Skip to main content

कोविड१९ : व्याप्ती आणि भवितव्य

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 31/07/2020 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे. या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत: १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज. वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय. आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

वाचने 107712
प्रतिक्रिया 243

प्रतिक्रिया

In reply to by हेमंतकुमार

एकुण किती प्रकार होतात? सध्याच्या वाचनावरून खालील तीन गोष्टींबद्दल चर्चा चालू आहे हे लक्षात येते. त्यांचा परस्पर संबंध अद्याप माझ्या नीटसा लक्ष्यात आलेला नाही. १) सर्वसाधारण प्रतिकार शक्ती २) विशीष्ट विषाणूंना सरावलेली प्रतिकार शक्ती ३) "टि" पेशी

In reply to by माहितगार

प्रतिकारशक्तीचे प्रकार असे आहेत : १. नैसर्गिक (innate) प्रतिकारशक्ती : कुठलाही जंतू शरीरात घुसल्यावर सर्वसाधारण पांढऱ्या पेशी त्यावर प्रतिहल्ला करतात. त्यातून दाह होतो हे काही मिनिटात घडते. २. बऱ्याच वेळा १ मधील कृती पुरेशी ठरते >> आजार होत नाही. पण, ती अपुरी ठरल्यास पुढील यंत्रणा कामाला लागते. ३. आता विशेषज्ञ यंत्रणा कार्यान्वित होते. ती संपूर्णपणे वरील आकृतीत दाखवलीच आहे. T पेशी विशिष्ट विषाणू विरोधी काम करतात. हा १ पेक्षा फरक आहे. ४. त्याचा सारांश : T व B पेशी हे दोन विभाग. T पेशी विषाणू बाधित पेशींना उद्ध्वस्त करतात, तर B पेशी antibodies तयार करतात.

मुंबईतून डॉक्टरांनाच पुर्नसंसर्गाची बातमी येताना दिसते आहे. तुरळक पुर्नसंसर्गाच्या शक्यतांच्या बातम्या सर्वसाधारण लोकांबद्दल जगभरातून येताना येताना दिसल्या तरी डॉक्टरांनाच पुर्नसंसर्गाची बातमी मुंबईतून वाचण्यात येत आहे उर्वरीत जगातील बातमी वाचण्यात अद्यापतरी आले नाही. एकदा संसर्ग होऊन गेला पुन्हा होणार नाही असे गृहीत धरून भारतीय डॉक्टरच बेसावध रहात नाहीएत ना ? पुर्नसंसर्गाचा अभ्यास हा तज्ञ आणि संशोधकांसाठीही क्लिष्ट प्रकार असावा असे दिसते आहे. पुर्नसंसर्गाचा अभ्यास शास्त्रीयपणे व्हावा म्हणून आधीच्या संसर्गचाचणीचे सँपल जपून ठेवणे मग नंतर पुन्हा संसर्ग आढळल्यास आधीच्या आणि नंतरच्या दोन्ही सँपलचे जेनेटीक सिक्वेन्सिंग करणे आणि नंतरच्या संसर्गातील वीषाणू क्रियाशील आहे की अक्रियाशील आहे; आधीचाच आहे की म्युटेट झालेली आवृत्ती आहे हे तपासणे. (सध्या साशंकीत पुर्नसंसर्गा सँपलचे जेनेटीक टेस्टींग होत नाही त्या सुविधा वाढवाव्या लागतील असे दिसते) आणि मग प्रतिकारशक्ती किती प्रभावी ठरते आहे, पुर्नसंसर्ग झालेली व्यक्ती इतरांना संसर्ग प्रसारण किती करेल, लसीकरणावरील प्रभाव काय असतील पुर्नसंसर्ग ह्याचा अभ्यास करणे एकुण प्रकरण क्लिष्ट आहे आणि एकदा संसर्ग होऊन गेलेल्यांनी सावधानता पुढेही बाळगावी असे चित्र तुर्तास दिसते आहे. काही अलिकडील बातम्यांचे दुवे https://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-mumbai-pune… https://theprint.in/opinion/theres-very-good-news-about-coronavirus-imm… https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/can-you-get-the-… https://www.firstpost.com/world/us-sees-first-suspected-case-of-coronav… https://indianexpress.com/article/explained/why-first-reinfection-cases… https://www.nature.com/articles/d41586-020-02506-y https://theswaddle.com/covid19-reinfection-myth-or-not-well-its-complic…

व्यक्तिगत संपर्कातून काही जणांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. तो म्हणजे, सध्याच्या आजारात घडलेल्या काही आश्चर्यकारक घटनांबद्दल. उदाहरणार्थ, एखादे १०३ वर्षाचे गृहस्थ सुद्धा या आजारातून खडखडीत बरे झाले आणि दुसऱ्या टोकाला 35 ते 40 वयोगटातील काहीजण चक्क मृत्युमुखी पण पडले. तर हे असे का ? या संदर्भात “संसर्गजन्य आजारांची सहनशीलता” (tolerance) या संकल्पनेवर गेली पंधरा वर्षे संशोधन चालू आहे. बरेचसे प्रयोग प्राण्यांवर झालेले आहेत आणि मानवी प्रयोगही आता टप्प्याटप्प्याने होत आहेत. समजा, दोन समान वय आणि लिंग असलेल्या व्यक्तींची तुलना आपण करतो आहोत. त्या कोणालाही अन्य कुठला दीर्घ आजार नाही. आता दोघांना एकच जंतुसंसर्ग होतो. त्याचे शरीरातील परिणाम मात्र असे असतात : १. एकाचा आजार अगदी सौम्य किंवा लक्षणविरहीत देखील राहू शकतो, तर २. दुसऱ्याचा आजार अति गंभीर होतो. वरील १ मध्ये शरीरात जंतुविरोधी दाह प्रक्रिया अगदी गरजेइतकीच मोजून-मापून होते. त्याने जंतूंचा नाश तर होतोच आणि शरीरातील बाकीच्या पेशींना इजाही पोहोचत नाही. परंतु २ मध्ये मात्र हीच प्रक्रिया अनियंत्रित किंवा विचित्र प्रकारची (erratic) होते. त्यातून जे ‘वादळ’ उद्भवते. त्यातून शरीरातील अन्य पेशी आणि पर्यायाने अवयवांना देखील इजा पोहोचते. ही प्रक्रिया शरीरातील कशामुळे नियंत्रित केली जाते, त्याचाच हा अभ्यास आहे. कोविडच्या निमित्ताने भविष्यात हे संशोधन अधिक गती घेईल अशी आशा आहे.

सहमत. मास्क ही गरिबांची लस असेही म्हटले जाते !

