Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by हेमंतकुमार on Fri, 07/31/2020 - 12:15
करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे. या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत: १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज. वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय. आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
  • Log in or register to post comments
  • 107308 views

प्रतिक्रिया

Submitted by चौकटराजा on Sun, 09/20/2020 - 11:58

In reply to चौरा, by हेमंतकुमार

Permalink

आणखी काही

सदर मयत स्त्री फक्त ४० वर्षांची एकदा बारा वर्षे वयाच्या मुलाची आई ! कोणताही दीर्घ आजार नसलेली ! पतीचे आईवडील , पती ,मुलगा सर्व करोनाग्रस्त झाले पण वाचले ! हीच फक्त बळी ठरली . यात असे लक्षात येईल की तिचा अनुवंश या सर्वापेक्षा भिन्न आहे. त्यानुसार काही म्युटेशन होऊन अचानक मरण आले असावे ! पुन्हा माझे " ते वाक्य आलेच ! " ओह गॉड , व्हॉट शाल आय डू टू लीड हेलदी लाइफ ?" चूझ यौवर पेरेंट्स केअरफुली माय सन " द गॉड सेड !!
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 09/20/2020 - 12:12

Permalink

होय ,

अग्दी बरोबर . दुसरे उत्तर नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sun, 09/20/2020 - 19:37

In reply to होय , by हेमंतकुमार

Permalink

चौकटराजांच्या काही मर्यादीत बाजू

....यात असे लक्षात येईल की तिचा अनुवंश या सर्वापेक्षा भिन्न आहे. त्यानुसार काही म्युटेशन होऊन अचानक मरण आले असावे ! पुन्हा माझे " ते वाक्य आलेच ! " ओह गॉड , व्हॉट शाल आय डू टू लीड हेलदी लाइफ ?" चूझ यौवर पेरेंट्स केअरफुली माय सन " द गॉड सेड !! ...
१) अनुवंशाचा संबंध नाहीच असे नाही तो महत्वाचा घटकही असू शकतो, पण सर्व खापर त्यावर फोडणे कितपत रास्त आहे? गोष्टी केवळ अनुवंशावर अवलंबून असत्यातर ९९ वर्षे अनुवंशाच्या बळावर तगलेला १०० व्या वर्षीही अनुवंशाच्या बळावर तगावयास हवा किंवा कसे आणि तसे नसेल तर गोष्टी केवळ अनुवंशावरही अवलंबून आहेत असे म्हणता येईल का ? २) देवाने म्हटले आणि आपले अनुवंश दाते जन्मदाते सुपिरीयर अनुवंश देऊ शकणारे मिळवता आले तरी इतर अपघाताने अपंगत्व अथवा मृत्यू येऊच शकणार याची शाश्वती देता येऊ शकते का ? ३) सर्वात महत्वाचे समाज म्हणून उपलब्ध ज्ञानाच्या आधारावर उपलब्ध साधनांच्या मर्यादेत एकमेका सहाय्यकरू च्या भावनेने सर्व मानवांनी किमान अंतर, मास्क, आणि प्रत्येक स्पर्ष निर्जंतूकचे तत्व मनापासून अंगिकारले असते तर साथ पसरणे टाळता आले असते - ज्या अनुवंशाच्या बळावर एक स्त्री ४० वर्षे जगू शकली ती कदाचीत अजून दहा वर्षे जगू शकली असती. आणि अशाच ३९% टक्क्याच्या आसपास जो मृत्यूदर गतवर्षापेक्षा वाढला आहे अशा अनेक व्यक्ती अधिक काळ जगू शकल्या असत्या. माणसे अपघातात मरतात हे म्हणणे हा एक भाग झाला अपघात घडण्यामागे कुणाचा कुठेतरी गलथानपणा झाला हे ही एक वास्तव असते ज्याबद्दल समाजाने अधिक संवेदनशीलपणे शीस्तीने अपघात मग रस्त्यावरचे असतील किंवा संसर्गाच्या प्रसाराचे असतील त्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण कारणीभूत होणार नाही याची अधिक दक्षता घ्यावयास हवी किंवा कसे ?
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 09/20/2020 - 14:56

Permalink

अभिनंदन !

‘टाटा’ समूह आणि CSIR-IGIB यांच्या संयुक्त प्रयत्नाने कोविड१९ च्या निदानासाठी भारतीय बनावटीच्या स्वस्तदर चाचणीला सरकारी मान्यता मिळाली आहे. तिचे शास्त्रीय नाव CRISPR test असून ‘फेलुदा’ या नावाने ती ओळखली जाईल. तिची वैशिष्ट्ये: १. RT-PCR च्या समकक्ष अचूकता २. कमी वेळात निष्कर्ष ३. स्वस्त ४. सुलभ प्रक्रिया संदर्भ
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sun, 09/20/2020 - 19:43

In reply to अभिनंदन ! by हेमंतकुमार

Permalink

स्तुत्य आणि अभिनंदनीय, ही

स्तुत्य आणि अभिनंदनीय, ही नवीन चाचणी पद्धती लौकरात लौकर उत्पादन वितरण आणि चाचणी यशात सहभागी होऊ शकेल अशी अपेक्षा करूया.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 09/24/2020 - 17:35

Permalink

रिपोर्ट नमुना

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 09/25/2020 - 11:49

Permalink

सर्वोच्च श्वसन सहाय्य

कोविडमधून बरे झालेल्यांचे प्रमाण आता वाढते आहे ही समाधानाची बाब आहे. याच्या दुसर्‍या टोकाला असेही काही रुग्ण आहेत की ज्यांच्या फुफ्फुसांना तीव्र इजा पोहोचली आहे. त्यामध्ये काही डॉक्टर्स आणि अन्य ‘योद्धे’ यांचाही समावेश आहे. अशा रुग्णांना व्हेंटिलेटर आणि तत्सम कृत्रिम श्वसन उपायांवर ठेवूनही बरे वाटत नाही. अशा गंभीर रुग्णांसाठी एका सर्वोच्च आधुनिक तंत्रज्ञानाचा (ECMO किंवा ELS) वापर केला जातो. जगभरात सध्या २५०० रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. त्यातून बरे झालेल्यांचे प्रमाण 40 ते 50 टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. खूप खर्चिक असलेल्या या तंत्राचा अल्प परिचय करून देतो. हा उपचार म्हणजे थोडक्यात रुग्णाला ‘कृत्रिम हृदय-फुफ्फुस यंत्रणेवर’ ठेवणे. यात नळीद्वारे रुग्णाच्या शरीरातील रक्त काढून ते या यंत्राला पोहोचवले जाते. यंत्रामध्ये त्यातील कार्बन-डाय-ऑक्‍साईड काढून घेऊन त्यात ऑक्सिजन भरला जातो .आता हे ‘शुद्ध’ झालेले रक्त रुग्णाच्या शरीरात पुन्हा नळीद्वारे पोचवले जाते. यामागचा हेतू असा आहे. श्वसनकार्य पूर्णपणे यंत्रावर सोपवल्याने रुग्णाचे फुप्फुसांना विश्रांती मिळते आणि त्यामुळे विषाणूने केलेल्या इजेमधून बरे होण्याची संधी मिळते.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Sun, 09/27/2020 - 02:12

