संवाद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन जणांचं एकमेकांशी चालणारं संभाषण येतं. पण खरं तर आपला सर्वाधिक संवाद हा आपल्या स्वतःशीच सुरू असतो. आपल्या मनात येणारे विचार हाही या संवादाचाच एक भाग झाला. कधी हा संवाद विचारांच्या रूपात असतो, कधी भावनेच्या, पण तो बहुतेक सारा वेळ सुरूच असतो खरा!
काळे ढग आणि बरसणारा पाऊस पाहून कोणाला त्या पावसात चिंब भिजण्याची इच्छा होते, कोणी छत्री शोधू लागतो, कोणी भज्यांची फर्माईश करतो आणि कोणाला कालिदासाचा मेघदूत आठवतो. तोच पाऊस ह्या वेगवेगळ्या गोष्टी कसा साधतो? कारण त्याने वेगवेगळ्या मनांची वेगवेगळी तार छेडलेली असते. मनाच्या तारा जेव्हा सुरांत झंकारल्या जातात तेव्हा सुरेख सुरावट उमटते. पण जेव्हा वरचेवर त्यांचे सूर बिनसतात तेव्हा? आपले विचार आपल्यालाच नकोसे वाटतात तेव्हा? त्यांचा त्रास कधी आपल्याला स्वतःला, कधी इतरांना होतो तेव्हा? "तुला नाही जमणार, तोंडघशी पडशील गेल्या वेळसारखं" असं म्हणून कधी आपलंच मन आपल्याला संधी नाकारतं, तर कधी रागावर ताबा ठेवायचं शेकडो वेळा ठरवूनही आपल्याला कळायच्या आत जळजळीत काटेरी शब्द आपल्या तोंडून निघतात. नाती तोडण्याची आपली इच्छा नसते खरं तर, पण नात्यांमधले पूल अश्या शब्दांनी पार कोलमडतात. कधी निराशेचा काळा अंधार इतका घेरतो की प्रयत्नाचं पाऊल पुढे टाकायला समोर उजेडच दिसत नाही. कधी नोकरी, कधी लग्न, कधी तब्बेत, कधी पूर्ण आयुष्यावर निराशेचे हे काळे ढग येतात. "हे असंच राहणार, काहीच, कधीच नाही बदलणार" असं सतत आत ऐकू येत राहतं. "मला काही झालं तर? माझ्या मुलांचं कसं होईल…." "छे छे असं काही नाही होणार!" "पण झालं तर! माझ्या मित्राच्या भावाचं नाही का अगदी अचानक असं झालं!" असे उलटसुलट विचार जाता जात नाहीत. आणि अजून जवळही न आलेल्या संकटाच्या भीतीने, दुःखाने आधीच हातपाय गळतात. आपल्या अंतर्मनात होणाऱ्या या संवादाचा त्रास तर आपल्याला होत असतो. पण या विसंवादाचा सुसंवाद कसा करायचा?
आपल्याला सार्यांना ही उपजत बुद्धी असते. पण कधी सवयीने, कधी चुकीच्या उदाहरणांमुळे, कधी आयुष्यातील तणावांमुळे त्यावर पुटं चढतात. हे सदर ही पुटं हटवून ह्या आपल्या विसंवादाचा सुसंवाद करण्यासाठी आहे. सध्याच्या काळात कोणाच्या मनात व्हायरसची भीती आहे, कोणाला नोकरी धंद्याची काळजी आहे, काही नाती विस्कटली आहेत आणि कधी सगळं ठीकठाक असूनही आत काहीतरी खुपतंय. माझ्या मानसोपचाराच्या अनुभवांतून आणि अभ्यासातून मी काही साचे (ज्याला आम्ही ट्रीटमेंट प्रोटोकॉल म्हणतो) तयार केले आहेत. मनातील गुंता स्वतःचा स्वतः सोडवायला हे साचे आपल्याला उपयोगी पडतील अशी आशा आहे.