सध्या या आजाराच्या निदानासाठी जो नाकातील स्वाब घेतात ती प्रक्रिया रुग्णांसाठी काहीशी त्रासदायक ठरते. मध्यंतरी काही कार्यालयात तेथील संपूर्ण कर्मचारी वर्गाचे स्वाब घेतले गेले. त्यातील काहींनी त्या प्रक्रियेनंतर दिवसभर डोके दुखत होते अशी तक्रार केली. आता यावर तोडगा म्हणून रुग्णाच्या लाळेची तपासणी हा एक पर्याय पुढे आलेला आहे. नाकाच्या तुलनेत लाळेची तपासणी ही कमी संवेदनक्षम आहे. सध्या त्याचे काही चाचणी संच परदेशात वापरात आलेले आहेत. यातून आभासी नकारात्मक निष्कर्ष काहीसे अधिक येऊ शकतात हेही खरे. तूर्त चाळणी चाचणी म्हणून ती ठीक आहे. यासंदर्भात इस्राईलमध्ये अजून एक संशोधन चालू आहे. त्यात रुग्णांनी फक्त एक गुळणी डिशमध्ये गोळा करायची आहे. आणि मग spectral तंत्रज्ञान वापरून केवळ एक सेकंदात रोगनिदान करता येईल अशी चाचणी विकसित होत आहे.

मागील भागात हा प्रश्न (प्र. क्र. १४) आलेला आहे. त्यावर आता अधिक संशोधन झाल्याने त्याचे विस्तारित उत्तर इथे देतो. प्र. हा आजार उच्चरक्तदाबाच्या रुग्णांना जेवढा वाईट आहे तेवढा दम्याच्या लोकांना नाही, असे वाचले. हे खरं आहे का ? होय त्यात काही तथ्य आहे. या आजाराचा विषाणू पेशीत शिरताना एका विशिष्ट एंझाइमला ( ACE२) चिकटतो आणि मग पुढील प्रक्रिया होतात. त्यातून आजार उद्भवतो. रक्तदाबाच्या आणि हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये या एंझाइमचे प्रमाण जास्त असते. याउलट ते प्रमाण दम्याच्या बऱ्याच रुग्णांमध्ये कमी असते. अधिक संशोधनातून खालील भर पडली आहे : दम्याचे रुग्णांना अजून एक फायदा होतो. हे रुग्ण तोंडावाटे steroids चा फवारा घेत असतात. या औषधामुळे श्वसनमार्गात ACE२ एन्झाइमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अशा लोकांना कोविड झाल्यास तो बऱ्यापैकी नियंत्रणात राहतो. मात्र धूम्रपानी व्यक्तींत वरील एन्झाइमचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे त्यांचा कोविड अधिक वाईट होऊ शकतो. तसेच अशा व्यक्तींनी धूम्रपान सोडल्याचेही सुपरिणाम दिसले आहेत.

प्रचुर मद्यपान करणारे आणि मधुमेही यांची कोविडशी लढण्याची क्षमता कमी असते का ? काही संशोधन झालयं का यावर ?

In reply to by अनिंद्य

@ अनिंद्य प्रचुर मद्यपान करणारे माझे काही मित्र गंमतीने म्हणतात बाकी लोकं अल्कोहोलचा वापर हात सॅनिटायझ करण्यासाठी करतात, आम्ही त्याचे प्राशन करून शरीर आतूनही सॅनिटायझ करतो 😀 अर्थात त्यातला गमतीचा भाग सोडून देऊ खाली प्रतिसादात कुमार साहेबांनी त्याबद्दल माहिती दिलीच आहे.

In reply to by अनिंद्य

प्राशन करून शरीर आतूनही सॅनिटायझ करतो
थोर लोक 😀 😁

मधुमेही कोविडग्रस्ताचे बाबतीत शरीरात अशा घटना घडतात : १. इन्सुलीनचे उत्पादन कमी होणे, २. शरीर पेशी इन्सुलीनच्या कार्यास दाद न देणे आणि ३. काही कोविडग्रस्त रुग्णालयदाखल व्यक्तींना steroidचे उपचार चालू असतात. हे औषध इन्सुलीनच्या विरोधी गटातील आहे. अशा तऱ्हेने वरील तिहेरी परिणामातून मूळचा मधुमेह अधिक बिघडतो. त्यातून कोविडची गुंतागुंत वाढून तो गंभीर होतो .......................... मद्यपान करणारे >>> त्यांच्यात यकृत (आणि परिणामी अन्य अवयव) किती बिघडले आहे ते पहावे लागेल. सर्वांना लागू असे एक विधान नाही.

लस आणि त्याच्या चाचणीची गुंतागुंत मोठीच असणार नक्की पण सामान्य रुग्णांना लस कधी आणि कितपत effective यावर थोडे लिहाल का?

कोविड विरोधात सध्या ज्या ३ प्रकारच्या लसींचे प्रयोग चालू आहेत त्यांचा तुलनात्मक तक्ता : ok

गेल्या चार दिवसांत Ab8 या नव्या संशोधन- उपचाराबद्दलचे ढकलपत्र बरेच फिरलेले दिसते. म्हणून त्याबद्दलची सद्यस्थिती : १. ही सूक्ष्म आकाराची अँटीबॉडी आहे. २. ती मानवी रक्तातूनच वेगळी काढून विकसित केली आहे. ३. ती सार्स-२ ला मारक आहे. ४. तूर्त तिचे उंदीर व अन्य प्राण्यांवरच प्रयोग झालेले आहेत. त्याचे निष्कर्ष आशादायक आहेत. ५. ती औषध रुपाने शरीरात गेल्यावर मानवी पेशींना इजा करणार नाही. त्यामुळे तिचे दुष्परिणाम कमीत कमी होतील. ६. तिच्या सूक्ष्म आकारामुळे हे औषध नाकाद्वारेही देता येऊ शकेल. ७. तिचा रोगप्रतिबंधक म्हणूनही उपयोग होऊ शकेल.

कुमार१ आपले लेख वाचतो आहे. चायनीज व्हायरोलॉजिस्ट Dr. Li-Meng Yan यांनी कोव्हिड -१९ लॅब मध्ये बनवल्याचा दावा केला आहे, यावरचा एक लेख पाहण्यात आला आहे. Unusual Features of the SARS-CoV-2 Genome Suggesting Sophisticated Laboratory Modification Rather Than Natural Evolution and Delineation of Its Probable Synthetic Route आपल्याला जमल्यास वरील लेखातील आपणास महत्वाचा वाटणारा भाग इथे समजवल्यास आभारी असेन.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलू

मबा, धन्यवाद. संबंधित अहवाल तब्बल 26 पानी आहे. त्यात सूक्ष्मजीवशास्त्र आणि जनुकशास्त्र यातील बरेच किचकट भाग देखील आहेत. मला जमेल तसे मी सवडीने त्यातल्या निवडक भागावर नजर टाकेन. तूर्त एक सांगतो. या विषयावर सहा महिन्यांहून अधिक काळ प्रचंड काथ्याकुट झालेला आहे. तो नैसर्गिकच आहे असे म्हणणारेही काही संशोधन मागे वाचण्यात आले होते. प्रस्तुत संशोधन हेही अपुरेच आहे. तेव्हा हा वाद लवकर मिटेल असे मला काही वाटत नाही. मला मनापासून असे वाटते, की विषाणूचा उगम कसाही असला तरी उपचारांमध्ये असा काय फरक पडणार आहे ? सामान्य माणसाच्या दृष्टीने उपचार आणि प्रतिबंध हेच तरसर्वात महत्त्वाचे आहेत. ‘संशोधन हे निव्वळ संशोधनासाठीच की थेट जनहितार्थ’ असा विचार मनात येतो. अर्थात मी संशोधक नसल्याने ते स्वाभाविक आहे. तरी पण बघतो एक नजर टाकून. मलाही त्यांचा हेतू समजू शकेल. अर्थात वेळ लागेल.

