Skip to main content

कोविड१९ : व्याप्ती आणि भवितव्य

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 31/07/2020 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे. या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत: १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज. वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय. आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

वाचने 107712
प्रतिक्रिया 243

प्रतिक्रिया

In reply to by माहितगार

काहीतरी गैरसमज होतोय. आजाराविषयी सर्व आवश्यक माहिती, प्रबोधन हे नुसतं चांगलंच नव्हे तर अत्यावश्यक आहे. मुद्दा वेगळाच होता. थेट स्ट्रोकच येतो, किंवा काहीतरी पूर्वकल्पनाच न देता थेट मृत्यू गाठतो आणि अशा बाबतीत आपण काहीतरी वेगळी आगाऊ खबरदारी घेतल्यास ही शक्यता कमी होत असेल तर पूर्ण माहितीसंच एकत्र न आल्यास "निरुपयोगी घबराट" उत्पन्न होऊ शकते. किती लोकांना असे अचानक भयंकर मृत्यू येत आहेत किंवा उपचार करताना आगोदरच रक्त गुठळ्या टाळण्यासाठी काही उपाय होत असतील का वगैरे हे एकत्र दिल्यास त्या भीतीचा सकारात्मक फायदा होईल. काही सामान्य इन्फेक्षन्सनंतर (उदा आतड्यात संसर्ग करणारे तसे सामान्यपणे आढळणारे काही जुलाबजनक bacteria) काही लोकांना न्यूरोलॉजिकल सिन्ड्रोम होतो आणि ते काही काळ लुळे पडतात. अगदी श्वासाचे स्नायूही लुळे पडून व्हेंटिलेटर लागू शकतो. शरीराच्या इम्युन सिस्टीममधे अति उत्तेजना आल्यासारख्या प्रकारामुळे असं होतं अशी थियरी आहे. हे उदा. 1 लाखात दोघांना होऊ शकतं. (दुर्मिळ). ते भयंकर आहे. पण त्यापायी जुलाब होणेच सर्वतोपरी टाळणे, कुठेच बाहेर अन्न न खाणे, सर्व अन्न डिसइफेक्ट करुनच खाणे अशी खबरदारी घ्यावी इतकी ती शक्यता जास्त आहे का? (नाही) इन्फेक्षन झाल्यावर जुलाब सुरु झाले की काही खबरदारी घेऊन हा पुढचा सिन्ड्रोम टळू शकतो का? (नाही) एकदा दुर्दैवाने लुळेपणा सुरु झाला की किती वेळ हाती मिळेल? तेव्हा तातडीने काही उपाय सुरु केल्यास फरक पडतो का? (हो) अशा प्रकारे माहितीसंच आल्यास त्याने घबराट न होता उपाय होईल. कोरोनानंतर स्ट्रोक या बाबत वरील कंसातील उत्तरे वेगळी असू शकतील. ती अजून अज्ञात असू शकतील. तर मग फक्त "कोणतीही लक्षणे न दिसता थेट स्ट्रोक होतो" इतकेच जाहीर करणे हे ब्रेकींग न्यूजसारखे वाटते. सर्वच माहितीबद्दल हे मत नसून त्या विशिष्ट एका प्रतिसादाबद्दल हे विवेचन आहे हे कृपया समजून घ्यावे.

In reply to by माहितगार

@माहितगार

कॉव्हिडच्या भयगंडामुळे

हृदयविकार आणि कर्करोगामुळे उपचाराला उशीर झाल्याने होणारे मृत्त्यू हे कदाचित कॉव्हिडच्या मृत्यू पेक्षा जास्त असतील. या भयगंडातून डॉक्टर्स ची सुद्धा मुक्ती झालेली नाही. माझ्या माहितीतील पन्नासच्या वर वय असलेले साधारण ४० % तरी विविध हृदयविकार, मेंदू किंवा शल्यक्रिया तज्ज्ञ आपले दवाखाने बंद करून घरी बसले होते. (यामुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाहीत हा एक भाग). आता हेच सर्व डॉक्टर परत दवाखाने उघडून बसले आहेत म्हणजे जेंव्हा खरं तर रुग्ण संख्या कमी होती तेंव्हा यांनी दवाखाने बंद ठेवले होते. आणि आता सहा महिने पूर्ण झाले तेंव्हा काय करणार?म्हणून हळूहळू दवाखाने चालू केले आहेत. काही डॉक्टर रोज भारताच्या कोपऱ्यात कुणीतरी डॉक्टर हुतात्मा झाला याची इत्यंभूत बातमी डॉक्टरांच्या ग्रुप वर टाकत असतात. यामुळे डॉक्टरांमध्येच किती भयगंड पसरतो हे मी रोज पाहतो आहे. दुसरा जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे अनेक वरिष्ठ नागरिक सातत्याने होणाऱ्या प्रचाराने बाहेरच पडलेले नाहीत. (ज्यांना उपचारासाठी बाहेर पडायचे आहे अशा अनेकांची मुले त्यांना बाहेर पडू देत नाहीत हि पण वस्तुस्थिती आहे.) यामुळे त्यांच्या चालू असलेल्या उपचारात खंड पडला आहे याचा परिणाम काय होईल हे येणाऱ्या काळात समजूनच येईल. काही उदाहरणे. लोकल बंद असल्यामुळे अनेक कर्करोगाचे रुग्ण टाटा मध्ये जाऊ शकले नाहीत आणि खाजगी दवाखाने/ रुग्णालये सरकारने जबरदस्तीने कोव्हीड केंद्रात रूपांतरित केल्यामुळे (अशा रुग्णासाठी चालू नसल्यामुळे) लोकांची केमोथेरपी/ रेडिओथेरपी वेळेत होऊ शकली नाही. कित्येक ठिकाणी छातीत दुखत असताना ज्याला अँजियोप्लास्टी करायला हवी होती त्यांना ती करता ना आल्यामुळे रोग बळावण्याची शक्यता बरीच वाढली आहे. एक उदाहरण देतो आहे- एक ६५ वर्षाच्या मध्यमवर्गातील बाई लघवी करायला त्रास होतो म्हणून मागच्या शनिवारी आल्या होत्या. हा त्रास त्यांना जानेवारीपासून होतो आहे. सुरुवातीला आयुर्वेदिक औषधे घेऊन झाली आणि रोग वाढेपर्यंत लॉकडाऊन झाल्यामुळे त्यांनी बाहेर न पडणे पसंत केले. माझ्या कडे आल्या तेंव्हा त्यांना गर्भाशयाच्या तोंडाचा (cervix) कर्करोग झाला आहे आणि तो मुत्राशयापर्यंत पसरून त्यात त्यांच्या डाव्या किडनीची नळी जवळ जवळ बंद झाली असे निदान झाले आहे. अर्थात हा रोग आता स्टेज ३ पर्यंत पोहोचला आहे. मानेला असलेल्या गाठीवर ६ महिने उपचार झाला नाही अशा ३ केसेस आल्या. त्यात २ रुग्णांना क्षयरोग झाल्याचे निदान झाले आणि एका २१ वर्षाच्या मुलीला लिंफोमाचे निदान झाले आहे. एका घरगुती काम करणाऱ्या महिलेला ओव्हरीचा कर्करोग झाला आहे. पण कोणतीही सोसायटी तिला काम करू देत नसल्याने उत्पन्न शून्य आहे आणि लोकल चालू नसल्याने टाटाला जाण्यासाठी प्रत्येक वेळेस टॅक्सी करणे तिला परवडणारे नाही. (टाटा मध्ये किती चकरा माराव्या लागतात याचा मी मागच्या वर्षी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहेच) मी सोनोग्राफी मध्ये १ हजार रुपये सवलत दिली आणि बाकी ८०० रुपये नंतर आणून द्या (ते येतील अशी शक्यता मला तरी वाटत नाही) यापलीकडे मी काय करू शकेन? यात कुणाला दोष देण्याचा हेतू नाही परंतु जी वस्तुस्थिती दिसते आहे ती नाकारता येत नाही.

