे उमेदवार तपन दासगुप्ता यांनी मतदारांना सांगितले की ज्या भागात त्यांना मत मिळणार नाहीत त्या भागातील लोकांना “वीज आणि पाणी मिळणार नाही”. हमीदुल रहमान यांनी लोकांना टीएमसीला मत देण्यास सांगितले. ते म्हणाले की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारी फायद्यांचा आनंद लुटल्यानंतरही “विश्वासघात” करणारे लोक “देशद्रोही” म्हणून गणले जातील.

In reply to by मुक्त विहारि

हमीदुल रहमान यांनी लोकांना टीएमसीला मत देण्यास सांगितले. ते म्हणाले की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारी फायद्यांचा आनंद लुटल्यानंतरही “विश्वासघात” करणारे लोक “देशद्रोही” म्हणून गणले जातील.
यावर पुरोगामी विचारवंतांची आणि शिवसेना समर्थकांची प्रतिक्रिया काय असणार आहे हे बघायचे. ते सोयीस्कर मौन पाळतील ही शक्यता सर्वात जास्त.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कधीच जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत... तृणमुल कॉंग्रेस पण अशीच आहे... भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, तृणमुल कॉंग्रेसने पण गठबंधनात भुमिका घेतली होतीच... अशा पक्षाबरोबर, शिवसेना, हात मिळवत आहे.... दिवसेंदिवस शिवसेना मनांतून उतरत चालली आहे..

In reply to by चंद्रसूर्यकुमार

फारतर "ममताद्रोही" किंवा "तृणमूलद्रोही" म्हणायला हरकत नाही. तृणमूलला विरोध म्हणजे देशाला विरोध असे म्हणायचे आहे असे दिसते, किंवा या बातमीच्या खांद्यावर बंदूक ठेवून केंद्र सरकारला हाणायचा बेत दिसतोय! :-)

बातमी गँग्ज ऑफ वासेपुर मधल्या एका वाक्याची आठवण झाली..."मजदूर पैदा हुये थे...मजदूर ही मरोगे......वोट ना दिया हमे...तो जिंदा जलोगे" इथे जिवंत जाळणार नाहीत, पण जिवंतपणीच नरकयातना भोगायला नक्की लावतील हे लोकं.

In reply to by सॅगी

मराठी माणसांचे दुर्दैव असे आहे की, शिवसेने सारखा मराठी पक्ष, अशा वृत्तीच्या माणसांबरोबर युती करतो.... निवडणूकीत हारजीत ही व्हायचीच, पण सामान्य माणसावर सूड उगवणे ही पाशवी वृत्ती मराठी माणसांत नाही...

In reply to by मुक्त विहारि

शिवसेनेने bjp ची झोप उडवली आहे एक महाराष्ट्र सारख्या श्रीमंत राज्यात ह्यांना सत्ता मिळू दिली नाही. आणि भविष्यात अजुन किती वर्ष महाराष्ट्रात सत्ता मिळणार नाही ह्याची शाश्वती नाही. कसा भागवायच पक्षाचा खर्च निवडणूक फंड कोण देणार ह्यांना. बिहार ,यूपी हातात आहे तिथे फक्त आंधळे भक्त मिळतात निवडणूक फंड मिळत नाही. सेने नी अवघड करून ठेवलं आहे. झोप लागणं कोणालाच.

In reply to by सॅगी

२०१४ मधील निवडणुकीच्या प्रचारात अजितदादांनी एका बारामती परिसरातील एका गावातील सभेत अगदी अशीच धमकी दिल्याची ध्वनीफीत प्रसिद्ध झाली होती. तेच अजितदादा नंतर फडणवीसांचे बडी झाले होते आणि आता ते उद्धव ठाकरेंचे बडी आहेत. हा त्या विषयावर निघालेला मिपावरील धागा https://www.misalpav.com/node/27632 हीच ती धमकीची चित्रफीत https://youtu.be/ZToKF05aTHY

मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपमधे प्रवेश!