In reply to by हेमंतकुमार

तेव्हा हा वाद लवकर मिटेल असे मला काही वाटत नाही. मला मनापासून असे वाटते, की विषाणूचा उगम कसाही असला तरी उपचारांमध्ये असा काय फरक पडणार आहे ? अगदी मान्य आहे. तरी पण बघतो एक नजर टाकून. मलाही त्यांचा हेतू समजू शकेल. अर्थात वेळ लागेल. काही हरकत नाही, तुम्हाला मी हक्काने विचारु शकतो असे वाटल्यानेच विचारणा केली. विषाणूंच्या रचनेनुसार त्यांचे DNA व RNA असे दोन प्रकार आहेत आणि करोना- २ RNA या प्रकाराचा आहे हे आपल्यामुळेच मला पटकन समजले. :) गेले दीड आठवडा मी विषाणूच्या त्रासातुन जात आहे, हा कोव्हिड आहे का ते ठावूक नाही पण अवस्था बेकार झाली आहे. कमालीचा अशक्तपणा आला आहे. माझ्या बरोबरच माझ्या मातोश्री आणि तिर्थरुपांना देखील हे कष्ट उद्भवले आहेत. काळजी म्हणुन झिंक आणि व्हिटामिन -डी यांचा देखील समावेश औषधात केला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलू

डी डा, धन्यवाद. मबा , प्रथम लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. गरजेनुसार डॉ चा सल्ला अवश्य घ्या. धीर धरून सकारात्मकतेने याला सामोरे जायचे.

In reply to by हेमंतकुमार

गरजेनुसार डॉ चा सल्ला अवश्य घ्या. हो,आमच्या फॅमेली डॉक्टर च्या सल्ल्याने औषधे घेतली आहेत. धन्यवाद.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tera Ghata | Gajendra Verma Ft. Karishma Sharma | Vikram Singh | Official Video

@ मबा संदर्भ त्याचा सारांश : सध्याची महासाथ घडवणारा सार्स-२ हा नक्की कसा उगम पावला याबाबत सध्या दोन थिअरीज आहेत - नैसर्गिक आणि कृत्रिम( प्रयोगशाळेत घडवलेला). १. नैसर्गिक थिअरीनुसार वटवाघूळातील करोना विषाणू आणि माणसातील सार्स-२ यांच्यात 96% जनुकीय साम्य आहे. मूळ वटवाघूळात असलेला हा विषाणू पुढे खवलेमांजरात गेला आणि तिथे त्याची उत्क्रांती झाली. त्यामुळे त्याला माणसात प्रवेश करणे सोपे झाले. बरेच वैज्ञानिक या थिअरीचे समर्थक आहेत. २. आता या थिअरीला प्रस्तुत अहवालातून आव्हान दिले गेले आहे. ३. कृत्रिमची थिअरी मांडणाऱ्या वैज्ञानिकांच्या मते त्यांच्याकडे याचे काही पुरावे आहेत. त्यांच्या थिअरीतील काही मुद्दे असे: a. वटवाघुळातील विषाणू हा पायाभूत म्हणून वापरला गेला. पुढे त्याच्यावर प्रयोगशाळेत बदल केले गेले. त्यामुळे त्याच्या टोकदार प्रथिनाचे गुणधर्म बदलले. b. म्हणून हा विषाणू मानवी शरीरातील एका विशिष्ट एंझाइम शी (ACE 2) संयोग करू शकला. त्यातूनच मानवी आजार घडला. c. एवढेच नाही तर हा आजार प्रचंड संसर्गजन्य, सुरुवातीस कमालीचा लक्षणविरहित आणि पुढे खूप घातक क्षमतेचा झाला. त्यामुळेच सध्याचा हाहाकार घडला. ४. या वैज्ञानिकांनी या अहवालात नैसर्गिक विषाणूवर प्रयोगशाळेत कसे बदल करता येतात याचे साद्यंत वर्णन केलेले आहे. आता यावर नैसर्गिक थिअरीचे समर्थक काय स्पष्टीकरण देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. एकूणच, एकमत होणारा हा विषय नाही. विषयाच्या दोन्ही बाजूंना खंदे समर्थक आहेत.

In reply to by हेमंतकुमार

वैयक्तिक पातळीवर विचार केला तर हा जिवाणू नैसर्गिक आहे कि कृत्रिम आहे याचा फरक पडणार नाही. परंतु जर चीनने हा जैविक अस्त्र म्हणून निर्माण केला असेल तर त्याला जगभर भरपूर (कु)प्रसिद्धी देऊन चीनला त्याची प्रचंड किंमत मोजायला लावणे आवश्यकआहे. असे केले तर एखादे नीच राष्ट्राला/ हुकूमशाहीला जैविक अस्त्र निर्माण करून जगाला वेठीस धरण्याचा विचार करण्यापासून परावृत्त करू शकता. चीनच्या रुग्णांची / मृतांची संख्या ८३ हजार/४५०० नंतर चावी फिरवल्यासारखी कशी बंद झाली आणि आता चीनचा क्रमांक ४३ वर कसा घसरला. ( अर्थात कुणीच यावर विश्वास ठेवत नाही) षडयंत्र गृहीतात (CONSPIRACY THEORY) दोन गोष्टी उद्भवतात- १) चीन मध्ये काही लाख लोक मृत्यू पावले असून त्यांना सरळ जाळून टाकले असावे.वूहान मध्ये प्रचंड मोठी दहनगृहे कित्येक दिवस रात्रंदिवस चालू होते असे उपग्रहाच्या चित्रांवरून दिसून आलेले आहे. २) चीन ने हा विषाणू तयार करण्याबरोबरच लस सुद्धा तयार केली परंतु सार्वत्रिक लसीकरण करेपर्यंत हा विषाणू चुकून प्रयोगशाळेतून बाहेर पडला आणि चीन च्या वूहन प्रांतात पसरला. यानंतर चीनने संपूर्ण लॉक डाऊन केले आणि सार्वत्रिक लसीकरण केले यामुळे हि रुग्ण संख्या वाढली नाही. एखादे वेळेस दोन्ही गोष्टी एकत्र घडल्या असाव्यात. म्हणजे प्रचंड संख्यने लोक मृत्यू पावले तेही लपवून ठेवले आणि सार्वत्रिक लसीकरण ही केले गेले असल्यामुळे साथ लवकर आटोक्यात आली. जैविक अस्त्र निर्मिती बद्दल जगाला हीच शंका आहे कि प्रथम स्वतः साठी लस तयार करायची, आपल्या जनतेला सार्वत्रिक लसीकरण करून सुरक्षित ठेवायचे आणि शत्रूच्या देशात रोगराई पसरवून हाहा:कार माजवायचा. हे काळे धंदे चीनने केले नाहीत असे कोणीही छातीठोकपणे म्हणू शकत नाही. चीन मध्ये काय चालू आहे हे आपल्याला कळणे कधीच शक्य होणार नाही.