In reply to by सुबोध खरे

सरजी, पुन्हा एकदा अत्यंत आदरपुर्वक नमुद करु इच्छितो की, १) काळजी करणे आणि काळजी घेणे यातील फरकांचे महत्व समजून घेणे आणि विषद करण्यात सुज्ञ समाज घटक म्हणून आपण (सर्वजण) कुठे तरी कमी पडल्याचे दिसते आहे. आणि भयगंड आणि संबंधीत परिणामांचे ते खरे कारण आहे. विश्वासार्ह सटीक माहितीचे वितरण नव्हे. २) दुसरा प्रश्न आपत्ती आणि आरोग्य विषयक गैरव्यवस्थापनाचा आहे, त्याचे खापर विश्वासार्ह सटीक माहितीचे वितरणावर फोडणे सयुक्तीक दिसत नाही. ३) आरोग्य विषयक शक्य ती प्रत्येक माहिती मिळवणे आणि सयुक्तीक काळजी घेणे प्रत्येक व्यक्तीचा, कुटूंबांचा आणि समाजाचा नैसर्गिक अधिकार आहे आणि या अधिकाराचा संशोधक आणि आरोग्य सेवकांनी आदर ठेऊन आरोग्य विषयक शक्य ती प्रत्येक माहिती मिळवणे आणि सयुक्तीक काळजी कशी घेतली जाऊ शकेल ते माहितीवर पडदे न टाकता विषद केली पाहीजे ती एक जबाबदार समाज घटकांची नैतिक जबाबदारी आहे. माझे तरी मत उपरोक्त प्रमाणे आहे. असो, मनमोकळ्या चर्चा सहभागासाठी अनेक आभार.

गवी आजाराचे विविधांगी व बदलते स्वरूप सर्वांसमोर ठेवणे इतकाच हेतू आहे.

the risk Professor Zeberg explained that those who carry these Neanderthal variants have up to three times the risk of requiring mechanical ventilation. "Obviously, factors such as your age and other diseases you may have also affect how severely you are affected by the virus. But among genetic factors, this is the strongest one." The researchers also found that there are major differences in how common these variants are in different parts of the world. In South Asia about 50% of the population carry them. However, in East Asia they're almost absent. It is not yet known why the Neanderthal gene region is associated with increased risk of becoming severely ill. "This is something that we and others are now investigating as quickly as possible," said Professor Pääbo.

आता वयोगटांवर आधारित 2 महत्वाचे प्रश्न पाहू. १. मुलांमध्ये कोविडचे प्रमाण बरेच कमी का आहे ? जेव्हा विषाणू शरीरात घुसतो, तेव्हा त्याविरुद्ध शरीरप्रतिकार दोन टप्प्यांमध्ये होतो. मुलांमध्ये असे होते : a. पहिल्या टप्प्यातच विषाणू जवळजवळ नेस्तनाबूत होतो. b. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील दाहप्रक्रिया सामान्य स्वरूपाची राहते >> आजार जाणवत नाही. याउलट प्रौढांमध्ये असे होते: a. पहिल्या टप्प्यातल्या प्रतिकार मध्यम स्वरूपाचा राहतो. b. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील दाहप्रक्रिया गरजेपेक्षा जास्त उफाळून येते >> शरीर पेशींचा नाश. ………………………………………… सध्या आपण मुलांचा जनसंपर्क ठरवून कमी ठेवलेला आहे. त्याचाही पूरक फायदा.