मनाच्या विसंवादामध्ये एक मोठा भाग असतो भीतीचा. असं झालं तर? तसं होईल का? अश्या प्रकारचे विचार मनाला घेरतातं आणि भीतीचा अंमल वाढत जातो. भीती, भय याला आपण सहसा नकारात्मक दृष्टीने पाहतो पण खरं तर काही प्रमाणात भीती ही आवश्यकच आहे. वानराचा नर होण्याच्या उत्क्रांतीमध्ये मानव तग धरू शकला कारण वेगवेगळे आणि मोठे अधिक बलवान प्राणी, नैसर्गिक संकटं यांपासून असलेला धोका मानवाने ओळखला. त्या धोक्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने निरनिराळ्या शकला लढवल्या, योजना आखल्या आणि त्या अंमलात आणल्या. योग्य प्रमाणात असलेल्या भीतीमुळे माणूस सुरक्षिततेसाठी प्रयत्न करतो, पण भीती जर प्रमाणाबाहेर वाढली तर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. भीतीने ग्रस्त लोकांमध्ये छातीत धडधडणं, घसा कोरडा पडणं, पोटात मळमळणं, उलट्या, जुलाब होणं, वारंवार टॉयलेटला जायची गरज आहे असं वाटणं, डोकं दुखणं, झोप उडणं, सतत अस्वस्थ वाटत राहणं यापैकी एक किंवा अधिक लक्षणं दिसून येतात. यावर उपाय कसा करायचा हे आपल्याला पाहायचं आहे.
वैद्यकीय शिक्षणाचं पहिलं दीड वर्ष, आठवड्यातले बहुतेक दिवस आम्ही शवविच्छेदन करून शरीर आत कसं असतं, शरीराचे सारे व्यापार कसे चालतात ही शिकत असू. कारण उपचार करण्या आधी गोष्टी सामान्यतः कश्या चालतात हे समजून घेणं फार आवश्यक आहे. अगदी हेच मनोविकारांनाही लागू आहे. म्हणूनच या सदरांमध्ये आपण भय, नैराश्य, तणाव इत्यादी विकारांकडे पाहताना आधी ते समजून घेऊन मग उपचार कसा करायचा हे पाहणार आहोत. समस्येला आधी नीट समजून घेणं, त्याविषयीची माहिती मिळवणं ही उपचाराची पहिली पायरीच म्हणता येईल.
अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीने ग्रासलेल्या असतात. भीतीचे मुख्य प्रकार समजून घेऊया.
• फोबिया (विशिष्ट गोष्टीची किंवा परिस्थितीची भीती)
• Generalised Anxiety Disorder (जी ए डी किंवा प्रत्येक गोष्टीची धास्ती)
• हेल्थ anxiety (आरोग्याबद्दलची, आजारांची भीती)
• सोशल anxiety (समूहामध्ये वावरण्याची भीती)
• पॅनिक डिसऑर्डर (भीतीचा तीव्र झटका)
सर्वपरिचित असणारा भीतीचा प्रकार म्हणजे फोबिया – एखाद्या विशिष्ट वस्तू/ प्राणी किंवा परिस्थितीशी निगडीत असलेलं भय. उदाहरणार्थ पाण्याची, उंचीची, कीटकांची, सापांची, बंदिस्त जागांची वाटणारी तीव्र भीती. सापांचा फोबिया असणारी व्यक्ती माळरानात, गवतात तर चालायला जात नाहीच, पण प्राणी संग्रहालयातील बंदिस्त पेट्यांमधील साप पाहणंही अश्या व्यक्तीला अशक्य असतं.
भीतीचा दुसरा प्रकार म्हणजे जीएडी (GAD) किंवा प्रत्येक गोष्टीची – प्रत्येक गोष्ट विपरीत झाली तर अशी सतत वाटणारी धास्ती. या प्रकारात मोडणाऱ्या बहुतेक व्यक्ती या सदैव काहीना काही कारणाने चिंताग्रस्त असतात. आणि अशी काळजी करणं आवश्यकच आहे असं यातल्या बहुतेकांचं मत असतं. हा मनोविकारांचा एक प्रकार आहे यांची कल्पनाच नसल्यामुळे त्यावर उपाय योजना करणं लांबच राहतं.
सध्याच्या व्हायरस मुळे पुढच्या काही वर्षांत ज्या एका प्रकारच्या भीतीचं प्रमाण वाढणार आहे तो प्रकार म्हणजे हेल्थ anxiety. या रोगाला पूर्वी हायपोकोंड्रिया म्हटलं जात असे. हेल्थ anxiety च्या व्यक्तींना स्वतःच्या आरोग्याविषयी खूपच चिंता वाटत असते. आपल्याला हा रोग तर नाही ना तो रोग तर नाही ना अश्या अवाजवी काळजीने त्यांचं मन सतत ग्रासलेलं असतं.