In reply to by सुबोध खरे

त्यांच्या कडच्या बातम्या न येणे हे खरेच आश्चर्यकारक आहे. गेले कित्येक दिवस हाच विचार मनात येत आहे. जर त्यांच्या कडे ही साथ आटोक्यात आली असेल तर त्यांनी लस बनवली असण्याची शक्यता आहे, त्या बाबतीत सगळ्या जगाकडुन दबाव आणुन माहीती घेणे आवश्यक आहे. कमीत कमी अमेरिकेकडुन (त्यांची पॉवर लक्शात घेता आणि त्यांच्या कडे ही साथ अजुन आटोक्यात आली नसताना) तरी हे व्हायला हवे.

In reply to by सुबोध खरे

जैविक अस्त्र निर्मिती बद्दल जगाला हीच शंका आहे कि प्रथम स्वतः साठी लस तयार करायची, आपल्या जनतेला सार्वत्रिक लसीकरण करून सुरक्षित ठेवायचे आणि शत्रूच्या देशात रोगराई पसरवून हाहा:कार माजवायचा.
पटण्यासारखं आहे, अगदी एखादं चलचित्र पॉज केल्याप्रमाणे तेथील रुग्ण संख्या संक्रमण अगदी अचानक थांबले आहे, कोणतीच बातमी बाहेर येत नाही. मात्र लस तयार केली असेल असे वाटत नाही. तसे असते तर कदाचित यव आणि त्यव माध्यमांवर दबाव असला तिकडच्या बातम्या बाहेर येत नाही असे सर्व असले तरी काही हेरांकडून अथाव तत्सम व्यवस्थेकडून लशीबाबत बातमी बाहेर आली असती असे वाटते. चीनी लोक मरण पावत असावेत किंवा भारतीयांप्रमाणे उपचार घेऊन बरेही होत असावेत अशीही एक शंका येते. -दिलीप बिरुटे

आमच्या सोसायटीतील एक केस .. दुपारी दीडच्या सुमारास पती घरून डबा घेऊन गेला ( रुग्णालय खाजगी ). ट्रीटमेंटला वीस दिवस झालेले . पत्नीने थोडेसे जेवण केले. पती घरी आला तो फोन " त्या सिरीयस झाल्या आहेत. पती तिथे पोचताच खुलासा त्या आता या जगात नाहीत. फक्त १ तासाचा खेळ ! ( सायटोकाईन स्टॉर्म ......?)

चौरा, यात बऱ्याच शक्यता असतात. रुग्ण समोर नसताना इथून नक्की काय ते सांगता येणार नाही. तसेच अन्य कुठला दीर्घ आजार आहे का हे पाहणे फारच महत्त्वाचे आहे. दोन प्रकारच्या केसेस पाहण्यात आल्या : १. मधुमेही + कोविड झाला. तो बरा झाला पण पुढे हृदयविकाराचा झटका आला व मृत्यू . २. दाह प्रक्रियेतील चढउतार >> अचानक श्वसनअवरोध >> गंभीर होणे, हेही शक्य आहे.

In reply to by हेमंतकुमार

सदर मयत स्त्री फक्त ४० वर्षांची एकदा बारा वर्षे वयाच्या मुलाची आई ! कोणताही दीर्घ आजार नसलेली ! पतीचे आईवडील , पती ,मुलगा सर्व करोनाग्रस्त झाले पण वाचले ! हीच फक्त बळी ठरली . यात असे लक्षात येईल की तिचा अनुवंश या सर्वापेक्षा भिन्न आहे. त्यानुसार काही म्युटेशन होऊन अचानक मरण आले असावे ! पुन्हा माझे " ते वाक्य आलेच ! " ओह गॉड , व्हॉट शाल आय डू टू लीड हेलदी लाइफ ?" चूझ यौवर पेरेंट्स केअरफुली माय सन " द गॉड सेड !!

अग्दी बरोबर . दुसरे उत्तर नाही.

In reply to by हेमंतकुमार

....यात असे लक्षात येईल की तिचा अनुवंश या सर्वापेक्षा भिन्न आहे. त्यानुसार काही म्युटेशन होऊन अचानक मरण आले असावे ! पुन्हा माझे " ते वाक्य आलेच ! " ओह गॉड , व्हॉट शाल आय डू टू लीड हेलदी लाइफ ?" चूझ यौवर पेरेंट्स केअरफुली माय सन " द गॉड सेड !! ...
१) अनुवंशाचा संबंध नाहीच असे नाही तो महत्वाचा घटकही असू शकतो, पण सर्व खापर त्यावर फोडणे कितपत रास्त आहे? गोष्टी केवळ अनुवंशावर अवलंबून असत्यातर ९९ वर्षे अनुवंशाच्या बळावर तगलेला १०० व्या वर्षीही अनुवंशाच्या बळावर तगावयास हवा किंवा कसे आणि तसे नसेल तर गोष्टी केवळ अनुवंशावरही अवलंबून आहेत असे म्हणता येईल का ? २) देवाने म्हटले आणि आपले अनुवंश दाते जन्मदाते सुपिरीयर अनुवंश देऊ शकणारे मिळवता आले तरी इतर अपघाताने अपंगत्व अथवा मृत्यू येऊच शकणार याची शाश्वती देता येऊ शकते का ? ३) सर्वात महत्वाचे समाज म्हणून उपलब्ध ज्ञानाच्या आधारावर उपलब्ध साधनांच्या मर्यादेत एकमेका सहाय्यकरू च्या भावनेने सर्व मानवांनी किमान अंतर, मास्क, आणि प्रत्येक स्पर्ष निर्जंतूकचे तत्व मनापासून अंगिकारले असते तर साथ पसरणे टाळता आले असते - ज्या अनुवंशाच्या बळावर एक स्त्री ४० वर्षे जगू शकली ती कदाचीत अजून दहा वर्षे जगू शकली असती. आणि अशाच ३९% टक्क्याच्या आसपास जो मृत्यूदर गतवर्षापेक्षा वाढला आहे अशा अनेक व्यक्ती अधिक काळ जगू शकल्या असत्या. माणसे अपघातात मरतात हे म्हणणे हा एक भाग झाला अपघात घडण्यामागे कुणाचा कुठेतरी गलथानपणा झाला हे ही एक वास्तव असते ज्याबद्दल समाजाने अधिक संवेदनशीलपणे शीस्तीने अपघात मग रस्त्यावरचे असतील किंवा संसर्गाच्या प्रसाराचे असतील त्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण कारणीभूत होणार नाही याची अधिक दक्षता घ्यावयास हवी किंवा कसे ?

‘टाटा’ समूह आणि CSIR-IGIB यांच्या संयुक्त प्रयत्नाने कोविड१९ च्या निदानासाठी भारतीय बनावटीच्या स्वस्तदर चाचणीला सरकारी मान्यता मिळाली आहे. तिचे शास्त्रीय नाव CRISPR test असून ‘फेलुदा’ या नावाने ती ओळखली जाईल. तिची वैशिष्ट्ये: १. RT-PCR च्या समकक्ष अचूकता २. कमी वेळात निष्कर्ष ३. स्वस्त ४. सुलभ प्रक्रिया संदर्भ

In reply to by हेमंतकुमार

स्तुत्य आणि अभिनंदनीय, ही नवीन चाचणी पद्धती लौकरात लौकर उत्पादन वितरण आणि चाचणी यशात सहभागी होऊ शकेल अशी अपेक्षा करूया.