२. वृद्धांमध्ये कोविड गंभीर होण्याची शक्यता का वाढते ? वृद्धापकाळी प्रतिकार शक्तीच्या घटकांमध्ये काही लक्षणीय बदल असे होतात : a. ‘T’ पेशींची संख्या खूप रोडावते. या महत्त्वाच्या नियंत्रक पेशी आहेत. b. दाहप्रक्रियेतील काही प्रथिनांचे प्रमाणही बरेच वाढलेले असते >> तीव्र प्रतिक्रिया व गंभीर आजार. c. आणि जर अन्य दीर्घकालीन आजार असतील तर प्र-शक्ती अजूनच दुबळी होते.

sparay AMSARVEDA mouth sanitizer spray covid -19 वर किती प्रभावशाली आहे??? कोणी वापरले आहे का?

म मा, +११ सर्वोपचार पद्धती चांगलीच. गोंधळी,
AMSARVEDA
>>> अशा उत्पादनांचे शास्त्रशुद्ध रुग्णप्रयोग झाल्याचे कुठे प्रकाशित केले असल्यासच त्यावर काही मत देता येईल.

या महासाथीचे एक वैशिष्ट्य म्हणजे अधिकतर लोक लक्षणविरहित राहिले, पण त्यांच्यामार्फत बराच फैलाव झाला. हा संसर्ग लक्षणविरहित असण्यासंबंधी बरेच संशोधन होत आहे. त्यापैकी हे एक रोचक वाटले. या प्रतिपादनानुसार सार्स २ चे जे टोकदार प्रथिन आहे ते शरीरातील वेदना जाणवण्याच्या संदेश यंत्रणेला दाबून टाकते. त्यामुळे जरी विषाणू शरीरात वाढत असले तरी संबंधितास वेदना/ त्रास जाणवत नाही. ज्या बाधितांचे बाबतीत विषाणूला असे यश मिळते, ते लोक लक्षणविरहित राहतात. काहीच त्रास न जाणवल्यामुळे ते जरा जास्तच जनसंपर्कात राहतात आणि रोगप्रसार करतात. या संशोधन चमूचे प्रमुख भूलतज्ञ आहेत.

• अमेरिकी अध्यक्षांना कोविडचा उपचार म्हणून Regeneron कंपनीचे अद्याप रुग्णप्रयोग पूर्ण न झालेले औषध दिले गेले आहे. त्याबद्दल माहिती : • हे औषध २ antibodies चे मिश्रण आहे. ते रक्तवाहिनीतून ‘ड्रीप’ पद्धतीने देतात. • ते या विषाणूच्या टोकदार प्रथिनाशी संयोग करून त्याला कमकुवत करते. • गेले चार महिने त्याचे ४ प्रकारच्या अभ्यासगटांवर प्रयोग चालू आहेत. • त्याचे निष्कर्ष समाधानकारक आहेत.

अमेरिकी अध्यक्षांना कोविडचा उपचार म्हणून Regeneron कंपनीचे अद्याप रुग्णप्रयोग पूर्ण न झालेले औषध दिले गेले आहे. + त्याचे निष्कर्ष समाधानकारक आहेत. >> अध्यक्ष back to white house , removed mask ==> सर, ह्या उदाहरणावरून positive निष्कर्ष वा नविन उपचारांची दिशा दिसू शकते का ? जगातील सर्वांत प्रबळ व्यक्तीला दिली जाणारी treatment must tried somewhere with positive results. Some other than scientific global indicator are already in positive trend.....

ह्या उदाहरणावरून positive निष्कर्ष वा नविन उपचारांची दिशा दिसू शकते का ? >>
चांगला प्रश्न. यानिमित्ताने Regeneron कंपनीच्या वरील विशेष औषधाबद्दल लिहितो. हे औषध दोन ताकदवान अँटीबॉडीजचे मिश्रण आहे. शरीरात गेल्यावर या अँटीबॉडीज सार्स-२ च्या टोकदार प्रथिनाशी संयोग करतात. हा विषाणू दरमहा दोन जनुकीय बदल करतोय. मात्र त्या प्रक्रियेत हे प्रथिन टिकून राहते. त्यामुळे या प्रथिनावर आघात करणारी औषधे ही खूप उपयुक्त ठरणार आहेत, कारण ती बदलत्या विषाणूचाही समाचार घेतील. त्यादृष्टीने हे मिश्रण वरदान ठरू शकेल. डिसेंबर 2020 पर्यंत ते मान्यताप्राप्त होऊन बाजारात येण्याची अपेक्षा आहे.

डिसेंबर 2020 पर्यंत ते मान्यताप्राप्त होऊन बाजारात येण्याची अपेक्षा आहे. ==> ++11 दरमहा दोन जनुकीय बदल करतोय==> बहुतेक हा सर्वांत मोठा अड्थळा असावा .

कोविडमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे बाबतीत गरज व आजार-तीव्रतेनुसार केल्या जाणाऱ्या रक्तचाचण्या : ok

एक धक्कादायक बातमी वाचनात आली की IAS सुधाकर शिंदे यांची covid -19 टेस्ट निगेटिव्ह असुनही त्यांच निधन झाल. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/ias-officer-sudhakar… वरील बातमी covid -19 टेस्ट वर संदिग्धता दर्शवनारी आहे की अजुनही टेस्ट foolproof नाही आहेत.

In reply to by गोंधळी

आज आठेकमहिने झाले तरी आपण नक्की अशा टेष्टकिटवर विश्वास ठेवावा यावर मन तयार नाही. साधं सर्दीपडसे वाले अंग कसकस करतात तेही पॉझीटीव येत असतील असे मला वाटते. सालं विश्वासच राहीला नाही. -दिलीप बिरुटे

गोंधळी, बातमी वाचली. Foolproof चा प्रश्न नाही. मुळात RT-PCR + येण्याच्या काही अंगभूत मर्यादा अशा आहेत: नाकातील swab : सुमारे ६५ % घशातील swab : ...... ४० % श्वसनमार्गात खालपर्यंत खोलवर जाऊन नमुना घेतल्यास ते प्रमाण ९४% च्या आसपास असते. पण हे नियमित स्वरुपात करणे शक्य नसते. म्हणून काही वेळेस रुग्णाची प्रत्यक्ष तपासणी, CT इत्यादी प्रतिमाचाचण्या असे सर्व बघून निदान करावे लागते.