जन्म बांगला देशात 1950 ला. Nexal movement मध्ये पण सुरुवातीला नाव जोडले होते. नंतर सिनेमे,नाटक केली की नाही माहीत नाही. तृणमूल काँग्रेस नी ह्यांना राज्यसभेवर पाठवला(तेव्हा ममता पूजनीय होत्या,वंदनीय होत्या मिथुन साठी) श्रद्धा स्कॅम ह्यांच्या पर्यंत पोचले म्हणून राज्यसभेचा राजीनामा. राज्यसभेत हे महाशय ह्यांच्या कार्यकाळात फक्त तीन दिवस हजर होते. आता हे सत्तर वर्षाचे आहेत आणि निवडुंग सारखे निवडणूक पूर्ण bjp मध्ये गेले. हे सत्तर वर्षाचे ह्यांचे शरीर च सांभाळणे ह्यांना भारी पडत आहे आता बंगाल सांभाळणार. आणि ह्यांच्या वर bjp ची भिस्त. पाच वर्षांपूर्वी पूजनीय,वंदनीय असलेल्या ममता जी ह्यांना आता आदरणीय वाटत नाहीत. किती नाटक करणार.

2019/20 वर्षाचा सर्वोत्तम शुध्द पाणी पुरवठा करणारी महानगर पालिका म्हणून मुंबई महानगर पालिकेला पुरस्कार देण्यात आला आहे. मुंबई मधील पिण्याचे पाणी 99.34टक्के शुद्ध आहे.योगीच्या रामराज्य मध्ये असे शुद्ध पाणी नाही.

In reply to by Rajesh188

केंद्रात भाजप असल्यामुळे छोट्या मोठ्या संस्था स्वायत्त काम करत आहेत , सत्यापन आणि सत्य यावर आधारित रिपोर्ट सादर करत आहेत आणि करू दिले जात आहेत , नाहीतर स्वतः अवॉर्ड तयार करून स्वतःला अर्पण करणाऱ्याची संख्या कमी नव्हती ,

In reply to by स्वलिखित

महानगर पालिकेचा 12 व्वा नंबर आला... जबरदस्त प्रदूषण असतानांही, 12 व्वा नंबर आहे, त्यातच सगळे काही आले... अर्थात, ह्या नंबरमुळे, जागांचे भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही...

मोदी प्रचारात DNA हा शब्द काही वेळा वापरतात. पूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीत विनाकारण DNA शब्द वापरून काहीतरी चुकीची वाक्ये वापरली होती. त्यावेळी नीतीशकुमारांनी या संदर्भाचा वापर करून मोदींवर जोरदार हल्ला चढविला होता. आता पुन्हा एकदा मोदींनी DNA शब्दाचा वापर प्रचारात केला आहे. https://www.indiatoday.in/elections/west-bengal-assembly-polls-2021/sto…

आम्ही मुस्लिम मतांमुळे निवडून आलो, असे सांगतात आणि नंतर म्हणतात की..... https://maharashtratimes.com/india-news/bjp-spreading-communal-poison-i… शरद पवार यांच्यावर, माझा तरी विश्र्वास नाही...

In reply to by मुक्त विहारि

शरद पवार यांच्यावर, माझा तरी विश्र्वास नाही...
माझा तरी विश्वास नाही म्हणजे? खरं तर कोणाचाच त्यांच्यावर विश्वास नाही :)

In reply to by मुक्त विहारि

ज्यांनी आयुष्यभर जातीयवादी प्रचार केला, तेच आज भाजपवर जातीयवादाचा आरोप करीत आहेत. ऑक्टोबर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर हेच दिल्लीला जाऊन भाजपबरोबर सरकारस्थापनेची चर्चा मोदी-शहांबरोबर करीत होते.