कोविडमधून बरे झालेल्यांचे प्रमाण आता वाढते आहे ही समाधानाची बाब आहे. याच्या दुसर्‍या टोकाला असेही काही रुग्ण आहेत की ज्यांच्या फुफ्फुसांना तीव्र इजा पोहोचली आहे. त्यामध्ये काही डॉक्टर्स आणि अन्य ‘योद्धे’ यांचाही समावेश आहे. अशा रुग्णांना व्हेंटिलेटर आणि तत्सम कृत्रिम श्वसन उपायांवर ठेवूनही बरे वाटत नाही. अशा गंभीर रुग्णांसाठी एका सर्वोच्च आधुनिक तंत्रज्ञानाचा (ECMO किंवा ELS) वापर केला जातो. जगभरात सध्या २५०० रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. त्यातून बरे झालेल्यांचे प्रमाण 40 ते 50 टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. खूप खर्चिक असलेल्या या तंत्राचा अल्प परिचय करून देतो. हा उपचार म्हणजे थोडक्यात रुग्णाला ‘कृत्रिम हृदय-फुफ्फुस यंत्रणेवर’ ठेवणे. यात नळीद्वारे रुग्णाच्या शरीरातील रक्त काढून ते या यंत्राला पोहोचवले जाते. यंत्रामध्ये त्यातील कार्बन-डाय-ऑक्‍साईड काढून घेऊन त्यात ऑक्सिजन भरला जातो .आता हे ‘शुद्ध’ झालेले रक्त रुग्णाच्या शरीरात पुन्हा नळीद्वारे पोचवले जाते. यामागचा हेतू असा आहे. श्वसनकार्य पूर्णपणे यंत्रावर सोपवल्याने रुग्णाचे फुप्फुसांना विश्रांती मिळते आणि त्यामुळे विषाणूने केलेल्या इजेमधून बरे होण्याची संधी मिळते.

गुणसूत्रे,dna, RNA चे कोड आता माणूस बदलू शकतो त्याला हवा तसा बदल आता माणूस करू शकतो. 3d प्रिंटिंग नी मानवाचे अवयव प्रिंट करू शकतो. कंप्युटर वर कोणत्या ही औषधाची चाचणी घेवू शकतो. मानवी शरीराची प्रती रचना कंप्युटर वर करून. अशा मोठा मोठ्या जाहिराती नावाजलेल्या पत्रिका नेहमी करत असतात. ह्या जाहिराती खऱ्या आहेत असे समजले तर कॅन्सर,मधुमेह,covid अत्यंत किरकोळ आजार आहेत . ते असेच टाइम पास म्हणून बरे करायला पाहिजे होते. पण साधे अत्यंत निकृष्ट काम सफेद केस काळे करणे नवीन केस उगवणे. नवीन दात हवे तेव्हा उगवणे . हे पण अजुन जमत नाही

ह्या टाईम्स ऑफ इंडीया वृत्तानुसार ज्या राज्यात साथीचा प्रसार अधिक आहे तेथिल पॉझीटीव्हचे प्रमाण कमी होण्याची सांख्यिकीय शक्यता दिसते आहे त्याच वेळी इतर काही देशांप्रमाणे साथीची दुसरी लाट येऊ शकते म्हणून सतर्क आणि काळजी घेतली पाहीजे. संघीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (संघीय शब्द संघ सरकारचे या अर्थाने केंद्रीयच्या एवजी वापरलाय) यांनी सनडे संवाद असा काही प्रकार, सोशल मिडीयावरून आलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा स्तुत्य प्रयत्न मागच्या तीन आठवड्यापासून चालू केलाय आणि त्यांच्या युट्यूब उपलब्ध होताहेत. अगदी केशकर्तनालयात काय काळजी घ्यावी अशा प्रकारच्या ते टिकात्मक प्रश्नांना उत्तरे देताना ते दिसतात. अगदी सामान्य नागरीक ते पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना ते उत्तरे देत आहेत. (हे आधी सुरू केले असते तर अधिक बरे झाले असतो) महत्वाचे म्हणजे दुसर्‍या राष्ट्रीय सेरोसर्वेचे निश्कर्ष लौकरच उपलब्ध होताहेत पण अजूनही हर्ड इम्युनिटी प्रकार भारतीयांसाठी दूर आहे आणि त्यामुळे मास्क सुरक्षीत अंतर आणि स्पर्षजन्यचे निर्जंतुकीकरण यावरील भर कमी करू नका जे याबाबतीत निष्काळजी करताहेत ते बरोबर नाही असे त्यांचे म्हणणे दिसते मोदींची भाषणे ऐकल्यावर डॉ.हर्षवर्धनांचा बोलण्याचा वेग कमी वाटणे स्वाभाविक आहे युट्यूबला स्पीड वाढवून ऐकण्याची सुविधा वापरल्यास बोअर न होता त्यांचा व्लॉग श्रवणीय आणि माहितीपूर्ण वाटतो संदर्भ https://timesofindia.indiatimes.com/india/7-day-average-down-9-days-in-… https://youtu.be/-zp_JRl88LU

आता व्हायरस नी स्वतः मध्ये बदल केला आहे आणि आता मास्क, sanitizer, सोशल distance हे नियम कुचकामी झाले आहेत व्हायरस वरील नियम पाळत असाल तरी कोणालाही बाधित करू शकतो . पण त्याची संहारक शक्ती कमी झाली आहे गंभीर परिणाम होण्याचे प्रमाण कमी झाले आहे पण बाधित करण्याची शक्ती वाढली आहे. असे प्रतिष्ठित सायन्स मॅगझिन मध्ये वाचलं आहे. हे खरे आहे का

In reply to by Rajesh188

असे प्रतिष्ठित सायन्स मॅगझिन मध्ये वाचलं आहे.
कोणते मॅगझिन , कोणता लेख इ. माहीती द्याल का ?

18 ऑगस्ट 2020 च्या Lancet मध्ये सार्स-2 विषाणूमधील एका विशिष्ट एका विशिष्ट जनुकीय बदलाचा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. सदर अभ्यास सिंगापूरमधील आहे. त्यानुसार : १.या बदलामुळे होणारा कोविड हा तुलनेने सौम्य आहे. २. मात्र त्यामुळे त्याच्या फैलाव क्षमतेवरील परिणाम अनिश्चित आहे. ३. जगाच्या विविध भागातून या संदर्भातले अधिक अभ्यास व्हायची गरज आहे

In reply to by कानडाऊ योगेशु

बदल होणे हे व्हायरस च्या जीवन चक्र चा भाग असावा . माणसाला त्रास देण्यासाठी ते स्वतः बदलत नसावेत. ह्या जगातील सजीव सृष्टी ची उत्पत्ती ची जिवाणू आणि विषाणू पासून झाली आहे. ते नसतील तर जीव सृष्टी पण नसेल. त्यांना खलनायक ठरवू नका