Permalink

मला सर्वात जास्त आश्चर्य वाटते

गुणसूत्रे,dna, RNA चे कोड आता माणूस बदलू शकतो त्याला हवा तसा बदल आता माणूस करू शकतो. 3d प्रिंटिंग नी मानवाचे अवयव प्रिंट करू शकतो. कंप्युटर वर कोणत्या ही औषधाची चाचणी घेवू शकतो. मानवी शरीराची प्रती रचना कंप्युटर वर करून. अशा मोठा मोठ्या जाहिराती नावाजलेल्या पत्रिका नेहमी करत असतात. ह्या जाहिराती खऱ्या आहेत असे समजले तर कॅन्सर,मधुमेह,covid अत्यंत किरकोळ आजार आहेत . ते असेच टाइम पास म्हणून बरे करायला पाहिजे होते. पण साधे अत्यंत निकृष्ट काम सफेद केस काळे करणे नवीन केस उगवणे. नवीन दात हवे तेव्हा उगवणे . हे पण अजुन जमत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 09/30/2020 - 09:37

In reply to मला सर्वात जास्त आश्चर्य वाटते by Rajesh188

Permalink

:)

सही हे.....! मनापासून आवडलं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Mon, 09/28/2020 - 09:10

Permalink

ह्या टाईम्स ऑफ इंडीया

ह्या टाईम्स ऑफ इंडीया वृत्तानुसार ज्या राज्यात साथीचा प्रसार अधिक आहे तेथिल पॉझीटीव्हचे प्रमाण कमी होण्याची सांख्यिकीय शक्यता दिसते आहे त्याच वेळी इतर काही देशांप्रमाणे साथीची दुसरी लाट येऊ शकते म्हणून सतर्क आणि काळजी घेतली पाहीजे. संघीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (संघीय शब्द संघ सरकारचे या अर्थाने केंद्रीयच्या एवजी वापरलाय) यांनी सनडे संवाद असा काही प्रकार, सोशल मिडीयावरून आलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा स्तुत्य प्रयत्न मागच्या तीन आठवड्यापासून चालू केलाय आणि त्यांच्या युट्यूब उपलब्ध होताहेत. अगदी केशकर्तनालयात काय काळजी घ्यावी अशा प्रकारच्या ते टिकात्मक प्रश्नांना उत्तरे देताना ते दिसतात. अगदी सामान्य नागरीक ते पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना ते उत्तरे देत आहेत. (हे आधी सुरू केले असते तर अधिक बरे झाले असतो) महत्वाचे म्हणजे दुसर्‍या राष्ट्रीय सेरोसर्वेचे निश्कर्ष लौकरच उपलब्ध होताहेत पण अजूनही हर्ड इम्युनिटी प्रकार भारतीयांसाठी दूर आहे आणि त्यामुळे मास्क सुरक्षीत अंतर आणि स्पर्षजन्यचे निर्जंतुकीकरण यावरील भर कमी करू नका जे याबाबतीत निष्काळजी करताहेत ते बरोबर नाही असे त्यांचे म्हणणे दिसते मोदींची भाषणे ऐकल्यावर डॉ.हर्षवर्धनांचा बोलण्याचा वेग कमी वाटणे स्वाभाविक आहे युट्यूबला स्पीड वाढवून ऐकण्याची सुविधा वापरल्यास बोअर न होता त्यांचा व्लॉग श्रवणीय आणि माहितीपूर्ण वाटतो संदर्भ https://timesofindia.indiatimes.com/india/7-day-average-down-9-days-in-row-is-india-past-peak/articleshow/78341805.cms https://youtu.be/-zp_JRl88LU
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 09/28/2020 - 09:58

Permalink

धन्यवाद !

माहितीबद्दल. छान.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Mon, 09/28/2020 - 13:39

Permalink

आता व्हायरस नी स्वतः मध्ये बदल केला आहे

आता व्हायरस नी स्वतः मध्ये बदल केला आहे आणि आता मास्क, sanitizer, सोशल distance हे नियम कुचकामी झाले आहेत व्हायरस वरील नियम पाळत असाल तरी कोणालाही बाधित करू शकतो . पण त्याची संहारक शक्ती कमी झाली आहे गंभीर परिणाम होण्याचे प्रमाण कमी झाले आहे पण बाधित करण्याची शक्ती वाढली आहे. असे प्रतिष्ठित सायन्स मॅगझिन मध्ये वाचलं आहे. हे खरे आहे का
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Tue, 09/29/2020 - 10:03

In reply to आता व्हायरस नी स्वतः मध्ये बदल केला आहे by Rajesh188

Permalink

असे प्रतिष्ठित सायन्स मॅगझिन

असे प्रतिष्ठित सायन्स मॅगझिन मध्ये वाचलं आहे.
कोणते मॅगझिन , कोणता लेख इ. माहीती द्याल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 09/28/2020 - 15:21

Permalink

जनुकीय बदल...

18 ऑगस्ट 2020 च्या Lancet मध्ये सार्स-2 विषाणूमधील एका विशिष्ट एका विशिष्ट जनुकीय बदलाचा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. सदर अभ्यास सिंगापूरमधील आहे. त्यानुसार : १.या बदलामुळे होणारा कोविड हा तुलनेने सौम्य आहे. २. मात्र त्यामुळे त्याच्या फैलाव क्षमतेवरील परिणाम अनिश्चित आहे. ३. जगाच्या विविध भागातून या संदर्भातले अधिक अभ्यास व्हायची गरज आहे
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Mon, 09/28/2020 - 15:54

In reply to जनुकीय बदल... by हेमंतकुमार

Permalink

च्यायला म्हणजे हा व्हायरसही

च्यायला म्हणजे हा व्हायरसही आपण काय करतो आहोत ह्यावर लक्ष ठेवुन आहे म्हणायचे : (
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Mon, 09/28/2020 - 16:40