प्राडॉ, कुणावरही विश्वास ठेवता येत नाही हे जे तुम्ही म्हणता ते अगदी खरंय. इथे अमेरिकी सरकारचं एक पीडीएफ कागदपत्र आहे : https://www.fda.gov/media/134922/download यांत पान क्रमांक ३९ ( पीडीएफ क्रमांक ४०) वर खालील मजकूर आहे : https://i.imgur.com/zBFVnlA.jpg अधोरेखीत केलेलं वाक्य : Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available, ... याचा अर्थ 'कोविद २०१९-एनसीओव्ही' हा विषाणू आजूनपर्यंत ( म्हणजे १३ जुलै २०२० पर्यंत) पूर्णपणे विलग केला गेला नाही. हे अमेरिकी सरकारचं अधिकृत विधान आहे. तरीपण तो ओळखणाऱ्या चाचण्या मात्र बिनदिक्कीतपणे चालू आहेत. नंतर म्हणे त्यावर लस निघणार आहे. यांस सामान्यजनांच्या भाषेत भंपकपणा म्हणतात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा पै याचा अर्थ 'कोविद २०१९-एनसीओव्ही' हा विषाणू आजूनपर्यंत ( म्हणजे १३ जुलै २०२० पर्यंत) पूर्णपणे विलग केला गेला नाही. हे अमेरिकी सरकारचं अधिकृत विधान आहे. तरीपण तो ओळखणाऱ्या चाचण्या मात्र बिनदिक्कीतपणे चालू आहेत. नंतर म्हणे त्यावर लस निघणार आहे. यांस सामान्यजनांच्या भाषेत भंपकपणा म्हणतात. आपण चुकीचा निष्कर्ष काढलेला आहे. विलग केलेला सार्स कोव्ही २०१९ विषाणू हा कोणत्याही छोट्या मोठ्या प्रयोगशाळेत उपलब्ध नाही जेथे विषाणूची अत्यन्त काटेकोर अशी व्यवस्था नाही (कारण तेथून तो जनतेत पसरु शकतो) परंतु मोठ्या प्रयोगशाळा उदा राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा पुणे (NIV) सारख्या प्रयोगशाळांमध्ये हा उपलब्ध आहे किंवा तेथून तो संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळांसाठी उपलब्ध होऊ शकतो. पहा On January 22, 2020, CDC received a clinical specimen collected from the first reported U.S. patient infected with SARS-CoV-2. CDC immediately placed the specimen into cell culture to grow a sufficient amount of virus for study. SARS-CoV-2, the virus that causes COVID-19, was isolated in the laboratory and is available for research by the scientific and medical community. https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/lab/grows-virus-cell-culture… आणि हि ५ मे ची बातमी आहे.;

In reply to by सुबोध खरे

खरे डॉक्टर, तुम्ही दिलेला दुवा वाचला. यातनं आजूनेक प्रश्न उद्भवतो. जर या विषाणूचा यथोचित नमुना उपलब्ध असेल तर विषाणूरोगविभागाने ( Division of Viral Diseases ) त्या पीडीएफ धारिकेत नकारार्थी उल्लेख का केला आहे? अमेरिकी सरकारच्या रोगनियंत्रण व प्रतिबंध खात्याच्याच दोन विभागांत समन्वय नाही, असा अर्थ निघतो. ब्रिटीश मेडिकल जर्नल मध्ये एक लेख आला आहे : https://www.bmj.com/content/371/bmj.m3925 हा लेख व्यावसायिक वैद्यकीय प्रकाशनात छापायच्या लायकीचा आजिबात नाही. ब्रिटीश मेडिकल जर्नल एक नाणावलेले प्रकाशन आहे. त्यांनी हे असले राजकीय लेख छापायला नकोत. मुरार येवलेकर या मुंबईच्या डॉक्टरने निषेध व्यक्त केला आहे. साहजिकच वैद्यकजगतातले अनेक डॉक्टर लोकं कोविडच्या अस्तित्वाविषयी शंका प्रदर्शित करीत आहेत. वरील लेखाचे प्रतिसाद इथे आहेत : https://www.bmj.com/content/371/bmj.m3925/rapid-responses प्रतिसादांत दोन डॉक्टरांनी 'Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available ....' या विधानाचं स्पष्टीकरण मागितलं आहे. अशी वेळ ब्रिटीश मेडिकल जर्नल वर येणं हेच कोविड हे थोतांड असल्याचं प्रमुख लक्षण आहे. निदान मी तरी तसंच मानतो. बाकी वाचकांची आपापली मर्जी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

दोन डॉक्टरांची राजकीय आणि पूर्वग्रहदूषित वक्तव्ये यापलीकडे त्याच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही.

करोना हे थोतांड आहे. टाळेबंदी हे महाथोतांड आहे. ऐकून धन्य झालो परत एकदा आता किती दिवस उगाळणार हे पैलवान ? बास कि आता. एवढे मेले जगभर कि ते जिवंतच आहेत? आणि त्यांना मोहावी किंवा थर च्या वाळवंटात दडवून ठेवलाय !