In reply to by मुक्त विहारि

त्यांचे लोक बंगल्यावर बोलवून चाबकाने मारतात. https://www.mahamtb.com/Encyc/2020/4/7/Thane-news-minister-jitendra-awh…

In reply to by मुक्त विहारि

त्यांचे लोक बंगल्यावर बोलवून चाबकाने मारतात. https://www.mahamtb.com/Encyc/2020/4/7/Thane-news-minister-jitendra-awh…

In reply to by मुक्त विहारि

आज आपला अर्थसंकल्प आहे. आणि उत्पन्न वाढीची चिंता अशी न्यूज आहे लोकसत्ता ला. ही खूप चांगली आयडिया आहे. सगळ्या दारू दुकानाचे परवाने रद्द करा आणि लिलाव करा. पण राजकारणी लोकांचीच दुकानं असतील ही सगळी..सो हे होणं अवघड आहे.

In reply to by शलभ

दारूच्या नादात, यादव बुडाले... ह्या धंद्यात राजकारणी मिलीभगत करू शकणार नाहीत... आपली पोळी कुणीच दुसर्याला देणार नाही...

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/nanar-refinery-opp… हे असेच काहीसे, Enron च्या वेळी घडले होते... मातोश्री वर बैठक झाली आणि समुद्रात बुडलेली Enron बाहेर निघाली... इतिहासाची पुनरावृत्ती होणार असे दिसते....

In reply to by मुक्त विहारि

नाणार होणारच हे भविष्य मी 2 वर्षांपूर्वी वर्तवले होते. का ते मला माहीत आहे, पण उगाच पब्लिक फोरम वरती त्याची चर्चा नको.. नाणारची अधिसूचना रद्द करणे आणि तो प्रकल्प पुनर्जीवित करणे यात एक मोठे अर्थकारण दडलेले आहे. त्याचा साक्षात्कार मला MIDC आणि अधिग्रहण याचा एकंदर अभ्यास करताना माझ्या सरकारी कर्मचारी असलेल्या भावाने जेव्हा अधिग्रहण कायद्यातील एक क्लॉज सांगितला तेव्हा झाला.. याच कारणामुळे आपल्याकडे बरेच प्रकल्प आले की त्यांना विरोध होतो, मग ते रद्द होतात आणि पुन्हा जिवंत पण होतात :)

In reply to by आनन्दा

आधी एक बोलतात आणि नंतर शब्द फिरवतात... संजय दत्त, Enron, एक रूपयांत झुणका भाकर, ही काही उदाहरणे...

श्री मोदींचा नाकर्तेपणा जसजसा उघडा पडत चाललाय तसतशी त्यांच्या भज्तांची हेटाळणी वाढत चाललीय. मोठमोठ्या गप्पा मारणारे हे सुशिक्षित मूर्ख भक्त वेळ-काळ-स्थळ किंवा सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ सत्य किंवा वाढता जनारोष न पाहता मोदींच्या व्यक्तिपूजेत आपले भान हरपताना दिसतात. नुकतीच एअर फ्रान्सच्या पॅरिस ते दिल्ली विमानात घडलेली घटना खूप बोलकी आहे. आपल्या पूर्वजांनी बहुसंख्य भारतीयांचे दमन करणारी जी व्यवस्था निर्माण केली होती त्या व्यवस्थेचे पुनरुज्जीवन मोदी करतील असे ह्या हिंदू उच्चवर्णीय भक्तांना वाटते आणि त्याला कोणी विरोध करताना दिसला की त्यांचे पित्त खवळते. असाच हा विमानात गोंधळ घालणारा भक्त आता पाच-दहा वर्षांसाठी आत जाणार आणि त्याच्या सुटकेसाठी त्याचे प्रिय मोदी शष्प काही करु शकणार नाहीत. https://scroll.in/latest/988894/air-france-flight-makes-emergency-landing-after-indian-passengers-disruptive-behaviour?fbclid=IwAR3PVUVAdD3_EjU7-I2M7sjLcvTXmyML6gaZr-Pw1zuuARLjkaC9GTVxKQU