In reply to by हेमंतकुमार

आता व्हायरस नी स्वतः मध्ये बदल केला आहे आणि आता मास्क, sanitizer, सोशल distance हे नियम कुचकामी झाले आहेत व्हायरस वरील नियम पाळत असाल तरी कोणालाही बाधित करू शकतो .
१) व्हायरसची नवी म्युटेशन आली म्हणजे जुनी कार्यरत व्हर्शन आपोआप अस्तीत्वहीन झाली/ निकामी झाली हा निश्कर्ष राजेश १८८ रावांनी नेमक्या कोणत्या बळावर काढला ? २) मास्क, sanitizer, सोशल distance हे नियम हे सर्व श्वसनजन्य साथीचा प्रसार कमी व्हावा म्हणून उपयूक्त आहे. व्हायरसचे नवे म्युटेशन श्वसनजन्य मार्गानेच पसरत असेल तर मास्क, sanitizer, सोशल distance हे लगेच कुचकामी कसे होतात? सध्या साथ असलेल्या विषाणूने न गचकता माणूस वाचला तरी इतर गंभीर साईड इफेक्टची शक्यता असू शकते असे नव्या वीषाणू म्युटेशन बद्दल नाही याचे कोणते आश्वासन राजेशराव किंवा त्यांनी देऊ केलेल्या संदर्भात उपलब्ध आहे ? मास्क, sanitizer, सोशल distance हे नियम यांचे शक्य तेवढे पालन नेमके, कुणाचेही केवढे मोठे घोडे मारतात की त्याबद्दल अपप्रचारात आणि समाजातील निष्काळजीपणास कारण शोधणारी निष्कर्षघाईकरून हकनाक सामील व्हावे?

आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे ! 🙂

सिरियसली की गमतीने?
>>> त्याकडे दोन्ही अर्थांनी बघता येईल ! यानिमित्ताने पोलिओ लसीचे संशोधक डॉ. Jones Salk यांचे एक अवतरण आठवले : “ जर पृथ्वीवरील सर्व कीटक नाहीसे झाले, तर पन्नास वर्षांत इथले सर्व जीवनच संपेल. पण, जर पृथ्वीवरील मानवजात नष्ट झाली, तर मात्र पुढच्या पन्नास वर्षात इथे सर्व प्रकारची जीवसृष्टी बहरेल !”

“हा संसर्ग झालेल्यापैकी काहींचाच आजार गंभीर का होतो ?” हा लाखमोलाचा प्रश्न आपल्याला सतावतोय. त्याची उकल करण्याचे दृष्टीने अनेक पातळ्यांवर संशोधन चालू आहे. आतापर्यंत गवसलेले काही मुद्दे असे : १. विषाणूंचा हल्ला >> शरीरात विचित्र अँटीबॉडीज (ऑटो अँटीबॉडीज) तयार होतात >> त्या विषाणूचा प्रतिकार करण्याऐवजी आपल्या शरीराच्या प्रतिकार प्रथिनांनाच नष्ट करतात >> प्रतिकारशक्ती दुबळी पडते. २. अशा काही रुग्णांत जनुकीय बिघाड आढळले आहेत. अशा जवळपास 13 जनुकांचा या दृष्टीने अभ्यास चालू आहे. अशा बिघाडाने या व्यक्तींच्या शरीरात interferons ही प्रथिने तयार होत नाहीत. (एरवी ही प्रथिने तयार होऊन विषाणूंचा नाश करतात).

मास्क, sanitizer, सोशल distance हे नियम यांचे शक्य तेवढे पालन नेमके, कुणाचेही केवढे मोठे घोडे मारतात की त्याबद्दल अपप्रचारात आणि समाजातील निष्काळजीपणास कारण शोधणारी निष्कर्षघाईकरून हकनाक सामील व्हावे? सहमत दुर्दैवाने याला दोन प्रकारची लोक विरोध करीत आहेत ( जगभर) १) कॉन्स्पिरसी थेअरी वाले ( एवढी जगभर उलथापालथ होऊन सुद्धा) २) टोकाचे भांडवलशाही...ज्यांना काहीही करून उद्योग धंदे हे चालूच राहिले पाहिजेत असे वाटते आणि त्या साठी ते सार्वजनिक स्वास्थ्याला दुय्यम स्थान द्यायला तयार आहेत ( पण ते हे विसरतात कि भांडवलशाहीत जर ग्राहक सुधृद नसेल तर काय खाक तुमची गोष्ट विकत घेणार) ३) भारतापुरते बोलायचे तर ,,, काहीही करा पण आपली नावडत्या पक्षाचे राज्य आहे ना ... मग फक्त विरोध करा )

कोविडची महासाथ यथावकाश संपेल. मात्र बराच काळ आपल्याला गर्दीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करावे लागेल. सध्या बऱ्याच कार्यालयांत लोकांना आत सोडताना ताप आहे की नाही, हे यंत्राने पहात आहेत. निव्वळ ताप असणे म्हणजे काही कोविडचे निदान नव्हे. तसेच ताप नाही म्हणून कोविडची शक्यता पुसून टाकता येत नाही. यावर उपाय म्हणून तंत्रज्ञांना एका उच्चस्तरीय रोगनिदान तंत्राची कल्पना सुचली आहे. कोविडबाधित व्यक्तीच्या श्वासातुन काही विशिष्ट रसायने ( VOCs) बाहेर पडतात. एक छोटे यंत्र जर आपण नाकाभोवती धरले आणि त्यात श्वास सोडला, तर संबंधित व्यक्ती बाधित आहे की नाही ते कळू शकेल. थोडक्यात, मद्यपी व्यक्ती जशी आपण उच्छवास चाचणी यंत्राने ओळखतो त्याच धर्तीवर ही चाचणी आहे. अर्थातच ही चाळणी चाचणी असणार आहे - रोगनिदान नव्हे. या अत्याधुनिक तंत्राबद्दल पुढील प्रतिसादात लिहितो.

ok या यंत्रामध्ये सोन्याच्या सूक्ष्मकणांचा (nanoparticles) समावेश आहे. प्रक्रिया अशी होते : कोविडबाधित व्यक्ती यंत्रात श्वास सोडते. त्यामध्ये विशिष्ट रसायने असतात. त्यांचा व सूक्ष्मकणांचा संपर्क आला की विद्युत संदेश तयार होतात. त्यातुन व्यक्ती बाधित असल्याचा संकेत मिळतो. सध्या हे संशोधन चालू असून प्राथमिक पातळीवरील यंत्र तयार झालेले आहे ते वापरून कोविडबाधित आणि निरोगी लोक यांच्या चाचण्या झाल्यात. सध्या हे तंत्र निदानातील अचूकता 76% दाखवत आहे. अधिक प्रयोग व प्रमाणीकरण यातून त्याची अचूकता उंचावेल अशी आशा आहे. मशीन लर्निंग या संकल्पनेवर हे तंत्र आधारित आहे. या विषयावर इथल्या तंत्रज्ञांनी जरूर मत द्यावे. वाचण्यास उत्सुक !