In reply to by चौकस२१२

चौकस२१२, १.
ऐकून धन्य झालो परत एकदा
तुम्हांस धन्य व्हायला इतका वेळ लागला हे पाहून अंमळ खेद झाला. पण काही हरकत नाहो. देरसे आये दुरुस्त आये, असं म्हणूया. २.
आता किती दिवस उगाळणार हे पैलवान ?
2019-nCoV चे quantified virus isolates मिळेपर्यंत तरी हेच उगाळायचा बेत आहे. नंतरचं नंतर बघू. ३.
बास कि आता. एवढे मेले जगभर कि ते जिवंतच आहेत? आणि त्यांना मोहावी किंवा थर च्या वाळवंटात दडवून ठेवलाय !
मृत्यूच्या प्रमाणपत्रावर करोनाचा शिक्का मारायला काय थोर अक्कल लागते? असो. मी पहिल्यापासनं करोना हे थोतांड आहे व टाळेबंदी हे महाथोतांड आहे असं म्हणंत होतो. त्या भूमिकेपासनं मी तसूभरही ढळलेलो नाही. याबद्दल मी स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेत आहे. धन्यवाद ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मी पहिल्यापासनं करोना हे थोतांड आहे>>>> ओ गा. पै मागे खफवर तुम्हाला मी जेव्हा सांगितले की तुम्ही करोना रुग्णांची देखभाल (थोडीशी सेवा) करणार का तेव्हा आठवडाभर इकडे फिरकलातच नाहीत. आता सुध्दा तिथे परदेशात असलात तर कोणत्याही करोना सेंटरला भेट देवुन तिथल्या लोकांची तरी सेवा करा की बिनधास्त, घाबरयंचंच नाही. बोला आहात कबुल? आपल्या विटेकर साहेबांना विचारा त्यांच्या मुलाने ती सेवा प्रत्यक्ष केली आहे. आणि जर तुम्ही म्हणताय तर इथे साधी (जनरल) प्रक्टीस करणार्या डॉ. लोकांनी कशाला घाबरुन मुखवटा, पीपीई किट या गर्मीत घालण्याचा अट्टाहास केला असता. त्यात त्यांचा काय वैयक्तीक फायदा?

In reply to by आंबट चिंच

आंबट चिंच, सेवा करायला गेलो आणि मी मेलो म्हणजे? करोना हा फ्ल्यूसारखा आहे. त्याची भीती माझ्यासारख्या हृदयविकारी वा तत्सम पूर्वपीडित लोकांना आहे. बाकीच्यांना नाही. चाचण्या आणि मुखपट्टी यांचा सर्वसाधारण मनुष्यास फुटक्या कवडीइतकाही उपयोग नाही. फ्ल्यूमुळे दरवर्षी हजारोंनी विकारप्रवण लोकांचे मृत्यू होतात. कधी फ्ल्यूची साथ आल्याचं ऐकलंय का? मग करोनाचीच साथ कशी काय आली? आ.न., -गा.पै.

In reply to by सुबोध खरे

खरे डॉक्टर, यु.के.च्या दुव्यांबद्दल धन्यवाद. हा एक दुवा उघडला : https://www.expressandstar.com/news/uk-news/2020/03/03/history-of-major… त्यात स्वाईन फ्ल्यू मुळे २००९/१० साली ४५९ मृत्यू झाल्याचं दिसलं. १९१८/१९ साली स्पॅनिश फ्ल्यू आला होता तेव्हा २,००,००० मृत्यू झाले होते. त्या पार्श्वभूमीवर ४५९ हा अत्यंत किरकोळ आकडा आहे. तरीही स्वाईन फ्ल्यूची 'साथ आल्या'चं म्हंटलं जातं. आता असं बघा की, इंग्लंड व वेल्स मध्ये साध्या फ्ल्यू मुळे दरवर्षी सुमारे १०,००० लोकं मरतात (संदर्भ : https://www.greenwichccg.nhs.uk/News-Publications/news/Pages/Around-10,… ) . पण तरीही साध्या फ्ल्यूची 'साथ आल्या'चं मानीत नाहीत. हा भेदभाव कशामुळे? 'करोनाची साथ आल्या'चं मानावं का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

साध्या फ्ल्यूची 'साथ आल्या'चं मानीत नाहीत. फ्ल्यू चा हंगाम/ सिझन असल्याचे मानले जाते. साथ नाही. याचे कारण हे दरवर्षी थंडीच्या मोसमात तेथेच वातावरण असलेले विषाणू सक्रिय होतात आणि एकाच वेळेस फार मोठ्या लोकसंख्येला प्रादुर्भाव होत नाही. ( खरं तर साथ आणि हंगाम यातील रेषा फार धूसर आहे). शिवाय विषाणूतील जनुकीय बदलामुळे दर वर्षी वेगळी लस तयार करावी लागते याचा खर्च मोठा आहे. या साथीमध्ये साधारण निरोगी माणसांना काहीहि होत नसल्याने आणि रोज मरे त्याला कोण रडे या न्यायाने कायमच असलेल्या फ्ल्यू च्या सीझनकडे थोडे दुर्लक्ष होते हा वस्तुस्थिती. कोव्हीड हा खरं तर एक फ्ल्यू सारखाच आजार आहे परंतु एकाच वेळेस लक्षावधी लोकांना लागण झाली, कोणतेही आजार नसलेले निरोगी तरुण याला बळी पडले आणि सार्वजनिक न्यासावर त्याच्या कहाण्या भडक स्वरूपात रंगवून सांगितल्यामुळे जनमानसात घबराट पसरली आहे.

https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/16102020/0/3/ रुग्णालयांची लोकांना भिती वाटते असे म्ह्टले आहे. इतके दिवस होउन ही लोकांच्या मनातील भिती दुर करता आली नाही हे एक अपयशच.

खरे डॉक्टर,
दोन डॉक्टरांची राजकीय आणि पूर्वग्रहदूषित वक्तव्ये यापलीकडे त्याच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही.
मूळ प्रश्न तसाच आहे. 2019-nCoV खरोखरंच अस्तित्वात आहे का? अमेरिकी सरकारच्या रोगनियंत्रण खात्याचा एक विभाग हो म्हणतोय तर दुसरा नाही म्हणतोय. शक्य झाल्यास तुमचं मत ऐकायला आवडेल. आ.न., -गा.पै.