In reply to by नगरीनिरंजन

असाच हा विमानात गोंधळ घालणारा भक्त आता पाच-दहा वर्षांसाठी आत जाणार आणि त्याच्या सुटकेसाठी त्याचे प्रिय मोदी शष्प काही करु शकणार नाहीत.
मोदी याविषयी काही करू शकणार नाहीत , त्यांनी काही करूही नये आणि ते काही करणारही नाहीत. तसेही आपल्यासाठी विमानात नुसता आरडाओरडा नाही तर विमान अपहरण करणार्‍यांना पक्षात घेऊन आमदारकीचे तिकिट देऊन आमदार बनवायला मोदी हे इंदिरा गांधी थोडीच आहेत? बादवे, भक्त वगैरे गरळ ओकून झाल्यानंतर मन थार्‍यावर आले (आलेच तर) की मग असे करणारा माणूस मानसिकदृष्ट्या अस्थिर असू शकतो या शक्यतेचाही विचार करता आला तर करा.

In reply to by मुक्त विहारि

नुसते रामराव आदिक नाही राजीव गांधी पण आठवायला हवेत. भोपाळ वायुगळतीप्रकरणी युनियन कार्बाईडचे सीईओ वॉरन अ‍ॅन्डरसनना भारतीय कायद्याने अटक केली होती. ती अटक करणे कितपत समर्थनीय होते वगैरे प्रश्न आहेतच आणि दोनेक महिन्यांपूर्वी मिपावर साहनांनी त्यावर एक लेखही लिहिला होता. काहीही असले तरी भारतीय कायदेशीर प्रक्रीयेप्रमाणे वॉरन अ‍ॅन्डरसनला पकडले होते. तेव्हा भारतीय कायदाच त्यांना सोडेल असे राजीव गांधी म्हणाले का? छे भलतेच काही. आम्ही वॉरन अ‍ॅन्डरसनला सोडतो आणि तुम्ही आमचा एक माणूस सोडा असे डील राजीव गांधींनी अमेरिकेबरोबर केले होते. आणि तो सोडलेला माणूस कोण होता? तर फ्लॉरीडात ट्रक जाळल्याचा गुन्हा केल्यामुळे तुरूंगात असलेला राजीव गांधींचा मित्र आदिल शहरयार. वॉरन अ‍ॅन्डरसनला डिसेंबर १९८४ मध्ये सोडले आणि आदिल शहरयारला अमेरिकेने लगेच सोडले असते तर ते अगदीच डोळ्यात आले असते म्हणून राजीव गांधींनी जून १९८५ मध्ये पंतप्रधान म्हणून अमेरिकेला पहिली भेट दिली तेव्हा त्यांचे विमान अमेरिकेत पोचतानाच अमेरिकेच्या अध्यक्षांनी आदिल शहरयारला माफी देऊन सोडले. म्हणजे ट्रक जाळणे या त्यामानाने कितीतरी किरकोळ गुन्ह्याबद्दल शिक्षा झालेल्या भारतीय नागरिकाला सोडून कितीतरी मोठ्या गुन्ह्यासाठी भारतीय कायद्याच्या कचाट्यात अडकू शकणार्‍या अमेरिकन नागरिकाला अमेरिकेच्या अध्यक्षांनी सोडवले म्हणजे त्यांच्यासाठी ते कितीतरी चांगले डील झाले. खरं तर मोदींनी युरोपातल्या देशांबरोबर असेच काहीतरी डील केले पाहिजे. तुम्ही आमच्या भक्ताला सोडा आणि आम्ही कितीतरी मोठ्या गुन्ह्याबद्दल चौकशी चालू असलेल्या कोणा युरोपियनाला सोडतो अशाप्रकारचे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तुमचे मोदी किती कार्यक्षम पंतप्रधान आहेत ते सांगा . तुमचे कर्तृत्व सांगा . आत्ता पर्यंत जेवढे कर्तृत्व भारताच्या सर्व पंत प्रधान असलेल्या लोकांनी केले आहे ह्याचा हिशोब मांडला तर मोदी चे देशाच्या भल्यासाठी काहीच कर्तृत्व नाही. शून्य च्या खाली किती तरी वजा शून्य असलेले आकडे वापरावे लागतील.