In reply to च्यायला म्हणजे हा व्हायरसही by कानडाऊ योगेशु

Permalink

बदल होणे हे व्हायरस चे जीवन चक्र असावे

बदल होणे हे व्हायरस च्या जीवन चक्र चा भाग असावा . माणसाला त्रास देण्यासाठी ते स्वतः बदलत नसावेत. ह्या जगातील सजीव सृष्टी ची उत्पत्ती ची जिवाणू आणि विषाणू पासून झाली आहे. ते नसतील तर जीव सृष्टी पण नसेल. त्यांना खलनायक ठरवू नका
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Mon, 09/28/2020 - 21:09

In reply to जनुकीय बदल... by हेमंतकुमार

Permalink

राजेश १८८ रावांच्या निष्कर्षघाईतील निसटत्या बाजू

आता व्हायरस नी स्वतः मध्ये बदल केला आहे आणि आता मास्क, sanitizer, सोशल distance हे नियम कुचकामी झाले आहेत व्हायरस वरील नियम पाळत असाल तरी कोणालाही बाधित करू शकतो .
१) व्हायरसची नवी म्युटेशन आली म्हणजे जुनी कार्यरत व्हर्शन आपोआप अस्तीत्वहीन झाली/ निकामी झाली हा निश्कर्ष राजेश १८८ रावांनी नेमक्या कोणत्या बळावर काढला ? २) मास्क, sanitizer, सोशल distance हे नियम हे सर्व श्वसनजन्य साथीचा प्रसार कमी व्हावा म्हणून उपयूक्त आहे. व्हायरसचे नवे म्युटेशन श्वसनजन्य मार्गानेच पसरत असेल तर मास्क, sanitizer, सोशल distance हे लगेच कुचकामी कसे होतात? सध्या साथ असलेल्या विषाणूने न गचकता माणूस वाचला तरी इतर गंभीर साईड इफेक्टची शक्यता असू शकते असे नव्या वीषाणू म्युटेशन बद्दल नाही याचे कोणते आश्वासन राजेशराव किंवा त्यांनी देऊ केलेल्या संदर्भात उपलब्ध आहे ? मास्क, sanitizer, सोशल distance हे नियम यांचे शक्य तेवढे पालन नेमके, कुणाचेही केवढे मोठे घोडे मारतात की त्याबद्दल अपप्रचारात आणि समाजातील निष्काळजीपणास कारण शोधणारी निष्कर्षघाईकरून हकनाक सामील व्हावे?
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 09/28/2020 - 16:37

Permalink

तो

आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे ! 🙂
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 09/28/2020 - 16:43

In reply to तो by हेमंतकुमार

Permalink

सिरियसली की गमतीने?

सिरियसली की गमतीने?
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 09/28/2020 - 17:34

Permalink

गवि,

सिरियसली की गमतीने?
>>> त्याकडे दोन्ही अर्थांनी बघता येईल ! यानिमित्ताने पोलिओ लसीचे संशोधक डॉ. Jones Salk यांचे एक अवतरण आठवले : “ जर पृथ्वीवरील सर्व कीटक नाहीसे झाले, तर पन्नास वर्षांत इथले सर्व जीवनच संपेल. पण, जर पृथ्वीवरील मानवजात नष्ट झाली, तर मात्र पुढच्या पन्नास वर्षात इथे सर्व प्रकारची जीवसृष्टी बहरेल !”
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 09/28/2020 - 21:21

Permalink

गंभीर आजार..

“हा संसर्ग झालेल्यापैकी काहींचाच आजार गंभीर का होतो ?” हा लाखमोलाचा प्रश्न आपल्याला सतावतोय. त्याची उकल करण्याचे दृष्टीने अनेक पातळ्यांवर संशोधन चालू आहे. आतापर्यंत गवसलेले काही मुद्दे असे : १. विषाणूंचा हल्ला >> शरीरात विचित्र अँटीबॉडीज (ऑटो अँटीबॉडीज) तयार होतात >> त्या विषाणूचा प्रतिकार करण्याऐवजी आपल्या शरीराच्या प्रतिकार प्रथिनांनाच नष्ट करतात >> प्रतिकारशक्ती दुबळी पडते. २. अशा काही रुग्णांत जनुकीय बिघाड आढळले आहेत. अशा जवळपास 13 जनुकांचा या दृष्टीने अभ्यास चालू आहे. अशा बिघाडाने या व्यक्तींच्या शरीरात interferons ही प्रथिने तयार होत नाहीत. (एरवी ही प्रथिने तयार होऊन विषाणूंचा नाश करतात).
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Tue, 09/29/2020 - 08:01

Permalink

भांडवलशाहीत जर ग्राहक सुधृद नसेल

मास्क, sanitizer, सोशल distance हे नियम यांचे शक्य तेवढे पालन नेमके, कुणाचेही केवढे मोठे घोडे मारतात की त्याबद्दल अपप्रचारात आणि समाजातील निष्काळजीपणास कारण शोधणारी निष्कर्षघाईकरून हकनाक सामील व्हावे? सहमत दुर्दैवाने याला दोन प्रकारची लोक विरोध करीत आहेत ( जगभर) १) कॉन्स्पिरसी थेअरी वाले ( एवढी जगभर उलथापालथ होऊन सुद्धा) २) टोकाचे भांडवलशाही...ज्यांना काहीही करून उद्योग धंदे हे चालूच राहिले पाहिजेत असे वाटते आणि त्या साठी ते सार्वजनिक स्वास्थ्याला दुय्यम स्थान द्यायला तयार आहेत ( पण ते हे विसरतात कि भांडवलशाहीत जर ग्राहक सुधृद नसेल तर काय खाक तुमची गोष्ट विकत घेणार) ३) भारतापुरते बोलायचे तर ,,, काहीही करा पण आपली नावडत्या पक्षाचे राज्य आहे ना ... मग फक्त विरोध करा )
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Tue, 09/29/2020 - 16:22

Permalink

नवे यंत्र

कोविडची महासाथ यथावकाश संपेल. मात्र बराच काळ आपल्याला गर्दीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करावे लागेल. सध्या बऱ्याच कार्यालयांत लोकांना आत सोडताना ताप आहे की नाही, हे यंत्राने पहात आहेत. निव्वळ ताप असणे म्हणजे काही कोविडचे निदान नव्हे. तसेच ताप नाही म्हणून कोविडची शक्यता पुसून टाकता येत नाही. यावर उपाय म्हणून तंत्रज्ञांना एका उच्चस्तरीय रोगनिदान तंत्राची कल्पना सुचली आहे. कोविडबाधित व्यक्तीच्या श्वासातुन काही विशिष्ट रसायने ( VOCs) बाहेर पडतात. एक छोटे यंत्र जर आपण नाकाभोवती धरले आणि त्यात श्वास सोडला, तर संबंधित व्यक्ती बाधित आहे की नाही ते कळू शकेल. थोडक्यात, मद्यपी व्यक्ती जशी आपण उच्छवास चाचणी यंत्राने ओळखतो त्याच धर्तीवर ही चाचणी आहे. अर्थातच ही चाळणी चाचणी असणार आहे - रोगनिदान नव्हे. या अत्याधुनिक तंत्राबद्दल पुढील प्रतिसादात लिहितो.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Tue, 09/29/2020 - 16:25

Permalink

पुढे चालू..