सर्वत्र भरपूर दिसून येणारा आणि तरीही कमी परिचित असणारा भीतीचा प्रकार आहे सोशल anxiety किंवा समूहामध्ये वावरण्याची भीती. अनोळखी लोकांशी बोलणं अश्या व्यक्तीना नकोसं वाटतं, बरेचदा या व्यक्तीना ओळखीच्या अनेक लोकांशी एकत्र भेटण्याची, बोलण्याची, उठण्या-बसण्याची वेळ आली (उदाहरणार्थ पार्टी / मीटिंग / पिकनिक) की त्यांना त्याचं अतिशय दडपण येतं. मग ते सहसा असे कार्यक्रम टाळतात किंवा कोणाचीतरी सोबत घट्ट पकडून ठेवतात. लाजरा स्वभाव या लेबलखाली दडून गेल्यामुळे कित्येक व्यक्तींच्या या रोगाचं निदानच होत नाही.
भीतीचा थोडा कमी परिचित असणारा प्रकार म्हणजे पॅनिक डिसऑर्डर. या व्यक्तींना भीतीचा तीव्र झटका हा अचानक कधीही येऊ शकतो. या झटक्यांच्या वेळी त्यांना वाटणारी भीती, जसं “मी आत्ताच्या आत्ता मरेन/ माझ्या शरीराचे तुकडे होतील / मला फिट येईल" इतरांना तर्कहीन, बिनबुडाची वाटते पण त्या व्यक्तींसाठी मात्र ती अतिशय तीव्र असते.
भीती किंवा चिंता (Anxiety) या मनोविकाराचे हे काही प्रमुख प्रकार आहेत. एकाच व्यक्तीला एकाहून अधिक प्रकारची भीती असणं किंवा भीती आणि नैराश्य असणं हेसुद्धा बरेचदा दिसून येतं. पुढच्या भागांमध्ये पाहूया की या भीतीशी टप्प्याटप्प्याने मुकाबला कसा करायचा ...
डॉ. माधुरी ठाकूर
https://drmadhurithakur.blogspot.com/2020/08/1.html?m=1
वाचने
37510
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वागत....!
+1 हेच म्हणायचंय.
In reply to स्वागत....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खुप अभ्यासपूर्ण लेखन.अभिनंदन
रोचक. पुभाप्र.
या अतिशय महत्त्वाच्या पण
सुबोध, आपण म्हणता ते अगदी खरं
In reply to या अतिशय महत्त्वाच्या पण by सुबोध खरे
माणसाचं आयुष्य सर्वाधीक प्रभावीत करणारा विषय.
आपल्या प्रतिक्रियेकरिता
In reply to माणसाचं आयुष्य सर्वाधीक प्रभावीत करणारा विषय. by अर्धवटराव
आभार
आभार
@ डॉ. माधुरी ठाकूर : तुम्ही मानसशास्त्राच्या डॉक्टर आहात का ?
चपखल!
In reply to @ डॉ. माधुरी ठाकूर : तुम्ही मानसशास्त्राच्या डॉक्टर आहात का ? by संजय क्षीरसागर
है शाबास
@ सुबोध खरे : आता बोललाच आहात तर तुम्हाला लाईट पाडतो !
In reply to है शाबास by सुबोध खरे
आम्ही कशाला मुद्दा भरकटवू.
In reply to @ सुबोध खरे : आता बोललाच आहात तर तुम्हाला लाईट पाडतो ! by संजय क्षीरसागर
@ सुबोध खरे : जे लिहिलंय ते तुमच्या अंडरस्टँडींग पलिकडे आहे
In reply to आम्ही कशाला मुद्दा भरकटवू. by सुबोध खरे
जे लिहिलंय ते तुमच्या
In reply to @ सुबोध खरे : जे लिहिलंय ते तुमच्या अंडरस्टँडींग पलिकडे आहे by संजय क्षीरसागर
@ सुबोध खरे : अध्यात्मात अजिबात रस नसलेली व्यक्ती
In reply to जे लिहिलंय ते तुमच्या by सुबोध खरे
जाणीव वर्टीकल व्हायला
In reply to @ सुबोध खरे : अध्यात्मात अजिबात रस नसलेली व्यक्ती by संजय क्षीरसागर
@ सुबोध खरे : बरीच मजल गाठायचीये अजून तुम्हाला !