In reply to by Rajesh188

मोदींनी काय केले ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खरच हवं असेल तर उगाच लोकांना विचारत कशाला फिरायचे? बरेच मोदींविरोधी लोकं असले बालिश प्रश्न विचारत फिरताना दिसतात. त्याऐवजी साधं सरळ गुगल करायचं. पण खात्री आहे मोदीद्वेषाचा ज्वर असं काही करू देत नाही.

In reply to by बिटाकाका

दंगलीमध्ये पोलिसांना काही ठिकाणी दिसताक्षणी गोळ्या घालायचे आदेश दिलेले असतात. त्याप्रमाणे मी माझ्या सबकॉन्शस माईंडला (मराठी शब्द?) आदेश दिला आहे की प्रतिसादांमध्ये १८८ चे नाव दिसले की ताबडतोब प्रतिसाद दुर्लक्षित करायचा. पुढचे काही वाचायचेच नाही. या आयडीचे प्रतिसाद वाचून त्याला उत्तरे द्यायचा संयम तुमच्याकडे आहे यामुळे प्रचंड आदर वाटायला लागला आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मोदी चे उच्च विद्या विभूषित भक्त आहेत त्यांनाच ते स्वतः अयशस्वी मोदी ना का आपण का पाठिंबा देत आहोत हेच माहित नाही माझा प्रतिसाद दुर्लक्षित केला तरी सत्य स्थिती बदलत नाही .. उच्च विद्या विभूषित भक्त(हा शब्द नी ठरवून वापरत आहे बिनडोक ,अशिक्षित ,भक्त ह्यांना काहीच समजत नसते ते कधी ही विचार बदलतात बिचारे ) ह्यांना सर्व माहीत आहे पण तरी ते आंधळे झाले आहेत . पण बाकी लोक थोडी आंधळे आहेतं

In reply to by चंद्रसूर्यकुमार

लेकी बोले सुने लगे करायचा प्रयत्न करून बघितला, एवढा बावळट प्रश्न पडणारे बरेच असतात. ****** दारू पिऊन किंवा पॅनिक अटॅक मध्ये कुणीतरी विमानात दहा विचित्र गोष्टी करतो, त्यातली एक मोदींचे नाव घेणे असते, त्यातही मोदीद्वेषाने पछाडलेल्यांना मोदी आणि त्यांचे समर्थक दिसतात. अवघड दुखणं आहे हे मोदीद्वेषज्वर :):).

In reply to by चंद्रसूर्यकुमार

प्रतिसादांमध्ये १८८ चे नाव दिसले की ताबडतोब प्रतिसाद दुर्लक्षित करायचा. पुढचे काही वाचायचेच नाही. + १ मिपावर काही विशिष्ट सदस्यनामे दिसली की मी प्रतिसाद न वाचता पुढे जातो. हा त्यातलाच एक आयडी.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तसेही आपल्यासाठी विमानात नुसता आरडाओरडा नाही तर विमान अपहरण करणार्‍यांना पक्षात घेऊन आमदारकीचे तिकिट देऊन आमदार बनवायला मोदी हे इंदिरा गांधी थोडीच आहेत? इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण करणाऱ्या पांडे बंधू या हवाई चाच्यांना इंदिरा गांधींनी मंत्रीपदाचे बक्षीस दिले होते. अजून एका विमानात मंत्रीपदावर असताना रामराम आदिकांनी शिवास रीगलची आख्खी बाटली ढोसून हवाईसुंदरी बरोबर गैरवर्तन केले होते. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.