Image removed. या यंत्रामध्ये सोन्याच्या सूक्ष्मकणांचा (nanoparticles) समावेश आहे. प्रक्रिया अशी होते : कोविडबाधित व्यक्ती यंत्रात श्वास सोडते. त्यामध्ये विशिष्ट रसायने असतात. त्यांचा व सूक्ष्मकणांचा संपर्क आला की विद्युत संदेश तयार होतात. त्यातुन व्यक्ती बाधित असल्याचा संकेत मिळतो. सध्या हे संशोधन चालू असून प्राथमिक पातळीवरील यंत्र तयार झालेले आहे ते वापरून कोविडबाधित आणि निरोगी लोक यांच्या चाचण्या झाल्यात. सध्या हे तंत्र निदानातील अचूकता 76% दाखवत आहे. अधिक प्रयोग व प्रमाणीकरण यातून त्याची अचूकता उंचावेल अशी आशा आहे. मशीन लर्निंग या संकल्पनेवर हे तंत्र आधारित आहे. या विषयावर इथल्या तंत्रज्ञांनी जरूर मत द्यावे. वाचण्यास उत्सुक !
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 09/29/2020 - 22:13

Permalink

धाग्यावर जरासे अवांतर करतो

धाग्यावर जरासे अवांतर करतो आहे, त्यासाठी क्षमस्व. Chief of Chief Minister’s Medical Assistance Cell in Maharashtra breaks down while describing the coronavirus situation in the state HC refuses to intervene in Maha's move to not open temples

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tumse Milne Ki Tamanna Hai... :- [ S. P. Balasubrahmanyam ] Saajan (1991)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 09/29/2020 - 22:16

Permalink

कोरोनाच्या अनियंत्रित

कोरोनाच्या अनियंत्रित फैलावामुळे मुंबईत १०००० बिल्डिंग सिल्ड करण्यात आल्या आहेत. Coronavirus in Mumbai: 10,000 buildings in city sealed to curb spread of COVID-19

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tumse Milne Ki Tamanna Hai... :- [ S. P. Balasubrahmanyam ] Saajan (1991)
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Wed, 09/30/2020 - 11:26

In reply to कोरोनाच्या अनियंत्रित by मदनबाण

Permalink

https://www.loksatta.com

https://www.loksatta.com/mumbai-news/28900-buildings-in-mumbai-free-from-restrictions-zws-70-2288937/ २८,९०० इमारती मुक्त केल्या आहेत. अजुन एक दिलासादायक बातमी. https://www.loksatta.com/desh-videsh-news/for-the-first-time-in-over-a-month-the-corona-death-is-under-a-thousand-abn-97-2288790/
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Tue, 09/29/2020 - 22:58

Permalink

काही विमान तळावर कुत्र्या ची मदत घेतली जात आहे

कुत्रा हा प्राणी corona बाधित व्यक्ती ला अचूक ओळखतो हे खरे आहे का? लक्षण दिसण्या च्यातीन चार दिवस अगोदर च कुत्र ओळखतो बाधित व्यक्ती ला
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 09/30/2020 - 09:27

Permalink

कुत्रा व कोविड..

कुत्रा हा प्राणी corona बाधित व्यक्ती ला अचूक ओळखतो हे खरे आहे का?
कोविडबाधित व्यक्तीच्या शरीरातील चयापचयात काही बदल होतात. त्यातून काही विशिष्ट रसायने तिच्या घामामध्ये उतरतात. या घामाच्या वासावरून कुत्रा ती ओळखू शकेल असे यामागचे तत्व आहे. सध्या हे प्रायोगिक अवस्थेत चालू आहे. काही कुत्र्यांना तसे प्रशिक्षण दिले जात आहे. ऑगस्टमध्ये हा प्रयोग दुबई विमानतळावर करण्यात आला. आता या महिन्यात तो फिनलंड विमानतळावर करण्यात येत आहे. हा कार्यक्रम ऐच्छिक ठेवलेला आहे. या प्रवासात इच्छा असेल तो प्रवासी स्वतःच्या मानेभोवती हात फिरवून जो काय घाम येईल तो एका डिश मध्ये गोळा करतो आणि मग ती डिश कुत्र्यापुढे ठेवली जाते. ते हुंगल्यावर कुत्रा पंजा घासतो, खाली आडवा पडतो किंवा भुंकतो. अद्याप याचे पुरेसे प्रयोग व्हायचे आहेत. कालांतराने चित्र स्पष्ट होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 09/30/2020 - 11:12

In reply to कुत्रा व कोविड.. by हेमंतकुमार

Permalink

भारतातही असे प्रयोग झाले

भारतातही असे प्रयोग झाले पाहिजेत. स्फोटकांच्या बाबत श्वानांचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असल्याने मुंबई पोलिसांच्या जंजीर या भुभु मुळे अनेकांचे प्राण वाचले
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Wed, 09/30/2020 - 12:35

In reply to भारतातही असे प्रयोग झाले by प्रकाश घाटपांडे

Permalink

भारतात ही पण एक गोष्ट झाली

भारतात ही पण एक गोष्ट झाली पाहीजे. https://www.loksatta.com/mumbai-news/ayurveda-modern-medicine-should-do-joint-research-governor-bhagat-singh-koshyari-abn-97-2287820/
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 09/30/2020 - 12:08

Permalink

लस तुलना

कोविडलस निर्मिती, वाहतूक व वितरणातील फायदे/तोटे : तुलना. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 10/01/2020 - 18:59