2019-nCoV खरोखरंच अस्तित्वात आहे का? हो १०० % खात्रीने. पण तो प्रयोगशाळेत मुद्दाम तयार केला (संकरित बियाणे सारखा दोन विषाणूंचे जनुकीय मिलन करून) जैविक शस्त्र म्हणून कि नैसर्गिक याबद्दल सांगता येणार नाही

In reply to by सुबोध खरे

खरे डॉक्टर, हा विषाणू अस्तित्वात असेल तर तो ओळखायची चाचणी नेमकी काय आहे? तिची विश्वासार्हता काय आहे? यावर एखादा लेख जमलं तर लिहा म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.

Covid 19 मास्क वापरणे व सोशियाल अंतर पाळणे आवश्यक आहे. कोव्हीडची रुग्णसंख्या लोकांच्या भयगंडामुळे नव्हे कोव्हीड पसरू न देण्यासाठी आवश्यक काळजी न घेतली गेल्यामुळे वाढली.
Ahmednagar News

खालील दुवे संशोधनातील प्रगतीच्या एका दिशे संदर्भाने विषय तज्ञांसाठी आहेत, संशोधन अद्यापी अपुर्णावस्थेतील असल्याने सर्वसामान्यांनी डॉक्टरी सल्ल्यांशिवाय स्वयंप्रयोग करू नयेत हे वेगळे सांगणे न लगे. * Until Covid-19 vaccine arrives, nitric oxide can cure patients, save lives | Study * Harnessing nitric oxide for preventing, limiting and treating the severe pulmonary consequences of COVID-19 * Nitric oxide supplements: Benefits, effectiveness, and risks citrulline सारखी काही संज्ञा दिसते आहे ज्या बद्दल सामान्य ज्ञानाच्या दृष्टीने तज्ञांकडून अधिक जाणून घेणे आवडेल.

माहीतगार, तुमचा NO याबद्दलचा प्रश्न खूप चांगला आहे. सविस्तर उत्तर तयार करत आहे. जरा वेळाने देईन

नायट्रिक ऑक्साईड (NO) हा वायू श्वसनाद्वारे उपचार म्हणून पूर्वीपासून वापरात आहे. ARDS यासम आजारांत जेव्हा रुग्ण तीव्र ऑक्सीजनन्यून होतात, तेव्हा तातडीचा उपचार (rescue) म्हणून त्याचे महत्त्व प्रस्थापित आहे. कोविड संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून त्याचे रुग्णप्रयोग चालू आहेत. हा वायू जेव्हा श्वसनाद्वारे दिला जातो तेव्हा त्याचे शरीरातील गुणधर्म असे असतात : १. फक्त फुप्फुसातील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात २. दाह प्रतिबंधक ३. रक्तगुठळी प्रतिबंधक ४. श्वासनलिकाना मोकळ्या करणे (bronchodilator) ५. त्याच्या प्रत्यक्ष सार्स-२ विषाणूविरोधी गुणधर्मबाबत अभ्यास चालू आहे. गेल्याच महिन्यात त्याच्या उपचाराबाबत एक मर्यादित रुग्णप्रयोग गरोदर स्त्रियांवर करण्यात आला. या सर्व स्त्रियांना तीव्र कोविड झालेला होता. त्यांना कुठलेही अन्य विषाणूविरोधी औषध दिलेले नव्हते. थेट या वायूचे उपचार 22 दिवस दिले गेले. त्यातून त्यांचा श्वसनअवरोध आणि धाप खूपच सुधारले आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाणही चांगले झाले. अजून मोठ्या प्रमाणावरील ट्रायलस (RCT) झाल्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. पुढे चालू....

सर्व कोविड रुग्णांसाठी NO हा वायू उपचार म्हणून वापरण्यात मात्र काही महत्त्वाच्या अडचणी आहेत : १. हा वायू शरीरात अत्यल्प काळ टिकतो २. तो नाकाद्वारे देणे हे बरेच कटकटीचे काम असते ३. तो खूप महाग आहे. येत्या काही महिन्यात याबाबतचे अधिक संशोधन होईल अशी आशा आहे

In reply to by हेमंतकुमार

डॉ. कुमार, क्लिष्टता टाळून सोप्या शब्दात आकलन सुलभ माहिती देण्यासाठी अनेक आभार.

कोविड विरोधी औषधशोध : घडामोडी १. Remdesivir : एकमेव एफडीए मान्यताप्राप्त औषध. फक्त गंभीर आजाराने रूग्णालयात दाखल असलेल्यांसाठी (ठराविक) शिफारस. उपयुक्ततेबाबत अंतरराष्ट्रीय एकमत नाही. २. Remdesivir + bamlanivimab ही antibody : रूग्णालयात दाखलच्या बाबतीत निष्कर्ष उपयुक्त न निघाल्याने प्रयोग थांबवले. ३. दोन antibodies चे मिश्रण : प्रयोग शेवटच्या टप्प्यात. निष्कर्ष बरेच आशादायक.

हा विषाणू फुफ्फुसावर परीणाम करतो हे माहीत होतो. ह्या बातमीत , त्याचा मेंदुवर देखील परीणाम होतो असे म्हटले आहे. हे कसे काय होते https://www.loksatta.com/desh-videsh-news/brains-of-patients-recovering…

ममा, या बातमीचा मूळ स्त्रोत पाहता सध्या ते संशोधन अन्य तज्ञांच्या परीक्षणातून गेलेले नाही. तथापि, कोविडचा मेंदूवर परिणाम यावर आतापर्यंत ज्या थिअरीज मांडल्या गेल्या आहेत त्या अशा : १. विषाणूचा मेंदु पेशींवर थेट हल्ला २. रक्त गुठळी >> मेंदूचा ऑक्सिजन पुरवठा कमी >> स्ट्रोक. मेंदूच्या शुभ्र भागास (white mater) इजा होणे. ३. या जोडीला जर फुफ्फुसे व यकृतावर देखील परिणाम झाला असेल तर त्याचाही अप्रत्यक्ष परिणाम मेंदूवर होतो. या महत्त्वाच्या विषयावर अधिक संशोधनाची व तज्ञ परीक्षणाची गरज आहे