धाग्यावर जरासे अवांतर करतो आहे, त्यासाठी क्षमस्व. Chief of Chief Minister’s Medical Assistance Cell in Maharashtra breaks down while describing the coronavirus situation in the state HC refuses to intervene in Maha's move to not open temples

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tumse Milne Ki Tamanna Hai... :- [ S. P. Balasubrahmanyam ] Saajan (1991)

कोरोनाच्या अनियंत्रित फैलावामुळे मुंबईत १०००० बिल्डिंग सिल्ड करण्यात आल्या आहेत. Coronavirus in Mumbai: 10,000 buildings in city sealed to curb spread of COVID-19

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tumse Milne Ki Tamanna Hai... :- [ S. P. Balasubrahmanyam ] Saajan (1991)

In reply to by मदनबाण

https://www.loksatta.com/mumbai-news/28900-buildings-in-mumbai-free-fro… २८,९०० इमारती मुक्त केल्या आहेत. अजुन एक दिलासादायक बातमी. https://www.loksatta.com/desh-videsh-news/for-the-first-time-in-over-a-…

कुत्रा हा प्राणी corona बाधित व्यक्ती ला अचूक ओळखतो हे खरे आहे का? लक्षण दिसण्या च्यातीन चार दिवस अगोदर च कुत्र ओळखतो बाधित व्यक्ती ला

कुत्रा हा प्राणी corona बाधित व्यक्ती ला अचूक ओळखतो हे खरे आहे का?
कोविडबाधित व्यक्तीच्या शरीरातील चयापचयात काही बदल होतात. त्यातून काही विशिष्ट रसायने तिच्या घामामध्ये उतरतात. या घामाच्या वासावरून कुत्रा ती ओळखू शकेल असे यामागचे तत्व आहे. सध्या हे प्रायोगिक अवस्थेत चालू आहे. काही कुत्र्यांना तसे प्रशिक्षण दिले जात आहे. ऑगस्टमध्ये हा प्रयोग दुबई विमानतळावर करण्यात आला. आता या महिन्यात तो फिनलंड विमानतळावर करण्यात येत आहे. हा कार्यक्रम ऐच्छिक ठेवलेला आहे. या प्रवासात इच्छा असेल तो प्रवासी स्वतःच्या मानेभोवती हात फिरवून जो काय घाम येईल तो एका डिश मध्ये गोळा करतो आणि मग ती डिश कुत्र्यापुढे ठेवली जाते. ते हुंगल्यावर कुत्रा पंजा घासतो, खाली आडवा पडतो किंवा भुंकतो. अद्याप याचे पुरेसे प्रयोग व्हायचे आहेत. कालांतराने चित्र स्पष्ट होईल.

In reply to by हेमंतकुमार

भारतातही असे प्रयोग झाले पाहिजेत. स्फोटकांच्या बाबत श्वानांचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असल्याने मुंबई पोलिसांच्या जंजीर या भुभु मुळे अनेकांचे प्राण वाचले

कोविडलस निर्मिती, वाहतूक व वितरणातील फायदे/तोटे : तुलना. ok

या साथीच्या सुरवातीस हा आजार शक्‍यतो वृद्ध आणि अन्य व्याधीग्रस्तांना होतोय असे चित्र होते. परंतु गेल्या तीन महिन्यांत त्याचे चित्र बदलते आहे. पन्नाशीच्या आतील आणि अन्य आजारविरहित लोकांनाही तो होतोय असे दिसते. अशा काही रुग्णांचे जागतिक अभ्यास आता प्रसिद्ध झालेत. त्यात दखलपात्र असा गट म्हणजे कोविडमुळे मेंदूविकाराचा झटका (स्ट्रोक) आलेले रुग्ण. किंबहुना असा झटका येणे हेच त्यांच्या कोविडचे पहिलेवहिले लक्षण ठरले. या रुग्णांमध्ये आजाराच्या तीव्र दाह प्रक्रियेमुळे प्राधान्याने रक्तगुठळ्या निर्माण होतात. एक विशेष बाब म्हणजे त्यांना श्वसनाचा त्रास होत नाही. थेट मेंदूविकाराचा झटकाच येतो.

In reply to by हेमंतकुमार

या बाबतीत काही प्रिव्हेंटिव्ह करता येण्यासारखे नसेल तर या माहितीने केवळ घबराट, चिंता पसरेल असं वाटतं का?

In reply to by गवि

असेच वाटले. हेतु माहितीचा असला तरी काळजी चिंता वाढू शकते याच्याशी सहमत. सध्या खट् वाजले तरी काळजी वाटायला लागते. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

गवि मी आपल्याशी अतिशय सहमत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय प्रथितयश तज्ज्ञ सुद्धा या घबराट पसरवण्यात नकळत सहभागी झालेले आहेत. प्रेस्टिट्यूट सनसनाटी बातम्या देताना दिसतात यामुळे लोकांमध्ये घबराट( fear psychosis) पसरवली जाते. पुनर्प्रादुर्भाव ( reinfection ) बद्दल रोज वर्तमान पत्रात काहींना काही येत आहे. भारतात पुनर्प्रादुर्भाव ( reinfection) झालेले चार रुग्ण सापडले यावरून अनेक अतिशय प्रथितयश तज्ज्ञ सुद्धा काळजी घ्या काही सांगता येत नाही म्हणून सर्वत्र बोलत असताना मी त्यांना स्वच्छ शब्दात सुनावले कि हि शक्यता किती आहे ? भारतात ६० लाख रुग्ण आहेत त्यापैकी ४ जणांना झाले. याचा स्पष्ट अर्थ असा आहे कि हि शक्यता एक लाखात एक पेक्षा कमी आहे. आज तुम्ही बाहेर पडलात तर रस्त्यावर अपघाताने किंवा हृदय विकाराने तुमचा मृत्यू होण्याची शक्यता यापेक्षा कितीतरी जास्त आहे. मग तुम्ही अशी विधाने करून लोकात भीती पसरवत आहात असे वाटत नाही का? यावर एकाकडेही उत्तर नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तज्ज्ञांना तोंडावर विचारल्या ज्याबद्दल त्यांच्या कडे उत्तर नाही.

In reply to by सुबोध खरे

फसव्या "गुडी गुडी" माहिती पेक्षा वास्तविक माहिती घेण्याकडे प्राधान्य हवे. ह्या धाग्याचे तेच प्रयोजन असावे. एकाद्या माहिती बद्दल 1 टक्का जरी शक्यता असेल तरी ती माहिती लोकांपर्यंत पोचायला हवी तेंव्हाच कोरोनाची व्याप्ती समजेल. कोरोनाच्या सुरुवातिच्या काळात तो गंभीर आजार नसून भारतात त्याची लाट येण्याची शक्यता नगण्य आहे अशी माहिती इथेच काही "मान्यवर" सदस्यानी दिली होती. आजचं देशातील चित्र फारच विदारक आहे. तेंव्हा कोरोनाची व्याप्ती समजली नव्हती आणि अजूनही तज्ञ मंडळी आजाराला समजून घेण्याचा प्रयत्नच करत आहेत. म्हणून कोणतेही गृहीतके धरून वंदरलँड मध्ये जगण्यापेक्षा वास्तववादी राहून परिस्थितीला सामोरे जाण्याकडे कल हवा. कुमारजी तुमच्या ह्या धाग्यातून खूप चांगली माहिती मिळत आहे. ह्या धाग्यासाठी आणि तो अद्ययावत ठेवण्यासाठी धन्यवाद. अजून काही उपयुक्त माहिती खालील लिंक मधून मिळेल https://www.zee5.com/hi/news/details/zee-24-taas-exclusive-interview-with-dr-sanjay-oak/0-0-newsauto_5egc3shpleo0

In reply to by जिन्क्स

जिन्क्स, उपयुक्त दुवा. नक्की बघतो. धन्यवाद ! हा आजार निव्वळ “श्वसनाचा” नसून त्याची शरीरातील व्याप्ती खूप मोठी आहे, हे जाणवून द्यावे याच प्रामाणिक उद्देशाने मी ती माहिती दिली आहे. तिच्या संदर्भात १० अभ्यासांतून निघालेला ९००० रुग्णांचा विदा आहे.