Permalink

मेंदूविकाराचा झटका

या साथीच्या सुरवातीस हा आजार शक्‍यतो वृद्ध आणि अन्य व्याधीग्रस्तांना होतोय असे चित्र होते. परंतु गेल्या तीन महिन्यांत त्याचे चित्र बदलते आहे. पन्नाशीच्या आतील आणि अन्य आजारविरहित लोकांनाही तो होतोय असे दिसते. अशा काही रुग्णांचे जागतिक अभ्यास आता प्रसिद्ध झालेत. त्यात दखलपात्र असा गट म्हणजे कोविडमुळे मेंदूविकाराचा झटका (स्ट्रोक) आलेले रुग्ण. किंबहुना असा झटका येणे हेच त्यांच्या कोविडचे पहिलेवहिले लक्षण ठरले. या रुग्णांमध्ये आजाराच्या तीव्र दाह प्रक्रियेमुळे प्राधान्याने रक्तगुठळ्या निर्माण होतात. एक विशेष बाब म्हणजे त्यांना श्वसनाचा त्रास होत नाही. थेट मेंदूविकाराचा झटकाच येतो.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 10/01/2020 - 21:09

In reply to मेंदूविकाराचा झटका by हेमंतकुमार

Permalink

या बाबतीत काही प्रिव्हेंटिव्ह

या बाबतीत काही प्रिव्हेंटिव्ह करता येण्यासारखे नसेल तर या माहितीने केवळ घबराट, चिंता पसरेल असं वाटतं का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 10/01/2020 - 22:37

In reply to या बाबतीत काही प्रिव्हेंटिव्ह by गवि

Permalink

+१

असेच वाटले. हेतु माहितीचा असला तरी काळजी चिंता वाढू शकते याच्याशी सहमत. सध्या खट् वाजले तरी काळजी वाटायला लागते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 10/02/2020 - 11:40

In reply to या बाबतीत काही प्रिव्हेंटिव्ह by गवि

Permalink

गवि

गवि मी आपल्याशी अतिशय सहमत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय प्रथितयश तज्ज्ञ सुद्धा या घबराट पसरवण्यात नकळत सहभागी झालेले आहेत. प्रेस्टिट्यूट सनसनाटी बातम्या देताना दिसतात यामुळे लोकांमध्ये घबराट( fear psychosis) पसरवली जाते. पुनर्प्रादुर्भाव ( reinfection ) बद्दल रोज वर्तमान पत्रात काहींना काही येत आहे. भारतात पुनर्प्रादुर्भाव ( reinfection) झालेले चार रुग्ण सापडले यावरून अनेक अतिशय प्रथितयश तज्ज्ञ सुद्धा काळजी घ्या काही सांगता येत नाही म्हणून सर्वत्र बोलत असताना मी त्यांना स्वच्छ शब्दात सुनावले कि हि शक्यता किती आहे ? भारतात ६० लाख रुग्ण आहेत त्यापैकी ४ जणांना झाले. याचा स्पष्ट अर्थ असा आहे कि हि शक्यता एक लाखात एक पेक्षा कमी आहे. आज तुम्ही बाहेर पडलात तर रस्त्यावर अपघाताने किंवा हृदय विकाराने तुमचा मृत्यू होण्याची शक्यता यापेक्षा कितीतरी जास्त आहे. मग तुम्ही अशी विधाने करून लोकात भीती पसरवत आहात असे वाटत नाही का? यावर एकाकडेही उत्तर नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तज्ज्ञांना तोंडावर विचारल्या ज्याबद्दल त्यांच्या कडे उत्तर नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by जिन्क्स on Fri, 10/02/2020 - 19:41

In reply to गवि by सुबोध खरे

Permalink

फसव्या "गुडी गुडी" माहिती

फसव्या "गुडी गुडी" माहिती पेक्षा वास्तविक माहिती घेण्याकडे प्राधान्य हवे. ह्या धाग्याचे तेच प्रयोजन असावे. एकाद्या माहिती बद्दल 1 टक्का जरी शक्यता असेल तरी ती माहिती लोकांपर्यंत पोचायला हवी तेंव्हाच कोरोनाची व्याप्ती समजेल. कोरोनाच्या सुरुवातिच्या काळात तो गंभीर आजार नसून भारतात त्याची लाट येण्याची शक्यता नगण्य आहे अशी माहिती इथेच काही "मान्यवर" सदस्यानी दिली होती. आजचं देशातील चित्र फारच विदारक आहे. तेंव्हा कोरोनाची व्याप्ती समजली नव्हती आणि अजूनही तज्ञ मंडळी आजाराला समजून घेण्याचा प्रयत्नच करत आहेत. म्हणून कोणतेही गृहीतके धरून वंदरलँड मध्ये जगण्यापेक्षा वास्तववादी राहून परिस्थितीला सामोरे जाण्याकडे कल हवा. कुमारजी तुमच्या ह्या धाग्यातून खूप चांगली माहिती मिळत आहे. ह्या धाग्यासाठी आणि तो अद्ययावत ठेवण्यासाठी धन्यवाद. अजून काही उपयुक्त माहिती खालील लिंक मधून मिळेल https://www.zee5.com/hi/news/details/zee-24-taas-exclusive-interview-with-dr-sanjay-oak/0-0-newsauto_5egc3shpleo0
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 10/02/2020 - 20:08

In reply to फसव्या "गुडी गुडी" माहिती by जिन्क्स

Permalink

जिन्क्स,

जिन्क्स, उपयुक्त दुवा. नक्की बघतो. धन्यवाद ! हा आजार निव्वळ “श्वसनाचा” नसून त्याची शरीरातील व्याप्ती खूप मोठी आहे, हे जाणवून द्यावे याच प्रामाणिक उद्देशाने मी ती माहिती दिली आहे. तिच्या संदर्भात १० अभ्यासांतून निघालेला ९००० रुग्णांचा विदा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 10/02/2020 - 20:22