देशभर आणि महाराष्ट्रात एकूणच रुग्णसंख्या कमी होत आहे, असे दिसत आहे. नेमकं काय घडत असावे त्यामुले हे प्रमाण कमी दिसत आहे, त्याचबरोबर इतर काही देशात पुन्हा लॉकडाऊन केल्याचे बातम्या येतांना दिसत आहे. रुग्णसंख्या प्रमाणाबाहेर वाढत आहे, तर आपल्या देशातील धोका टळत आहे काय ? -दिलीप बिरुटे

प्राडॉ,
तर आपल्या देशातील धोका टळत आहे काय ?
एक मुद्दा ध्यानात घ्यावा. महासाथ कधी एकदम जात नाही. सुरवातीस खूप जोर असतो. >> ओसरतो. >> पुन्हा डोके वर काढते >> पुन्हा ओसरते . हे चक्र किमान २ वर्षे चालते. >>>> तो आजार सामान्य होतो. म्हणजे सध्या आपण वरील चक्रात २ वर आहोत तर अन्य काही देश ३ वर आहेत. सध्या निरीक्षण करूया. ठाम सांगता येत नाही. संयम ठेवावा लागेल.

In reply to by हेमंतकुमार

डॉ.कुमार, जिथे दुसरी किंवा तिसरी लाट येते आहे तिथे आधीच्याच म्युटेशनची लागण झालेल्यांची संख्या किती या बद्दल बातम्यात काही दिसत नाही त्याबद्दल काही अधिक माहिती आहे का?

जोपर्यंत रुग्णसंख्या घटती/स्थिर आहे तोपर्यंत काळजी नसावी. जर का थंडीत वाढ दिसली तर त्यानुसार यथायोग्य निर्णय होईल. नाही तसे झाले तर छानच.

डॉ. कुमार, ड्युक विद्यापीठातील कुणी डॉ. पुरुषोत्तम टाटा म्हणून आहेत त्यांनी मानवी शरीराबाहेर मानवी फुफ्फुसावर प्रयोग करण्याची सक्षमता मिळवल्याचे मागच्या आठवड्यात हे एनडीटीव्ही वृत्त होते. मुलाखतीतून हे मानवी फुफ्फुसावरील प्रयोग आहेत अथवा प्रतिकृतीवरील हे नीटसे लक्षात आले नाही प्रतिकृती असेलतर हुबेहुब पणा कसा साध्य केला आणि मानवी अवयवदानातील असेल तर शरीराबाहेर सक्रीय कसे ठेवले? आणि मानवी अवयवदानातून असेल तर प्रत्येक प्रयोगासाठी वेगळे अवयवदान मिळावयास हवे तेवढाच प्रयोगांचा वेग कमी राहील का? आणि आतापर्यंतच्या प्रयोगाचा आढावा इत्यादी बद्दल जिज्ञासा आहे . एनडीटीव्ही वृत्त युट्यूब दुवा https://www.youtube.com/watch?v=aDGwdHc8lc8

तुमचा दुवा फ्रांस व मुस्लीम ..... हे दाखवतोय !

मागा दुवा पाहिला. सदर संशोधकांनी प्रयोगशाळेमध्ये मानवी फुप्फुसाच्या मूळ पेशींपासून शरीराबाहेर फुप्फुसपेशी तयार केल्या. या पेशी अगदी शरीरातील मानवी पेशी प्रमाणेच असतात. आता त्यांच्यावर प्रत्यक्ष विषाणूचा संसर्ग घडवला आणि ज्या काय रासायनिक घडामोडी होतात त्या अभ्यासल्या. (अवयवदानाचा काहीही संबंध नाही. मानवी अवयव प्रत्यक्ष तयार केला आहे !) हे एक सुंदर अभ्यास प्रारूप आहे. याचा अजून पुढे फायदा आहे. एकदा प्रयोगशाळेत आपल्या डोळ्यांसमोर शरीरातील रासायनिक घडामोडी दिसल्या, की मग तिथेच निरनिराळ्या औषधांचे प्रयोग देखील सुलभपणे करता येतात. सध्या मूळ पेशीच्या संशोधनाने खूपच मोठी मजल मारलेली आहे. हा त्याचा एक सुंदर आविष्कार म्हणता येईल. इथे मिपावर मूळ पेशी या विषयांवर पूर्वी एक सुरेख चर्चा झालेली आहे त्याचा हा दुवा

In reply to by हेमंतकुमार

खरेच छान माहिती आहे. पेशींवरील परिणाम प्रत्यक्षात आणि जवळून अभ्यासता येणे हा मोठाच फायदा म्हणता येईल. त्यांच्या चाचण्यांना लौकर यश यावे अशी इच्छाकरूयात. प्राण्यांवरचे प्रयोगाची स्टेज टाळणे इत्यादी फायदे होतीलच. वीषाणूंचे अस्तीत्व नाकारणारे महाभाग आहेत त्या मंडळींनाही संशोधक खोलात अभ्यास करून माहिती देताहेत याचाही विश्वास देता येईल.