In reply to जाणीव वर्टीकल व्हायला by सुबोध खरे
मग आडवं पडलं कि जाणीव
In reply to @ सुबोध खरे : बरीच मजल गाठायचीये अजून तुम्हाला ! by संजय क्षीरसागर
३. लेखकाचा अप्रिय आठवणींमुळे
In reply to @ सुबोध खरे : जे लिहिलंय ते तुमच्या अंडरस्टँडींग पलिकडे आहे by संजय क्षीरसागर
@ शाम भागवत : बरे प्रकटलात !
In reply to ३. लेखकाचा अप्रिय आठवणींमुळे by शाम भागवत
ॐ शांती ॐ
In reply to @ शाम भागवत : बरे प्रकटलात ! by संजय क्षीरसागर
तुमचं अगदीच कल्पना दारिद्र्य
In reply to @ शाम भागवत : बरे प्रकटलात ! by संजय क्षीरसागर
राफेल? ;)
In reply to तुमचं अगदीच कल्पना दारिद्र्य by सुबोध खरे
संक्षी
In reply to @ सुबोध खरे : आता बोललाच आहात तर तुम्हाला लाईट पाडतो ! by संजय क्षीरसागर
@ चौकस२१२ : खर्यांचे प्रतिसाद वाचा आणि
In reply to संक्षी by चौकस२१२
१:१० विक्रम गोखले टू नाना
In reply to @ चौकस२१२ : खर्यांचे प्रतिसाद वाचा आणि by संजय क्षीरसागर
@ चौकस२१२ : ?
In reply to १:१० विक्रम गोखले टू नाना by चौकस२१२
- 'प्रत्त्येक विषयात आपल्याला
In reply to @ चौकस२१२ : ? by संजय क्षीरसागर
ह्म्म..
In reply to संक्षी by चौकस२१२
वाह, क्या बात है!
In reply to @ सुबोध खरे : आता बोललाच आहात तर तुम्हाला लाईट पाडतो ! by संजय क्षीरसागर
शरीर
In reply to वाह, क्या बात है! by सोत्रि
अहं
In reply to शरीर by शा वि कु
माझं म्हणणं
In reply to अहं by सोत्रि
@ शा वि कु : एका क्षणात अनुभव येईल !
In reply to माझं म्हणणं by शा वि कु
हम्म.
In reply to @ शा वि कु : एका क्षणात अनुभव येईल ! by संजय क्षीरसागर
@ शा वि कु : आपला आणि न्यूरो सिस्टमचा संबंध
In reply to हम्म. by शा वि कु
मुळात शरीर नावाची कुठलीच गोष्ट अस्तित्वात नाहि
In reply to शरीर by शा वि कु
सर्वात महत्वाचं...
In reply to मुळात शरीर नावाची कुठलीच गोष्ट अस्तित्वात नाहि by अर्धवटराव
बरोबर.
In reply to सर्वात महत्वाचं... by अर्धवटराव
पण मायक्रो असण्याने मॅक्रो का रद्द करावा ?
In reply to बरोबर. by शा वि कु
भीतीच्या ह्या सर्व प्रकारातील
Dr. मैडम आपन खुप छान संमजावत
लेख वाचुन असे वाटले कि लेखात
अगदी हेच म्हणतेय
अगदी हेच म्हणतेय
अगदी हेच म्हणतेय
छान सुरवात. पु.भा.प्र.
डॉ खरे, आपण हे लक्षात ठेवूया
डॉ खरे, आपण हे लक्षात ठेवूया
डॉ खरे, आपण हे लक्षात ठेवूया
डॉ खरे, आपण हे लक्षात ठेवूया
आपण हे लक्ष्यात ठेवूया की
In reply to डॉ खरे, आपण हे लक्षात ठेवूया by आनन्दा
वाचतोय...
माहितीपुर्ण लेख!!!