In reply to जिन्क्स, by हेमंतकुमार

Permalink

कोरोनाच्या सुरुवातिच्या काळात

कोरोनाच्या सुरुवातिच्या काळात तो गंभीर आजार नसून भारतात त्याची लाट येण्याची शक्यता नगण्य आहे अशी माहिती इथेच काही "मान्यवर" सदस्यानी दिली होती. अशी माहिती मीच धागा काढून दिली होती. आणि ती जागतिक आरोग्य संघटनेच्या निघणाऱ्या परिपत्रकाची सोपे विश्लेषण लोकांना उपलब्ध व्हावे म्हणून बरेचसे तसेच्या तसे दिले होते. दुर्दैवाने जागतिक आरोग्य संघटनेने इतकी उलट सुलट पत्रके काढून आज दिलेली माहिती उद्या फिरवली होती कि मी साफ तोंडघशी पडलो. याबद्दल अनेक लोकांनी मला ट्रॉल सुद्धा केले/ करत आहेत. ( त्याने मला फरक पडत नाही हा भाग अलाहिदा) अर्थात मला तो धागा लिहिला याचाच खेद आहे. परंतु आजही अनेक बाबतीत इतकी चुकीची माहिती औषध कंपन्यांतर्फे दिली जात आहे कि याबद्दल काही बोलणे / लिहिणे हे मूर्खपणाचे ठरावे. कॉव्हिडच्या भयगंडामुळे हृदयविकार आ णि कर्करोगामुळे उपचाराला उशीर झाल्याने होणारे मृत्त्यू हे कदाचित कॉव्हिडच्या मृत्यू पेक्षा जास्त असतील. उदा Substantial increases in the number of avoidable cancer deaths in England are to be expected as a result of diagnostic delays due to the COVID-19 pandemic in the UK. https://www.thelancet.com/journals/lanonc/article/PIIS1470-2045(20)30388-0/fulltext https://www.financialexpress.com/lifestyle/health/covid-19-and-cardiac-health-delay-in-treatment-diagnosis-due-to-pandemic-impacting-your-hearts-health/2084398/ The CDC and the National Center for Health Statistics report an all-cause provisional death count of almost 1.2 million people between February 1 and June 16, 2020. According to CDC estimates, the predicted number of excess deaths that have occurred within that same time period is between 102,641 and 140,023 people. https://blog.definitivehc.com/effects-of-postponing-essential-care-due-to-covid-19
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 10/03/2020 - 10:01

In reply to कोरोनाच्या सुरुवातिच्या काळात by सुबोध खरे

Permalink

डॉ. खरेसरांच्या निसटत्या बाजू

रुग्णांना आजार आणि उपचार या दोन्हींच्या माहिती बाबत अंधारात ठेवण्याचा एक काळ होता, आजही काही डॉक्टर अशी अपारदार्शकता पाळतात. पण डॉक्टरांसाठी आताशा रुढ होऊ लागलेल्या आदर्श संकेतात रुग्ण आणि नातेवाईकांना पुर्ण माहिती देणे अभिप्रेत समजले जाते किंवा कसे. कोविड१९ ची माहिती प्रत्येक फोन सरशी दिली जाते लोक घाबरत असते तर लोकांनी अधिकतम अंतर मास्क बांधणे हि पथ्ये पाळली असती तसे तर फारसे होताना दिसत नाही. आरोग्य जागरूकता विषयक माहितीचे प्रसारण लोकांना घाबरवण्यासाठी नाही काळजी कशी घ्यावी ह्या बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केले जाते. आरोग्य विषयक लोकशिक्षणाच्या अभावी आजार आणि मृत्यूदर कमी असतील की अधिक असतील ? वुहान चीनमध्ये कोविड बद्दल सावधान करु इच्छित डॉक्टरला असाव विरोध केला गेला माहिती दाबण्याच्या प्रयत्नानेच कोविडचा प्रसार होण्यास हातभार लागला . असंख्य आजारांची माहिती गेली अनेक दशके शालेय शिक्षणातून दिली जाते. असंख्य रुग्ण आणि परिचित गंभीर आजारांच्या स्वरुपाची सहज चर्चा करताना दिसतात. रेडीओ आणि टिव्हीवरून असंख्य आजारांच्या स्वरुपाची चर्चा चालू असते. हा निरंतर लोक शिक्षणाचा भाग आहे, यात माहिती घ्यावी पण उपचार हे डॉक्टरांच्या व्यक्तिगत सल्ल्याने घ्यावेत हे तत्व अंतर्निहीत असते. लोक घाबरतातचे तत्व लावायचे तर शालेय शिक्षण ते निरंतर शिक्षण यातून तयार केली जाणारी सर्व जागरूकतेचे प्रयत्न थांबवावे लागतील. लोक भितील म्हणून त्यांना गाडी काळजीपुर्वक चालव एवढेही सांगता येणार नाही कारण गाडी काळजीपुर्वक न चालवल्यास काय होते हे ही सांगता येणार नाही. लाखात एका प्रकारचा एकच तर अपघात होतो हे म्हणताना अपघाताचे प्रकार हजार असू शकतात आणि एकुण अपघातांची संख्या वाढत असते, लाखात एकालाच होणारे हजार आजार असतील आजाराचा दर सहज १ टक्क्याला पोहोचतो. अगदी लेटेस्ट दुसर्‍या राष्ट्रीय सेरो सर्वेचे निष्कर्ष बघीतले तर कोविड१९ चे रुग्णसंख्या केवळ साठ लाख आहे हे स्वतः आयसीएमाआरलाही मान्य नाही. इतर लोक चुकीची माहिती देतात म्हणायचे आणि डॉक्टरांनी स्वतः माहिती देण्यास विरोध करायचा हे तर्कपुर्ण ठरत नसावे किंवा कसे. लोक आजार होई पर्यंत सांगूनही घाबरत नाही आजार झाल्यावर घाबरतात, याच वाक्याचा दुसरा अर्थ कोणतीही माहिती सांगितली तरी बहुसंख्य लोक प्रत्यक्षात आजारीपडे पर्यंत घाबरत नाहीत.
कॉव्हिडच्या भयगंडामुळे हृदयविकार आ णि कर्करोगामुळे उपचाराला उशीर झाल्याने होणारे मृत्त्यू हे कदाचित कॉव्हिडच्या मृत्यू पेक्षा जास्त असतील.
कोव्हीडची रुग्णसंख्या लोकांच्या भयगंडामुळे नव्हे कोव्हीड पसरू न देण्यासाठी आवश्यक काळजी न घेतली गेल्यामुळे वाढली. सर्वसाधारण वार्षीक मृत्यूदरापेक्षा वार्षीक मृत्यूदर ४० टक्के वाढले असतील तर कोव्हीडची साथ कमी गंभीर कशी ठरते ? उलट लोकांची व्यक्तीगत दक्षता, ट्रेस आणि टेस्टींग कमी पडल्याने रुग्ण शेवटच्या क्षणी येऊन अतीदक्षता विभागाचा ताण वाढत होता. कोविडची साथ पसरू देणे र्‍हुदयरोग रुग्णांना आणि कर्करोग रुग्णांना कसे अधिक सोईचे होते ? कोविडची जोखीम त्यांनाही अधिक नव्हीती की नाही ? म्हणजे दुसरीकडच्या गैरव्यवस्थापनाचे खापर माहिती प्रसारणावर फोडायचे आणि माहितीप्रसारणालाच विरोध करायचा हे चिनी गणित न उमगणारे म्हणावे किंवा कसे
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Sat, 10/03/2020 - 10:27

In reply to डॉ. खरेसरांच्या निसटत्या बाजू by माहितगार

Permalink

काहीतरी गैरसमज होतोय.