In reply to by नगरीनिरंजन

तो उच्चवर्णीय आहे याला काही आधार? की विमानप्रवास आणि परदेशगमन ही उचचवर्णीयांची मक्तेदारी आहे असे म्हणायचे आहे तुम्हाला? त्याचे नाव कळलेले नसून सुद्धा तुम्ही असे म्हणताय म्हणून विचारतोय. बाकी हाच न्याय लावायचा म्हटलं तर अल्ला हु अकबर म्हणून डांगे करण्याऱ्या लोकांचा अल्ला म्हणजे मोठेच failure मानले पाहिजे. कारण त्यांनी तर महाभयंकर उपद्व्याप केले आहेत. असो, मी यातले दोन्ही मानत नाही, पण तुमच्या विधानाचा नेमका अर्थ काय होतो ते दाखवावे म्हणून लिहिले.

In reply to by आनन्दा

नगरकरांना तेवढा विचार करायची शुद्ध आहे असा तुम्ही विचार करता म्हणजे नवल आहे. काहीही बरळून लिहिलेला प्रतिसाद आहे तो त्यांचा.

In reply to by पिनाक

खरं सांगायचं तर विमानात गोंधळ घातलेल्या प्रवाशापेक्षा त्याचा बादरायण संबंध मोदींशी जोडून आपली मोदीद्वेषाची खाज भागवून घेणारेच कायम नशेत असतात.

In reply to by आनन्दा

प्रश्न सांख्यिकीचा आहे. फक्त उच्चवर्णीयच विमानप्रवास करतात असे मी म्हणतच नाहीय. मोदी भक्ती करणारे व काहीही झालं तरी मोदींची बाजू घेणारे कोण आहेत ते मी लिहीलंय फक्त. स्वत:ला काहीही फायदा नसूनही मोदी-मोदी करणारे निम्नवर्णीय/अवर्णीय मूर्खही असतातच; पण तुलनेने फारच कमी. बाकी मुस्लिमांतही जाती आहेतच. तसा फारसा फरक नाही

हे खरोखर उच्च शिक्षित लोक आहेत त्यांच्या क्षेत्रात प्रगती केलेली लोक आहेत पण मोदी हे पूर्णतः अयशस्वी पंतप्रधान आहेत हे त्यांच्या मेंदूत घुसत नाही. सर्व क्षेत्रात भारत मागे पडत आहे हे त्यांना दिसत नाही. समजा समाजात द्वेष वाढत आहे हे त्यांना दिसत नाही , देशाच्या इतिहासातील सर्वात नालायक पंतप्रधान ही त्यांची खरी प्रतिमा आहे. पण हे उच्च शिक्षित भक्त आंधळे झाले आहेत. नक्की ह्यांनी डिग्री अभ्यास करून घेतली आहे की कॉपी करून अशीच शंका येते.

यात मोदींचा काय संबंध आहे? हा प्रवासी नशेत असण्याची शक्यता असू शकते. विमानात असा गोंधळ घालणारे दरवर्षी पाचसात प्रवासी सापडतात. त्यांचा मोदी किंवा इतरांशी संबंध काय? एका अभ्यासानुसार विमानात गोंधळ करणारे ९०% प्रवासी जास्त ढोसल्यामुळे नशेत असतात. काही लोकांना ढाळ लागले किंवा खडा झाला तरी त्यासाठी ते मोदींनाच जबाबदार धरतात. वरील पोस्ट त्याच प्रकारातील आहे.

In reply to by श्रीगुरुजी

.... प्रवासी जास्त ढोसल्यामुळे नशेत असतात.... असेही, असू शकते.... काही लोकांना घराणेशाहीची नशा चढते, तसेच असेल...

देश हितासाठी घेतलेले निर्णय ह्याची माहिती उच्च विभूषित भक्तांनी द्यावी आणि ते भक्त सांगतील ते थापा नाही खरे आहे हे बाकी लोकांनी मना पासून सांगावे. करा चालू उच्च शिक्षित मोदी भक्त.