In reply to by हेमंतकुमार

कोरोनाच्या सुरुवातिच्या काळात तो गंभीर आजार नसून भारतात त्याची लाट येण्याची शक्यता नगण्य आहे अशी माहिती इथेच काही "मान्यवर" सदस्यानी दिली होती. अशी माहिती मीच धागा काढून दिली होती. आणि ती जागतिक आरोग्य संघटनेच्या निघणाऱ्या परिपत्रकाची सोपे विश्लेषण लोकांना उपलब्ध व्हावे म्हणून बरेचसे तसेच्या तसे दिले होते. दुर्दैवाने जागतिक आरोग्य संघटनेने इतकी उलट सुलट पत्रके काढून आज दिलेली माहिती उद्या फिरवली होती कि मी साफ तोंडघशी पडलो. याबद्दल अनेक लोकांनी मला ट्रॉल सुद्धा केले/ करत आहेत. ( त्याने मला फरक पडत नाही हा भाग अलाहिदा) अर्थात मला तो धागा लिहिला याचाच खेद आहे. परंतु आजही अनेक बाबतीत इतकी चुकीची माहिती औषध कंपन्यांतर्फे दिली जात आहे कि याबद्दल काही बोलणे / लिहिणे हे मूर्खपणाचे ठरावे. कॉव्हिडच्या भयगंडामुळे हृदयविकार आ णि कर्करोगामुळे उपचाराला उशीर झाल्याने होणारे मृत्त्यू हे कदाचित कॉव्हिडच्या मृत्यू पेक्षा जास्त असतील. उदा Substantial increases in the number of avoidable cancer deaths in England are to be expected as a result of diagnostic delays due to the COVID-19 pandemic in the UK. https://www.thelancet.com/journals/lanonc/article/PIIS1470-2045(20)3038… https://www.financialexpress.com/lifestyle/health/covid-19-and-cardiac-… The CDC and the National Center for Health Statistics report an all-cause provisional death count of almost 1.2 million people between February 1 and June 16, 2020. According to CDC estimates, the predicted number of excess deaths that have occurred within that same time period is between 102,641 and 140,023 people. https://blog.definitivehc.com/effects-of-postponing-essential-care-due-…

In reply to by सुबोध खरे

रुग्णांना आजार आणि उपचार या दोन्हींच्या माहिती बाबत अंधारात ठेवण्याचा एक काळ होता, आजही काही डॉक्टर अशी अपारदार्शकता पाळतात. पण डॉक्टरांसाठी आताशा रुढ होऊ लागलेल्या आदर्श संकेतात रुग्ण आणि नातेवाईकांना पुर्ण माहिती देणे अभिप्रेत समजले जाते किंवा कसे. कोविड१९ ची माहिती प्रत्येक फोन सरशी दिली जाते लोक घाबरत असते तर लोकांनी अधिकतम अंतर मास्क बांधणे हि पथ्ये पाळली असती तसे तर फारसे होताना दिसत नाही. आरोग्य जागरूकता विषयक माहितीचे प्रसारण लोकांना घाबरवण्यासाठी नाही काळजी कशी घ्यावी ह्या बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केले जाते. आरोग्य विषयक लोकशिक्षणाच्या अभावी आजार आणि मृत्यूदर कमी असतील की अधिक असतील ? वुहान चीनमध्ये कोविड बद्दल सावधान करु इच्छित डॉक्टरला असाव विरोध केला गेला माहिती दाबण्याच्या प्रयत्नानेच कोविडचा प्रसार होण्यास हातभार लागला . असंख्य आजारांची माहिती गेली अनेक दशके शालेय शिक्षणातून दिली जाते. असंख्य रुग्ण आणि परिचित गंभीर आजारांच्या स्वरुपाची सहज चर्चा करताना दिसतात. रेडीओ आणि टिव्हीवरून असंख्य आजारांच्या स्वरुपाची चर्चा चालू असते. हा निरंतर लोक शिक्षणाचा भाग आहे, यात माहिती घ्यावी पण उपचार हे डॉक्टरांच्या व्यक्तिगत सल्ल्याने घ्यावेत हे तत्व अंतर्निहीत असते. लोक घाबरतातचे तत्व लावायचे तर शालेय शिक्षण ते निरंतर शिक्षण यातून तयार केली जाणारी सर्व जागरूकतेचे प्रयत्न थांबवावे लागतील. लोक भितील म्हणून त्यांना गाडी काळजीपुर्वक चालव एवढेही सांगता येणार नाही कारण गाडी काळजीपुर्वक न चालवल्यास काय होते हे ही सांगता येणार नाही. लाखात एका प्रकारचा एकच तर अपघात होतो हे म्हणताना अपघाताचे प्रकार हजार असू शकतात आणि एकुण अपघातांची संख्या वाढत असते, लाखात एकालाच होणारे हजार आजार असतील आजाराचा दर सहज १ टक्क्याला पोहोचतो. अगदी लेटेस्ट दुसर्‍या राष्ट्रीय सेरो सर्वेचे निष्कर्ष बघीतले तर कोविड१९ चे रुग्णसंख्या केवळ साठ लाख आहे हे स्वतः आयसीएमाआरलाही मान्य नाही. इतर लोक चुकीची माहिती देतात म्हणायचे आणि डॉक्टरांनी स्वतः माहिती देण्यास विरोध करायचा हे तर्कपुर्ण ठरत नसावे किंवा कसे. लोक आजार होई पर्यंत सांगूनही घाबरत नाही आजार झाल्यावर घाबरतात, याच वाक्याचा दुसरा अर्थ कोणतीही माहिती सांगितली तरी बहुसंख्य लोक प्रत्यक्षात आजारीपडे पर्यंत घाबरत नाहीत.
कॉव्हिडच्या भयगंडामुळे हृदयविकार आ णि कर्करोगामुळे उपचाराला उशीर झाल्याने होणारे मृत्त्यू हे कदाचित कॉव्हिडच्या मृत्यू पेक्षा जास्त असतील.
कोव्हीडची रुग्णसंख्या लोकांच्या भयगंडामुळे नव्हे कोव्हीड पसरू न देण्यासाठी आवश्यक काळजी न घेतली गेल्यामुळे वाढली. सर्वसाधारण वार्षीक मृत्यूदरापेक्षा वार्षीक मृत्यूदर ४० टक्के वाढले असतील तर कोव्हीडची साथ कमी गंभीर कशी ठरते ? उलट लोकांची व्यक्तीगत दक्षता, ट्रेस आणि टेस्टींग कमी पडल्याने रुग्ण शेवटच्या क्षणी येऊन अतीदक्षता विभागाचा ताण वाढत होता. कोविडची साथ पसरू देणे र्‍हुदयरोग रुग्णांना आणि कर्करोग रुग्णांना कसे अधिक सोईचे होते ? कोविडची जोखीम त्यांनाही अधिक नव्हीती की नाही ? म्हणजे दुसरीकडच्या गैरव्यवस्थापनाचे खापर माहिती प्रसारणावर फोडायचे आणि माहितीप्रसारणालाच विरोध करायचा हे चिनी गणित न उमगणारे म्हणावे किंवा कसे