काहीतरी गैरसमज होतोय. आजाराविषयी सर्व आवश्यक माहिती, प्रबोधन हे नुसतं चांगलंच नव्हे तर अत्यावश्यक आहे. मुद्दा वेगळाच होता. थेट स्ट्रोकच येतो, किंवा काहीतरी पूर्वकल्पनाच न देता थेट मृत्यू गाठतो आणि अशा बाबतीत आपण काहीतरी वेगळी आगाऊ खबरदारी घेतल्यास ही शक्यता कमी होत असेल तर पूर्ण माहितीसंच एकत्र न आल्यास "निरुपयोगी घबराट" उत्पन्न होऊ शकते. किती लोकांना असे अचानक भयंकर मृत्यू येत आहेत किंवा उपचार करताना आगोदरच रक्त गुठळ्या टाळण्यासाठी काही उपाय होत असतील का वगैरे हे एकत्र दिल्यास त्या भीतीचा सकारात्मक फायदा होईल. काही सामान्य इन्फेक्षन्सनंतर (उदा आतड्यात संसर्ग करणारे तसे सामान्यपणे आढळणारे काही जुलाबजनक bacteria) काही लोकांना न्यूरोलॉजिकल सिन्ड्रोम होतो आणि ते काही काळ लुळे पडतात. अगदी श्वासाचे स्नायूही लुळे पडून व्हेंटिलेटर लागू शकतो. शरीराच्या इम्युन सिस्टीममधे अति उत्तेजना आल्यासारख्या प्रकारामुळे असं होतं अशी थियरी आहे. हे उदा. 1 लाखात दोघांना होऊ शकतं. (दुर्मिळ). ते भयंकर आहे. पण त्यापायी जुलाब होणेच सर्वतोपरी टाळणे, कुठेच बाहेर अन्न न खाणे, सर्व अन्न डिसइफेक्ट करुनच खाणे अशी खबरदारी घ्यावी इतकी ती शक्यता जास्त आहे का? (नाही) इन्फेक्षन झाल्यावर जुलाब सुरु झाले की काही खबरदारी घेऊन हा पुढचा सिन्ड्रोम टळू शकतो का? (नाही) एकदा दुर्दैवाने लुळेपणा सुरु झाला की किती वेळ हाती मिळेल? तेव्हा तातडीने काही उपाय सुरु केल्यास फरक पडतो का? (हो) अशा प्रकारे माहितीसंच आल्यास त्याने घबराट न होता उपाय होईल. कोरोनानंतर स्ट्रोक या बाबत वरील कंसातील उत्तरे वेगळी असू शकतील. ती अजून अज्ञात असू शकतील. तर मग फक्त "कोणतीही लक्षणे न दिसता थेट स्ट्रोक होतो" इतकेच जाहीर करणे हे ब्रेकींग न्यूजसारखे वाटते. सर्वच माहितीबद्दल हे मत नसून त्या विशिष्ट एका प्रतिसादाबद्दल हे विवेचन आहे हे कृपया समजून घ्यावे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 10/03/2020 - 12:42

In reply to डॉ. खरेसरांच्या निसटत्या बाजू by माहितगार

Permalink

@माहितगार

@माहितगार

कॉव्हिडच्या भयगंडामुळे

हृदयविकार आणि कर्करोगामुळे उपचाराला उशीर झाल्याने होणारे मृत्त्यू हे कदाचित कॉव्हिडच्या मृत्यू पेक्षा जास्त असतील. या भयगंडातून डॉक्टर्स ची सुद्धा मुक्ती झालेली नाही. माझ्या माहितीतील पन्नासच्या वर वय असलेले साधारण ४० % तरी विविध हृदयविकार, मेंदू किंवा शल्यक्रिया तज्ज्ञ आपले दवाखाने बंद करून घरी बसले होते. (यामुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाहीत हा एक भाग). आता हेच सर्व डॉक्टर परत दवाखाने उघडून बसले आहेत म्हणजे जेंव्हा खरं तर रुग्ण संख्या कमी होती तेंव्हा यांनी दवाखाने बंद ठेवले होते. आणि आता सहा महिने पूर्ण झाले तेंव्हा काय करणार?म्हणून हळूहळू दवाखाने चालू केले आहेत. काही डॉक्टर रोज भारताच्या कोपऱ्यात कुणीतरी डॉक्टर हुतात्मा झाला याची इत्यंभूत बातमी डॉक्टरांच्या ग्रुप वर टाकत असतात. यामुळे डॉक्टरांमध्येच किती भयगंड पसरतो हे मी रोज पाहतो आहे. दुसरा जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे अनेक वरिष्ठ नागरिक सातत्याने होणाऱ्या प्रचाराने बाहेरच पडलेले नाहीत. (ज्यांना उपचारासाठी बाहेर पडायचे आहे अशा अनेकांची मुले त्यांना बाहेर पडू देत नाहीत हि पण वस्तुस्थिती आहे.) यामुळे त्यांच्या चालू असलेल्या उपचारात खंड पडला आहे याचा परिणाम काय होईल हे येणाऱ्या काळात समजूनच येईल. काही उदाहरणे. लोकल बंद असल्यामुळे अनेक कर्करोगाचे रुग्ण टाटा मध्ये जाऊ शकले नाहीत आणि खाजगी दवाखाने/ रुग्णालये सरकारने जबरदस्तीने कोव्हीड केंद्रात रूपांतरित केल्यामुळे (अशा रुग्णासाठी चालू नसल्यामुळे) लोकांची केमोथेरपी/ रेडिओथेरपी वेळेत होऊ शकली नाही. कित्येक ठिकाणी छातीत दुखत असताना ज्याला अँजियोप्लास्टी करायला हवी होती त्यांना ती करता ना आल्यामुळे रोग बळावण्याची शक्यता बरीच वाढली आहे. एक उदाहरण देतो आहे- एक ६५ वर्षाच्या मध्यमवर्गातील बाई लघवी करायला त्रास होतो म्हणून मागच्या शनिवारी आल्या होत्या. हा त्रास त्यांना जानेवारीपासून होतो आहे. सुरुवातीला आयुर्वेदिक औषधे घेऊन झाली आणि रोग वाढेपर्यंत लॉकडाऊन झाल्यामुळे त्यांनी बाहेर न पडणे पसंत केले. माझ्या कडे आल्या तेंव्हा त्यांना गर्भाशयाच्या तोंडाचा (cervix) कर्करोग झाला आहे आणि तो मुत्राशयापर्यंत पसरून त्यात त्यांच्या डाव्या किडनीची नळी जवळ जवळ बंद झाली असे निदान झाले आहे. अर्थात हा रोग आता स्टेज ३ पर्यंत पोहोचला आहे. मानेला असलेल्या गाठीवर ६ महिने उपचार झाला नाही अशा ३ केसेस आल्या. त्यात २ रुग्णांना क्षयरोग झाल्याचे निदान झाले आणि एका २१ वर्षाच्या मुलीला लिंफोमाचे निदान झाले आहे. एका घरगुती काम करणाऱ्या महिलेला ओव्हरीचा कर्करोग झाला आहे. पण कोणतीही सोसायटी तिला काम करू देत नसल्याने उत्पन्न शून्य आहे आणि लोकल चालू नसल्याने टाटाला जाण्यासाठी प्रत्येक वेळेस टॅक्सी करणे तिला परवडणारे नाही. (टाटा मध्ये किती चकरा माराव्या लागतात याचा मी मागच्या वर्षी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहेच) मी सोनोग्राफी मध्ये १ हजार रुपये सवलत दिली आणि बाकी ८०० रुपये नंतर आणून द्या (ते येतील अशी शक्यता मला तरी वाटत नाही) यापलीकडे मी काय करू शकेन? यात कुणाला दोष देण्याचा हेतू नाही परंतु जी वस्तुस्थिती दिसते आहे ती नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 10/03/2020 - 13:59

