Skip to main content

बटाट्याचे उपयोग

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 09/12/2019 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
बाटाट्याचे उपयोग स्वयंपाकघरात गाल फुगवून बसला होता बटाटा अंगावरल्या डोळ्यांनी मला पाहत होता || माझ्याशी बोलायला लागला तो जेव्हा खरे नाही वाटले मला तेव्हा तुम्हालाही वाटेल मी सांगे हा प्रसंग खोटा || " खाण्यामध्ये उपयोग माझे आहेत खूप मोठे तरी तुम्ही का बोलतात डोक्यात आहे कांदे बटाटे नाकाने सोलाल कांदे तर आहे तुमचाच तोटा || कांद्याचे वाढले ना रे बाजारी भाव चढ्या दराने गंजले सारे रंकराव आता मला आला आहे मान मोठा || कधीही मी कामी येई जेव्हा नसे भाजी ताजी कोणत्याही भाजीत मिसळून जाण्या मी राजी बहुगुणी असा सगळ्या भाज्यांत शहाणा मोठा || माझी करा रस्सा भाजी सुकी भाजी मटार बटाटा भाजी किंवा करा मिक्स भाजी नाहीतर पाव भाजी कुकरमध्ये उकडून घ्या किंवा मेथी पालकात टाका || खिचडीत टाका बघा चव कशी छान न्यारी वांगी बटाटा भाजी आवडीने खातात सारी माझ्यासवे बनवा सार भाजी घेवून टमाटा || माझे बनवा वेफर्स, फिंगर चिप्स, काप कापून छोटे उद्योग झालेत मोठे त्या साऱ्याला विकून पिकवून शेतकरी व्यापारी हाती मोजती नोटा || " इतक्यात घाईने आई आली स्वयंपाकघरात प्रश्न विचारी आज काय देवू तुला डब्यात? बटाटा कर मी म्हटले अन केला त्याला बाय बाय टाटा || - पाषाणभेद ०९/१२/२०१९

वाचने 4809
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

कृपया कवितेचे शिर्षक "बटाट्याचे उपयोग" असे वाचावे. ( संपादकांना विनंती आहे की आपण शिर्षकात बदल करावा.)

छान कविता. बा द वे निर्महला सिथारामन यांना पाठवायला हवी ही कविता. कारण त्यांच्या घरी त्या कांदा वापरत नाही, त्यामुळे त्या त्यांच्या डोक्यातील बटाटे काढून, त्याचा त्या घरी बराच उपयोग करू शकतील.

छान लिहिलंय. जिथे काही कमी तिथे बटाटा.