नेहमीच्या ‘फ्लू’ विषाणूंच्या तुलनेत सध्याच्या विषाणू संदर्भात शरीराचा अँटीबॉडीज प्रतिसाद बराच वेगळा व काही वेळेस विचित्र आलेला आहे. काही ठळक मुद्दे : १. सहसा संसर्गनंतर तीन आठवड्यांनी अँटीबॉडीची पातळी चांगली असते. सध्याच्या संसर्गात अगदी 10 ते 12 व्या दिवसापासून देखील अँटीबॉडीची पातळी मोजण्याइतकी दिसून आली. २. अँटीबॉडी चाचणी ++ असतानाही काही रुग्ण RT-PCR + दाखवत आहेत. ३. शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजपैकी काही ठराविकच विषाणूमारक प्रकारच्या आहेत. पण त्यामुळे प्रत्येक रुग्णाला भावी संरक्षण मिळेलच असे नाही. काहींच्या बाबतीत तर त्यांनी शरीराला अधिक इजा घडवली. त्यामुळेच मूळ आजार वाढत गेला. ४. एखाद्या व्यक्तीत अँटीबॉडीज असल्या तरीही तो इतरांसाठी रोगप्रसारक ठरू शकतो. त्यामुळे या चाचणीकडे ‘सुरक्षा चाचणी’ म्हणून पाहता येणार नाही. (काही लोक कामवाल्या व्यक्तींना बोलावण्यासाठी याचा आधार घेत आहेत). या चाचणीतून आपण सुरक्षेबाबत खात्रीशीर काही बोलू शकत नाही.

In reply to by हेमंतकुमार

डॉ. कुमार क्र. २ आणि ४ महत्वाचे मुद्दे वाटतात, यांचा विचार मला वाटते डोळस स'तर्क'तेने व्हावयास हवा का. शरीरात अँटीबॉडी असल्या आणि त्यांनी वीषाणू विरोधी 'यशस्वी झूंज' दिली तरी झूंज चालू असतानाच्या कालावधीत शरीरात प्रयत्नरत वीषाणू असणारच आणि ते संक्रमित होऊ शकणार असेच काहीसे आपल्याला म्हणायचे आहे का? या वरून आठवले, माननीय पंप्रच्यां एका सभेसाठी कोविड होऊन गेलेल्या पोलीसांना सुरक्षेसाठी वापरल्याची बातमी होती तेव्हा मला हाच प्रश्न पडला होता.

झूंज चालू असतानाच्या कालावधीत शरीरात प्रयत्नरत वीषाणू असणारच आणि ते संक्रमित होऊ शकणार
होय, बरोबर. खास करून ज्यांच्यात अँटीबॉडीज लवकर निर्माण होताहेत ते तर बऱ्यापैकी विषाणू घेऊन असतात.

कोविडवरील प्रभावी औषधाचा शोध चालूच आहे. आज अखेर सुमारे तीनशे औषधांचे शास्त्रीय रुग्ण प्रयोग चालू आहेत. त्यापैकी एक रोचक असल्याने लिहितो. या औषधाचे नाव आहे cannabidiol (CBD). मुळात ते Cannabis sativa या वनस्पतीपासून मिळवले जाते. शुद्ध मराठीत ही आहे भांग ! ok या औषधाला विषाणू विरोधी आणि दाहप्रतिबंधक गुणधर्म आहेत. हे औषध विशिष्ट मेंदू विकारांसाठी याआधीच वापरात आहे. सध्याचे त्याचे प्रयोग आता शेवटच्या टप्प्यात आहेत

In reply to by हेमंतकुमार

प्रतिसाद माहितीपूर्ण आहे. आभार. -दिलीप बिरुटे

या विषाणूमुळे छोट्या रक्तवाहिन्यांच्या अस्तराला इजा होते. >>> दाह. त्यातून संबंधित अवयवांना इजा पोहोचते, ही मूलभूत गोष्ट आहे. काही तुरळक रुग्णांच्या बाबतीत कानाच्या आतील एका नाजूक भागाला इजा झाल्याचे आढळले आहे. यावर अधिक अभ्यास चालू आहे. अर्थात अजून दोन्ही गोष्टींचा कार्यकारणभाव पुरेसा सिद्ध झालेला नाही

आजच्या लोकसत्ता नागपूर आवृत्तीत एक बातमी होती. गरम पाणी आणि काढ्याच्या अतिरेकामुळे धडधाकट व्यक्तींनाही नवे आजार. विषाणू शरीरात शिरल्यावर घशाच्या त्वचेवर फार काळ राहत नाही, लगेचच तो पेशीमधे प्रवेश करतो. त्यामूले काढा, गरमपाण्याची वाफ किंवा गरम पाणी घेतल्याने विषाणूपासून प्रतिबंध होण्याबाबत कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. तेव्हा या गैरसमजांना बळी पडू नये असा सल्ला डॉ.भूमकर यांनी दिला आहे. खरं तर आता आठ महिन्यानंतर अशा बातम्या येणे म्हणजे फार उशीर झालेला असतो. करोनाचा प्रतिबंध म्हणून आत्तापर्यंत लोकांनी काय काय उपाय केले असतील हे त्यांना आणि देवांनाच ठाऊक. विषाणू प्रतिबंधासाठी मधे मधे मालेगावचा काढ्याबद्दल असेच बोलले जात होते, नंतर मूळव्याधाच्या बातम्या येऊ लागल्या. खरं तर लोकांची काहीही चूक नसते, आरोग्यासाठी महत्वाचे म्हणजे जीव वाचविण्यासाठी असे सर्व प्रयोग होत असतात आणि नव्या आजाराची सुरुवात झालेली असते. -दिलीप बिरुटे

वरील दोन्ही प्रतिसादांशी सहमत. योग्य त्या सल्ल्याविन्या केलेले स्व-उपचार तापदायक ठरतात.

टाटा उद्योगाने तयार केलेली ‘फेलुदा’ ही कोविड निदानाची चाचणी (RT-PCR ला समकक्ष ) आता उपलब्ध झाली आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे 75 मिनिटात तिचा निकाल मिळतो. ती प्रयोगशाळेत करायला तुलनेने खूप सोपी आहे. महिन्याला दहा लाख चाचण्या करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. बातमी https://www.thehindu.com/news/national/tatamd-launches-new-test-for-covi...

फायझर कंपनीच्या अत्याधुनिक लशीसाठी पडद्यामागे राहून ज्यांनी काम केले ते वैज्ञानिक आहेत डॉ. उगुर साहीन व डॉ. उझ्लेम तुरेसी. अल्प परिचय इथे :