In reply to @माहितगार by सुबोध खरे

Permalink

सरजी, पुन्हा एकदा अत्यंत

सरजी, पुन्हा एकदा अत्यंत आदरपुर्वक नमुद करु इच्छितो की, १) काळजी करणे आणि काळजी घेणे यातील फरकांचे महत्व समजून घेणे आणि विषद करण्यात सुज्ञ समाज घटक म्हणून आपण (सर्वजण) कुठे तरी कमी पडल्याचे दिसते आहे. आणि भयगंड आणि संबंधीत परिणामांचे ते खरे कारण आहे. विश्वासार्ह सटीक माहितीचे वितरण नव्हे. २) दुसरा प्रश्न आपत्ती आणि आरोग्य विषयक गैरव्यवस्थापनाचा आहे, त्याचे खापर विश्वासार्ह सटीक माहितीचे वितरणावर फोडणे सयुक्तीक दिसत नाही. ३) आरोग्य विषयक शक्य ती प्रत्येक माहिती मिळवणे आणि सयुक्तीक काळजी घेणे प्रत्येक व्यक्तीचा, कुटूंबांचा आणि समाजाचा नैसर्गिक अधिकार आहे आणि या अधिकाराचा संशोधक आणि आरोग्य सेवकांनी आदर ठेऊन आरोग्य विषयक शक्य ती प्रत्येक माहिती मिळवणे आणि सयुक्तीक काळजी कशी घेतली जाऊ शकेल ते माहितीवर पडदे न टाकता विषद केली पाहीजे ती एक जबाबदार समाज घटकांची नैतिक जबाबदारी आहे. माझे तरी मत उपरोक्त प्रमाणे आहे. असो, मनमोकळ्या चर्चा सहभागासाठी अनेक आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 10/01/2020 - 21:28

Permalink

गवी

गवी आजाराचे विविधांगी व बदलते स्वरूप सर्वांसमोर ठेवणे इतकाच हेतू आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on गुरुवार, 10/01/2020 - 22:03

Permalink

हे पण कारण आहे

the risk Professor Zeberg explained that those who carry these Neanderthal variants have up to three times the risk of requiring mechanical ventilation. "Obviously, factors such as your age and other diseases you may have also affect how severely you are affected by the virus. But among genetic factors, this is the strongest one." The researchers also found that there are major differences in how common these variants are in different parts of the world. In South Asia about 50% of the population carry them. However, in East Asia they're almost absent. It is not yet known why the Neanderthal gene region is associated with increased risk of becoming severely ill. "This is something that we and others are now investigating as quickly as possible," said Professor Pääbo.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 10/02/2020 - 14:42

Permalink

मुले..

आता वयोगटांवर आधारित 2 महत्वाचे प्रश्न पाहू. १. मुलांमध्ये कोविडचे प्रमाण बरेच कमी का आहे ? जेव्हा विषाणू शरीरात घुसतो, तेव्हा त्याविरुद्ध शरीरप्रतिकार दोन टप्प्यांमध्ये होतो. मुलांमध्ये असे होते : a. पहिल्या टप्प्यातच विषाणू जवळजवळ नेस्तनाबूत होतो. b. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील दाहप्रक्रिया सामान्य स्वरूपाची राहते >> आजार जाणवत नाही. याउलट प्रौढांमध्ये असे होते: a. पहिल्या टप्प्यातल्या प्रतिकार मध्यम स्वरूपाचा राहतो. b. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील दाहप्रक्रिया गरजेपेक्षा जास्त उफाळून येते >> शरीर पेशींचा नाश. ………………………………………… सध्या आपण मुलांचा जनसंपर्क ठरवून कमी ठेवलेला आहे. त्याचाही पूरक फायदा.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 10/02/2020 - 14:43

Permalink

वृद्ध ..

२. वृद्धांमध्ये कोविड गंभीर होण्याची शक्यता का वाढते ? वृद्धापकाळी प्रतिकार शक्तीच्या घटकांमध्ये काही लक्षणीय बदल असे होतात : a. ‘T’ पेशींची संख्या खूप रोडावते. या महत्त्वाच्या नियंत्रक पेशी आहेत. b. दाहप्रक्रियेतील काही प्रथिनांचे प्रमाणही बरेच वाढलेले असते >> तीव्र प्रतिक्रिया व गंभीर आजार. c. आणि जर अन्य दीर्घकालीन आजार असतील तर प्र-शक्ती अजूनच दुबळी होते.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Fri, 10/02/2020 - 15:50

Permalink

एक चांगला निर्णय.https://www

एक चांगला निर्णय. https://www.loksatta.com/mumbai-news/recognition-of-ayush-treatment-at-corona-hospital-abn-97-2290938/
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on Fri, 10/02/2020 - 20:27

Permalink

mouth sanitizer spray??

Image removed. AMSARVEDA mouth sanitizer spray covid -19 वर किती प्रभावशाली आहे??? कोणी वापरले आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sat, 10/03/2020 - 09:21

Permalink

...

म मा, +११ सर्वोपचार पद्धती चांगलीच. गोंधळी,
AMSARVEDA
>>> अशा उत्पादनांचे शास्त्रशुद्ध रुग्णप्रयोग झाल्याचे कुठे प्रकाशित केले असल्यासच त्यावर काही मत देता येईल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com