ताई तुम्ही यांचे मिपावरतीच
In reply to माहितीपुर्ण लेख!!! by वीणा३
आणि मानसशास्त्रांच्या अभ्यासक
In reply to माहितीपुर्ण लेख!!! by वीणा३
@ शाम भागवत : चर्चा वाढवत नेण्यासाठी
In reply to आणि मानसशास्त्रांच्या अभ्यासक by शाम भागवत
ॐ शांती ॐ
In reply to @ शाम भागवत : चर्चा वाढवत नेण्यासाठी by संजय क्षीरसागर
याचा साधा अर्थ तुम्हाला
In reply to ॐ शांती ॐ by शाम भागवत
मी तर बाॅ एकदाच “शांती“
In reply to याचा साधा अर्थ तुम्हाला by सुबोध खरे
@ शाम भागवत : पुन्हा चुकलात !
In reply to मी तर बाॅ एकदाच “शांती“ by शाम भागवत
:) ॐ शांती ॐ
In reply to @ शाम भागवत : पुन्हा चुकलात ! by संजय क्षीरसागर
वाचतोय. तुमचे मागील लेखही
अवांतर : संक्षी यांना प्रश्न - मन म्हणजे नक्की काय
@ गामा पैलवान : वॉट अ वंडरफुल क्वेस्टशन गामाश्री !
In reply to अवांतर : संक्षी यांना प्रश्न - मन म्हणजे नक्की काय by गामा पैलवान
सगळे संत-महंत, सगळी सायकीअ
In reply to @ गामा पैलवान : वॉट अ वंडरफुल क्वेस्टशन गामाश्री ! by संजय क्षीरसागर
@ सुबोध खरे : एकतर तुम्ही संपूर्ण प्रतिसाद वाचत नाही
In reply to सगळे संत-महंत, सगळी सायकीअ by सुबोध खरे
श्री सर्वज्ञ संक्षी
In reply to @ सुबोध खरे : एकतर तुम्ही संपूर्ण प्रतिसाद वाचत नाही by संजय क्षीरसागर
Can fMRI Read your Mind ?
In reply to श्री सर्वज्ञ संक्षी by सुबोध खरे
@ सुबोध खरे : तुमचा प्रतिसाद व्यक्तिगत असला तरी
In reply to श्री सर्वज्ञ संक्षी by सुबोध खरे
हा हा हा
In reply to @ सुबोध खरे : तुमचा प्रतिसाद व्यक्तिगत असला तरी by संजय क्षीरसागर
मी
च हुशार चालू द्यातुमच्या लिंक्स बोगस असतात
In reply to हा हा हा by सुबोध खरे
मन नसेल तर पार्श्वभूमी कोण पुरवणार
In reply to @ गामा पैलवान : वॉट अ वंडरफुल क्वेस्टशन गामाश्री ! by संजय क्षीरसागर
@ गामा पैलवान : या चर्चेच्या निमित्तानं तुम्ही
In reply to मन नसेल तर पार्श्वभूमी कोण पुरवणार by गामा पैलवान
मौज अशी की लेखिका
In reply to @ गामा पैलवान : या चर्चेच्या निमित्तानं तुम्ही by संजय क्षीरसागर
@ सुबोध खरे : लिहिलंय ते शुद्ध मराठीत आहे
In reply to मौज अशी की लेखिका by सुबोध खरे
एकदा कळलं की स्वतःलाच शाबासकी
In reply to @ सुबोध खरे : लिहिलंय ते शुद्ध मराठीत आहे by संजय क्षीरसागर
गा पै साहेब
@ सुबोध खरे : अरे व्वा,
In reply to गा पै साहेब by सुबोध खरे
नेपाळी देवनागरी स्क्रीप्टमधे लिहितात
In reply to @ सुबोध खरे : अरे व्वा, by संजय क्षीरसागर
हे मन पण नेपाळी आहे :)
In reply to गा पै साहेब by सुबोध खरे
पण वाचता येतं आणि समजत नसेल
स्वतःच्या अस्तित्वाची भीती
शिवाय...
In reply to स्वतःच्या अस्तित्वाची भीती by Rajesh188
मन अस्तित्वात आहे (किंव तसं मानावं तरी लागतं)
@ गामा पैलवान : पुनश्च उत्तम प्रश्ण !
In reply to मन अस्तित्वात आहे (किंव तसं मानावं तरी लागतं) by गामा पैलवान
जागृतावस्थेतून निद्रावस्थेत